Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फरार आरोपी दुर्री पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील न्यायालय इमारतीच्या आवारातून २७ जानेवारी रोजी फरार झालेला आरोपी इब्राहीम मोहम्मद अब्दुल गणी उर्फ दुर्री यास पकडण्यात नाशिक ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पथकाने गुजरातमधील सुरत येथून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नाशिक कारागृहातून मालेगावी गुन्हा संदर्भात कारवाईसाठी दुर्री यास न्यायालयात हजर करण्यासाठी आणणयात आले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याने पोलिस हवालदाराच्या हातास झटका देऊन बेडीसह पलायन केले होते. या घटनेने मालेगाव शहरात खळबळ माजली होती. येथील कुप्रसिद्ध बालगुन्हेगारी टोळीतील तो एक महत्त्वाचा गुन्हेगार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


... तर देशाची आर्थिक समस्या निकाली

$
0
0

नाशिक बार असोशिएशन, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन्स लॉयर आणि अविष्कार फोरम फॉर लीगल स्टोरी या संस्थांतर्फे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रि. टी. ए. कुलकर्णी सभागृहात 'बँकेचे कायदे व त्याचा सराव: सध्याची स्थिती' याविषयावर रविवारी सेमिनार झाला.

यावेळी अॅड. जायभावे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सेमिनार दोन सत्रात घेण्यात आले. पहिल्या सत्रात बँक ऑफ महाराष्ट्रचे डीजीएम मोहन यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की मोबाइल, इंटरनेट बँकिंग वापरली जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ग्राहकांच्या सोयीतून या सुविधा सुखद आहेत. भारताची अर्थव्यवस्था बँकेतील जमा होणाऱ्या व्याज दरावरही अवलंबून आहेच. याचसोबत ज्या स्मार्ट सिटी घोषित करण्यात आल्या, त्यांची आर्थिक परिस्थिती सोबत तेथे होणारी इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. नाशकात देखील असं काही झाल्यास नाशिक स्मार्ट होऊ शकेल. यासाठी आर्थिक कारभार हा सर्वत्र महत्त्वाचा ठरतो. याबाबतचे कायदे देखील कठोर करण्यात आले आहेत.

दुसऱ्या सत्रात उपस्थितांना बँक विषयक कायदे-कॉन्ट्रॅक्ट कायदे, बँकिंग रेग्युलेशन कायदे, को-ऑपरेटिव्ह कायदे, मुंबई स्टॅम्प कायदा यासोबत बँक-ग्राहक, कर्ज-व्याज, वसुली, बँकेतील गुह्यांबाबत कोर्टाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी नाशिक डिस्ट्रिक्ट माजी न्यायाधीश अॅड. परतवार, नाशिक बार असोशिएशन अध्यक्ष अॅड. नितिन ठाकरे, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर अध्यक्ष अॅड. जयश्री अकोलकर, आविष्कार फोरम चेअरमन अॅड. इंद्रायणी पाटणी याच्यासह विविध बँकेतील कायदे विषयक सल्लागार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवगांधार सभेत रंगला ‘जोगेश्री’

$
0
0

निनादिनी संगीत संस्था व शंकराचार्य न्यासचा सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देवगांधार या वार्षिक संगीत सभा झशली. यावेळी मीरा नवसाळकर, पंडिता अलका देव-मारूलकर, शिवानी मारूलकर-दसककर यांचे गायन झाले. पंडित राजाभाऊ देव यांच्या ८५ व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त तसेच पंडित मधुसूदन कानेटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त या कार्यक्रमाची सुरूवात अमरावती येथील प्रतिभावंत गायिका मीरा नवसाळकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग श्री ने सुरूवात करीत 'कहाँ में गुरू ढुँढन जाऊँ' ही बंदिश सादर केली. हा एकताल ख्याल झाल्यानंतर एक विलंबित ख्याल त्यांनी सादर केला. त्यांना तबल्यासाठी राम नवसाळकर यांनी तर संवादिनीवर आशिष कुलकर्णी यांनी तर तानपुऱ्यावर ईश्वरी दसककर यांनी साथ केली.

त्यानंतर पंडित राजाभाऊ देव तसेच पंडित मधुसूदन कानेटकर यांच्या शिष्या ख्यातनाम गायिका पंडिता अलका देव मारूलकर व त्यांच्या कन्या व शिष्या सूरमणी शिवानी मारूलकर यांचे विशेष गायन रंगले. अलका देव यांनी राज जोगकंस विलंबित एकताल बंदिश तसेच 'पीर पराई' ही छोटी बंदिश सादर केली. त्यानंतर जोगेश्री हा स्वरचित राग मारूलकरांनी सादर केला. 'माता शारदा' हे मध्य लयीतील रूपक त्यांनी सादर केले. कार्यक्रमात त्यानंतर उपशास्त्रीय ख्याल, दादरा, ठुमरी सादर करण्यात आली. त्यांना संवादिनीवर पंडित सुभाष दसककर, तब्लयावर अरविंदकुमार आझाद यांनी साथसंगत केली.

