Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ब्ल्यू लाइन रिक्षांचा महिलांसाठी प्रस्ताव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी होण्यासाठी आता नागरिकही अनेक स्मार्ट प्रस्ताव विविध माध्यमांतून पुढे ठेवत आहे. महिलांच्या सक्षम‌िकरणासाठी जयपूर पॅटर्नचा प्रस्ताव एका संस्थेच्या अध्यक्षांनी दिला व त्याला आपल्या पत्राची जोड देत आमदार जयवंत जाधव यांनी परिवहन आयुक्तांकडे पाठवला आहे. या प्रस्तावात महिलांच्या सक्षम‌िकरणासाठी नाशिकमध्ये जयपूर पॅटर्नच्या ब्ल्यू लाइन रिक्षा असाव्या अशी मागणी करण्यात आली आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती सुरसे यांनी हे निवेदन दिले आहे. त्यावर अवलोकन व्हावे असेही आमदार जाधव यांनी म्हटले आहे. सुरसे यांनी निवदेनात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी योजनेतंर्गत या ब्ल्यू लाइन रिक्षा चालविण्याची महिलांना परवानगी दिली तर त्याचा फायदा महिला सक्षम‌िकरणासाठी होईल. या रिक्षा महिला चालकांमार्फत चालवल्या जातील. शासनाने यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण देवून रिक्षा परमिट द्यावेत.

या महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळ अथवा शासनाच्या इतर महामंडळामार्फत रिक्षा घेण्यासाठी वित्त सहाय्य उपलब्ध करून द्यावे. सदर संस्था शासनाच्या योजनांमार्फत महिलांना चालकांचे प्रशिक्षण देण्यास तयार असून महिलांना कॉल सेंटर मार्फत व्यवसाय उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही म्हटले आहे. शहरात अशा रिक्षा सुरू झाल्यातर महिलांना रोजगार उपलब्ध होणार असून, इतर महिलांची सुरक्षाही होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाचशेसाठी अखेरची मुदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा जीवनावश्यक ठिकाणी स्वीकारण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सरकारी बिले व इतर ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे पाचशे व हजाराची नोट केवळ बँकेत जमा करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या. मात्र या मुदतीचाही आता शेवट होणार असल्यामुळे अनेकांची पंचायतही होणार आहे.

पाचशेची नोट केंद्र सरकार आणि राज्य सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या फी, केंद्र आणि राज्य सरकारच्या महाविद्यालयातील फी, ग्राहक सहकारी भांडार, प्री-पेड मोबाइलच्या टॉप अपसाठी, पाणी बिल आणि वीज बिल, सरकारी रुग्णालये, विमानतळावरील तिकीट, दूध केंद्र, स्मशानभूमी, पेट्रोल पंप, मेडिकल, एलपीजी गॅस सिलेंडर, पुरातत्व विभागाच्या वास्तू (उदा. ताजमहल, लालकिल्ला, अजिंठा लेणी), सरकारी बियाणे केंद्र या ठिकाणी या ठिकाणी स्वीकारल्या जात होत्या.

पण त्याची मुदत संपली आहे. गेल्या काही दिवसात या नोटा चलनात असल्यामुळे थोडासा दिलासा होता. पण आता ही मुदत संपल्यामुळे नवीन चलन व शंभर, पन्नास, वीस व दहाच्या नोटावर आता व्यवहार करावे लागणार आहेत. शहरात या नोटा चलनात असल्यामुळे महानगर पालिकेपासून तर इतर सरकारी भरण्यापर्यंत अनेकांनी त्याचा फायदा घेत आपल्याकडील नोटा खपवल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयसीडब्ल्यूएचा पेपर फुटला; परीक्षा लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या नियोजनासाठी अत्यंत उत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या ‘आयसीडब्ल्यूए’च्या वतीने आयोजित परीक्षेतील एक प्रश्नपत्रिका फुटण्याची धक्कादायक घटना शहरातील एका परीक्षा केंद्रावर घडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे त्या एका विषयाची परीक्षा त्वरीत रद्द करण्यात आला असून, त्याची पेपरची तारीख लवकरच घोषित केली जाईल.

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्स अकाउंट्स ऑफ इंडिया (आयसीडब्ल्यूए) या संस्थेच्या वतीने कॉस्ट अकाउंट्स या विषयातील अभ्यासक्रम चालविला जातो. कॉमर्स क्षेत्रातील दर्जेदार व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून या अभ्यासक्रमाकडे पाहिले जाते. वर्षभरातून दोन वेळा यासाठी परीक्षा होतात. सद्यस्थितीत इंटरमिजीएट स्तराच्या परीक्षा या अभ्यासक्रमांतर्ग सुरू आहेत. बुधवारीही सकाळच्या सत्रात ‘ऑपरेशन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सिस्टम’ या विषयाची परीक्षा होणार होती. यासाठी परीक्षेच्या नियोज‌ित वेळेत विद्यार्थी केंद्रावर पोहोचले.

मात्र काही वेळात ही परीक्षा रद्द करण्यात आली असून, ती पुन्हा घेतली जाणार असल्याची सूचना त्यांना देण्यात आली. या सूचनेमुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. आयसीडब्ल्यूए या शैक्षणिक संस्थेने जपलेल्या विश्वासर्हतेमुळे या अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण चांगले आहे. या परीक्षांच्या नियोजनासाठी संस्थेची स्वतंत्र कमिटी कार्यरत आहे. या प्रकारे या अभ्यासक्रमाची परीक्षा रद्द होण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती आहे. नियोजीत वेळेत परीक्षा घेणाऱ्या संस्थांमध्ये या संस्थेचा नावलौकीक आहे.

या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तर आयसीडब्ल्यूएच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र सावरासावरी करत तांत्रिक कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र या पेपरफुटीमुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाव्या आघाडीचे वैचारिक आव्हान कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभरातून डाव्या आघाडीचे राजकीय आव्हान पूर्णत: संपुष्टात आले आहे. मात्र, समाजातील तळागाळात या विचारसरणीचे वैचारिक आव्हान अद्याप कायम आहे. राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेला विरोध करून केवळ उठाठायी संघर्ष निर्माण करण्याची डाव्यांची पद्धती आणि विचारसरणी राष्ट्रकल्याणाच्या उद्देशासाठी घातक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार विभागाचे सदस्य आणि अभिलेखाकार मिल‌िंद ओक यांनी व्यक्त केले.

डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमालेच्या समारोपाच्या व्याख्यानात ते बोलत होते. ‘डाव्या आघाडीचे सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हान’ या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण मत मांडले. विषयाची मांडणी करताना त्यांनी डाव्या विचारसरणीचे जगभरातील संदर्भ उदाहरणादाखल मांडले.

