Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

​शालिमार नव्हे; हातगाड्यांचा चौक

$
0
0

शालिमार नव्हे; हातगाड्यांचा चौक
म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक
'रस्ते का माल सस्ते में...' अशा आरोळ्या ठोकत विविध वस्तू विक्रेत्यांचे शालिमार परिसरातील अतिक्रमण काही नवीन नाही. या हातगाड्यांबरोबरच आता फळ विक्रेत्यांच्या हातगाड्याही भर रस्त्यावरच ठाण मांडून उभ्या राहत आहेत. यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे.
संदर्भ रुग्णालयासमोरच्या रस्त्यावर या फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या राहतात. या हातगाड्या वाहनांसाठी अडथळा ठरत आहेत. याचबरोबरच या फळ विक्रेत्यांमध्ये हातगाड्या उभ्या करण्याच्या जागेवरुन आपापसात शीतयुध्द तर कधी हाणामारीही होते. महाराष्ट्रीय व परराज्यातील फळ विक्रेते यांच्यामध्येही आजकाल वाद सुरू झाल्याने पूर्वीपासून गजबजलेल्या शालिमार परिसरात फळ विक्रेत्यांच्या या हातगाड्या डोकेदुखी ठरत आहेत.
हातगाडीवाल्यांच्या वादामुळे शालिमार भागात दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन अनेकजण रक्तबंबाळ झाले होते. खंडणी वसुलीतूनही अनेक हाणामारीचे प्रकार इथे घडल्याने पोलिस व महापालिकेने इथे हातगाड्या लावण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे काही दिवस इथे शुकशुकाट होता. मात्र पुन्हा विविध वस्तू विक्रेत्यांच्या हातगाड्या या भागात उभ्या राहू लागल्याने तोच प्रकार सुरू झाला आहे.
या भागात वाहतूक पोलिस, महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक व पोलिसांचे गस्तपथक असूनही इथली शांतता भंग होण्याच्या घटना कायम आहेत. त्यात आता फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यांची भर देखील पडल्याचे चित्र आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या अतिक्रमित हातगाड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ प्लंबर्सवर फौजदारी कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर
परस्पर पाण्याचे कनेक्शन देणाऱ्या खासगी प्लंबर्सवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी सातपूर विभागाच्या प्रभाग बैठकीमध्ये केली. स्वतंत्र कनेक्शनमुळे थकीत राहिलेल्या आधीच्या पाणी बिलाबद्दल 'मटा'ने 'बिलाने पळविले तोंडचे पाणी' ही बातमी प्रसिध्द केली होती. त्याची दखल घेत दिनकर पाटील यांनी ही मागणी केली.
वर्षानुवर्षे एकाच कनेक्शनवर पाण्याचा वापर करणारे रहिवासी स्वतंत्र कनेक्शन घेत आहेत. परंतु आधीचे कनेक्शन, त्याच्या वापराचे आलेले बील यासारख्या बाबींची कोणतीही खातरजमा न करता खासगी प्लंबर या ग्राहकांना परस्पर पाण्याचे स्वंतत्र कनेक्शन देत आहेत. त्यामुळे जुनी थकबाकी एकाच ग्राहकाच्या नावे येत आहे. या समस्येने हैराण झालेल्यांची बाजू 'मटा'ने संबंधित बातमीमधून समोर आणली होती. एका रहिवाशाला या प्रकारामुळे तब्बल ५० हजार रुपये बील भरावे लागणार असल्याच्या माहितीवरही यामध्ये प्रकाश टाकण्यात आला होता. महापालिकेच्या सातपूर प्रभाग बैठकीत अशा प्लंबर्सवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी दिनकर पाटील यांनी सभापती उषा शेळके यांच्याकडे केली आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाने स्वतंत्र कनेक्शन देताना अगोदरचे बिल अदा केले आहे किंवा नाही याची खात्री करुनच कनेक्शन देण्यात यावे, अशी सूचनाही पाटील यांनी यावेळी मांडली. शहरातील पाण्याची अवस्था पाहता महापालिकेने समतोल पाण्याचे नियोजन करावे, असेही यावेळी सुचविण्यात आले.
या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परंतु पाणी कनेक्शनचा प्रकार आणि त्यामुळे उद्भविलेल्या अडचणींवर तोडगा काढण्यावर भर देण्यात आला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडासंकुलातील गाळ्यांची दुरवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव नाका विभागीय क्रीडासंकुलाच्या समोरील गाळ्यांची आणि इमारतीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी क्रीडासंकुलाची इमारत आणि आजूबाजूला विविध खेळाची मैदाने आहेत. परंतु मैदानासामोरच्या दर्शनी भागात अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या गाळ्यांची अवस्था मात्र दयनीय आहे.
या ठिकाणच्या अनेक गाळ्यांना दरवाजे नाहीत, शटर्स वाकवली असल्यामुळे जनावरे आणि साप यांच्यासाठी हे गाळे म्हणजे हक्काची जागा बनली आहे. या ठिकाणी रात्रीच्यावेळी अनेक गैरप्रकार चालत असल्याची माहितीही समोर आली आहे. परिसरातील रहिवाशांना तसेच खेळाच्या सामन्यांकरीता मुक्कामी आलेल्या खेळाडूंना खूपच त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या ठिकाणी उभारलेल्या स्वच्छतागृहाचीही मोडतोड करण्यात आली आहे. येथील संडासाची भांडीही चोरून नेण्यात आली आहेत. या सर्व गोष्टींमुळे अनेक खेळाडूंनी नारजी व्यक्त केली आहे. या गाळ्यांची तसेच स्वच्छतागृहांची दुरुस्ती करावी, या भागात सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी रहिवासी तसेच खेळाडूंमधून होत आहे.
'महापालिकेने विभागीय क्रीडा संकुलाला हे गाळे हस्तांतरीत केले आहेत. त्यांची मार्च महिना अखेरपर्यंत दुरुस्ती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर हे सर्व म्हणजेच २० गाळे भाडेतत्वावर दिले जाणार असून नगरिकांच्या मागणीनुसार परिसराचे लवकरच सुशोभ‌ीकरण केले जाईल.'
- संजय सबनीस,
जिल्हा क्रीडाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेवाभाव रुजविण्यासाठी स्काऊट व गाईडची स्थापना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
'भारतीय मुलांना उत्तम नागरिक बनवत त्यांच्यामध्ये सेवाभाव रुजविण्याच्या हेतूने लॉर्ड बेडन पॉवेल यांनी भारत स्काऊट आणि गाईडची निर्मिती केली', अशी माहिती एनसीसीचे सेकंड ऑफिसर योगेश्वर मोजाड यांनी दिली. देवळाली हायस्कूलमध्ये स्काऊट आणि गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते.
सर्व जगात बंधुभाव, ऐक्य व शांतता नांदावी हे स्काउटचे धोरण असून त्याप्रमाणे आपण वागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिन स्काऊट आणि गाईड तर्फे चिंतन दिन व विश्वबंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रप्रीति मोरे होत्या. काय्रक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी प्रार्थना व 'हम होंगे कामयाब...' हे गीत सादर केले. स्काऊट आणि गाईडमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी शपथ देण्यात आली तसेच नियमांचे वाचन करून दाखविण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक हेमंत मोजाड, आर. डी. शेख, एस. के. शिंदे, महेश आढाव, आरती ठोके, कल्पना पवार तसेच स्काऊट आणि गाईडचे विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीएम’ची सुरक्षा रामभरोसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
देवळाली कॅम्प परिसरात असणाऱ्या विविध बँकांच्या एटीएम सेंटर्सची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या एटीएम सेंटर्सवर सुरक्षा रक्षकच नसल्याने इथे काही समस्या निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल?, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होते आहे.
येथील संसरी नाक्यावर असलेले बँक ऑफ इंडियाचे एटीएम, सौभाग्यनगर भागात असलेले युनियन बँकेचे एटीएम तसेच लेव्हीट मार्केट परिसरातील आयसीआय बँकेचे एटीएम यासह विविध बँकांच्या एटीएम सेंटर्सची सुरक्षा सध्या वाऱ्यावर आहे. या ठिकाणी एकही सुरक्षारक्षक नसल्याचे निदर्शनास आले आहे. देवळालीत ग्रामीण भागातून येणारे नागरिक व्यवहारासाठी एटीएमचा वापर करतात. अशा नागरिकांना पैसे काढताना निर्माण होणाऱ्या समस्येसाठी बाहेरील व्यक्तींची मदत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत कोणी पैसे काढून लुटले तर दाद कोणाकडे मागायची?, असा सवाल हे नागरिक करत आहेत.
देशात अनेक ठिकाणी एटीएम फोडण्याचे प्रकार घडले आहेत. देवळालीमध्ये असा एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण?, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. संबधित बँक शाखांना एटीएम सेंटर्सवर सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश पोलिसांनी दिले असूनही त्याची कार्यवाही होत नसल्याचे
दिसत आहे. त्यामुळे बँकांचे देवळाली कॅम्प भागातील एटीएम सेंटर्सच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे ज्येष्ठांची फसवणूक तसेच चोरीच्या घटना होण्याबद्दलची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर सुरक्षेची मदार
अनेक बँकांच्या एटीएम सेंटर्सवर सुरक्षा रक्षकाऐवजी सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत आहे. सुरक्षेसाठी केवळ एवढा उपाय पुरेसा नसून सुरक्षा रक्षक असणे अनिवार्य आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग चोर शोधण्यासाठी किंवा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी होत असला तरी त्याच्या पळवाटाही अनेक असल्याने एवढ्यावर विसंबून राहणे धोकादायक असल्याचे या भागातील नागरिकांचे मत आहे. त्यामुळे बँकांनी तातडीने या सुरक्षेबाबात दक्षता घ्यावी असे नागरिकांचे मत आहे.
'संबधित बँक शाखांना एटीएम सेंटर्सकरीता सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत पूर्वीच सूचित करण्यात आले आहे. त्यांनी या सूचनांचे पालन करुन नागरिकांसाठी ही सुविधा पुरवायला हवी.'
राजेश आखाडे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
'दिवसभरात अनेकजण येथील एटीएमचा वापर करत असतात. पण सुरक्षा रक्षक नसल्याने इथे पैसे काढण्याचा धोका कायम आहे. अनेकदा काही अडचण आल्यास कोणाला विचारायचे असा प्रश्नही पडतो.'
कमल धामेजा,
व्यावसायिक


