Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वर्षा सत्पाळकरांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मैत्रेय ग्रुपच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्या पोलिस कोठडीत जिल्हासत्र न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली आहे. पोलिस तपासामध्ये १२५ बँक खाते, सात कंपन्यापरराज्यात असलेल्या स्थावर मालमत्तेसंदर्भातील माहिती समोर आली आहे. कंपनीचे दुसरे संचालक फरारी असून, त्यांना पोलिसांनी कोर्टासमोर हजर करावे, असे आदेश न्यायाधीशांनी दिले. मैत्रेय ग्रुपच्या मैत्रेय प्लॉटर्स ऍण्ड स्ट्रक्‍चर्स प्रा. लि. व इतर कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये वर्षा सत्पाळकरांसहीत एका अन्य संचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनीफेब्रुवारी रोजी पालघर तालुक्यातील माणिकपुरी येथे छापा मारून सत्पाळकर यांना अटक केली होती. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना आज पुन्हा जिल्हासत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे अॅड. राजेंद्र घुमरे यांनी वर्षा सत्पाळकर यांच्या कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. पोलिस तपासामध्ये संशयित संचालक वर्षा सत्पाळकरफरार संचालक जनार्दन परुळेकर हे भाऊ-बहीण असून त्यांच्या नावावर १२५ बँक खाते असल्याचे निष्पण झाले आहे. या दोघांच्या मैत्रेय कंपनीव्यतिरिक्त आणखी सात कंपन्या असून त्याचे कार्यकारी संचालक हे दोघेच असल्याचे समोर आले आहे. सेबीकडून निर्बंध घातलेले असताना गुंतवणूकदारांची गुंतवणूक इतर कंपन्यांमध्ये करण्यात आली. परराज्यातील मालमत्तांचा शोध घेण्यासाठी सत्पाळकरांच्या कोठडीची मुदत वाढून देण्याची मागणी पोलिसांमार्फत करण्यात आली. सरकारी पक्षाच्या मागणीस बचावपक्षातर्फे अॅड. अविनाश भिडे यांनी विरोध केला. सेबीने कायदेशीर कारवाई केलेली असल्याने पोलिसांना मैत्रेय कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे सांगतिले. कंपनीने गुंतवणुकदारांना साडेसातशे कोटी रूपये परत केले असून उर्वरीत ४१ कोटीही देण्यात येणार असल्याचा युक्तिवाद भिडे यांनी केला. दरम्यान, जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एम. एच. मोरे यांनी सरकारी पक्षाचे मागणी मान्य करीत वर्षा सत्पाळकर यांना येत्या १५ तारखेपर्यंत कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेक बाऊन्सप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चेक बाऊन्सप्रकरणी नाशिक कोर्टाने दोषी ठरलेल्या व्यक्तीला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. महेंद्र नामदेव सोनवणे असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सीमा बाबासाहेब लांडगे यांनी फिर्याद दाखल केली होती.

सीमा लांडगे आणि महेश यांच्यात जुनी ओळख होती. त्यांच्यामध्ये नियमितपणे आर्थिक व्यवहारासाठी पैशांची देवाणघेवाण होत होती. महेश यांचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांनी सीमा यांच्याकडून एक वर्षांच्या मुदतीसाठी २० नोव्हेंबर २०११ रोजी बिनव्याजी स्वरुपात चार लाख रुपये हातउसने घेतले. पैसे परत मिळत नसल्याने २१ नोव्हेंबर २०१२ रोजी महेश यांनी सीमा यांना अॅक्सीस बँक, त्र्यंबक नाका शाखेचा चार लाखांचा चेक (नंबर : ८६६४९२) दिला.

मात्र, खात्यात पुरेसे पैसे नसल्याने तो वटला नाही. त्यामुळे सीमा यांनी ४ मार्च २०१३ रोजी न्यायालयात खटला दाखल केला. सबळ पुरावे सादर करण्यात आल्याने नाशिक न्यायदंडाधिकारी वर्ग १ च्या न्यायाधीश के. एम. पिंगळे यांनी महेश यांना दोषी ठरविले. त्यांना सहा महिने कारावास आणि सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच फौजदारी खटल्यानुसार दंडातील ६ लाखांपैकी साडे पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निकाल सुनावला. सीमा लांडगे यांच्या वतीने अॅड. मनीषा जाधव यांनी खटला लढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत, नृत्याने बहरला ‘सोनचाफा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सत्यम् शिवम् सुंदरम्... ये शाम मस्तानी... तुझ्या प्रितीने धुंद झाले या गीतांबरोबरच सादर झालेली मराठमोळी लावणी रंगली अन् दृष्टी प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेला 'सोनचाफा' चांगलाच बहरला. निमित्त होते, दृष्टी प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. सांस्कृतिक कार्यक्रम व यशस्वी अंध व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी कालिदास कलामंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी बहुविकलांग नायब तहसीलदार हंसराज पाटील यांना 'दृष्टीगौरव २०१६' पुरस्कार माजी मंत्री बबन घोलप यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पाच हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमात अकबर खान, प्रमोद पांढरे, पूजा जाधव, आरती गवई यांनी यावेळी गीतांचे सादरीकरण केले. त्यांना पुष्पराज पवार (ढोलकी), सुनील साळवे (गिटार), मनोज धाबारे, किशोर उबाळे (ऑरगन), किशोर चौधरी (ऑक्टोपॅड) यांनी संगीतसाथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॉरेन्सिक सायन्सशिवाय पर्याय नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फॉरे​न्सिक सायन्सद्वारे मिळणारे पुरावे विश्वासार्ह असतात. कालाघौत त्यांच्यात बदल होत नाहीत. सध्या गृह विभागामार्फत फॉरेन्सिक लॅब सक्षम करण्यात येत असून, गुन्हा सिध्द होण्याचे प्रमाण यामुळे खूप चांगल्या पध्दतीने वाढेल, असे मत पोलिस महासंचालक (विधी व तांत्रिक) मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या बोरवणकर यांनी आज सकाळी नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबला भेट देऊन माहिती घेतली. नाशिकची लॅब तुलनेत चांगली असून, राज्यातील इतर ठिकाणी अशाच सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नांदेडची लॅब दोन दिवसांत सुरू होणार असून, कोल्हापूरमध्ये लॅबच्या इमारतीसाठी पुरेशी जागा उपलब्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील फॉरेन्सिक लॅब सक्षम असल्या तरी त्यावर ​अतिरिक्त भार पडत असल्याचे बोरवणकर म्हणाल्या. लॅबसाठी पाठवण्यात येणारे सॅम्पल किती असावे, त्याचा कोर्टात काय उपयोग होणार याचा विचार होत नाही. परिणामी आज ३० टक्क्यांपेक्षा जास्त सॅम्पल लॅबमध्ये पडून आहेत. नव्या कार्यपध्दतीत याचेही प्रशिक्षण सर्वांना दिले जाणार आहे.

