Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कृषी पर्यटनाला वाव

$
0
0

किशोर अहिरे
आतिथ्य क्षेत्रात जगभरात कृषी पर्यटन किंवा ग्राम पर्यटन याचा अत्यंत महत्त्वाचा असा वाटा आहे.नाशिकला असलेल्या आल्हाददायक वातावरणामुळे विविध प्रकारच्या पिकांची तसेच फळबागांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. द्राक्ष शेती, डाळिंबाची शेती तसेच विविध प्रकारची फळे, भाजीपाला व फुलांची अत्यंत समृद्ध शेती या भागात केली जाते. शेती व्यावसायात मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. नवी पिढी शेती व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघते. यामुळे या क्षेत्रात मोठी क्रांतिकारी बदल घडून आले. जैव तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम पिके घेऊ लागले आहेत. अशा प्रकारे उत्पादकता वाढीत नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यावरण अनुकूल अशा मापदंडांचा वापर केला जातो. या सगळ्यात आपली शेती खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली आहे. या सगळ्यात कृषी पर्यटन तसेच त्यावर आधारित आतिथ्य व्यवसायाकडे तितक्या गंभीरतेने पहिले गेले नाही. युरोपात कृषी अथवा ग्राम पर्यटन यांकडे अत्यंत व्यावसायिकतेने बघितले जाते. यामुळे तेथील शेतकऱ्यांना अथवा गावकऱ्यांना उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण झालेला दिसतो.

स्थानिक हस्तकला व्यवसाय तसेच कारागिरांना देखील यामूळे चांगले दिवस आले आहे. आपल्या जिल्ह्यात देखील कृषी अथवा ग्राम पर्यटनास मोठाच वाव आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन होते. पर्यटकांना द्राक्षाच्या हंगामात जर द्राक्ष खुडणीपासून ते पॅकिंगपर्यंत होणाऱ्या प्रक्रियेत सामील केले व तेथेच त्यांच्या निवासाची व जेवणाची सोय केली तर निश्चितच मोठ्या प्रमाणात पर्यटक याचा आनंद घेतील. सोबतच ग्रामीण जीवनाची ओळख होईल तसेच तेथील स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वाद देखील घेता येईल. यामुळे ग्रामीण भागात उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत निर्माण होईल. त्यासोबतच द्राक्षाची विक्री थेट ग्राहकास होईल. यामुळे शेतकरी आणि पर्यटक दोघांनाही याचा लाभ होईल.

येणाऱ्या पर्यटकांना शेतावरच शेतकऱ्यांनी आपल्या राहत्या घरातच जर चांगल्या निवासाची सोय करून दिली तर निश्चितच पर्यटक आनंदाने या गोष्टीचा स्वतःहून प्रसार करतील कालांतराने अशा प्रकारचे पर्यटन निश्चितच लोकप्रिय होईल. शेतकरी व शहरी भागातील लोकांमध्ये दृढ असे नाते निर्माण होईल. एखादा पर्यटक जेव्हा प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या घरी राहतो तेव्हा त्याला शेती सोबतच ग्रामीण भागातील जीवनमान, रूढी परंपरा या जवळून अनुभवता येतात.

नव्या पिढीला शेती व्यवसायाची ओळख होते. त्यात येणाऱ्या अडीअडचणी व त्याचबरोबर शेती पिकविण्यासाठी लागणाऱ्या कष्टांची देखील जाणीव होते. बहुतेक द्राक्ष उत्पादक शेतकरी हे शेतावरच राहतात व आर्थिक सुबत्तेमुळे बहुतेकांनी सर्व सोयींनी युक्त असे बंगले शेतावरच बांधलेले दिसतात. या राहत्या घरांमधीलच एखादी खोली जर पर्यटकांसाठी राखून ठेवली तर पर्यटक आनंदाने तेथे राहतील. द्राक्षासारखेच जिल्ह्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते. डाळिंबाच्या शेतीतून देखील ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता वाढलेली पाहायला मिळते. तिथे सुद्धा कृषी पर्यटनास मोठा वाव आहे. यातूनच ग्रामीण भागात तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांना (लोणचे, पापड इ.) देखील चांगली मागणी वाढू शकते.

जिल्ह्याचा आदिवासी भागात तर पर्यटकांना प्रचंड वाव आहे. आदिवासी किंवा डोंगराळ भागात पावसाळ्यात निसर्ग अगदी हिरवाईने नटलेला असतो. या काळात बरेच लोक या परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी फिरतात. त्यांना जर निवास व भोजनाची व्यवस्था त्या परिसरात करून दिली तर ते आनंदाने तेथे राहणे पसंत करतील. त्यामुळे तेथे राहणाऱ्या आदिवासींना उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण होईल. सोबतच शहरी लोकांनादेखील आदिवासी लोकांच्या जीवनमान जवळून अनुभवता येईल. या आदिवासी भागात अनेक लोककला तसेच नृत्य प्रकार आजही जतन केलेले दिसतात. या दुर्मिळ कलांचा पर्यटकांना देखील निश्चितच आस्वाद घेता येईल. डोंगराळ भागात पिकणाऱ्या स्थानिक वाणांचे भात, नाचणी, वरई आदींना देखील शहरी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे शहरी भागातील लोकांना याचा निश्चितच आस्वाद घेता येईल.

डोंगराळ भागात अनेक दुर्मिळ अशा वनौषधी तसेच पावसाळी भाज्यांची उपलब्धता असते. या गोष्टी जर आपण पर्यटकांपर्यंत पोहोचवू शकलो तर तेथील आदिवासींना निश्चितच चागले उत्पन्न मिळू शकते. आपल्याकडे विविध प्रकारच्या फुलांचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन होते पण आपण कधीही पर्यटकांनी ही फुले शेतावर येऊन पहावी असा कधीही प्रयत्न करत नाही. किंबहुना आपल्या देशातील लोक वेगवेगळ्या फुलांचा बहर अनुभवण्यासाठी देश विदेशात प्रवास करतात. या प्रकारच्या पर्यटकांना आपण जर इथल्या फुलांचा बहर अनुभवण्यास बोलावले तर आतिथ्याचे नवीन दालनच आपल्या समोर खुले होईल.

