Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भाषेतला डिजिटल बदल

$
0
0

Blackberry, PDA, iPOD, MP3 डिजिटल युगाच्या या काळात हे शब्द जुने वाटावे इतक्या वेगाने तरुणांचे जगणे बदलतेय. what's app च्या हातात हात घालून पुढे जाणारे snapchat, android कडून IOS (i-फोन operating system) बद्दल वाटणारे आकर्षण. APPLE कॉम्प्यूटरला आवर्जून MAC म्हणून संबोधणे. पेन ड्राईव्ह आता जरा बाजूला पडला. I cloud हा त्यासाठी वापरला गेलेला शब्द. video calling हे म्हणणे थोडे गावंढळ. आता फेस टाईम किंवा skype ची आलेली भाषा. बाकी बोलणे तर कधीच कात टाकून बसलेय. जन्मजात शिशूचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकला की त्याखाली शो... श्वीट किंवा आपल्याच मैत्रिणींना बेब इज अ हॉटी असे लिहिणे, दिवसातून एकदा तरी समथिंग कूल किंवा ऑसम, वाऊ.. म्हटल्याशिवाय मैत्रीला रंग न भरणे जुने झालेय. दिवसागणिक त्यात नवनव्या शब्दांची भर पडत जाते. फिल्मफेअर award सारख्या कार्यक्रमात आलिया भट शाहरुख खानला ठणकावून सांगते, या पिढीची भाषा तुला येत नाही, ही भाषा तुझ्या ओळखीची नाही, तू आता निवृत्त झालेले बरे.. हे ही सहजसहज अगदी गमतीत चाललेले असते. पण त्यापाठीमागे जनरेशन एखाद दीड वर्षात बदलू पाहतेय हे लक्षात येते.

आता कॉम्प्यूटरला टेक्नोलॉजी म्हणणे हास्यास्पद झाले आहे. टीव्ही देखील हलकेच बाजूला झाला आणि त्याची जागा इंटरनेटने घेऊन टाकली. ज्याला वास्तव समजतो त्यातही लक्षणीय बदल दिसतो. एखादा गरीब घरातला मुलगा मित्रांबरोबर हॉटेलमध्ये जेवायला गेला तरी तेथे तो, अन्न बऱ्यापैकी टाकून देताना दिसतो. चाटून पुसून ताट साफ केले पाहिजे असे घरात शिकलेला तो, बाहेर गेला की ताटात काही पदार्थ तसेच ठेवतो. आपण फार भुकेलो आहोत असे वाटता कामा नये. हे तो शिकलेला असतो. खाल्ल्यासारखे करणे ही एक वेगळीच स्टाइल. भवताल बदलला म्हणजे नेमके काय झाले. याची आपापली उत्तरे या तरुणांनी शोधली आहेत.

तुम्हाला काय माहित आहे असा प्रश्न या पिढीला न आवडणारा. कुठल्यातरी लढाया किंवा पक्षीय विचारसरणी पाठ करण्यापेक्षा कृतीवर भर असणारे सर्व काही त्यांना करायला आवडते. आपण अभ्यासक्रमात जे शिकतो त्याबद्दल दिवसरात्र कोणी तरी आपली परीक्षा घ्यावी असे त्यांना अजिबातच वाटत नाही. to know पेक्षा to do वर त्यांचा विश्वास. त्यामुळेच मोबाइल चालत नाही, त्याचे अमुक एक फंक्शन बंद आहे अशी वाक्ये कोणत्याही ग्रुपमध्ये ऐकू येणार नाहीत. त्यांना ते नीट करता येते. हे करणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. कोणतेही इव्हेंट असेल तर साऊंड सिस्टीम कोणताही तरुण सहज हाताळू शकतो. त्याला या गोष्टी शिकायला आवडतात. multitasking is a way of life हे त्याचे आग्रहाचे सांगणे असते. त्याला टू व्हीलर घेऊन दिली की फार कमी वेळेस तो दुरुस्तीसाठी गाडी घेऊन जाताना दिसतो. त्याला त्यातील प्रत्येक पार्ट माहित असतो, त्या पार्टची जागा माहित असते. तो केवळ ऐकीव माहितीवर कोणत्याही यंत्रावर अवलंबून नसतो. त्याला laptop आणला, तर त्याला वडिलांची फार कमी वेळेस मदत घ्यावी लागते आणि वडिलांनी स्वत:साठी laptop आणला तर त्यांना मात्र क्षणोक्षणी मुलाची मदत घ्यावी लागते. अर्थात आपण काही निराळे करतो याची जाणीव या तरुणांना करून द्यावीशी वाटत नाही. घरातल्या कोणाचा वाढदिवस असला तर घरच्या घरी एखादे कार्ड प्रिंटरवर ही तरुण मुले करून देतात, तेंव्हा हे काही न समजणाऱ्या अगोदरच्या पिढीला सुखद धक्का बसतो. त्यांचे हस्ताक्षर अजिबात चांगले नसते. स्क्रीनवर मात्र वेगाने त्यांची अक्षरे टाईप होतात. पानेच्या पाने ते उतरवतात, त्यातून ब्लॉग त्यांच्या जवळचा बनतो. तो कोणी वाचेल की नाही ही फिकीर नसते. तुझे लिहिणे, तुझी ही बकवास कोण वाचणार या थोरांच्या प्रश्नावर व्यक्त व्हायला त्यांना आवडत नाही. त्यांच्या प्रोफाईलवर त्यांची स्वत:ची अशी एक निराळीच ओळख असते. आपला मुलगा पोरीबाळीशी दिवसभर chat करत असतो अशी समजूत असणाऱ्या पालकांना हे माहित नसते की मुलाने त्याच्या स्टेटसवर "गर्ल्स attittude इज अंडर माय फूट" असे लिहून मुलगी या विषयाला हद्दपार केले असते.

फक्त मैत्रिणी या सर्वकाही असतात हा त्यांचा समज नसतोच मुळी. त्यांची अक्षरे तासनतास फिरत असतात. कारण त्यांना त्यांच्या जुन्या नव्या मित्रांपासून disconnected व्हायची भीती वाटते. ही असुरक्षितता नकोशी वाटते, कारण समोरची न पाहिलेली व्यक्ती आपण टाकलेली कॉमेंट, पोस्ट वाचते, जे अपलोड करतो त्याला ती दाद देते, हे कौतुक त्याला सर्वाधिक सुखावून टाकते. एकच वेळेस दहा, पंधरा, पन्नास जण आपण ज्या इमेजेस पाठवतोय त्याला लाईक करतात याचा आनंद इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक असतो. नाहीतरी घरात प्रत्येक कृतीला असे का, असे कशासाठी, जायलाच हवे का, करायलाच हवे का असे प्रश्न विचारून भंडावून सोडले जाते.