यंत्रणांना प्रशिक्षण

गुन्हा सिद्ध होत नसल्याबाबत अनेकदा पोलिसांना दोषी ठरवले जाते. वास्तविक गुन्हा सिद्ध होत नसल्यास यामागे पोलिस, मेडिकल ऑफिसर, फॉरेन्सिक तज्ज्ञ, कायदे तज्ज्ञ यांचा एकत्रित सहभाग असतो. यातील एक विभागाने आपले कर्तव्य बजवताना कसूर केल्यास गुन्हेगारांना फायदा होतो. त्यामुळे या सर्व यंत्रणांना एकाच व्यासपीठावर घेऊन प्रशिक्षण देणार असल्याचे बोरवणकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांसाठी नाशकात म्हाडाची ४९ घरे

$
0
0

नाशिक : पोलिस कर्मचाऱ्यांकडून सातत्याने घरांची मागणी होत असली तरी शहरातील पोलिस वसाहतींमध्ये सदनिका उपलब्ध नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. म्हाडाच्या हिरावाडी गृह प्रकल्पात पोलिसांसाठी ४९ सदनिका खरेदी करण्यात येणार असून, सहा महिन्यांत पोलिसांचा म्हाडाच्या इमारतींमध्ये गृहप्रवेश होईल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

हिरावाडी परिसरात म्हाडाने गृहप्रकल्प उभारला आहे. पोलिस वसाहतीसाठी तेथे ४९ सदनिका निश्चित करण्यात आल्या आहेत. येत्या पाच त्या सहा महिन्यांत या सदनिका पोलिसांकडे हस्तांतरीत होतील अशी माहिती म्हाडाच्या अधिकारी सरिता नरके यांनी दिली आहे. पोलिस वसाहतीसाठी म्हाडाच्या ४९ सदनिका घेण्याचे निश्चित झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनीही दिली आहे. काही पोलिस कर्मचाऱ्यांना या घरांमध्ये राहावयास मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे ‘हसमुख’ आंदोलन

$
0
0

काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. राज्यातील युती सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, भद्रकाली पोलिसांनी जुने नाशिक परिसरात चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे आंदोलकांचीच नाकाबंदी झाली. दुपारी एक वाजेच्या सुमारास अवघ्या काही मिनिटात रास्ता रोको आंदोलन आटोपण्यात आले. वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची नंतर लगेचच सुटका करण्यता आली.

माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळा प्रकरणी खटला चालविण्यास राज्य सरकारने राज्यपालांकडून नुकतीच परवानगी घेतली आहे. त्यामुळे आदर्श प्रकरणात चव्हाण यांना पुन्हा घेरले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील भाजप सरकार सुडाच्या भावनेतून काँग्रेस नेत्यांची बदनामीचा कट रचत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी यावेळी केले. माजी मंत्री शोभा बच्छाव, हेमलता पाटील, नुरजहाँ पठाण, अंबादास खैरे, सुरेश मारू, हनिफ बशीर, साजीद खान, डॉ. खान अख्तर, डॉ. सादिक शेख, डॉ. इजहार खान आदींनी आंदोलनात समावेश घेतला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी १२ महिला व ४२ पुरुष आंदोलकांवर कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाची आता दंडांची भाषा

$
0
0

महापालिकेने घरपट्टी वसुलीची तीव्र केली असतांनाच पाणीपट्टीच्या थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला आहे. पाणीपट्टीची बिले वाटल्यानंतर त्यांच्या वसुलीसाठी सुद्धा मोहीम तीव्र केली आहे. दर चार महिन्यांनी पाणीपट्टी बिले ग्राहकांना दिली जातात. तरी सुद्धा पूर्ण वसूली होत नाही. एप्रिलमध्ये बील वाटप केले तरी पुढील वर्षी मार्चपर्यंत बील अदा केले जात नाहीत. शहरात पाणीपट्टीचे एक लाख ९२ हजार ग्राहक असून या सर्वांना वेळेत पाणीपट्टी बील भरावे यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. सन २०१६-१७ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पाणीपट्टी ४० दिवसांच्या आत भरली नाही तर प्रत्येक महिन्याला आता दोन टक्के दंड बसणार आहे.

सहाआयुक्तांची वेतनवाढ रोखली शहरातील अनेक भागात नागरिकांपर्यत बिलेच पोहचली नाहीत. वेळेत बिले पाणीपट्टीधारकांपर्यत पोहचली नसल्याने व त्याचा थेट वसुलीवर परिणाम झाल्याने आयुक्तांनी अतिक्रमण विभागाचे सहआयुक्त एम. डी. पगारे यांच्या दोन वेतनवाढ रोखल्या आहेत. सोबतच ज्या कर्मचाऱ्यांनी वेळेत बिले पोहचवली नाहीत, अशा कर्मचाऱ्यांवरसुद्धा कारवाईची प्रक्रिया आयुक्तांनी सुरू केली आहे.