शेतावरची बैलगाडी, मोटेने पाणी ओढणारे बैल, चुलीवर भाकरी करणाऱ्या बायका, चौरंग पाटावर केलेले जेवण म्हणजे कृषी पर्यटन या जुनाट संकल्पनेवर आपण अडकलेले आहोत. गरज आहे ती इथे येणाऱ्या पर्यटकांना शेतीच्या नवीन पद्धती त्यावर आधारित उद्योग प्रक्रिया व सोबतच त्यांच्या आरामदायी निवासाची व्यवस्था या गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याची. यातूनच निश्चितपणे कृषी पर्यटन व ग्राम पर्यटन या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो.

(लेखक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपच्या जखमेवर मीठ!

$
0
0

मनसे करणार घरोघरी पाणीजागर; बचतीच्या संवादाआडून साधणार थेट निशाणा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत विविध विषयांवरून सत्ताधारी मनसेला खिंडीत पकडणाऱ्या भाजपला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील वाढीव पाणीकपात लागू केल्यानंतर भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी आता घरोघरी जावून पाणीबचतीचा जागर करणार आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतींसह पदाधिकारी व नगरसेवक पाणीबचतीच्या नावाखालीसाठी जनतेशी संवाद साधत भाजपचेही पानिपत करणार आहेत. त्यामुळे हा संवाद की भाजपचा दुष्प्रचार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाणीप्रश्नावरून महापालिकेत आता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला आहे. नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडल्याने भाजप विरोधात हा मुद्दा पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांपर्यंत तापत ठेवण्याचा चंग भाजप विरोधकांनी बांधला आहे. शहरात अगोदरच १५ टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता सोमवारपासून (दि. २२) पुन्हा विभागवार एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. या पाणीकपातीला भाजपचा पूर्ण विरोध होता. परंतु, सत्ताधाऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेत जनतेचे भविष्यात जास्त हाल नको म्हणून ही पाणीकपात सुरू केली आहे.

सत्ताधाऱ्यांनी एकीकडे पाणीकपात वाढवत दुसरीकडे पाणीबचतीबाबत आता थेट जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, गटनेते आणि नगरसेवक आता नागरिकांना पाण्याचा मोल समजावून सांगणार आहेत. सत्ताधारी थेट जनतेशी संवाद साधून पाण्याचा अपव्यव टालण्याचा सल्ला नागरिकांना देणार आहेत. मात्र, या संवादाआडून सत्ताधारी थेट भाजपवर निशाना साधणार आहे. भाजपने नाशिकचे पाणी पळविल्यानेच ही परिस्थिती आल्याची अप्रत्यक्ष जाणीवच सत्ताधारी मनसे जनतेला करून देणार आहे. त्यामुळे या प्रकाराने भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जाणार असून त्याचा भाजपला मोठा फटका बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेस्ट कंट्रोलसाठी स्थायी मुख्यमंत्र्याच्या दारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत वादग्रस्त ठरलेला पेस्ट कंट्रोलचा १९ कोटींचा ठेका फेटाळण्यासह अनुभवी ठेकेदाराला काम देण्याच्या मागणीसाठी स्थायी समितीने आता मुख्यमंत्र्याकडे अपील केले आहे. पेस्ट कंट्रोलसाठी नव्याने निविदा काढण्याची मागणी स्थायी समितीने केली असून त्यासाठी मुख्यमंत्र्याकडे भेट घेण्यासाठी वेळे देण्याची मागणी केली आहे. सोबतच सर्वसमत्तीने सरकारचा ठराव विखंडित करण्याच्या निर्णयाविरोधात सरकारकडेच अभिवेदन केले जाणार असल्याची माहिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिली आहे.

स्थायी समितीने प्रशासनाने ठेवलेला १९ कोटींचा पेस्ट कंट्रोलचा ठेका फेटाळून लावला होता. स्थायीचा हा प्रस्ताव फेटाळण्याचा ठराव प्रशासनाने सरकारकडे विखंडनासाठी पाठवला होता. सरकारने सुद्धा हा ठराव विखंडित केल्याने प्रशासनाचा निर्णय कायम ठेवला. त्यावरून प्रशासन विरुद्ध स्थायी समिती असा संघर्ष निर्माण झाला होता. आता स्थायी समितीने ठराव विखंडित करण्याच्या निर्णया विरोधात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीने सर्वसंमतीने सरकारकडे विखंडन ठरावाच्या विरोधात अभिवेदन करणार आहे. पेस्ट कंट्रोलसाठी शहरात अनुभवी ठेकेदाराची गरज असून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी समितीने केली आहे. त्यासाठी स्वतः स्थायी समिती मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडणार आहे. सोमवारी स्थायीने मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून बाजू मांडण्याला वेळ मिळावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पेस्ट कंट्रोलसाठी स्थायीने आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात बाजू मांडणारा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीवर मनसेचा दावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २९ फेब्रुवारी रोजी पूर्ण होत असून नव्या सदस्यांची निवड २६ फेब्रुवारीला केली जाणार आहे. पुढील वर्ष निवडणुकांचे असल्याने स्थायीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी मनसेने व्यूहरचना सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पॅटर्नची आठवण करून दिली आहे. त्यामुळे पुढील सभापती हा मनसेचाच होणार हे निश्चित असून भाजप शिवसेना काय भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूक असल्याने शेवटची संधी साधण्यासाठी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २९ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे २९ फेब्रुवारीपूर्वी नव्या सदस्यांची निवड केली जाणार असून त्यासाठी नगरसेवकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या रंजना भानसी, कुणाल वाघ, आरपीआयच्या ललिता भालेराव, अपक्ष गटाच्या रशीदा शेख, काँग्रेसचे राहुल दिवे, मनसेच्या सुरेखा भोसले, शिवसेनेचे शैलेश ढगे, शोभा फडोळ अशी निवृत्त सदस्यांची नावे आहेत. त्यामुळे या रिकाम्या होणाऱ्या जागांसाठी नगरसेवकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या आठ सदस्यांसह सर्वांना संधी या उद्देशाने उर्वरित सदस्यांचेही राजीनामे घेण्याचा विचार पक्षांतर्फे सुरू आहे. त्यामुळे जवळपास १५ सदस्य स्थायीमध्ये नव्याने येवू शकतात.