संक्षिप्त मजकूर आणि केवळ काही अक्षरातून, चिन्हातून व्यक्त होण्याची त्यांना सवय लागते. याचे कारण देखील इतरांशी connected राहिलेच पाहिजे ही तीव्र होत जाणारी भावना. त्याच्या मोबाइलवर तो फार कमी शब्दांचा वापर करतो, कारण त्याला प्रत्येक अक्षरांचे पैसे मोजावे लागतात. J/K म्हणजे just kidding, IMHO-In My Humble Opinion, LOL-Laughing Out Loud किंवा Lots of Love, NP-No Problem हे तो कायम वापरतो, तसे Thank youचे THx किंवा THKS यापेक्षा TLK लिहायला त्याला जास्त आवडते. TENDER LOVING CARE ने तो आपल्या भावना व्यक्त करतो. मोबाइल सतत संशयाने तपासणाऱ्या पालकांना या शब्दांचे अर्थ लागत नाहीत, एखाद्याला Wish You Were Here XOXO हे समजत नाही, X मध्ये दोन्ही हातांनी कवटाळण्याची कृती, O मध्ये होणारा ओठांचा चंबू, HUGS AND KISSES हा त्याचा अर्थ. तर LYLAS वाचून आपल्या मुलीचा चेहरा का उतरतो हे त्यांना कळत नाही, त्या आद्याक्षरांचा अर्थ Love You Like A Sister. भाषेबरोबर भवताल बदलतो, जे अटळ आहे. हा बदल स्वीकारावा लागणार हे नक्की.

(लेखिका साहित्यिक तसेच तरुणांच्या भावविश्वाच्या अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाडके क्रिकेट गुरू

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

आपल्या मुलाने सचिन तेंडूलकर सारखं क्रिकेट खेळावं झहीर खान सारखी बॉलिंग करावी अशी अनेक पालकांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी नाशिकच्या रमेश संवत्सरकरांनी आपल्या मुलांना क्रिकेट शिकवावे यासाठी बहुतांश पालक प्रयत्नशील असतात. वयाची ७६ वर्ष पूर्ण केलेला हा क्रिकेट गुरू रवींद्र विद्यालयात क्रिकेटचे धडे देण्याचे काम करतो आहे. वयाच्या ८० व्या वर्षाकडे वाटचाल सुरू असली तरी ३० वर्षांच्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह आजही वाखणण्यासारखा आहे.

रमेश संवत्सरकर हे इंदूर येथील महुचे रहिवासी. त्यानी आपले शालेय शिक्षण मध्यप्रदेश येथे पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. वडिलांना खेळात फारसा रस नसल्याने त्यांचा कायम खेळाला विरोध असायचा, मात्र संवत्सरकर यांचे काका उत्कृष्ठ क्रिकेटपटू असल्याने त्यांच्या खेळाचा प्रभाव नकळत त्यांच्यावर झाला. त्यानंतर संवत्सरकरांनी क्रिकेटची वाट चोखाळली. पुढे बारावी झाल्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि कोरबा येथील वीज केंद्रात कोल हॅन्डलिंग डिपार्टमेंटमध्ये नोकरीला सुरुवात केली. याचवेळी त्यांचा संपर्क रशियन लोकांशी आला. त्यामुळे रशियन भाषा थोडीफार समजू लागली. दरम्यान १९६४ मध्ये लँग्वेज ट्रान्सलेटर पदासाठी एचएएलची जाहिरात निघाली ती वाचून रमेश सरांनी तेथे अर्ज केला व १९६५ मध्ये ते एचएएलला रुजू झाले.

एचएएलमध्ये खेळाला पोषक असे वातावरण होते. तेथे क्रिकेटच्या मॅचेस होत असे, एकदा टीटीसी विरुध्द एचएएल अशी मॅच आयोजित करण्यात आली. त्यात रमेश सरांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला. हा परफॉर्मन्स पाहून तेथील क्रिकेटपटू दत्तू गोरे यांनी नाशिकला येऊन क्रिकेट खेळण्याची विनंती केली. यावेळी पोलिस परेड ग्राऊंड येथे क्रिकेटच्या मॅचेस होत असे. १९६५ मध्ये नाशिक बाबा इलेव्हन विरुद्ध नाशिक पोलिस अशी मॅच आयोजित केली होती. त्या मॅचसाठी रमेश संवत्सरकरांनी नाशिकच्या संघाकडून खेळावे असे दत्तू गोरे यांनी सुचविले. यावेळी नाशिक बाबा इलेव्हन संघात राजा शेळके, कमरुद्दीन, अख्तर, अन्वर, बाळ डोंगरे, बाळ फडतरे, रमेश वैद्य, दत्तू गोरे असे दिग्गज खेळाडू होते. त्यांच्यात रमेश संवत्सरकर यांचा समावेश झाला. या मॅचमध्ये रमेश संवत्सरकरांनी चांगली कामगिरी करीत ८१ धावा काढल्या. याच मॅचपासून ते नाशिककर खेळाडू झाले. येथे त्यांच्या क्रिकेटला आणखी चालना मिळाली. याच क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण भारतात त्यांनी आपला खेळ दाखवला. १९८४ मध्ये त्यांनी नाशिक संघाकडून शेवटची मॅच खेळली. त्यानंतर संवत्सरकरांनी कोचिंगला वाहून दिले.

रोज सकाळी सात वाजता ते रवींद्र विद्यालयाच्या ग्राऊंडवर हजर राहून मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या मुशीतून अनेक खेळाडू तयार झाले आहेत. सध्याच्या खेळाडूंपैकी मनिष पांडे, अभिषेक राऊत, राजु लेले, मुर्तजा ट्रंकवाला यांच्यासारख्या क्रिकेटपटूंनी प्रशिक्षण घेतले आहे. त्याच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. नाशिकच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट अॅकेडमीच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जास्तीत जास्त चांगले खेळाडू तयार करुन नाशिकचे नाव क्रिकेटच्या क्षेत्रात उंच ठेवायचे अशी आशा ते व्यक्त करतात. सध्या त्यांचे वय ७६ आहे. वयाच्या ८५ व्या वर्षापर्यंत तरी मी ग्राऊंड सोडत नाही असा आशावाद ते व्यक्त करतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश, राजस्थान येथील काही खेळाडू त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात असतात. क्रिकेट हा झटपट आत्मसात होणार खेळ नाही त्याला सरावाबरोबरच अभ्यासाची गरज आहे. खेळाडूंनी खेळात सातत्या राखावे निश्चिच यश पदरात पडेल असे ते सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव, उमराणेत ९८ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव बाजार समिती व उमराणे बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. दोन्ही बाजार समित्यांच्या प्रत्येकी १८ जागांसाठी निवडणूक झाली. मालेगाब बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान झाले, तर उमराणेतही ९९ टक्के मतदान झाले. आज (दि. २२) सकाळी आठ वाजेपासून येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागातील आठ अशा नऊ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. उमराणे येथे देखील चार मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळी थंड प्रतिसाद होता. दुपारनंतर मतदारांचा प्रतिसाद वाढत गेला. सर्वच केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात आणि ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच पॅनल प्रमुख, उमेदवार आणि समर्थकांची गर्दी झाली होती.

