Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एसएसबी मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी दहा दिवसीय एसएसबी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाचा कालावधी २३ जून ते २ जुलै असा असून छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांना प्रशिक्षण वर्गात प्रवेश देण्यासाठी २१ जून रोजी निवड चाचणी होणार आहे.
या प्रशिक्षण वर्गात सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या महाराष्ट्रीयन तरुणतरुणींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परीक्षेची मुलाखतपत्रे मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांसाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी हा मोफत प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात निवास व भोजनाची सोय विनामूल्य आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्ग प्रवेश चाचणीसाठी २१ जून रोजी सकाळी १०.३० वाजता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिकरोड येथे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळप्रतींसह मुलाखतीस हजर राहायचे आहे. याविषयी अधिक माहितीसाठी ०२५३-२४५१०३१ व २४५१०३२ या क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एसएसबी प्रवेश वर्गासाठी खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत आणणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

कंबाइन्ड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.
एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.
टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे जिल्ह्यातील निकाल शंभर टक्के

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरासह जिल्ह्यातील सर्व सीबीएसई पॅटर्न शाळांचा ऑनलाइन निकाल शनिवारी (दि. २८ मे) दुपारी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

शहरातील केंद्रीय विद्यालयाचा सलग चौथ्यावर्षी निकाल शंभर टक्के लागला. या परीक्षेत रागिणी सहदेव चतुर्वेदी हिने ९.२ सीजीपीए ग्रेड मिळवून प्रथम क्रमांक, रोशनी पाटील आणि हितेश निकम याने ९ सीजीपीए ग्रेड मिळवून द्व‌ितीय क्रमांक प्राप्त केला. या परीक्षेसाठी एकूण ३३ विद्यार्थी बसले होते.

तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूलचाही निकाल शंभर टक्के लागला. यात खुशी अग्रवाल हिला १० सीजीपीए ग्रेड प्राप्त झाली. तर शैलेश चव्हाण याला ९.६ सीजीपीए ग्रेड प्राप्त झाली. शंभर टक्के निकाल लागणाऱ्या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल, शिरपूर तालुक्यातील दहीवद येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलचा समावेश आहे. या शाळेतील रागिणी पाटील, शिवकुमार पाटील व सौरभ गावीत या तिघांनी प्रत्येकी १० सीजीपीए ग्रेड मिळवून धुळे जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांकडून एकाची अमृतधामला लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुचाकीस्वारास खाली पाडून तिघा संशयितांनी त्याला लुटल्याची घटना अमृतधामजवळील टीबी सॅनेटोरियम परिसरात घडली. आडगाव शिवारातील समर्थनगर येथील अभिजीत श्रीकृष्ण जगताप (३८) हे गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम परिसरातून दुचाकीवरून जात असताना त्यांना तीन संशयितांनी धक्का मारून पाडले. तसेच, त्यांच्याजवळील १२ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

सहा लाखांचे दागिने चोरी मुंबई येथून इंदिरानगर परिसरात आलेल्या महिलेच्या कारच्या डिक्कीतून सुमारे सहा लाख रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना एप्रिल महिन्यात झाली असून, या प्रकरणी तारिका हरिष राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आठ एप्रिल रोजी राजपूत या मुंबईहून नाशिकला त्यांच्या कारने आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कारच्या डिक्कीत पाच लाख ८२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. हे दागिने कारच्या डिक्कीतून अथवा इंदिरानगर परिसरातील वंदना अपार्टमेंट येथून चोरीला गेले असावेत, असा संशय राजपूत यांनी व्यक्त केला आहे.

८७ हजाराची घरफोडी जयभवानी रोडवरील आडकेनगर परिसरातील आदित्य रो-हाऊस येथील अमितकुमार जीवनचंद्र भट्टाचार्या यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून आत शिरलेल्या चोरट्यांनी तब्बल ८७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना बुधवारी झाली. तसेच चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीचे दागिने, डिजिटल कॅमेरा, लॅपटॉप, घड्याळ असा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कोणार्कनगरात घरफोडी आडगाव शिवारातील कोणार्कनगर परिसरातील प्रज्ञा सोसायटीत राहणारे सुधीर भिमराव निकम (वय ५४) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल १ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केली. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी निकम यांच्या घरी कोणीच नव्हते. निकम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुधवारपासून सुरळीत पाणी

$
0
0

सिन्नरसाठी दारणा नदीतून आवर्तन सोडले; शहरासह उद्योगालाही पुरवठा
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

दारणा नदीपात्रातील पाणीसाठा संपल्यामुळे सिन्नर शहरासह दोन्ही औद्योगिक वसाहती, नायगावसह सात गावे, तसेच टँकरद्वारे तालुक्यात होणारा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प झाल्यामुळे सिन्नर शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रविवारी दुपारी दारणातून पाण्याचे आवर्तन सोडल्याने बुधवारपासून पाणीपुरवठा सुरू होऊ शकणार आहे. तोपर्यंत शहरासह तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

सध्या सिन्नर शहरात चार ते पाच दिवसांनी, तर उपनगरात आठवड्यातून एकदा पाणी सोडले जात आहे. त्यामध्ये अजून चार दिवसांची भर पडून आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळणार आहे. दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्यामुळे नगरपालिकेसह औद्योगिक वसाहतींना पाणी उचलणे अश्यक्य झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार राजाभाऊ वाजे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांची भेट घेऊन पाणीप्रश्नाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवारी दारणा नदीतून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले असून, हे पाणी २४ तासात चेहडी बंधाऱ्यात येऊन नगरपालिकेसह औद्योगिक वसाहतींना पाणी उचलणे शक्य होणार आहे. त्यानंतर सिन्नरकरांना बुधवारपर्यंत पाण्याची वाट पहावी लागणार आहे.