सदस्यांच्या निवडीसह स्थायी समितीचे सभापती महाआघाडीत कोणाला जाणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वेळेस मनसेने राष्ट्रवादीला सभापती पद दिले होते. तर काँग्रेसने यापूर्वीच पद भूषविले आहे. अपक्षांना उपमहापौर पदाची संधी दिल्याने सभापतीपदावर आता मनसेनेच दावा सांगितला आहे. पुणे महापालिकेत मनसे राष्ट्रवादीला मदत देणार असून त्याबदल्यात नाशिकमध्ये राष्ट्रवादी मनसेला पाठिंबा करण्याचा पुणे पॅटर्न अगोदरच निश्चित झाला आहे. त्यामुळे सभापतीपद यावेळी मनसेला मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. आठ सदस्यांच्या निवडीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला महासभेची विशेष सभा होणार आहे. त्यात नव्या आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतरच स्थायीच्या सभापतीची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.


गुरुवारऐवजी शुक्रवारी बजेट

महापालिकेचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आता गुरुवारी ऐवजी शुक्रवारी (दि. २६) सादर केले जाणार आहे. स्थायी समितीच्या सभेत सकाळी ११ वाजता पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सादर होणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यामुळे बजेटवर मंथन करण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी मॅरॅथान बैठक घेतली. निवडणुकीचे वर्ष असल्याने मनसेतर्फे अनेक योजनांचा भडीमार केला जाणार आहे. त्यामुळे बजेट सादर करतांना आयुक्तांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाऊसाहेब हिरे पॅनलचे वर्चस्व

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागले असून, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पॅनलला बहुमत मिळविण्यास अपयश आले आहे. भाऊसाहेब हिरे पॅनलने सर्वाधिक नऊ जागा ‌जिंकल्या. मात्र, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सत्तेचा दहा हा जादुई आकडा कोणालाही गाठता न आल्याने सत्तास्थापनेत प्रसाद हिरे किंगमेकर ठरू शकतात.

एकूण १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या बाजार समितीवर भाजप आणि हिरे समर्थकांनी बाजी मारीत सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेच्या शेतकरी पॅनलला ८ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र या तिरंगी लढतीत काँगेस-राष्ट्रवादीच्या बळीराजा पॅनलला केवळ एका जागेवर विजय मिळाला. पॅनलप्रमुख प्रसाद हिरे हे विजयी झाले आहेत.

एकूण १८ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. यात सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांचे शिवसेनचे शेतकरी पॅनल, भाजप नेते अद्वय हिरे यांचे भाऊसाहेब हिरे पॅनल आणि काँग्रेस नेते प्रसाद हिरे यांचे बळीराजा पॅनल अशी तिरंगी लढत होती. सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते या निवडणुकीत रिंगणात उतरल्याने निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली. एकूण ८५ कर्मचाऱ्यांनी मतमोजणी केली. मतमोजणीसाठी एकूण १० टेबल लावण्यात आले होते. प्रारंभी हमाल मापारी गटासाठी मतमोजणी करण्यात आली. यात पहिला विजयी निकाल सेनेच्या शेतकरी पॅनलचा लागल्याने सेनेच्या गोटात एकच आनंदाची लहर पसरली. वसंत कोर हे १६० मते मिळवून विजयी झाले. सोसायटी गटात भाजपने मुसंडी मारीत ११ पैकी ७ जागी तर सेनेला ३ जागी विजय मिळाला. मात्र या गटात बळीराजा पॅनलच्या प्रसाद हिरे यांनी देखील विजय मिळवल्याने समर्थकांचा जीवात जीव आला.

ग्रामपंचायत गटासाठी फेरमतमोजणी ग्रामपंचायत गटातील निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी पॅनलचे प्रमुख बंडूकाका बच्छाव यांच्यासह या गटातील त्यांचे उमेदवार अनिल बच्छाव तर हिरे पॅनलचे प्रभाकर शेवाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी बलसाने यांच्याकडे केली. या गटातील भाजपचे विजयी उमेदवार पुंजाराम धुमाल यांना ४६८ मते तर अनिल बचछाव यांना ४५७ मते मिळाली होती. प्रभाकर शेवाळे यांना ४२८ मते मिळाली होती. फेरमतमोजणी केली असता निकालात कोणताही बदल झाला नाही.

हिरे बंधूची भेट लक्षवेधी काँग्रेस नेते प्रसाद हिरे मतमोजणी केंद्रावर संपूर्ण दिवसभर ठाण मांडून होते. त्यांच्या बळीराजा पॅनलमधील केवळ त्यांचा एकमेव विजय झालेला असताना देखील ग्रामपंचायत गटात उमेदवार विजयी होतील, अशी आशा त्यांना व समर्थकांना होती. मात्र एकाच जागी विजय मिळवता आला तरी आपली भूमिका महत्वाची ठरेल हे त्यांना समजल्याने ते बसूनच होते. सर्वच निकाल हाती आल्यावर हिरे पॅनलचे प्रमुख अद्वय हिरे यांचे देखील आगमन झाले. दोन्ही हिरे बंधू एकाच जागी बसून चर्चा करू लागल्याने हिरे बंधूंची ही भेट लक्षवेधी ठरून सत्ता स्थापनेत प्रसाद हिरे यांना अद्वय हिरे सोबत घेणार का? याबाबत चर्चा रंगली.

तीनही पॅनलप्रमुखांचा विजय या निवडणुकीत सोसायटी गटात सर्वसाधारण वर्गातून शेतकरी पॅनलचे प्रमुख बंडूकाका बच्छाव, हिरे पॅनलच प्रमुख अद्वय हिरे तर बळीराजा पॅनलचे प्रसाद हिरे निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे या लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. या तीनही पॅनलप्रमुखांनी निवडणुकीत विजय मिळवला असून प्रतिष्ठा कायम राखली आहे.