ते म्हणाले, ‘डावी आघाडी समाजाकडे कायम एकसंघ भावनेच्या ऐवजी प्रस्थापित अन् विस्थापित अशा दोन आघाड्यांमध्ये बघते. यातूक केवळ एकबाजूस राहताना राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेला ही विचारसरणी स्वीकारत नाही. परिणामी, या कार्यपद्धतीतून होणारे नुकसान अंतिमत: देशाचेच होत असते. समाजामध्ये केवळ संघर्ष धुमसते ठेवणे, हीच आपली अंतिम जबाबदारी असल्याचा समज या विचारसरणीचा झाला आहे. यामुळे समाज जोडण्यऐवजी तो कायम दुभंगता ठेवण्याचा प्रयत्न या विचारसरणीकडून केला जातो. जगभरात ज्या ज्या ठिकाणी आर्थिक तणाव निर्माण होत आहेत त्या त्या ठिकाणी डावे गट अधिकाधिक सक्रीय होत आहेत.

ते म्हणाले, नवउदारवादांचे नवे आव्हान जगात उभे ठाकते आहे. डावे हे उदारमतवादी असू शकत नाही, तर उजवे उदारमतवादी असतात. गरीब आणि कष्टकरी समाजात डावा विचार रूजत असल्याचा मोठा गैरसमज आहे, असेही ओक म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या करा कॅशलेस व्यवहार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुमच्याकडे साधा फोन आहे. गावात इंटरनेट कनेक्शनचा संबंध नाही. तरीही चितेंचे कारण नाही. तुम्ही आपापसात कॅशलेस ट्रॅन्झॅक्शन सहजपणे करू शकतात. साधा मोबाइल फोन वापरणारे यूएसएसडी कोडद्वारे तर मोबाइल न वापरणारे बँकेत दिलेल्या आधारकार्ड क्रमांकाच्या मदतीने आपापसात पाच हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार कसे करू शकतात याचा वर्गच जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी भरला. महा ई-सेवा केंद्र चालकांनी कॅशलेस व्यवहार शिकावे आणि इतरांनाही शिकवावेत, असे आवाहन प्रशिक्षणाद्वार करण्यात आले.

रजिर्स्ट मोबाइल क्रमांकावरून महा इ सेवा केंद्रांकडील मायक्रो एटीएम सेंटर्सच्या मदतीने कॅशलेस ट्रान्झॅक्शन करणे शक्य असल्याने त्याबाबतचे प्रशिक्षण जिल्हाभरातील महा ई-सेवा केंद्रांच्या चालकांना बुधवारी देण्यात आले. जिल्हाभरात प्रत्येक २० किलोमीटरच्या आत असे इ-सेवा केंद्र आहेत. त्यामुळे गावात एटीएम सेंटर किंवा बँक नसेल तरीही असे व्यवहार करणे शक्य होणार आहे. येत्या काळात दैनंदिन व्यवहारांसाठी इ-बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगचा वापर अधिक प्रमाणात होणार असल्याने महा ई-सेवे कंद्राच्या प्रतिनिधींनी कॅशलेस व्यवहाराविषयी माहिती घेऊन ती इतरांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन या प्रशिक्षण सत्राच्या निमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले. कार्यशाळेत महा ई-सेवा केंद्र व सीएससीच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) शशीकांत मंगरुळे, तहसीलदार सी. एस. देशमुख, ‘सीएससी’चे स्टेट हेड समीर पाटील, ई-गव्हर्नन्सचे जिल्हा व्यवस्थापक चेतन सोनजे आदी उपस्थित होते. यावेळी सोनजे यांनी विविध मोबाइल अॅपचा कॅशलेस व्यवहारांसाठी उपयोग करण्याबाबत तसेच ई-बँकिंग आणि मोबाइल बँ‌किंगचा उपयोग करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली.

नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर अनेकांमध्ये कॅशलेसबाबत प्रश्न आहे. मात्र, या व्यवहारामुळे पैसा सुरक्षित राहतो आणि दैनंदिन चलनातील अनेक अडचणी टाळता येतात. या नव्या प्रणालीमुळे व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. महा ई-सेवा केंद्रांनी या प्रणालीचा प्रचार व प्रसार करावा.
- रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्तांची नाकाबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळण्यासाठी शहर पोलिसांनी नाकाबंदीची मोहीम हाती घेतली आहे. शहरात सर्वच भागात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा रस्त्यावर उतरला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरात प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस थांबणार असेल तरच वाहतुकीच्या नियमांचे पालन करायचे असा जणू काही पायंडाच पडला आहे. काही बहाद्दर तर पोलिसांच्या नाकावर टिचून बेदरकारपणे वाहने चालवितात. अशा वाहनधारकांना अडविल्यानंतर अरेरावीपर्यंत इतकेच नव्हे तर पोलिसांवर हात उगारण्यापर्यंत बेशिस्त वाहनधारकांची मजल जाऊ लागली आहे. याखेरीज शहरात काही दिवसांत चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांचे दागिने हिसकावून नेण्याचे प्रकार वाढू लागल्याने चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळणे पोलिसांपुढे आव्हान ठरू लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात काही दिवसांपासून ठराविक ठिकाणी नाकाबंदी केली जात होती. परंतु, तरीही चेन स्नॅचर्स मोकाटच असल्याने आता शहराच्या बहुतांश भागात पोलिसांनी वाहन तपासणी सुरू केली आहे.

वाहनधारकांनी हेल्मेट परिधान करूनच वाहन चालवावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी वारंवार केले आहे. सर्वप्रथम पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. नागरिकांनी हेल्मेट परिधान करूनच वाहन चालवावे, असे आवाहन करूनही शहरात बहुतांश वाहनधारक हेल्मेटशिवायच वाहने चालवित असल्याचे पहावयास मिळते आहे. अशा वाहनधारकांवर प्राधान्याने कारवाई करण्यात येते असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.


संशयास्पद वाहनांची होणार तपासणी
रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येतो आहे. चेन स्नॅचिंग करून पसार होणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यासाठीही पोलिस सरसावले आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत असून ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. परवाना तसेच परमीट नसतानाही प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात येत आहे.

शहरात सर्वत्र मोहीम तीव्र
वाहनांची तपासणी करून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करणे ही पोलिसांच्या वाहतूक विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे वाहतूक विभागाचे अधिकारी ठिकठिकाणी कारवाया करीतच आहेत. परंतु, त्याचबरोबर पोलिस स्टेशन्सचे निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक या दर्जाचे अधिकारी देखील कारवायांसाठी आपापल्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावर उतरल्याचे बुधवारी पहावयास मिळाले. म्हसरुळपासून श्रमिनगरपर्यंत आणि नाशिकरोडपासून अंबड लिंकरोडपर्यंत शहरातील बहुतांश भागात वाहन तपासणी सुरू असल्याचे दिसत आहे.