१७ गावे, १०७ वाड्या तहानलेल्याच! गेल्या तीन दिवसांपासून पाणी उचलणे बंद झाल्याने १७ गावे, १०७ वाड्यांना ३० टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठाही होऊ शकला नाही. औद्योगिक वसाहतीतील जलकुंभात असलेल्या शिल्लक पाण्यावर काही टँकर भरण्यात आले. त्यानंतर टँकर भरणेही बंद झाले. नगरपरिषदेचा जलकुंभही कोरडा पडला. त्यामुळे शहरासह उपनगरांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दारणा धरणातून रविवारी २०० दशलक्ष घनफुटाचे आवर्तन सोडण्यात आल्याने तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याबरोबरच सिन्नर नगरपरिषद, औद्योगिक वसाहतीसह सात गावे पाणीयोजनांचा पाणीपुरवठा बुधवारपासून नियमित होण्याची शक्यता आहे.

सिन्नर शहर, उपनगरे दोन्ही औद्योगिक वसाहती तसेच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना औद्योगिक वसाहतीच्या जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. नायगावसह सात गावांची योजना चेहडी बंधाऱ्यावर अवलंबून आहे. बंधारा कोरडा झाल्याने पाणी सोडण्यात यावे ही विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली. यामुळे लवरकच पाणीपुरवठा करणे शक्य होईल. - राजाभाऊ वाजे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूचे १६ ट्रक पकडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे गावाजवळ उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहून नेणाऱ्या विनापरवानाधारक ट्रकवर कारवाई केली. एकूण १६ ट्रक पकडले असून, एक कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त केला गेला आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात नाशिक-मुंबईच्या दिशेने वाळू वाहतूक होत असते. मात्र, यातील गैरकारभारावर प्रथमच एवढी मोठी कारवाई झाली आहे.

मालेगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर उपअधीक्षक गजानन राजमाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास महामार्गवरील टेहरे शिवारात धुळे येथून नाशिककडे जाणाऱ्या बाजूस या पथकाने ट्रक अडवून चौकशी व तपासणी केली. त्यात क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहून नेली जात असल्याचे निदर्शनास आले. मात्र, अशा एक दोन नव्हे तर एकाचवेळी १३ ट्रक पकडण्यात आल्याने खळबळ उडाली.

मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिक-मुंबई येथील बांधकाम व्यवसायासाठी लागणारी वाळू मोठ्या प्रमाणात वाहून नेली जाते. यात बऱ्याचवेळा क्षमतेपेक्षा अधिक वाळू असणे, अवैध प्रकारे वाळू उपसा करून नेणे, परवाना नसणे असे प्रकार घडतात. मात्र, मालेगाव पोलिसांकडून पकडण्यात आलेल्या या वाळू ट्रकमुळे वाळू वाहतुकीतील गैरकारभार पुन्हा चर्चेत आला आहे. या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेले १६ ट्रक दुपारी येथील कॅम्प पोलिस स्थानक आवारात जमा करण्यात आले होते. यात सर्व सोळा ट्रक चालक-चालक तसेच लिलावधारक सचिन सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी येथील छावणी पोलिस स्थानकात नायब तहसीलदार गिरीश वाखारे यांनी फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिल्या धरणातून गाळ उपसा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येत्या पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर शहराचा पाणीसाठा काही पटीने वाढणार असे जलाशयांच्या होत असलेल्या दुरुस्तीच्या कामांनी स्पष्ट होत आहे. त्र्यंबक शहरास विस्तीर्ण तलावांचा वारसा लाभला आहे. अहिल्या धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यासोबतच या धरणाची उंची वाढवून दगडांनी मजबूत करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात त्र्यंबक शहराला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते दीपक लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, आरोग्य सभापती यशवंत भोये, बांधकाम सभापती धनंजय तुंगार आणि नगरसेवकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून हे काम सुरू केले आहे. नगरपरिषदेने फंडातून येथील दुरुस्तीसाठी तरतूद केली आहे. शासन आणि लोकसहभागातून या धरणाचा साठा वाढल्यास शहरास अधिक पाणी उपलब्ध होईल. त्याचबरोबर या परिसरात पर्यटकांना आकर्षित करता येईल, असे निसर्ग संर्वधन करणे शक्य होणार आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील सर्वात पुरातण असा मुकुंद तलावाचा गाळ लोकवर्गनीतून काढून डागडूजी करण्यात येत आहे.

