Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जनतेला प्रतीक्षा पुनर्वैभवाची!

$
0
0

शहराच्या मध्यभागी आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालायाशेजारून वाहत असलेल्या नाल्याचे विदारक दृश्य बदलून त्याजागी सन २००५ साली तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइईओ) निगार हुसैन यांनी तत्कालीन नगरसेवकांच्या सहाय्याने नालापार्क उभारले. दानशुराच्या मदतीने लाखो रुपये खर्चून निर्माण केलेल्या या उद्यानाला सध्या मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवकळा आली आहे.

शहराच्या मध्यभागी असलेल्या हाडोळा भागात दोन उद्याने आहेत. कॅन्टोन्मेंट शाळेच्या पाठीमागे असलेल्या गार्डनमधील झोके तुटलेले आहेत. उद्यानातील हिरवळ पाण्याअभावी वाळून गेली आहे. याच भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर भागातील सार्वजनिक उद्यान तत्कालीन नगरसेवकांनी मोठ्या प्रयत्नाने निर्माण केले. मात्र, त्यालाही आता अवकळा आली आहे. उद्यानातील हिरवळ गायब झाली आहेत. संरक्षक जाळ्या सुद्धा चोरीला गेल्या आहेत. उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी असलेल्या ट्रॅकच्या फरशा तुटून पडल्या आहेत.

प्रशासनच जबाबदार नालापार्क उद्यानाच्या निर्मितीमागील मूळ उद्देश शहरातील नागरिकांना सांयकाळ निवांत घालविण्यासाठी व पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असावा, या हेतूने बांधण्यात आले होते. मात्र, आज केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे उद्यानाची वाताहत झाली आहे. काही वर्षापूर्वी रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, खेळण्याचे व व्यायामाचे साहित्य गायब झाले आहे. नाल्याला पूर्वी असलेले वैभव संपुष्टात आले आहे. प्रवेशद्वारावर जंगली वनस्पती वाढल्या आहे. तसेच हिरवळीला आणि शोभेच्या झाडांना नियमित पाणी दिले जात नाही. याशिवाय उद्यानांमध्ये नियमित साफसफाई केली जात नाही.

मोजकीच उद्याने सुस्थितीत कॅन्टोन्मेंट बोर्डमधील वॉर्ड क्रमांक २ मध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या मागील बाजुस असणारे गार्डन सुस्थितीत आहे. तसेच वॉर्ड क्रमांक ४ मधील उद्यानात देखील नियमित स्वच्छता केली जाते. झाडांची व्यवस्थित निगा राखली जाते. वॉर्ड क्रमांक ७ मध्ये खंडेराव टेकडीच्या पायथ्याशी असलेले टेंपल हिल उद्यान तर सांयकाळी बच्चेकंपनीसह ज्येष्ठ नागरिकांच्या गर्दीमुळे फुलून जाते. परंतु, वॉर्ड क्रमांक ५, ६ व ८ मध्ये अद्याप उद्यानांची निर्मिती करण्यात आलेली नाही. तेथे उद्यानांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी मांडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घंटागाडी कंत्राट पाच वर्षांसाठी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने स्वच्छतेचे काम आऊटसोर्सिंगमार्फत करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर महापालिका प्रशासनाने मंगळवारच्या विशेष महासभेत घंटागाडी कंत्राटाचा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी ठेवला आहे. गुजरातमधील सुरतच्या धर्तीवर घंटागाडीचे कंत्राट दिल्यास स्वच्छता करवाढीचा विचार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याबाबत बुधवारी (दि. २) महासभा होणार आहे.

प्रशासनाने घंटागाडी कंत्राट दहा वर्षासाठी देण्याचे समर्थन करीत कंत्राटदाराची पुन्हा पाठराखण केले आहे. सोबतच सुरतच्या धर्तीवर कचरा गोळा करण्याची प्रक्रिया राबविण्यास विलंब लागणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, प्रशासनाने दहा वर्षांचे कंत्राट देण्याची विनंती केली असली तरी सत्ताधारी पाच वर्षासाठी अनुकुल आहेत.

