Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

केंद्रीय पथकही झाले आवाक्

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकऱ्यांच्या अर्थकारणातील कांदा पिकाला गेल्या काही दिवसांपासून मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने लासलगाव बाजार समितीला अन्न नागरी पुरवठा मंत्रालयातील संचालक जाकीर हुसेन आणि उपसंचालक दिनेश कुमार यांच्या पथकाने भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उत्पादन खर्चाचा ताळेबंद समितीपुढे मांडल्याने समितीचे सदस्यही आवाक् झाले.

लासलगाव कृषी उत्पन बाजार समितीमध्ये कांद्याची आवक गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने कांदादरात घसरण सुरू आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गत आठवड्यात जिल्ह्यातील बाजार समितीत भाव घसरल्याने लिलावही बंद झाले होते. कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणातील अनियमितता दिसून आल्याने दिल्ली येथील अन्न नागरी पुरवठा मंत्रालयातील संचालक यांनी लासलगाव बाजार समितीला भेट देऊन सभापती नानासाहेब पाटील, कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी चर्चा केली.

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी लासलगावमध्ये कोल्ड स्टोअरेज उभारण्याची मागणी केली. यावेळी पणन महामंडळाचे चंद्रशेखर बारी, निफाडचे तहसीलदार संदीप आहेर, बाजार समिती संचालक राजाराम दरेकर, व्यापारी प्रतिनिधी नितीन जैन, मनोज रेदासनी, सचिव बी. वाय. होळकर, राजाराम काळे, निवृती न्याहारकर आदी उपस्थित होते.

मागणी आणि पुरवठ्यात समतोल साधणार कांद्यास मिळालेला भाव आणि उत्पादनास झालेला खर्च बघता हातात काहीच शिल्लक राहत नसल्याचे या पथकाच्या लक्षात आले. घाऊक बाजारात हा कांदा पाच ते सहा रुपयांनी विकला असला तरी शहरात हाच कांदा २५ ते ३० रुपये किलो विकला जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात इतका फरक कसा पडत आहे, असा प्रश्न या समितीलाही पडला. येणाऱ्या काळात कांदा भावामध्ये अनियमितता राहू नये, मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल राहावा यासाठी हा दौरा असल्याचे या पथकाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा करतोय पुन्हा वांधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

एकीकडे दुष्काळाच्या दाहकतेचे चटके सोसताना मेटाकुटीस आलेला शेतकरी आता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या कांदा बाजारभावामुळे हवालदिल झाला आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत महिनाभरापूर्वी प्रतिक्विंटल हजार ते बाराशे असलेला कांदा गेल्या तीन चार दिवसात खाली खाली येऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पुन्हा वांधा झाला आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून रांगडा कांद्याचे बाजारभाव सातत्याने कोसळत आहेत. महिनाभरापूर्वी हजार ते बाराशे रुपये क्विंटल असलेला कांदा गेल्या काही दिवसात तब्बल ६०० ते ७०० रुपयांनी खाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात या आठवड्यातील बुधवारी १५ हजार ५५४ क्विंटल रांगडा कांद्याची आवक होताना त्याला प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल १११४ (सरासरी ७००) असा बाजारभाव मिळाला होता. गुरुवारी या आवारात ९ हजार १६७ क्विंटल रांगडा कांदा शेतकऱ्यांकडून विक्रीला आणला जाताना त्याला किमान ३०० ते कमाल ९९२ (सरासरी ६५०) असा बाजारभाव मिळाला. शुक्रवारी जवळपास १४ हजार क्विंटल इतकी आवक होताना देखील अशीच काहीशी परिस्थिती होती.

अर्थचक्र कोलमडले रांगडा कांद्याचे बाजारभाव गडगडू लागल्यानं शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडून पडलं आहे. रांगडा कांदा पीक घेताना शेतीची मशागत, बियाणासाठी मोजावे लागलेले दाम, बरोबरच सेंद्रिय खतांसह रासायनिक खते, किटकनाशके फवारणी, मजुरी, कृषीपंपाचे वीजबिल, वाहतूक खर्च आदी सर्व बघता सध्या कांदा विक्रीनंतर हाती पडणारे दाम यातून ताळमेळ बसणे मुश्कील झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांचे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहरात रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांना धान्य वाटपात विलंब होत आहे. तसेच, धान्य वाटप नियमांनुसार होत नसल्याने अशा धान्य दुकानदारांवर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस आमदार आसिफ शेख यांनी येथील तहसील कार्यालयाबाहेर एकदिवसीय लक्षणिक धरणे आंदोलन केले.

