Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बागलाणमध्ये २५ टँकर्स भागवताहेत तहान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यात मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला असून, तालुक्यात ठिकठिकाणी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील १७१ गावांपैकी २८ गावे व ४ वाड्यांना सुमारे २५ टँकर सुरू आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात १५ टँकर्स वाढण्याची शक्यता आहे.

बागलाण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्रता वाढली आहे. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह नामपूर, काटवन परिसरात तीव्र पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात २५ टँकर सुरू असून, पैकी ५ शासकीय तर १९ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आठ ठिकाणच्या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन टँकर भरण्यासाठी व पाच गावांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील सारदे, तरसाळी, सुराणे, रामतीर, बिजोरसे, इजमाणे, रातीर, नवेगांव, पिंपळकोठे, अजमीर सौंदाणे, कऱ्हे, वरचे टेंभे, चौगाव, पिंपळदर, चिराई, राहुड, जुनीशेमळी, नामपूर, कातरवेल, बहिराणे, मळगाव भामेर, भाक्षी, देवळाणे, आखतवाडे, श्रीपूरवडे, वडेखुर्द, टिंगरी, खमताणे या गावांसह लोणारवाडी, वघाणे पाडा, किरायतवाडी, जामनवाडी या चार वाड्यांचा समावेश आहे. आराई, बिजोटे, ठेंगोडा, चौंधाणे, नवी शेमळी, इंदिरानगर, निताणे, या आठ ठिकाणी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. सटाणा शहरात देखील सद्यस्थितीत आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू असल्याने शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परश्या-आर्चीसाठी पब्लिक सैराट!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

'सैराट'फेम आर्ची आणि परश्याची अर्थातच रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी रविवारी नाशिकमध्ये हजेरी लावली आणि नाशिककरांची प्रचंड गर्दी उसळली. परश्या व आर्चीची एक झलक पाहण्यासाठी उसळलेली गर्दी बेकाबू झाल्याने अनेकांना लोटालोट, चेंगराचेंगरीचा फटका बसला. धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड टेक्नॉलॉजी कॉलेजतर्फे इंटर्नल इलेगन्स या मेगा फॅशन शोसाठी रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी रविवारी दुपारी नाशिकच्या चोपडा लॉन्सवर हजेरी लावली.

या म्युझिक, मस्ती आणि ग्लॅमरस फॅशन शोचे खास आकर्षण होते 'सैराट'फेम परश्या आणि आर्ची. राज्यभरातील सर्व प्रेक्षकांना याड लावलेल्या या जोडीला भेटायला नाशिककर प्रचंड उतावीळ झालेले दिसून आले. दुपारपासूनच लॉन्सच्या परिसरात यंगस्टर्सचा कल्ला होता. आर्ची... परश्या... असा सतत जल्लोष सुरू होता. या वेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त देत परिसराला छावणीचे स्वरूप देण्यात आले होते. जसजसा फॅशन शो सुरू होत रंगत वाढवत गेला, तसतशी यंगस्टर्समध्ये या जोडीला पाहण्याची झिंग चढली. प्रचंड उत्सुकतेनंतर आर्ची-परश्याची स्टेजवर एंट्री होताच नाशिककर अक्षरशः 'सैराट' झाले. ही गर्दी नंतर पोलिसांनाही जुमेनाशी झाली.

असे झाले परफॉर्मन्स

इंटरनल इलेगन्स या फॅशन शोमध्ये अनेक प्रकारच्या फॅशनचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. या वेळी शेरवानी, पटियालासोबतच राजस्थानी, दाक्षिणात्य पद्धतीच्या पेहरावांचे प्रदर्शन करण्यात आले. सोबतच पेशवेकालीन आणि शिवकालीन साड्यांसोबत त्या काळच्या ज्वेलरीचेही बहारदार सादरीकरण झाले. या वेळी सिंगल आणि कपल फॅशन रॅम्प वॉक सादर झाले. गीता शेवाळे माळी हिने सादर केलेल्या 'पिंगा' आणि 'दिवाणी हो गयी' या गाण्यावर नाशिककरांनी ताल धरला.

माऊथ म्युझिक अन् मिमिक्री

फॅशन शोमध्ये एका परफॉर्मरने झिंगाट गाणं माऊथ मिमिक्रीने फक्त म्युझिकच्या आधारे सादर केले, तर ठका गांगड यांच्या पक्षी, प्राणी यांच्या अस्सल आवाजाने आणि चेहऱ्यावरील हावभावाने नाशिककरांनी उत्स्फर्त दाद दिली.

सुरक्षारक्षक, पोलिसांची अरेरावी

उसळलेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रशासनही हतबल झाले. या वेळी अनेकांकडे पास नसल्याने प्रवेशद्वारावर तुफान लोटालोट आणि चेंगराचेंगरी झाली. प्रवेशद्वार तोडत नाशिककरांनी बेफाम झाले होते. या वेळी पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी लाठीचा वापर सुरू केला, तसेच अनेकांना धक्काबुक्कीही केली. या वेळी अनेक महिला आणि तरुणी गर्दीत चेंगरल्या गेल्या. या वेळी पत्रकारांनाही वेठीस धरत पोलिसांनी अरेरावी केली.