राज्यमंत्री दादा भुसे, अद्वय हिरे व प्रसाद हिरे यांनी स्वतः सर्वच मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेनेच्या पॅनलची धुरा राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांभाळली, तर भाजपच्या हिरे पॅनलकडून अद्वय हिरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळीराजा पॅनलकडून प्रसाद हिरे स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मालेगाव आणि उमराणे बाजार समितीसाठी मतदान शांततेत पार पडल्यानंतर आता मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. मालेगाव बाजार समितीची मतमोजणी सकाळी आठपासून येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात होणार आहे. उमराणे येथील जि.प. शाळेतच मतमोजणी होणार आहे.

उमराणे बाजार समिती मतदान गट - एकूण मतदार - झालेले मतदान सोसायटी - १०० - १०० ग्रामपंचायत - ८० - ८० हमाल मापारी - १२९ - १२९ व्यापारी - २५८ - २५१ एकूण - ५६७ - ५६० - मालेगाव बाजार समिती मतदान गट - एकूण मतदार - झालेले मतदान सोसायटी १५४८ - १५४६ ग्रामपंचायत - ११९१ - ११८७ हमाल मापारी - ३०३ - ३०१ व्यापारी - ६९३ - ६६८ एकूण - ३७३५ - ३७०२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव मर्चंटसाठी ८६.२२ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत येथील पिंपळगाव मर्चंट बँकेसाठी विक्रमी ८६.२२ टक्के मतदान झाले. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत ५४३० मतदारांपैकी ४७९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज, सोमवारी सकाळी आठ वाजता येथील चिंचखेड गेटवरील सौभाग्य मंगलकार्यालयात मतमोजणीस प्रारंभ होईल.

पिंपळगाव मर्चंट बँकेसाठी नाशिक व पिंपळगाव ‌हे दोन मतदान केंद्र होते. पिंपळगाव बसवंत येथील मतदान केंद्रावर ४३२६ पैकी ३६८८ मतदारांनी मतदान केले. नाशिक येथे १३२३ पैकी ११०४ मतदारांनी मतदान केले. किरकोळ कुरबुरी वगळता शांततेत मतदान झाले. अशोक शहा, सुमतीलाल सुराणा, सोहनलाल भंडारी, विजय बाफणा, व्दारकानाथ मुंदडा, प्रकाश देशमुख, राजेंद्र बाविस्कर, राजेद्र छाजेड आदी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

अशोक शहा यांचे उत्कर्ष पॅनल तर सुमतीलाल सुराणा यांचे परिवर्तन पॅनल अशी सरळ लढत आहे. गत आठ दिवसांपासून दोन्ही पॅनलने प्रचाराचा धुराळा उडवला होता. दोन्ही पॅनलकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या पेन्शन योजनेसाठी धरणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी येवल्यातील पेन्शन बचाव कृती समितीच्या वतीने येवला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार शरद मंडलिक यांना निवेदन देण्यात आले.

सन १९८२ च्या पेन्शन कायद्यानुसार शासकीय व निमशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना देत असलेली जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, यासाठी आता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क समितीच्या वतीने तीव्र लढा सुरू केला आहे. राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर राज्य सरकारच्या सेवेत लागलेल्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू केलेली आहे. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना त्याच्या पश्चात उदरनिर्वाह करण्यासाठीची कुठलीही तरतूद अंशदायी पेन्शन योजनेत नाही. भविष्य निर्वाह निधीतील रक्कम नवीन योजनेत काढता येत नाही. या अंशदायी पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याच्या

पगारातून १० टक्के रक्कम व शासन अनुदानातून १० टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा केली जाते. निवृत्तीवेतन दिले जाणार आहे, त्यामुळे या पेन्शन योजनेत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कुठलीही सुरक्षितता पुरविण्यात आलेली नाही, असे पेन्शन बचाव कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रा. एम. पी. गायकवाड, प्रा. विजय आरणे, प्रा. शरद पाडवी, अनिल आव्हाड, संदीप शिरसाठ, नीलेश वाघ, राहुल गांगुर्डे, प्रशांत बागूल, सचिन दुकळे, दिलीप जोंधळे आदींच्या सह्या आहेत.

मालेगावात हक्क संघटनेचे आंदोलन मालेगाव : अंशदायी निवृत्तीवेतन योजनेच्या विरोधात येथील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने अन्यायकारक अशा अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पेन्शन योजना लागू करून शासन शासकीय कर्मचारी वर्गात भेदभाव करीत आहे, असा आरोप संघटनेचे नीलेश नहिरे, शाम ठाकरे आदींनी यावेळी केला. दिवसभर धरणे आंदोलन केल्यानंतर सायंकाळी नायब तहसीलदार गिरीश वाखारे यांना मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी या धरणे आंदोलनात भास्कर पाटील, महेश पाटील, संदीप गलांडे, भाऊसाहेब कापडणीस, विशाल धीवरे, परेश बडगुजर, भूषण कदम, रत्ना काकळीज, दीप्ती पागरे, मदन नाथबाबा आदींसह शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, महसूल अशा विविध शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री समर्थ बँकेच्या सभासदांचा निरुत्साह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री समर्थ सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी २१ टक्के मतदान झाले. बँकेच्या सुमारे १२ हजार सभासदांपैकी जेमतेम अडीच हजार सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. विद्यमान सत्ताधारी समर्थ पॅनल आणि विरोधी श्री समर्थ पॅनलमध्ये दुरंगी लढत पहायला मिळाली. आज (दि.२२) नाशिक-पुणे रोडवरील समर्थ मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येऊन बँकेचे संचालक मंडळ स्पष्ट होणार आहे.

पुढील पाच वर्षासाठी बिनविरोध संचालकांची निवड होण्यासाठी काही घटक प्रयत्नशील होते. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांना काही सदस्यांना नव्या पॅनलची उभारणी करीत आव्हान उभे केल्याने निवडणूक झाली. रविवारी सकाळी टिळक पथ येथील सारडा कन्या विद्यालयात मतदानाला सुरुवात झाली. मात्र, मतदानासाठी सभासदांचा म्हणावा तितका उत्साह दिसून आला नाही. सुरूवातीस १५ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र इतर मागास प्रवर्ग गटातून डॉ. रवीकुमार निकम आणि भटक्या विमुक्त जमाती संवर्गातून जालिंदर ताडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित १३ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते.