बिल्वतीर्थ हा तलावातील गाळ त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थानतर्फे काढण्यात येत आहे. सर्व तलाव सुशोभीकरण करण्यात येणार आहेत. त्र्यंबकेश्वरला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबोली धरणातील गाळ शेतकरी स्वयंस्फूर्तीने काढून नेत आहेत. लाखो लीटर पाणीसाठा असा वाढल्याने त्र्यंबक शहरास भविष्यात पाण्याची सधनता प्राप्त होणार आहे. धरण आणि तलावातील गाळ हा समृध्द मृदा संचय असून, तो शेतजमिनीस लाभदायक आहे. शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला शहरात पुन्हा भरदिवसा डल्ला

$
0
0

शेतकऱ्याची १ लाख १४ हजारांची रोकड लांबवली

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुचाकी अथवा इतर वाहनातून मार्गक्रमण करणाऱ्यांच्या रोख रकमेवर भरदिवसा भररस्त्यात अज्ञात चोरट्यांकडून डल्ला मारण्याच्या घटना सुरूच आहेत. अशाच पद्धतीने एका शेतकऱ्याची १ लाख १४ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. यामुळे पोलिसांसमोर या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

येवला तालुक्यातील चांदगाव येथील शेतकरी साहेबराव विष्णू आहिरे (वय ५२) हे शुक्रवारी दुपारी अकराच्या सुमारास येवला शहरात आले होते. त्यांनी साडेअकराच्या सुमारास येथील टिळक मैदानातील देना बँकेच्या शाखेतून १ लाख १४ हजार रुपये काढले. बँकेतून बाहेर आलेल्या आहिरे यांनी पैसे आपल्या अॅक्टिव्हा गाडीच्या डिक्कीत ठेवले. पुढे घरी जाण्यासाठी ते घरी निघाले.

शहरातील जुन्या नगरपालिका इमारतीजवळून जात असताना कुणीतरी त्यांच्या मानेवर एक पदार्थ टाकला असता त्यांना आग होण्यास सुरुवात झाली. अशाही परिस्थितीत त्यांनी पुढे जात बसस्थानक रोडवरील हॉटेल विक्रांतीमध्ये जाऊन आपल्या मानेवर पाणी टाकले. याचदरम्यान त्यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीच्या डिक्कीतील रोकड काढून घेत पलायन केले.

जवळच असलेल्या एका नारळ विक्रेत्याने काका तुमच्या डिक्कीतून काहीतरी काढत दोघेजण पळाल्याचे साहेबराव आहिरे यांना सांगितले. आहिरे यांनी येवला शहर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, पोलिस हवालदार वसंत हेंबाडे अधिक तपास करीत आहेत. आहिरे हे बँकेतून पैसे काढत असतानाच चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे. शहरात बॅग लिफ्टिंगच्या घटना वाढल्या असून, पोलसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचोरे वणीला तंटामुक्तीचा पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

गावातील वाद, मतभेद, जमिनीचे वाद आपापसात सामंजस्याने मिटवत गावातील शांतता व सलोखा अबाधित ठेवल्याबद्दल पाचोरे वणी (ता. निफाड) गावास महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्तीचा चार लाखांचा पुरस्कार नुकताच अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास पोलिस उप अधीक्षक दत्तात्रय घोगरे, विभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आदी उपस्थित होते. यावेळी मोहिते म्हणाले, की पाचोरे वणी येथील ग्रामस्थांनी गावातील छोटे-मोठे वाद, जमिनीचे भांडण सामंजस्याने व मध्यस्थीने गावातच मिटवून चांगला आदर्श उभा केला आहे. पाचोरे वणी गावातून वर्षभरात कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात आली नाही. तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावातील वाद गावातच मिटवून पाचोरे वणी गावाने शासनाचा तंटामुक्तीचा पुरस्कार मिळविला आहे. या गावाचा इतर गावांनी आर्दश घ्यावा, असे आवाहनही मोहिते यांनी केले. पाचोरे वणी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष एकनाथ रोटे, भालचंद्र रसाळ, संपतराव वाटपाडे, पोपटराव गवारे आदी मान्यवरांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराच्या चार लाख रुपयांतून गावात विकासासाठी एखादी चांगली योजना राबविण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी साहेबराव गवांदे, रंगनाथ वाटपाडे, जयवंत वाळूं, विजय वाळूंज, शांताराम वाळूंज, प्रकाश नागरे, संतोष वाटपाडे, एकनाथ नेहरे, ज्ञानेश्वर वाटपाडे, वाल्मिक रसाळ, ग्रामसेवक जी. के. शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनावरे नेणारी पिकअप पकडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवणहून जवळ असलेल्या भेंडी रत्यावरील वस्तीजवळ अवैधरित्या कत्तलसाठी गायी व वासरे घेऊन जाणारी पिकअप गाडी मध्यरात्री कळवण पोलिसांनी पकडली. याप्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गाडीचा पोलिसांनी माहिती मिळताच सिनेस्टादल पाठलाग केला. या कारवाईमुळे जनावरे कत्तलीसाठी अवैधरित्या घेऊन जाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कळवण परिसरातील नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.