वाहतूक पोलिसांकडून प्रबोधन
नागरिकांनी स्वत:च्या रक्षणासाठी हेल्मेट परिधान करावे, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईही सुरू आहे. परंतु, अजूनही अनेक लोक हेल्मेटविनाच वाहने चालवित असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारण्यापूर्वी सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. हेल्मेटचा वापर करा. अन्यथा उद्यापासून कठोर कारवाईचा बडगा उगारण्यास आम्ही सुरूवात करणार आहोत. ५०० रुपये दंड भरण्यास तयार रहा, असा इशाराच पोलिस देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, शहर विद्रूप कराल तर...!

$
0
0

माजी नगरसेवक अमोल जाधव यांना दंड व शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या जागेवर बॅनर आणि फ्लेक्सबाजी करून स्वस्त साधनांद्वारे तुम्ही स्वत:ची प्रतिमा अधिक उजळू पहात असाल तर सावधान. अशा प्रकारची फ्लेक्सबाजी शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरत असल्याचा ठपका ठेवत कोर्टाने शहरातील एका माजी नगरसेवकाला एक हजार रुपये दंड किंवा दहा दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. अशा प्रकरणात शिक्षा सुनावण्याची ही शहरातील पहिलीच घटना असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने दिलेला हा निर्णय बॅनरबाजी करणाऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा ठरणार आहे.

सन २००२ मध्ये अमोल जाधव यांनी नगरसेवकपदासाठी महापालिकेची निवडणूक लढवली होती. २५ जानेवारी २००२ रोजी सकाळी प्रभाग क्र. १९ मध्ये वडाळागावातील खंडोबा चौकात त्यांनी महापालिकेच्या मालकीच्या जागेवर निवडणूक चिन्ह, फोटो आणि निवडणुकीत निवडून देण्याविषयीचा मजकूर असलेला कापडी बोर्ड लावला होता. मात्र महापालिकेची परवानगी घेण्यात आली नाही. या प्रकरणी भ्रदकाली पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या प्रकरणाची सुनावणी बुधवारी (दि. १४) रोजी प्रथम न्यायदंडाधिकारी अ. मो. शाह यांच्या कोर्टात झाली. यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील जी. डी. सोनवणे यांनी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी असे चार साक्षीदार तपासले. त्यांची साक्ष ग्राह्य धरून कोर्टाने जाधव यांना शहरामध्ये फलक लावून शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचविल्याप्रकरणी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दहा दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

निर्णयाने बसणार इतरांना चाप

या खटल्याचा निकाल तब्बल १४ वर्षांनी लागला आहे. माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्यावर विनापरवानगी फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवण्यात आला. कोर्टाने ठोठावलेली शिक्षा सौम्य असली तरी यापुढे विनापरवानगी सरकारी जागेत फलक, फ्लेक्स लावण्याचा प्रकारांना चाप बसण्यास मदत होणार आहे. महापालिकेची परवानगी न घेता अशा प्रकारे शहर विद्रुप करणे यापुढे महागात पडणार असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पती अन् जावेनेच दिली ‘तिच्या’ हत्येची सुपारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रेमविवाहमुळे समाजात मान मिळत नाही. भर कार्यक्रमांमध्ये अपमानाला सामोरे जावे लागत असल्याची पतीची भावना, तर परधर्मीय असून घरात मिळत असलेला सन्मान यामुळे व्यथ‌ित असलेली जाऊ एकत्र आले. हा काटा कायमचा काढायचा म्हणून त्यांनी एका गुंडाला हत्येची सुपारी दिली. सुदैवाने हल्ल्यात विवाह‌िता जखमी झाली. हे प्रकरण दडपून जाईल अशा अविर्भावात असलेल्या पती व जावेला सरकारवाडा पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर जेरबंद करीत हल्ल्याचे गूढ उकलून काढले.

सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील पी अॅण्ड टी या उच्चभ्रू वस्तीतील दत्त मंदिरात दर्शन घेणाऱ्या ज्योती अजित जैन या विवाह‌ितेवर ७ डिसेंबर रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास मागून हल्ला झाला. लोखंडी रॉडने डोक्यात वार करून हल्लेखोर फरार झाला होता. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. पोलिसांच्या कार्यक्षमेतवरदेखील नागरिकांनी प्रश्नचिन्ह लावले. मात्र, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व त्यांच्या पथकाने निकराने तपास करीत महिलेचा पती अजित जैन व जखमी महिलेची जाऊ प्राजक्ता जैन यांना जेरबंद केले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अजित जैनने काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. परधर्मीय मुलीसोबत विवाह केल्याने अजितला समाजातून विरोधाचा सामना करावा लागला. अनेकदा अजितला यामुळे अपमानाचा समाना करावा लागला. यातच अजितच्या लहान भावाचा विवाह मात्र घरच्यांनी ठरवून दिलेल्या पध्दतीने झाला. घरात आलेल्या प्राजक्ताला ज्योतीचा सुरुवातीपासून तिटकारा होता. दुसऱ्या धर्माची असताना ज्योतीचा घरात मानसन्मान होता, ही बाब प्राजक्ताला खटकत होती. लग्नानंतर अजितला दोन मुले झाली. मात्र, तरीही प्रेमविवाह केल्याने मोठी चूक झाल्याची बाब अजितच्या मनात सलत होती. यातूनच प्राजक्ता व अजित यांनी एकत्र येऊन नितीन शंकर शेट्टी यास ज्योतीला संपवण्याची सुपारी दिली. प्राजक्ताकडे कामास येणाऱ्या महिलेचा भाऊ असल्याने नितीनचे जैन यांच्या घरात येणे जाणे होते. नितीनवर यापूर्वी काही गंभीर गुन्हे दाखल असल्याने ज्योतीचा काटा तो काढेल, या विश्वासाने या दोघांनी त्याला सुपारी दिली.