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवान ऋषभदेव चरणी लाखो भाविक लीन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील १०८ फूट अखंड पाषाणातील विशालकाय भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा गुरुवारपासून उत्साहात सुरू आहे. शनिवार व रविवार हे सुटीचे दिवस आल्यामुळे या ठिकाणी भाविकांच्या गर्दीने अवघ्या चार दिवसांत विक्रम मोडीत चार लाखाहून अधिक भाविकांनी भगवान वृषभदेवांचे दर्शन घेतले.

सोमवारी अभिषेक करण्याचा दुसरा मान दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश व मुंबई येथील भाविकांना मिळाला. यावेळी सकाळपासूनच महामस्तकाभिषेक सोहळ्यास भाविकांनी गर्दी केली होती. आचार्य अनेकांत सागरजी महाराज, पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजी महाराज यांनी केलेल्या णमोकाराच्या मंत्रोच्चारात हजारो लिटर दही-दुधाचा अभिषेक करण्यात आला.

महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवारपासून राज्यनिहाय भाविकांची समितीकडून चोख व्यवस्था करण्यात येत आहे. भाविकांसाठी सकाळी सहा वाजेपासून डोंगरावर जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी अभिषेक करण्याचा दुसरा मान दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश व मुंबई येथील जसबीर जैन, मालती जैन, चंद्रप्रकाश जैन, ज्ञानमती माताजींच्या पूर्वाश्रमीच्या भगिनी मालती, त्रिशाला जैन, अरिहंत व अभिषेक जैन यांना देण्यात आला असल्याची माहिती मूर्ती निर्माण समितीचे महामंत्री संजय पापडीवाल यांनी दिली. आलेल्या भाविकांमध्ये बहुंताश उद्योजकांचा समावेश होता. भाविकांनी तीर्थस्थळावर एकच गर्दी केली होती. या गर्दीने विक्रम मोडीत काढला असून, तब्बल चार लाखाहून भाविकांनी अवघ्या चार दिवसांमध्ये दर्शनासाठी गर्दी केल्याने, या सोहळ्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

पंतप्रधान येण्याची शक्यता या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे. येत्या ६ मार्चला पंतप्रधान मोदी येणार असल्याचे मूर्तिनिर्माण समितीच्यातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निषेध रॅली अन् रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांचे समर्थन केल्याच्या निषेधार्थ इगतपुरी तालुका भाजपच्या वतीने घोटी शहरात निषेध रॅली काढून घोटी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे घोटी-नाशिक व घोटी-सिन्नर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

