Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विनातक्रार हटविले इंगळेनगरमधील अतिक्रमण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडच्या इंगळेनगर चौकातील मटन, मच्छी आणि अन्य व्यावसायिकांच्या टपऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवल्या. या कारवाईनंतर तातडीने रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. व्यावसायिकांनी सहकार्य केल्याने तणाव निर्माण झाला नाही.

महापालिकेचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय उपअभियंता नीलेश साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा कर्मचाऱ्यांनी ही मोहीम पार पाडली. टपरीधारकांनीही सहकार्य केले. यावेळी पोलिस बंदोबस्त नव्हता. गेल्या आठवड्यात चव्हाण मळ्यातील झोपड्या हटविण्यासाठी कडक बंदोबस्त होता.

जेलरोडच्या या चौकात पन्नास वर्षापासून मच्छीबाजार भरत आहे. कालांतराने येथे मटन व चिकन विक्रेत्यानींही टपऱ्या टाकल्या. त्यापाठोपाठ सलून, हार व अन्य व्यावसाय‌िकही आले. त्यामुळे पवारवाडीकडे जाणारा रस्ता अरुंद झाला होता. महापालिकेने पूर्वसूचना देऊन येथील सुमारे ४५ टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने हटविल्या. व्यावसायिकांनीही सामंजस्याची भूमिका घेतली.

रस्त्याचे काम सुरू

या मार्गावरील झोपडपट्टी तसेच टपरीधारकांचे अतिक्रमण तातडीने हटविण्यात आले आहे. टपरीधारकांबरोबरच येथे भाजी, हार, फळविक्रेतेही आहेत. त्यांचाही वाहतुकीला अडथळा होत होता. आता सर्व अतिक्रमण हटविल्याने चौक मोकळा झाला आहे. त्यामुळे पवारवाडीपर्यंत रस्ता रुंदीकरणही करण्यात आले. या रस्त्यावर खड्डे पडले होते.

पर्यायी जागा नाही

येथील व्यावसायिकांचे हातावर पोट आहे. टपऱ्या हटविल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना देण्यासाठी पर्यायी जागाच शिल्लक नाही. समाजकल्याणचा भूखंड जवळ असून अनेक वर्षांपासून तो पडून आहे. येथे मच्छीविक्रेत्यांना दहा दहा बाय आणि भाजी विक्रेत्यांना सात बाय सात जागा द्यावी, अशी मागणी शांताराम पाडळे, योगेश आहेर, रफीक शेख, इस्माईल खान, दिलावर शेख, संगीता मोरे, सुमन बेंडकुळे आदी व्यावसायिकांनी केली आहे. नव्या जागेतील स्वच्छता आम्हीच करू, फक्त लाईट व पाणी द्या, असे त्यांचे म्हणणे आहे.









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांचे मंत्र्यांकडून कौतुक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पंचवटी येथील वाघ खूनप्रकरणी शनिवारी मध्यरात्री स्विफ्ट कारमधून पळणाऱ्या दोघा संशयित आरोपींना शिताफीने पकडणाऱ्या येवला शहर पोलिस स्टेशनच्या वाहतूक शाखेच्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांची पालकमंत्र्यांनी थोपटली पाठ थोपटली आहे.

शनिवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब टिळे, योगेश हेंबाडे व राजेंद्र बिन्नर या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून पालकमंत्र्यांनी तिघांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला.

शिताफीने पकडले संशयित

पोलिस कॉन्स्टेबल टिळे, बिन्नर व हेंबाडे हे तिघेही नाशिक-औरंगाबाद तसेच मनमाड-नगर या दोन राज्य महामार्गावरील महत्त्वाच्या अशा येवला शहरातील विंचूर चौफूलीवर शनिवारी मध्यरात्रीची नाकाबंदी करत होते. नाशिकमधील पंचवटी भागात दोन युवकांना दगडाने आणि लाकडी दांड्याने मारून मर्डर केला गेला आहे. तर आरोपी स्विफ्ट गाडी नंबर (एम.एच.-१५, डी.एस. ९७९९) हिच्यात फरार झाले असल्याची माहिती या तिघा पोलिसांना मिळाली. तिघेही सतर्क होऊन पोलिस फ्रेंड व्हाट्सअॅप ग्रुपवर असल्याने त्यांनी चौफुलीवर वाहनांची तपासणी सुरू केली होती. रात्री नाकाबंदी दरम्यान अडीचच्या सुमारास या तिघा पोलिसांनी पळून जाणाऱ्या मयुर कानडे व श्रीनिवास कानडे या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनासाठी उभारणार चाळीस हजार कोटींचा निधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

राज्य सरकार राज्यातील सिंचनासाठी चाळीस हजार कोटी रुपये निधी उभारणार आहे. या निधीतून जलसंपदा विभागाकडून बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचनप्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

खासदार भामरे यावेळी म्हणाले की, बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा-डावा कालवा, तळवाडे भामेर पोहच कालवा, केळझर चारी क्रमांक आठ यासारखी सिंचनाची कामे गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित आहे. सदरचे प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने तांत्रिक मंजूरी मिळवून जलसंपदा विभागाकडून प्रकल्पांना निधी उपलब्ध करून येत्या तीन वर्षांत सरकार दरबारी पाठपुरावा करून बागलाण तालुका सुजलाम-सुफलाम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही ते खासदार भामरे म्हणालेत. करंजाड येथे बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांची परिषद आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गिरीश जगताप होते. व्यासप‌िठावर बागलाणचे आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, द्वारकाधीश साखर कारख्यान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र पाटील, नारायण कोर, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, सुनीता पाटील, डॉ. विलास बच्छाव, यशवंत अहिरे, राघो अहिरे, अशोक सूर्यवंशी, नानाजी दळवी, लालचंद सोनवणे, सुभाष नंदन, केदा जाधव, अॅड. पंडित भदाणे, सोमनाथ ब्राम्हणकार, अॅड. सरोज चंद्रात्रे होते. प्रास्ताविक सचिन सावंत यांनी केले. परिषदेस धर्मराज खैरनार, महेंद्र भामरे, संजय भामरे, केदा काकुळते, परशुराम अहिरे, केशव पाटील, अण्णा जगताप, यशंवत अहिरे, दीपक पगार, संजय वाघ, नानाजी दळवी, भिका सोनवणे, भरत कापडणीस, सरला अहिरे, शिवाजी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांची पातळी घटली