महापालिकेतील घंटागाडी कंत्राट सध्या वादग्रस्त बनले असून आदर्श घंटागाडी योजना शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मार्चमध्ये घंटागाडीचे कंत्राट दहा वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. मात्र महासभेने हा प्रस्ताव फेटाळत कंत्राट तीन वर्षांचा आणि विभागनिहाय देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी केली गेली नाही. मनसेच्याच बड्या नेत्याने हे कंत्राट दहा वर्षाचा देण्यासाठी आग्रह धरल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांसाठी कंत्राटदाराला ३०० कोटी देण्याचा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव फेटाळल्याने मुदतवाढीवर काम सुरू होते.

दरम्यान, महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी सुरतच्या घंटागाडी योजनेचा अभ्यास दौरा केला. त्यात महापालिकेने घंटागाडी कंत्राट दहा नव्हे पाच वर्षांसाठी दिला असून तो विभागनिहाय दिला आहे. हाच पॅटर्न अवलंबण्याची सत्ताधाऱ्यांची मानसिकता असली तरी प्रशासनाने पुन्हा दहा वर्षांचेच कंत्राट देण्याचे समर्थन केले आहे. सुरतमध्ये स्वच्छता कराची आकारणी केली जात असून रहिवासी मालमत्ते वर ६०० रुपये, व्यावसायिक मालमत्ता ७०० रुपये, औद्योगिक मालमत्ता १५०० रुपये प्रतिवर्ष चार्जेस लावले जातात. तशीच वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सोबत दहा वर्षांसाठी कंत्राट दिल्यास भांडवली गुंतवणूक कमी होवून महापालिकेचा बोजा कमी होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. सोबतच सुरतच्या धर्तीवर कचरा संकलनाचे वाटणी केल्यास खर्च वाढून प्रक्रियाही लांबणार असल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे. घंटागाड्या वाढवण्यासह जीपीएस, बायोमेट्रीक व सेल्फी अटेंडससारख्या सुविधा देण्याचे आणि संगणकीय नियंत्रण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर ग्लोबल पद्धतीने निविदा मागवून हे कंत्राट देण्याचे प्रस्तावित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीला कोर्टात आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

बहुसंख्य मुस्लिम सभासद असलेल्या दि फैज मर्कन्टाईल को-आप. बँकेची नुकतीच झालेल्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेत अनेक गैरप्रकार घडले आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रियाच बेकादेशीर ठरवावी, अशी मागणी करीत काही पराभूत विरोधी उमेदवारांनी जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासह सत्ताधारी संचालक मंडळाला प्रतिवादी बनविण्यात आले आहे.

प्रतिवादींना कोर्टाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वजाहत बेग, कुतबुद्दीन शेख, दिलीप महाले व पटेल लतीफ यांनी कोर्टात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत निवडणूक निर्णय आधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपणे न राबविता अनेक बेकायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करीत एका गटाला फायदा पोचविला. मतदारयादीतून ४०० नावे वगळण्यात आली. मतदानाच्या दिवशी मृत्यू झालेल्या सुमारे ३०० सभासदांच्या नावावर तोतया मतदारांनी मतदान केले. तर निवडणुकीच्या अधिसुचनेनुसार मतदान न घेता मतदानाची तारीख बदलण्यात आली. संचालिका रफतजहाँ शकील शेख या थकबाकीदार सभासदाला जामीनदार आहेत. याबद्दल आक्षेप घेतला असतांनाही त्यांचा अर्ज छाननीत वैध ठरविणयात आला. असे विविध मुद्दे निवडणूक याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.