नाशिककरांच्या उत्साहावर विरजण

गेल्या दोन दिवसांपासून नाशिककर आर्ची आणि परश्याच्या जोडीला भेटायला उत्सुक झाले होते. मात्र, काही यंगस्टर्स आणि नाशिककरांनी ही जोडी स्टेजवर आल्यावर त्यांना तिथेच गराडा घातल्याने आयोजकांना तत्काळ कार्यक्रम थांबवावा लागला. या वेळी पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी गर्दीला हटवण्याच्या प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. यामुळे मात्र नाशिककराच्या आनंदावर विरजण पडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ निवारणाचे अनुदान लवकरच मिळणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दुष्काळ निवारणासाठी मालेगाव तालुक्यास आतापर्यंत ५० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असून, उर्वरित अनुदान लवकरच प्राप्त होईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

नदी पुनरुज्जीवन योजनेंतर्गत पाटणे (ता. मालेगाव) येथील परसूल नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन भुसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती भरत पवार, रामा मिस्तरी, कैलास तिसगे आदी यावेळी उपस्थित होते. भुसे पुढे म्हणाले, की दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात कोरडवाहू शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले. नाशिक जिल्ह्यास दुष्काळ निवारण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपये अनुदान मिळणे अपेक्षित आहे.

राज्यातील २५ हजारांवर गावांना टंचाई व दुष्काळाची झळ बसली आहे. मालेगाव तालुक्यातही काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत विकास साधला पाहिजे. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी परिश्रम घ्यावेत, असे ते म्हणाले.

अधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होणारी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. आगामी पावसाळ्यात पाण्याचा प्रत्येक थेंब अडवावा, जेणेकरुन जलसाठा निर्माण होईल, असेही भुसे यांनी नमूद केले. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बंधारा, तलावांचीही होणार दुरुस्ती

मालेगाव तालुक्यातील देवारपाडे, भिलकोट, गुगुळवाड, जळकू, कंधाणे, अस्ताणे, मोहपाडा, कौळाणे (गा.), वनपट, टिंगरी, गाळणे, कजवाडे, पोहाणे, दुंधे येथे नदी पुनर्जीवन, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाझर तलाव दुरुस्ती, सिमेंट काँक्रीट बंधारा, केटीवेअर दुरुस्ती आदी कामांचे भूमिपूजन भुसे यांच्या हस्ते झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर भरायलाही मिळेना पाणी!

$
0
0

निफाडमधील लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना अडचणीत

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुका भीषण पाणीटंचाईला सामोरा जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. तालुक्यातील ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने अधिकारीही हैराण झाले आहेत. त्यामुळे टँकर भरायला कोणी पाणी देत का? पाणी.. असे म्हणण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे.

पाणीटंचाईची सर्वात जास्त झळ तालुक्याच्या पूर्व आणि दक्षिण भागाला बसत आहे. तालुक्यातील जवळपास १२ गावांना १४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तालुक्यातील मानोरी येथे दिवसातून पाणीटँकरच्या दोन खेपा होत आहेत. गोंदेगाव येथे सात वेळा, पाचोरे खुर्द येथे दोन वेळा, पाचोरे बु. येथे पाच वेळा, मरळगोई खुर्द येथे तीन वेळा, मरळगोई बु. येथे तीन वेळा गोळेगाव येथे दोन वेळा, वाहेगाव येथे दोन वेळा, भर्वस येथे तीन वेळा दिवसातून पाणीपुरवठा करावा लगत आहे. पिंपळगाव नजिक, चितेगाव, औरंगपूर येथे पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव आलेले असल्याचे पंचायत समितीचे ल. पा. चे अधिकारी गोरे यांनी सांगितले.

पाणी आणायचे कुठून?

टँकरमध्ये पाणी भरायचे कुठून हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. निफाड तालुक्यात खासगी टँकरला ७०० ते १००० रुपये एका खेपेला द्यावे लागत आहेत. तर, सरकारच्या पाणीपुरवठा टँकरने दिवसाला कितीही खेपा झाल्या तरी, त्याला फक्त ४०० रुपये दिले जात आहेत. शासकीय टँकरला पाणी उपलब्ध करणे अवघड झाले असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले.

धरणाच्या गावातच टंचाई

धरणाचे गाव असलेल्या नांदूरमध्यमेश्वरला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. यावरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येते. तालुक्यात कानळद, वाकद, शिरवाडे, धारणगाव, देवगाव, सावरगाव, रेडगाव आदी गावांमध्येही तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. तालुक्यातील नद्या, नाले, कालवे, पाझर तलाव पूर्णता आटल्याने अनेक ठिकाणी शेतकरी उभे-आडवे बोर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाश‌िक : पाऱ्याने ओलांडली चाळीशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उकाड्यामूळे हैराण झालेल्या नाशि‌ककरांना आता पुढील तीन दिवस तप्त उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. रविवारी नाशिकमधील तापमानाच्या पाऱ्याने चाळ‌िशी पार गेला. नाशिक ४०.३, तर मालेगाव ४३.४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. बुधवारपर्यंत नाशिकचा पारा ४३ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नाशिककर गेल्या दीड दोन महिन्यांपासून तापमानातील चढउतार अनुभवत आहेत. एरवी एप्रिल आणि मेमध्ये ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणारा तापमानाचा पारा मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच येथे पोहोचला होता. २५ मार्चला राज्यातील सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद जिल्ह्यातील मालेगावात झाली होती. त्यांनतरच्या दोन चार दिवसांत नाशिकचे तापमानही ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यानंतर आतापर्यंत हे तापमान ३५ ते ३९.९ अंश सेल्सियसच्या आसपास राह‌िले आहे. त्यामुळे कधी तप्त उन्हाच्या झळा, तर कधी प्रचंड उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ३१ मेपर्यंत जिल्हावासीयांनाच नव्हे; तर उत्तर महाराष्ट्रातील रहिवाशांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार आहे. तेलंगणा, विदर्भ आणि राजस्थानात ‍तापमान वाढले असून, त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील तापमानावरही होतो आहे.