$
0
0

उत्तर महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाई; नद्यांचे खोरेही झाले कोरडे

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

नाशिक विभागातील भूजल पातळी वेगाने घटू लागली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात सप्टेंबर २०१५ पर्यंत नाशिक विभागातील ५४ तालुक्यांपैकी तब्बल ३२ तालुक्यांतील भूजल पातळीत तीन मिटरपेक्षा जास्त घट झाली असल्याची धक्कादायक माहिती भूजल व सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणातून नुकतीच पुढे आली आहे. या सर्वेक्षणात आजमितीस तालुक्यांची संख्या वाढली असल्याची शक्यताही भूजल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली गेली आहे.

यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नगर आणि जळगाव या जिल्ह्यातील जवळपास प्रमुख तालुक्यांना पाणीटंचाईची झळ पोहचत आहे. यात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्या खालोखाल खान्देशातील जळगाव जिल्ह्याचा नंबर लागतो. यावरून गोदावरी व गिरणा, तापी-पूर्णा या नद्यांचे खोरेही वेगाने कोरडे पडू लागले आहे.

राज्यातील दुष्काळ सर्व भागांसाठी एक मोठी चिंतेची बाब बनला आहे. नाशिक विभागातही या दुष्काळाची तीव्रता यंदा विस्तारली आहे. या दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई पशू, पक्ष्यांसह माणसांच्याही जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य माणसासह सरकारचीही झोपच उडाली आहे. त्यातच आणखी भर पडली आहे. कारण भूजलपातळीत वेगाने घट होत असल्याचे नुकतेच भूजल विकास व सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणावरून उघड झाले आहे.

नाशिक विभागातील नाशिक, निफाड, इगतपुरी, त्र्यंबक, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, देवळा, अकोले, पारनेर या तालुक्यांचा काही प्रमाणात अपवाद वगळता उर्वरीत सर्वच तालुक्यांतील भुजलपातळीत ० ते ३ मीटरपर्यंत घट झालेली आहे. चांदवड, संगमनेर, मालेगाव, शिंदखेडा व पारनेर या तालुक्यांतील मोठ्या भागातील भूजलपातळी २ ते ३ मीटरपर्यंत घटली आहे. भविष्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटाच आहे.

या ठिकाणी घटली पातळी

गेल्या पाच वर्षांच्या माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, नगर, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर, कोपरगाव तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव हे तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, बोदवड, भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव, चोपडा व अमळनेर या तालुक्यांना टंचाईचा फटका बसला आहे. यासोबतच धुळे जिल्ह्यातील चारही तालुके व नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा या तालुक्यांतील मोठ्या प्रांतातील भूजलपातळीत तीन मिटरपेक्षाही जास्त घट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीजेएस उचलणार १५० विद्यार्थ्यांचा खर्च

$
0
0

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगणात खेळण्याच्या वयात वडिलांच्या आत्महत्येमुळे दुर्दैवाचे दशावतार बघणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे १५० विद्यार्थ्यांच्या जीवनास नवसंजीवनी मिळणार आहे. भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) यासाठी पुढाकार घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पितृछत्राशिवाय उघड्यावर पडलेल्या मुलांच्या शिक्षण अन् निवासाची पूर्ण सुविधा बीजेएस पुण्यामध्ये करणार आहे. यासाठी अशा कुटुंबांमधून इयत्ता पाचवी ते बारावीच्या सुमारे १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या प्रेरक उपक्रमाचा लाभ होणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून राज्यात दुष्काळाचा आलेख वाढीला लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येतही वाढ झाली. कुटुंब प्रमुखानंतर पूर्णपणे निराधार होणारे शेतकरी कुटुंब अन् त्यातल मुलांची होणारी फरफट बघून भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेत मराठवाड्यातील ३०० विद्यार्थ्यांची पुण्यात शिक्षणाची व्यस्था केली आहे. यानंतर नाशिक जिल्ह्यातही या विषयाच्या अनुषंगाने सर्व्हे करण्यात आला. या माध्यमातून निफाड, नांदगाव आणि मालेगाव या तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी बीजेएसच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. यातील गरजू अशा १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड या उपक्रमांतर्गत करीत या विद्यार्थ्यांना १३ जून रोजी नाशिकमधून पुढील शिक्षणासाठी रवाना करण्यात येणार आहे.पित्यावर ओढावलेले संकट खेळकर वयात बघून थिजलेले अनेक निरागस डोळे स्तब्ध झाले आहेत. या विद्यार्थ्यांसमोर घरात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे मानसिक आघातही झाला आहे. या विद्यार्थ्यांना या धक्कयातून बाहेर काढण्यासाठी बीजेएसने मेंटल हेल्थ या विभागाचीही स्थापना केली आहे. यापूर्वी लातूर भूकंपातील १२०० अनाथ झालेली मुले अन् मेळघाटातील आदिवासी भागातील मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सुरू असल्याची माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष सतीश बोरा यांनी दिली. आदिवासी तालुक्‍यांमध्ये मात्र शेतकरी आत्महत्येची प्रकरणे आढळली नाहीत.

बीजेएसच्या माध्यमातून समाजातील आपत्तीग्रस्त घटकांच्या पुनर्वसनाचे काम दीर्घ कालावधीपासून केले जाते. याच अजेंड्यांतर्गत यंदा नाशिक जिल्ह्यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सुमारे १५० विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी संघटना घेते आहे. यासाठी १३ जून रोजी या विद्यार्थ्यांना नाशिकहून पुण्यात पुढील शिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.

- दीपक चोपडा, कार्यकारिणी सदस्य, बीजेएस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर सहा मिनिटाला एकाचा मृत्यू!