प्रशासक नियुक्तीचीही मागणी

अन्य एका याचिकेत कोर्टाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीत सत्तारूढच्या एकता पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांचा अपना पॅनलचा दारुण पराभव केला होता. सत्तारूढ गटात फुट पडून संचालक निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेलिकॉप्टर उड्डाणाची गडावर हवी परवानगी

$
0
0

नाशिक : सप्तशृंगीदेवी गडावरील धोकादायक दरडी कोसळू नयेत यासाठी संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी हेलिकॉप्टरची मदत घेता यावी यासाठी परवानगी मिळावी, अशा आशयाचे पत्र आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

हेलिकॉप्टरचा २ ते २५ डिसेंबर या कालावधीत वापर करू द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. सप्तशृंगीदेवी मंदिराच्या कळसावरील धोकादायक दरडी हटविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. संबंधित कंपनीला लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीने युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी कंपनीला हेलिकॉप्टरची गरज भासणार असून उड्डाणाची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे करण्यात आली आहे. हिमालयीन कंपनीचे हेलिकॉप्टर वापरले जाणार असून हे हेलिकॉप्टर गडावरील फॅनिक्युलर ट्रॉलीच्या आवारातील जागेवरून उड्डाणाचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात रद्द करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा महासभेत घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला केल्या आहेत. पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करीत नागरिकांना पाणी नियमितपणे उपलब्ध करून द्यावे तसेच पाणीगळतीबाबत कठोर पावले उचलून नागरिकांची गैरसोय होणार नाही दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना महाजन यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या महासभेत शहरात आठवड्यातून एक दिवसाची पाणीकपात लागू करण्याचा निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकारी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार शहराची लोकसंख्या २० लाख गृहीत धरली तरी १५ ऑक्टोबर २०१५ ते ३१ जुलै २०१६ या कालावधीसाठी एकूण सुमारे २९१३ एमसीएफटी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. पाणीवाटप बैठकीत ३१ जुलैपर्यंत उपलब्ध पाण्यातून ३२०० एमसीएफटी पाणी आरक्षणाला बैठकीत मान्यता देण्यात आली.

शहरासाठी पुरेसे पाणी आरक्षित केले असताना पाणी वितरणाच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीने होईल. पाणी वितरणादरम्यान होणाऱ्या गळतीला आळा घालण्यासाठी काटेकोरपणे नियोजन महापालिकेने केल्यास नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. तसेच पाणीकपातीचीही गरज भासणार नाही. पाणी पुरवठ्यासारख्या संवेदनशील प्रश्नाबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज असून याबाबतीत लोकप्रतिनिधींनी राजकीय भूमिका बाजूला सारावी, असे आवाहन महाजन यांनी केले आहे. महापालिका प्रशासनाने पाणी गळती होऊ नये याची विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये थंडीची चाहूल

$
0
0



नाशिक : नोव्हेंबर महिना संपला तरी अद्यापही थंडीचा फारसा कडाका सुरू झालेला नाही. परंतु, आता नाशिककरांना हळूहळू थंडी जाणवू लागली आहे. सकाळच्यावेळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना थंडीमुळे गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या थंडीवर अवकाळी पावसाने पाणी फिरवले. त्यामुळे दिवाळीदरम्यान नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेताच आला नाही. परंतु, आता मात्र शहरवासियांना थंडीच्या पाऊलखुणा जाणवू लागल्या आहेत. चार दिवसांमध्ये शहराच्या किमान तापमानामध्ये चढ उतार होत असून १ डिसेंबरला (मंगळवार) चार दिवसातील सर्वात कमी तापमानाचा अनुभव नाशिककरांनी घेतला. गेल्या वर्षी २८ डिसेंबरला १६.५, २९ डिसेंबरला १८.८, ३० डिसेंबरला १७.५ तर १ डिसेंबरला १५.९ इतके कमाल तापमान नाशिकमध्ये होते. थंडीची

चाहूल लागल्यामुळे गरम कपड्यांच्या खरेदीसाठी शालिमार, तिबेटियन मार्केट, मेनरोड यासह शहरातील विविध भागांमध्ये गर्दी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुसावळ लोकलचा वाघोबा आला रे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