रविवारी जिल्ह्यात ४०.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. बुधवारी १८ मेपर्यंत हे तापमान वाढत जाऊन ४१ अंश सेल्सियसच्या वर पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उष्णतेची ही लाट मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही पसरण्याची शक्यता राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग सुरक्षा निधीत होणार वाढ?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची महासभा मंगळवारी होत असून या सभेत शहरातील आग सुरक्षा निधीच्या वाढीवर निर्णय घेतला जाणार आहे. सोबतच चीनच्या युंग याँग शहरासोबत सिस्टर सिटी करण्याचा प्रस्तावही चर्चेसाठी येणार असून या प्रस्तावालाही मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

गंगनचुंबी इमारतींच्या आग सुरक्षा निधीत त‌िपटीने वाढ सुचविण्यात आली असून सदस्यांचा या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे लेखापरिक्षण अहवालाच्या आधारे प्रशासनाने हा विषय मंजुरीला ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महासभा होत आहे. त्यात विकासकामांच्या प्रस्तावांसह आग सुरक्षा निधीत वाढ करणे व चीनच्या युंग याँग सिटीसोबत सिस्टर सिटीचा करारनामा करण्याचे दोन महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. आग सुरक्षा निधीच्या वाढीचा विषय स्थायी समितीने महासभेवर पाठवला आहे. आग सुरक्षा निधीत त‌िपटीने वाढ सुचव‌िण्यात आली आहे. त्यातून एक हजार चौरस फुटावरील प्लॉट व १५ मीटर खालील इमारती वगळण्यात आल्या आहेत. लेखा परिक्षणात महापालिका कमी आग सुरक्षा निधी गोळा करत असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे महापालिकेडून

ही वाढ सुचविण्यात आली आहे. या वाढीला नगरसेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तर युंग याँग सिटी सोबतच सिस्टर सिटी करार करण्याच्या प्रस्ताववरही चर्चा केली जाणार आहे.

निमाच्यावतीने हा प्रस्ताव आला असून २५

तारखेला चीनच्या शिष्टमंडळासोबत हा करार केला जाणार आहे. त्यावर महासभेत शिक्कामोर्तब होण्याचा जाण्याची शक्यता आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजारप्रकरणी आयुक्तांना नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाने भंगार बाजार काढण्यासंदर्भात आदेश देवून महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांकडून भंगार बाजार हटवण्यासंदर्भात कारवाई केली जात नाही. त्यामुळे याचिकाकर्ते दिलीप दातीर यांनी अवमान याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाच्या आदेशाची अमंलबजावणी केली नाही, म्हणून वकिलामार्फत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना अवमानना नोटीस बजावल्याची माहिती याचिकाकर्ते दिलीप दातीर यांनी दिली आहे. तसेच १५ दिवसाच्या आत हटवण्याची कारवाई केली नाही तर शिवसेनेतर्फे आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिका प्रशासन व पोलिस आयुक्त भंगार बाजाराची पाठराखण करत आहेत. वारंवार सूचना व कोर्टाचे आदेश देवून भंगार बाजार हटवले जात नाही. शहरातील अवैध व्यवसायाचा अड्डा हा भंगार बाजार बनला आहे. परंतु, राजकीय वरदहस्तामुळे त्याच्यावरील कारवाई केली जात नाही. त्यामुळे याचिककर्ते दिलीप दातीर यांनी न्यायालयाचा आदेश देवूनही भंगार बाजार हटवले जात नाही. म्हणून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दातीर यांनी वकिलामार्फत आयुक्तांना नोटीस बजावली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयमा निवडणूक अविरोध करण्यासाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) दोन वर्ष मुदतीसाठी असलेली निवडणूक येत्या २९ मे रोजी होत आहे. यात मात्र सर्वच आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांना पाठ फिरवल्याने एकही अर्ज गेला नाही. दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून राजेंद्र अहिरे व नीलिमा पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केले जाण्याची चर्चा आयमा पदाधिकाऱ्यांमध्ये होती. विरोधी गटातून तुषार चव्हाण यांनी देखील अध्यक्षपदासाठी आपण उभे राहणार असल्याचे अगोदरच जाहीर केले आहे. यामुळे निमा, आयमाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कितपत यश येते हे येणारा काळच ठरविणार आहे.

आयमाची दोन वर्ष मुदतीची निवडणूक जाहीर झाली आहे. आयमा निवडणुकीत बहुतेक वेळा बिनविरोध होण्याची परंपरा राहिली आहे. आताही होऊ घातलेल्या निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. जी. चंद्रशेखर व त्यांचे सहकारी सी. डी. कुलकर्णी, सुभाष छोरीया काम पहात आहेत. सोमवारी उमेदवारांनी अर्ज विक्रीकडे पाठ फिरविल्याने एकही अर्जाची विक्री झाली नाही. दरम्यान अर्ज विक्री व स्वीकृती १६ ते १९ मे पर्यंत आहे. २० मे अर्जाची छाणणी, २१ उमेदवारांची यादी जाहीर, २२ मे हरकत घेतलेल्या अर्जांची छाणणी, २३ मे ला माघार व २४ मे रोजी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. राजेंद्र आहिरे व नीलिमा पाटील

यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ड्रेनेजचे सांडपाणी कंपनीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर महापालिकेने एमआयडीसीच्या एफ सेक्टरमध्ये टाकलेली सांडपाण्याची ड्रेनेज लाइन उघड्यावर सोडून देण्यात आल्याने ड्रेनेजचे सांडपाणी थेट कंपनीत जात आहे. सांडपाणी सोडून दिलेल्या ठिकाणच्या शेतक-याने सांडपाण्याची लाइन सिमेंटचा थर टाकून बंद केल्याने थेट कंपनीत सांडपाणी शिरत असल्याची तक्रार नीलय इंडस्ट्रीच्या व्यवस्थापकांनी केली आहे. महापालिका व एमआयडीसी दोघांकडेही कंपनी व्यवस्थापनाने तक्रारही केल्या आहेत. परंतु, हे काम आमचे नाही, असे सांगत टाळाटाळ करण्याचे काम महापालिका व एमआयडीसी करीत असल्याचा आरोप होत आहे. सांडपाण्यामुळे मात्र कंपनीतील कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यानंतर तेथील सांडपाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेज लाइनचे जाळेच टाकळण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून असंख्य कंपन्यांचे सांडपाणी नैसर्गिक नाल्यांद्वारे गोदावरी व नंदिनीत मिसळत आहे. याबाबत अनेकदा महापालिका व एमआयडीसीकडे निमा, आयमासह औद्योगिक संघटनांनी तक्रारीदेखील केल्या आहेत. परंतु, महापालिका व एमआयडीसीत एकमत होत नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न अधांतरीच आहे. दरम्यान, सातपूर एमआयडीसीतील एफ सेक्टरमधील सांडपाण्याची लाइन शेतात पसरत असल्याने शेतक-याने बंद केल्याचे सांगितले. परंतु, महापालिकेने टाकलेल्या सांडपाण्याच्या लाइनचे काम अर्धवटच का करण्यात आले, असा सवालदेखील यामुळे उपस्थित होत आहे. सांडपाण्याची लाइन शेतक-याने बंद केल्याने सांडपाणी एफ सेक्टरच्या कंपन्यांमध्ये शिरत आहे. त्यामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, याबाबत एफ सेक्टरमधील काही कंपनी व्यवस्थापनांनी महापालिका व एमआयडीसीकडे तक्रारीदेखील केल्या आहेत. परंतु, महापालिका व एमआयडीसी हे काम आमचे नाही असे सांगून चालढकल करीत असल्याचे कंपनी अधिका-यांचे म्हणणे आहे. यावर महापालिका व एमआयडीसीने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी एफ सेक्टरमधील उद्योजकांनी केली आहे. महापालिकेने टाकलेल्या सांडपाण्याची लाइन शेतक-याच्या शेतात नेऊन सोडलेली आहे. परंतु, शेतक-याला त्याचा त्रास होत असल्याने त्याने ती सिमेंट टाकून बंद केली. यामुळे या लाइनमधील सांडपाणी एफ सेक्टरमधील कंपन्यांमध्ये शिरत आहे. यामुळे कामगारांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. महापालिकेने याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. -ललित जाधव, व्यवस्थापक, नीलय इंडस्ट्री सांडपाणी कंपनीत येत असल्याने त्याचा त्रास कामगारांना सहन करावा लागत आहे. काही कामगार यामुळे आजारीदेखील पडले आहेत. याबाबत कंपनी व्यवस्थापनाने महापालिका व एमआयडीसीकडे तक्रारदेखील केली. परंतु, दाद मिळत नाही. त्यामुळे कंपनीत येणारे सांडपाणी बंद करणार कोण, असा आमचा सवाल आहे. -प्रवीण ठोके, कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलानगरला लाखो लिटर पाणी वाया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, इंदिरानगर एकीकडे शहरात सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असताना व पाणीबचतीसाठी महापालिका नागरिकांमध्ये जनजागृती करीत असताना दुसरीकडे प्रशासनाच्याच ढिसाळ कारभारामुळ लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे आढळून येत आहे. येथील कलानगर भागातील जलवाहिनीतून सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे महापालिका प्रशासनास कळविल्यानंतरसुद्धा येथे कोणताही अधिकारी वा कर्मचारी न फिरकल्याने नागरिकांनाच ही गळती बंद करावी लागली. त्यामुळे अशा प्रकारांकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, अशा प्रकारांना जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला आहे. इंदिरानगर येथील वडाळा पाथर्डीरोडवर असलेल्या कलानगर येथील मुख्य जलवाहिनीतून पाणी वाया जात होते, याबाबतची माहिती नागरिकांनी तातडीने महापालिकेला कळविली. परंतु बराच वेळ होऊनदेखील महापालिकेचा कोणाताही अधिकारी किंवा कर्मचारी येथे न आल्याने अखेर नागरिकांनीच पुढाकार घेऊन ही पाणी गळती थांबविली. रात्री उशिरापर्यंतदेखील कोणताही अधिकारी वा कर्मचारी या ठिकाणी न आल्याने या पाणीगळतीला जबाबदार असणा-यांवर कारवाई होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास कलानगर येथे जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. पाण्याचे महत्त्व बघता नागरिकांनी तातडीने जलवाहिनीतून गळती थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याच्या दाबामुळे सुमारे वीस मिनिटांनंतर त्यात यश आले. पाणी गळती सुरू होताच यासंदर्भात महापालिकेच्या कर्मचा-यांना कळवूनदेखील ते इकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड स्थानकाला रिक्षांचा विळखा