ऑफलाइनलाही सवलत घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टी वसूलीसुद्धा सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पाणीपट्टीचे बील मिळाल्यानंतर ३० दिवसाच्या आत बील भरल्यास संबंधित ग्राहकाला एक टक्का सवलत मिळणार आहे. घरपट्टीसाठी सध्या ही सवलत सुरू आहे. घरपट्टीसाठी एप्रिल, मे व जूनसाठी विशेष सवलत योजना राबविली जाते. त्याच धर्तीवर पाणीपट्टीला सुद्धा सवलत दिली जाणार आहे.

अद्याप निम्मीच वसुली चालू वर्षी पाणी पट्टी वसूलीचे उद्दिष्ट हे ६५ कोटी रुपयांचे आहे. मात्र, अद्यापही निम्मी वसुली झालेली नाही. त्यामुळे महापालिकेन वसुलीची कडक नियमावली तयार केली आहे. वसुलीची कारवाई तीव्र करण्यासोबतच ऑनलाइन बिले भरणाऱ्यांना आता वर्षभर एक टक्का सवलत देण्यात येणार आहे. ऑनलाइन बील भरल्यास घरपट्टीसाठी वर्षभर एक टक्का अतिरिक्त तर पाणापट्टीसाठी अर्धा टक्का अतिरिक्त सवलत मिळणार आहे.

वर्षभरात तीन बिले पाणीपट्टी भरणासाठी आता कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पाणीपट्टीचे वर्षभरात तीन बिले दिली जाणार असून बील मिळाल्याच्या दिनांकापासून ४० दिवसात ते महापालिकेला भरावे लागणार आहे. तर नागरिकांपर्यंत वेळेत बिले पोचली नाहीत तर थेट कर्मचाऱ्यांवर त्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदारांनी वेळेत भरणा केला तर महापालिकेची वसुली वाढणार आहे.

ऑनलाइनला प्रोत्साहन महापालिकेने घरपट्टीपाठोपाठ पाणीपट्टीचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना ऑनलाइन बिले भरण्यासाठी सवलत योजना सुरू केली आहे. पाणीपट्टीचे बील ऑनलाइन भरल्यास ग्राहकांना अर्धा टक्का सवलत मिळणार आहे. एका बिलाच्या भरणासाठी महापालिकेला यंत्रणेवर ७५ रुपये खर्च येतो. हा खर्च यंत्रणेवर खर्च न करता थेट ग्राहकालाच त्याचा फायदा देण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच वर्षभर ऑनलाइन घरपट्टी भरणाऱ्या ग्राहकांना आता अतिरिक्त एक टक्का सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने येत्या वर्षापासून घेतला आहे. त्यामुळे महापालिकेचा ओढा ऑनलाइन कारभाराकडे वाढल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीतुंगी येथे गुरुवारी ध्वजारोहण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मांगीतुंगी येथील अखंड पाषाणातील १०८ फुटी विशालकाय भगवान वृषभदेवाच्या पंचकल्याण महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी दि. ११ रोजी दुपारी दोन वाजता विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी एक लाख चौरस फुटाच्या सर्वतोभद्र महलचे शुद्धीकरण करण्यात येऊन मंगलकलश स्थापना, अखंड दीप प्रज्वलन, सकलीकरण यज्ञ, दीक्षा मंडप, प्रतिष्ठा, एवंम यांग मंडल विधान प्रारंभ होणार आहे. ही माहिती राष्ट्रीय महामंत्री संजय पापडीवाल यांनी दिली.

चार हजार तंबू, तीन हजार निवारागृहांची अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. मांगीतुंगी तीर्थस्थळी देशभरातून आर्चाय मुनी, आर्यिका, माताजी आणि भाविकांचे आगमन होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, या सोहळ्याची जागतिक शोभा वाढविण्यासाठी देशभरातून सुमारे ५०० हून अधिक कलाकार आपले कलाकौशल्य दाखविण्यासाठी दाखल होत आहेत. यामध्ये ४० प्रकारची नृत्ये, अणि १७ नाटकांचा समावेश आहे. ढोल ताशांचे पथकही मांगीतुंगीत दाखल होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतूक कोंडीला टोईंग व्हॅनचा हातभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वादग्रस्त ठरत असलेल्या टोईंग व्हॅनच्या कारवाईपुढे वाहनचालक त्रस्त झाल्याचे चित्र निर्माण होत आहे. टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी केटीएचएम कॉलेजसमोरील उड्डाणपुलाखाली वाहन आडवी लावत वाहतूक कोंडीला हातभार लावला. या व्हॅनवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण न देता कारवाई होत असल्याने या मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी केटीएचएम कॉलेजसमोरील उड्डाणपुलाखाली आपले वाहन पार्क केले. तब्बल अर्धा ते पाऊण तास वाहने उचलण्याचा खेळ सुरू असताना यामार्गावरील येणाऱ्या इतर वाहनचालकांना मात्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. एकीकडे टोईंग व्हॅनमुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणाऱ्या सर्वसामन्यांना वाहन सोडवतानाही कोणताही दिलासा मिळत नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. याबाबत सराफी व्यावसायिक धनंजय मुंडे यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी ठक्कर बाजार परिसरात पार्किंगची व्यवस्था असलेल्या जागेत मी दुचाकी पार्क केली होती. कोणतीही सूचना देता माझे वाहन जमा केले. मी दंड भरण्यास तयार आहे. मात्र, माझे वाहन कोणत्या अधिकारानुसार तुम्ही जमा केले, या प्रश्नाचे उत्तर मी मागितले. ठक्कर बाजार येथे कोणता परिसर नो पार्किंगचा आहे किंवा कोणता नाही, याविषयी कोठेही मागमूस सापडत नाही. याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला अधिकारी नाहीत तर कधी कर्मचारी नाहीत, असे उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. वप्राथमिक सोयी सुविधा पुरविल्यानंतरच सदरची कारवाई हाती घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विक्रेत्यांचा जिल्ह्यात कडकडीत बंद

$
0
0

टीम मटा

केंद्र शासनाने किटकनाशकांच्या विक्रीसाठी परवान्याची मागणी करणाऱ्या व परवाने असलेल्या व्यक्तीच्या शैक्षणिक अर्हतेबाबत जाहीर केलेल्या अधिसूचनेविरोधात कळवणसह जिल्हाभरात कृषी व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला.

