Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

खोरे सर्वेक्षणावर पावसाचे पाणी

$
0
0
गोदावरी आणि तापी खोऱ्यातील तूट लक्षात घेता पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी दोन्ही खोऱ्यांच्या सर्वेक्षणावर पावसाळ्याने पाणी फेरले आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतरच या सर्वेक्षणाला प्रारंभ होईल, असे स्पष्टीकरण पाटबंधारे विभागाकडून देण्यात येत आहे.

विजेचा धक्का बसून महिला ठार

$
0
0
तुटलेल्या विजेच्या तारेचा शॉक बसून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना नाशिक तालुक्यातील कोटमगाव येथील म्हस्के वस्ती येथे बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

'नृत्यांगण'च्या पदन्यासाने रसिक तृप्त

$
0
0
नृत्याची देवता नटराजाची ‘नृत्यआरती’ करीत साकारलेला गंधार जेव्हा तराणाचा अनुभव देऊन जातो तेव्हा नाशिककर रसिकांच्या कानाबरोबरच डोळेही तृप्त होतात. नृत्यांगण या कथक नृत्यसंस्थेतर्फे गुरूपौर्णिमा २०१३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवरचनातील २५० विद्यार्थ्यांना ब्राह्मी लिपीचे धडे

$
0
0
लोप पावत चाललेली प्राचीन लिपींप्रतीची ओढ विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांना ट्रिब्युल्स या संस्थेच्या माध्यमातून धडे देण्यात येत आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून गंगापूर रोडच्या नवरचना शाळेत अडीचशे विद्यार्थ्यांची ब्राह्मी लिपी कार्यशाळा सुरू आहे.

मजूर संघाच्या अध्यक्षपदी खेमनार

$
0
0
नाशिक जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी राजाभाऊ खेमनार तर उपाध्यक्षपदी म्हसू कापसे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे गेल्या काही दिवसात सुरू असलेली चुरस संपुष्टात आली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सदस्यपदी विश्वास ठाकूर यांची नियुक्ती

$
0
0
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नियामक मंडळाच्या सदस्यपदी विश्वास ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकूर यांच्या सहकार, शिक्षण आणि सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

सिन्नरला तोतया निरीक्षकांचा शिरकाव

$
0
0
सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसीमध्ये वजनमापांची तपासणी करण्याच्या नावाखाली येणारे तोतया निरीक्षक आढळून आले आहेत. अशाच प्रकारे दोन कंपन्यांमध्ये आलेल्या निरीक्षकांसंदर्भात वैधमापन कार्यालयाशी संपर्क साधल्यावर भामटे पळून गेले आहेत.

आयटीआयमध्ये रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश आयटीआयमध्ये रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश

$
0
0
सातपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रिक्त जागांवरील प्रवेशांसाठी नव्याने ऑनलाईन विकल्प भरण्यात येणार आहेत. यासाठी ३१ ऑगस्ट रोजी प्रवेश देण्यात येणार आहेत.

लिलाव रद्द करण्याची नामुष्की

$
0
0
गोल्फ क्लब मैदानावर गणपती मूर्ती विक्रेत्यांसाठी लिलाव पध्दतीने स्टॉल उभारण्यात येतील असा दावा करणाऱ्या महापालिकेला मागील चार दिवसात तोडगा काढणे शक्य झाले नाही.

व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ज्यादा तुकडयांसाठी प्रक्रिया सुरू

$
0
0
कायम विनाअनुदानित तत्त्वावर शैक्षणिक सत्र २०१३ पासून नवीन खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नवीन व्यवसाय, जादा तुकड्या सुरू करणे तसेच व्यवसाय बदल करण्यासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

बलात्काऱ्यांना जामीन नको

$
0
0
बलात्कार तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर पावलं उचलावी यासाठी राज्य विधिमंडळ महिला हक्क व कल्याण समिती पुढाकार घेणार आहे. मुंबईतील शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन समितीतर्फे सरकारला विविध उपाययोजनांची मागणी करण्यात येणार आहे.

जकात, एलबीटीचा जाच नकोच

$
0
0
महापालिका क्षेत्रात जकात किंवा स्थानिक संस्था कर (एलबीटी) लावणे हे जाचकच आहे. या दोन्ही करांना लघु उद्योग भारतीचा तीव्र विरोध असून यापुढेही या विरोधातील लढा सुरूच राहील, असा निर्धार लघु उद्योग भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष योगेश कनानी यांनी व्यक्त केला आहे.

सहा धरणे फुल्ल

$
0
0
गेल्या तीन महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठा ६५ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील सहा धरणे शंभर टक्के भरली असून मोजकी धरणे वगळता सर्व धरणांमध्ये साठ टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याचा साठा आहे.

मनसे-भाजपची मिलीभगत

$
0
0
शहर विकास आराखड्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी आयोजीत केलेली महासभा अवघ्या दोन मिनीटांत गुंडाळण्यात आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी मनसे-भाजपवर टिकेची झोड उठवत डीपीतील काळेबेरे लपवण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करीत असल्याची टिका केली.

मनसे एसटी युनियनमध्ये मारामारी

$
0
0
इतरांना दणका देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी परस्परांनाच दणका दिला. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचे पर्यवसन गुरुवारी नाशिकरोड बसस्टँडवर मारामारीत झाले.

माथाडी कामगारांचा संप सुरूच

$
0
0
हमाली व तोलाईची दरवाढ करण्यात यावी, या मागणीसाठी माथाडी कामगारांनी सुरू केलेल्या संपावर कोणताही तोडगा न निघाल्याने हा संप सुरूच राहणार आहे.

अन् वाहतूक कोंडली

$
0
0
शरणपूर रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणारे सारेच हैराण झाले आहेत. मात्र, दोन दिवसांपुर्वीच या रस्त्याचे भाग्य उजळले आणि या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची तत्परता महापालिकेने दाखविली.

कुंभमेळ्यात मिळणार रियल टाइम वेदर

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात दर तीन तासांनी हवामानाचा अंदाज देण्यात येणार आहे. तशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी लोकसभेत दिली आहे. मोबाइल अॅपद्वारे ही माहिती उपलब्ध होणार असल्याने भाविक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रशासनच सायलन्स झोनमध्ये

$
0
0
सिव्हील हॉस्पिटल आणि गोल्फ क्लब मैदानाच्या भिंतीलगत उभे राहिलेले गणपती विक्रीचे स्टॉल कायम करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये असे सांगत महापालिकेने सायलन्स झोनकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यामुळे होत आहे.

सुविधा नाही तर स्थलांतरही नाही

$
0
0
गणेशोत्सवापूर्वी फुलविक्रेत्यांचे स्थलांतर करा, असा आदेश महापौरांनी दिल्यानंतर फुलविक्रेत्या संघटनेने आक्रमक भूमिका घेत सर्व सुविधा पुरवल्याशिवाय विक्रेते स्थलांतरित होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images