$
0
0

तंबाखूमुक्तीचे आव्हान अद्यापही कायम

ashwini.kawale @timesgroup.com

नाशिक : तंबाखूमुक्तीसाठी सरकारी यंत्रणेमार्फत प्रयत्न केले जात असले तरी अद्याप हे आव्हान कमी झालेले नाही. राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांविषयी कठोर कायदे करण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपण होत नसल्याचे दिसून येते. देशभरात दर सहा मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू तोंडाच्या व घशाच्या कॅन्सरने होत आहे. त्यामुळे या समस्येपुढील आव्हान कायम असल्याचे दिसून येत आहे.

कॅन्सरतज्ज्ञ शैलेश बोंदार्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात कॅन्सर आढळून येणाऱ्या ४५ ते ५० टक्के पुरूष रुग्णांमधील कॅन्सर हा घशाचा व तोंडाचा कॅन्सर असतो. हेच प्रमाण महिलांमध्ये २५ ते ३० टक्के इतके आहे. याचा वयोगट बघता १५ ते २५ वयोगटात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढीस लागत असल्याचे समोर येत आहे. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हेनुसार दरवर्षी भारतात पाच हजार विद्यार्थी तंबाखू सेवनाच्या आहारी जातात. हे प्रमाण असेच राहिल्यास व्यसनाधिन जनतेचे मोठे आव्हान देशासमोर उभे राहण्यास वेळ लागणार नाही.

सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व शाळांच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थ विक्रिस बंदी आहे. मात्र, शाळेच्या आवारात खुलेआम अशा पदार्थांची विक्री होताना दिसून येत असल्याने हे आव्हान आणखी जड होत चालल्याचे दिसून येत आहे. या वयातील विद्यार्थ्यांना अशा व्यसनांसून दूर राखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज कॅन्सरतज्ज्ञांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

ग्लोबल युथ तंबाखू सर्व्हेनुसार भारतात १३ ते १५ वर्षे वयोगटातील १४ टक्क्यांपेक्षा जास्त मुले तंबाखूचे सेवन करतात. लहान वयात ही सवय लागल्याने ती सोडवणे कठीण जाते. मात्र यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात, याची जाणीव त्यांच्यामध्ये नसते.

ही जाणीव करून देण्याच्या उद्देशाने शासनामार्फत प्रयत्न केले जात असले तरी त्याला गती मिळण्याची गरज असल्याचे दिसून येते. त्याबरोबरच शहरपातळीवर किती व्यक्ती घशाच्या व तोंडाच्या कॅन्सरनी मृत्युमुखी होत आहे, याचे रिपोर्टिंग करण्याची गरजही वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

तंबाखू विरोधी दिन एक दिवस पाळण्यापेक्षा तो रोज पाळला जाणे आवश्यक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात तंबाखू विरोधात कायदे कठोर आहेत. मात्र, तंबाखू सेवनाचे प्रमाण समूळ नष्ट करण्यासाठी त्यांची योग्य अंमलबजावणीे गरजेची आहे.

- डॉ. शैलेश बोंदार्डे, कॅन्सरतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासधारक प्रवाशांनी ‘खेळ’ मांडला!

$
0
0

राज्यराणी एक्स्प्रेसच्या बोगीत पासधारक करतात इतर प्रवाशांना मज्जाव

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वागणुकीचा इतर प्रवाशांना फटका बसत आहे. जणू काही रेल्वेने बोगी आपल्याला आंदण दिली आहे आणि आपलीच मालमत्ता आहे, असे वागतात. मासिक पासधारकांच्या या भाईगिरीतून लहान बाळालाही फटका बसल्याची निर्दयी घटना नुकतीच राज्यराणी एक्स्प्रेसच्या मासिक पासधारकांच्या बोगीत घडली. ज्येष्ठ नागरिक, स्त्रियाच काय तर लहान बाळालादेखील मासिक पासधारकांच्या बोगीतून प्रवास नाकारला गेला तो केवळ जुगार खेळण्यासाठी पुरेशी जागा मिळावी म्हणून. असे असभ्य प्रकार या गाडीच्या मासिक पासधारकांच्या बोगीत कायमच घडत असल्याचेही प्रवाशांनी सांगितले.

मनमाडसह नाशिक ते मुंबई असा नोकरीनिमित्ताने दररोज प्रवास करणाऱ्या मासिक पासधारकांची संख्या मोठी आहे. राज्यराणी व पंचवटी या दोन एक्स्प्रेसला प्रत्येकी एक एमएसटी बोगी असते. या बोगीतून मासिक पासधारक प्रवास करीत असतात. हे पासधारक इतर प्रवाशांना या बोगीतून प्रवास करणे तर दूरच पण चढूदेखील देत नाहीत. कोणी प्रवाशी या बोगीत बसलास तर त्याला अक्षरशः अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, कधी कधी तर धक्काबुक्की करीत बाहेर ढकलून देण्यापर्यंत त्याची मजल जाते.

राज्यराणी एक्स्प्रेसच्या एमएसटी बोगीत नुकताच असा एक मानवतेला लाजवणारा प्रकार घडल्याचे एका सुजाण प्रवाशाच्या संवेदनशीलतेमुळे उजेडात आला. त्याने यू ट्यूबवर या निर्दयी घटनेचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर या गाडीच्या एमएसटी बोगीतील पासधारकांनी जुगार खेळायला जागा असावी, यासाठी इतर काही प्रवाशांना धक्काबुक्की, दमबाजी व शिवीगाळ करून त्यांना उठवून दिले. या त्यांची मजल इथेच थांबली नाही, तर त्यांनी चक्क एक लहान बाळ असलेल्या मातेलाही उठवून दिले. गाडी इगतपुरीच्या स्थानकाच्या पुढे गेल्यावर पासधारकांनी चक्क जुगार खेळायला सुरुवात केली. एकीकडे जुगाराचा जमलेली अड्डा, तर दुसरीकडे जागेअभावी आपल्या टाहो फोडणाऱ्या तान्हुल्याला शांत करतांना नाकीनऊ आलेली माता असा ह्र्दय पिळवटून टाकणारा अन् तितकाच चिड आणणारा प्रसंग प्रवाशांना बघायला मिळाला. जणू काही एमएसटी बोगी रेल्वेने आपल्याला आंदणच दिलेली आहे नव्हे आपलीच मालमत्ता आहे, अशा अविर्भावात अत्यंत उद्धट व निलाजरे वर्तन या मासिक पासधारकांकडून नेहमीच होत असते. त्यांच्याकडून