खान्देशवासीयांसह नाशिककरांना प्रतिक्षा असलेली नाशिक-भुसावळ लोकलचा केवळ फार्सच ठरणार असल्याचे दिसत आहे. लोकल आज सुरु होणार, उद्या सुरु होणार अशा केवळ वावड्याच उठवल्या जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नाशिक-भुसावळ दरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये नाशिक आणि खान्देश पट्ट्यातील नागरिकांचा समावेश लक्षणीय आहे. नाशिकमध्ये सातपूर, नाशिकरोड, सिडको भागात खान्देशचे बांधव मोठ्या संख्येने स्थायिक झालेले आहेत. काम आणि नातेसंबंधानिमित्ताने त्यांचे जळगाव-धुळे जिल्ह्यात नियिमित जाणे-येणे असते.

लोकलची तीव्र गरज

भुसावळला जाण्यासाठी सध्या पहाटे पाच वाजता पॅसेंजेर आहे. काशी एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या आहेत. परंतु, त्यांना नेहमी गर्दी असते. काही गाड्या फक्त भुसावळला थांबतात. जळगाव, चाळीसगाव, पाचोरासह अन्य स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांची पंचाईत होते. भुसावळ पॅसेंजेर तर नाशिकरोड स्टेशनवरच फुल्ल होते. पुणे-लोणावळ लोकल सेवेच्या धर्तीवर नाशिक-भुसावळ लोकल सुरू केल्यास तिला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

जन्माआधीच हत्या

भुसावळ लोकल सुरू होणार, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले होते. लोकलचे टाईमटेबलही अनेकांच्या व्हॉटसअॅपवर आले. काही वृत्तपत्रांमधून लोकल सुरू होणार असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले. परंतु, तीन महिने झाले तरी अद्याप काहीच हालचाल दिसत नाही. रेल्वेचे नाशिकरोडचे अधिकारी, कर्मचारी छाती ठोकपणे सांगायला तयार नाही. आता तर ही लोकल रद्द झाल्याचेच वृत्त येत आहे.

पाचोरा, चाळीसगाव, जळगावसह महत्त्वाच्या सर्व स्टेशनवर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. तेव्हा प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक-भुसावळ लोकल त्वरित सुरू करावी. नोकरदारांसह विद्यार्थ्यांनाही या लोकलचाही फायदा होऊ शकेल.

- आबासाहेब धामणे

निश्चित सांगता येत नाही हो!
नाशिकरोड रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एम. बी. सक्सेना यांच्याशी 'मटा'ने संपर्क साधला असता त्यांनी अशी गाडी सुरू होणार असल्याचा सध्यातरी प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, व्हॉटसअॅपवरील टाईमटेबल विश्वासहार्य नसते. ही गाडी कधी सुरू होईल ते सांगता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिलिटरी स्कूल शिक्षक परीक्षा आजपासून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाईन स्वरुपात असलेली ही परीक्षा सकाळी ९.३० ते १२.३० व २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांमध्ये होणार आहेत. एकूण ६१६ परीक्षार्थी यावेळी परीक्षा देणार आहेत. यासाठी परिक्षार्थींनी कागदपत्र तपासणी, बायोमेट्रिक ओळखपत्र तसेच उमेदवाराचे कॉम्प्युटराईज्ड फोटोसोबत आणायचे आहेत. आर्मी वेल्फफेअर एज्युकेशन सोसायटीचे भारतात एकूण १३५ आर्मी पब्लिक स्कूल आहेत. त्यापैकी २४९ प्री-प्रायमरी स्कूल आहेत. या शाळांमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात तर ५ हजार विद्यार्थ्यांचा दरवर्षी प्रवेश होतो. या संस्थेत कार्य करण्याची संधी शिक्षकांना या परिक्षेद्वारे मिळू शकणार आहे.
परीक्षेसाठी उत्तम तांत्रिक सुविधा व गैरप्रकार रोखण्यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. पॉलिटेक्निकचे प्राचार्य मनोज बुरड, उपप्राचार्य सागर पाटील, पंकज महाले, यज्ञेश घमंडी हे परीक्षेसाठी तांत्रिक सहाय्य करणार
आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डब्ल्यूटीओ' विरोधात आज आंदोलन