रंगले श्रीराम तत्त्ववादींचे गायन देवगांधार सभेच्या दुसऱ्या सत्रात पंडिता अलका देव मारूलकर यांचे शिष्य श्रीराम तत्त्ववादी यांचे गायन रंगले. त्यांनी कोमल रिषभ आसावरी मध्ये 'प्रीत न किजीए' ही बंदिश सादर केली. त्यानंतर अहिरभैरव मध्ये 'रुपक तालात दिन नाही चैन' ही बंदिश सादर केली. तराना व पिलू रागात 'अँखियन कलना परत माई' ही ठुमरी सादर केली. त्यांना सारंग तत्त्ववादी यांनी तबल्यावर तर आशिष कुलकर्णी यांनी संवादिनीवर साथ संगत केली. तानपुऱ्यावर आरोह ओक व राजेंदर कौर होते. त्यानंतर तबलावादक अरविंदकुमार आझाद यांचे स्वतंत्र तबलावादन झाले. आझाद हे पंडित किशन महाराज यांचे शिष्य आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्राचा संकल्प

$
0
0

थॅलेसेमिया या गुणसुत्रीय आजाराच्या परिणामी रुग्णास सातत्याने रक्तसंक्रमणाची गरज पडते. ही प्रक्रिया रुग्णासाठी अत्यंत खर्चिक व सामान्य घरातील रुग्णांच्या आवाक्याबाहेरील आहे. परिणामी या आजाराने ग्रस्त मुले उपचारांअभावी दुर्लक्षितच राहत असल्याची बाब अर्पणच्या लक्षात आल्यानंतर या रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा देणारे देशातील पहिले केंद्र अर्पणने नाशिकमध्ये साकारले होते. या केंद्राच्या यशानंतर मुंबईतही या धर्तीवर केंद्र उभारण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे १८१ थॅलेसेमिया पीडित रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात. यात उपचारांसाठी येणारा प्रतिरूग्ण खर्च हा सुमारे ६० हजारांच्या घरात आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध खाजगी कंपन्यांनीही या खर्चासाठी योगदान दिले आहे.

राज्यभरात सुमारे ३५० रक्तपेढ्या असून 'अर्पण'च्या दहा रक्तपेढ्या राज्यातील एकूण रक्तपुरवठ्यात सात टक्के वाटा उचलतात. सन २०२० पर्यंत हे योगदान १० टक्क्यांपर्यंत वाढवून यापुढेही आरोग्य क्षेत्रातील सामाजिक उपक्रम वाढविण्यावर भर देण्यात येईल, असेही उद्दिष्ट्य यावेळी कार्यकारी संचालिका वर्षा उगांवकर, डॉ. रत्नाकर कासोदकर व वैद्यकीय संचालिका डॉ. वैशाली काळे यांनी मांडले. 'अर्पण'च्या माध्यमातून आजवर ६ लाख ५१ हजार रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून १३ हजारांवर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत. रक्तपेढीचा फायदा आजवर १६ लाख गरजू रुग्णांना झाला असल्याची माहितीही डॉ. तातेड यांनी दिली. रुग्णाच्या सुरक्षेसाठी नॅट टेस्टेड हे आधुनिक प्रणालीच्या चाचणीतील रक्त वापरण्यासाठी डॉक्टरांचे व रुग्णांचे विशेष प्रबोधन रक्तपेढीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही डॉ. तातेड म्हणाले.

दोन दशकांचा प्रवास पूर्ण करताना रक्तपेढीने नवी उद्दिष्ट्ये समोर ठेवली आहेत. यात थॅलेसेमियामुक्तीसह रक्तदान शिबिरांची संख्या वाढविणे आणि नॅट टेस्टेड प्रणालीतील अधिक सुरक्षित रक्ताचा पुरवठा करणे, आरोग्य विषयक प्रबोधनावर भर देणे अशा सामाजिक उद्दिष्टांना रक्तपेढीकडून प्राधान्य दिले जाणार आहे. - डॉ. एन. के. तातेड, चेअरमन, अर्पण रक्तपेढी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरियत माध्यमातून तंटामुक्ती गौरवास्पद

$
0
0

पखाल रोडवरील अल-अशरफ फाउंडेशन मदरशात ए 'दहशतवाद आणि तरुण', 'समाजातील घटस्फोटाचे वाढते प्रमाण' आदी विषयावर परिसंवाद झाले. परिसंवादात आमदार प्रा. देवयानी फरांदे, ज्येष्ठ सुन्नी मुस्लिम धर्मगुरु अल-अशरफ फाउंडेशनचे संस्थापक हजरत सय्यदअली अशरफ अशरफी जिलानी, पोलिस उपायुक्त एन. अंबिका, सुन्नी दावते इस्लामीचे मौलाना जहुर अहेमद अशरफी, प्रा. किशोर शिंदे, हनिफ बशीर, अजिम सय्यद, अहेमद काझी, डॉ. इज्हार खान, डॉ. खान अख्तर-उल-इमान आदी सहभागी झाले.