एकूण जागा व पॅनलला मिळालेल्या जागा कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल (भाजप) - ९ शेतकरी विकास पॅनल (शिवसेना) - ८ बळीराजा पॅनल (काँग्रेस-राष्ट्रवादी) - १

विजयी उमेदवार सोसायटी गट : अव्दय हिरे (८३३), प्रकाश हिरे (७४३), बंडूकाका बच्छाव (५९९), गोरख पवार (५४९), गोविंद खैरनार (५३९), अमोल शिंदे (५२८), राजेंद्र जाधव (५१२). महिला राखीव- सुमन निकम (५९४), सोजाबाई पवार (६६०). इतर मागासवर्गीय - संजय निकम (६२३). विमुक्त जाती जमाती- राजाभाऊ खेमनार (६८५). ग्रामपंचायत गट : सर्वसाधारण- संग्राम बच्छाव (४८३), पुंजाराम धुमाळ (४६८). अनु. जाती जमाती - बबिता कासवे (४७०). आर्थिब दुर्बल - सुशील देवरे (४६८). व्यापारी गट : संजय घोडके (३६५), शेख फकिरा शेख सादीक (२९५). हमाल मापारी गट : वसंत कोर (१६०).

गट व पॅनलला मिळालेल्या जागा गट - शेतकरी - हिरे - बळीराजा सोसायटी - ३ - ७ - १ ग्रामपंचायत - २ - २ - ० व्यापारी - २ - ० - ० हमाल मापारी - १ - ० - ० एकूण जागा - ८ - ९ - १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमराणे बाजार समितीवर कर्मवीर पॅनलची सत्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

उमराणे बाजार समितीच्या एकूण १८ पैकी १६ जागा पटकावत कर्मवीर ज्ञानदेव दादा देवरे पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

येथील जि. प. शाळेत मतमोजणी प्रक्रिया झाली. मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके, एन. डी. पाटील, उपाधीक्षक आर. एस. अग्रवाल व कर्मचारी यांनी काम पहिले. एकूण २० कर्मचारी व १० टेबल मतमोजणीसाठी होते. एकूण १८ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात होते. विलास देवरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर पॅनल व जि.प. सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनल यांच्यात चुरशीची लढत होती.

सर्वप्रथम हमाल व मापारी गटासाठी मतमोजणी झाली. कर्मवीर पॅनलचे उमेदवार नथा देवरे यांनी ६६ मते मिळवित विजयाचे खाते उघडले. व्यापारी गटात संजय देवरे यांनी १६५ मते तर प्रवीण बाफणा यांनी १५४ मते मिळवित विजय मिळवला. ग्रामपंचायत गटात संजय अहिरे (४३ मते), सरला खैरनार (४१ मते), सुंदराबाई झारोळे (४४ मते) रामराव ठाकरे (४२ मते) हे विजयी झाले. तसेच, ११ जागा असलेल्या सोसायटी गटात विश्वासनाथ बस्ते (५१ मते), मिलिंद शेवाळे (५३ मते), विजया खैरनार (५२ मते), शोभा अहिरे (५१ मते), विलास देवरे (५४ मते), राजेंद्र देवरे (५४ मते), शेतकरी पॅनल नेते प्रशांत देवरे (५४ मते), शिवाजी ठाकरे (५३ मते), हिरामण खैरनार (५२ मते), महेंद्र आहिरे (५२ मते), बाळासाहेब आहिरे (५१ मते) यांनी विजय मिळवला. शेतकरी पॅनलचे प्रशांत देवरे व शोभा अहिरे हे दोनच उमेदवार विजयी झाले. यावेळी कर्मवीर पॅनलच्या विजयी उमेदवररांनी गुलाल उधळीत जल्लोष केला.

प्रत्येक गटासाठी चुरस उमराणे बाजार समितसाठी सुमारे ९९ टक्के मतदान झाले होते. यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. यात सोसायटी गटातून ११ जागा आहेत. सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागास वर्गीय १, विमुक्त जाती/भटक्या जमाती १, ग्रामपंचायत गटात ४ जागा असून, सर्वसाधारण २, अनु.जाती/जमाती १, आर्थिक दुर्बल घटक १, व्यापारी गटात २ जागा असून, हमाल मापारी गटात १ जागा याप्रमाणे विवरण करण्यात आले. यामुळे प्रत्येक गटासाठी चुरस वाढली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महत्त्वाची फाईल बाबूंच्या लेखी दुर्लक्षित

$
0
0

कलेक्टर आॅफिसमध्ये बेजबाबदारपणाचा कळस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परिस्थितीनुरूप सामान्यांसाठी जीव की प्राण ठरणारे विविध प्रकारचे दाखले सरकारी बाबूंच्या लेखी कसे कवडीमोल असतात याचा प्रत्यय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला. नागरिकांचे जातीचे, उत्पन्नाचे व तत्मस दाखले असणारी फाईल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अक्षरश: बेवारस अवस्थेत आढळली. असा महत्त्वपूर्ण दस्ताऐवज अत्यंत बेजबाबदारपणे सोडणाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.

सायंकाळी सहाची वेळ. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दगडी इमारती भोवतालचा परिसर. येथे पुरवठा कार्यालयासमोर एक डेरेदार झाड झाडाच्या पारावर सोमवारी सायंकाळी गुलाबी रंगांची एक फाईल बेवारस पडून होती. केवळ फाईल नाही तर कागदपत्रांनी गच्च भरलेला महत्त्वपूर्ण दस्तऐवजच तो. ये जा करणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेत ही फाईल स्पष्टपणे भरत होती. मात्र, त्याचवेळी पुरवठा कार्यालयाबाहेर गप्पा झोडत बसलेले शिपाई आणि अन्य कर्मचाऱ्यांना मात्र डोळ्यांसमोर असूनही ती दिसत नव्हती, हे विशेष.

