Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लासलगाव शहरात ७ तास लोडशेडिंग

$
0
0
लासलगाव शहरात काही दिवसांपासून दिवसभरात तब्बल सात तासांचे लोडशेडिंग सुरू असल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत.

लाचखोर पीएसआयला अटक

$
0
0
‘मी तुला जामीनासाठी मदत केली असून पुन्हा अटक न करण्यासाठी हजार रुपये दे’, अशी मागणी करणारा देवळाली कॅम्प येथील लाचखोर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंकुश थोरात याला अॅन्टी करप्शन ब्युरोने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

कावळा बसायला...

$
0
0
‘कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक वेळ’ या म्हणीचा प्रत्येय येणारा किस्सा नुकताच घडला. सिडकोतल्या एका पुतळ्याचे अनावरण कधी होणार असा प्रश्न एका कार्यकर्त्याला पडला होता. त्याने यासाठी नगरसेवकांकडे तगादा लावला.

वृक्ष पुनर्रोपणाचा श्रीगणेशा

$
0
0
दोन वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता ग्रीन आयडॉल करण्याचे निश्चित झाल्याने सध्याच्या रस्त्यालगत असलेल्या काही वृक्षांच्या पुनर्रोपणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

‘डीएड’चे प्रवेश सप्टेंबरपासून

$
0
0
कॉलेज तपासणीचा निर्णय जाहीर होत नसल्याने रखडलेले डीएड कॉलेजचे प्रवेश अखेर १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. ज्या तपासणीच्या निर्णयासाठी हे प्रवेश रखडले होते तो निकाल मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

सलग ३ रात्री चोरट्यांनी केले प्रयत्न

$
0
0
त्रिमूर्ती चौकातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या चोरट्याने सलग तीन रात्री याच परिसरातील काही दुकाने फोडण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

नाशिकच्या आरोग्याला ‘केंद्रा’ची मान्यता

$
0
0
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) अंतर्गत नाशिक महापालिकेने पाठविलेल्या ६७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे.

सिन्नर रेल्वेच्या कामास फेब्रुवारीत प्रारंभ

$
0
0
गेल्या अडीच वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेली नाशिक ते सिन्नर रेल्वेची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

रक्षा‘बंधन’ने बनविले आदिवासींना स्वयंपूर्ण

$
0
0
मेळघाटातील आदिवासींनी बनविलेल्या राख्या घराघरात पोहोचविणाऱ्या ‘प्रोजेक्ट बंधन’ने कुपोषितांसाठी दोन लाखांची मदत उभारली आहे.

आणखी १० व्यापा-यांवर दंडात्मक कारवाई

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स अर्थात एलबीटी चुकवणाऱ्या व्यावसायिकांविरोधात सुरू झालेल्या दंडात्मक कारवाईचा दुसरा टप्पा बुधवारी राबवण्यात आला. त्याअंतर्गत एलबीटी विभागाने आणखी दहा व्यावसायिकांवर कारवाई करीत २ लाख २० हजार रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल केली आहे.

...अन् देहेर किल्ल्यावरील कुंड झाली स्वच्छ!

$
0
0
शक्यतो कुणालाही कळणार नाही अशा अत्यंत निबिड झाडीत अन आकर्षक धुक्यात लपलेली पायवाट शोधत काही तरुण शिवकालिन देहेर गडावर जातात...

स्वच्छतागृहांचे रुपडे पालटणार

$
0
0
राज्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे आगामी सहा महिन्यांत रुपडे पालटणार असून त्याची सुरुवात एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांपासून होणार आहे.

कांदा, धान्य लिलाव आजपासून पूर्ववत

$
0
0
शेतकरी हिताबाबत व्यापारी व कामगार वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने बाजार समितीच्या लासलगाव मुख्य आवारासह निफाड व विंचुर उपबाजार आवारात आज, २९ ऑगस्टपासून कांदा व धान्य लिलाव पूर्ववत सुरू होत आहे.

डीपीसाठी आज घमासान

$
0
0
महासभेत सादर होण्यापूर्वी विवादास्पद ठरलेल्या शहर विकास आराखड्यासंबंधी (डीपी प्लॅन) आज, गुरुवारी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशकात आणखी २ मुद्रांक कार्यालय

$
0
0
प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे वाढते व्यवहार पाहता शहरात आणखी दोन ठिकाणी मुद्रांक तसेच नोंदणी कार्यालय सुरू होणार आहेत. नोंदणी व मुद्रांक कार्यालय सध्या शहरात पाच ठिकाणी कार्यान्वित आहे.

महिंद्रात ९,३०० रुपये पगारवाढ

$
0
0
देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिती आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदी अशाही स्थितीत नाशिकच्या उद्योग जगताला गुड न्यूज मिळाली आहे.

मंगळागौरीची रेकॉर्ड

$
0
0
श्रावण महिन्यात मंगळागौरीनिमित्त अनेक ठिकाणी मंगळागौरीच्या खेळांचे आयोजन केले जाते. आजकाल शहरामध्ये हे खेळ सादर करणारे अनेक ग्रुप आहेत. या ग्रुपमध्ये दोन-तीन महिला मंगळागौरीची गाणी गात असतात तर उरलेल्या महिला त्या गाण्यांवर खेळ खेळत असतात.

बस पास बंद; विद्यार्थी संतप्त

$
0
0
नाशिकरोड बसस्थानकात दुहेरी पास देणे अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गुरुवारी विद्यार्थ्यांना पास न मिळाल्याने अनेकांना तिकीट काढून प्रवास करावा लागला.

सातबाऱ्याला ‘आधार’ची साथ

$
0
0
प्रॉपर्टीची मालकी असलेल्या सात-बारा उताऱ्याला लवकरच ‘आधार’ मिळणार आहे. जमीन किंवा रिअल इस्टेट क्षेत्रातील फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी आधार नोंदणी क्रमांक सातबाऱ्यावर नोंदविले जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यात या उपक्रमाला लवकरच प्रारंभ होणार आहे.

विरोधक आक्रमक, पण...

$
0
0
शहर विकास आराखडासंबंधी (डीपी प्लॅन) चर्चा करण्यासाठी गुरूवारी आयोजीत केलेली महासभा अवघ्या दोन मिनीटांत तहकुब करण्यात आली. बैठकीस महापालिका आयुक्त संजय खंदारे आणि नगररचना विभागाच्या अधिकारी सुलेखा वैजापूरकर उपस्थिती नसल्याने सभा तहकूब करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली होती.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images