धार्मिक बाबीवर दहशतवादाचा समर्थन होऊ शकत नाही. इस्लामला दहशतवाद मान्य नाही. जिहाद अथवा कोणत्याही धार्मिक बाबीवर दहशतवादाला इस्लाममध्ये स्थान नाही. तेव्हा कोणत्याही दहशतवादी संघटनेचा इस्लामशी कोणतेही संबंध होऊच शकत नाही. इस्लामच्या नावावर दहशतवाद पसरविणारे दहशतवाद्यांना पितळ उघडे पडले पाहिजे, असे मत सुन्नी दावत-ए-इस्लामीचे प्रमुख जहुर अहेमद अशरफी यांनी मांडले. यावेळी मौलाना व मुफ्ती जुबेर साहब यांनी अल अशरफ फाऊंडेशनचे धार्मिक शरियतवर आधारित कार्याचा आढावा सादर केला. साबीर शेख यांनी सूत्रसंचालन केले तर मोहम्मद हुसेन अशरफी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रमाच्या भोवऱ्यात सापडलेले ‘अरण्यभूल’

$
0
0

डॉन क्विक्झोट हा जगातून हद्दपार होत चाललेली जीवनमूल्ये पुन्हा प्रस्थापित करण्याच्या हेतूने प्रवासाला निघतो. त्याला वाईट गोष्टी नष्ट करून जगाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी तो सॅँको पान्झा नावाच्या साध्या शेतकऱ्याला सोबतीला घेतो; पण तो प्रत्येक आघाडीवर पराभूत होऊन परत येतो; त्याला गावात शिरायची लाज वाटते म्हणून ते दोघे अंधाराची वाट पहात आपल्या गावाच्या वेशीजवळ येऊन थांबतात आणि येथून नाटकाचा प्रवास सुरू होतो. डॉन हा पाप-पुण्य, सुख-दु:ख, मोह यांच्या फेऱ्यात अडकलेला असतो आणि सँको हा वर्तमानाशी जुळवून घेणारा असतो. भ्रम आणि वास्तव यांच्या प्रवासात त्यांना अनेक प्रवासी भेटतात. डॉन या प्रवासामध्ये सैरावरा पळत धावत सुटतो. शेवटी त्याची धुंदी ओसरते.

नाटकाचे निर्माण लक्ष्मीकांत खैरनार यांचे होते. लेखन प्रा. रमेश कोटस्थाने तर दिग्दर्शन विजय जगताप यांची होते. रितेश गायकवाड, चारुदत्त हिरे, भाऊसाहेब साळवे, योगेश बागुल, दीपक सूर्यवंशी, सुमन शर्मा, अनुप खैरनार यांच्या भूमिका होत्या. गोपाल भगत यांनी सूत्रधाराची जबाबादारी सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजमुळे वाहनचालक हैराण

$
0
0

शहरात ड्रेनेज व सांडपाणी यांची समस्या प्रत्येक भागात भेडसावत आहे. सातपूर एमआयडीसीतील सीएट कंपनी समोरील असलेल्या ड्रेनेज महिन्यातून ७ ते ८ वेळा चोकअप होत असल्याने वाहनचालक तसेच पायी चालणारे देखील हैराण झाले आहेत. चोकअप झालेल्या ड्रेनेजचे सांडपाणी मुख्य रस्त्यावर येऊन तळे साजत असते. यात एमआयडीसीत वाहतूक करणारी मोठी लहान, मोठी वाहने सांडपाण्यातून जातात. पायी चालणाऱ्या नागरिकांनाही सांडपाण्यातूनच प्रवास करावा लागतो. सतत चोकअप होणाऱ्या ड्रेनेजची अनेकदा चोकअप काढण्याचे काम करुन देखील पुन्हा पुन्हा ड्रेनेज चोकअप का, होते याचा तपास महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने लावण्याची गरज आहे. केवळ तुंबलेली ड्रेनेजचे चोकअप काढून महापालिकेच्या ड्रेनेजचे कर्मचारी मोकळे होतात. परंतु, पुन्हा काही दिवसांनी त्याच ठिकाणी ड्रेनेच चोकअप होऊन सांडपाणी रस्त्यावर वाहत असते. यावर महापालीच्या ड्रेनेज विभागाने कायमस्वरूपी मार्ग शोधण्याची मागणी वाहनचालक तसेच पायी चालणाऱ्यांनी केली आहे.

सातपूर एमआयडीसीत सीएट कंपनी समोर नेहमीच ड्रेनेजचे चोकअप होते. याबाबत वाहनचालक महापालिकेकडे अनेकदा तक्रारी करतात. परंतु, महापालिकेचा ड्रेनेज विभाग तात्पुरती दुरुस्ती करतात. परंतु, नेहमीच चोकअप होणाऱ्या ड्रेनेजची कायमस्वरुपी दुरुस्ती का केली जात नाही, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. - हरिष सुतार, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वालदेवी’मधील जलविसर्ग थांबला

$
0
0

गोदावरी कॅनलसाठी राखीव असलेल्या जलसाठ्यामधून सुमारे दोन टीएमसी पाणी अहमदनगर जिल्ह्यासाठी पाठविण्यात आले होते. मात्र, जलसंपदा विभागाने अहमदनगर जिल्ह्याची मागणी लक्षात घेतला राखीव असलेले पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. आमदार घोलप यांनी हिवाळी अधिवेशनात देवळाली मतदार संघ व निफाड तालुक्यातील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. पाणी सोडण्याचे व बंद करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित विभागाने रोटेशननुसार पाणी सोडले. ते शनिवारपर्यंत सुरू होते.