सुटी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा येथे राबता होता. मात्र, प्रत्येकाने फाईलकडे दुर्लक्षच केले. कामानिमित्त आलेल्या काही सजग तरुणांचे लक्ष फाईलकडे गेले. ते फाईलजवळ घुटमळले. त्यांनी उत्सुकतेने ही फाईल उघडली. दाखल्यांसाठी नागरिकांनी केलेले अर्ज त्यात आढळले. जातीचे, उत्पन्नाचे व तत्सम दाखलेही फाईलमध्ये होते. ई सेवा केंद्राशी संबंधित कामकाजाची ही फाईल असल्याने या तरुणांनी ती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे सुपूर्त केली. खेडकर यांनी धन्यवाद देताना अशा गलथान कारभाराबाबत सेतू विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना फैलावर धरले. ही फाईल कोण ठेवून गेले याची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

ती फाईल एजंटची?

ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन दाखले मिळत असले तरी एजंट्सच्या माध्यमातून दाखले दिली जातात. अनेकदा या झाडाखाली बसून एजंट दाखल्यांची कामे घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या फाईलमध्ये जातीचे, उत्पन्नाचे दाखले होते. तसेच दाखले मिळावेत यासाठी कागदपत्रांसह जमा केलेले अर्जही होते. इंदिरानगर सेतू कार्यालय असा शिक्का या फाईलवर मारलेला होता. आतापर्यंत कुणाला दाखले दिले याची यादी संबंधितांच्या संपर्क क्रमांकासह होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६८ गावे पोलिस पाटलांविना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात अनेक महत्त्वाच्या व मोठ्या गावांमध्ये पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. सरकारी अनास्थेमुळे ही पदे भरली जात नसल्याचे वास्तव चित्र आहे. ही पदे लवकर भरल्यास तंटामुक्त गाव मोहिमेलाही वेग मिळू शकतो. गावात पोलिस पाटील नसल्याने पोलिसांच्याही अडचणी वाढत आहेत. तालुक्यात ६८ गावे पोलिसपाटलांविना असल्याने ही पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांनी केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील १२६ गावांपैकी ६८ गावांना गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस पाटील हे पद रिक्त आहे. तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये अनेक वर्षांपासून पोलिस पाटीलची पदे भरण्याकडे पोलिस व महसूल विभाग ठोस निर्णय घेत नसल्याने हे पद रद्दबादल झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इगतपुरी तालुक्यात जवळपास ६८ गावांत पोलिस पाटलांच्या रिक्त पदांचा परिणाम पोलिस प्रशासनासह महसूल यंत्रणेवरही होत आहे. खेडे गावातील गुन्हेगारी, घडामोडी, समाजकंटक, गुन्हेगार, नेत्यांचे दौरे, अनूचित घटना, धार्मिक कार्यक्रम, जयंती, सण, उत्सव, विविध घटनांची खबर, शेतीचे वादविवाद आदी काम पोलिस पाटील करीत असतात. पोलिस पाटील पद भरण्याचे काम महसूल प्रशासनाचे आहे.

या गावांमधील पदे रिक्त काळुस्ते कुऱ्हेगाव, खेड, अधरवड, बेलगाव तऱ्हाळे, बेलगाव कुऱ्हे, धामणी, पिंपळगाव घाडगा, घोटी खुर्द, साकूर, सांजेगाव, धारगाव, मुरंबी, कुशेगाव, कावनई, आहुर्ली, रायांबे, शेणीत, मालुंजे, वाघेरे, निनावी या महत्त्वाच्या व मोठ्या गावांसह टाकेद, आडवन, चिंचलेखैरे, बोरली, नांदगाव सदो, आवळखेड, तळेगाव, बलायदुरी, मानवेडे, पारदेवी, जामुंडे, कुरुंगवाडी, गावंडे, तारंगणपाडा, तळोशी, भरवज, दौडत, खैरगाव, वाकी, उभाडे, निरपन, डहाळेवाडी, शिदवाडी, औचितवाडी, ठाकूरवाडी, त्रिंगलवाडी, मायदरा, बारशिंगवे, अडसरे खु., अडसरे बु., टाकेद खु., गंभीरवाडी, परदेशवाडी, जानोरी, रामनगर, सोमज, मोगरे, शेनवड खु., भरवीर खु., भंडारदरावाडी, गडगडसांगवी, मोडाळे, बळवंतनगर, पिंपळगाव भटाटा, धारणोली, कुरणोली.

इगतपुरी तालुक्यात महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम व अन्य सेवेसाठी तसेच, महसूल व पोलिस प्रशासनाला सहकार्य मिळण्यासाठी पोलिस पाटील पदाच्या जागा भरणे गरजेचे आहे. त्यात सुशिक्षित पात्र व युवा वर्गाला त्यात प्राधान्य मिळावे. प्रशासनाने विकासाला गती येण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करावी. - पांडूरंग वारुंगसे, उपसभापती, पंचायत समिती, इगतपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इगतपुरीत उपनगराध्यक्षपदी चौधरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

इगतपुरी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अलका चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

इगतपुरी नगरपरिषदेच्या सभागृहात पीठासन अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. गेल्या पंचवीस वर्षांपासून आजपर्यंत इगतपुरी नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता आहे. रत्नमाला जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे उपनगराध्यक्षपद रिक्त झाले होते. निवडणुकीवेळी विरोधी फ्क्षाचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. त्याचप्रमाणे निर्धारीत वेळेत एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने पीठासन अधिकारी महेंद्र पवार यांनी अलका चौधरी यांना विजयी घोषित केले. शिवसेनेचे ११ नगरसेवक असून, राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक आहेत. शिवसेनेकडून एका वर्षासाठी एका नगरसेवकाला उपनगराध्यक्षपदाची संधी दिली जाते.

यावेळी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी अलका चौधरी यांचा सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक सतीष करपे, सुनील रोकडे, ज्ञानेश शिरोळे, शशी उबाळे, नईम खान, नगरसेविका नीलिमा सोनवणे, जनाबाई खातळे, रु‌ख्मिनी डावखर, संगीता वारघडे, मनसेचे तालुकाध्यक्ष भागीरथ मराडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न ऐरणीवर

$
0
0

म. टा, वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनला आहे. तब्बल आठ दिवसांनंतर होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर केळझर धरणातून सुमारे १७० क्युसेक पाणी सोडल्याने आठ दिवसाकरिता शहरवासीयांना दिलासा मिळणार असून, आठवडाभरानंतर मात्र पुन्हा पहिले पाढे पंच्चावन होणार आहेत.