$
0
0

डब्ल्यूटीओ' विरोधात आज आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येत्या १३ डिसेंबरला नैरोबी येथे आयोजित जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्य देशांच्या बैठकीत भारत सरकार उच्च शिक्षणाबाबतीतील करारावर सही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा करार झाल्यास भारतातील उच्च शिक्षण महागाईच्या गर्तेत जाण्याची तसेच परदेशी शिक्षण घेण्याची नाहक वेळही भारतीय विद्यार्थ्यांवर येण्याची भीती आहे. त्यामुळे असा करार करू नये, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
मागील सहा महिन्यांपासून अखिल भारत शिक्षण अधिकार मंच या संघटनेतर्फे देशभर आंदोलन व जनजागृती मोहिम राबविली जात आहे. तसेच ५ ते १३ डिसेंबर या काळात दिल्लीतही धरणे आंदोलन केले जाणार आहे. देशातील विविध संस्था, संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच ही मोहिम राबवित आहे. जिल्हाधिकार्यांना याबाबत निवेदनही दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॉगिंग ट्रॅकला फुटले पाय!

$
0
0

सातपूर परिसरात विविध भागातून वास्तव्यासाठी नागरिक आले. यामध्ये बहुतांश कर्मचारी वर्ग आहे. महापालिकेला सर्वाधिक कररुपी उत्पन्न देणाऱ्या सातपूरची नागरी सुविधा मिळण्याबाबत सुरू असलेली उपेक्षा अद्याप थांबू शकलेली नाही. सातपूर विभागात एमआयडीसीतील क्लब हाऊस वगळता अन्यत्र मोठा जॉगिंग ट्रॅकच नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी असलेल्या नागरिकांना जॉगिंगसाठी थेट रस्त्यावरच उतरावे लागते. यात अनेकदा रस्त्यावर जॉ‌गिंग करतांना भरधाव येणाऱ्या वाहनांचा देखील धोका पत्करावा लागतो.

जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था कामगारनगर भागात असलेल्या कॅनल रोड, राज्य कर्मचारी वसाहत अशोकनगर व सातपूर कॉलनीमधील मीनाताई ठाकरे उद्यान याठिकाणी महापालिकेने जॉगिंग ट्रॅक उभारले आहेत. यामध्ये सातपूर क्लब हाऊसच्या जॉगिंग ट्रॅक असमतोल असल्याने त्यावर चालतांना कसरत करावी लागते. तर कामगार नगरच्या जॉगिंग ट्रॅकवर माती उडत असल्याने आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळेस पाणी मारण्याची मागणी व्यायामपटूंनी केली आहे. अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीत असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर मुलांची खेळण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे पायी चालतांना वाट शोधावी लागते. सातपूर कॉलनीतील मीनाताई ठाकरे उद्यानातील जॉगिंग ट्रॅक रोजच टवाळखोरांचा अड्डा भरलेला असतो. जॉगिंग ट्रॅकला बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यात टवाळखोरांनी गायब केल्या आहेत.

पेव्हर ब्लॉकही गायब नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी लाखो रुपये खर्च करीत सातपूर पोलिस स्टेशनला लागून एक किलोमिटरचा जॉगिंग ट्रॅक उभारला होता. मात्र, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा जॉगिंग ट्रॅकच जागेवरून गायब झाला आहे. आता केवळ जाळ्या उरल्या आहेत. तसेच ट्रॅकवरील पेव्हर ब्लॉक देखील गायब झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी निधी येणार कुठून?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी २०० कोटींचा विशेष निधी मंजूर करण्याची तयारी सोमवारच्या (दि. ७) महासभेत सुरू केली आहे. नगरसेवकांना शांत करण्यासाठी हा प्रयत्न असला तरी निधी कुठून येणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

चालू वर्षाचे आर्थिक उत्पन्न १४३७ कोटी अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात ९२६ कोटीच पदरात पडणार असल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळणार आहे. सहाशे कोटी महसूली खर्च तर ३०० कोटींचा स्पीलओव्हर असून २०० कोटींचे देयके अद्यापही बाकी आहेत. त्यामुळे रस्त्यांचा निधी हा गाजरच ठरण्याची शक्यता दिसत आहे.