ठरविण्यात आलेल्यापेक्षा अधिक पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत इतरत्र जात होते. त्याचा तालुक्याला फायदा होत नसल्याने रोटेशन बंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार घोलप यांच्याकडे केली.

घोलप यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन रोटेशन बंद करण्याबाबत चर्चा केली. पाणी बंद केले नाही तर आपण धरणावर जाऊन रोटेशन बंद करू असा इशारा घोलप यांनी दिला.

जनतेवर अन्याय नको आमदार घोलप म्हणाले, की नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड, दिंडोरी आदी तालुक्यातील विहिरींनी आताच तळ गाठला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जिल्हावासियांचे कसे होणार हा प्रश्न आहे. संबंधित विभागाने रोटेशन सोडताना त्याचे वेळापत्रक व प्रत्येक रोटेशनचा कालावधी निश्चित करावा आणि पाणीटंचाई होणार नाही याची काळजी घ्यावी. इतरत्र पिण्यासाठी पाणी सोडण्यास आमची हरकत नाही मात्र, लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच वेळापत्रकानुसार रोटेशन सोडावे. तालुक्यातील जनतेवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा घोलप यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळात तेरावा महिना..!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील जनता यंदाच्या भीषण दुष्काळाच्या झळा सोसत असतानाच आता तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना व्यवस्थापन समितीने पाणीपट्टीत तब्बल २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. योजना चालविताना तिचा खर्च वाढत असल्याचे कारण देत समितीने ही पाणीपट्टी वाढ करत असल्याचे म्हटले असले तरी ही वाढ अन्यायकारक असल्याचा सूर गावोगांवच्या ग्रामपंचायती अन् गावांमधील ग्रामस्थांमध्ये उमटू लागला आहे.

जनता दुष्काळाच्या दाहकतेचे चटके सोसत असताना ३८ गावे पाणीपुरवठा योजना व्यवस्थापन समितीने पाणीपट्टीत केलेल्या वाढीमुळे साहजिकच योजनेतून पाणी घेणाऱ्या येवला तालुक्यातील गावोगावच्या ग्रामपंचायतींना देखील वाढ करावी लागणार आहे. यापूर्वी प्रतीलक्ष लिटरला एक हजार रुपये दर होता. आता या वाढीमुळे ग्रामपंचायतींना एक हजार २५० रुपये पाण्यासाठी मोजावे लागणार आहेत.

येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा व्यस्थापन समितीने ग्रामपंचायतीना नोटीस देऊन यासंदर्भात सूचना करताच नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावोगावी ही दरवाढ करण्याची माहिती दिली. ३८ गावे योजनेला नव्याने जोडलेली गावे धरून सध्या ४१ गावांना पाच ते सहा दिवसाआड पाणी उपलब्ध करून दिले जाते.

गेली तीन वर्ष नऊ महिने व्यवस्थापन समितीने योजना सांभाळताना आता दिवसेंदिवस खर्चाचा बोजा वाढू लागल्याचे समिती सदस्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजबिल, रसायन खर्च, देखभाल व दुरुस्ती, पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी इतर खर्च वाढला असून, वसुलीच्या तुलनेत तो जास्त होत आहे. सन २०१४ मध्ये योजनेचा खर्च २६.६२ टक्के होता. आता २०१५ मध्ये ३७.३९ टक्के झाला आहे. हा खर्च वाढत असताना पाटबंधारे विभागाकडून दिल्या जाणाऱ्या बिगर सिंचन पाणीपट्टीत देखील वाढ होत आहे. त्यातच सप्टेंबर २०१५ पर्यंतची थकबाकी १६ लाखांवर गेली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी व योजना सुरळीत चालावी यासाठी समितीने पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

३८ गावे पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्षांनी आजपर्यंत कुठल्याही गावांच्या सरपंचांना माहिती दिलेली नाही. आजवर योजनेची बरीच वीज बिले माफ झाली. पाटबंधारे खात्याचे पैसे देणे बाकी आहे. ३८ गावे योजनेतील समाविष्ट गावांच्या सरपंचांची मिटिंग घेण्यात येऊन त्यातच पाणीपट्टी वाढीबाबत सर्वसंमतीने निर्णय घेण्यात यावा. - संभाजी पवार, माजी सभापती, येवला पंचायत समिती