कुणाचीही भिड मर्यादा राखली जात नाही. केवळ जुगार खेळण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक रहावी, यासाठीच या पासधारकांकडून ही भाईगिरी केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

एमएसटी बोगी सिस्टीममध्ये नसते. त्यामुळे तिथे केवळ आरक्षण होत नाही. मात्र, इतर प्रवाशांनी या बोगीतून प्रवास केल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. या बोगीतून प्रवास करण्यास पासधारकांकडून मनाई करणे बेकायदेशीर असून, तशी तक्रार आल्यास मनाई करणाऱ्यावर सक्त कारवाई होऊ शकते. - के. टी. महापात्रा, निरीक्षक, मध्य रेल्वे, नाशिकरोड

एमएसटी बोगीतून इतर प्रवाशांना प्रवास करता येत नाही. कारण नाशिकहून सुमारे चार हजारपेक्षा जास्त पासधारक प्रवास करतात. त्यामुळे आहे तीच जाग कमी पडते. परंतु, वृद्ध नागरिक, स्त्रिया, लहान मुले यांचा आदर राखलाच पाहिजे. त्यांना दमदाटी करून प्रवासास मनाई करणाऱ्यांची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. - राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन व्यवहार फसवणुकीला बसणार चाप

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

सरकारी जमिनींच्या परस्परविक्रीद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. सरकारी जमिनींचा इत्थंभूत तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांची फसवणूक टळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नाशिकमध्ये राबविण्यात आलेला हा पायलट प्रोजेक्ट राज्यभरासाठी मॉडेल प्रोजेक्ट म्हणून स्वीकारला गेला आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात तो यशस्वीपणे राबविला जात आहे.

राज्यभरात आदिवासी क्षेत्रातील जमिनी, वनजमिनी, गायरान जमिनी, शर्थी व इनामी जमिनी आदी प्रकारांतील हजारो एकर जमिनी सरकारी मालकीच्या आहेत. खासगी व्यक्ती सरकारी जमिनीची विक्री करू शकत नाहीत. मात्र, तरीही अशा जमिनी आपल्याच मालकीच्या असल्याचे भासवत त्यांच्या परस्परविक्रीचे प्रकार राज्यात घडतात. जमिनींना सोन्याचा मोल आलेला नाशिक जिल्हादेखील त्यास अपवाद नाही. बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये अशा जमिनी मिळत असल्याने खरेदीदार फसतात. मात्र, जमीन नावावर होण्यात अडचणी आल्या, की फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येते. हे प्रकार रोखता यावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारची मालकी असलेल्या व प्रशासनाच्या परवानगीशिवाय व्यवहारच होऊ न शकणाऱ्या जमिनींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. तेथे जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १,९५९ गावांमधील सरकारी जमिनींचा तपशील नागरिकांना पाहता येणार आहे. त्यामध्ये सुरगाणा तालुक्यातील सर्वाधिक १९१, बागलाणमधील १६८, दिंडोरीतील १५८, कळवण येथील १५२, तर देवळा तालुक्यातील सर्वांत कमी ४६ गावांमधील सरकारी जमिनींची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

भूमापन क्रमांक, भोगवटादाराचे नाव, क्षेत्र, आकारणी, गावातील जमीन कोणत्या शर्तीवर प्रदान केली त्याचा तपशील, जमिनी प्रदानाचे आदेश व क्रमांक, जमिनी ज्या कारणासाठी विहित केली त्या उपयोगाचे प्रयोजन, विहित केलेल्या प्राधिकरणाचे (नगरपालिका, ग्रामपंचायत, संस्था, खासगी व्यक्ती) नाव, जमीन हस्तांतरणास परवानगी देणारा सक्षम अधिकारी, सरकारला भरावा लागणारा नजराणा, सक्षम प्राधिकाऱ्याचे विक्री प्रकाळ आदेश, नजराणा दंड भरण्याची रक्कम, तपासणी अधिकारी व तपासणी दिनांक, शेरा अशा स्वरूपात ही माहिती सविस्तर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यावर संबंधित गावाचा तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ही माहिती अधिकृत करण्यात आली आहे.

एनआयसीवर कौतुकाची थाप

जिल्हा प्रशासनाच्या एनआयसी विभागाने नाशिकमध्ये हा पायलट प्रोजेक्ट राबविला आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी त्याची दखल घेऊन अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. एवढ्यावरच न थांबता विभागातील अन्य जिल्हा प्रशासनांनाही सरकारी जमिनींचा तपशील त्यांच्या वेबसाइटवर टाकण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमधील सरकारी जमिनींची माहितीदेखील त्यांच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने राज्यभर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

सरकारी जमिनींची खरेदी करून लोक फसतात. जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर सरकारी मालकीच्या जमिनींची माहिती उपलब्ध करून दिल्याने जगाच्या कोपऱ्यात कोणालाही हा तपशील समजू शकेल. त्यामुळे कोणती जमीन खरेदी करावी आणि कोणती करू नये, याचा त्यांना नेमका अंदाज येईल. गावांमधील जमिनींबाबतचे रजिस्टर्ड मेन्टेन ठेवण्याची सूचना तलाठ्यापासून संबंधित यंत्रणेला दिली आहे.

- राजेश साळवे, डीआयओ, एनआयसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांत मिळणार दाखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेतू कार्यालयातून दाखले देण्यास विलंब होत असल्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थी आणि पालकांचा मनस्ताप कमी व्हावा यासाठी त्यांना १५ दिवसांच्या आत दाखले द्या, असे आदेश उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिले आहेत. दाखले देण्यास विलंब झाला तर नागरिकांना सेवा हमी कायद्यांतर्गत दाद मागता येणार आहे.