$
0
0
नाशिकरोड बसस्थानकात इन व आउटसाठी सध्या एकाचा मार्गाचा वापर केला जात आहे. मात्र, या स्थानकाला रिक्षांचा विळखा पडत असल्याने बसेसची कोंडी नित्याचीच झाली असून, प्रवाशांची चढ-उतार करण्यासाठी काही बसेस अक्षरशः बसथानकाच्या बाहेरच उभ्या कराव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पेठरोडवरील झाडे ठरताहेत जीवघेणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम पेठरोडवर मध्यभागी असणारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी असंख्य झाडे जीवघेणी ठरत आहेत. अनेक निष्पाप व्यक्तींचा बळी घेणारी व अनेकांना जायबंदी करणारी अशी धोकादायक झाडे येथून काढून त्यांचे पुनर्रोपण करावे, अशी मागणी प्रवासी व वृक्षप्रेमींकडून केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून पेठरोडवरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे पेठरोडचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे अनेक झाडे रस्त्याच्या मध्यभागी आली आहेत. त्यामुळे पेठरोडवरून जाणे जीवघेणे बनले असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून केल्या जात आहेत. गेल्या वर्षभरात अनेक वाहनचालक अशा झाडांवर आदळल्याने काहींना जीव गमवावा लागला असून, अनेक जण जायबंदी झाले आहेत, तर मोठा भुर्दंडही अनेकांना बसला आहे. त्यामुळे या रोडवरील अशी धोकादायक झाडे काढून त्यांचे उद्यानात किंवा अन्यत्र पुनर्रोपण केल्यास अशी झाडेही वाचतील आणि माणसांचा जीवदेखील वाचू शकेल. त्याचप्रमाणे वाहनांचे होणारे नुकसानही टळू शकेल. महापालिकेने वृक्षप्रेमींशी चर्चा करून आणि संबंधित परवानग्या घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे. पवार मार्केटमधून बाहेर पडताना आणि आतमध्ये जाताना मध्यभागी असलेला मोठा वृक्ष वाहतुकीस अडथला बनला आहे. पेठरोडवरून पेठकडे आणि म्हसरूळ व मखमलाबाद गावाकडे जाणारी चौफुली व सिग्नलजवळ अशीच दोन झाडे रोडच्या मध्यभागी आहेत. याशिवाय मेहेरधाम आणि एसटीच्या कार्यशाळेसमोरदेखील भर रस्त्यात अनेक झाडी आहेत. या ठिकाणांवर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे अशा धोकादायक झाडांच्या पुनर्रोपणाची मागणी करण्याची वृक्षप्रेमी, वाचनचालकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाव्या लॉकरमध्येही निघाले सोने

$
0
0

भाऊसाहेब चव्हाणच्या नामको बँकेच्या खात्यात आढळले सव्वापाच किलो सोने

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केबीसी मल्टिट्रेड अ‍ॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भाऊसाहेब चव्हाणचे आणखी एक लॉकर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी उघडले. या लॉकरमध्ये तब्बल ५ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले. आर्थिक गुन्हे शाखेने आजवर १४ किलो १३४ ग्रॅम वजनाचे सोने व दोन किलो ३०० ग्रॅम वजनाचे दागिने असा मुद्देमाल चव्हाणच्या विविध लॉकरमधून जप्त केले आहे.

राज्यभरातील गुंतवणूकदारांना हैराण करून सोडणा-या भाऊसाहेब चव्हाणला अटक केल्यापासून आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या संपत्तीची शोध मोहीम हाती घेतली आहे. आजवर त्याच्याकडून चार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमत्तीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सोमवारी, आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धनलक्ष्मी बँकेतील लॉकर्सची तपासणी केली. या लॉकरबाबत त्यानेच पोलिसांना माहिती दिली होती. मात्र, त्यात काहीच आढळून आले नाही. पोलिस सातत्याने त्याच्याकडे चौकशी करीत असून, त्यातच त्यांना चव्हाणच्या आणखी एका लॉकरबाबत माहिती मिळाली होती. हे लॉकर नामको बँकत असल्याने पोलिसांनी लागलीच या लॉकरची तपासणी केली. या लॉकरमध्ये ५ किलो ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडून आले.

सिंगापूरवरून परतलेला भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती हे सुरुवातीस पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे चित्र होते. मात्र, हळूहळू चव्हाण तीच तीच माहिती देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आज उघडण्यात आलेल्या सहाव्या लॉकरबाबतची माहिती चव्हाणने पोलिसांना दिलीच नव्हती. भाऊसाहेब चव्हाण लपवाछपवी करीत असल्याने वरिष्ठ अधिकारी सुध्दा त्याच्याकडे वेगवेगळ्या पध्दतीने चौकशी करीत आहेत. सोमवारी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी देखील चव्हाणकडे सखोल चौकशी केली. पोलिसांनी केबीसी कंपनीशी संबंधित सर्व हार्डडिस्क तसेच कागदपत्रे जप्त केली असून, त्या आधारे त्यांच्याकडील माहिती बाहेर काढली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तपासावर एक दृष्टीक्षेप ७ मे रोजी भाऊसाहेब व आरती चव्हाला अटक ८ मे रोजी चव्हाण दाम्पत्यास १३ मेपर्यंत कोठडी ९ ते १० मे या दरम्यान कंपनीच्या हार्डडिस्कसह इतर कागदपत्रे जप्त १३ मे रोजी कोर्टाकडून दोघांच्या कोठडीत १९ मेपर्यंत वाढ

जप्त मालमत्ता दिनांक - बँकचे नाव - उघडकीस आलेली मालमत्ता १० मे - नगर अर्बन को. ऑफ. - ६ किलो ६०० ग्रॅम सोने १० मे - मेरी एसबीआय शाखा - २०० ग्रॅम वजनाचे सोने ११ मे - एसबीआय शाखा, शरणपूररोड - काहीही नाही ११ मे - २ किलो ३५ ग्रॅम वजनाचे सोने व २ किलो ३ ग्रॅम वजनाची चांदी १६ मे - धन लक्ष्मी बँक - काहीही नाही १६ मे - नामको बँक - ५ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने एकूण - १४ किलो १६९ ग्रॅम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीत धमाल नाट्य कार्यशाळेची

$
0
0

'मटा' आणि लोकहितवादी मंडळाचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स व लोकहितवादी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बालनाट्य शिबिर आणि मोठ्या मुलांसाठी असलेल्या नाट्य कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला. ही दोन्ही शिबिरे राका कॉलनीतील लोकहितवादी मंडळाच्या हॉलमध्ये सुरू असून, ज्येष्ठ दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी आणि डॉ. प्रशांत वाघ शिबिरार्थींना प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पहात आहेत.