या जनआंदोलनाची सुरुवात घोटी येथील भाजपच्या संपर्क कार्यालयापासून करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी तालुकाध्यक्ष पांडूरंग बऱ्हे, भाऊसाहेब धोंगडे, रमेश परदेशी, महेश श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काढण्यात आली. खासदार राहुल गांधी व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निषेधार्थ घोषणा देत दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या नेत्यांचा धिक्कार करण्यात आला. या निषेध रॅलीचा समारोप घोटी महामार्गावरील सिन्नर फाटा येथे महामार्ग रोको आंदोलनाने करण्यात आला. या महामार्ग रोको प्रसंगी घोटी-सिन्नर महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी तालुकाध्यक्ष पांडूरंग बऱ्हे, भाऊसाहेब धोंगडे, महेश श्रीश्रीमाळ, प्रकाश सोनवणे, भाऊसाहेब कडभाणे, तानाजी जाधव, इगतपुरी शहराध्यक्ष मुन्ना पवार आदींनी या रास्तारोको आंदोलनात मनोगत व्यक्त करून खासदार राहुल गांधी व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जाहीर निषेध केला.या आंदोलनात जिल्हा पदाधिकारी रमेश परदेशी, महेश श्रीश्रीमाळ, हेमंत सुराणा, जगन भगत, कैलास कस्तुरे, माजी सभापती मंदा भोईर, संदीप शहाणे, तानाजी जाधव, भाऊसाहेब कडभाणे, संजय झनकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मयूर माळी, सरचिटणीस मयूर परदेशी, सचिन काळे, स्वप्नील लहाने, मुन्ना शेख, रामदास शेलार, जयराम गव्हाणे, राजेंद्र कटकाळे, संदीप शहाणे, प्रकाश सोनवणे, भगीरथ भगत, भरत दोडके, महिला आघाडीच्या आशा डोंगरे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या वतीने तहसीलदार महेंद्र पावर व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना निवेदन देण्यत आले.

सटाणा भाजपतर्फे निवेदन सटाणा : जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणारे इंदिरा काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या नेत्यांनी घटनेचे समर्थन केल्याने त्यांच्या निषेधार्थ बागलाण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना निवदेन देण्यात आले. निवदेनाप्रसंगी तालुका अध्यक्ष संजय भामरे, डॉ. विलास बच्छाव, नगरसेवक साहेबराव सोनवणे, शामकांत मराठे, देवेंद्र जाधव, जगदीश मुंडावरे, सुरेश महाजन, प्रकाश कुमावत, मुन्ना सोनवणे, प्रकाश सांगळे, संजय पाकवार, दामोधर नंदाळे, विकी मोरे, सुशांत जाधव, किरण नांद्रे, अतुल पवार, भरत अहिरे, विनोद नंदाळे, मुन्ना नंदाळे, संदीप वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

देशात राहून दहशतवादाचा बिमोड करण्यास प्राधान्य देण्याऐवजी दहशतवादाचे समर्थन करणे ही खेदाची बाब असून, असा गंभीर प्रकार यापुढे भाजप कार्यकर्ते व तमाम भारतीय जनता कदापि सहन करणार नाही. - अण्णासाहेब डोंगरे, तालुकाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विडी कामगारांचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने विडी धंद्यावर जाचक अटी व बंधने लावल्याच्या निषेधार्थ सिन्नर येथे हजारो विडी कामगारांनी सीटूच्या आंदोलनात सहभाग घेत शासनाविरोधात भव्य मोर्चा काढला. मोर्चानंतर तहसीलदार मनोज खैरनार यांना निवेदन देण्यात आले.

सिन्नर बस स्थानकापासून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागातून तहसील कार्यालयावर हा मोर्चा गेला. या मोर्चाचे नेतृत्व सीटूचे हरिभाऊ तांबे यांनी केले. विडी बंडलावर ८५ टक्के आरोग्य चेतावणी लावण्याबाबत कायद्यातून वगळण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी विडी कामगार संघाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चा तहसील कार्यालाजवळ आल्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी हरिभाऊ तांबे यांनी विडी कामगारांच्या अडचणीकडे लक्ष वेधले. देशात पाच कोटीहून अधिक विडी कामगार असून, शासनाच्या धोरणामुळे विडी उद्योग संकटात येईल. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मालक, मालकांचे प्रतिनिधी, विडी कामगार फेडरेशनचे पदाधिकारी, कामगार यात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूषित पाणीप्रकरण भोवणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

प्रदूषण कायदा व पर्यावरण अधिनियमनुसार पिंपळगाव बाजार समितीच्या संचालक मंडळावर तीन महिन्यापूर्वी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याबाबत पोलिस तपास पूर्ण झाला असल्याने संभाव्य अटक टाळण्यासाठी बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्यासह तत्कालीन १६ संचालकांनी निफाड जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणावर आज (दि. २४) सुनावणी होणार आहे.

दोन ते अडीच वर्षापूर्वी जोपूळ रोडवरील नवीन बाजार समिती आवारातील शौचालयाचे दूषित पाणी पिंपळगाव, चिंचखेड, उंबरखेड आदी शिवारातील शेतीत व विहिरीत पसरून पिण्याचे पाणी दूषित होण्याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. याबाबत येथील शेतकरी विश्वास माधवराव मोरे यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करूनही दखल न घेतल्याने शेवटी मोरे यांनी राष्ट्रीय हरीत लवाद पुणे यांच्याकडे याचिका दाखल केली होती. या प्रकरणी राष्ट्रीय हरीत लवादाने पिंपळगाव बाजार समितीला दोषी ठरवून पाच लाख रुपये नुकसानभरपाई व काही निर्देशांचे पालन करण्याचे आदेश दिले होते.

या संदर्भात पिंपळगाव बाजार समितीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायालयाचे अपील फेटाळत हरीत लवादाचा निर्णय पाळण्याचे आदेश देत फौजदारी गुन्ह्याचा पर्याय खुला केला होता. त्यानुसार विश्वास मोरे यांनी पिंपळगाव न्यायालयात याचिका दाखल केली होती. पिंपळगाव न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेणुका सातव यांनी १५६ (३) नुसार फौजदारी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते.

पिंपळगाव पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपळगाव बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळावर स्वतःच्या फायद्यासाठी जनतेची फसवणूक तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे हित न बघता ‌अहित पाहिले. तसेच अनेक विभागांच्या परवानग्या व ना हरकत दाखले न घेताच बेकायदेशीर मार्केट सुरू केले. यानुसार प्रदूषण कायदा व पर्यावरण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करून तपास केला होता.