या पीकअप गाडीत जनावरांना पाय बांधून त्यांना हालचाल करता येणार नाही अशाप्रकारे निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत होते. सदर गाडी व जनावरे कळवण पोलिस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहे. तर या गाडीतील गुरांची राहण्याची व्यवस्था नारायणगाव येथील गोशाळेत करण्यात आल्याचे कळवण पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुजय घाटगे यांनी दिली. तर अधिक तपास पोलिस हवालदार जे. जी. पवार करीत आहेत.

सिनेस्टाइल पाठलाग

रविवारी, (दि. २९ मे) रोजी पहाटे ४ वाजता अभोणा पोलिस स्टेशन हद्दीत एक गाडी (एमएच ४१, जी. ९०६८) भरधाव वेगाने जात असल्याचे अभोण्याच्या सहाय्यक निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या लक्षात आले. त्यांना ती गाडीबद्दल संशय आल्याने त्यांनी गाडीस अडवण्याचा प्रयत्न केला. पण चालकाने गाडी भरधाव पुढे नेत कळवण मार्गे पळ काढला.

ही संपूर्ण माहिती सहाय्यक निरीक्षक कमलाकर यांनी कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय घाटके यांना कळवली. त्यांनी माहिती मिळताच पोलिस हवालदार बी. डी. पाटोळे, जे. जी. पवार, आर. आर. डगळे, जातवे, भवर यांना सांगून संबंधित गाडी अडवण्याचा प्रयत्न कळवण येथे केला. पण यावेळीही ड्राइव्हर जोरात गाडी घेऊन निघून गेला. पुढे या पीकअप गाडीचा पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून ही गाडी आणि त्यातील दहा गाई जप्त केल्या. या गाडीसोबत एक व्यक्तीस त्याचे नाव अब्दूल वदाब अहमद याकूब (वय ५७, रा. भिकूचौक) यास अटक केली. तर दुसऱ्या व्यक्तीने त्याठिकाणाहून पळ ठोकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदली प्रक्रियेत सावळागोंधळ

$
0
0

लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवले; स्थानिक पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा आक्षेप
म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी पंचायत समिती येथे ग्रामसेवक व इतर प्रवर्गाच्या बदली प्रक्रिया राबविली असली तरी ही प्रक्रिया पुन्हा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे बदली प्रक्रिया न राबविता इगतपुरी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बदली प्रक्रिया राबविली.
विशेष म्हणजे या बदली प्रक्रियेतील सभापती व उपसभापतीसह लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून नियमबाह्य बदल्या केल्याने या बदल्यांना लोकप्रतिनिधींनी हरकत घेतली आहे. त्यामुळे बदली प्रक्रियाबाबत काय होते, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. इगतपुरीच्या स्थानिक पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता राबविलेली ग्रामसेवक बदली प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली. या संदर्भात माजी आमदार काशिनाथ मेंगाळ , जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, संदीप गुळवे, सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन या नियमबाह्य बदल्यांची माहिती दिली. याबाबत जिल्हा परिषदेने दखल न घेतल्यास आम्ही विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती सभापती गोपाळ लहांगे व उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांनी यावेही 'मटा'शी बोलताना दिली. नियमबाह्य मनमानी पद्धतीने केलेल्या बदल्या रद्द करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या विरोधात कार्यवाही करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
अधिकाऱ्यांकडून दिरंगाई

या सर्व प्रकारात इगतपुरी तालुक्यात शासन नियम धाब्यावर बसवून बदल्या प्रक्रिया राबविण्यात आली. याला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचा वरदहस्त असल्याचा आरोपही सभापती गोपाळ लहांगे व उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांनी केला. गटविकास अधिकारी, प्रशासन, विस्तार अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक व संबंधित ग्रामसेवक यांनी संगनमताने बदली प्रक्रिया राबविली. स्थानिक पंचायत समिती, लोकप्रतिनिधींना माहिती न देता ही प्रक्रिया राबविल्याचा आरोप सभापती व उपसभापती यांनी केला. गटविकास अधिकारी हे मनमानी पद्धतीने वागत असून जनतेच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करतात व नेहमी बाहेर फिरस्तीचे नाव सांगून दिरंगाई करत असल्याचा आरोपही नमूद केले आहे.



काय सांगते प्रक्रिया?

या बदली प्रक्रियेमध्ये तालुकास्तरावर काही कागदोपत्री कार्यरत असलेले ग्रामसेवक, वादग्रस्त ग्रामसेवक, इतर ग्रामसेवक यांची बदली प्रक्रिया तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांनी राबविली आहे. यात रिक्त जागेवर पेसा क्षेत्रात आदिवासी गावात प्राधान्याने पदे भरण्याचे नियुक्त आदेश सरकार स्तरावर असतानाही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. तसेच याठिकाणी 'जागा रिक्त नाही' असे नमूद करून तालुका पातळीवरही बदली जागा एक वर्षापासून रिक्त दाखवली जात आहे, बदली टिपणीतही तसे नमूद केले आहे. आदिवासी, पेसा भागातील रिक्त जागा प्रथम भरणे, रिक्त ठेवू नये असे आदेश असून, गटविकास अधिकारी यांची जबाबदारी आहे. अन्यथा गटविकास अधिकारी यांना दोषी धरून कार्यवाही करण्याचे शासन निर्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजयुमो’ची कळवण कार्यकारिणी जाहीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत भाजप जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, शहराध्यक्ष निंबा पगार, भाजयुमो तालुकाध्यक्ष हेमंत रावले, दीपक वेढणे, सचिन सोनवणे, कृष्णकुमार कामळस्कर, मोती वाघ यांच्या उपस्थितीत भाजयुमोची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या वेळी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी हेमंत रावले, उपाध्यक्षपदी चेतन निकम, सागर जाधव, शशिकांत बागूल, सुनील गवळी, चेतन पाटील, देवीदास देवरे, प्रशांत शेवाळे यांची निवड करण्यात आली. तर सरचिटणीसपदी मोहसीन कासार, राहुल आहेर, मधुकर मोरे यांची निवड झाली. तसेच चिटणीस म्हणून हंसराज गवळी, किशोर तोटे, तेजस कोठावदे तर संघटक नितीन सूर्यवंशी, जितेंद्र पंडित यांना स्थान देण्यात आले आहे.