असा उघडकीस आला कट

हल्ल्याची घटना पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. कोल्हे यांनी तपासाला सुरुवात केली. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार झालेला नाही, हे चाणाक्ष पोलिसांनी ओळखले. त्यानुसार जैन यांच्या घरातील सर्वांचा मोबाइल डेटा रेकॉर्डिंग तपासण्यात आले. त्यात अजित आणि प्राजक्ता एका अनोळखी व्यक्त‌िच्या संपर्कात आल्याचे पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीचा म्हणजे नितीन शेट्टीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वरील घटनेची कबुली दिली. अजित आणि प्राजक्ता जैन यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासाच्या दृष्टीने अतिशय किचकट गुन्हा असा असू शकतो. मारण्याचा प्रयत्न घरातून झाला आहे हे सप्रमाण सिध्द करण्यासाठी मागील काही दिवस आम्ही दिवस-रात्र एक केली. जखमी महिलेवर अद्याप उपचार असून, सुशिक्ष‌ित व्यक्ती असे कृत्य करू लागले तर फक्त पोलिसांकडे बोट दाखवून काय साध्य होणार?

-डॉ. सीताराम कोल्हे, सिन‌िअर पीआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासी विभागात आता नाइट ड्रेस घोटाळा

$
0
0

vinod.patil@timesgroup.com
tweet : vinodpatilMT

नाशिक ः कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर आदिवासी विभागाने बहुचर्चित स्वेटरचा ठेका नुकताच रद्द करण्यात आला असतानाच, आता या विभागात आणखी एक घोटाळा उघडकीस येतो आहे. या वेळी सरकारला अंधारात ठेवून २२ कोटींचे नाइट ड्रेस (टॉप व पायजमा) परस्पर खरेदी करण्यात आले आहेत. सरकारकडून वित्तीय खर्चाची मान्यता न घेताच पुण्यातील एका फर्मला खरेदी आदेश देऊन बिलही अदा करण्यात आले. तत्कालीन आदिवासी आयुक्तांच्या आदेशानेच हा सारा मामला घडल्याचे समोर येत आहे.

आदिवासी विभाग आणि घोटाळे असे समीकरण मागील काही वर्षांत पक्के झाले आहे. सरकार काँग्रेस आघाडीचे असले वा भाजपचे, आदिवासी विभागात गैरव्यवहारांची परंपरा मात्र सदैव कायम राहिली आहे. मग ती शालेय साहित्य असो वा स्वेटर खरेदी. ठेकेदार आणि अधिकारी संगनमताने आदिवासींऐवजी स्वतःचाच विकास करून घेतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सरकारने केवळ ई-निविदा काढण्यास परवानगी दिली असताना तत्कालीन आयुक्त बाजीराव जाधव, तसेच सोनाली पोंक्षे यांनी सरकारकडून खर्चाची वित्तीय मान्यता न घेता पुण्यातील श्री महालक्ष्मी ड्रेसेस अँड टेलरिंग फर्मला नाइट ड्रेस खरेदीचे आदेश दिले. सोबतच ठेकेदारांची बिलेही अदा करण्यात आली. वास्तविक आदिवासी आयुक्तांना फक्त ५० लाखांच्या खरेदीचे अधिकार आहेत.

स्वेटर खरेदीपूर्वी उरकण्यात आलेली पावणेदोन लाख आदिवासी मुला-मुलींसाठीचे नाइट ड्रेस खरेदी आता चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे. २२ कोटींची ही खरेदी तत्कालीन आयुक्त बाजीराव जाधव यांनी आपल्या अधिकारात केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आलेल्या तत्कालीन आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी या रकमेसाठी शासकीय मान्यता घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनीही शासकीय मंजुरी न घेताच परस्पर आपल्या अधिकारात ठेकेदारास बिलही अदा केल्याचे समोर आले आहे.

आदिवासी मंत्रालयाची अळीमिळी

सरकार पातळीवरून कोणतेही खर्चाचे आदेश न घेता ही खरेदी उरकण्यात आली. या साऱ्या प्रकारात काही राजकीय पदाधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची चर्चा दबक्या आवाजात विभागात होते आहे. महत्त्वाचे म्हणजे आदिवासी मंत्रालयानेही अळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही सर्व प्रक्रिया वादग्रस्त असून, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा आरोप आदिवासी संघटनांकडून केला जात आहे.

प्रभारींचे प्रताप!

आदिवासी विभागाने २०१४ मध्ये आदिवासी मुला-मुलींना नाइट ड्रेस देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीची निविदाप्रक्रिया एप्रिलमध्येच काढण्यात आली. या ड्रेस खरेदीसाठी २२ कोटी १६ लाख रुपये खर्च गृहीत धरून निविदा काढण्यास सरकारने मंजुरी दिली. मात्र, आर्थिक वर्ष संपण्याच्या दोन दिवस अगोदर प्रभारी पदावर असलेल्या बाजीराव जाधव यांनी घाईगडबडीत पुण्याच्या श्री महालक्ष्मी ड्रेसेस अँड टेलरिंग फर्म या कंपनीला २७ मार्च २०१५ रोजी आपल्याच अधिकारात खरेदीचे आदेश दिले. प्रभारी पदावर असताना एवढ्या मोठ्या रकमेच्या खरेदीसाठी त्यांनी सरकारची परवानगी घेण्याची तसदी घेतली नाही. महत्त्वाचे म्हणजे स्वेटर खरेदीतही याच जाधवांभोवती संशयाची सुई फिरत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ पैसे अखेर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही कर्मचाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली ५७ लाख रुपयांची रक्कम एनडीसीसी बँकेच्या शाखेत जमा करण्यात आली आहे. लवकरच संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही रक्कम अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या पथकाने ऑक्टोबर महिन्यात जप्त केली होती.

एसीबीने कोर्टाच्या आदेशाने ही रक्कम एनडीसीसीच्या पेठरोड शाखेत भरणा केली. २५ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी विजय सीताराम निकम, दिगंबर हिरामण चिखले व अरविंद हुकूमचंद जैन यांना रोकडसह पकडले होते. चौकशीअंती हे पैसे बाजार समिती कर्मचाऱ्यांचे असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या बळजबरीने स्वाक्षऱ्या घेऊन तसेच बँकिंग नियम पायदळी तुडवून पैसे काढण्यात आल्याचे एसीबीच्या चौकशीत समोर आले. एवढेच नव्हे तर रात्रीच्या सुमारास एवढ्या मोठ्या रकमेची वाहतूक करण्यात आल्याने संशय दाटला. आजमितीस एसीबीची चौकशी सुरूच असून, कोर्टाच्या आदेशाने सदर रक्कम एनडीसीसी बँकेत जमा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. लवकरच ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसी कॉलेजातही मिळणार जेनेरिक औषधे

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com
Tweeter : @jitendratartemt

नाशिक : रामायणकालीन आपत्कालीन प्रसंगात अचाट बलाने दिव्य संजीवनी आणण्याचा भीमपराक्रम करणाऱ्या महाबली हनुमंताचे जन्मस्थान अंजनेरी पर्वताच्या कुशीतील जनतेला आता फार्मसी कॉलेजमधून स्वस्तातील जेनेरिक औषधे मिळणार आहेत. बाजारपेठेतील इतर औषधांच्या तुलनेत या औषधांच्या किमती सुमारे ७० टक्क्यांनी कमी असतील, असा दावाही करण्यात येत आहे. शिवाय फार्मसी कॉलेजमध्ये जेनेरिक औषध वितरणाचे केंद्र सुरू करण्याचा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्यांदाच राबविला आहे.