शहरातील धान्य व रॉकेल वाटप दुकानदार पिवळे व अंत्योदय कार्डधारकांना शासकीय आदेशानुसार वाटप करीत नसल्याची तक्रारी आमदार आसिफ शेख यांच्याकडे लाभार्थ्यांकडून करण्यात आल्या. त्यानुसार आमदार शेख यांनी २७ जानेवारी रोजी या संदर्भात तहसीलदारांकडे लेखी स्वरुपात निवेदन करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, अद्याप देखील अशा अनियमित दुकानदारांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने त्यांनी हे धरणे आंदोलन केले. प्रांत अजय मोरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन यासंबंधी कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस नगरसेवक असल्म अन्‍सारी, शकील बेग, खुशीद अस्लम, जमील मौलाना, कालिम खान मन्सुरी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले.

हॉकर्स झोन निश्चित करा

मालेगाव मनपाकडून हाती घेण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम स्तुत्य आहे. मात्र, या मोहिमेदरम्यान रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर अन्याय होत आहे. तसेच, अतिक्रमण हटवण्यात आलेल्या भागात रस्त्यालगत असलेले विजेचे व टेलिफोनचे खांब तसेच आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने हॉकर्स झोनची निर्मिती करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विभागाचे वर्चस्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नाशिक जिल्हा हौशी रोलबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेत पुणे संघाने आपले वर्चस्व राखले. विभागीय क्रीडा संकुलातील मीनाताई ठाकरे इनडोअर हॉलमध्ये बुधवारी समारोप झाला.

स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सभापती अॅड. नितीन ठाकरे, फिल्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष कुणाल पाटील, विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी महेश पाटील, राज्य संघटनेचे सचिव प्रताप पगार, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, जिल्हा सचिव बाळासाहेब रायते, स्पर्धा संयोजक संजय होळकर आदी उपस्थित होते.

बुधवारी झालेल्या स्पर्धेत १९ वर्षांआतील मुलींच्या गटात अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात होऊन पुणे संघाने सहा विरुद्ध तीन गोलने सामना जिंकला. तर तृतीय क्रमांक मुंबई विभागाने प्राप्त केला. मुलांच्या स्पर्धेत अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात होऊन पुणे संघाने चार विरुद्ध तीन गुणांनी विजय संपादन केला. तर तृतीय क्रमांक अमरावती संघाने मिळविला.

१४ वर्षे वयोगटात मुलांचा अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झाला. त्यात सहा विरुद्ध दोन गोलने पुणे संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर तृतीय क्रमांक नाशिक (नंदुरबार) विभागाच्या संघाने प्राप्त केला. मुलांच्या गटात अंतिम सामना नागपूर विरुद्ध पुणे यांच्यात होऊन नागपूर संघ विजयी झाला. तृतीय क्रमांक मुंबई विभागाने प्राप्त केला.

या सर्व विजयी संघांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पदके व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्पर्धेसाठीचे संघ निवडण्यात आले. निवडसमिती सदस्य म्हणून रवि देसाई, अमित पाटील, प्रभाकर वडवेराव, रफिक इनामदार, बाळासाहेब रायते, नंदू पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखभर कामगारांवर गदा!

$
0
0

वीजदरवाढीमुळे उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांनी व्यक्त केली भीती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांना वीज सवलतीपासून दूर ठेवले, तर जिल्ह्यातील उद्योग बंद पडून एक लाख कामगारांच्या रोजगारावर गदा येईल, अशी भीती नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (निमा) व्यक्त केली आहे. याबाबतची कैफियत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडली.

निमाचे जिल्ह्यात सहा हजार सभासद आहेत. युती सरकारच्या मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर उद्योग वाढीसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये नाशिकमधील उद्योजकही योगदान देणार आहेत. १९ जानेवारी रोजी ऊर्जा मंत्र्यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. राज्यात केवळ मराठवाडा आणि विदर्भात सवलतीच्या दरात वीज देण्यात येणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले. त्यामुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर करणारे सर्व उद्योग अडचणीत येतील, अशी भीती उद्योजकांमधून व्यक्त होत आहे. याबाबतची कैफियत मांडण्यासाठी उद्योजकांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेतली. येथील अनेक उद्योग सध्या मंदीचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात दोन विभागांत वेगवेगळा औद्योगिक वीजदर लागू केला, तर उत्तर महाराष्ट्रातील उद्योग टिकाव धरू शकणार नाहीत ही बाब कुशवाह यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

‌ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी, अशी विनंती कुशवाह यांना करण्यात आली. यावेळी निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, मंगेश पाटणकर, विवेक पाटील, राजेंद्र अहिरे, मिलिंद राजपूत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलपंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार सातपूर परिसरातील कुबेर पेट्रोल पंपावर घडला. विशेष म्हणजे सकाळी हा प्रकार घडूनही सातपूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल केला नव्हता.