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने गत महिन्याभरापासून सटाणा शहरातील काही भागात सात ते काही ठिकाणी दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील केळझर या मध्यम लघु प्रकल्पातील २९० दशलक्ष घनफूट पाण्यापैकी १७० क्युसेक पाणी सोडल्याने सटाणा शहरासह नदी किनाऱ्यावरील शेतीसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. डिसेंबर महिन्यातील पहिल्या आवर्तनानंतर सद्यस्थितीत दुसरे आवर्तन सोडण्यात आल्याने शहरवासीयांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. या धरणातील संपूर्ण पाणी पिण्यासाठी आरक्षित केल्याने तीन आवर्तनापैकी दोन आवर्तन सोडण्यात आल्याने आगामी काळात मार्च-एप्रिलमध्ये अखेरचे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर मे महिन्यात शहरवासीयांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. सुमारे १७० क्युसेस पाण्यापैकी १०० क्युसेस पाणी हे सिंचनाखाली येणाऱ्या ओलित क्षेत्रासाठी असून, ७० क्यूसेस पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईवर विहिरी अधिग्रहणाचा उतारा

$
0
0

गतवर्षाच्या तुलनेत तीनपट वाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ‌

दुष्काळाच्या झळा आणि ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन बारमाही पाणी असलेल्या गावोगावच्या विहिरी अधिग्रहित करीत आहे. गतवर्षी फेब्रुवारीपर्यंत अवघ्या चार विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र यंदा पाणीटंचाईच्या तीव्रतेमुळे आताच १२ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने अनेक धरणांचा घसा कोरडा पडू लागला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमधील रहिवाशांना पाण्यासाठी आतापासूनच वणवण करावी लागत आहे. मनमाड सारख्या नगरपालिका क्षेत्रात तर १८ ते २० दिवसांनंतर नागरी भागात पाणी पुरवठा केला जात असल्याची भीषण परिस्थिती आहे. सध्या बागलाण, नांदगाव, येवला, सिन्नर आणि मालेगाव तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठीही दोन तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. उन्हाची तीव्रता वाढेल तशी ही प‌रिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून जिल्हा प्रशासनाकडूनही उपाययोजनांचा अवलंब केला जाऊ लागला आहे. एकीकडे जिल्ह्यातील ५९ गावे आणि १०१ वाड्यांना ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना काही दुष्काळी गावांमध्ये विहिरी देखील अधिग्रहित करण्यात येत आहेत.

गावकऱ्यांची तहान भागवू शकेल आणि वेळ पडल्यास पंचक्रोषित टँकरद्वारे पाणी पुरवू शकेल अशा विहिरी अधिग्रहित करण्यास जिल्हा प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत प्रशासनाने १२ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक पाच विहिरी बागलाण तालुक्यामध्ये अधिग्रहित केल्या आहेत. त्यापैकी तीन विहिरी गावासाठी तर दोन विहिरी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मालेगावात एक विहीर गावासाठी तर एक टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. नांदगावात गावासाठी तीन तर येवल्यात दोन विहिरी अधिग्रहित केल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. देवळा, सिन्नरमध्ये गतवर्षी प्रत्येकी एक विहीर अधिग्रहित जिल्ह्यात गावासाठी एकूण नऊ तर टँकरसाठी तीन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात सुमनबाई सोनवणे बिन‌विरोध

$
0
0

म. टा, वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषेदच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुमनबाई दगा सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सटाणा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष ज्योती रत्नाकर सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी सटाणा नगरपरिषदेच्या सभागृहात नगरसेवकांची विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सुमनबाई दगा सोनवणे व भारत काटके तिघे इच्छुक होते. अखेर पक्षीय नगरसेवकांच्या आणि पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या वेळेत नगरसेवक राजेंद्र सोनवणे व सुमनबाई सोनवणे यांनी अर्ज दाखल केले. माघारीपूर्वीच्या वेळेत नाट्यमय घडामोडी होत राजेंद्र सोनवणे यांनी माघार घेतल्याने सुमनबाई सोनवणे यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला. उनगराध्यक्षपदी सुमनबाई सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पोतदार यांनी घोषित केले.

नूतन उपनगराध्यक्ष सोनवणे यांचा सत्कार नगराध्यक्ष सुलोचना चव्हाणा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे, सनपाचे राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते काका रौंदळ, नगरसेवक ज्योती सोनवणे, सुमन सोनवणे, नलिनी सोनवणे, सुशीला रौंदळ, उज्वला सोनवणे, मंदाकिनी सोनवणे, भारत काटके, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगाव जिल्ह्यात टँकरग्रस्त गावे २० वर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

जिल्ह्यात तापमान वाढू लागताच पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून, जामनेर तालुक्यात दोन नवीन टँकर सुरू करण्यात आले आहेत, तर पारोळा तालुक्यातूनही दोन टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. जिल्ह्यात एकूण २० गावांना टँकर सुरू करण्यात आले असून, ८३ गावांत ८३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्याचे तापमान ३७ अंशांवर गेले असून, यापुढे ते वाढतच जाण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची धगही तीव्र होत असून, टँकरची मागणी वाढली आहे. आतापर्यंत १८ गावांना ११ टँकर सुरू होते. यात आता जामनेर तालुक्यातील वडगाव आणि वडगाव तिघ्रे या दोन गावांची भर पडली असून, त्यांना दोन टँकर सुरू करण्यात आले आहेत. या तालुक्यातील टँकरग्रस्त गावांची संख्या आठवर येऊन ठेपली आहे. याशिवाय सध्या पारोळा तालुक्यात सहा गावांना तीन टँकर सुरू असून, चहुतरे आणि टिटवीतांडा या दोन गावांना टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव आला आहे.

दीड कोटीचा खर्च दरम्यान, टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात १५१ गावांत ३३९ विंधन विहिरी, तर ३ गावांत ३ कूपनलिका घेण्यात आल्या आहेत. त्यावर १ कोटी ६६ लाख रुपये खर्च करण्यात आला. २३ गावांत ८ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, ८३ गावांत ८३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती सोमवारी प्रशासनाने दिली.