या प्रकरणी पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे लागल्याने सभापतींसह माजी संचालकांना अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजार समितीच्या संचालक मंडळाने १७ फेब्रुवारी रोजी अटकपूर्व जामिनासाठी निफाड सत्र न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर करीत अंतिम जामिनासाठी आज, बुधवारी सुनावणी ठेवली आहे. आजच्या या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदक्षिणा मार्गावर स्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रावणाचा तिसरा सोमवार आणि लाखोंच्या संख्येने ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा हे अतूट समीकरण झाले आहे. अर्थात त्यानंतर वर्षभर देखील या मार्गावर लाखोंच्या संख्येने भाविक प्रदक्षिणेसाठी येत असतात. या मार्गावर अस्वच्छता निर्माण होत असते. याची दखल आयपीएल ग्रुपने घेत शिवजयंतीचे औचित्य साधत प्रदक्षिणा मार्गावरील गौतम ऋषी मंदिर आणि डोंगराची साफसफाई केली.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग काँक्रीटचा झाला आहे. अर्थात गौतमऋषीचा डोंगर रस्ता पायऱ्यांचा झाला आहे. हा परिसर अद्यापही दुर्गम आणि दुर्लक्षित असाच आहे. नुकतीच संत निवृत्तीनाथांची यात्रा झाली. तेव्हा सुमारे एक लाख वारकरी भाविकांनी प्रदक्षिणा घातली. या वाढत्या वर्दळीने येथे कचरा साठणे साहजिकच आहे. पायरी उतरताना साठलेली माती आणि कचरा यामुळे भाविक पाय घसरून पडण्याचा धोका वाढतो. यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

आयपीएल ग्रुपचे सदस्य नगरसेवक ललित लोहगावकर, अॅड. पराग दीक्षित नगरपालिका आरोग्य अधिकारी शाम गोसावी, सचिन कदम, रवींद्र अग्रवाल, पांडूरंग गंगापुत्र, अमोल दोंदे, कैलास नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक शैलेंद्र गायकवाड, पिंटू नाईकवाडी आदींनी पर्वतशिखरावर असलेल्या धार्मिक स्थळावर यापूर्वीही स्वच्छता मोहीम राबवली आहे. प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या गौतमऋषींच्या डोंगरावर जाणाऱ्या पायरी मार्गावर आणि परिसरात भाविकांनी टाकलेला कचरा काढून सर्व पायऱ्या स्वच्छ करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन शाळांना 'आयएसओ' मानांकन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील पांडववाडी, मन्याडथडी व शंकरवाडी येथील ग्रामस्थांनी अगदी मोकळ्या मनाने दिलेली लोकवर्गणी अन् तेथील शिक्षकांची मेहनत चांगलीच फळाला आली आहे. तालुक्यातील या तीन शाळांना अद्ययावत ९००१-२०१५ हे 'आयएसओ' मानांकन जाहीर झाले आहे. येवला तालुक्यातील तिन्ही शाळांनी एकाच वेळी हे मानांकन मिळवत जिल्ह्यात बाजी मारली आहे. यातील पांडवावाडी ही वस्तीशाळा आहे.

जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की मोडकळीस आलेली जीर्ण इमारत, सोयीसुविधांचा अभाव हे आजवर नजरेत पडणारं चित्र. अशा प्रतिकूल परिस्थितीतही येवला तालुक्यातील पांडववाडी, मन्याडथडी, शंकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळांनी आदर्शवत काम करीत किमया केली आहे. शिक्षण अधिकारी, ग्रामस्थ व शाळेच्या गुरुजींनी खिशाला झळ लावत दिलेल्या लोकवर्गणीतून हे सर्व हे सगळ शक्य झालं.

शाळा आयएसओ करण्याची मोहीम आता सुरू होताना पांडववाडी, मन्याडथडी, शंकरवाडी या तीन शाळांतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी शाळा देखणी व गुणवत्तापूर्ण करण्याचा वसा दोन वर्षापूर्वीच घेतला होता. स्वच्छ, सुंदर आणि संस्कारांचे बाळकडू पाजणारी आणि संपूर्ण शिक्षक, अधिकारी व ग्रामस्थांनी जणू दत्तक घेतलेली शाळा पाहायला आता अनेक जण गर्दी करू लागले आहेत. पांडववाडी ही तर वस्तीशाळा आहे. पण, येथील शिक्षक संदीप शेजवळ यांनी जणू आपण स्वतः या शाळेचे संस्थापक आहोत या भूमिकेतून माळरानावर नंदन फुलवलं आहे. मन्याडथडी (अंदरसूल) या शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील व शंकरवाडी (अंदरसूल) शाळेचे मुख्याध्यापक शंकर वैद्य यांनी देखील सहकाऱ्यांच्या मदतीने रात्र-दिवस एक करीत शाळांना रूप मिळवून दिले आहे. विविध वैशिष्ट्यांमुळे या तिन्ही शाळाना 'आयएसओ' ९००१-२०१५ हे मानांकन प्राप्त झाले आहे.

यापूर्वी जिल्ह्यात सर्व शाळांना २००८ चे 'आयएसओ' मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी जिल्ह्यात आयएसओ झालेल्या शाळाची संख्या ३० वर गेली आहे. पण त्या सर्व ९००१-२००८ हे भौतिक सुविधांचे मानांकन प्राप्त आहेत. या तीन शाळांनी मात्र भौतिक सुविधा,विधार्थी गुणवत्ता व शालेय दप्तर यासाठीचे हे अद्ययावत मानांकन मिळवत जिल्ह्यासमोर आदर्श उभा केला आहे. गटविकास अधिकारी सुनील आहिरे, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, विस्तार अधिकारी प्रमिला शेंडगे, मंगला कोष्टी, केंद्रप्रमुख रोडे व श्रीमती वैद्य यांनीही भार उचलला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे संभाजी पवार मजूर फेडरेशनवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत येवला प्रतिनिधी गटातून इतर सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येवला पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे संभाजी पवार यांची बिनविरोध निवड झाली.