देविराज बबन निंबेकर (वय २२) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अशोकनगर परिसरातील दोन तरूण मोटरसायलकवरून पंपावर आले. पेट्रोल टाकीवर सांडले. त्यामुळे संतप्त झालेल्या मोटरसायकलस्वारांपैकी एकाने निंबेकर यांच्या श्रीमुखात मारली. त्याचवेळी दोहोंपैकी एकाने जवळील चाकू काढून निंबेकर यांच्या मानेवर आणि पोटावर वार केले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोनल कुस्ती स्पर्धेत येवल्याचा संदीप चव्हाण प्रथम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नाशिक येथील के. के. वाघ पॉलिटेक्निक येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व इंटर इंजिनीअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स असोसिएशनचे वतीने घेण्यात आलेल्या झोनल लेव्हल कुस्ती स्पर्धेत एस. एन. डी. पॉलिटेक्निकचा इलेक्ट्रिक विभागातील विद्यार्थी संदीप चव्हाण यांने प्रथम क्रमांक पटकावला.

संदीप हा येवला तालुक्यातील वाईबोथी येथील रहिवासी असून गावात व तालुक्यात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. संदीप चव्हाण याच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक किशोर दराडे, प्राचार्य अनंत जोशी, उपप्राचार्य गितेश गुजराथी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. संदीप ह्यास प्रा. संदीप असुंदे, प्रा. प्रवीण लहरे, प्रा. किरण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रातील सहाय्यक लिपिक निलंबित

$
0
0

इगतपुरी : तालुक्यातील वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका महिला कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निलंबित केले आहे.

वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक लिपिक राजकमल रामचंद्र भोये या गत तीन वर्षांपासून आरोग्य केंद्रात अनियमित येत असल्यामुळे व मुख्यालयी न राहता कार्यालयीन कोणतेही कामकाज करीत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील मानव विकास कार्यक्रमांचे ऑडिट वेळेवर न केल्यामुळे मानव विकास कार्यक्रमांचे सन २०१४-१५ व २०१५-२०१६ चे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील लाभार्थी वंचित राहिले. त्याचप्रमाणे रुग्ण कल्याण समितीचेही ऑडिट न केल्यामुळे सन २०१५-२०१६ चे अनुदान मिळाले नाही.

दरम्यान, मातृत्व अनुदान, आशांना मिळणारे अनुदान व कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे अनुदान लाभार्थ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी इगतपुरीच्या पंचायत समिती कार्यालयात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठ करणार सक्षम

$
0
0

कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा आशावाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यापीठाचे विभाजन रोखण्यासाठी विद्यापीठाची बचाव कृती समिती ठोस पावले उचलत आहे. मजबुतीकरणाने विद्यापीठाचे विभाजन रोखण्याचा प्रयत्न करू, असा आशावाद महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारल्याने आरोग्य विद्यापीठात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठ विभाजनाचा प्रश्न अद्याप माझ्यापर्यंत आला नसून, त्याची माहिती करून घेणार असल्याचे ते म्हणाले. नाशिकमधील विद्यापीठाचे नागपूरसाठी विभाजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, विद्यापीठ सक्षम केल्यास विभाजन होणे शक्य नाही. येथे वैद्यकीय क्षेत्रात आंतरविद्याशाखा संशोधन व आरोग्य संवाद यांचे महत्त्व मोठे आहे. याला न्याय देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या संशोधनाला वाव देण्याची गरज आहे. यासाठी यूजीसीच्या निकषांचा अभ्यास करून त्यांच्याकडून सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. या सहकार्याचा फायदा विद्यापीठाच्या प्रगतीस होऊ शकेल. राज्यात सर्वच पॅथीच्या पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा कमी असल्याने काही डॉक्टरांना फेलोशिप व इतर अभ्यासक्रम देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने १९९८ मध्ये केलेल्या कायद्यानुसार देशातील तीन विद्यापीठांना स्वायत्ता मिळाली. आरोग्य विद्यापीठालाही पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्वायत्ता मिळाल्यास त्याचा लाभ विद्यापीठाला होईल, असे ते म्हणाले. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या अभ्यासक्रमाबाबत ते म्हणाले की, अभ्यासक्रम बदलला नसून, केवळ तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यातील क्रम बदलण्यात आला आहे. तसेच, नाशिकमधील सरकारी हॉस्पिटल्स रिकामी पडू नयेत, यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या डॉक्टरांना संवाद कौशल्य शिक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले. परिषदेस कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ, परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्क्रिप्ट असावी प्रेक्षकांना आवडणारी

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

शब्दांशिवाय जे साहित्य मांडण्यात रस असतो, त्याला पटकथा म्हणतात. शब्दांपेक्षाही चित्रस्वरुपात लवकर आकलन होते. प्रचंड संवादांपेक्षा चित्रस्वरूपात गोष्टी बघण्यास तरूण प्राधान्य देतात. प्रेक्षकांना जे हवे आहे, त्यानुसार आपली स्क्रिप्ट असायला हवी, असे प्रतिपादन पटकथा, चित्रपट लेखक संजय पवार यांनी केले.