यासोबतच भाजयुमोच्या कळवण शहराध्यक्षपदी नितीन भामरे यांची तर अभोणा शहराध्यक्षपदी कुणाल सोनवणे, उपाध्यक्ष अमर कानडे यांची निवडही यावेळी करण्यात आली. या नूतन कार्यकारिणी निवडीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, भाजयुमो जिल्हाध्यक्ष समीर चव्हाण, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विकास देशमुख, रमेश रावले, गोविंद कोठावदे आदिंनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वर धरणातील गाळ काढण्याचा ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नांदूरमध्यमेश्वर धरणातील प्रचंड प्रमाणात गाळ साठल्याने धरणाची साठवण क्षमता कमालीची घटली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून परिसरातील लोकांना प्रचंड पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या धरणात अवघा वीस टक्के पाणी शिल्लक आहे. यावर उपाययोजना म्हणून नुकताच निफाड पंचायत समिती गाळ काढण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यामुळे हा गाळ काढला गेला तर पाणीप्रश्न सुटणार असून याबाबत पालकमंत्र्यांनीही लक्ष घालावे अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. दुसरीकडे पर्यटनाच्या दृष्टीने या धरणात पक्ष्यांचेही वास्तव्य असते त्यामुळे या गाळ क‌ाढण्याच्या मुद्द्याचे पक्षीमित्रही समर्थन करीत आहेत.

नाशिक, नगर, मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणात गोदावरी आणि तिच्या उपनद्यांनी आणलेल्या गाळांनी धरणात ८० टक्के गाळ साठला आहे. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता केवळ २० टक्के राहिली आहे. सदरचा गाळ धरणापासून ७०० मिटरपर्यंत गाळ काढता येऊ शकतो. तसेच धरण परिसरात असणाऱ्या अभयारण्याचे लाभक्षेत्र वगळून गाळ काढण्यात यायला हवा, असेही काही जाणकारांकडून सुचविण्यात येत आहे.

गत महिन्यात उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दारणातून २८ मार्चला आवर्तन सोडले होते. मात्र हे रोटेशन संपताच पंधरवाड्यात धरण कोरडे पडून पाण्याचा ठणठाणाट झाला आहे. त्यामुळे लासलगावसह इतर सोळा गावांचा पाणीपुरवठा ५ मे पासून बंद झाला आहे. यामुळे निफाडच्या पूर्व भागातील गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत नांदूरमध्यमेश्वर धरणातील गाळ काढण्याशिवाय पर्याय नसल्याने सरकारने तत्काळ नांदूरमध्यमेश्वर धरणातील गाळ काढण्यास निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच सदरचा गाळ पावसाळा सुरू होण्यापूर्वी काढण्यात यावा, असा ठराव पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी मांडला. त्यास बाळू हिले यांनी अनुमोदन दिले. त्यावर निफाड समिती सभागृहात चर्चा होऊन सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याकडे लक्ष घालून गाळ काढण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.

तलाव घेणार मोकळा श्वास

निफाडसारख्या सधन तालुक्यातील नागरिकांना या साचलेल्या गाळामुळे पाणीसाठा कमी झाल्याने दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहे. याबाबत निफाड पंचायत समितीच्या सभेत नुकताच पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी ठराव मांडला. तो सर्व सदस्यांच्या सर्वानुमते मंजूरही करण्यात आला आहे. या ठरावामुळे आता गाळ काढण्यात येणार असून नांदूरमध्यमेश्वर तलाव मोकळा श्वास घेणार आहे.

नांदूरमध्यमेश्वर धरणातील गाळ काढण्याला पक्षी अभयरण्यामुळे अडचण आहे. हे जागतिक पाणथळ स्थळ असल्याने या धरणातील गाळ काढायला परवानगी मिळणे अवघड आहे. मात्र धरणाच्या भिंतीपासून पाचशे मीटर पर्यंत गाळ काढण्यास काही हरकत नाही. त्याचा पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होणार नाही.