टँकरची स्थिती जळगाव तालुका ः १ गाव , १ टँकर जामनेर तालुका ः ८ गावे ६ टँकर अमळनेर तालुका ः ५ गावे ३ टँकर पारोळा तालुका ः ६ गावे ३ टँकर एकूण ः २० गावे १३ टँकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड पालिकेवर प्रवीण नाईक निश्चित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मैमुना तांबोळी यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिल्याने मनमाड पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रवीण ऊर्फ पिंटू नाईक यांची निवड निश्चित मानली जात आहे. नगराध्यक्षपद सेनेला मिळणर असल्याने आनंद व्यक्त केला.

प्रवीण नाईक हे मुक्तांगण परिसरातून गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत असून, त्यांची निवड झाल्याने मुक्तांगण परिसरात जल्लोष करण्यात आला. मनमाड शहरात हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर प्रवीण नाईक यांनी उभारले असून, त्यांच्या या मं‌दिर

निर्मितीवर यापूर्वी बरीच चर्चा झाली आहे. येत्या उन्हाळ्यात मनमाड शहरात पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे असून, नवे नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांच्यासमोर पाणीटंचाई दूर करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. शिवसेना नेत्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीवायएसपी हरी मोरेंना गुणवत्ता सेवापदक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस विभागातील पोलिस उपअधीक्षक हरी मोरे (सेवानिवृत्त) यांना सोमवारी गुणवत्तापूर्ण सेवेबाबत राज्यपालांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आले. हरी मोरे हे सन १९८३ च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत.

मोरे यांनी पोलिस खात्यात ३१ वर्षे सेवा केली. या दरम्यान त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे व बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विविध पदांवर कर्तव्य बजावले. या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना २६ जानेवारी २०१४ रोजी राष्ट्रपतींनी पोलिस पदक जाहीर केले होते. सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले. हा सोहळा मुंबईतील राजभवन येथे पार पडला. मोरे यांना यापूर्वी पोलिस महासंचालक यांचे देखील पदक प्राप्त आहे. मूळ सिन्नर येथील रहिवाशी असलेले मोरे हे ३१ मे २०१४ रोजी निवृत्त झाले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टमुळे दिवसभर चर्चेचे गुऱ्हाळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या विरोधात भाजपमध्ये खदखद आहे. ती वेळोवेळी येनकेन प्रकारे व्यक्त होत असते. त्यामुळे कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ फेसबुक, व्हॉट्सअॅपवर आततायीपणा करतात. त्यामुळे ते कधी गोत्यात येतात, तर कधी चर्चेत. जळगावचे भाजपचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी अशाच एका फेसबुकवरील पोस्टमुळे वादात सापडले आहेत. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ टाकलेल्या एका छायाचित्रात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या सेवेत असल्याचे दर्शविले आहे. यामुळे जिल्ह्यात दिवसभर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. अनेकांनी या पोस्टवर टीका केली आहे.

पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ लाडवंजारी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट टाकत असतात. मात्र, सोमवारी त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ एक फोटो अपलोड केलेला पाहायला मिळाला. या फोटोत पंकजा मुंडे सिंहासनावर विराजमान आहेत, तर त्यांच्या दिमतीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे असलेले दाखवले आहे. या दोघांनाही त्यांनी बंदूकधारी बॉडीगार्डच्या वेशात उभे केलेले दाखवले आहे. या फोटोवर 'असं पाहिजे आपल्याला' असे नमूद केलेले आहे. या फोटोमुळे मात्र लाडवंजारी गोत्यात आले असून, दिवसभर यावर चर्चा रंगली होती.

सध्या फेसुबकवरून पालकमंत्री एकनाथ खडसे यांना धमकी दिल्यावरून दोन तरुणांवर गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असताना अशा प्रकारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनच त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांची खिल्ली उडवत असल्याने हा मुद्दा दिवसभर चर्चेत राहिला होता. अनेकांच्या टीकेचेही लक्ष्य झाल्याने लाडवंजारी यांनी अखेर ही पोस्ट फेसबुक पेजवरून डीलीट केली.

'माझ्याविरुद्ध षडयंत्र' फेसबुकवर मी कुठलीही पोस्ट टाकलेली नाही. माझे अकौंट ब्लॉक करून कुणी तरी फेक अकौंट तयार करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अशा पद्धतीचा प्रकार मी करणार नाही, याची त्यांना खात्री आहे. हा प्रकार मला दुपारी समजला. तेव्हा मी बाहेरगावी होतो. जळगावात आल्यावर मी पालकमंत्री खडसे यांच्यासह व‌रिष्ठ पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर पोलिस अधीक्षकांना अर्ज देऊन या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असा खुलासा लाडवंजारी यांनी 'मटा'शी बोलताना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईतही ५८,१६७ एकरांत कांदा लागवड

$
0
0

दीपक महाजन, कळवण

कळवण कृषी उपविभागात येणाऱ्या कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यात यंदा सर्वाधिक कांदा लागवड झाली आहे. सुमारे ५८ हजार १६७ एकर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. मात्र पाणीटंचाईची झळ बसत असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. पुरेशी वीज व पाण्याचा मारा मिळाला तर बळीराजाला ऐन मंदीतही आर्थिक कुरण सापडेल.

संपूर्ण देशभरात सरासरी १२ टक्के पोळ व १८ टक्के रांगडा कांदा लागवड होत असते. कळवण, देवळा तालुक्यात ऊस, गहू व डाळिंब या पिकाला महत्त्व होते. मात्र, या तिन्ही पिकांबाबत शेतकरी वर्गाने नैसर्गिक उपलब्धी पाहता दुर्लक्ष केले. यंदा कांद्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते. त्यातच नोव्हेंबरमध्ये पाऊसामुळे थोडी पाण्याची पातळी वाढल्याचाही त्यावर परिणाम झाला. कांदा उत्पादनासाठी लागणारी मजुरी (मक्ता) वाढलेली आहे. निर्यातमूल्य शून्य केलेले असल्याने हे मूल्य पूर्ण उन्हाळी कांदा बाजारात विकला जातो तोपर्यंत राहिल्यास व शासनाने कांदा निर्याती संदर्भात सकारात्मक पावले उचलल्यास शेतकऱ्यांना कांदा पिकाला योग्य भाव मिळेल. अर्थात उत्पादनावर आधारित असा किमान २५०० रुपये भाव मिळाला तरच शेतकरी वर्गाच्या हाती दोन पैसे लागतील.