नाशिकनजीक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी डोंगराच्या कुशीत त्र्यंबकेश्वरसह आदिवासी परिसर मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी औषधोपचारांसाठी ग्रामस्थांना शहर गाठण्याशिवाय पर्याय राहत नाही. शेती व मजुरी करणाऱ्या या ग्रामस्थांसाठी अनेकदा जीवनदायी महागडी औषधे विकत घेणेही आवाक्याबाहेर असते. परिसरातील ही परिस्थिती लक्षात घेत सपकाळ नॉलेज हबच्या फार्मसी कॉलेजने प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रासंदर्भातील प्रस्तावास सरकारच्या विविध संबंधित विभाग आणि मंत्रालयाच्या सर्व मान्यता मिळाल्या आहेत. यामुळे आता लवकरच अंजनेरीसारख्या दुर्गम भागात कार्यरत फार्मसी कॉलेजमधून नागरिकांना अल्प दरातील जेनेरिक औषधे उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. रवींद्रनाथ सौदागर यांनी दिली.

या केंद्रासाठी ‘बीपीपीआय’, ‘डीपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स’, ‘मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स आणि फर्टिलायझर्स’, ‘भारत सरकार’, ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली’ यांच्या निर्देशानुसार व ‘अन्न व औषध प्रशासन विभाग’, महाराष्ट्र राज्य या संस्थांच्या परवानग्या या केंद्रस्थापनेसाठी मिळाल्याचे डॉ. सौदागर यांनी सांगितले.

७० टक्क्यांपर्यंत किमतीत फरक

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेंतर्गत बाजारपेठेतील औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधे तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कमी दराने मिळू शकतील, असा विश्वासही संस्थेने व्यक्त केला आहे. जेनेरिक औषध केंद्रांची उपलब्धता प्रामुख्याने शहरी वस्तीत जास्त प्रमाणात आहे. दुर्गम भागात व त्यातही फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून अशी केंद्रे अपवादानेच आढळतात. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.

काय आहेत जेनेरिक औषधे?

औषधांचे मूळ नाव धारण करून बाजारपेठेत दाखल होणारी औषधे प्रामुख्याने या गटात मोडतात. ब्रँडेड व जेनेरिक औषधांचे गुणधर्म एकच असले तरीही केवळ मार्केटिंग, अॅडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंगसारख्या विक्रीवर्धक साखळीत जेनेरिक उत्पादने अडकत नसल्याने ही औषधे अन्य औषधांपेक्षा सुमारे ३० ते ७० टक्क्यांनी स्वस्त मिळतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप्ती मोहीम सोमवारपासून

$
0
0

शहरातील घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकबाकीदारांवर धडक कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासंदर्भात दिलेल्या मुदतीत करांचा भरणा न करणाऱ्या शहरातील १७ हजारांपेक्षा अधिकच्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा भरण्याची संधी असतांनाही थकबाकीदारांनी बाकी भरलेली नसल्याने अशा कर चुकव्यांविरोधात सोमवार (दि. १९) पासून जप्तीची मोहीम सुरू करणार आहे. त्यासाठी पालिकेच्या सहा विभागात सहा जप्ती पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जप्ती कारवाईचा पहिला बडगा हा बड्या थकबाकीदारांवर उगारला जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त रोज या जप्ती मोहिमेचा आढावा घेणार असून पालिकेच्या खडखळाट झालेल्या तिजोरीला या जप्ती मोहिमेतून दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्या तरी, या नोटा विविध कर भरण्यासाठी वापरता येतील, असे आदेश दिले होते. त्याचा चांगला फायदाही पालिकेला झाला होता. जवळपास घरपट्टी व पाणीपट्टीतून जवळपास २० कोटींच्या वर रक्कम जमा झाली होती. पाचशेच्या नोटा भरण्याची १५ डिसेंबर शेवटची मुदत होती. त्यामुळे पालिकेने थकबाकीदारांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. परंतू, या योजनेचा फायदा जास्त थकबाकीदारांनी घेतलेला दिसत नाही. त्यामुळे महापालिकेने थकबाकीदारांसह चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टीसह एमटीएसचा भरणा करण्याचे आवाहन केले होते. त्याचा लाभ चालू वर्षाच्या मालमत्ताधारकांनी घेतला असला तरी, थकबाकीदारांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. जवळपास दहा हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांची यादीच पालिकेने तयार केली असून, त्यांची संख्या सोळा हजारांच्यावर आहे. या सर्वांकडे पालिकेला जवळपास ६० कोटी रुपयांची रक्कम थकित असून, यात बड्या थकबाकीदारांसह शहरातील बड्या आसामींचाही समावेश आहे.

महापालिकेने या थकबाकादांसाठी सोमवारपासून विशेष जप्ती मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व अशा विभागात सहा पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकामार्फत दररोज जप्ती मोहीम राबविली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या निगरानीखाली ही कारवाई सुरू करण्यात येणार असून पथकाला रोज आपला अहवाल मुख्यालयाला द्यावा लागणार आहे. या कारवाईमुळे खाली असलेल्या तिजोरीला हातभार लागणार आहे.


बडे थकबाकीदार रडारवर

सोमवारपासून सुरू होणाऱ्या मालमत्ताकर वसूलीच्या कारवाईत सुरुवातीस व्यावसायिक मालमत्तांवर कारवाई केली जाणार आहे. जास्त थकबाकी असलेल्या व्यावसायिक मालमत्ताधारकांची प्राधान्यक्रमाने यादी तयार करण्यात येत असून प्रथम त्यांच्यावरच जप्तीची कारवाई केली जाणार आहे. या थकबाकीदारांमध्ये व्यावसायिक, व्यापारी, उद्योगपती तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पालिकेने प्रथम बडे थकबाकीदार रडारवर घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाताळसाठी पालटतेय चर्चचे रुपडे...

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरात नाताळच्या तयारीला वेग आला असून, शहरातील सर्व चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यासह सजावटीचे नियोजन पूर्णत्वास आले आहे. सर्वच चर्चमध्ये प्रभू येशूचे दर्शन व प्रार्थनेसाठी गर्दी होणार असल्याने त्याचेही नियोजन सुरू असून, बाजारपेठांमध्येही खरेदीची धामधूम दिसून येत आहे.

