Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शाळांमध्ये आधार नोंदणी सुरू

$
0
0
आधार नोंदणीसाठी पालक, विद्यार्थ्यांची होत असलेली फरफट अखेर थांबली असून शाळांमध्ये आधार नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार सोमवारपासून नाशिकरोडच्या के. एन. केला हायस्कूल व सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये प्रत्येकी तीन मशिन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

पावणे दोन कोटींचा दंड

$
0
0
अवैधरित्या तसेच प्रमाणापेक्षा अधिक गौण खनिजांची वाहतूक केल्याप्रकरणी नाशिक महसूल विभागाने चार महिन्यांत एकूण पावणे दोन कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सातपूरला महिलेचा खून

$
0
0
सातपूरमधील वासाळी परिसरात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मृत महिलेच्या पतीसह अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे.

आ. कदमांची जामिनावर मुक्तता

$
0
0
शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याविरुद्ध पिंपळगाव-बसवंत पोलिस स्टेशनमध्ये शिवीगाळ, विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक होण्याची अटकळ होती.

मोबाइलसाठी मुलाने केली पित्याची हत्या

$
0
0
मोबाइल विकत घेण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून दारुड्या मुलाने पित्याची हत्या केल्याची घटना एकलहरा गावाजवळील गंगापाडळी शिवारात घडली. या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ग्रामपंचायत निवडणुका २२ सप्टेंबरला

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील तीन, जळगावमधील चार आणि नगर जिल्ह्यातील ११ अशा नाशिक विभागातील एकूण १८ ग्रामपंचायतींसाठी येत्या २२ सप्टेंबरला मतदान होणार असून या निवडणुकांचा ‌निकाल २४ सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

अशीही फसवणूक

$
0
0
कितीही नाही म्हटलं तरी तोतयागिरीचा अनुभव प्रत्येकाला येत असतो. शहरात पार पडलेल्या एका मेळाव्यात याचा अनुभव एकाने घेतला. त्यात झालं असं की, मेळाव्यासाठी बडी नेतेमंडळी येणार असल्याने कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली होती. त्यातील काही कार्यकर्त्यांसाठी हा पहिलाच मेळावा होता.

कला समाजाभिमूख व्हावी यासाठी...!

$
0
0
रमोद कांबळे म्हटले की आपल्या नजरेसमोर लगेचच येते की खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्यांचा पाहुणचार केला. त्यांच्या शिल्पकलेची मोहिनी खुद्द तेंडुलकरवर पडली म्हटल्यानंतर कांबळेच्या हातात काही जादू नक्कीच असणार.

थोरांच्या पुतळ्यांना घोर

$
0
0
नाशिकरोड येथील थोरांच्या पुतळ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शहराची ओळख असलेले पुतळे अखेरची घटका मोजत आहेत.

गोप‌िका फोडणार दहीहंडी !

$
0
0
दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या गोविंदा पथकांचे साहस दुरूनच पाहणाऱ्या नाशिकमधील महिला व मुली आता मनोरे रचनार आहेत. राष्ट्रवादी किमया युवती मंचच्या पुढाकारामुळे शहरात पहिल्यांदाच गोपीकांचे पथक उद्या (२९ ऑगस्ट) होणाऱ्या दहिहंडीच्या सोहळ्यात सहभागी होणार असल्याने उत्सुकतेचे वातावणर निर्माण झाले आहे.

नाशिकरोडला पाणी नाही

$
0
0
नाशिकरोड विभागातील भीमनगर येथील नवीन जलकुंभाची जलवाहिनी जोडण्याचे काम करावयाचे असल्याने काही भागात गुरूवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने तर सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

‘डीपी’ खरा की खोटा ?

$
0
0
महासभेत सादर होण्यापूर्वीच वादात अडकलेल्या शहर विकास आराखड्यावर (डीपी प्लॅन) प्रशासनाकडून गुरूवारी (२९ ऑगस्ट) विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील महासभेत डीपी प्लॅन फुटल्याचा आरोप करीत सदस्यांनी तो फेटाळण्याची मागणी केली होती.

गणेशोत्सव काळात सुविधा पुरवा

$
0
0
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या दृष्टीकोनातून सर्व सोयीसुविधा पुरवण्याची मागणी शहरातील विविध गणेश मंडळांनी केली आहे.

पतीनेच केली पत्नीची हत्या

$
0
0
सातपूर परिसरातील वासाळी शिवारात रविवारी मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या खून प्रकरणात पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला अटक केली आहे.

त्रिमूर्ती चौकात एटीएम फोडले

$
0
0
त्रिमूर्ती चौकातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एटीएममध्ये ही घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.

लासलगाव कृउबा बेमुदत संपावर

$
0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सायंकाळी बाजार समिती प्रशासन व अडत व्यापा-यांमध्ये झालेल्या बैठकीत शेतकरी हिताच्या निर्णयावर एकमत न झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह विंचूर व निफाड उपबाजार आवारावर लिलावाचे कामकाज अनिश्चित काळासाठी बंद झाले आहे.

आ. जाधवांची याचिका फेटाळली

$
0
0
गेल्या वर्षी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालाला हरकत घेत शिवसेनेचे उमेदवार नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे यांनी दाखल केलेल्या याचिकेला प्रत्यारोप करणारी आमदार जयंत जाधव यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.

पीएसआय महिलेचा कौटुंबिक छळ

$
0
0
मुंबई पोलिस दलात पीएसआय म्हणून काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने तिच्या पतीसह सासू-सासऱ्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार तक्रार दाखल केली आहे.

सावधान... नोकर भरती सुरू आहे

$
0
0
‘नमस्ते, मैं केंद्र सरकार की भारत नव-निर्माण योजना सेवासे बात कर रही हूँ. आपका रेझ्युमे हमारे पास आया है... उसके द्वारा हम आप को गव्हर्नमेंट जॉब की उपलब्धी पेश करते है...’ अशा प्रकारचा संवाद असणारे फोन सध्या काही तरुणांना येत आहेत.

स्टॉल्स व्यावसायिकांना स्थलांतर नको

$
0
0
सिव्हील हॉस्पिटल आणि गोल्फ क्लब मैदानाच्या भिंतीलगत गाळ्यांची उभारणी केलेल्या गणपती मूर्ती विक्रेत्यांनी महापालिकेच्या तोडग्याला वाटाण्याचा अक्षता लावत स्थंलातरीत होण्यास ठाम नकार दर्शवला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images