एचपीटी कॉलेजच्या जर्नालिझम विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय स्क्रिप्ट रायटिंग कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेला शुक्रवारी प्रारंभ झाला. प्री. टी. ए. कुलकर्णी हॉलमध्ये झालेल्या उद्घाटन समारंभावेळी 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहाय्यक संपादक इब्राहीम अफगाण, माध्यमतज्ञ संजीव लाटकर, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, जर्नालिझम विभाग प्रमुख डॉ. वृंदा भार्गवे व्यासपीठावर उपस्थित होते.

स्क्रिप्ट रायटिंग म्हणजे काय? डॉक्युमेंट्रीसाठी स्क्रिप्ट रायटिंग कसे असावे? त्याचे नियम किंवा त्यातील सुसूत्रता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत पवार यांनी लेखनाबाबतची नवी गरज तसेच साहित्यात असणारी नावीन्यता कशी जपली जावी याबाबत मार्गदर्शन केले. शुद्धलेखनाप्रमाणे स्क्रिप्ट रायटिंग ठरवता येत नाही असा सल्ला दिला.

अफगाण यांनी विद्यार्थ्यांसमवेत चर्चात्मक संवाद साधला. विद्यार्थ्यांप्रती डॉक्युमेंट्रीचे नेमके कोणते विषय असायला हवेत हे यावेळी जाणून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्री बनवतांना लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी समजावून सांगण्यात आल्या. कमी खर्चात सर्वाधिक माहिती डॉक्युमेंट्रीमध्ये दाखविण्यात यावी. डॉक्युमेंट्रीचा आत्मा हा रिसर्च आहे. एडिटरची भूमिका महत्त्वाची असते. त्याच्या दृष्टिकोनातून दाखवली गेलेली खरी विचारप्रणाली प्रेक्षकांवर रुजते, असे अफगाण यांनी सांगितले. लाटकर यांनी डॉक्युमेंट्री आणि स्क्रिप्टबद्दल तिसऱ्या सत्रात माहिती दिली. डॉक्युमेंट्रीमधून वास्तव्याची जाणीव व्हायला हवी. डॉक्युमेंट्री लेखकांची भूमिका तटस्थ असावी. याचसोबत संजीव लाटकरांनी काही ग्रुप्स करून एका विषयावर स्क्रिप्ट रायटिंगची स्पर्धा घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या राज्यस्तरीय स्क्रिप्ट रायटिंग कार्यशाळेत राज्यभरातून विद्यार्थी, प्राध्यापक, हौशी अभ्यासक उपस्थित होते.

हे करणार मार्गदर्शन आज (१३ फेब्रुवारी) पटकथा लेखिका सई लळीत, माहितीपट अभ्यासक जगदीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सकाळी ९.३० वाजता कॉलेजच्या प्री. टी. ए. कुलकर्णी हॉल येथे ही कार्यशाळा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकूल योजनेला मुदतवाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेअंतर्गत (जेएनयूआरएम) शहरात राबविण्यात येत असलेली घरकूल योजना धिम्या गतीने सुरू आहे. तिला केंद्राने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. महापालिकेला आता मार्च २०१७ पर्यंत घरकूल योजना पूर्ण करायची असून आता केवळ वर्षभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. गेल्या आठ वर्षात आतापर्यंत १६१७ नागरिकांना प्रत्यक्ष घराचा ताबा देण्यात आला असून तीन हजार घरांची हस्तातंरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे वर्षभराच्या अवधीत घरकूलांचे काम पूर्ण करण्याचे आवाहन यंत्रणेसमोर आहे.

'जेएनयूआरएम' अंतर्गत शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने घरकूल योजना राबविण्यात आली. सुरुवातीला १६ हजार घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. प्रत्यक्षात हे उद्दिष्ट आता ७ हजार ४६० पर्यंत आले आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ४१४० घरे हस्तांतरणासाठी तयार आहेत. यापैकी २८३४ घरे हस्तांतरित झाले असून त्यात १६१७ घरकूलांचा प्रत्यक्षा ताबा देण्यात आला आहे. चुंचाळेची मोठी योजना ही रखडली असून ३७६० घरांपैकी केवळ ५०० घरांचा ताबा देण्यात आला आहे. बांधकाम साहित्य महागल्याने ठेकेदारांना दर वाढविण्याची मागणी केली. मात्र, महापालिकेने आता ती फेटाळली असून या ठिकाणच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. एसटी बस, आरोग्यसेवा, शाळा आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.

योजनापूर्तीचे आव्हान सन २००८ पासून ही योजना सुरू आहे. मात्र, घरकूलांच्या बांधणीचे काम संथ गतीने सुरू आहे. केंद्र सरकारने आता ही योजना पूर्ण करण्यासाठी मार्च २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात ही योजना पूर्ण करण्याचे आव्हान बांधकाम विभागाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकरी अन् ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातत्याने कांदादरात होणाऱ्या चढ-उतारांवर तोडगा काढण्याबाबत प्राप्त झालेल्या सूचना केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यात येतील. किमान मूल्यावर आधारीत बाजारभावाद्वारे शेतकऱ्याला दिलासा देतानाच ग्राहकालाही केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही नाशिक भेटीवर आलेल्या केंद्रीय समितीने दिली.