सध्या पाण्याचे रोटेशन तीन आठवड्याचे करणे गरजेचे आहे. चणकापूर उजव्या कालव्यातून जाणारे पाणी सुरू राहिले तरच उन्हाळी कांदा जिवंत राहील, अन्यथा शेवटचे दोन पाणी कमी पडल्यास उत्पादनात घट निर्माण होऊन मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कांदा चाळीसाठी शासनाकडून प्रतिटन ३५०० रुपये सबसिडी दिली जाते. त्याची कमाल मर्यादा २५ मेट्रिक टनापर्यंत आहे. या योजनेचा लाभ शेतकरी वर्गाला घेता येऊ शकतो.

रब्बी (उन्हाळी) कांदा लागवड कळवण ८७२० हेक्टर देवळा १५९८७ हेक्टर दिंडोरी ७१६ हेक्टर सुरगाणा ९५ हेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कांद्याला दोन हजा रुपये भाव द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कांद्याचा भाव वाढला की सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. परंतु, भाव कोसळले की शेतकऱ्यांसाठी कुणीही रस्त्यावर उतरत नसल्याचा स्वाभिमान शेतकरी संघटनेने निषेध नोंदविला. कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांबाबतचे निवेदन दिले. शेतपिकांना उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, बाजार हस्तक्षेप योजना लागू करून सरकारने कांद्याची खरेदी करावी, कांद्याला किमान प्रती क्विंटल दोन हजार रुपये भाव मिळावा, प्रस्तावित कांदा चाळीचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित मिळावे, मोसम, गिरणा व आरम नदीवर केटीवेअर बंधारे बांधावेत, डाळिंब उत्पादकांना दुष्काळाचे पॅकेज त्वरित मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष दीपक पगार, गोविंद पगार, हंसराज वडघुले, रतन मटाले, श्रावण देवरे, रवींद्र शेवाळे, रवींद्र पगार, नितीन रोटे आदींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटी मार्चमध्ये?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत बी. एड., एम.एड., बी.पी.एड., एम.पी.एड. व विधी पदवी २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचा (सीईटी) अभ्यासक्रम व प्रवेशपूर्व परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संकेतस्‍थळावर प्रसिद्ध केले आहे. ही परीक्षा मार्च ते ऑगस्ट २०१६ दरम्यान होईल, अशी शक्यता आहे.

वेळापत्रकात १२ व १३ मार्च एमबीए, एमएमएस, पीजीडीएम, पीजीडीबीएम, तर २७ मार्चला एमसीए, एमएचटी सीईटीची ५ मे, तर एलएल. बी.ची २२ मे रोजी, तसेच बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजीची सीईटी २२ मे, तर बीएड, एमएड, मास्टर ऑफ आर्किटेक्चरची सीईटी २९ मेस होणार आहे. बीपीएड, एमपीएडमध्ये रिटर्न टेस्ट १२ जून, फिल्ड टेस्ट १५ जून आणि सुपर स्पेशालिटी मेडिकल कोर्सेसची सीईटी जूनमध्ये, तर पीजीपी, पीजीओ, पीजीएएसएलपी, एम.एस्सीसाठी ऑगस्ट २०१६ मध्ये सीईटी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावध ऐका टंचाईच्या हाका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मागील वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे पुण्यात एक दिवसाआड, औरंगाबादमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. तर नाशिक जिल्ह्यातही आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात होत आहे. राज्यातील या महत्त्वांच्या शहरांमध्ये पाणीसंकट घोंघावत असताना, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मात्र पाण्याची चंगळ सुरू आहे. नाशिकमध्ये एप्र‌लिपासून कडाक्याचा उन्हाळा सुरू झाल्यानंतर शहरात पाण्याची आबाळ होण्याची शक्यता आहे. तर राज्याला मार्चमध्येच पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. नाशिकनेही पाणी कपातीचे धोरण स्व‌किारले असून, पाणी बचतीसाठी लोकप्रतिनिधी व पालिका सरसावले आहेत.

नाशकात जलसंकट

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहात सध्या २६६२ दशलक्ष घनफूट (३५ टक्के) पाणीसाठा आहे. हा उपलब्ध साठा आणि ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवठ्याचे गणित जुळत नसून, महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरु केली आहे. सोमवारपासून (२२ फेब्रुवारी) ही कपात सुरु होताच शहरात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. सातपूर, सिडकोसह शहराच्या अन्य भागातील नागरिकांना सोमवारी पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे. विशेष म्हणजे, आरक्षित पाणीसाठा लक्षात घेता १५ दिवसांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे नाशिक शहरात येत्या काळात आणखी पाणी कपात होण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्ह्यातील ७ मोठे आणि १६ मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या १३,८४३ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. ही टक्केवारी अवघे २१ एवढीच आहे. मनमाड शहरात तब्बल २१ दिवसाआड, नांदगावला १५ दिवसाआड, येवल्यामध्ये दर १२ दिवसाआड, सटाणा शहरात १० दिवसाआड, मालेगाव शहरात ३ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच अशी परिस्थिती असल्याने येत्या काही महिन्यात पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करण्याची चिन्हे आहेत.

मुंबईतही पाणीकपात

पाणीकपात वगळता मुंबईच्या सव्वाकोटी लोकसंख्येसाठी रोज ३,७५० एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वर्षभर पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे सध्या ३,२०० एमएलडी पुरवठा केला जातो. पाणीटंचाईमुळे महापालिकेने घरगुती वापरात २० टक्के, तर व्यावसायिक वापरासाठी ५० टक्के पाणीकपात केली आहे. अपुऱ्या पाण्यामुळे पालिकेने तरणतलावांचा पाणी खंडित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images