गेल्या साडे तीन वर्षांपासून प्रभागातील कामे होत नसल्याची नगरसेवकांची ओरड आहे. सिंहस्थात शहरात रस्त्यांची कामे झाले असली तरी अतंर्गत रस्त्यांची समस्या कायम आहे. शहरातील अतंर्गत कॉलनी रस्त्यांची अवस्था खराब आहे. खडीकरण व डांबरीकरण होत नसल्याने नगरसेवकांची अडचण वाढली आहे. महापालिका निवडणूक समोर असल्याने या रोषात भर पडण्याच्या धास्तीपोटी सत्ताधाऱ्यांनी अंतर्गत रस्ते व कॉलनी रस्त्यांसाठी २०० ते २५० कोटींचा निधी देण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी येत्या सोमवारी महासभा होणार असून त्यात या विषयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

सत्ताधाऱ्यांनी २०० कोटी देण्याची तयारी दर्शवली असली तरी हा निधी येणार कुठून असा प्रश्न उपस्थित केला आहे. जकातीपाठोपाठ एलबीटीही हद्दपार होणार असल्याने महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे. चालू वर्षाचे आर्थिक बजेट हे १४३७ कोटी असले तरी मार्चअखेर तिजोरीत ९२६ कोटीच जमा होण्याची शक्यता आहे. या उत्पन्नात खर्चाचा मेळ कसा घालावा असा यक्षप्रश्न प्रशासनापुढे आहे. ९२६ कोटीतून सुमारे ५७५ कोटी रुपये हा महसूली खर्च राहणार आहे. तर सिंहस्थातील रस्ते, कर्जाचा हफ्ता, जेएनयूआरएमचा हफ्ता, चालू विकासकामे, दलित व महिलांसाठी राखीव निधी यासाठी जवळपास ३०२ कोटी रुपये लागणार आहे. तर सिंहस्थाची उर्वरित बिले देण्यासाठी अजून १८१ कोटीची गरज आहे. त्यामुळे उर्वरित कामांसाठी तिजोरीत पूर्ण खळखळाट आहे. सध्याची विकासकामासाठी निधी कुठून आणायचा हा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

कामासाठी वर्षभराची प्रतीक्षा

महासभेने २०० कोटींचा प्रस्ताव पारीत केला तर त्यासाठी हा निधी येणार कुठून असा प्रश्न उभा राहिला आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ पाहता चालू वर्षाच्या निधीतून ही कामे करणे सध्या तरी शक्य दिसत नाही. हा निधी पुढील वर्षाच्या बजेटमध्ये धरावा लागणार असल्याने नगरसेवकांसाठी हे तात्पुरते गाजरच ठरणार आहे. त्यामुळे प्रस्ताव पारित झाला तरी त्याची कामे ही सन २०१६ मध्येच होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूची तीव्रता घटली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीत सप्टेंबर व ऑक्टोबरच्या तुलनेत डेंग्यू व स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. डिसेंबरच्या चालू आठवड्यात शहराच्या हद्दीत डेंग्यूचे केवळ दोनच रुग्ण आढळले असून नोव्हेंबरमध्ये रुग्णांची संख्या रोडावली आहे. दरम्यान, जानेवारीपासून आतापर्यंत शहराच्या हद्दीत ३३५ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात शहरात डेंग्यूचा उद्रेक झाला होता. ऑक्टोबर महिन्यात शहराच्या हद्दीत १०४ डेंग्यूचे पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये मात्र रुग्णांची संख्या कमी झाली आहे. नोव्हेंबरमध्ये १५७ संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ७७ रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आले. यात शहराच्या हद्दीतील ६० रुग्ण होते. त्यामुळे ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या निम्म्यावर आल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे. डिसेंबरच्या चालू आठवड्यात १३ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी केवळ २ जणांनाच डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजकातील फलक फाडले