कळवण तालुका अॅग्रो डीलर्स असोशिएशनने नायब तहसीलदार लिलके यांना निवेदन दिले. देशात कुठेही चार वर्षाच्या खाली पदवी अभ्यासक्रम नाही. दोन वर्षात शैक्षणिक अर्हता जुन्या परवानाधारकांना कशी सिध्द करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुकानदार त्यांच्या आधारावर शेतकऱ्यांना चागल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात. खेड्या पाड्यातील छोटे किरकोळ विक्रते शेतकऱ्यांच्या अडीअडचणीच्या वेळेत कामी येतात. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वेळेवर पुरवठा करतात. काही दुकानदारांची शैक्षणिक पात्रता आठवी ते दहावी किंवा इतर शाखेतील पदवीधर आहेत. ते दुकानदार स्वतःची शैक्षणीक पात्रता कशी सिध्द करतील, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून या व्यवसायात असल्यामुळे व स्वतःची शेती असल्यामुळे कीटकनाशकाची हाताळणी, वापर, त्यांचे प्रमाण या विषयाची सविस्तर माहिती दुकानदारालाच आहे. खेड्यातील दुकाने बंद झाली तर शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागेल. प्रत्येक कृषी केंद्राला या अटी मान्य करणे अशक्य आहे. त्यामुळे राज्यात पन्नास हजारांपेक्षा जास्त कृषी केंद्रांवर संकट आलेले आहे. सुमारे अडीच लाख कुटुंबे या केंद्रांवर अवलंबून आहेत. निर्णय घेण्याआधी त्याचा विचार करायला हवा होता. या निर्णयामुळे राज्यात शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशकांचा पुरवठा करणारी यंत्रणा विस्कळित होईल. त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. म्हणून सरकारने परवाण्याच्या अटीबद्दल विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी कळवण तालुका अॅग्रो डीलर्स असोशिएशन तालुकाध्यक्ष सुधाकर खैरनार, शहराध्यक्ष संदीप अमृतकर, राजेंद्र खैरणार, स्वप्नील पगार, राजेंद्र मालपुरे, मिलिंद मालपुरे, भरत पाटील, बबलू शिरसाठ, विष्णू बोरसे आदी उपस्थित होते. मालेगाव आग्रो डिलर्स असोशिएनचे अध्यक्ष अविनाश निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसेच आपल्या विविध मागण्यासंबंधीचे निवेदन नायब तहसीलदार जगदीश निकम यांना देण्यात आले. यावेळी संदीप शिरसाठ, शेखर शिंदे, दिनेश पवार आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या शासनाच्या या जीवघेण्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करीत पूर्वीच्या परवानाधारकांना कृषी पदवीच्या अटीतून वगळण्यात यावे. किंवा पर्याय म्हणून विक्रेत्यांसाठी किवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींकरिता एक ते दोन महिन्याचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करून त्यांना प्रमाणपत्र देऊन ते प्रमाणपत्र पदवीऐवजी ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आली आली एसटी गाडी...!

$
0
0

प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र धावणारी एसटी नेहमीच टीकेची आणि दंगलखोरांची लक्ष्य झाली आहे. पण हीच एसटी आपल्या रोजच्या प्रवासाची सोबतीण आणि मैत्रीण होऊ शकते. फक्त आपली नजर तिच्याकडे पाहण्याची चांगली असली पाहिजे, या उद्देशाने कवयित्री तथा शिक्षिका लता पवार यांनी स्वखर्चाने या एसटीची काळजी सर्वांनी घ्यावी, ती आपलीच सार्वजनिक मालमत्ता आहे याची जाण सर्वांना करून देण्यासाठी कवितेच्या गोड माध्यमातून आपली मैत्रीण नावाची कविता एसटी वर लिहिली आहे. येता-जाता सर्व प्रवाशांनी ती वाचली तर सर्व जण या एसटीला आपलेसे करतील, तिची काळजी घेतील यासाठी दोन हजार प्रती छापून नाशिक विभागातील प्रत्येक एसटीवर लावण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत.

यासाठी त्यांचे पती मधुकर पवार यांसह त्यांच्या शाळेतील शिक्षक सहकारी छगन जाधव यासारखी सृजनशील लोक ही त्यांना या समाजोपयोगी कामासाठी मदत करीत आहेत.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच एसटीत वायफाय बसविण्याची घोषणा केली आहे. एवढी मोठी स्वप्ने रयतेला दाखविण्यापेक्षा लता पवार यांनी लिहिलेल्या कवितेची दखल घेऊन महामंडळाने या कवितेच्या प्रचार प्रसिद्धीचा वाटा उचलला तर स्वच्छ सुंदर व आपली एसटी असे वाक्य रुजण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