समर्थ बँकेचे ११ हजार ८८१ सभासद आहेत. पैकी रविवारी २ हजार ५६२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. रविवारी निवडणुकीच्या नियोजनासाठी १५० कर्मचारी कार्यरत होते. आज (दि.२२) व्दारका परिसरातील समर्थ मंगल कार्यालयात मतमोजणी होऊन दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. या बँकेसाठी सर्वसाधारण गटातून दहा जागांसाठी समर्थ पॅनलच्या वतीने लक्ष्मण उगावकर, नरेंद्र कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, प्रमोद गर्गे, बाळकृष्ण कुलकर्णी, मनोज गोडसे, मकरंद सुखात्मे, अरूण भांड, डॉ. प्रशांत पुरंदरे, तर श्री समर्थ पॅनलच्या वतीने शंकर बर्वे, मंदार तगारे व मंगेश मालपाठक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महिला राखीव गटातील दोन जागांसाठी समर्थ पॅनलच्या वतीने अल्का मुकूंद कुलकर्णी व हेमा चिंतामण दशपुत्रे तर श्री समर्थ पॅनलच्या वतीने सविता हेमंत कुलकर्णी रिंगणात आहेत. अनुसूचित जाती संवर्गातून प्रकाश ठाकूर, तर श्री समर्थ पॅनलच्या वतीने लक्ष्मीकांत अंडे यांच्यात लढत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पराये यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिझनेस बँकेसाठी ५५.२४ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

गैरकारभारवरून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिकरोड बिझनेस बॅँकेच्या १९ जागांसाठी रविवारी (ता. २१) ५५.२४ टक्के मतदान झाले. बनावट आधारकार्डाच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन महिला व एका युवकाला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली. सहकार व आदर्श अशा दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. मतमोजणी आज, सोमवारी नाशिकरोडच्या म्हसोबा मंदिरामागील देशपांडे मंगल कार्यालयात सकाळी आठला सुरू होईल.

जागरुक सभासद सत्ताधाऱ्यांच्या हाती पुन्हा सत्ता देणार की परिवर्तन करुन इतिहास घडविणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. बँकेचे पाच हजार मतदार आहेत. सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी झाली होती. नंतर प्रतिसाद कमी झाला. दुपारी बारापर्यंत २५ टक्के, तर चारपर्यंत ५५.२४ टक्के मतदान झाले. मतदानासाठी तेरा बूथ लावण्यात आले होते. दुपारी तीनपर्यंत अंतिम निकाल लागेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चांगदेवराव पिंगळे यांनी दिली. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या सहकार्यामुळे मतदान शांततेत पार पडल्याचेही त्यांनी नमूद केले.

वसंतराव नगरकर, विजय संकलेचा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी सहकार पॅनलने विमान चिन्ह घेऊन प्रचार केला. तर निवृती चाफळकर आणि जीवन घिया यांच्या आदर्श पॅनलने रोडरोलर चिन्ह घेऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. दोन्ही पॅनलने आपलीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करीत विजयाचा दावा केला आहे. सत्ताधाऱ्यांचा कथित भ्रष्टाचार आणि गैरकारभार यावरून चाफळकर यांच्या आदर्श पॅनलने रणधुमाळी उडवली. तर सहकार पॅनेलनेही प्रगतीचा चढता आलेख मांडत सडेतोड उत्तर दिले. १८ वर्षांत प्रथमच चुरशीची निवडणूक झाली.


बोगस मतदानाचा प्रयत्न

मतदान कामासाठी शंभर कर्मचारी आणि २५ पोलिस नियुक्त करण्यात आले होते. दुपारी तीन महिला आणि एक युवकाने बनावट आधारकार्ड आणून मतदानाचा प्रयत्न केला. मात्र, मतदार यादीतील नाव व फोटो यात तफावत आढळली. लेखा परीक्षक नवनाथ बोडके यांच्या तक्रारीवरुन कमल प्रवीण काळे (२४), सीमा विजय बच्छाव (२६), रेणुका भूषण चव्हाण (४०, सर्व रा. सहवास नगर, कालिकामंदिरामागे) आणि गिरीष अशोक ललवानी (२४, हरिकुंज सोसायटी, वास्को चौक, नाशिकरोड) यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक करण्यात आली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतोष कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील शिवसेनेचे नगरसेवक संतोष कदम यांची पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून शिवसेनेतून हाकालपट्टी केली आहे. याबाबत त्र्यंबक पालिकेत उपनगराध्यक्ष असलेले संतोष कदम यांनी आपण शिवसैनिक असून, शिवसेनेतच राहणार असल्याचे म्हटले आहे.

संतोष कदम हे त्र्यंबक पालिकेत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले एकमेव सदस्य आहेत. त्यांचीच हकालपट्टी झाल्याने याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये नगराध्यक्ष निवडणुकीच्या घडामोडीनंतर आता त्याचे पडसाद उमटले आहेत. अर्थात या घडोमोडीचे बिज जून २०१५ मध्ये नगराध्यक्ष निवडणुकीत रोवले होते. संतोष कदम हे सत्तारूढ गटाच्या सोबत असल्याने त्यांनी पालकमंत्री महाजन यांच्या म्हणजेच भाजपच्या गटाच्या बाजूने मतदान केले होते. याची दखल शिवसेना नगरसेवकांनी वरिष्ठ पातळीवर पोहचवली. पक्षाच्या विरोधी मतदान केल्याने त्यांना कारवाईस सामोरे जावे लागले काय अशी चर्चा आता होत आहे.संतोष कदम यांच्यावर वरिष्ठांनी केलेली कारवाई योग्यच आहे. सभागृहात काम करीत असताना पक्षाच्या ध्येयधोरणांच्या प्रमाणे निर्णय घेताना वैयक्तीक मैत्री बाजूला ठेवून पक्षासोबत राहिले पाहिजे, असे पदाधिका-यांचे म्हणणे आहे.

पक्षाने माझी हकालपट्टी केली असली तरी सेनेशी एकनिष्ठ राहणार आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत माझी भूमिका स्पष्ट होती. नव्याने सेनेत प्रवेश करणारे केवळ मागच्या राजकारणाचा वचपा काढत कुरघोडी करण्यासाठी आले होते. माझ्याबाबत काही चुकीची माहिती पुरविली गेली असावी. शिवसैनिक म्हणून कधीही वावगे वागलेलो नाही. - संतोष कदम, उपनगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाभाऱ्यातील प्रवेशासाठी ७ मार्चपर्यंत अल्टिमेटम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार असल्याचे पत्र दिले असून, सात मार्चपर्यंत केव्हाही या रणरागिणी येथे येऊ शकतात, असे या पत्रातून सुचित होत आहे.

शनिशिंगणापूरनंतर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यासाठी आंदोलन होणार असे कालपर्यंत प्रसिध्दी माध्यमांमधून चर्चेस आले होते. मात्र, भूमाता रणरागिणी ब्रिगेडचे अधिकृत पत्र देवस्थान ट्रस्टला प्राप्त झाले आहे. यामध्ये महाशिवरात्री दिनांक ७ मार्च २०१६ रोजी आहे. त्यापूर्वी देवस्थान ट्रस्टने महिलांना मं‌दिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात यावा, अन्यथा आम्हाला दर्शनासाठी प्रवेश करावा लागेल, असा इशारा दिला आहे. यामध्ये काशी विश्वेश्वर येथे देखील महिलांना प्रवेश देतात मग, पार्वतीदेवीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिलांना प्रवेश का नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

भूमाता बिग्रेडच्या पत्रानंतर सुरक्षेची बाब म्हणून पोलिस यंत्रणेसह विविध शासन यंत्रणांना कळविण्यात आले आहे. याबाबत धर्मशास्त्रचा अभ्यास करण्यात यावा, असा मतप्रवाह व्यक्त होत आहे. त्यानुसार आखाडा परिषद, पुरोहित संघ आदी संस्थांना ट्रस्टमार्फत कळविण्यात आले आहे.