राज्याचे माजी मंत्री तथा येवल्याचे विद्यमान आमदार छगन भुजबळ यांच्याशी 'गुफ्तगू' करीत पवार हे आमदार भुजबळांना राजी करण्यात यशस्वी झाल्याने भुजबळांच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या मंगळवारच्या दिवशी अर्ज मागे घेतला अन् संभाजी पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

नाशिक जिल्‍हा मजूर संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येवला प्रतिनिधी गटातून एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील अनेकांनी सोमवारपर्यंत आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले होते. त्यामुळे येवला पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे संभाजी पवार विरुद्ध आमदार छगन भुजबळ समर्थक उमेदवार असा सामना रंगणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत होते. तशी जोरदार चर्चा एकीकडे रंगत होती. निवडणूक अटीतटीची होणार असे एका बाजूला दिसत होते. या घडामोडीत तालुक्यातील राधाकिसन सोनवणे, माणिकराव शिंदे, पंकज पारख, अरुण थोरात, अंबादास बनकर, वसंत पवार, साहेबराव मढवई, बी. आर. लोंढे, संतोष खैरनार यासह कार्यकर्ते आणि विशेषतः आमदार छगन भुजबळ यांचे येवला संपर्क कार्यालयीन स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिन्नरमध्ये होणारी पाणी नासाडी थांबवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ‌

सिन्नर तालुक्यात होणाऱ्या इंडिया बुल्स कंपनीच्या मल्टिप्रॉडक्ट सेझ प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने येथील शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. सिन्नर तालुक्यात होणारी पाण्याची नासाडी थांबवा, अशी मागणी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे करण्यात आली आहे.

इंडिया बुल्सच्या पाइपलाइनमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शेतकऱ्यांना शेती आणि पिण्यासाठी पाणी नसताना हा पाण्याचा अपव्यय कसा होऊ शकतो याची चौकशी करावी, अशी मागणी संघटनेचे गोविंद पगार, दीपक पगार, हंसराज वडघुले, रतन मटाले आदींनी केली आहे. नियोजित रेल्वेमार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया त्वरित रद्द करावी, सातबारा उताऱ्यावर लावलेले अन्य अधिकाराचे बोजे रद्द करावे, पर्यावरण, शेती आणि परिसरातील जनतेवर होणाऱ्या प्रदूषणाच्या परिणामांबाबत अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करावी, अशा मागण्याही केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंडस्ट्रीअल कॉरिडॉरमुळे उज्ज्वल भवितव्य

$
0
0

संतोष मंडलेचा

जपानच्या आर्थिक सहकार्याने दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉरमध्ये ४,२३००० कोटी रुपयांचा मेगा प्रोजेक्ट निर्माण करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. हा महाप्रोजेक्ट म्हणजे देशातील राजकीय राजधानी आणि आर्थिक राजधानी यांना जोडणारा १४८३ किलोमीटरचा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत दिल्ली ते मुंबई दरम्यान सहा मेगा इंडस्ट्रीअल झोन निर्माण करण्यात येणार आहेत. यामुळे या संपूर्ण १४८३ किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये औद्योगिकरण होणार आहे. परिणामी रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात शक्य आहे. या उपक्रमातून सुरुवातीस नाशिकला वगळण्यात आले होते. परंतु नुकताच या उपक्रमात नाशिकचा समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डीएमआयसी म्हणजे 'दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर'. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक पाया भक्कम करणे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करु शकेल अशा प्रकारची साधन सामुग्री निर्माण करणे, यातून स्थानिक व्यापार, उद्योग वाढविणे व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणुकीला आकर्षित करणे, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक व त्यातून विकास करणे.

या कॉरिडॉर प्रकल्पातील प्रस्तावित योजनेनुसार इगतपुरी-नाशिक-सिन्नर हा मुंबई, कल्याण, मनमाड, जळगाव या ट्रक रोडला संलग्न असा पट्टा आहे. यात प्रामुख्याने इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल्स, अॅल्युमिनिअम आणि स्टील फर्निचर या उद्योगांना मोठा वाव निर्माण होईल.

नाशिक प्रामुख्याने कृषी उत्पादनासाठी अग्रेसर जिल्हा आहे. त्याचा विचार केला तर या डीएमआयसी प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणारा कृषी माल, विशेषतः द्राक्षे युरोपीय देशांमध्ये निर्यात करण्याच्या दृष्टीने जलद वाहतुकीची साधने निर्माण होणार आहेत. या विभागातील औद्योगिक विकासाचा विचार केला तर या प्रकल्पामुळे नाशिक सिन्नर असा औद्योगिक पट्ट्याचे एकत्रिकरण करुन विकासाला वेग येणार आहे. या विभागात प्रामुख्याने निर्यातक्षम उद्योग येतील अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर नाशिकमधील कृषी उत्पन्नाचा विचार करता कृषी माल प्रक्रिया उद्योग व अन्न प्रक्रिया उद्योगाबरोबरच फळफळावळाचे मोठे मार्केट या ठिकाणी निर्माण होऊ शकते.

या डीएमआयसी उपक्रमांतर्गत इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल्स, अन्न प्रक्रिया उद्योग यांना सहाय्यभूत ठरणारे प्रशिक्षित कामगार निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती करण्यात येईल. साहजिकच नाशिक जिल्हा नॉलेज हब म्हणून विकसित होऊ शकतो. या योजनेत निर्यातक्षम उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने साहजिकच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक सेंटर व व्हॅल्यू अॅडेड सेवा केंद्र मोठ्या प्रमाणात निर्माण होतील.

निर्यात व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढता संबंध यामुळे नाशिकच्या विमानतळावर सुविधा निर्माण होऊन येथून आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत सेवा देण्यासाठी सुविधा या ठिकाणी निर्माण होतील. या उपक्रमामुळे नाशिक-सिन्नर हा भाग राष्ट्रीय व राज्य महामार्गांना जोडला जाईल व दृतगती मार्ग निर्माण होतील. या निर्माण होणाऱ्या सोयीसुविधा नशिकला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सहाय्यभूत ठरतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकमध्ये गुंतवणूक वाढेल. त्यामुळे साहजिकच नाशिकच्या औद्योगिकरणाचा वेग मोठा प्रमाणात वाढण्यास मदत होईल. नाशिक मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर हा नाशिकच्या औद्योगिक विकासाला उज्ज्वल भवितव्य निर्माण करणारा असेल, असा विश्वास वाटतो.

(लेखक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौण खनिज वाहतुकीवर कारवाया सुरूच राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ‌

पोलिस विभागातील काही अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या पारदर्शक कामकाजाबाबत संशय व्यक्त केला असला तरी त्याचा अवैध गौण खनिज वाहतुकीवरील कारवायांवर कुठलाही परिणाम होणार नाही. अवैध वाहतुकीवर कारवाया सुरूच राहणार, असे जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी स्पष्ट केले आहे.

अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करतेवेळी महसूलच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले होत असल्यास त्यास पोलिस यंत्रणा जबाबदार नसल्याचा मजकूर ग्रामीण पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे महसूल विभागाची बदनामी झाली. याबाबतचा खुलासा करण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय मोहीते, पोलिस उपअधीक्षक राहूल खाडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. महसूल यंत्रणा पारदर्शकपणे काम करीत नाही हे पोलिस विभागाचे की अधिकाऱ्याचे स्वत:चे मत आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. हा प्रकार अनावधानाने घडला की जाणीवपूर्वक हे देखील स्पष्ट करावे असे यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिली. महसूलचे कामकाज पारदर्शक नाही असा दावा पोलिसांकडून केला जात असेल तर संबंधितांनी त्याबाबतचे पुरावे द्यायला हवेत अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी दाहीदिशा वणवण

$
0
0

हातपंपावर महिलांची गर्दी सातपूर : सिडको परिसरात सोमवारी तर सातपूरमध्ये मंगळवारी पिण्याचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा महापालिकेने निर्णय जाहीर केला. यानंतर पाणीसाठा नसलेल्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. तर सातपूरमध्येही पाण्यासाठी महिलांनी हातपंपांवर गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान, पाणीच आले नसल्याने ऐरवी धो धो पाणी वाया जाणारे गल्लीबोळ मंगळवारी कोरडे दिसून आले.

महापालिकेने आठवड्यातील एक दिवस पाणीसाठा पूर्ण बंद करावा. परंतु, इतर दिसशी मात्र वेळेवर पाणी द्यावे अशी मागणी सातपूर परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन महापालिकेने करावे. यात सिडको, सातपूरच्या काही भागात पूर्ण दाबाने तर शेजारील गल्लीत कमी दाबाने पाणी येत असल्याचा अजब अनुभव नागरिकांना मंगळवारी आला.

सिडको व सातपूरच्या कामगार वस्तीत पिण्याच्या पाण्याचे नियोजन नसल्याने एकाच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाणी मिळत असते. त्यातच उंच भाग असलेल्या रहिवाशी भागात तर अगदी कमी दाबाने पाणी मिळत असल्याने पाणीसाठा करता येत नाही. यासाठी महापालीका आयुक्तांनी नियोजन करून सर्वांना समान पाणी कसे देता येईल, याकडे लक्ष घातले पाहिजे. - जितेंद्र विसपुते

बदलीमुळे व्हॉल्व्ह बंद सातपूरच्या पाणी पुरवठा विभागात एका कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली. त्याचा राग मनात ठेवून त्याने चुंचाळे शिवारातील व्हॉल्व्हच बंद केल्याचे मंगळवारी दिसून आले. यात नवीन नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्याला व्हॉल्व्ह न सापडल्याने चुंचाळेवासीयांना दोन दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहवे लागले. व्हॉल्व्ह बंद ठेवणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर महापालिका आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रहिवाशी संतप्त, नगरसेवकांचे मौन जुने नाशिक : जुने नाशिक परिसरात मंगळवारी एक थेंबही पाणी न मिळालेले नागरिकांची मोठी पंचायत झाली. पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती नसलेल्या नागरिकांना पाण्यासाठी सार्वजनिक नळांकडे धाव घेतली. परंतु, तेथे जाऊन ही पाणी मिळू न शकल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला. पाण्यासारख्या जिव्हाळाचा प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. मात्र, या प्रश्नी नगरसेवकांचे मौन असल्याचे दिसून आले. पाणीप्रश्नी कोणीच पुढे येत नसल्याने थेट जनआंदोलने करण्याची वेळ आता नागरिकांवर येऊन ठेपली असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पाणीप्रश्न सोडविताना भौगोलिक अभ्यास करुन नियोजन व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. जुने नाशिक परिसरात संजरीनगर, इगतपुरीवाला चाळ, नागसेन नगर, बागवानपुरा, नावावली, खडकाळी, गैबनशहा नगर, झारेकरी कोठ, काझीपुरा, जोगवाडा आदी परीसरात प्रामुख्याने पाणीटंचाई आहे. कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागली.

असून नदीकाठी, जीव तहानलेला! पंचवटी : गोदावरी नदीच्या काठावर वसलेले अनेक रहिवाशी पाण्यावाचून तहानलेली आहेत. पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. जलकुंभ जवळ असूनही कमी दाबाने पाणी मिळते. या परिस्थितीत कधी बदल होणार याची पंचवटीवासीयांना प्रतीक्षा आहे.

पंचवटीतील प्रभाग क्रमांक एकमधील अनेक कॉलनीतील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. महालक्ष्मी नगर आणि गायत्री नगर भागातील महिलांनी अनेकदा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला याबाबत निवेदन दिले, हंडा मोर्चा काढला. तरी पाणी पुरवठा विभागाने दाखल घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रभाग एकमधील जुनी जलवाहिनी बदलण्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. जत्रा हॉटेलच्या मागील समर्थ नगर आणि कोणार्क नगर भागात पाणी अतिशय कमी दाबाने येते. जवळच जलकुंभ जवळ असून आम्हाला पिण्याचे पाणी मुबलक मिळत नसल्याची खंत महिला वर्गाने व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक तीनमधील सिद्धेश्वर नगर येथे जलकुंभ आहे. मात्र, पाणीटंचाईचे संकट काही दूर होऊ शकलेले नाही. पंचवटी विभाग सभापती यांना निवेदन देऊनही परिस्थिती बदलली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक एकमध्ये आम्ही अनेक वर्षापासून राहतो. परिसरात नळांना पाणी आलेच नाही. जलवाहिनी बदलण्याच्या मागणीची कुणी दखल घेत नाही. - मनीषा पाटील

पिण्याचे पाणी अतिशय कमी दाबाने येते. त्यामुळे रोज पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गोदावरीच्या काठावर असून पुरेसे पाणी मिळत नाही. - वंदना संत

आमच्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात यावी, अशी मागणी करून आम्ही थकलो आहोत. सहा वर्ष झाले तरी जलवाहिनी बांधण्याविषयी कुणीही गांभीर्याने घेत नाही. - समीक्षा निकम

जलवाहिनी फुटल्याने देवळालीवासीयांचे हाल म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीतील महालक्ष्मी मंदिर परिसरात तीन दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

देवळालीसह शहरात सुमारे ३.२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीवितरण योजनेअंतर्गत खोदकाम सुरू असतांना जेसीबीच्या प्रहारामुळे जुनी जलवाहिनी फुटली. त्यामुळे पिण्याचे पाणी रहिवाशांना मिळू शकले नाही. देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने टँकरद्वारे रहिवाशांना पाणीपुरवठा केला असला तरी पिण्याच्या पाण्याचा दर्जा योग्य नाही.