कांद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारांची दखल घेऊन त्याबाबतची माहिती घेण्यासाठी वर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक मोहमद झाकीर हुसेन व दिनेशकुमार यांची समिती नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. या समितीने लासगाव बाजार समितीला भेट देऊन कांदा आवक व दराची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कांद्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार गंभीर असल्याची माहिती या समितीने दिली. कांद्याचे दर कोसळल्याने जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे समितीने स्पष्ट केले.

कांदा उत्पादक शेतकरी व ग्राहकांना समाधानकारक भाव कसा देता येईल, कांद्याचे दर कोसळण्याची कारणे, कांद्याची आवक, लागवड, बाजार समित्यांमधील लिलावाची पध्दती, कांदा साठवणुकीसाठी असणाऱ्या सुविधा आदींची माहिती घेण्यात आली. तसे च उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व कृषी व पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कांदादराच्या चढ-उतारांवर तोडगा काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याचा आढावा घेण्यात आला.

अहवालाव्दारे पोहोचविणार समस्या

कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्याला प्रति क्विंटल चारशे ते सहाशे रुपये तोटा होत असल्याची वस्तुस्थिती समितीने मान्य केली. कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणे, शेतकऱ्याला कांदा चाळ बांधण्यासाठी अधिकाधिक अनुदान देणे, कांद्याला हमी भाव देणे, कांदा प्रक्रिया उदयोग सुरू करणे यांसारख्या सूचना अहवालाद्वारे केंद्र सरकारपर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमित शहा, दानवे आज ऋषभदेव चरणी

$
0
0

मांगीतुंगी परिसराची कसून तपासणी

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

श्री क्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव यांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याला उपस्थिती व दर्शनासाठी अखिल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब दानवे यांचे आज (१३ फेब्रुवारी) मांगीतुंगी येथे दुपारी एक वाजता आगमन होत आहे. देवस्थान व मूर्ती निर्माण कमेटीच्या वतीने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

शहा व दानवे यांच्याबरोबरच खासदार हरिश्चंद्र चव्हाण, डॉ. सुभाष भामरे, आमदार राजेंद्र पटणी, आमदार अतुल सावे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयांनी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार दीपिका चव्हाण, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू आदी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी दीड वाजता मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर भगवान श्री ऋषभदेव यांच्या मूर्तीच्या दर्शनासाठी ते रवाना होऊन मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा, खासदार रावसाहेब दानवे हे प. पू. गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी, प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी व कर्मयोगी पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजी यांची भेट घेणार आहेत. यानंतर सर्वतोभद्र महल या ठिकाणी उपरोक्त मान्यवर अतिथींचा सत्कार सोहळा व महासभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय मंत्री संजय पापडीवाल, भूषण कासलीवाल व जीवनप्रकाश यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फाळके’चा ठेकेदार गायब

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाच्या साफसफाई नियुक्त केलेला ठेकेदाराने दोन महिन्यांपासून काम सोडल्याने स्मारकाच्या सफाईसाठी असलेले ४७ कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांना वेतनच मिळाले नसल्याचा दावा शिवसेना कर्मचारी सेनेचे प्रमुख शिवाजी सहाणे यांनी केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्याच एका बड्या नेत्याने मध्येच काम सोडल्याने कामगारांवर ही वेळ आली आहे. दरम्यान प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर कामगारांच्या वेतनासाठी स्थायीवर प्रस्ताव ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

फाळके स्मारकाच्या सफाईचे काम जय बजरंग स्वंय सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले. त्यांच्यातर्फे ४७ कामगार कार्यरत आहेत. सन २०१३ पासून सदर कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, संबंधित संस्थेने डिसेंबरमध्येच काम सोडल्याचे पत्र महापालिकेला दिले.

महापालिकेने नवीन ठेकेदार नेमण्याबाबत कारवाई न केल्याने कामगार विना ठेकेदारच काम करत आहेत. ठेकेदाराने काम सोडण्यापूर्वी संबंधित कामगारांचे वेतनही थकविले. ठेकेदार संस्था शिवसेनेच्या एका नेत्याची आहे. सध्या हे कामगार फाळके स्मारकाची साफसफाई करत असले तरी त्यांना कुणी वाली नाही. त्यामुळे या कामगारांनी शुक्रवारी शिवसेना म्युनिसीपल कर्मचारी सेनेचे शिवाजी सहाणे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेतली.या वेळी कामगारांनी पूर्वीच्या ठेकेदाराचे रक्कम थांबवण्याची मागणी करत, आमचे थकीत वेतन द्या, असा टाहो फोडला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी संबंधित कामगारांच्या वेतनासाठी स्थायी समितीवर प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