त्र्यंकेश्वर मंदिरात गर्भगृहात पुरूषांना सोवळे नेसून जाता येते. अर्थात सध्या ठराविक वेळेतच जाता येते. याबाबत नेहमी वाद होत असतात. गाभाऱ्यात वर्दळ वाढल्यास त्याचा परिणाम रांगेतून दर्शन घेणाऱ्यांवर होतो. त्यांना दर्शनही मिळत नाही. त्यात अडथळा येतो म्हणून अशा प्रकारे गाभाऱ्यातील प्रवेश सरसकट बंद करावा, असा मतप्रवाह व्यक्त होत असतो. अशा प्रकारे महिलांचे आंदोलन झाल्यास येथे सरसकट प्रवेश बंद करण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

स्थानिक महिलांचा विरोध मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश करण्यास स्थानिक महिलांचा विरोध आहे. या महिलांनी एकत्रित येऊन सुमारे ३०० ते ४०० महिलांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र देवस्थानसह पोलिस आणि महसूल अधिकारी यांना दिले आहे. त्र्यंबक येथे अशा प्रकारे आंदोलने झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथील मंदिर गाभाऱ्यात महिलांच्या प्रवेशाबाबत असे प्रकार श्रध्देला ठेच पोहचविणारे आहेत. हिंदू धर्मात स्त्री-पुरूष भेदाभेद नसताना याबाबत वादळ उठविण्याचे कारण नाही. परमेश्वराची आराधना करताना मंदिरात उपासना करताना काही नियम पूर्वापार तयार झाले आहेत. त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे. - स्वामी सागरानंद सरस्वती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडेराव महाराजांची आज निफाडला यात्रा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड शहराचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांची यात्रा आज (दि.२२) होत आहे. या यात्रेला अनेक वर्षांची परंपरा असून, यात्रेच्या दिवशी खंडेराव मंदिराचे पुजारी भगत रमेश शेलार हे बारागाड्या ओढतात. त्यांच्या कुटुंबाकडे परंपरेने हा मान आहे.

यावर्षी यात्रेनिमित्ताने निफाड नगरपंचायतीने निफाड महोत्सवाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार व यात्रा कमिटीचे खजिनदार सुभाष कार्डिले यांनी दिली. यात्रेनिमित्त सोमवारी सकाळी नऊ वाता गोदावरी नदीच्या पाण्याने भरलेल्या कावडीची मिरवणूक होईल. सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी चौकात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर खंडेराव महाराजांच्या रथाची मिरवणूक निघून खंडेराव मंदिराजवळ विसर्जन होईल. याच दिवशी रात्रभर मंदिरात जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल.

निफाडचे ग्रामदैवत असल्याने शहरातील सर्व कुटुंबातून मंदिरात नैवद्य आणला जातो. यात्रेनिमित्त २३ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत निफाड महोत्सवांतर्गत मॅरेथॉन, वकृत्व, लगोरी, समूहनृत्य अशा अनेक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल होणार आहे. दि. २९ रोजी दुपारी तीन वाजता शिवाजी चौकात स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा होईल. यात्रे निमित्ताने शुक्रवारी रात्री आठ वाजात शिवाजी चौकात कवी प्रशांत मोरे यांच्या आईवरील कवितांचे सादरिकरण होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्या सोडविण्यासाठी वकिलांचीही असोसिएशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात वास्तव्य करणाऱ्या व नाशिक जिल्हा कोर्टात वकिली करणाऱ्या वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी नाशिक महानगर अॅडव्होकेट असोसिएशन नाशिकची स्थापना करण्यात आली आहे.

नाशिक बार असोसिएशन ही वकिलाची संघटना जिल्ह्यातील संपूर्ण वकिलांसाठी काम करते. पंरतु, नाशिक शहरातील वकिलांच्या समस्यांकडे यामुळे दुर्लक्ष होत होते. या पार्श्वभूमीवर असोसिएशनची स्थापना करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव रामचंद्र जाधव यांनी दिली. शहरात राहणाऱ्या वकिलांना काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र, त्यांचे प्रश्न सुटत नव्हते, असे जाधव यांनी स्पष्ट केले. या संस्थेची कार्यकारणी जाहीर झाली असून, यात उपाध्यक्ष म्हणून अॅड. दगुजी रामभाऊ विधाते, अॅड. सचिव अविनाश देवराम जाधव, सहसचिव अॅड. लिलाधार मुरलीधर जाधव, जनसंपर्क व प्रसिध्दी प्रमुख म्हणून अॅड. अरुण माळोदे, सहसचिव (महिला) श्यामला दीक्षित, खजिनदार अॅड. धनंजय बालाजी बाकरे यांची तर सदस्य म्हणून अॅड. रामचंद्र चौथवे, अॅड. इस्तियाक यासीन पटेल, अॅड. आनंदा पिपाडा, अॅड. मीना कदम (देवरे) आणि अॅड. पंकज चौधरी यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली. सभासद नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, शहरातील वकिलांनी सभासदत्व घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिसळ सरमिसळवर नाशिककरांचा ताव!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मिसळ आणि नाशिक यांचे अनोखे नाते मागील दोन-चार वर्षांत अधिक घट्ट झाले आहे. पूर्वी केवळ मिसळची ओढ असणाऱ्या नाशिककरांच्या जीभेवर आता चुलीवरची मिसळ, निखाऱ्यावरची मिसळही राज्य करू लागली आहे. त्यातूनच 'विश्वास संकल्प आनंदाचा' या उपक्रमाअंतर्गत मिसळ सरमिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला. दोन दिवसात या महोत्सवात तब्बल ५० हजारांवर खवय्यांनी मिसळवर ताव मारला.

बहुसंख्य नाशिककरांची रोजची सकाळ होते ती, मिसळ कुठे खायची या प्लॅनिंगमध्ये. एकसे बढकर एक अशी मिसळची केंद्र शहरात असल्याने खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविले जात आहेत.

यातूनच मग प्रत्येकाला आवडेल त्या मिसळवर ताव मारता यावा, यासाठी मिसळ सरमिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. एक, दोन नव्हे तर तब्बल मिसळचे बारा स्टॉल्स या महोत्सवात एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. हजारो किलो शेव, कांदे, हरभरे व तब्बल एक लाख पाव या महोत्सवात फस्त झाले.