बारावीचे निकाल जाहीर झाले असून, लवकरच दहावीचे निकालही जाहीर होतील. महाविद्यालयीन प्रवेशासाठी विविध प्रकारचे दाखले आवश्यक असल्याने विद्यार्थी आणि पालकांची सेतू कार्यालयात झुंबड उडत आहे. मात्र त्यांना किमान महिनाभर विलंबाने दाखले मिळत असल्याने तीव्र असंतोष व्यक्त होऊ लागला आहे. महाराष्ट्र टाइम्सने मंगळवारी याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेऊन मुंडावरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. नागरिकांना वेळेत दाखले मिळत नसल्याबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच सर्व आवश्यक दाखले त्यांना मुदतीत मिळावेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीला सेतू चालक तसेच सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना उत्पन्न, नॉनक्रिमिलेअर, जात, राष्ट्रीयत्व आणि अधिवास अशा विविध दाखल्यांची गरज भासते. प्रवेशासाठी हे दाखले जोडणे बंधनकारक आहे. मे महीन्याच्या पहील्या आठवडयात अर्ज केलेल्या नागरीकांना मे अखेरपर्यंत दाखले मिळू शकलेले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. रोज शेकडो अर्ज दाखल होत आहेत. मात्र वितरीत होणाऱ्या दाखल्यांची संख्या नगण्य आहे. सर्व त्रुटी दूर करून १५ दिवसात दाखले देण्यात यावे, असे निर्देश मुंडावरे यांनी दिले आहेत.

'राष्ट्रवादी विद्यार्थी'चे निवेदन नाशिक : नाशिक शहरातील मध्यवर्ती विभागीय सेतू कार्यालयात एजंट मंडळींची चलती दिसून येत आहे. विद्यार्थी आणि पालकांना वेठीस ठेवत एजंटला पाठिंबा देणाऱ्या सेतू अधिकाऱ्यांच्या मनमानीला नाशिकर हैराण झाले आहेत. सदर बातमीवर मटाने प्रकाश टाकला होता. सदर वृत्ताचा मंगळवारी इम्पॅक्ट दिसून आला. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने सदर वृत्त लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सेतुच्या आवारात वाढती एजंट गिरीला आळा घालण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचा माजी शहराध्यक्ष चिन्मय गाढे, महेश सोनवणे आणि इतर पादधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ‘पुण्यतिथी’ आंदोलन

$
0
0

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अधिक आक्रमक होण्याची रणनीती आखली आहे. शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी, दि. १ जून रोजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निषेधात्मक म्हणून दुसरी प्रतिकात्मक पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. तसेच येत्या ६ जून रोजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी आत्महत्यांसह महागाईच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रदेश काँग्रेसने शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यावर विश्वास दाखवत शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. आहेरांनी देखील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आक्रमक धोरण आखले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने सुरू केले आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुका या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकींची तयारी सुरू केली आहे. त्यात आता काँग्रेसनेही उडी घेतली. शरद आहेर हे काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष आहेत. परंतु, प्रदेश काँग्रेसने निवडणुकांपर्यंत त्यांच्यावरच विश्वास टाकला आहे. त्याच्या सल्ल्यानेच शहर कार्यकारीणीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या आहेर यांनी आता भाजपच्या विरोधात आक्रमक धोरण स्वीकारत पक्षात जुन्या आणि नव्या नेत्यांना एकत्र करण्याची मोहीम सुरू केली आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंदोलन, मोर्चे काढण्यास भाजपने सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने नुकतेच दोन वर्ष पूर्ण केले आहेत. परंतु या दोन वर्षात भाजप सरकारची कामगिरी निराशाजनक असल्याचा आरोप करीत काँग्रेसने सरकारच्या या कामगिरी विरोधात बुधवारी आंदोलन करण्यात येणार आहे. रविवार कारंजा येथे केंद्र सरकारची दुसरी प्रतिकात्मक पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला जाणार आहे. तसेच योजनांच्या अपयशाबद्दल शंखनाद केला जाणार आहे. तसेच वाढती महागाई व शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये मे महिन्यात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जानेवारीपासून आतापर्यंत ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आत्महत्या वाढत असतांना त्या रोखण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न होतांना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी, ६ जून रोजी आंदोलन केले करणार आहे.

बडे नेते नाशिकच्या मैदानात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आपल्या बड्या नेत्यांना नाशिकच्या मैदानात उतरवणार आहे. नाशिकचे प्रभारी भाई जगताप यांच्यासह, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह बडे नेते नाशिकमध्ये काँग्रेसचा आवाज बुलंद करणार आहे. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी नाशिकचा नुकताच दौरा केला. त्यांनी पक्षाची ताकद वाढवण्याचा कानमंत्र या नेत्यांना दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरांच्या मांसाचा पिकअप पकडला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहर पोलिसांनी मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास नगर-मनमाड राज्य महामार्गावर येवला शहरातील फत्तेबुरुज नाक्याजवळ जनावरांचे मांस व हाडे याची बेकायदा वाहतूक करणारा महिंद्रा मॅक्स पिकअप ताब्यात घेतला. सदरचा पिकअप हा नगर येथून मालेगावकडे चालला होता. पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करीत पिकअप चालकास अटक केली आहे.

येवला शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलिस हवालदार अभिमन्यू आहेर, माधव सानप, पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब टिळे व कैलास महाजन हे रात्रीची पेट्रोलिंग करीत असताना मंगळवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास त्यांना मनमाड-नगर राज्य महामार्गावर येवला शहरातील फत्तेबुरूज नाक्याजवळ दुर्गंधीयुक्त वास येणारा एक महिंद्रा मॅक्स पिकअप (एम.एच.-४०,एन १९३७) जाताना दिसून आला. त्यांना त्यात जनावरांचे मांस व हाडे आढळून आली. विनापरवाना मांस वाहतूक तसेच प्राणी संरक्षण कायदा आदी कलमान्वये वाहनचालक मोसिन महेमूद खान (वय ३३), मांस माल मालक जाकीर शेख (नगर) तसेच पिकअप मालक या तिघांविरोधात येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या वाहनचालकास येवला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