$
0
0

बिटको चौक ते देवळालीगावातील महात्मा गांधी पुतळा दरम्यान रस्ता दुभाजकाचे सुशोभीकरणाचे काम महापालिकेत ठरावाद्वारे एका बांधकाम कंपनीला मिळाले आहे. तर शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा दरम्यानच्या दुभाजकाच्या सुशोभीकरणाचे काम एका खासगी शैक्षणीक संस्थेला देण्यात आले आहे. बिटको चौक ते देवळालीगावातील दुभाजकांमध्ये चाफा व इतर शोभेची झाडे लावण्यात आली आहे. त्यांना पाणी घालून त्यांचे संगोपन केल्यामुळे शोभा वाढली आहे. हे काम ज्या कंपनीने केले तीचे फलक दोन दिवसांपूर्वी दुभाजकात लावण्यात आले होते. ते अज्ञात टवाळखोरांनी काढून टाकले.

याकामासाठी पुढाकार घेणाऱ्या नगरसेविका वैशाली दाणी यांनी सांगितले, की महापालिकेकडे विकासासाठी निधी नाही. कुंभमेळ्यात सिन्नरफाटा रेल्वे गेटच्या रस्त्याचे झाले. आता दुभाजक सुशोभीकरणाचे काम झाले आहे. मात्र, हे काम पुरस्कृत करणाऱ्या कंपनीचेच फलक काढून टाकल्याने संबंधित कंपनीचे संचालक नाराज झाले आहे. अन्य मार्गावरील दुभाजकांमध्ये झाडे जळू लागली असून कचरा साचला आहे. दुभाजकाची शोभा वाढली असताना गैरप्रकार होणे चुकीचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोडरोम‌िओंचा उच्छाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रत्यय नाशिककरांना वारंवार येऊ लागला आहे. त्यातच शहराच्या विविध भागातील तरुणी सध्या रोडरोमिओंचे लक्ष्य ठरताहेत. वर्दळीच्या रस्त्यांवरही तरुणींना रोडरोमिओ आणि टवाळखोरांचा सामना करावा लागत असून, याचे गंभीर पडसाद उमटत आहेत. अशा घटनांमुळे तरुणींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होते आहे.

रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणीपेक्षांही गाडी चालवणाऱ्या मुलींना जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गाडी चालवताना पाठलाग करणे, गाडी चालवताना ओव्हरटेक करणे, चारही बाजूंनी गाड्यांचा गराडा घालणे, टोमणे मारणे, अश्ल‌िल भाषा बोलणे अशा प्रकारांना तरुणींना तोंड द्यावे लागते आहे. मागील आठवड्यात अशाच प्रकारामुळे कृषीनगर परिसरात दोन तरुणी अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना घडल्याने पालकवर्गही धास्तावला आहे.

कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, महात्मानगर, कॉलेजरोड, गंगापूररोड, ‌त्रिमुर्ती चौक, पवननगर चौक, सिडकोतील स्टेटबँक चौक, पाथर्डीचौक, आयटीआय सिग्नल ते सातपूर पोलिस चौकी, त्र्यंबकरोड, पेठरोड, दिंडोरीरोड या रस्त्यांवर मागील काही दिवसांपासून रोडरोमिओ आणि टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे. सायंकाळी आणि कमी गर्दीचा फायदा घेत तरुणींना लक्ष्य केले जात आहे.

मुलींमध्ये भीतीचे वातावरण आपला कुणीतरी पाठलाग करते आहे किंवा आपण टवाळखोरांचे लक्ष्य ठरतो आहोत हे स्पष्टपणे सांगण्यासही मुली घाबरत असल्याची सध्याची परिस्थिती आहे. असा प्रसंग घडल्यावर काय करावे किंवा पोलिसांकडे मदत कशी मागावी याविषयी देखील माहिती नसल्याने मुली तक्रार करणे टाळतात. तसेच आपण तक्रार केल्यास किंवा टवाळखोरांना विरोध केल्यास त्यानंतर काय परिणाम होईल या विचाराने अनेक मुलींना हा त्रास सहन करण्याव्यतिरिक्त पर्याय दिसत नाही.