हॉटेल चालकांनाही नाशिककरांच्या या मिसळ प्रेमाचा पुरेपूर अंदाज आला आहे. यासाठीच त्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी ते सतत नवीन काहीतरी शहरात दाखल करीत आहेत. आधी फक्त मिसळ-पाव, त्यानंतर काळ्या-लाल रश्शाचे निरनिराळ्या चवीचे प्ररकार, मग जोडीला आलेले ताक, मठ्ठा, मग सोलकढी, आता झणझणीत मिसळनंतर स्वीट काहीतरी असावे म्हणून जिलेबी, त्यानंतर एखाद्या वेगळ्याच फ्लेवरचं पान, अशी मिसळची सोबत करणाऱ्या पदार्थांची यादी वाढत आहे. मिसळवरच्या या प्रेमामुळेत नाशिकच्या ओळखीला नवे आयाम मिळाले आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारातही लाखोंची उलाढाल दरदिवसाला होते आहे. दोनदिवसीय महोत्सवात ५० लाखांची आर्थिक उलाढाल झाली. किटी पार्टी, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, गेट टुगेदर याचा आनंदही येथे लुटण्यात आला.

ट्रॅफिक जॅम

गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी कॉलेज ते सावरकर नगर या परिसरात सकाळपासून ट्रॅफिक जॅम होती. या रस्त्यावर कधीही ट्रॅफिक जॅमची परिस्थिती येत नाही, त्यामुळे हे चित्र बघणाऱ्या प्रत्येकाला मिसळ महोत्सवाला मिळत असलेल्या प्रतिसादाचा अंदाजही

येत होता.

नाशिकला वाईन कॅपिटल म्हणून ओळख मिळाली असली तरी मिसळ कॅपिटल ही ओळख असणे महत्त्वाचे आहे. या महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादामुळे तर आमची याबाबत पक्की खात्रीच पटली आहे. अपेक्षेपेक्षाही मोठा प्रतिसाद मिळाला.

विश्वास ठाकूर

महोत्सवाचे आयोजक

पहिल्या दिवशी मिळालेल्या प्रतिसादामुळे दुसऱ्या दिवशी दीडपट व्यवस्था आम्ही वाढवली होती. नाशिककरांना एकत्र आणण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा ठरला. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मजा लुटत मिसळचा आस्वाद घेतला.

विनायक रानडे

महोत्सव समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बॅनर लावल्याने गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेत अनधिकृत पोस्टर, बॅनर, होर्डिंगवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग एकमधील अनधिकृत बॅनरवर कॅम्प पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे.

शहरातील प्रभाग एकमध्ये शनिवारी प्रभाग अधिकारी यांना गस्तीदरम्यान कॉलेज स्टॉपजवळील विजिलेंट करिअर अकॅडेमी यांनी बेकायदेशीरपणे विनापरवानगी बॅनर लावलेले असल्याचे प्राथमिक चौकशी दरम्यान आढळून आले. त्यामुळे ते तत्काळ जमा करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे संबंधितांवर प्रभाग अधिकारी यांनी कॅम्प पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. त्यावरून सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीपणा कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिओ मोहीम उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि.२१) शहरी आणि ग्रामीण भागात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यात चार लाख ३५ हजार बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजांमुळे समाजातील काही घटक अशा लसीकरण मोहीमांपासून दूर राहतात. त्यामुळे पोलिओचे समूळ उच्चाटन हा सरकारचा उद्देश असला तरी तो सफल होत नाही. जिल्ह्यातही पोलिओचे रुग्ण आढळल्याने यंदा जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. अशा मोहिमेपासून दूर पळणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा

आदेश जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी काही महिन्यांपूर्वीच आरोग्य विभागाला दिले होते. मालेगावमध्ये अशा मोहिमांना प्रतिसाद कमी मिळत असल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदविल्याने या भागात अनेकविध पध्दतीने पोलिओ लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व अति जोखमीच्या कार्यक्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर यांनी यंत्रणेला दिल्या होत्या.

जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाख ९७ हजार असून, पाच वर्षांखालील ४ लाख ३५ हजार बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले होते. त्यासाठी आरोग्य विभागाकडे ६ लाख १० हजार ट्रायव्हायलेट लस प्राप्त झाली. नाशिक महापालिका क्षेत्रात महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह महापा‌लिकेचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. या मोहिमेसाठी महापालिका क्षेत्रात एकुण ६२८ बूथ लावण्यात आले. ९५ ट्रान्झिट टिम, ३९ फिरती पथके, ९ रात्रीची पथके अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. एक हजार ८५७ कर्मचाऱ्यांसह १३६ पर्यवेक्षकांनी मोहिमेत सहभाग घेतला. प्रत्येक पथकात दोन कर्मचारी आणि पाच पथक मिळून एक पर्यवेक्षक नेमण्यात आले होते. खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेण्यात आली. बाळाला डोस दिला की नाही याबाबतची खातरजमा कर्मचारी घरोघरी जाऊन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २१ टक्के पाणीसाठा

$
0
0

धरणांनी गाठला तळ; गतवर्षीपेक्षा ५० टक्के घट, जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरण समूहातील पाणी पातळी खालावल्याने शहरवासीयांवर पाणीकपातीचे अटळ अरिष्ट ओढावले असताना कधी नव्हे ते जिल्ह्यातील अन्य धरणेही आतापासूनच तळ गाठू लागली आहेत. अवघ्या २१ टक्के पाण्यावर जुलै अखेरपर्यंत जिल्हावासीयांची तहान कशी भागणार, हा यक्षप्रश्न आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीचिंतेचे सावट जिल्ह्यावर घोंघावत आहे.

फेब्रुवारीच्या पंधरवड्यातच नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. एप्रिल-मे या तीव्र उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये काय परिस्थिती असणार याबाबतची चिंता नागरिकांच्या बोलण्यातून डोकाऊ लागली आहे. ग्रामीण भागात पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. बऱ्याचशा विहिरींनी आतापासूनच तळ गाठला आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. जिल्ह्यात ५८ गावे आणि १०१ वाड्या पाण्याचे दुर्भिक्ष्य अनुभवत आहेत. आतापासूनच तेथे टँकरद्वारे पाणी पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाला पार पाडावी लागत आहे. जून-जुलैमध्येही समाधानकारक पाऊस झाला नाही तर ती जुलै अखेरपर्यंत पार पाडावी लागणार आहे. गंगापूर धरण समूह, पालखेड धरण समूह आणि गिरणा खोऱ्यातील धरणांमधील पाणी पातळी दिवसागणिक खालावत असून, जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी नोंदविणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करण्याची वेळ आल्याने शेतपिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर करपू लागली आहेत.

जिल्ह्यात २३ धरणे असली तरी त्यापैकी चणकापूर, पुनद, हरणबारी आणि केळझर या चारच धरणांमध्ये सध्या ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. नांदुरमध्यमेश्वर बंधारा आणि नागासाक्या धरण कोरडेठाक पडले आहे. ज्या गिरणा धरणात गतवर्षी फेब्रुवारीत २२ टक्के पाणी साठा होता, त्या धरणामध्ये आजमितीस केवळ दोनच टक्के पाणी शिल्लक आहे. गौतमी गोदावरी, पालखेड, मुकणे धरणांमध्ये अनुक्रमे पाच, नऊ आणि सहा टक्के पाणी शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेने दिली आहे.