दिवसेंदिवस योजनेचा खर्च वाढू लागला आहे. त्यामुळे दरवाढ करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील ही बाब लक्षात घेता पाणीपट्टी वाढ स्वीकारायला हवी. - सचिन कळमकर, अध्यक्ष, ३८ गावे योजना पाणीपुरवठा व्यवस्थापन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यांतील धरणांत २४ टक्केच पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणांमधील पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील २३ धरणांमध्ये केवळ २४ टक्के पाणी शिल्लक आहे. धरणांच्या एकूण साठवण क्षमतेच्या केवळ एक चतुर्थांश पाणी शिल्लक असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही केवळ ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने धरणांचा घसा कोरडाच राहीला. जिल्ह्यातील २३ धरणांपैकी अनेक धरणे यंदा ५० टक्केही भरू शकली नाहीत. त्यामुळेच यंदा पिण्यासाठी आणि सिंचनासाठीही काटकसरीने पाणी वापरण्याची वेळ जिल्हावासियांवर आली आहे. जिल्ह्यात गंगापूर, पालखेड आणि गिरणा असे तीन धरणसमूह असून, त्यामध्ये अनुक्रमे ३२, २५ आणि १७ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ६६ हजार १६१ दशलक्ष घनफूट आहे. त्यापैकी मोठ्या प्रकल्पांची क्षमता ४८ हजार २९१ दशलक्ष घनफूट तर मध्यम प्रकल्पांची क्षमता १७ हजार ८७० दशलक्ष घनफूट आहे. मात्र धरणांमध्ये आजमितीस १५ हजार ८३४ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये गतवर्षी या कालावधीत ४ हजार ४६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७२ टक्के पाणी होते. यंदा हा साठा अवघ्या ३९ टक्क्यांवर आला असून, धरणामध्ये दोन हजार २०४ दशलक्ष घनफूट एवढेच पाणी शिल्लक आहे. २० लाखांहून अधिक लोकसंख्येला जुलैपर्यंत हे पाणी पुरविण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे असून, त्याचसाठी पाणी कपातीचा निर्णय अंमलात आणण्यास सुरूवात झाली आहे. गंगापूर धरण समूहातील काश्यपी धरणात ३२ टक्के तर गौतमी गोदावरीत १२ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

धरणाचे नाव गतवर्षीचा पाणीसाठा चालूवर्षीचा पाणीसाठा

गंगापूर ७२ ३९

काश्यपी ८५ ३२

गौतमी गोदावरी ५२ १२

पालखेड १८ १६

करंजवण ७३ ३२

वाघाड ४१ २२

ओझरखेड ४१ २७

दारणा ५५ ३३

मुकणे ५५ ६

वालदेवी ४५ ३०

कडवा ४५ १७

आळंदी ७६ ४६

पुनद ९० ६६

हरणबारी ७२ ६७

केळझर ६४ ५१

नागासाक्या १६ ०

गिरणा २६ ३

धरणसमूह उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.फू) टक्केवारी

गंगापुर २२०४ ३२

पालखेड ४९६१ २५

गिरणा ४३१७ १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१८ सहकारी संस्था होणार रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

केवळ वैयक्तिक स्वार्थ आणि नाशिक जिल्हा बँकेच्या मतदानासाठीचे आर्थिक लक्ष्य पूर्ण व्हावे या हेतूने सन १९७६-२०१० या काळात निफाड तालुक्यात निर्माण झालेल्या जवळपास २१८ सहकारी संस्था रद्द होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या विशेष सर्वेक्षण मोहिमेतंर्गत मान्यता रद्द करण्याची नोटीस निफाडच्या सहाय्यक निबंधकांनी काढली आहे. यामुळे या संस्थेच्या चेअरमन व संचालकांचे धाबे दणाणले आहे.

राज्य सरकारच्या सहकार खात्याने राज्यातील फक्त नावाला असलेल्या सहकारी संस्था ज्यांचे कामकाज बंद आहे किंवा फक्त कगदोपत्री कामकाज असून, त्यांचा कुठेही ठावठिकाणा नाही, कार्यालय नाही अशा संस्था सर्वेक्षणांनतर नोटीस काढून रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार तालुक्यातील सहकार विभागाने कार्यवाहिला सुरुवात केली आहे. तालुक्यात २८१ संस्थांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, ६१ संस्थांना नोटीस पाठवली आहे. या नोटिसीत संबंधित संस्थांनी सहकारी तत्त्वानुसार काम केलेले नाही, नोंदणी व व्यवस्थापनाबाबतचे शर्तीचे अनुपालन केलेले नाही, कामकाज बंद आहे, संस्थांचे अस्तित्व कगदोपत्री आहे आदी कारणे नमूद केली आहेत.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम २१ अन्वये नोंदणी रद्द करण्यासाठी हरकती मागवल्या असून, ६२ संस्थांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुदत संपून अवघ्या १ ते २ हरकती आल्या आहेत. उर्वरित संस्थांची यादी हरकतीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये फडकला भगवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सर्वत्र औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय बनलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार संजय पवार व शिवसेनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या शिवनेरी शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली. नांदगाव बाजार समितीप्रमाणे मनमाड बाजार समितीवरही शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. शिवनेरी पॅनलने १२, नम्रता पॅनलने तीन व अपक्षांनी तीन जागा पटकावल्या.

माजी आमदार संजय पवार, सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी पॅनलने ग्रामपंचायत गटात जोरदार मुसंडी मारत सर्वच्या सर्व दहा जागा जिंकून ग्रामीण भागातील सेनेच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले. नांदगावचे बापूसाहेब कवडे यांची साथ लाभल्याने शिवसेनेचे पारडे जड झाले. नांदगाव बाजार समितीची पुनरावृत्ती होऊन मनमाड बाजार समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर यांचे समर्थन असलेल्या चंद्रकांत गोगड यांच्या नम्रता पॅनलला अवघ्या तीन जागा मिळाल्या. त्यांना माजी सभापती प्रकाश घुगे, राजेंद्र पवार यांचाही पाठिंबा मिळाला होता.