'आपली मैत्रीण' ही कविता परिवहन राज्यमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पाठविली आहे. त्यांनी फक्त अभिप्राय नोंदवावा इतकीच अपेक्षा आहे. - लता पवार, कवयित्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वायत्त फायद्यांची एमपीएला प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र पोलिस अकादमीला (एमपीए) स्वायत्तता देताना या संस्थेची जबाबदारी सरकारने नियामक मंडळ आणि कार्यकारी मंडळावर सोपवली आहे. पोलिस प्रशिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या एमपीएला स्वायत्त झाल्यानंतर काही फायदे मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्यातील पोलिस उपनिरीक्षक आणि उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या त्र्यंबकरोडवरील २६० एकर जागेतील संस्थेला स्वायत्त करण्याबाबत राज्य सरकार आग्रही होते. त्यानुसार नोव्हेंबर २०१५ मध्ये कॅ‌बिनेट बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यशदाच्या धर्तीवर एमपीएला स्वायत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी ही मोठी बाब असून, त्याचे प्रत्यक्ष फायदे मिळण्यात मोठा कालावधी खर्ची पडणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या स्वायत्त संस्थेचे कामकाज करण्यासाठी राज्य सरकारने १० सदस्यांचे नियामक मंडळ तयार केले असून, कार्यकारी मंडळात सात सदस्यांचा समावेश आहे. नियामक मंडळ व कार्यकारी मंडळाला पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात आवश्यक बदल सुचवून अंमलबजावणीचे अधिकार देण्यात आले आहेत. भारतातील व विदेशातील इतर प्रशिक्षण संस्थाशी करार करणे, प्रशिक्षण साहित्य मिळवणे, निधी मिळवणे, तंत्रज्ञानाची देवाण घेवाण करणे, खर्चाचे नियोजन करणे, मानधनावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे असे अधिकार या मंडळाकडे असतील. स्वायत्तता प्रदान करण्यात आल्यानतंर एमपीएला कायम ठेव म्हणून पाच कोटी रुपये देण्यात आले आहे. अकादमीतील कार्यकारी मंडळाला दोन कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार असून, त्यापेक्षा मोठ्या रक्कमेच्या खर्चास कार्यकारी मंडळाला नियामक मंडळाची मान्यता घ्यावी लागेल. मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार कार्यकारी मंडळाकडे सोपवण्यात आले आहेत.

एमपीएवर प्रतिनियुक्ती

एमपीएतील सध्या एकूण ३४१ पदे अस्तित्वात असून, त्यांना शासनाचे सर्व नियम लागू असणार आहेत. एमपीएत नियुक्त केल्या जाणाऱ्या संचालक, सहसंचालक, उपसंचालक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, तसेच अस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवरील अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून गणले जाणार आहेत. दरम्यान, एमपीएला स्वायत्तता मिळाली असली तरी तिच्या जंगम व स्थावर मालमत्तेचा वापर मूळ उद्देशापुरताच मर्यादीत ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॉमा केअर होणार लवकरच सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा येथील ट्रॉमाकेअर युनिटमधील रिक्त पदे भरण्यासाठीचा प्रस्ताव राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी आहे. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ ट्रॉमाकेअर सुरू होण्याचा मार्ग सुकर होईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य उपसंचालक सुनील पाटील व जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांनी दिली.

सटाणा येथील ट्रॉमाकेअर युनिट गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेले आहे. या ठिकाणी लाखो रुपयांची यंत्रसामुग्री येऊन पडलेली असतांना केवळ पदे मंजुरीअभावी यंत्रणा सुस्त पडलेली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक सुनील पाटील यांच्याकडे चौकशी केली असता ते म्हणाले की, आमदार दीपिका चव्हाण यांनी या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे.

२५ कर्मचारी बजावतील सेवा सटाणा ट्रॉमाकेअरकरिता आवश्यक रिक्त पदे तातडीने मंजूर करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या मान्यतेसाठी देण्यात आलेला आहे. तो मंजूर होताच शहरातील ट्रॉमाकेअरकरिता पाच वैद्यकीय अधिकारी, १३ परिचारिका व २० बेड्सचे अद्ययावत रुग्णालय तातडीने सुरू होऊन २५ आरोग्य कर्मचारी सेवेत दाखल होतील. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, मार्च अखेर या पदांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये शहरातील ट्रॉमाकेअर सुरू होण्याची शक्यता यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक सुनील पाटील व जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडरसाठी भर रस्त्यात रांगा

$
0
0



शहरातील बहुतांश ग्राहकांना एचपी आणि भारत या इंधन कंपन्यांद्वारे सिलिंडरचा पुरवठा केला जातो. गॅस एजन्सीज डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून घरपोच सिलिंडर पुरवितात. एकीकडे गॅस वितरण प्रणालीत अधिकाधिक अद्ययावतता आणून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू असताना दुसरीकडे मंगळवारी नागरिकांना सिलिंडर मिळविण्यासाठी चक्क रस्त्यावर रांगेत उन्हातान्हात उभे रहावे लागले. महात्मानगर परिसरात स्वामी समर्थ गॅस एजन्सीचे कार्यालय आहे. या एजन्सीद्वारे महात्मानगर, पारिजातनगर, उंटवाडी, कामटवाडे, अशोकनगर, त्र्यंबकेश्वरपर्यंत हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या सिलिंडरचे वितरण केले जाते. गॅस एजन्सीकडील ग्राहकांची संख्या १६ हजारांवर असून राणेनगर परिसरात त्यांचे गोदाम आहे.

एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदाम लोकवस्तीमध्ये असल्याबाबत आम आदमी पक्षाचे पदाधिकारी जितेंद्र भावे यांनी आक्षेप घेतला होता. याबाबतची तक्रार त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला केली. त्यामुळे एजन्सीला केला जाणारा सिलिंडरचा पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. १ फेब्रुवारीपासून एजन्सीकडे सिलिंडरचा पुरवठाच केलेला नाही. एजन्सीकडे नोंदणी असलेल्या ग्राहकांना अडहॉक श्री व्यंकटेश गॅस एजन्सीकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्राहकांचा डेटा संबंधित एजन्सीकडे ऑनलाइन ट्रान्सफर करताना ९ हजार ग्राहकांचा डेटा करप्ट झाल्याचे स्वामी समर्थ एजन्सीतील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

मनुष्यबळाची कमतरता व्यंकटेशा एजन्सीकडे मनुष्यबळ व वाहनांची कमतरता असल्याने ग्राहकांना सिलिंडर मिळविण्यासाठी महात्मानगरपर्यंत धाव घ्यावी लागते आहे. ग्राहकांनी मंगळवारी एबीबी सर्कल चौकातील स्वामी समर्थ एजन्सीच्या कार्यालयाला गराडा घातला. ग्राहकांकडून सिलिंडरची मागणी होत असल्याने कार्यालयाचे शटर ओढून घेण्यात आले. व्यंकटेशा एजन्सीलाही मनुष्यबळ व वाहनांअभावी सर्वांच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोच करणे शक्य होत नसल्याने एबीबी सर्कलवर सिलिंडर वाटप केले जात आहे. सिलिंडरसाठी ग्राहकांनी रस्त्यावर रांगा लावल्याचे चित्र पहावयास मिळत होते. लवकरच या समस्येतून तोडगा निघेल. पुरवठा सुरळीत सुरू होईल अशी माहिती स्वामी समर्थ गॅस एजन्सीच्या संचालकांकडून देण्यात आली.