नाताळ सण शहराच्या विविध भागात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. नेहरूनगर येथील बाल येशू मंदिर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असल्याने देशभरातील भाविक आतापासूनच येथे दर्शनासाठी येत आहेत. दि. २४ व ३१ रोजी येथे दहा वाजता मिस्सा प्रभूची प्रार्थना होणार आहे. ख्रिस्त जन्मोत्सवाचा गव्हाणीचा देखावा येथे सादर करण्यात आला असून, मदर मेरी व देवदूतांच्या मूर्ती बच्चेकंपनीचे आकर्षण ठरत आहेत. सेंट आंद्रिया चर्च, शालिमार येथील सेंट थॉमस चर्च, जेलरोडचे अण्णा चर्च इत्यादी ठिकाणी बैठका होऊन कोणत्या दिवशी कोणत्या कार्यक्रमाची आखणी करायची याची तयारी झाली आहे. या सर्व ठिकाणी २४ डिसेंबरच्या मध्यरात्री मिस्सा विधी होणार आहे. चर्चप्रमाणेच घरोघरी फराळाची तयारी सुरू झाली असून, सणाच्या वातावरणामुळे परिसर चैतन्यदायी बनला आहे. अनेक चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्माचा देखावा सादर केला जाणार असून, घराबाहेर ताऱ्याचा आकाशकंदील लावण्यात येणार आहे. आप्तस्वकीयांना फराळासाठी निमंत्रण देण्यास घराेघरी प्रारंभ झाला आहे.

आंतरधर्मीय प्रार्थना

नाताळनिमित्त नेहरूनगर येथील बाल येशू प्रार्थना मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मिस्सा, ख्रिसमस कॅरॉल साँग्स, प्रभू येशूची प्रार्थना आदी कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे आंतरधर्मीय प्रार्थनादेखील आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी शहरातील विविध मान्यवरदेखील उपस्थित राहणार आहेत.


मातृत्व, स्त्री गौरव दिन

भारतीय एकात्मता समितीतर्फेदेखील नाताळ साजरा करण्यात येणार असून, दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा समारंभ संत आंद्रिया चर्च येथे होणार आहे. मातृत्व दिन व स्त्री गौरव दिनदेखील साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ‘मैं औरत हूँ’ या एकपात्री प्रयोगाचेही आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी छेडले धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी मुलांच्या वसतिगृह बांधकामाची चौकशी व्हावी, काम बंद झाल्याची कारणे तपासून संबंधितांवर कठोर कारवाही करावी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत, स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी अँटी करप्शन अण्ड क्राईम कंट्रोल समितीचे पदाधिकारी आणि काही विद्यार्थ्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीबाहेर धरणे आंदोलन केले. कळ्वणचे प्रकल्पाधिकारी तथा प्रांत डी. गंगाथरण, सहाय्यक प्रकल्पाधिकारी एस. टी. बागुल यांना निवेदन देण्यात आले.

एक दिवसीय धरणे आंदोलनाला कळवण, सुरगाणा तालुक्यातील विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला असून, प्रकल्पाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या भेटीत याबाबत संबंधितांना नोटिसा पाठवण्याचे व माहिती जाणून घेत कारवाई करण्याचे संकेत दिले.

सुरगाणा शहर व करंजुल (क), उंबरठाण येथील बंद पडलेल्या वसतीगृह बांधकाम बाबत चौकशी करावी व हे बांधकाम त्वरित चालू करावे याबाबत बांधकाम खात्याच्या अभियंता, उपअभियंता यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. याबाबत संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रकल्पाधिकारी यांनी दिले. त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. मात्र पंधरा दिवसात आश्वासन पूर्ण न झाल्यास नाही आदिवासी आयुक्तालयाबाहेर पुढील आंदोलन छेडले जाईल, असे आंदोलकांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष नरेंद्र देशमुख, सेक्रेटरी राहुल आहेर, दौलत भोये, तुळशीराम खोटरे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्थांनी तारले खातेदारांना!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नोटाबंदीमुळे नागरी व राष्ट्रीय बँकांपुढील रांगा अद्याप हटायला तयार नाहीत. मात्र कळवण, देवळा शहरातील बहुतांश पतसंस्थांनी कोणत्याही बँकेची आर्थिक मदत ने घेता दैनंदिन अल्पबचतीच्या पैशांच्या बळावर खातेदार, सभासदांना पैसे उपलब्ध करून दिल्याने अनेक खातेदार, सभासदांना त्याचा फायदा होत आहे.

रिझर्व बँकेने जिल्हा सहकारी बँका, पतसंस्थांवर मर्यादा घालून दिल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी यांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊन आपले आर्थिक व्यवहार करावे लागत आहेत. शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र, युनियन, बँक ऑफ इंडिया, देवळा येथील देना बँकमध्ये खातेधारकांची गर्दी होत असून यात सर्वाधिक संख्या शेतकऱ्यांचीच असते. सध्या इतर सहकारी बँका व पतसंस्था यांचे आर्थिक व्यवहार मर्यादित झाल्याने सर्वांचीच धाव राष्ट्रीयकृत बँकांकडे आहे. या बँकांमध्ये गर्दीचा उच्चांक वाढत असताना कळवण, देवळा शहरातील पतसंस्थांनी आपल्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांची कुचंबणा होऊ नये म्हणून दैनंदिन अल्पबचतीच्या गोळा झालेल्या पैशांच्या माध्यमातून गरजेपरता रक्कम देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
पतसंस्थांच्या बँकर्समार्फत हक्काचेच मूबलक चलन मिळत नसले तरी जिल्हा बँका, पतसंस्थांवरील नोटाबंदीनंतर लादलेले निर्बंध उठतील तेव्हा उठतील. मात्र सहकारक्षेत्र टिकवून ठेवण्याचे, खातेदारांना पैसे उपलब्ध करून देण्याचे काम कळवण व देवळा शहरातील पतसंस्था करीत असून त्यांच्या कामकाजाचे निश्चित कौतुक केले पाहिजे.
- अशोक जाधव, संचालक, जिल्हा पतसंस्था फेडरेशन