आता लक्ष उमराणे, मालेगावकडे मालेगाव व उमराणे कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीकडे आता देवळा व मालेगाव या दोन तालुक्यांचे लक्ष लागले आहे. मालेगावमध्ये सेना विरुध्द भाजप असा संघर्ष रंगणार आहे. उमराणेत डॉ. राहुल आहेर यांनी लक्ष घातल्यामुळे भाजपचे पारडे जड मानले जात आहे. - निवडणुकीचा निकाल शिवनेरी पॅनल - १२ नम्रता पॅनल - ३ अपक्ष - ३ - विजयी उमेदवार सोसायटी मतदारसंघ : सर्वसाधारण - मच्छिंद्र हाके, गंगाधर बिडगर, आनंदा मार्कंड, दीपक गोगड, उत्तम व्हरगळ, भगिनाथ यमगर, किशोर लहाने. सर्वसाधारण गट - राजू सांगळे, आप्पा कुणगर. आर्थिक दुर्बल गट - अशोक पवार. व्यापारी संघ - कल्याणचंद ललवाणी, माणकचंद गांधी. विशेष मागास वर्ग - संजय सांगळे. इतर मागास वर्ग - भाऊसाहेब जाधव. महिला राखीव- सुभद्राबाई उगले, मीराबाई गंधाक्षे. हमाल मापारी संघ - मधुकर उगले. अनुसूचित जाती गट - दशरथ लहिरे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणाच्या तक्रारीमुळे कुटुंबीयांना मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील मळगाव येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार केली म्हणून मळगावच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह दहा जणांनी तक्रारदाराच्या आई, भाऊ व वडिलांना मारहाण केल्याची फिर्याद तक्रारदारची आई जिजाबाई राऊत यांनी कळवण पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

मळगाव येथील गट क्रमांक ७ सर्व्हे क्र. ११४ मधील एक हेक्टर सहा गुंठे शासकीय जमीन गुरांना उभे रहाण्यासाठी असून, त्या जागेवर सरपंच मीनाबाई गवळी, उपसरपंच विश्वास ठाकरे यांच्यासह दहा जणांनी अतिक्रमण करून घरे बांधल्याचे निदर्शनास आल्याने मळगाव येथील जगदीश रमेश राऊत याने अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे तक्रार केली.

मळगाव येथील तलाठी चौरे यांनी याबाबत सरपंच मीनाबाई गवळी, उपसरपंच विश्वास ठाकरे, पंडित देशमुख, जिभाऊ देशमुख, सोमनाथ देशमुख, जिभाऊ ठाकरे, जगन गवळी, तुकाराम देशमुख, मीराबाई देशमुख, सोनाबाई देशमुख, ग्रामसेवक यांना अतिक्रमण केले म्हणून अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्या कार्यालयात चार फेब्रुवारी रोजी उपस्थित रहाण्याबाबत नोटिसीद्वारे सुचित केले आहे.

तक्रार केली म्हणून तक्रारदाराची आई जिजाबाई राऊत यांना घराबाहेर बोलून शिविगाळ करून मारहाण केली. गळ्यातील सोन्याची मनचली तोडून दहा हजार रुपयांचे नुकसान केले, आलेले पती, मुलगा व नातेवाईकांना विश्वास ठाकरे व जिभाऊ देशमुख यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, अतिक्रमण काढण्याबाबत पुन्हा तक्रारी अर्ज केला तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही असा दम दिला, अशी फिर्याद जिजाबाई राऊत यांनी कळवण पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. याबाबत कळवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध नळजोडणीवर मनपाची कारवाई सुरूच

$
0
0

मालेगाव : महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम आणि अवैध नळजोडणीधारकांवरील कारवाई सुरूच आहे. यात प्रभाग चारमधील अतिक्रमण काढण्यात आले तर प्रभाग १ मध्ये अवैध नळजोडणीवर दंडवसूल करण्यात आला.

मनपा अतिक्रमण हटाव पथकाने शहरातील प्रभाग चारमधील फत्ते मैदान ते पवारवाडी या भागातील अतिक्रमणांवर बुलडोजर चालवला. सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान सुमारे ३५ अतिक्रमण हटवण्यात आले. या भागातील व्यावसायिक दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर थेट आपले शेड्स तसेच बांधकाम उभारलेले आढळून आले. मनपा पथकाने शेड्स, पत्रे अन्य समान जप्त केले तसेच बांधकाम पाडून उद्ध्वस्त केले. यावेळी स्थानिकांचा विरोध लक्षात घेत पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

प्रभाग एकमध्ये देखील मनपाच्या पथकाने अवैध नळजोडणी धारकांवर कारवाई केली. यात दिवसभरात एकूण १० नळजोडणी दंड वसूल करून अधिकृत करण्यात आल्या, तर दोन नळजोडण्या बंद करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगावात वाहनांची तोडफोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव येथील बाजारतळात रविवारी रात्री काही गुंडांनी २० ते २५ वाहनांची तोडफोड करून वाहनचालकांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे लासलगाव, ब्राह्मणगाव, विंचूर व पिंपळगाव नजीक या गावांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

लासलगाव येथील बाजारतळात रविवारी रात्री ९ वाजेदरम्यान ब्राह्मणगाव, विंचूर येथे राहणाऱ्या आकाश वाघ व त्याचे साथीदार संतोष, लहान्या (पूर्ण नावे माहीत नाही) व अन्य सात ते आठ साथीदारांनी एकत्र येत तेथे उभ्या असलेल्या वाहनांची लोखंडी रॉड व काठीने तोडफोड करण्यास सुरुवात केली. रस्त्याने ये-जा करणारेही यातून सुटले नाहीत. यामुळे दहशत पसरली होती.