गायी ताब्यात नाशिकरोड : कत्तलीसाठी नेत असलेल्या सात गायी उपनगर पोलिसांनी टाकळीरोडवर केलेल्या कारवाईत ताब्यात घेतल्या. महिनाभरातील ही दुसरी कारवाई आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सहाय्यक निरीक्षक अविनाश येवला आणि सहकारी पोलिस गस्त घालत होते. त्यांनी महिंद्र पिकअप (एमएच ४८ टी ८३१६) ही गाडी संशयावरून थांबवली. त्यात सात गायी बेकायदा आढळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवडीसाठी फोटोची सक्ती

$
0
0

शहरात २१ हजार वृक्षांची लागवड करण्यासाठी पावसाळ्याचा मुहूर्त निवडणाऱ्या ठेकेदारांच्या बनवेगिरीला महापालिका चाप लावणार आहे. वृक्षांची लागवड करतांना ठेकेदारांनी घोळ करू नये, म्हणून उद्यान विभागाने वृक्षांची लागवड करतांना फोटो काढण्याची अट टाकली आहे. सोबतच वर्षभर संबंधित वृक्षाची देखभाल केल्यानंतर वाढलेल्या वृक्षाचे फोटोग्राफ सादर केल्यानंतरच बिले अदा केली जाणार आहेत. विशेष म्हणजे ठेकेदारांनी बनवेगिरी करू नये म्हणून प्रत्येक झाडाला नंबरिंग देखील दिले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक वृक्षाचे जतन करण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपवण्यात आली आहे.

महापालिकेने नुकतेच शहरातील मुख्य रस्त्यांवर २१ हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांच्या सौंदर्यीकरणासह पर्यावरण संतुलनासाठी लहान रोपे लावण्याऐवजी थेट आकर्षक ठरतील असे वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी साडेपाच कोटीची रक्कम खर्च केली जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रियाही पार पडली. सात ठेकेदारांना काम देण्यात आले. परंतु, उन्हाळा असल्याने व पाणीसमस्या बिकट असल्याचे कारण पुढे करत ठेकेदारांनी झाडे लावण्यासाठी पावसाळ्याची मुदत मागितली. वेळेत झाडे लावली नाहीत म्हणून महापालिकेने त्यांना नोटीसही बजावली. अखेरीस महापालिकेने नमते घेत त्यांना पावसाळ्यात वृक्षलागवड करण्यास परवानगी दिली आहे.

पावसाळ्यात वृक्ष लागवड करतांना ठेकेदारांकडून बनवेगिरीची शक्यता आहे. वृक्षांची संख्या हजारात असल्याने उद्यान विभागाने प्रत्येक वृक्षाला नंबर देण्याची अट घातली आहे. तसेच वृक्षाची लागवड करतांना, त्याची फोटोग्राफी करण्याची सक्ती केली आहे. तसेच एक वर्षभर ठेकेदारालाच या वृक्षांची देखभाल करावी लागणार आहे. वर्षभरानंतरच ठेकेदारांना बिले अदा केली जाणार आहे. बिले सादर करतांना ठेकेदाराला लावलेल्या वृक्षांची पुन्हा फोटोग्राफी करावी लागेल. वृक्ष लागवडीचा पहिला फोटा व एक वर्षानंतरच्या फोटो याची पडताळणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराला बिल अदा केली जाणार आहेत. या अटी शर्तींमुळे ठेकेदारांकडून बनवेगिरी करण्याची शक्यता कमी आहे.

फोटोग्राफीसाठी असणार निकष प्रत्येक वृक्षाला नंबर देण्यात येवून त्याच वृक्षाचा फोटो जमा करावा लागणार. वृक्षाचा आजूबाजूचा परिसर फोटोत येणार असून जवळच्या वृक्षाचाही नंबर दिसेल अशा पद्धतीने फोटोग्राफी केली जाणार आहे. त्यामुळे एकाच वृक्षाचे अनेकदा फोटो काढून महापालिकेची फसवणूक ठेकेदाराला करता येणार नाही. ठेकेदारांने फोटो जमा केल्यानंतर महापालिकेची यंत्रणा त्याची पडताळणी करणार आहे. त्यामुळे बोगस वृक्षाच्या नावाने बिले काढणे ठेकेदाराला शक्य होणार नाही. यामुळे १०० टक्के वृक्षांची लागवड होण्यास मदत होणार आहे.

वृक्षाची लागवड करतांना प्रत्येक वृक्षाचा फोटा काढला जाणार आहे. तसेच बिले काढतांना अपडेटेड फोटोही जमा करावा लागणार आहे. दोन्ही फोटोंची पडताळणी केल्यानंतरच ठेकेदाराला बिले अदा केली जातील. - अनिल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती संचालकपदी मिनाक्षी देवरेंची शिफारस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी देवळा पंचायत समिती सदस्यांमधून मीनाक्षी निवृत्ती देवरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. याबाबत मंगळवारी (दि. ३१ मे) रोजी झालेल्या पंचायत समिती सदस्यांच्या विशेष बैठकीत सर्वानुमते हा ठराव करण्यात आला.

उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिली लोकनियुक्त पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये पंचायत समिती सदस्यांमधून बाजार समितीवर संचालकपदासाठी शिफारस करण्याबाबतचे पत्र पंचायत समितीला देण्यात आले होते. त्यानुसार पंचायत समिती सदस्यांची बैठक मंगळवारी (दि. ३१ मे) रोजी सभापती अशोक बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात उमराणा बाजार समितीसाठी पंचायत समिती सदस्यांमधून संचालकपदासाठी मीनाक्षी देवरे यांच्या नावाची सूचना माजी सभापती केदा शिरसाठ यांनी मांडली. तर पंचायत समिती सदस्या लीना आहेर यांनी अनुमोदन देऊन सर्वानुमते ठराव करण्यात आला. बैठकीस उपसभापती सिंधूबाई पवार, सदस्य लीना आहेर, गटविकास अधिकारी सी. एल. पवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीकविमा योजना ऐच्छिक करण्याची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील एकूण साठ सहकारी संस्था असून यामधील ४५ संस्था या अनिष्ट तफावतीमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सक्तीचे पंधरा टक्के शेअर्स कपातीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सक्तीची पीकविमा योजना ही ज्या सभासदाला आवश्यकता आहे त्यालाच लागू करून ऐच्छिक करण्यात यावी, अशी मागणी घोटी बाजार समितीचे संचालक तथा कावनई विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी शिरसाठ यांनी केली.