पतसंस्थांचे अनेक सहकारी, खासगी, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कोट्यवधी रुपये ठेवीच्या, चालू खात्याच्या माध्यमातून जमा आहेत. नोटाबंदीमुळे हा पैसा अडकून पडला आहे. देवळा शहरातील पतसंस्थांकडून दैनंदिन अल्पबचतीच्या गोळा झालेल्या पैशांतून सभासद, खातेदार, ठेवीदारांच्या आर्थिक गरज भागविल्या जात आहेत. लवकरात लवकर पतसंस्थांवरील आर्थिक निर्बंध उठविण्याची गरज आहे.
- भारत कोठावदे, संस्थापक अध्यक्ष, अमृतकार पतसंस्था, देवळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रन फॉर पीस’ मॅरेथॉनची वेबसाइट सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहर पोलिसांकडून आयोज‌ित होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचे पडघम वाजले आहेत. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या स्पर्धेसाठी पोलिस दलाने एक वेबसाइट सुरू केली असून, महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते तिचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे महापौरांसह आणखी काही स्पर्धकांनी लगेच नावनोंदणी देखील केली.
शहर पोलिस दलातर्फे मागील वर्षी मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यंत्र व मंत्रभूमी असलेल्या नाशिकमध्ये खेळ संस्कृती बहरत असून, त्याचा संदेश जगभरात देण्यासाठी या मॅरेथॉनची सुरुवात तत्काल‌िन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केली. नाशिक शहराची एक चांगली छबी जनमाणसात रुजावी, असा जगन्नाथन यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा मानस होता. जगन्नाथन यांच्या बदलीनंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनीही हा उपक्रम पुढे नेण्याचा निर्णय घेतला. १२ फेब्रुवारी रोजी गोल्फ क्लब मैदान येथे आयोज‌ित करण्यात आलेल्या स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांनी http://nashikpolice21k.in/ ही वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटचे उद्‌घाटन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., जिल्हा परिषदेचे सीईओ मिलिंद शंभरकर, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, के. के. वाघ कॉलेजचे अजिंक्य वाघ, पोलिस आयुक्त सिंघल, पोलिस उपायुक्त दत्तात्रय कराळे, विजय पाटील, श्रीकांत धिवरे यांच्यासह इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नाशिक शहर खेळाडूंची खाण असून, पोलिस आपली जबाबदारी सांभाळत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याने हा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे महापौर मुर्तडक यांनी म्हटले. मागील वर्षी घाईगर्दीत आयोजन झाले होते. तरीही १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. पोलिस आणि नागरिकांमध्ये यानिमित्ताने सुरू झालेला संवाद आता पुढे सरकत असून, सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. गेल्या वर्षी ऑलिम्प‌िक तयारीमुळे मला मॅरेथॉनमध्ये सहभागी होता आले नाही. यंदा मात्र मी स्वतः स्पर्धेत सहभागी होणार असून, इतरांना यासाठी प्रेरीत करणार असल्याचे कविता राऊतने स्पष्ट केले. दरम्यान, पोलिस आयुक्त सिंघल यांनी स्पर्धेच्या आयोजनात जीव तोडून मेहनत घेणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. चांगला उपक्रम असून, तो पुढे न्यायच ा हे मी खूप दिवसांपूर्वी ठरवले होते. स्पर्धेच्या आयोजनात व्यावसायिकता आणण्यासाठी प्रयत्नशील असून, नाशिकची खेळ संस्कृती यानिमित्ताने जगभरात पोहचवण्याचे काम याद्वारे होणार असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले. पोलिस दलातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्पर्धेची तयारी सुरू करून सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्या शास्त्रज्ञांनी जिंकली मने

$
0
0

टीम मटा

जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये ४२ व्या तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड, मालेगाव, घोटीला ४२ व्या विज्ञान प्रदर्शनात चिमुकल्यांनी आपली शास्त्रीय जिज्ञासा जागवत विविध उपकरणे तयार करत सादर केली. चिमुकल्यांनी तंत्रज्ञानाची सांगड घालत आपली उपकरणे यात मांडली. उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांना प्रोत्साहित केले.



जिल्ह्यात ठिकठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

‘संशोधक वृत्ती रूजविण्यासाठी प्रदर्शन’

मालेगाव ः छोट्या छोट्या प्रयत्नातून मोठे संशोधन जन्म घेते, अनेक संशोधकांनी आपल्या बालवयात विज्ञानाची आवड जोपासली म्हणून जगाला विज्ञानाचे चमत्कार पाहायला मिळाले. अशीच संशोधक वृत्ती विद्यार्थ्यांत रुजवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे ठरते असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती भरत पवार यांनी केले.

तालुक्यातील जळगाव निंबायती येथील पाटील विद्यालयात आयोजित ४२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद््घाटनाप्रसंगी बोलत होते. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे व मोठे यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विज्ञान प्रदर्शनातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमवेत शेतकऱ्यांनादेखील त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने येथील खैरनार बंधूनी मृदा परिक्षण फिरती प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली. ‘राष्ट्र निर्माणासाठी विज्ञान तंत्रज्ञान व गणित’ ही यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाची मुख्य संकल्पना होती. दिवंगत रोधू आण्णा पाटील विज्ञान नगरीत उद््घाटनाप्रसंगी अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कासुताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, गटशिक्षणाधिकारी डी. एस. गायकवाड , विस्तार अधिकारी टी. व्ही. पवार, सरपंच रोहू आहिरे ,प्राचार्य आर. आर. बागल, पर्यवेक्षक जी एस फसाले उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. डी. काळे यांनी केले तर आभार प्राचार्य एम. एम. पवार यांनी मानले.

‘विज्ञान आणि भारत हे एक समीकरण’

घोटी ः जगभरात नावाजलेल्या शास्रज्ञामध्ये आज भारतीयांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळेच विज्ञान आणि भारत हे समीकरण झाले आहे. विज्ञानात भारतीयांचे योगदान मोलाचे आहे. भारतीय वैज्ञानिकांचे विद्यार्थ्यांनी अनुकरण करावे. विज्ञान आणि संशोधनात विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अलका जाधव यांनी केले.

इगतपुरी पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घोटी येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ४२ व्या इगतपुरी तालुका विज्ञान प्रदर्शनाचा उद््घाटन सोहळा झाला. प्रदर्शनाचे उद््घाटन मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, भाऊसाहेब खातळे, पांडुरंग वारुंगसे, प्राचार्या लता देवरे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी अहिरे, प्राचार्य हरिभाऊ अहिरे उपस्थित होते.