दरम्यान, संबंधित वितरक विल्होळी येथे गोदाम सुरू करणार आहे. त्यासाठीचे कामही सुरू आहे. गोदाम हलविण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत मिळावी, अशी विनंती संबंधित गॅस एजन्सीच्या वितरकांकडून करण्यात आली. मात्र, ही विनंती मान्य करण्यात आली नसल्याचे स्वामी समर्थ गॅस एजन्सीमधील वितरक आणि कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. राणेनगर येथील गोदाम अन्यत्र हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, एवढ्या अल्प कालावधीत गोदाम कसे हटविणार? असा सवाल वितरकांकडून उपस्थित करण्यात आला.

ऑफलाइन बुकिंग कामटवाडे, अशोकनगर आणि उंटवाडी परिसरातील बहुतांश ग्राहकांचा डेटा उपलब्ध होत नसल्याने त्यांचे गॅस रिफील बुकिंगच करता येत नसल्याने ग्राहकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोबाइलद्वारे बुकिंग होत नसल्याने ग्राहक एजन्सीकडे धाव घेऊन त्याबाबत जाब विचारत आहेत. सरकारने सिलेंडरचा पुरवठा बंद केल्याची माहिती ग्राहकांना दिली जात असली तरी आम्हाला सिलिंडर कोठून मिळणार याचे उत्तर देता देता संबंधित एजन्सीच्या नाकीनऊ आले आहेत. ग्राहकांना सध्या गॅस कार्डच्या आधारे ऑफलाइन बुकिंग करून सिलिंडरचे वितरण केले जात आहे.

महिलांचे हाल; नोकरदार खोळंबले घरीच सिलिंडरची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांची या प्रकारामुळे धांदल उडते आहे. एजन्सीशी फोनद्वारे संपर्क साधणाऱ्या महिलांना सिलिंडर घेऊन जाण्यासाठी एबीबी चौकात बोलावण्यात येत होते. मात्र, घरापर्यंत सिलिंडर कसे घेऊन जाणार? तुमच्या कर्मचाऱ्याला सिलिंडर घेऊन घरापर्यंत पाठवा, अशी मागणी महिलांकडून होते आहे. त्याबाबत संबंधितांकडून असमर्थता दर्शविली जात असून त्यामुळे वादाचे प्रसंग उदभवत आहेत. अन्य सर्व कामे सोडून सिलिंडरसाठी एजन्सीकडे धाव घ्यावी लागत असल्याने नोकरदार वर्गाकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.

सिलिंडर एजन्सीचे गोदाम राणेनगरात लोकवस्तीमध्ये आहे. तेथे किमान ५०० सिलिंडरचा साठा असतो. येथे काही दुर्घटना घडू शकते. ती होऊ नये म्हणूनच गोदाम येथून हटवावे अशी आमची मागणी आहे. त्याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. - जितेंद्र भावे, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहारदार कार्यक्रमांनी उपस्थितांची जिंकली मने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

विविध गीतांवरील जोशपूर्ण नृत्य, एकाहून एक सरस मिमिक्री व सामाजिक प्रश्नांनावर भाष्य करणारी पथनाट्य अशा विविध कलागुणांचा दर्शन घडविणाऱ्या बहारदार आणि रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते एमएसजी कॉलेजमधील युवा स्पंदन २०१६ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. के. देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एस. देवरे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. आर. ई. वाणी, प्रा. ए. एम. केदार आदी उपस्थित होते. गणेशवंदना या नृत्याने कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात झाली. नृत्याविष्कारात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकाहून एक सरस असे नृत्य सादरीकरण केले. यात देशभक्तीपर गीते, चित्रपट गीते, लोकगीते, शिवगीते, भीमगीते अशा विविध गाण्यांवरील नृत्याविष्कारावर तरुणाईची थिराकरणारी पावले आणि त्याला उपस्थितांची वन्स मोअर अशी मिळणारी दाद सादरीकरण करणाऱ्यांचा उत्साह वाढवणारी ठरली.

डिजे मिक्स गीतांच्या नृत्याविष्कारात तर प्रेक्षकांना देखील ताल धरायला भाग पाडले. कॉलेज तरुणांनी सिनेक्षेत्रातील अनेक कलावंतांची केलेली मिमिक्री क्षणभर ते कलावंत कार्यक्रमास उपस्थित असल्याचा अनुभव उपस्थितांना देवून गेले. यासोबतच सामाजिक जाणिवांना भिडणाऱ्या विविध विषयांवरील पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्तर वर्षीय वृध्देचा गळा आवळून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एका ७० वर्षीय वृध्द महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या महिलेचा मृतदेह सोमवारी रात्री पंचवटीतील वल्लभाचार्य आश्रमात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

सिंधुबाई माधवराव चव्हाण (वय ७०) असे या महिलेचे नाव असून, त्यांचा मृतदेह सोमवारी रात्री आश्रमात आढळून आला. पंचवटी पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. मंगळवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करताना सिंधुबाई चव्हाण यांचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. सिंधूबाई या ठिकाणी एका खोलीत एकट्याच राहत होत्या. सदर जागेसंबंधी त्यांचा वाद सुरू होता, अशी प्राथमिक माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला अाहे. एकापाठोपाठ समोर येणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

साबळेचा जामीन रद्द

नाशिक : दंगलीच्या गुन्ह्यात अटक करू नये म्हणून आकाश साबळेने घेतलेला अटकपूर्व जामीन मंगळवारी कोर्टाने रद्द केला. यामुळे साबळेच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीलाच भारतनगर झोपडपट्टीलगत असलेल्या एका मोकळ्या भूखंडावरील रहिवाशी आणि नगरसेवक संजय साबळे, त्यांचा मुलगा आकाश, फिलोमीना साबळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. यावेळी दगडफेक तसेच गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वरील तिघांजणांविरोधात पीटा अॅक्ट तसेच दंगल करणे असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. अटकपूर्व जामिनातील अटींनुसार संशयितांना पोलिस स्टेशनला हजेरी लावणे तसेच तपासात सहकार्य करणे बंधनकारक होते. मात्र, आकाश साबळे पोलिस स्टेशनला हजेरी लावत नाही. तसेच सहकार्य करीत नसल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संबंधितांचे जामीन रद्द करण्याची विनंती कोर्टाकडे केली. त्यानुसार कोर्टाने आकाश साबळेचा जामीन रद्द ठरवला असून, त्याच्या अटकेाचा मार्ग मोकळा झाला आहे.