पाण्याचा अपव्यय एकीकडे पाणी वाचवा असा संदेश देणाऱ्या बोर्ड प्रशासनाकडून केवळ संबधित काम करणारे कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी काम करावयास गेले असल्याने या कामाकडे दुर्लक्ष केले जात असून या तुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.

बोर्ड प्रशासनाने जलवाहिनीच्या कामाची योग्य माहिती ठेवण्याची गरज आहे. निव्वळ हलगर्जीपणामुळे जलवाहिनी फुटली. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. - शंकर भोर

जलवाहिनी कामामुळे नळांना पाणीच आले नाही. त्यामुळे घरातील सगळी कामे सोडून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागली. - पल्लवी आडके







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहेब शौचालये मिळाली, ड्रेनेजलाइनचे काय?

$
0
0

सातपूरमधील महिलांचा महापालिका आयुक्तांना सवाल म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक महापालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी १२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रबुद्धनगर भागात बांधलेली शौचालयांची महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पथकासह मंगळवारी पहाणी केली. या वेळी महिलांनी साहेब शौचालये उभारली, पण ड्रेनेजची लाइन कधी टाकणार, असा सवाल उपस्थित केला.

स्वच्छ भारत अभियानात नाशिक महापालिकेने स्लम भागातील रहिवाशांना शौचालये उभारण्यासाठी आवाहन केले होते. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्लम भागातील रहिवाशांनी वैयक्तिकरित्या शौचालये राहत्या ठिकाणी बांधली आहेत. यात बहुतांश शौचालये उभारणाऱ्यांना बँकेचा ६ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. या शौचालयांची डॉ. गेडाम यांनी पथकासह पहाणी केला. याप्रसंगी महिलांनी साहेब शौचालय उभारले; पण ड्रेनेजलाइन कधी टाकणार, असा सवालच उपस्थित केला. याबाबत अधिक माहिती घेतली असता, महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने टाकलेले ड्रेनेज हे लाईन असल्याने नेहमीच चोकअप होत असते. परंतु, शौचालयांना जुन्या ड्रेनेजला जोडल्यास रोजच गटारीच्या पाण्यातून रहिवाशांना प्रवास करावा लागेल, असे महिलांचे म्हणणे आहे. महापालिकेने शौचालयांसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी महिलांनी पहाणी आयुक्तांकडे केली.

सुलभ इंटरनॅशनल काळ्या यादीत

गेडाम यांनी सुलभ इंटरनॅशनलने उभारलेल्या शौचालयांचीही पहाणी केली. बंद असलेली शौचालये सुरू कशी करता येतील, यावर लवकरच बैठकीत ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. चुकीचे काम करणाऱ्या सुलभ इंटरनॅशनलला काळ्या यादीत टाकणार असल्याचेह गेडाम म्हणाले. शौचालय पहाणी दौऱ्यात अतिरिक्त उपायुक्त जीवन सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. विजय ढेकाटे, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुनील बुकाणे, विभागीय अधिकारी चेतना केरुरे, विभागायी स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, राजू नेटावटे, बांधकाम उप-अभियंता रमेश पाटोळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

-आरोग्य विभागाने सूचना केल्यानुसार शौचालयाची उभारणी केली खरी; परंतु, सांडपाणी जोडण्यासाठी स्वतंत्र ड्रेनेजलाइनच नसल्याने विनावापर शौचालये पडून आहेत. महापालिकेने ड्रेनेजलाइन टाकली पाहिजे.

लक्ष्मीबाई आहिरे

रहिवाशी, प्रबुद्धनगर, रोहिदास चौक

प्रबुद्धनगरच्या स्लम भागात अगोदरच ड्रेनेजच्या चोकअपचा रोजच त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो. यात शौचालयांचे सांडपाणी जुन्या ड्रेनेजला जोडल्यास रोजच सांडपाण्यातून चालण्याची वेळ नागरिकांवर येणार. यासाठी स्वतंत्र ड्रेनेजची व्यवस्था महापालिकेने केली पाहिजे.

बेबी केदारे

रहिवाशी, प्रबुद्धनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विद्यापीठ स्वीकारणार पीएचडी ऑनलाइन पोर्टल

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड पीएचडीच्या वेळखाऊ प्रक्रियेला फाटा देत पारदर्शक प्रक्रियेसाठी रायगडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठा (बाटू)ने तयार केलेले पीएचडी पोर्टल आदर्श ठरत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठे हे पोर्टल स्वीकारण्याच्या प्रक्रियेत आहेत. दुबईत झालेल्या वर्ल्ड एज्युकेशन अॅवार्ड स्पर्धेत या पीएचडी ऑनलाइन पोर्टलला कलेटिव्ह ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिसेस इन एज्युकेशन विभागाच्या एल‌िट ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले आहे.

देशभरातील विविध विद्यापीठांतून पीएचडी प्रक्रियेच्या गुणवत्तेबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. पीएचडीची देण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि संशोधन याचा फेरआढावा घेण्याची गरज असतानाच, वेळखाऊ प्रक्रियेमुळे उमेदवारांकडून मनस्ताप व्यक्त केला जातो. यामुळे ‌विद्यापीठांना सतत टिकेचा सामना करावा लागतो. अशाच स्थितीतून रायगडच्या लोणेरे येथील `बाटू`लाही जावे लागले होते. यातून मार्ग काढण्यासाठी माजी कुलगुरू राजू मानकर व परीक्षा नियंत्रक योगेश पाटील यांनी पीएचडीची प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी प्रयत्न केले. यातून `बाटू`चे ऑनलाइन पीएचडी पोर्टल २०१२ मध्ये तयार केले. या पोर्टलमुळे पीएचडी प्रवेशप्रक्रिया ते अगदी प्रबंध जमा केल्यानंतर एका टाइम बाँडमध्ये तो तपासला जातो आहे की नाही याचा ट्रॅक विद्यापीठासह उमेदवारालाही ठेवता येतो. यामुळे पीएचडी करणाऱ्यांना आपला प्रबंध कोणत्या स्तरावर आहे हे पहाता येते. पोर्टल बनविल्यानंतर विद्यापीठातील इंजिनीअरिंग व बेसिक सायन्सच्या २२ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. सध्या १०५ विद्यार्थी विद्यापीठात पीएडी करीत आहेत.