बाल वैज्ञानिकांची भरली जत्रा

मनमाड ः मनमाड शहरातील सेंट झेवियर्स विद्यालयात बाल वैज्ञानिकांच्या भरलेल्या जत्रेत चिमुकल्या शास्त्रज्ञांनी आपल्या विविध विज्ञान प्रतिकृतींनी सर्वांची मने जिंकली. प्रदर्शनात पाण्यापासून शेतीच्या अवजारापर्यंत आणि लोकसंख्येपासून ते बेटी बचाव पर्यंत विविध प्रतिकृती सादर करण्यात आल्या. प्रदर्शनाचे उद््घाटन सेंट झेवियर्सचे पदाधिकारी फादर जॉन मिस्किटा यांच्या हस्ते झाले, अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती सुरक्षा केसकर होत्या. व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी विजयालक्ष्मी आहिरे, एस. बी. कोठावदे, शैला पेगाड़ो, मुख्याध्यापक फादर सॅबी कोरिया, उपस्थित होते. दिलीप देवरे यांनी प्रास्ताविक तर अनिल निकाळे यांनी परिचय करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार खून प्रकरणी महिलेस पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर कॉलनी भागात राहणाऱ्या सुशांत बच्छाव या कामगाराचा खुनाच्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अर्चना जाधव या महिलेस कोर्टाने १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सातपूर कॉलनीत नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या जाधव कुटुंबीयांतील अनेकांना चौकशीसाठी सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, कामगार बच्छावच्या खुनात सहभागी असलेल्या तीन संशयित आरोपींचा अद्याप पोलिसांना सुगावा लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपचाराच्या वेळी मयत झालेला कामगार सुशांत याला जबर मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. सुशांत ज्या घरात भाड्याने राहत होता त्या ठिकाणी स्टेट बँकेचे एटीएम आहे. यात पोलिसांनी अधिक माहितीसाठी एटीएमला लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज घेतल्यास त्याचा निश्चित तपासाला फायदा होणार आहे. त्यातच पोलिसांनी संजय जाधव यास चौकशीसाठी बोलवले असल्याचे सांगितले जात असले तरी तो अद्याप पोलिसांच्या समोर आला नसल्याने खुनाचे गूढ आणखी वाढले आहे. खुनाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जगन्नाथ गायकवाड करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशलेस जुगाराला चाप!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet : @ArvindJadhav

नाशिक : नोटाबंदीनंतर कॅशलेस सोसायटीचे वारे जोमात वाहत आहे. कुठे ऑनलाइन पेमेंट, तर कुठे मोबाइल बँकिंगचा जोर. क्रेडिट किंवा डेबिट कार्डाचा वापर सर्रास होताना दिसतो. नोटाबंदीमुळे जुगार खेळणारे, बेटिंग करणाऱ्यांना चाप बसला. यावर पर्याय म्हणून या महाभागांनी क्रेडिट कार्डाचा वापर सुरू केला. ही बाब लक्षात घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांना क्रेडिट कार्डाचा वापर करता येणार नाही, असा आदेश दिला आहे. एवढेच नव्हे, तर असे निदर्शनास आल्यास संबंधित कार्ड लागलीच बंद करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयाने काय फरक पडला, यावर सध्या बराच खल सुरू आहे. सर्वसामान्य व्यक्ती आपआपल्या परीने आर्थिक किल्ला लढवताना दिसतात. यात, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारे दोन नंबरचे धंदेही सापडलेत. कॅसिनो, लॉटरी, अनधिकृत कॉल बॅक सिस्टिम तसेच बंदी असलेली मासिके खरेदी यांच्या व्यवहारात मंदी आली. शेवटी या व्यावसायिकांनी ऑनलाइन प्रणालीचा पर्याय निवडला. विशेषतः क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून रोज कोट्यवधींचे व्यवहार पार पडत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निर्दशनास आले आहे. अनधिकृत व्यवहारांना याद्वारे प्रोत्साहन मिळत असून, ही बाब घातक असल्याने अशा व्यवहारांना पायबंद घालण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. याबाबत बँक व्यवस्थापनांना रिझर्व्ह बँकेने आदेश दिले आहेत.

यापुढे क्रेडिट कार्डवर लॉटरी तिकिटे खरेदी करता येणार नाहीत, तसेच कॉल बॅक सर्व्हिस, बेटिंग किंवा जुगाराबाबत इतर व्यवहारही करता येणार नाहीत. एवढेच नव्हे, तर देशात बंदी असलेल्या मासिकांची खरेदीसुद्धा क्रेडिट कार्डाद्वारे करता येणार नाही. देशातील अनेक मोठ्या कसिनो, हॉटेल्समध्ये हे उद्योग चालतात. वेबसाइटच्या मदतीने खरेदीप्रक्रिया पार पाडली जाते.

...तर कार्ड कायमस्वरूपी ब्लॉक

फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट १९९९ (फेमा)मधील तरतुदीनुसार क्रेडिट कार्डधारकास प्रतिबंधित व्यवहार करण्यास मनाई असल्याने रिझर्व्ह बँकेने हे आदेश दिले असल्याचे राष्ट्रीयीकृत बँकेतील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित कार्ड लागलीच बंद करण्यात येईल, तसेच वापरकर्त्याला पुन्हा क्रेडिट कार्ड दिले जाणार नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हे टाळावेच लागेल!

- क्रेडिट कार्डावर लॉटरी तिकीट खरेदी
- बंदी असलेली मासिकांची खरेदी
- कसिनोत क्रेडिट कार्डचा वापर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९२ कोटींचे रस्ते तपासणीच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शहरातील १९२ कोटींच्या रस्त्यांच्या कामासंदर्भात तक्रारी आल्याने महापालिका आयुक्तांनी या कामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंहस्थाच्या धर्तीवर खासगी संस्थेमार्फत या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. स्थायी समितीतही या कामासंदर्भात काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. खासगी संस्थेकडूनच या रस्त्यांची गुणवत्ता तपासली जाणार असल्याने बांधकाम विभागाला धडकी भरली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेने महासभेत शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण,अस्तरीकरण व खडीकरणसाठी तब्बल १९२ कोटींच्या विशेष खर्चाला मंजुरी दिली होती. त्या बजेटमध्ये तरतूदही करण्यात आली होती. त्यानंतर झपाट्याने सध्या ही कामे सुरू आहेत. यातील शंभर कोटींच्यावर कामे ही डांबरीकरणाची आहेत. परंतू, मनसेच्या या ड्रीम प्रोजेक्टसंदर्भात काही नागरिकांसह भाजपच्या सदस्यांनी तक्रार केली आहे. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत, या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सिंहस्थातील चारशे कोटींच्या कामांच्या गुणवत्तेची तपासणीही त्रयस्थ खासगी संस्थेमार्फत करण्यात आली होती. त्याच धर्तीवर के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज, शासकीय आयटीआय संस्था व मेरीसारख्या संस्थांकडून ही चौकशी करण्यात येणार असून त्यांसदर्भातील कारवाईही सुरू केली आहे. या रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासला जाणार असून नियमाप्रमाणे काम केले की नाही, याचा अहवाल बांधकाम विभाग घेणार आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांमध्ये झालेली गडबड समोर येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images