फाळके स्मारकाबाबत उदासीनता

फाळके स्मारक सफाई ठेकेदाराने डिसेंबरमध्ये काम सोडल्याचे पत्र दिले. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या पत्राकडे दुर्लक्ष केले. कामगारांनी कोणाच्या आदेशाची वाट न पाहता नाशिकचा हा अमूल्य ठेवा स्वच्छ ठेवण्याचे कार्य सुरूच ठेवले. त्याच वेळी प्रशासकीय यंत्रणेन फाळके स्मारकाबाबत उदासीनता दाखवली. त्यामुळे यंत्रणेच्या या निष्काळजीपणावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरपाडा एक्स्प्रेस’ ‌निघाली रिओ ऑलिम्पिकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गोहत्ती येथे १२ व्या साऊथ एशियन गेम्समध्ये महिलांच्या ४२ किमी मॅरेथॉन प्रकारात नाशिकची धावपटू कविता राऊत हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. जागतिक स्तरावर भारताचा झेंडा रोवणाऱ्या कविताच्या या यशाबरोबरच तिचा रिओ ऑलिम्पिकमधील सहभागही निश्चित झाला आहे.

इंदिरा गांधी स्टेडियमवर शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजता स्पर्धा पार पडली. कविताने ४२ किलोमीटर अंतर २ तास ३८ मिनिटे ३८ सेकंदात पूर्ण करुन यशाला गवसणी घातली. प्रतिस्पर्धी आणि तिच्यात तब्बल १२ मिनिटांचा फरक होता. श्रीलंकेची ए. जी. राजा सेकरा हीने हेच अंतर २ तास ५० मिनिटे आणि ४७ सेकंदात पूर्ण केले. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेच्याच बी. जी. एल. अनुराधी हीने हेच अंतर २ तास ५२ मिनिटे १५ सेकंदात पूर्ण केले. चौथ्या क्रमांकावर भारताचीच ज्योती गवते होती. तिने २ तास ५४ मिनिटे ३३ सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. पाचवा क्रमांक नेपाळच्या खडका स्वरुपा हिला तर सहावा क्रमांक नेपाळच्याच पुष्पा भंडारी हिला मिळाला. `सावरपाडा एक्स्प्रेस`च्या या यशामुळे अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाल्याची भावना नाशिकमधील खेळाडूंनी व्यक्त केली. कविताला अनेक दिवसापासून हुलकावण्या देणारे यश पदरात पडल्याने नाशिकच्या खेळाडूंनी भोसला स्कूलच्या मैदानावर आनंदोत्सव साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइल दुकानात चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

म्हसरूळ परिसरातील पुष्पकनगरमध्ये बंद दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने मोबाइल तसेच अॅक्सेसरीज चोरून नेले. उमेश देवीदास जाधव (वय २७, रा. सनदे प्लाझा, पुष्पक नगर) यांचे वृंदावन प्लाझा या इमारतीत दुकान आहे. रविवारी (दि. ७) रात्री चोरट्यांनी गाळ्याचे शटर उचकटून दुकानातील मोबाइल फोन, इयरफोन, मोबाइल बॅगकव्हर, सीमकार्ड असा सुमारे पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. म्हसरूळ पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मंगळसूत्र हिसकावले

सातपूर एमआयडीसीमधील एका कंपनीसमोरून पायी चालेल्या सुरेखा भिमाशंकर जोशी (वय ५२, रा. तारामंडल सोसायटी, पारिजातनगर) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटरसायकलस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. रात्री पावणेदहाच्या सुमारास त्या अरुण वायर कंपनीसमोरून पायी चालल्या होत्या. त्यावेळी मागून आलेल्या मोटरसायकलस्वारांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकासून नेले. जोशी यांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

मोबाइल लांबविला

पंचवटीतील फुलेनगरमध्ये भाजीपाला खरेदीसाठी गेलेले संजय काळे (रा. सुख आनंदा निवास, इंदिरानगर) यांच्या खिशातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्यांनी लांबविला. पंचवटी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

एकास बेदम मारहाण

आमच्या भानगडीत लक्ष घालू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने संशयित राहुल कापसे व ऋषिकेश दाते यांनी प्रवीण बोडके (रा. महालक्ष्मीनगर अंबड) यांना बेदम मारहाण केली. अंबड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दखल केला आहे.

जुगार अड्ड्यावर छापा

सावित्रीबाई फुलेनगर झोपडपट्टीजवळील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. तीन पत्ती जुगार खेळणारे संशयित सुनील रामदास सुरवडे (वय ३५, निलगिरी बाग) व अन्य तिघांवकडून ७४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

सातपूर एमआयडीसीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका जणाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ११) दुपारी ही घटना घडली. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन कंपनीसमोर दुपारी दीडच्या सुमारास भरधाव वाहनाने एका व्यक्तीला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तरुणाची आत्महत्या

राहत्या घरी गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. म्हसरूळ परिसरात ही घटना उघडकीस आली. आकाश फकिरा गांगुर्डे (वय २४, रा. राजवाडा, म्हसरूळ) असे त्याचे नाव आहे. म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश एकटाच राहत होता. नैराश्यातून त्याला दारूचे व्यसन जडले. यातूनच त्याने सकाळी दहाच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले.