या शिबिरात मुलांकडून रोज विविध प्रकारचा नाट्याभ्यास करून घेतला जात आहे. सुरुवातीला पहिल्या दिवशी एकमेकांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर आवाजावर नियंत्रण, स्पष्ट उच्चार, समयसुचकता, वाचिक आणि कायिक अभिनय या गोष्टींवर मार्गदर्शन केले जात आहे. तसेच, बालनाट्य शिबिर पूर्ण करणाऱ्या बालकलाकारांचा एक नाट्यविष्कार पंचवटीतील पलुस्कर सभागृहात १९ मे रोजी आयोजित केला आहे. शिबिरार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे शिबिर ६ ते १९ मे या कालावधीत आयोजित केले आहे. या शिबिरात ५ ते १४ वर्षे वयोगटातील २७ मुला-मुलींना प्रवेश दिला आहे. लहान मुलांप्रमाणेच मोठ्या मुलामुलांसाठीदेखील लोकहितवादी मंडळातर्फे आयोजित कार्यशाळेलादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी काम पहात असून, ही कार्यशाळा ८ मे पासून सुरू झाली आहे २२ मेला समारोप होईल. ज्या मुला-मुलींना या क्षेत्रात करिअर करायचे आहे, अशांसाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे. यात अभिनयाबरोबरच नाट्यसंहिता लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत वेषभूषा, केशभूषा, रंगभूषा, अभिनय इत्यादी तांत्रिक अंगाचे देखील मार्गदर्शन केले जात आहे. या कार्यशाळेतील मुलांना २२ मे रोजी एका विशेष समारंभात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

आम्ही चांगल्या ठिकाणी नाटकाचे धडे घेत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. नाटकात इतका बारिक विचार केला जातो, याचा कधी विचार केला नव्हता. या कार्यशाळेत आल्यानंतर नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. - डॉ. नरेंद्र दाभाडे

फारच सुंदर कार्यशाळा सुरू आहे. वाचिक अभिनयाबरोबरच कायिक अभिनयदेखील आम्हाला शिकवला जात असून, अनेक तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करीत आहेत. - प्राजक्ता इखानकर

खूप खूप मजा येत आहे. रोज शिबिराच्या ठिकाणी कधी येईल असे होऊन जाते. मंडळात आम्ही खूप चांगल्या गोष्टी शिकलो. - रुचा

खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. शाळेत मित्रांशी वागाव कसं, त्याचप्रमाणे अभिनय कसा करावा, मराठी वाचन कसे करावे, याचा छान अभ्यास झाला. - मिताली वाघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील ४६ अवैध धंद्यांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या तब्बल ४६ अवैध धंद्यावर छापे मारीत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत अनेकांवर कारवाई केली. सोमवारी दिवसभर सुरू असलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली.

शहरात गुन्हेगारी घटनांनी जोर पकडला असून, पोलिस टीकेचे धनी ठरत आहेत. अवैध धंद्याबाबत ओरड असून, पोलिस संशयितांना पाठीशी घालत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या भागात छापे मारून ३३ अवैध मद्य विक्रीची ठिकाणे व १३ जुगार अड्डे उद्ध्वस्त केले. पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे दाबे दणाणले असून, बंद पडलेले अड्डे पुन्हा सुरू होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.

इंदिरानगरला दारूच्या बाटल्या जप्त

वडाळा गावातील अवैध धंद्यावर छापा टाकून हजारो रुपयांचा माल जप्त करून काही संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी वडाळागावातील काही अवैध धंद्यावर छापा टाकला. यावेळी एका अवैधरित्या देशीदारू विकणाऱ्यांवर संशयित आरोपी बबन ठाकरे (वय ४०) यांच्या धंद्यावर छापा टाकला. यावेळी १५ हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या हेत. तसेच, एका मोकळ्या मैदानात जुगार खेळणाऱ्यावरही पोलिसांनी छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी आसिफ शेख, सोयब कुरेशी, पप्पू किर्लोस्कर, मच्छिद्र मुणे यांना ताब्यात घेतले. यांच्याकडेही सुमारे चौदाशे रुपये जप्त करण्यात आले आहे. या छाप्याप्रसंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्यासह इंदिरानगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील इतर भागात पोलिसांनी अवैध धंद्यांवर छापे टाकले. ही मोहीम आणखी काही दिवस सुरू ठेवून अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेलरोडला घरात घुसून महिलेचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरात घुसून तिघा संशयितांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना जेलरोड येथील मंगलमूर्तीनगर परिसरात घडली. सॅम पारखे, रॉर्बर्ट पारखे आणि रोहित पारखे व त्यांची आई अलका (पूर्ण नाव समजले नाही) अशी संशयितांची नावे आहेत. विशेष म्हणजे घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना सुध्दा यावेळी धक्काबुक्की करण्यात आली. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयितांनी पीडित महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला. तसेच, तिला मारहाण केली. या प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील या पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, पीडित महिलेने संशयितांविरोधात उपनगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सदाफुले हे काही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यावेळी संशयित सॅम पारेख याच्यासह त्याच्या साथिदारांनी पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. या प्रकरणी सदाफुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा दुसरा गुन्हा दाखल केला.