दरम्यान २०१६ च्या खरीप हंगामापासून भाताला दोन टक्के तर नगदी पिकांना पाच टक्के कर्जातून कपात करण्याचे ठरवले आहे. यामुळे अनिष्ट तफावतीतील संस्थांना बारा ते पंधरा टक्के कर्ज कपात करून सभासदांना कर्ज मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी कर्ज घेण्यास दुसऱ्या बँकांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे सहकार विभागाने शेतकऱ्यांवर अन्याय न करता शेअर कपात नेहमीप्रमाणे केवळ पाच टक्के करावी, अशी मागणी कावनईचे शिवाजी शिरसाठ यांच्यासह पंढरीनाथ काळे, अर्जुन खातळे, खंडेराव भोर, रामकृष्ण बर्हे, देवराम म्हसने, बाळासाहेब सदगीर, हरिश्चंद्र नाठे, कैलास गोवर्धने, रघुनाथ खातळे, सुखदेव आव्हाड, रुंजा भोसले आदी शेतकऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनपूर्व नियोजनाचा त्र्यंबकला खोळंबा

$
0
0

वीजवितरणकडून नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

मान्सूनपूर्व नियोजन करताना महाराष्ट्र वीजवितरण महामंडळाचे सुरक्षेबाबत दुर्लक्ष झाल्याने त्र्यंबक शहरासह ग्रामीण भागात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवडाभरात सुसाट वारा आणि पावसाला सामोरे जाताना गंजलेले खांब आणि झोळ पडलेल्या तारा यांनी अपघातांची शक्यता असताना ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. खांब पडायला आल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. मात्र त्याकडे वीजवितरणकडून नेहमीच दुर्लक्ष केले गेल्याचे दिसते. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.

गत काही वर्षात अपघात होऊन सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. अर्थात तरीही म्हणावे तितक्या गांभिर्याने प‌ाहिले जात नाही. याचे एक बोलके उदाहरण म्हणजे नाशिक त्र्यंबक रस्त्यावर शहरापासून जवळच सिंहस्थात स्थापन केलेल्या रक्षकनगर या पोलिस निवासस्थानाच्या बाजूस मुख्य वीजवाहक तारा असलेला खांब तळापासून सडला असतानाही तो बदललेला नाही. याबाबत येथील रहिवाशांनी वारंवार वीजवितरण महामंडळास निदर्शनास आणले असतानादेखील याकडे कानाडोळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नव्या पिढीशी समरस व्हा

$
0
0

उपमहापौर गुरुमित बग्गा यांचे ज्येष्ठांना आवाहन

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

आयुष्याच्या संध्याकाळी झाले गेले सारे विसरून आत्मचिंतनानंतर वर्तमानात नव्या पिढीचे नवे विचार अंगिकारावेत. निवृत्तीनंतर थकून निवांत होण्यापेक्षा थकवा झटकून नव्या आत्मविश्वासाने प्रवाहित व्हा, असे प्रतिपादन नाशिक महापालिकेचे उपमहापौर गुरुमित सिंग बग्गा यांनी केले.

पिंपळगाव बसवंत येथे ज्येष्ठ नागरिकांची सभा बग्गा यांच्या उपस्थितीत झाली. जुने ज्ञान व संगणकीय ज्ञान यांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. त्या अनुभवाला योग्य तो सन्मान मिळवून दिला तर ते सर्वच समाजासाठी हितावह होईल. आजची पिढी विविध उपकरणांनी ज्ञानसंपन्न झाली आहे. यामुळे दोन्ही पिढ्यांमध्ये वैचारिक समन्वय होत नाही. यामुळे दोन्ही पिढींमधील अंतर वाढले आहे, असेही ते म्हणाले. यामुळे आपण नव्या ज्ञानाशी समरस व्हा, असे आवाहनही बग्गा यांनी केले.

योग्य वेळी जेवण, विश्रांती व वाचनादी सांभाळून व्यायामालाही महत्त्व दिले तर आयुष्याची संध्याकाळ निश्चितच सोनेरी व बहारदार होईल, असेही बग्गा यांनी सांगितले. भास्करराव बनकर यांनी बग्गा यांचा परिचय करून दिला.

विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काझीबाबा होते. व्ही. के. आले यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय चंद्रकांत टकले यांनी करून दिला. यावेळी प्रियदर्शन टांकसाळे, लेखिका सुनीता वाघ, कांतीलाल सोनी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीजे’चा धमाका पडला महागात

$
0
0

वाग्दत्त वधूच्या भावावर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईला गती दिली असून, परिसरात मोठ्याने डीजे, साऊंड सिस्टम अथवा वाद्य वाजवून किंवा अन्य प्रकारे ध्वनीप्रदूषण करणे आता महागात पडू लागले आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली असून, उपनगर पोलिस स्टेशनमध्ये दोघांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात मोठ्याने डीजे, साऊंड सिस्टम अथवा वाद्य वाजवून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण केले जात असेल, तर नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला किंवा १०० क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी गेल्या आठवड्यातच केले होते. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, पोलिसांनाही कायद्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. रात्री दहापर्यंतच अशी वाद्य वाजविण्यास परवानगी असून, त्यानंतरही वाद्य वाजविले जात असेल, तर तोदेखील गुन्हा ठरणार आहे. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जगन्नाथन यांनी यापूर्वीच दिला आहे.

बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमात मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आंबेडकरवाडी परिसरात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. नीलेश अनिल मोरे (वय ४९, रा. प्रेस कॉलनी, गांधीनगर), धीरज मोरे (रा. आंबेडकरवाडी, नाशिक-पुणा रोड) अशी संशयितांची नावे आहेत. रविवारी रात्री धीरज याच्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी संशयित नीलेश मोरे हा परिसरात मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेने डीजे वाजविताना मिळून आला. पोलिस शिपाई वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांवर ध्वनी प्रदूषण कायदा कलम पाच आणि सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक डहाके तपास करीत आहेत.