- दत्त उगावकर, पक्षीमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘युती सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

शेतीसाठी लागणारे खते, बियाणे, किटकनाशके प्रचंड प्रमाणात महाग झाले आहेत. शेतमालाला भाव मिळत नसल्याने सर्व स्तरावर महागाई वाढली आहे. भाजप-शिवसेना युती सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून, 'अच्छे दिन' कुठे आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तसेच दुष्काळी परिस्थितीची पहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रत्यक्ष जिल्हा परिषद गटवार दौरा सुरू करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील या दौऱ्यात दिंडोरी येथील मेळाव्यात अॅड. पगार बोलत होते. अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.

रवींद्र पगार पुढे म्हणाले, की शंभर दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारचे दोन वर्षे उलटूनही महागाई कमी झाली नाही. काँग्रेस आघाडी सरकारने अनेक चांगले निर्णय घेऊनही परिवर्तनाच्या लाटेत सत्तारुढ झालेले मोदी सरकार महागाई कमी करण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांची मनोगते जिल्हाध्यक्ष अॅड. पगार यांनी जाणून घेतली.

श्रीराम शेटे म्हणाले, की या सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथा समजत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. मात्र हे सरकार कुणालाही दिलासा देत नसून जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. आमदार नरहरी झिरवाळ म्हणाले, की मतदारसंघातील विविध विकासकामे करण्यास कटिबध्द असून, दिंडोरी येथे समाजकल्याण विभागमार्फत मुलां-मुलीसाठी वसतिगृह व दादासाहेब गायकवाड यांच्या जन्मस्थळी स्मारक हे काम लवकरच सुरू होणार आहे. शासनाने कोणताही भेदभाव न करता मांजरपाडा प्रकल्पास त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गणपत पाटील, कृउबा समिती सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, पक्ष निरीक्षक जगदीश पवार, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, दिंडोरीचे उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, पंचायत समितीचे सभापती अलका चौधरी, जिल्हा परिषदेच्या सदस्या संगीता ढगे, डॉ. भारती पवार, विष्णुपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, महिला नेत्या शोभा मगर, डॉक्टर सेलचे जिल्हाद्यक्ष डॉ. योगेश गोसावी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेतही अॅड. पगार यांनी सरकारवर टीका केली. सन १९७२ च्या दुष्काळापेक्षा कठीण दुष्काळी परिस्थिती यावर्षी आहे. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे हाल दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने आंदोलने करीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, वीजबिल माफी करावी, कांदा पिकासह शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, तसेच त्वरित चारा छावण्या सुरू कराव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी मागणी होताच २४ तासांत पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही पगार यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारची मालट्रकला धडक; तीन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंबई-आग्रा महामार्गावरील सवंदगाव फाटाजवळ शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मालट्रक व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले. मालेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील स्पीड ब्रेकरवर नाशिककडून धुळ्याकडे जात असलेल्या मालट्रकने अचानक ब्रेक लावला. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणारी फिगो कार मालट्रकवर मागून आदळली. या भीषण अपघातात कारमध्ये असलेला चालक नयन अशोक गाढे (वय २६, रा. नगर), प्रभाकर नथू साळुखे (वय ३५, रा. चोपडे), रेखा रमेश पाटील (वय ३०, रा. यावल) हे जागीच ठार झाले. तर रमेश पंढरीनाथ पाटील व तुषार विश्वनाथ तायडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक येथे सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघातात ट्रकचालक धुळे दिशेने फरार झाला आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास मालेगाव पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघ हत्याकांडात चौघांना अटक

$
0
0

पाच जणांचा युध्दपातळीवर शोध सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील सुनील वाघ हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली. या चौघांसह अन्य दोघांना पोलिसांनी शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी ताब्यात घेतले होते. तर, अन्य एकाला रविवारी सकाळी पकडले. मात्र, चौकशी अंती चौघांनाच अटक झाली. या घटनेतील मुख्य सूत्रधार कुंदन परदेशीसह इतर फरार असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

पंचवटीतील क्रांतीनगर येथे एका टोळक्याने सुनील वाघ (वय २५) आणि त्याचा मोठा भाऊ हेमंत यांच्यावर शुक्रवारी रात्री हल्ला चढवला. यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला, तर हेमंतवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मंदाबाई रामदास वाघ (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलिसांनी कुंदन परदेशी, करण परदेशी, अक्षय इंगळे, गणेश कालेकर, रवि परदेशी, मयूर कानडे, श्रीनिवास कानडे, गौरव माळी, मयूर भावसार यांच्यासह अन्य काही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेच्या दिवशी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मयूर व श्रीनिवास कानडे या भावांना येवला पोलिसांनी जेरबंद करीत पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले. तर, गौरव माळी आणि मयूर भावसार यांना पंचवटी पोलिसांनी शहरातूनच ताब्यात घेतले. खुनाच्या चौकशीसाठी शहर पोलिसांनी अन्य तिघां जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांच्याविरोधात सबळ पुरावे समोर न आल्याने त्यांची पुढील चौकशी स्थगित करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुंदन परदेशी, करण परदेशी, अक्षय इंगळे, गणेश कालेकर, रवि परदेशी हे मुख्य संशयित अद्याप फरार असून, क्राईम ब्रँचसह पंचवटी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पंचवटी टॉपवर जानेवारी ते २९ मे २०१६ या कालावधीत शहर हद्दीत खुनाच्या एकूण २२ घटना घडल्या. यातील सर्वाधिक म्हणजे सात घटना एकट्या पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतील आहेत. म्हसरूळ आणि पंचवटी असे दोन पोलिस स्टेशनचा स्वतंत्र कार्यभार सुरू झाल्यापासून पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीत गुन्ह्यांचा आलेख उंचावतो आहे. अवैध धंद्याचे केंद्रीकरण या भागात होत आहे.