ब्लेडने वार जुने नाशिक येथील तलवाडी परिसरात एकावर ब्लेडने वार करण्यात आले. इरफान अजगर सैयद (वय ३८) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात अज्ञात संशयिताने काही एक कारण नसतानाही ब्लेडने सैयद याच्या मानेवर, हातावर वार करून दुखापत केली. घटनेनंतर संशयित फरार झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

ट्रकखाली सापडून एकाचा मृत्यू ट्रक पार्क करीत असताना तोल जाऊन खाली पडलेल्या व्यक्तीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना औरंगाबादरोड वरील निलगिरी बागेतील म्हाडा कॉलनी येथे घडली. राजू नंदकिशोर जगताप (वय ३०) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. औरंगाबाद रोडवरील म्हाडा कॉलनी येथे राहणारे जगताप शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घराजवळ ट्रक पार्क करीत असताना हा अपघात झाला. ट्रक पाठीमागे घेत असताना पाठीमागे वळून पाहणाऱ्या जगतापांचा तोल गेला. त्यातच ट्रकचे पाठीमागील चाक छातीवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबीसीनंतर आता ‘ट्रू लाइफ’चा गुंतवूणकदारांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुंतवणूकदारांना साखळी पद्धतीने मार्केटिंग करण्याचे व आकर्षक आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या ट्रू लाइफ व्हिजन प्रा. लि. कंपनीच्या सात जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. प्राथमिक तपासात त्यांनी ६,३०० गुंतवणूकदारांची आतापर्यंत तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांतील गुंतवणूकदारांचा समावेश आहे. निराला बाजार येथील सेमिनार संपल्यानंतर रविवारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंपनीचा प्रमुख संचालक नाशिकचा आहे.

ट्रू लाइफ या कंपनीचा रविवारी वर्धापनदिन होता. त्यानिमित्त निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात 'उडाण' नावाने सेमिनार आयोजित करण्यात आला होता. तेथे कंपनीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर दीपक जिभाऊ सूर्यवंशी यांच्यासह इतर उपस्थित होते. या सेमिनारला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हजेरी लावली होती. सुमारे १८०० ते १९०० गुंतवणूकदार सेमिनारला उपस्थित होते. तेथे आकर्षक ब‌क्षिसे देऊन गुंतवणूकदारांचा सत्कार करण्यात आला. प्रभावी भाषणाद्वारे कंपनीला साखळी पद्धतीने ग्राहक मिळवून दिल्यास सभासदांना आकर्षक बक्षिसे व करोडपती बनवण्याचे आमिष दाखविण्यात आले.

सेमिनार संपल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कंपनीचे सीएमडी दीपक सूर्यवंशी (वय ३७, रा. कामटवाडा, नाशिक), शंकर प्रकाश निकम (वय ३६, रा. शेंदूरवादा ता. गंगापूर), राजेंद्र दादासाहेब भुसे (वय ३५, रा. चापटगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर), अरुण चंद्रभान मोगल (वय ३०, रा. शिवाजीनगर, बारावी योजना, औरंगाबाद), परमेश्वर रावसाहेब लोंढे (वय ३५, रा. ‌शिवाजीनगर, जालना), संदीप श्रीधर बांडे (वय २९ रा. निलजगाव फाटा, बिडकीन, ता. पैठण) व रविराज जवाहर राठोड (वय २७ रा. विजयंतनगर, देवळाई चौक, औरंगाबाद) यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध ‌गुंतवणूकदार शिवाजी शेनूबा ढाकणे (वय ५३, रा. बजाजनगर) यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहार, फसवणूक, ठेवीदारहित संरक्षण अधिनियम कायदा, माहिती व तंत्रज्ञान कायदा, प्राइज चीट्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम (बॅनिंग) अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे व पीएसआय सुभाष खंडागळे यांनी ही कारवाई केली.

नाशिकच हेडक्वार्टर्स

भाऊसाहेब चव्हाणच्या केबीसी कंपनीचे व दीपक पारखेच्या सुपर पॉवर कंपनीचे हेडक्वार्टर्स नाशिकचेच होते. दीपक सूर्यवंशी याच्या ट्रू लाइफचे मूळदेखील नाशिक शहरात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील गोळेगाव येथील सागर पंढरीनाथ डोंगरे (वय २७, रा. गोळेगाव) या तरुण शेतकऱ्याने रविवारी शेततळ्यामध्ये उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. जिल्ह्यात आतापर्यंत ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यात निफाड तालुक्यात १२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

बागायतदारांचा तालुका अशी निफाडची ओळख आहे. मात्र, याच तालुक्यात चालू वर्षात शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. सागर डोंगरे याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. त्याच्या वडिलांच्या नावे शेती असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. तो विवाहित होता. त्याच्या मागे पत्नी, आईवडील असा परिवार असल्याची माहिती निफाड तहसील कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. डोंगरे कुटुंबांवर कर्ज असावे, असा प्राथमिक अंदाजही प्रशासनाने व्यक्त केला आहे. मेमध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या नऊ घटनांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कर्जबाजारीपणा, दुष्काळी परिस्थिती यांमुळे शेतकऱ्यांचा धीर खचत असून त्यातून दिवसागणिक आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील बुद्धिबळपटूंच्या क्रीडागुणांचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकविध क्रीडा संघटनांपैकी अनेक खेळांना क्रीडागुण सवलतीतून यंदा वगळण्यात आले आहे. यात बुद्धिबळालाही वगळण्यात आल्याने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने मंगळवारी नाशिक येथील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याची तातडीने दखल घेत क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी त्याच दिवशी मंगळवारीच निर्णय घेऊन क्रीडागुण सवलत देण्याचे संघटनेला आश्वासन दिले. यामुळे बुद्धिबळ खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नाशिक येथे रेषा फाऊंडेशनतर्फे मंगळवारपासून फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव दिलीप पागे, सहसचिव फारूक शेख व भाजपचे शहर सरचिटणीस लक्ष्मण सावजी या वेळी उपस्थित होते. उद््घाटनप्रसंगी संघटनेचे सचिव दिलीप पागे यांनी भाजपचे शहर सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांच्यासमोरच क्रीडागुणांचा प्रश्न उपस्थित करीत तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणतेही कारण न देता बुद्धिबळाला वगळण्याचे कारण काय, असा थेट सवाल त्यांनी केला. पागे म्हणाले, की राज्यातील दहावी-बारावीच्या अनेक खेळाडूंनी संघटनेच्या विविध राज्यस्तरीय स्पर्धांत सहभाग घेतला. मात्र, २०१५-१६ मध्ये या खेळाला वगळण्यात आले. हा निर्णय घेताना बैठकीला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या प्रतिनिधीला निमंत्रित करण्यात आले नाही. त्याचबरोबर निर्णयाची माहितीही संघटनेला देण्यात आली नाही. मुळात शैक्षणिक वर्षाच्या आधीच निर्णय घ्यायला हवा होता. शिवाय बुद्धिबळाला का वगळले, याचे कारणही स्पष्ट केले नाही. त्यामुळे हा बुद्धिबळपटूंवर अन्याय आहे. याबाबत अनेक मंत्र्यांशी पत्रव्यवहार केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आल्याची खंतही पागे यांनी व्यक्त केली. भाजपचे शहर सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी बुद्धिबळ संघटनेच्या तक्रारीचा गांभीर्याने विचार करण्यात येईल व क्रीडामंत्री विनोद तावडे आज नाशिक दौऱ्यावरच असल्याने त्यांच्याकडे हा प्रश्न मांडू, असे आश्वासन दिले.