रेल्वे प्रवाशांच्या बॅग्ज चोरणारा अटकेत

नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रवाशांच्या चोरीस गेलेल्या दोन बॅग परत मिळवल्या असून, चोराला अटक केली आहे. एकूण दोन लाख ६७ हजारांचा ऐवज त्यात होता. २९ जानेवारीला हावड्याला जाणाऱ्या शालिमार एक्स्प्रेसमधून सांकेत रमेश तिवारी (बिलासपूर, छत्तीसगड) आणि गुणवंत प्रेमराज भंगाळे (कल्याण) हे वेगवेगळ्या डब्यातून प्रवास करीत होते. तिवारींच्या बॅगेत लॅपटाप, कॅमेरा, लेन्स असा ८९,७०० रुपयांचा ऐवज होता. भंगाळे यांच्या बॅगमध्ये सहा तोळे सोने व २५ हजाराची रोकड होती. आयुब उंबर शेख (देवळालीगाव राजवाडा) याने या दोन्ही बॅगा लंपास केल्या. मात्र, तो स्थानकात येताच तिकीट तपासनीसाला संशय आला. लोहमार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता चौकशीत त्या चोरीच्या निघाल्या.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवारसाठी १३ कोटी निधी प्राप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यात जलयुक्तशिवार अभियानांतर्गत १६ गावांत २८ बंधारे बांधण्यात आले असून, त्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नाने १३ कोटी ३८ लाख ८४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला.

जलयुक्त शिवारांतर्गत २६ बंधारे पूर्ण झाली असून, धोंडवीरनगर येथील हनुमान मंदिर पास्ते येथील शिवनदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यात किमान १५ दलघफू इतका पाणीसाठा होऊ शकेल. त्यामुळे तालुक्यातील; दुष्काळग्रस्त भागास वरदान ठरणार आहे. स्थानिक स्तर विभागाद्वारे या बंधाऱ्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यांना मंजुरी मिळावी, याकरिता आमदार वाजे यांनी प्रयत्न केले होते. जलयुक्तच्या बंधाऱ्यांत पाणी साठल्यास त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोग होणार आहे. भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्यासाठी नाले, ओहोळ नदीतील पाणी ठिकठिकाणी अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा भाग म्हणून २८ ठिकाणी बंधारे बांधण्यात आले.

१५ दलघफूने पडणार भर बंधाऱ्यांमुळे तालुक्यातील पाणीसाठ्यात १५ दशलक्ष घनफुटाने भर पडणार आहे. पाऊस चांगला पडल्यास पूर्ण क्षमतेने भरणारी ठिकाणे निवडली असून, साठणाऱ्या पाण्यासाठी किमान ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल. तर बंधाऱ्याच्या परिसरातील कुटुंबांची उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांना परवडणारा फो‌ल्डिंग मायक्रोस्कोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सध्या विज्ञानाचा सर्वत्र जागर सुरू आहे. शाळा हायटेक आणि प्रयोग शाळा उपकरणे खर्चिक होत असताना ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या शाळांना परवडेल असा अगदी कमी किमतीतला पण उपयुक्त असा मॅग्नेटिक फोल्डिंग मायक्रोस्कोप मनमाडच्या छत्रे विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक संजय वाघ यांनी तयार केला आहे. त्यांच्या या कल्पक संशोधनाने बारामती येथे झालेल्या ४१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला.

ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत शाळांना अशी उपकरणे वरदान ठरतील. विद्यार्थीवर्गाची महागड्या खर्चिक उपकरणांअभावी होणारी गैरसोय दूर होईल, अशी करामत संजय वाघ यांच्या या मायक्रोस्कोपने केली असून, राज्यासह सर्वत्र या मेहनती हुशार तरुणाचे कौतुक होत आहे. बारामती येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात परिचर गटात महाराष्ट्रातून दुसरा मानाचा पुरस्कार मिळविणा-या संजय वाघ यांनी जणू परिसरातील कच्या साधन सामुग्रीचा वापर करून कमीत कमी खर्चात शिक्षक-विद्यार्थी आपली प्रयोग शाळा कशी समृद्ध करू शकतात, याचा पुरावाच दिला आहे.

पीव्हीसी पाइप, गोल चुंबके, लोखंडी पट्टी, बल्ब, वायसर, कार्बन, अॅक्रलिक पट्टी असे अवघ्या काही रुपयांतील साहित्य वापरून हा मायकोस्क्रोप दिमाखात साकारण्यात संजय वाघ यांना यश आले आहे. हे संशोधन अभ्यासपूर्ण असल्याचे मत तज्ज्ञ विज्ञान मार्गदर्शकांनी नोंदवून मनमाडच्या संजय वाघ यांचा गौरव केला आहे.

भारत सरकार व महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक संशोधन परिषदेने संजय वाघ यांच्या संशोधनाची दखल घेतल्याने छत्रे विद्यालयासह नाशिक जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचा ही सन्मान झाला आहे. सलग पाच वेळा राज्यस्तरावर जाण्याचा विक्रम ही परिचर गटातून संजय वाघ यांनी केला आहे. संस्थेचे पदाधिकारी पी. जी. धारवाडकर, पी. जे. दिंडोरकर, दिनेश धारवाडकर, पी. व्ही. पंचवाघ, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे यांच्यासह मान्यवरांनी संजय वाघ यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.