तक्रारीसाठी संकेतस्थळाचा पर्याय ध्वनी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने गंभीर पावले उचलली आहेत. गृह विभागच याबाबत कायदेशीर आणि कठोर कारवाई करू शकत असल्याने त्यांनाच अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असेल, तर नागरिकांनी न संकोचता तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. त्यासाठी नाशिक पोलिसांनी नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकाबरोबरच (०२५३ - २३०५२३३) nashikpolice.com या संकेतस्थळाचा पर्यायही तक्रार देण्यासाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅनडा कॉर्नरवरील ब्यूटिपार्लरवर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॅनडा कॉर्नर परिसरातील ऋषिराज अव्हेन्यू या इमारतीमधील सायली ब्यूटिपार्लर येथे छापा टाकून पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये चार महिला, दोन पुरुषांचा समावेश आहे. येथे पार्लरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीमधील तळमजल्यावर असणाऱ्या सायली ब्यूटी पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तेथे मंगळवारी सायंकाळी छापा टाकण्यात आला. तेथून चार महिला, दोन पुरुषांना ताब्यात घेतले. सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे, बाजीराव महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरेंनी महापालिकेचा भूंखडही लाटला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगरसेवक विनायक खैरे यांनी पालिकेच्या डीपी रस्त्यावरच केवळ तबेला उभारला नसून पालिकेच्या मालकीचा अर्धा एकर भूखंडही लाटल्याचे समोर आले आहे. संबंधित भूखंडावरील अतिक्रमण काढून घेण्याची सूचना अतिक्रमण विभागाने केली आहे. खैरेंनीही संबंधित अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान खैरेंनी डीपी रस्त्यासह थेट पालिकेच्या भूखंडावरच अतिक्रमण केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आयुक्तांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यांना नोटीस दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

म्हसरूळ मधील १८ मीटर डीपी रस्त्यावरील नगरसेवक खैरे यांचा तबेला सोमवारी अतिक्रमण विभागाने पाडला. संबंधित अतिक्रमणाची सारवासारव खैरेंकडून सुरू होती. तसेच अतिक्रमण स्वतःहून काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आता या अतिक्रमणासह पालिकेच्या मालकीच्या अर्धा एकर भूंखडावरही खैरे यांनी तबेला उभारल्याचे समोर आले आहे. पालिकेने वैभव पिंगळे या व्यक्तीकडून संबंधित भूखंड दहा वर्षापूर्वीच भूसंपाद‌ति केला आहे. त्या भूखंडावर खैरेंनी तबेला उभारला आहे. पालकमंत्र्यांकडेच तक्रारी करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तर नगररचना विभागानेही या संदर्भातील माहिती दडविल्याचे समोर आले आहे. अतिक्रमण विभागाने हा भूंखडही ताब्यात घेण्याची तयारी सूरू केली आहे. त्यांसदर्भातील नोटीस खैरेंना बजावण्यात आली आहे. खैरेनींही कारवाईच्या भीतीने पालिकेच्या भूंखडावरील अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शवली आहे.पालिकेचा भूखड लाटल्याची गंभीर दखल आयुक्त डॉ. गेडाम यांनी घेतली आहे. डीपी रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत दुर्लक्ष केले होते. परंतु, भूखंडाबाबत कारवाईची तयारी सुरू केली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहातील कैद्याकडे पुन्हा मोबाइल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे नाशिकरोड कारागृहाची अब्रू पुन्हा वेशीवर टांगली जाऊ लागली आहे. कारागृहातील कैद्यांकडे मोबाइलसारख्या वस्तू आढळत असून, नाशिकरोड पोलिसांनी सोमवारी (दि. ३० मे) पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हेगारी कृत्यामधील संशयित म्हणून गुन्हा दाखल झाल्यास संबंधितांची रवानगी नाशिकरोड कारागृहामध्ये केली जाते. कारागृहात दररोज नवनवीन कैद्यांची भर पडते तसे जन्मठेपेसारख्या शिक्षा भोगणारे कैदी देखील आहेत. कारागृहातील गैरव्यवहार यापूर्वीही अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. त्यामध्ये कैद्यांच्या आपापसात होणाऱ्या हाणामाऱ्या, कैदी पळून जाणे, कैद्यांकडे गांजा सारखे अंमली पदार्थ आढळणे यांसारखे प्रकार घडले आहेत. कैद्याचा खून, आत्महत्येचा प्रयत्न, पॅरोलच्या नावाखाली सुटीवर गेलेले कैदी न परतणे यांसारख्या प्रकारांमुळे नाशिकरोड कारागृह नेहमीच चर्चेत राहिले आहे. अशा आश्चर्यकारक घटनांनी येथील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. गतवर्षी येथील कैद्यांकडे मोबाइल सापडल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले होते. सोमवारी (दि. ३०) पुन्हा असाच प्रकार उघडकीस आला. मोहमद अलिक मोहमद यासिन उर्फ काल्या या कैद्याकडे मोबाइल हॅन्डसेट आढळून आला. तुरूंग अधिकारी पोपट जयराम मानकर (वय ४८) यांनी या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिलीहे. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा यंत्रणा काय काम करते, असा सवाल उपस्थित होत आहे.

कैद्यांपर्यंत मोबाइल पोहोचविणारी यंत्रणा कार्यरत असून, ती कारागृह प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कैद्यांनी कारागृहातून मोबाइलद्वारे बाहेरील व्यक्तींना धमक्या दिल्याचे प्रकार देखील यापूर्वी उघडकीस आले आहेत. केवळ मोबाइलच नव्हे तर वेगवेगळी सिमकार्ड, हेडफोन, निरोधची पाकिटेदेखील कारागृहात यापूर्वी आढळून आली आहेत. कैद्यांना वस्तू पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन होमगार्डसवर यापूर्वीच कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानंतरही पुन्हा कैद्याकडे मोबाइल आढळून आल्याने कारागृह व्यवस्थापनापुढील आव्हाने वाढली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images