दोन तासांत निर्णय!

नाशिकमध्ये सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोरच खेळाडूंच्या क्रीडागुणांचा प्रश्न उपस्थित झाला असला तरी त्याची दखल घेतली जाणार नाही, असेच बुद्धिबळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटले. मात्र, लक्ष्मण सावजी यांनी क्रीडामंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. तावडे यांनीही तातडीने दखल घेत संघटनेचे सचिव पागे यांच्याशीच थेट संपर्क साधला. बुद्धिबळपटूंना क्रीडागुण सवलत देण्यात येईल. याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले. नाशिकमधील स्पर्धेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याची दोन तासांत दखल घेतली गेल्याने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने समाधान व्यक्त केले.

राज्यातील खेळाडूंना फायदा

राज्य सरकारने क्रीडागुण सवलतीत यंदा ४२ शालेय स्पर्धांतील खेळांचा समावेश केला आहे. या यादीत बुद्धिबळाचा समावेश असला तरी या सवलतीतून फेडरेशनच्या स्पर्धांना वगळण्यात आले होते. विशेष म्हणजे थेट क्रीडागुण सवलतीची जाहिरात करून काही आयोजकांनी स्पर्धाही आयोजित केल्या होत्या. मात्र, क्रीडागुण सवलतीतून हा खेळच वगळल्याने खेळाडूंची घोर निराशा झाली. अनेक पालकांनी संघटनेलाच दोषी धरले होते. मात्र, राज्य सरकारने खेळाला अचानक वगळल्याने संघटनाही पेचात पडली होती. अखेर क्रीडामंत्री तावडे यांनीच आश्वासन दिल्याने राज्यातील बुद्धिबळपटूंसह संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रँडमास्टर गागरे, श्रीनाथ, कठमाळे विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेषा फाऊंडेशनतर्फे नाशिक येथे मंगळवारपासून सुरू असलेल्या द्वितीय आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर शार्दुल गागरे, महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीसह आंतरराष्ट्रीय मास्टर नारायण श्रीनाथ, समीर कठमाळे, विक्रमादित्य कुलकर्णी, चंद्रशेखर गोखले, साक्षी चितलांगे, नितीन बेदरकर यांनी अपेक्षितपणे विजयी सलामी दिली.

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने येथील स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत २२६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त रघुनंदन गोखले अध्यक्षस्थानी होते. मंदिराचे स्वामी ज्ञानी पुराणी, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, नाशिक महानगराचे उपाध्यक्ष अनिल भालेराव, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव दिलीप पागे, सहसचिव फारूक शेख, ग्रँडमास्टर विदित गुजराथी प्रमुख पाहुणे होते. महाराष्ट्राचा नवोदित ग्रँडमास्टर शार्दुल गागरे व भारतीय हवाई दलाची गोव्याची खेळाडू महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेत पंचप्रमुख नितीन शेणवी यांच्यासह दिलीप रावल, भोसले, नंदुरबारचे शोभराज खोंडे, अर्चना कुलकर्णी, रसिका रत्नपारखी, अभिषेक देशपांडे, ओंकार जाधव यांनी सहकार्य केले.

नाशिककरांना मिळणार जीएमचे मार्गदर्शन
स्पर्धेचे आयोजक मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले, की केवळ स्पर्धा घेणे एवढ्यावरच रेषा फाऊंडेशन थांबणार नाही, तर नाशिककरांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून दर तीन महिन्याला ग्रँडमास्टरचे (जीएम) प्रशिक्षण घेण्यात येईल, तसेच आयएमलाही (आंतरराष्ट्रीय मास्टर) प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येणार आहे. केवळ नाशिककरांनाच नव्हे, तर देशातील कोणत्याही खेळाडूला ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी खेळाडूंना निवास व भोजन व्यवस्था मोफत दिली जाईल.

पालकांनो, मुलांवर दबाव नको!
नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले, की मुलांवर दबाव आणू नका आणि खूप लांबचा विचार करू नका. रात्री गाडी चालवताना लाइटच्या प्रकाशात किमान २०० ते ३०० मीटरचेच दिसू शकते. त्यामुळे आपणही जे दिसतं त्याचाच विचार करावा. जवळचं पाहायचं सोडून लांबचा विचार केल्यास अपघात घडू शकतो. मलाही माझे पालक १४, १६ वर्षांखालील वयोगटात खेळवायचे. मला खूप राग यायचा. कारण मी हरायचो. अपयशाचा विचार न करता खेळत राहा. यश नक्कीच मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images