महिलेची आत्महत्या

राहत्या घरी विषारी औषध सेवन करून महिलेने आत्महत्या केली. इगतपुरी तालुक्यातील मुंडेगावात ही घटना घडली. म्हळसाबाई सुरेश मोसे (वय ५९) असे तिचे नाव आहे. चार फेब्रुवारीला रोजी दुपारी त्यांनी विषारी औषध सेवन केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योती मालवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेसाठी नाशिककरांचे ‘ट्विटर उड्डाण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विमानसेवेसाठी आसुसलेल्या नाशिककरांनी ट्विटरवर सुरू केलेल्या मोहिमेला तुफान प्रतिसाद लाभत असून, शुक्रवारी हा ट्रेंड हिट ठरला आहे. उत्स्फूर्तपणे नाशिककरांनी ही मोहीम सुरू करून देशभरातील नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींना टॅग करीत आपल्या भावना पोहचविल्या आहेत.

नाशिकच्या विमानसेवेला लागलेले ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. एअर इंडियाने २७ मार्चपासून नाशिक-मुंबई-नाशिक विमानसेवेची घोषणा केली आहे. मात्र, मुंबई-आग्रा हायवेच्या चौपदरीकरणामुळे नाशिक-मुंबई हे अंतर जवळ आले आहे. त्यामुळे नाशिककरांना मुंबई वगळता अन्य शहरांसाठी विमानसेवेची अपेक्षा आहे. एअर इंडियाच्या सेवेत मुंबईसाठी गैरसोयीच्या वेळा मिळणार असल्याने त्यास कितपत प्रतिसाद लाभेल यात शंकाच आहे. हॉपिंग फ्लाईटसारखा प्रभावी पर्याय असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

आघाडी सरकारच्या काळात ओझर विमानतळाच्या ठिकाणी पॅसेंजर टर्मिनल साकारण्यात आले. त्यानंतर आता युती सरकारच्या का‍ळात विमानसेवा सुरू होण्याची मोठी अपेक्षा नाशिककरांना आहे. अद्याप त्यादृष्टीने कुठल्याही हालचाली होत नसल्याने नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे ट्विटरचे माध्यम वापरत मोहीम सुरु केली आहे.

#NashikNeedAirService या नावाखाली ट्विटरवर शुक्रवारी दिवसभर मोहीम सुरू होती. विमानसेवेविषयीच्या तीव्र भावनाही नाशिककर आवर्जून व्यक्त करीत होते. काहींनी तर कुठल्या शहरांची सेवा असावी हे ट्विटमधून व्यक्त केले. पंतप्रधान, त्यांचे कार्यालय, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचे कार्यालय, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख यांना टॅग करुन त्यांच्यापर्यंत ही मोहीम पोहचविली जात आहे. काही नाशिककरांनी विमानसेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांना टॅग करुन लक्ष्य वळविण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेकडून नव्या १७५ स्पीड ब्रेकरचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सध्याच अस्तित्वात असलेले स्पीड ब्रेकर नाशिककरांची डोकेदुखी ठरले असतांना महापालिकेकडे नव्याने स्पीड ब्रेकर करण्यासाठी तब्बल १७५ प्रस्ताव आले आहेत. नव्या स्पीड ब्रेकरसाठी महापालिकेला सुमारे एक कोटी खर्च येणार आहे. महापालिकेने आता नव्या व जुन्या स्पीड ब्रेकरच्या आढाव्यासाठी समितीची स्थापना केली आहे.

पोलिस उपायुक्त व शहर अभियंत्याच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांची समिती शहरातील स्पीड ब्रेकरचा आढावा घेणार आहे. नव्याने गरज असलेल्या स्पीड ब्रेकरची संख्या निश्चित करून अहवाल देणार आहे. त्यामुळे सध्याच्या अस्तित्वात असलेल्या अवाजवी स्पीड ब्रेकरपासून नाशिककराची सुटका होण्याची शक्यता आहे.

सिंहस्थानिमित्ताने नाशिकमधील रस्ते सुंदर व चकचकीत झाले. मात्र, अपघातांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे शाळा, संस्था व नागरिक याच्याकडून स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेकडे अशा प्रकारचे १७५ प्रस्ताव आले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पीड ब्रेकर बसविल्यास त्याचा शहर विकासावरच परिणाम होणार आहे. शहरात अगोदरच अनेक ठिकाणी गरज नसतांना स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. शहरात कमी स्पीड ब्रेकर असावेत, अशी महापालिकेची इच्छा आहे.