लासलगाव पोलिस ठाण्यात या टोळीविरोधात नितीन उत्तम शेजवळ याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पोलिसांना अजूनही सापडलेले नाहीत. लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

लासलगाव व परिसरात या टोळीपासून अनेकांना त्रास होत आहे. आता तर त्यांनी वाहनांची तोडफोड करण्याचा धडाका लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लासलगावमध्ये त्यांच्या वाढत चाललेल्या कारवाया पाहता पोलिसांनी कठोर पावले उचलवावीत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भेंडीतील निर्यात केंद्राला मिळणार सुविधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

भेंडी येथील कांदा, डाळिंब व द्राक्ष निर्यात सुविधा केंद्राला सुविधांसह एक्स्प्रेस फिडरद्वारे २४ तास वीजपुरवठा सुरळीत करून देण्याबाबत पणन मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद आकरे यांनी आश्वासन दिले आहे. या महिन्यात याबाबत निविदा निघणार असून, निधी मंजूर असल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे.

शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व भाजप तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांनी या केंद्राबाबत वारंवार पाठपुरावा केला. पगार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सरव्यवस्थापकांना निवेदन पाठवून भेंडी येथील कांदा, डाळिंब व द्राक्ष निर्यात सुविधा केंद्राला सुविधांसह एक्स्प्रेस फिडरद्वारे वीजपुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी केली होती.

आमदार डॉ. राहुल आहेर यांनी देखील याबाबत पाठपुरावा करून पणन मंडळाचे सरव्यवस्थापक व व्यवस्थापकांशी चर्चा केली होती. पगार यांच्याशी पणन मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद आकरे यांनी संपर्क साधून यशस्वी चर्चा केली. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी या प्रकरणी पणन मंडळ व शेतकरी सहकारी संघ यांच्यात समन्वय साधून चर्चा घडवून आणल्याने व तत्काळ काम पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले आहे.

पगार यांनी सांगितले की, शेतकरी सहकारी संघ व पणन मंडळाच्या सहकार्याने भेंडी येथे कांदा, डाळिंब, द्राक्ष निर्यात सुविधा केंद्र बांधण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अपूर्ण सुविधा पूर्ण करून देण्याच्या अटी शर्तीवर तीन लाख रुपये अनामत व २१ हजार रुपये भाडे प्रती महिना याप्रमाणे ११ महिने कराराने दिनांक १ मे २०१२ ते १ मे २०१३ या कालावधीसाठी १८ मे २०१२ रोजी करारनामा करून चालविण्यास दिले होते. मात्र, आजपर्यंत अटी शर्तीप्रमाणे विद्युत पुरवठा व प्रकल्पाच्या इतर अपूर्ण सुविधांची पूर्तता न झाल्याने संस्थेने पणन कार्यालयाशी वारंवार लेखी पत्रव्यवहार व समक्ष शिष्टमंडळाने भेटी घेऊनही काम पूर्ण होत नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली

$
0
0

सटाणा : देवळा पोलिस ठाण्यासमोर हाकेच्या अंतरावरील श्री दुर्गामाता मंदिरातील दानपेटीवरच चोरट्यांनी हात साफ केले आहेत. दानपेटी पळवून नेण्याची ही शहरातील दुसरी घटना आहे.

गावातील महादेव मंदिराच्या दानपेटीतील चोरीचा अद्याप तपास लागलेला नसताना देवळा गावातील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात रात्री १२ वाजून ५९ मिनिटांनी दोन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. या दोघांनी चेहरा झाकून अवघ्या पाच मिनिटात कटरने दानपेटीची साखळी तोडून ४० ते ५० किलो वजनाची दानपेटी घेऊन पोबारा केला. मंदिरातील पुजारी योगेश वाघमोरे हे नित्यपूजेसाठी सकाळी सहा वाजता मंदिरात आल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांसद आदर्श ग्राम योजनेचा बट्ट्याबोळ