जिल्ह्यात एकूण २३ धरणे असून, त्यामध्ये ७ मोठी तर १६ मध्यम स्वरुपाची आहेत. ६६ हजार १६१ दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील धरणांमध्ये ४० टक्के म्हणजेच २६ हजार ७३२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. मात्र सध्या या धरणांमध्ये अवघा १४ हजार २१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांनी कमी झाला असून पिण्याच्या पाण्याचा, शेतपिकांचा आणि चाऱ्याचा प्रश्न त्यामुळे जटील रुप धारण करू लागला आहे. काही भागात शेतपिके शेतातच करपू लागली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस स्टेशनच बनले तक्रारींचे केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नववर्षाच्या प्रारंभीच सुरू झालेल्या मुंबई नाका पोलिस स्टेशनची परवड अद्यापपर्यंत संपलेली नाही. तक्रारदारांना आजही भद्रकाली पोलिस स्टेशन गाठावे लागते. पुरेशा सुविधांभावी सुरू झालेल्या पोलिस स्टेशनमुळे 'असून अडचण आणि नसून खोळंबा' अशी गत झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळात होत असून, त्याचा फटका मात्र सर्वसामान्य तक्रारदारांना सहन करावा लागतो आहे.

शहर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई नाका पोलिस स्टेशन आणि म्हसरूळ ही दोन नवीन पोलिस स्टेशन वाजतगाजत सुरु करण्यात आली. प्राथमिक सोयी-सुविधांकडे लक्ष दिले गेल्यास हे पोलिस स्टेशन सुरू होण्यास आणखी कालावधी खर्ची पडला असता. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पोलिस स्टेशनचे कामकाज सुरू झाले. साधारणतः ६० पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा पोलिस स्टेशनला उपलब्ध करून देण्यात आला. पोलिस स्टेशन सुरू होऊन आता दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून, तेथील परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीत भद्रकाली, सरकारवाडा, इंदिरानगर, अंबड आणि उपनगर या पोलिस स्टेशन हद्दीतील भाभानगर, गोविंदनगर, काठेगल्लीपासून थेट फेम थिएटर आणि त्यापाठीमागील अशोका मार्ग तसेच मायको सकर्लपासून त्र्यंबकनाकापर्यंतचा भाग समाविष्ट करण्यात आला. मात्र, या भागात काही घटना घडल्यास नागरिकांना पोलिस स्टेशनला थेट संपर्क करण्यात अडचणी येतात. पोलिस स्टेशनमध्ये दूरध्वनी नसल्याने कंट्रोल रूमला संपर्क साधल्यानंतरच कार्यवाही होते.

निम्मेच मनुष्यबळ

शंभरपेक्षा अधिक मनुष्यबळ मंजूर असताना प्रत्यक्षात ५० कर्मचारी उपलब्ध असून, त्यांच्यावर कामाचा थेट भार पडत असल्याची ओरड होते आहे. मध्यवर्ती पोलिस स्टेशनवर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी उपयोगी पडणारे पोलिस स्टेशन नियोजनाभावी कोलमडले असून त्याचा फटका सामान्यांना बसतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल कांदा दरात सातत्याने घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

रांगडा लाल कांदा बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या सप्ताहात रांगडा कांद्याच्या किमान बाजारभावाचा आलेख हा ३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य आवारात शनिवारी जवळपास सहा हजार क्विंटल रांगडा कांद्याची आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल ७९७ तर सरासरी ७२५ रुपये असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात गेल्या सप्ताहात एकूण ५४ हजार ९५ क्विंटल इतकी कांदा आवक झाली. बाजारभाव किमान ३००, कमाल ९५२ तर सरासरी ७०० रुपये असे होते.

बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात गेल्या सप्ताहात एकूण २३ हजार ८३ क्विंटल कांदा आवक झाली. येथे किमान ३००, कमाल ८६८ तर सरासरी ६७५ रुपये या बाजारभावाने स्थानिक व्यापारी वर्गाने कांदा खरेदी केला. एकंदरीत गेल्या काही दिवसात लाल रांगडा कांदा बाजारभावाचा आलेख खाली खाली येत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे 'अर्थचक्र' बिघडल्याचे दिसत आहे.

गेल्या सप्ताहात लाल कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली आदी राज्यांसह परदेशातील दुबई, मलेशिया, कोलंबो (श्रीलंका) व फिलीपाईन्स येथे सर्वसाधारण मागणी होती, अशी माहिती येवला कृषी उत्पन्न बाजार समिती सूत्रांनी दिली.

सध्या 'गरवा' खातोय भाव सध्या गुजराथ, पश्चिम बंगाल यासह राज्यातील चाकण (पुणे) येथील 'गरवा' कांद्याची आवक सुरू झाली आहे. हा 'गरवा' चांगलाच भाव खाताना त्याला मागणी दिसत आहे. साहजिकच या गरवा कांद्याच्या चलतीत नाशिक जिल्हयातील 'लाल रांगडा' कांद्याचा 'भाव' अर्थातच मागणी कमी झाली आहे. मागणी कमी झाल्याने साहजिकच ह्या रांगडा लाल कांद्याच्या बाजारभावात देखील घसरण होत असल्याचे बाजार समिती सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटकेचा दिखावा अन् ‘शाही बिदाई’

$
0
0

खूनप्रकरणातील संशयितांच्या अटकेवरून पोलिसांच्या कर्तृत्वाबाबत चर्चेला उधाण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या दोघांना सातपूर पोलिसांनी शनिवारी वासाळी भागात अटक केली. संशयितांना सापळा रचून शिताफिने अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला. प्रत्यक्षात दोघेही आरोपींनी आत्मसर्पण केले असून, पोलिसांकडून 'शिताफिची' कारवाई सुरू असताना या ठिकाणी संशयितांचा गोतवळा जमला होता हेही विशेष. मित्रांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम बराच वेळ सुरू होता. सध्या सातपूरमध्ये या 'शाही बिदाई'चा विषय चर्चेला येत आहे. भूषण लोंढेचे प्रकरण ताजे असतानाचा आत्मसर्पण केलेल्या आरोपींना शिताफीने अटक केल्याचे दाखवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरत आहेत.