शहरात शोध मोहीम

शनिवारी रात्री शहर पोलिसांनी सुमारे अडीचशे पोलिस कर्मचारी व ४० अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कोम्बिंग ऑपरेशन राबवले. शहरातील नाशिकरोड, अंबड, ​सिडको, सरकारवाडा, म्हलारखान झोपडपट्टी, भद्रकाली तसेच पंचवटीतील फुलेनगर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या मोहिमेदरम्यान २३४ टवाळखोरांवर कारवाई केली. घरफोडीच्या तयारीत असलेल्या एका टोळीला जेरबंद करण्यात आले. तर, एक जुगार अड्डा पोलिसांनी उद्धवस्त केला. सर्वसामान्यांना वेठीस न धरता पोलिसांनी अशाच प्रकारे गुन्हेगार प्रवृत्तीच्या नागरिकांना सळो की पळो करून सोडण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिष्यवृत्तीचे फेक मेसेज व्हायरल

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. सदर निकालानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. सदर मेसेजची पडताळणी करण्यासाठी अनेकांनी मेसेजमधील संकेतस्थळावर भेटी दिल्या आहेत. मात्र तेथे कोणत्याही प्रकारची या योजनांबाबत माहिती अपलोड नसल्याचे दिसून येते.

'दहावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेऊन ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारद्वारे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम आणि भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने शिष्यवृत्ती देणार आहेत. त्या संबंधित सगळी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.' हा व्हायरल होणार मेसेज आहे. संबंधित लिंकवर मात्र कोणत्याही प्रकारची माहिती अपलोड नसल्याचे दिसून येते. यामुळे नेमका हा मेसेज खरा की खोटा असा सवाल विद्यार्थी आणि पालक करत आहेत. गेल्या महिन्यात देखील हा मेसेज व्हायरल झाला होता. मात्र निकालानंतर हा मेसेज अधिकाधिक व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.

मेसेजमध्ये म्हटल्याप्रमाणे अशी कोणतीही शिष्यवृत्ती सरकारकडून जाहीर झाली नसल्याची माहिती वजा स्पष्टीकरण शिक्षण खात्याकडून मागील महिन्यातच देण्यात आले होते. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लवकरच दहावीचा निकाल सुद्धा जाहीर होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र शिक्षण खात्यानेच हे स्पष्टीकरण दिल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर वेबसाइट आर्मीची..!

-www.desw.gov.in ही वेबसाईट सदर मेसेजमध्ये देण्यात आली आहे. ही वेबसाईट एक्स-सव्हिर्स मॅन वेल्फेअर विभागाची आहे. या वेबसाईटवर मोदींच्या नावे देण्यात आलेल्या सर्व योजना या फक्त सैनिकी शाळा आणि सैनिकांच्या पाल्यांसाठी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा पॉवर’मुळे उद्योगांना चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मँन्युफँक्चरर्स असोसिएशन (निमा) आयोजीत निमा पॉवर २०१६ या प्रदर्शनात उद्योगवाढीसाठी चालना मिळणार, असा विश्वास विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी व्यक्त केला.

निमा पॉवर प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. २७ ते ३० मे दरम्यान भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला हजारो नाशिककरांनी भेट देत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.

प्रदर्शनामुळे नाशिकच्या उद्योगांना चालना मिळणार असल्याने उद्योजकांनी संधीचा निश्चितच फायदा घ्यावा, असे आवाहन डवले यांनी केले. इलेक्ट्रानिक व इलेक्ट्रीकल हब म्हणून नाशिक विभाग नव्याने उद्यास आला असून एचएएलसारख्या नामांकीत कंपनीचे सुटे पार्ट निर्माण करणारे उद्योजक तयार झाले पाहिजेत असेही ते म्हणाले.

दरम्यान, या प्रदर्शनाला नाशिककरांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल निमाचे अध्यक्ष संजीव नारंग यांनी आभार मानले. निमा पॉवर प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी छोट्या व मध्यम उद्योगांना निमा पॉवरमुळे नक्की चालना मिळणार असल्याचे सांगतिले. सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी निमाचे माजी अध्यक्ष निशीकांत आहिरे, धनंजय बेळे, सतीश कोठारी. विरल ठक्कर, राजेंद्र वडनेरे आदी उपस्थित होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर भूसंपादनाला हिरवा कंदील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील दोन डीपी रस्त्यांच्या भूसंपादनासाठी सव्वा कोटीचा निधी देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली असून ४० कोटीचे प्रस्ताव स्थग‌ीत ठेवण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील क्रिडांगणासाठी ५६ कोटी रुपये दिले असतांना देवळाली शिवारातील क्रिडांगणासाठी २५ कोटी देण्याचा प्रस्तावाचा स्थगीत ठेवण्यात आला.