सिग्नलचाही आढावा

समितीच्या वतीने शहरात सध्या अस्तित्वात असलेले चौकातील सिग्नल्स यंत्रणेचा आढावा घेतला जाणार आहे. सध्याचे सिग्नल्सची ठिकाणी आणि नव्याने रस्त्यावर कोणत्या ठिकाणी सिग्नल्सची गरज आहे. त्याचीही निश्चिती समिती करणार आहे. त्यासाठी गर्दीच्या रस्त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहेत. तर अनावश्यक ठिकाणचे सिग्नल्ससुद्धा काढले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीतूनही सुटका होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक विधींनी वातावरणात उत्साह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

श्री क्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव यांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याला ध्वजारोहणानंतर खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सर्वतोभद्र महल येथे दिवसभर जैन आचार्य, आर्यिका व मुनीका, मुनीश्रींसह ब्राह्मण ब्रह्योत्तर, इन्द्र-इन्द्राणी यांच्या वतीने अभिषेक, नित्यपूजन, यागमंडल व नवग्रह होम हवन आदी धार्मिक विधी मंगलमय वातावरणात पार पडले.

या धार्मिक विधी सोहळ्यानंतर दुपारच्या सत्रात मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. भाविक व भक्तगणांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून येत होते. पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवातील विविध धार्मिक विधी सर्वतोभद्र महला सुरू आहेत. यावेळी मुख्य व्यासपीठावर दिव्यशक्ती, सिद्धान्त चक्रेश्वरी, अमृतझारिणी मॉ., ज्ञानमती माताजी, प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माताजी यांच्यासह आर्यिका व मुनीका, तसेच सप्तम पट्टाचार्य श्री अनेकांत सागरजी महाराज व आर्यारत्नन रयणसागर महाराज यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

मध्यभागी ब्रह्म-ब्रह्मोत्तर व मुख्य इंद्र यांची विशेष बैठक लक्ष वेधून घेत होती. सर्वतोभद्र महलाच्या सभागृहात इंद्र-इंद्राणी या जोडप्यांचा अभिषेक विधीसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. श्री ज्ञानमती माताजी, प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी व अनेकांत सागरजी महाराज व आर्यारत्नन रयणसागर महाराज प्रमुख मार्गदर्शनाखाली अभिषेक, नित्यपूजन, यागमंडल व नवग्रह होम आदी धार्मिक विधी मंगलमय वातावरणात व प्रचंड ध्वनीच्या सहाय्याने झाले. सुमारे २५ हजार भाविक बसू शकतील, अशा भव्यदिव्य सभागृहात इंद्र व इंद्राणी या दानशूर भाविक, दाम्पत्य धार्मिक विधीत सहभागी झाले होते. या इंद्र-इंद्राणी अर्थात महिलांना विशेष लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. पुरूष भाविकांनी लाल रंगाचे पंचा अंगावर घेतलेला होता. तर, मस्तकावर मोरपंखी टोप धारण केलेला होता.

बालगोपाळांसाठी विशेष बगीचा तयार करण्यात आला असून, त्यांना या ठिकाणी खेळण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. जेष्ठ व अपंग व्यक्तींना धार्मिक विधी बघण्यासाठी विशेष बैठक व्यवयस्था करण्यात आली आहे. नव्याने दाखल होणाऱ्या आर्चाय, मुनी यांच्या स्वागतासाठी विशेष बॅण्ड पथक तयार करण्यात आले आहे. मोठ्या आनंदाने वाजत गाजत व महिला मंडळ भजने गात नाचण्याचा आनंद घेऊन प्रवेश सोहळा होत आहे.

दुपारनंतर भाविक व भक्तगणांसाठी नाटिका, नाट्य, भजन व गायन संध्या आदी मनोरंजानात्मक कार्यक्रमाची रेलचेल ठेवण्यात आल्याने भाविक व महिला भगिनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रॅन्ड अॅम्बेसिडरसाठी नाशकात चुरस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहराचे देश-विदेशात ब्रँडिंग करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणुन महापालिकेने स्वतःचा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर नेमण्याची तयारी चालवली आहे. क्रीडा, चित्रकला , अभिनय आदि क्षेत्रांत नावलौकिक असलेल्या भूमिपुत्रांना या पदासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतसह आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा जिंकणारे सायकलपटू महाजन बंधू, चित्रकला क्षेत्रातील सावंत बंधू, शिशिर शिंदे व अभिनेते चिन्मय उदगीरकर यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर बोस्टन दौऱ्यावर गेलेल्या महापालिकेच्या पथकाला नाशिक ब्रँडिंगची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यामुळेच नाशिकसाठी स्वतंत्र ब्रॅन्ड अॅम्बेसिडर नियुक्त करण्याचा प्रस्ताव १६ फेब्रुवारीच्या महासभेवर ठेवण्यात आला आहे. कविता राऊत व महाजन बंधूंची नावे सध्या आघाडीवर असली तरी पाचही जणांमध्ये चुरस असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images