अशोकनगर येथील अमोल मोहिते खून प्रकरणातील हे दोघे संशयित असून, रोशन काकड व दीपक भालेराव (रा. पिंपळगाव बहुला) अशी त्यांची नावे आहेत. ३१ मार्च २०१५ रोजी रात्री नऊच्या सुमारास मारूती व्हॅनमधून आलेल्या तिघांनी अमोल मोहिते याचे अपहरण केले होते. १ एप्रिलला दुपारी वासाळी शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला होता. व्हॅनचालक बाळू नागरे याला पोलिसांनी अटक केली होती. काकड आणि भालेराववर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असून, मोहिते खून प्रकरणानंतर दोघेही फरार असल्याचे पोलिस वारंवार सांगत होते. प्रत्यक्षात काकड आणि भालेराव सातपूरमध्येच वास्तव्यास असल्याचे अनेक पुरावे समोर येत राहिले. पोलिस स्टेशन परिसरातच दोघांचा वावर होता. फरार घोषित संशयित सहजतेने सातपूरमध्ये फिरत असल्याचे पाहून सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांच्या 'कार्यकर्तृत्वाचे' गुणगाण करताना तोंडात बोटे घालण्याची वेळ आली. पोलिस आणि संशयितांमधील वाढत्या प्रेमाचे किस्से वरिष्ठांपर्यंत पोहचले. संशयितांना अटक करण्याच्या आदेशाचे सोपस्कार पार पडले. यानंतर, सातपूर पोलिसांच्या एका पथकाने वासाळी शिवारातून शनिवारी दुपारी त्यांना अटक केली. मात्र, वस्तुस्थिती भिन्न असून याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, पोलिसांनी सापळा रचण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. वासाळी शिवारात आपण आपल्या मित्रासमवेत असून, खुनाच्या गुन्ह्यात शरण येत असल्याचे काकडने पोलिसांना मोबाइलद्वारे कळवले. दरम्यानच्या वेळेत काकडची भेट घेण्यासाठी त्याचे अनेक मित्र जमा झाले. गाठीभेटी व शुभेच्छांच्या वर्षावात न्हाऊन निघालेले दोघे संशयित मात्र पोलिस येत नसल्याने त्रासले. तब्बल दोन तासाच्या उशिराने पोलिस पथक रोशन व दीपकला घेण्यासाठी आले. त्यांनी दोघा संशयितांना ताब्यात घेत पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांच्या या दिखावेबाज कारवाईबाबत सातपूरमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

दोघांच्या जीवाला धोका

मोहिते खून प्रकरणात रोशन काकड व दीपक भालेराव तब्बल ११ महिन्यांपासून फरारी होते. दरम्यानच्या काळात ते सातपूर व त्र्यंबकरोड परिसरातच वास्तव्यास होते. त्यांचे कारनामेही सुरूच होते. पोलिसांना मात्र ते सापडत नव्हते. आता गँगवारमधून रोशन व दीपक या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळेच ते पोलिसांना शरण आल्याची चर्चा सातपूर परिसरात होत आहे.

पोलिस बॅकफूटवर!

गुन्हे होणारच, असे सांगत नामानिराळे राहणारे पोलिस एक प्रकारे गुन्ह्यांना खतपाणी घालण्याचे काम करीत आहेत. खुनाचे गुन्हे होत असतील तर त्यात पोलिसांचा काय दोष असे सांगणाऱ्या पोलिसांकडून संशयितांना प्रौढी मिरवण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येतो, ही गंभीर बाब आहे. काकड आणि भालेरावला निरोप देण्यासाठी आलेल्या मुलांना पोलिस यंत्रणेविषयी कोणतीही भीती नाही, हे उघडच आहे. भविष्यात यातील काही मुले खुनासारख्या गुन्ह्यात आढळून आल्यास यास जबाबदार कोण, असा प्रश्न सातपूरकरांच्या मनात सध्या उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार हेमंत गोडसे यांचे सूतोवाचलष्कराकडून मिळणार पर्यायी रस्ता!

$
0
0

लष्कराकडून मिळणार पर्यायी रस्ता!

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्पकडून मुंबई महामार्गाला जाणारा वडनेररोड काही महिन्यांपासून नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे या भागातील रहिवाशांना शहरात येण्यासाठी समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी येथील स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडर ब्रिगेडियर प्रदीप कौल यांची भेट घेऊन पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. लष्करी प्रशासन याबाबत सहकार्य करणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

देवळाली, भगूर, शिंगवे बहुला, वडनेर पिंपळगाव खांब यासारख्या अनेक गावातील शालेय विद्यार्थी, अंबड व सातपूरकडे जाणारा कामगार वर्ग व शेतकरी संबंधित रस्त्याने ये-जा करतात. हा रस्ता बंद केल्याने त्यांच्यापुढे समस्या निर्माण झाली आहे. लष्कराच्या जागेतूनच पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचे हाल थांबतील, असे खासदार गोडसे यांनी ब्रिगेडियर कौल यांना सांगितले. वडनेर रस्त्यालगत लष्कराचे सहा युनिट व पेट्रोल पंप आहेत. त्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने हा भाग संवेदनशील असल्याने संबंधित रस्ता बंद केल्याचे ब्रिगेडियर कौल यांनी खासदार गोडसे यांना सांगितले.

याला पर्याय म्हणून देवळालीच्या कॅन्टोन्मेंट बोर्डातील सरकारी भूखंड सर्वे क्रं. ८५ मधील जागा लष्कराला देता येईल, असे खासदार गोडसे यांनी ब्रिगेडीअर कौल यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच आनंद रोड- बुचरी-विनी पार्क-गायकर मळा-मथुरारोड ते वडनेररोडपर्यंत ९ मीटर रुंदीचा पर्यायी रस्ता देऊन सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

याबाबत येत्या १५ दिवसात

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.






















मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभाने घेतला मोकळा श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूरच्या अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहतीमधील जलकुंभ परिसराच्या स्वच्छतेला महापालिकेमार्फत सुरुवात झाली आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'अस्वच्छतेच्या विळाख्यात अशोकनगरचा जलकुंभ', या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. याची दखल घेत महापालिकेच्या बांधकाम विभागाने हे काम हाती घेतले आहे. परंतु आरोग्य विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करी‌त असल्याचे रहिवाशांचे मत आहे.

अशोकनगर भागातील परिसरला पाणी पुरवठा करणाऱ्या राज्य कर्मचारी वसाहतीमधील जलकुंभास काटेरी गवताने वेढले होते. याबाबत 'मटा'ने बुधवारी बातमी प्रसिध्द करताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने या भागाची स्वच्छता हाती घेतली आहे. यात दोन ट्रॅक्टर्सच्या सहाय्याने जलकुंभाच्या परिसरातील काटेरी गवत व झुडपे काढण्यात आली आहेत. तसेच या भागात पडलेले अनावश्यक साहित्यही उचलण्यात आले आहे. ही स्वच्छता सुरू असली तरी अद्यापही आरोग्य विभागाचे कर्मचारी मात्र या भागात फिरकलेले नाहीत.

जलकुंभाच्या बाजूला पसरलेल्या कचऱ्यामुळे या भागातील रहिवासी व शेजारील अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमधून काटेरी गवतामुळे सर्पदंश होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

याबाबत महापालिकेकडे तक्रार करुनही जलकुंभाच्या परिसराची स्वच्छता केली जात नसल्याने रहिवाशांचे मत होते. परंतु 'मटा'च्या बातमीमुळे हे काम तातडीने सुरू झाल्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. या परिसरातील अन्य समस्याही सोडविण्याची रहिवासी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images