$
0
0

कामांना मंजुरीच नाही; खासदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श गावांचे स्वप्न पहात धुळीत मिळविण्याचा उद्योग जिल्ह्यात सुरू असून, सांसद आदर्श ग्राम योजनेचा बट्ट्याबोळ सुरू असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ऑक्टोबर २०१६ पर्यंत अंजनेरीचा विकास करण्याची जबाबदारी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर सोपविली असताना ९५ टक्के कामांना अद्याप प्रशासकीय मान्यताच न मिळाल्याने गोडसे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. विशेष म्हणजे काही कामांसाठी सीएसआरमधून निधी देण्यासही ठेंगा दाखविण्यात आल्याने योजना मार्गी लागणार कशी, असा पेच निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सांसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत दरवर्षी एक गाव आदर्श गाव म्हणून विकसित करण्याची जबाबदारी खासदारांवर सोपविली होती. प्रत्येक वर्षी एक गाव आदर्श केल्यास एका खासदाराला त्याच्या मतदारसंघामधील पाच गावे आदर्श करण्याची संधी मिळेल. देशभरात एका वर्षात शेकडो तर पाच वर्षांत एक हजारहून अधिक गावे आदर्श करण्याचे स्वप्न मोदी यांनी पाहिले होते. एकीकडे मोदी ही योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत आग्रही असताना नाशिक जिल्ह्यात स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून या योजनेला सुरूंग लावला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. गोडसे यांनी अंजनेरी गाव दत्तक घेतले असून योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला गोडसे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार यांच्यासह विविध विभागांचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते. जून २०१५ मध्ये अंजनेरीची निवड केली असताना गेल्या सात महिन्यांमध्ये १२१ कामांपैकी केवळ पाच ते सात टक्के कामेच पूर्ण झाल्याने गोडसे यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे कामांच्या प्रगतीबाबत ठोस माहिती नसल्याने त्यांची कानउघाडणी करण्यात आली. प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी संबंधित विभागांना १९ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली असून २० फेब्रुवारीला पुन्हा आढावा बैठक घेणार आहे. संबंधित ग्रामसेवकाची बदली करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती गोडसे यांनी दिली.


प्रवेशद्वार, इ लायब्ररी अधांतरी

या योजनेसाठी सरकारकडून स्वतंत्र निधी मिळत नसल्याने विविध योजनांसाठी येणाऱ्या निधीमधून ही कामे मार्गी लावण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. विशेष म्हणजे काही कामांना कोणत्याच योजनेमधून निधी मिळत नाही. अशी कामे सीएसआरद्वारे उभारण्यात येणाऱ्या निधीमधून मार्गी लावावी लागतात. अंजनेरीमध्ये इ लायब्ररी उभारणे, वायफाय सुविधा उपलब्ध करून देणे आणि आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यासारखी कामे सीएसआरमधून करण्यात येणार होती. मात्र सीएसआरमधून निधी देण्याऐवजी उद्योजक, धार्मिक व सामाजिक संस्थांकडून ठेंगा दाखविण्यात आल्याने ही कामे होणार की नाही हे पहाणे, औत्सुक्याचे ठरणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे कर्मचारी सेना शहराध्यक्षपदी निकुळे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका मनसे कर्मचारी सेना नाशिक शहराध्यक्षपदी नगरसेवक यशवंत निकुळे यांची निवड झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशन्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्षविस्ताराची मोहीम सुरू केली आहे. पक्षाच्या शाखांचे मजबूतीकरण केले जात आहे. महापालिका कर्मचारी सेनेच्या माध्यमातून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी नगरसेवक निकुळे यांच्यावर टाकण्यात आली आहे. राजगड कार्यालय येथे मनसे नेते अविनाश अभ्यंकर व मनसे कर्मचारी सेनेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांच्या हस्ते निकुळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. मनसे सचिव प्रमोद पाटील, प्रदीप पवार, राहुल ढिकले, संदीप लेनकर, सचिन भोसले, पराग शिंत्रे, कुणाल भोसले आदी उपस्थित होते. पक्ष वाढीसाठी मेहनत घेणार असल्याचे निकुळे यांनी सांगितले.


कोठावदे, बिडवेंनाही मिळाली संधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार स्वयंरोजगार सेनच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सागर कोठावदे, मनसे स्वयंरोजगार सेनेच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राम बिडवे, रोजगार स्वयंरोजगार सेनच्या नाशिक शहराध्यक्षपदी किशोर वडजे यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक राजगड कार्यालय येथे मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचे लचके तोडू देणार नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकार नाशिकवर सूड उगवत असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे तुकडे करण्याचा शासनाचा घाट घातला जात आहे. मात्र, शिवसेना विद्यापीठाचे लचके कदापि तोडू दणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला आहे. विद्यापीठ विभाजनास आमचा असून, याबाबत शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. भाजपकडून नाशिकचा विकास रोखला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विद्यापीठाच्या स्थलांतराला शिवसेनेने विरोध केला आहे. भाजपतर्फे सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. आधी नाशिकचे पिण्याचे पाणी पळविण्यात आले. आता उद्योगही पळविले जात असून, विद्यापीठाचेही तेच केले जात आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. भाजपच्याच डॉ. दौलतराव आहेर यांनी या विद्यापीठासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांना भाजप विभाजन करून श्रदांजली वाहत आहे काय, असा सवाल बोरस्ते यांनी केला आहे. नाशिकच्या वाट्याला येणाऱ्या अनेक संस्था अगोदरच नागपूरकडे पळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिकवर अन्याय झाला आहे. शिवसेना हा अन्याय सहन करणार नाही. या विभाजनाविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्याकडे तक्रार देणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images