उपकरणाची वैशिष्ट्ये हा मायकोस्क्रोप फोल्डिंग करता येतो. ठेवायला जागाही कमी लागते. छोट्या पेटीतही मावतो. धूळ विरहीत आणि स्वच्छ राहू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरवायकेमध्ये दोन गटात फ्रिस्टाईल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी , नाशिक

कॉलेजरोडवरील आरवायके कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मंगळवारी पुन्हा दोन गटात सिनेस्टाइल मारामारी झाली. या संस्थेच्या आवारात गत महिनाभराच्या कालावधीत या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे कॉलेजरोडवरील कॉलेज कॅम्पसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही घटना आरवायकेच्या बायोटेक बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर घडली. कॉलेजियन्सवर होणारे हल्ले कॅम्पसमधून आता बिल्डिंगच्या क्लासरूमपर्यंत पोहोचल्याने घबराटीचे वातावरण आहे.

हा प्रकार दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडला. गोसावी कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची प्रॅक्टिकल परीक्षा होती. यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बायोटेक बिल्डिंगखाली बसून टवाळखोरी करीत होता. दरम्यान, सिनिअर कॉलेजच्या बायोटेक विभागातील विद्यार्थी तिथून वर जात असताना धक्का लागल्याने या दोन गटात वाद निर्माण झाला. शुल्लक कारणाचा बारावीच्या विद्यार्थ्यांनी बाऊ करीत सिनिअर्सला शिवीगाळ केली. याकडे दुर्लक्ष करीत सिनिअर्स बायोटेक बिल्डिंगमध्ये लेक्सचर्ससाठी निघून गेले. मात्र, ज्युनिअर्सनी आणखी काही कॉलेजियन्स घेत बायोटेकच्या क्लासरूममध्ये जात हा वाद उकरून काढला. यानंतर दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी फाइटर, चॉपर सारख्या छोट्या शस्त्रांचा वापर करण्यात आला. या उपर उद्या पुन्हा तुम्हाला बघून घेण्यासाठी येऊ अशी दबंगशाही या टवाळखोरांनी केली. दंगेखोर कोण आहेत याची माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रशासनाला मात्र सीसीटीव्ही चक्क बंद असल्याचे दिसून आले.

बायोटेक बिल्डिंगमध्ये हाणामारीची घटना घडली. किरकोळ घटनेचा एवढा बाऊ करण्यात आला. ही बाब चिंतेची आहे. कॉलेजातील शिपाईही मदत करीत नाहीत. प्रशासनाने अशा घटना रोखण्यकडे लक्ष देणे गरजेचे आहे, सुरेश नखाते विद्यार्थ्यांने म्हटले आहे.

आरवायके कॉलेजमध्ये हाणामारी झाल्याची घटना समजताच आम्ही घटनास्थळी ताबडतोब गेलो. या घटनेतील ज्युनिअर्स बाहेरच्या कॉलेजचे विद्यार्थी होते. सर्व ठिकाणचे कॅमेरे आहेत त्याच्या फुटेजचे चेकिंग सुरू आहे. जे सीसीटीव्ही बंद होते ते देखील नुकतेच सुरू केले आहेत.

- व्ही.एन.सूर्यवंशी, प्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सामाजिक जाणिवेची ज्योत अखंड जपावी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

माणसाच्या वैयक्तिक विश्वापलिकडेही समाज असतो. माणसावर असणाऱ्या सामाजिक ऋणांची जाणीव मनात अखंड जागती रहायला हवी. ही जाणिवेची ज्योत अखंडित ठेवण्याचे कार्य समाजातील काही निरपेक्षवृत्ती करीत असतात. या सदप्रवृत्तींना समाजानेही बळ पुरवावे व सकारात्मक विचार पेरावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी केले.

आझाद चौक येथील श्री बंड्या राम मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित मोफत पाणी वितरण योजनेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी शिंदे बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले, यंदा राज्यभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. येवल्यासारखा तालुका पिढ्यान-पिढ्या दुष्काळाशी झुंजत आल्या आहेत. दुष्काळाचे संकट परतावून लागतानाचा संघर्ष हा थेंबभर पाण्यापासून सुरू होतो. ही वस्तुस्थिती हेरत बंड्या राम मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने मोफत टँकरव्दारे पाणी वितरण योजनेचा सुरू उपक्रम प्रेरणादायी आहे.

येवला येथील भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते कै. अरविंद तरटे काका यांच्या स्मरणार्थ मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. येवला शहरासाठी सद्यस्थितीत उपलब्ध असणारा पाणीसाठी आणि पाणी वितरणाच्या नियोजनासंदर्भात नगरसेवक माणिक शर्मा यांनी नागरिकांना माहिती दिली. पाणी दुर्भिक्ष्याच्या संकटाचा सामना करताना नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, नगरसेवक संतोष परदेशी, दत्ता निकम, श्रीकांतभाई गायकवाड, नगरपालिका जलविभागाचे अभियंता जे. बी. फुलारी, ज्येष्ठ पत्रकार रमेश्चंद्र पटेल आदी उपस्थित होते.

... अन् मिळाले मुबलक पाणी येवला शहरात आझाद चौक परिसरातील श्री बंड्या राम मंदिराच्या जीर्णोध्दाचे कार्य सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना पाण्याची टंचाई जाणवल्याने मंदिराच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने मंदिरात बोअर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी अल्पवेळेतच मुबलक पाणी लागल्याने आनंदलेल्या व्यवस्थापन समितीने मंदिरासाठी गरजेइतके पाणी वापरत उर्वरित पाणी नागरिकांमध्ये वितरीत करण्याचा निर्णय घेतला. भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते कै.अरविंद तरटे यांच्या स्मरणार्थ या बोअरच्या आधारे गावात व तालुक्यातील गावांमध्ये दिवसातून तीन वेळा पाण्याचे वितरण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images