दरम्यान, प्रथमच दोन रस्त्यांच्या जम‌िनीचे भूसंपादन करण्यासाठी टीडीआर देण्याच्या प्रस्तावालाही स्थायी समितीने मंजुरी दिली. विकासकामांचे विषयही मंजूर करण्यात आले आहेत.

सभापती सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. त्यात भूसंपादनाच्या विषयांवरून विरोधक व मनसेचे सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. नगरसेवक दिनकर पाटीलसह शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी भूसंपादनाच्या प्रस्तावांना विरोध करत निधी कुठून आणणार असा सवाल केला. तर शेतकऱ्यांच्या जम‌िनींचे पैसे द्यायचे नाहीत काय? असा सवाल मनसेच्या अशोक सातभाई यांनी केला. सभापतींनी या विषयावर दीर्घ चर्चा करत डीपी रस्त्यांच्या भूसंपादनाचे सव्वा कोटीचे दोन विषय मंजूर केले. तसेच देवळाली शिवारातील क्रिडांगणासाठी २५ कोटी देण्याचा, चिल्ड्रन पार्कसाठी ११ कोटी, विहीतगाव शिवारातील डीपी रस्त्यासाठी अडीच कोटी असे तब्बल चाळीस कोटीचे प्रस्ताव स्थगीत ठेवले. आडगाव व आगरटाकळी येथील दोन रस्त्यांच्या कामांसाठी टीडीआर देण्याचा प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोंढेंचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

कोर्टात सुनावणीसाठी आणलेल्या कैद्यांना पाण्याच्या बाटलीतून मद्य देण्याचा प्रयत्न करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी (दि. ३ जून) सुनावणी होणार आहे.

सातपूर परिसरातील स्वारबाबानगर येथील नगरसेवक लोंढेंच्या पीएल ग्रुपच्या कार्यालयात तडीपार आणि सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड व निखील गवळे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपींची मंगळवारी (दि. २४ मे) कोर्टात सुनावणी होती. तेथे कैदी पार्टी म्हणून पोलिस मुख्यालयातील कर्मचारी तैनात होते. त्यावेळी नगरसेवक लोंढे यांनी पोलिसांच्या वाहनात बसलेल्या संशयित आरोपींना पाण्याच्या बाटलीमधून मद्य देण्याचा प्रयत्न केला. कैदी पार्टीत कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी संदीप आहेर यांनी लोंढे यांना विरोध केला. लोंढे यांनी आहेर यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. यामुळे आहेर यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये लोंढे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाला तेव्हापासून लोंढे पसार आहे. अटक टाळण्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सोमवारी (दि. ३०) त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीत घरात घुसून महिलेला दमदाटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलेच्या घरात घुसून तिला दमदाटी केल्याचा प्रकार भद्रकाली परिसरातील जुने टॅक्सी स्टँड जवळ घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मांतगवाडा परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली. संशयित सचिन लहू निरभवणे, जनाबाई लहू निरभवणे आणि लहू निरभवणे (सर्व रा. जुने टॅक्सी स्टँड) अशी संशयितांची नावे आहेत. रविवारी (दि. २९ मे) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ते तिघे जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसले. तिला शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाण केली.

पेट्रोलपंपावर चोरी पेट्रोलपंपावर पैशांचा हिशेब करतेवेळी एका संशयिताने लबाडीने रोकड चोरून नेली. पंचवटीतील गुडअर्थ पेट्रोलपंपावर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये काशिनाथ गंगाराम कुकडे यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटल्यानुसार ते स्वप्नील सुभाष चिखले याच्यासह पेट्रोलपंपावरील पैशांचा हिशेब करीत होते. त्यावेळी संशयित काळू पगारे तेथे आला. त्याने कुकडे यांची नजर चुकवून लबाडीने त्यांच्याकडील तीन हजार ५०० रुपये रोकड चोरून मोटरसायकलवरून पोबारा केला.

नवविवाहितेचा मृत्यू सातपूर परिसरात राहणाऱ्या नवविवाहितेचा भाजल्याने मृत्यू झाला. सोनी संदीप प्रजापती (वय १८, रा. क्रांतीचौक, सातपूर) असे तिचे नाव आहे. विवाहिता २५ मे रोजी घरात ५४ टक्के भाजली होती. सया प्रकरणी सातपूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संशयितांना अटक दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन फरार संशयितांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ताब्यत घेतले आहे. नितेश ऊर्फ बाब्या अजय सुरजाशे (रा. क्रांतीनगर, पंचवटी), संभाजी विलास कवठे (रा. एकतानगर, म्हसरूळ) आणि रवि निवृत्ती पारधी (रा. हनुमानवाडी) अशी त्यांची नावे आहेत. हे तिनही सराईत गुन्हेगार आहेत. बुधवारी (दि. २५ मे) रोजी मध्यरात्री सरकारवाडा पोलिसांनी सापळा रचून त्र्यंबकरोडवरील वेद मंदिरासमोरील परिसरातून दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील विकी दत्तात्रय काळे (२०, रा. रामवाडी), वैभव सुनील त्रिकोणे (२०, रा. रविवार पेठ) याच्यासह एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>