दिल्ली झालेल्या विद्यापीठांच्या परिषदेतही विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक योगेश पाटील यांनी पीएचडी पोर्टलचे सादरीकरण केले होते. या परिषदेतही या पोर्टलला बेस्ट ईआरपी इन हाऊस हा पुरस्कार मिळाला होता.

याबाबत अधिक माहिती देताना योगेश पाटील म्हणाले,' पीएचडी प्रक्रियेसाठी केंद्राने स्थापन केलेल्या आगरवाल कमिटीने `बाटू`च्या ऑनलाइन पोर्टलचे कौतुक केले आहे. देशभरातील विद्यापीठांनी या पोर्टलप्रमाणे पीएचडीची प्रक्रिया राबविणे सोईचे असल्याचे म्हटले आहे. यामुळे फुले पुणे विद्यापीठाने `बाटू`कडून हे पोर्टल घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठही याप्रमाणे पोर्टल बनविणार आहे. देशभरातील विद्यापीठाकडून

`बाटू`च्या पोर्टलबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ही विद्यापीठासाठी अभ‌िमानाची गोष्ट आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यशवंत’चा शतकमहोत्सव झाकोळला आर्थिक विवंचनेत

$
0
0

अवघा सहा लाखांचा निधी शिल्लक; सेवकांच्या पगाराचे वांधे

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : शंभर वर्षांपासून नाशिकमधील तरुणांच्या बलसंवर्धनाचे काम करणाऱ्या यशवंत व्यायामशाळेने शंभरी गाठली आहे. मात्र, केवळ आर्थिक विवंचना असल्याने महाराष्ट्रातल्या या संस्थेला शतक महोत्सव साजरा करता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

नाशिकमधील नावाजलेली यशवंत व्यायाम शाळा १ मार्च २०१६ रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. एव्हाना या संस्थेने शतकमहोत्सवी वर्षात होणाऱ्या कार्यक्रमांची यादी प्रसिध्द करणे गरजेचे होते. मात्र, व्यायामशाळेकडे अवघे सहा लाख रुपये शिल्लक असून, येणाऱ्या काळात सेवकांच्या पगारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे कार्यक्रमांचे नियोजन करता येणे शक्य नसल्याची चर्चा व्यायामशाळेच्या वर्तुळात आहे.

शहरातच नव्हे तर महाराष्ट्रात या संस्थेची ख्याती आहे. कृष्णाजी बळवंत महाबळ यांनी १ मार्च १९१७ रोजी गोदावरी काठी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज संस्थानच्या प्रांगणात या व्यायाम शाळेची स्थापना केली. त्यावरुनच या व्यायाम शाळेला यशवंत हे नाव देण्यात आले. 'राष्ट्रास रक्षण्याला व्यायाम मंत्र घ्यावा' हे संस्थेचे ब्रीद असून, देशाला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी निरोगी पिढी तयार व्हावी यासाठी या व्यायाम शाळेची स्थापना करण्यात आली तेव्हा ९९ वर्षापासून या संस्थेचे अविरत कार्य सुरू आहे. या संस्थेत मल्लखांब जिम्नॅस्टीक, कबड्डी, खो-खो बास्केटबॉल इत्यादी प्रकारचे खेळ शिकवले जातात. ९९ वर्षाच्या कालखंडात या व्यायाम शाळेने अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तर तयार केलेच; सोबत सरकारी अधिकारी, पोलिस अधिकारीही दिले आहेत. आज येथून बाहेर पडलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात जाईल.

आम्हाला तर पत्र्यांची चिंता!

संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याला शतकमहोत्सवी वर्षानिमित्त कोणते कार्यक्रम आयोजित करणार? असे विचारले. त्यावर तो म्हणाला, कार्यक्रम तर लांबची गोष्ट आहे. आम्हाला येणाऱ्या पावसाळ्याचे नियोजन करायचे आहे. वरचे पत्रे बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यंतरी या जागेवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पार्किंगचा विचार केला होता. मात्र, यावेळी नाशिक शहरातील क्रीडा प्रेमींनी एकत्र येऊन त्याला तीव्र विरोध केला. नाशिकची क्रीडा संस्कृती संपुष्टात आणणाऱ्यांना क्रीडा प्रेमींनी चांगला धडा दाखवला.

लोकप्रतिनिधींनो पुढाकार घ्या!

एखाद्या स्पर्धेवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शतकोत्तर महोत्सवी वर्षात आयोजित होणाऱ्या कार्यालक्रमाला हातभार लावून व्यायाम संस्कृती टिकावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधींच्या रकमेतून शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्याला संस्थेला मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. सोबतच, ज्या व्यायामशाळेमुळे नोकरीला लागणारे असंख्य खेळाडू शहरात व शहराबाहेर आहेत, त्यांनी प्रत्येकाने थोडा जरी हातभार लावला तरी संस्थेला चांगले दिवस येतील. शतकमहोत्सवीही वर्ष उत्साहात साजरे होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरित लवादापुढे २ मार्चला सुनावणी

$
0
0

बांधकाम परवानगी थांबविण्याविरोधात महापालिकेचे अपील म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील बांधकाम परवानगी थांबविण्याच्या हरित लवादाच्या आदेशाविरोधात महापालिकेने अपील दाखल केले आहे. पालिकेच्या या अपिलावर येत्या बुधवारी (२ मार्च) सुनावणी होणार आहे. महापालिकेच्या वतीने अॅड. रघुनाथ महाबळ यांनी अपिल दाखल केले आहे. त्यामुळे बांधकामांच्या परवानग्यांवरील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे आहेत.

कचऱ्याच्या प्रश्नांवरून हरित लवादाने नाशिकमधील बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून शहरातील बांधकाम परवानग्या थांबल्या असून, बिल्डरांसह ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. शहराचा विकास ठप्प झाला असल्याने व्यावसायिक अस्वस्थ आहेत. तर हरित लवादाच्या निर्णयाला वरच्या न्यायालयात अपील केल्यास निकाल विरोधात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेने या निर्णयाला पुण्याच्या हरित लवादात पुर्नविलोकन याचिका दाखल निर्णय घेतला आहे. महापालिकेने या संदर्भात प्रतिज्ञापत्र तयार केले असून, हरित लवादाचे अॅड.रघुनाथ महाबळ अॅड कंपनी यांना वकीलपत्र दिले आहे. अॅड.महाबळ ही अपील अर्ज दाखल केले असून, त्यावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे बुधवारी बांधकाम परवानग्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images