पथदीप बंद मॉडेल कॉलनी ते कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, एबीबी सर्कल ते सातपूर पोलिस चौकी यांसारख्या बऱ्याचदा भागातील पथदीप बंद नसल्यानेदेखील असे प्रकार वाढले आहेत. ज्या रस्त्यांवर तरुणींची छेड काढण्याचा किंवा त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होतो अशा रस्त्यांवरचे पथदीप

बऱ्याचदा बंद असल्याचे आढळून आले आहे. संध्याकाळी सातनंतर या रस्त्यांवरून वर्दळदेखील कमी होत असल्याने अशा ठिकाणी तरुणींना जाणूनबूजून लक्ष्य केले जाते. त्यामुळेच या रस्त्यांवरचे पथदीप सुरू केव्हा होणार अशीही विचारणा पालकवर्गाकडून केली जाते आहे.

तक्रार करण्याचे आवाहन तरुणींना असे प्रकार घडल्यास पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हेल्पलाइन किंवा एका फोनकॉलमुळे नक्कीच हा त्रास कमी होऊ शकतो. त्यामुळे अशा घटना घटड असल्याचा अंदाज आल्यास त्वरित तक्रार केल्याने मदत नक्की मिळेल, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र पोलिसांकडूनही अशा रोडरोमिओंवर कडक कारवाई होण्याची गरज आहे.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलवाईंच्या वक्तव्याचा ‘राष्ट्रवादी’कडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मालेगाव

हिंदूंना मक्का या मुस्लिमांच्या धर्मस्थळी प्रवेश मिळवून देण्यासंदर्भात काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगावात शुक्रवारी निषेध केला. संतप्त जमावाने दलवाई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनाचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मालेगावचे माजी आमदार राष्ट्रवादी नेते मौलाना मुफ्ती यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. हिंदूंना मक्का येथे प्रवेश मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे कथित वक्तव्य दलवाई यांनी केल्याने माजी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. बसस्थानक परिसरात जमावाने घोषणा दिल्या. आंदोलनासाठी पोलिस प्रशासनाकडे पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. आंदोलनाची माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, पोलिस निरक्षक राजमणे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जमावाने दोन वेळा पुतळा जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

यामुळे तणावाची परिस्थिती झाली. जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. मात्र, काही कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे दहन केले. परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी जादा पोलिस कुमक मागविण्यात आली होती. अखेर माजी आमदार मुफ्ती यांच्याशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन लाख रुपयांचे अपंगांना साहित्य वाटप

$
0
0

महाराष्ट्र फेडरेशन ऑफ नाशिक आणि नगरसेवक शैलेश ढगे यांच्यातर्फे जेलरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात अपंगांना तीन लाखांचे साहित्य वाटप झाले. शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शैलेश ढगे व संस्थेचे पदाधिकारी एम. बी. चव्हाण यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये डीजे प्लेअर, स्मार्ट केन, चेस बोर्ड, बेंच पाटी, गणित पाटी, भूमिती साहित्य आदींचा समावेश होता. सतीश शेंडे, हिरामन टिळे, राजेंद्र सोनकर, हिलाल सपकाळ, प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभागात अंध प्रबोधिनीसाठी जागा उपलब्ध करण्याचे आश्वासन ढगे यांनी दिले.

बिटको हॉस्पिटल बिटको हॉस्पिटलमध्ये सुशिक्षत बेरोजगार अपंग संघटनेतर्फे रुग्णांना फळवाटप करून संवाद साधण्यात आला. संघटनेचे अंकुश कुमावत, सुभाष गिते, शिवा गायधनी, दिनेश साखला, स्वप्निल शेळके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेहरु युवा केंद्राचा नवीन उपक्रम, पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्राच्यावतीने 'पडोस युवा संसद कार्यक्रमा'चे आयोजन प्रत्येक तालुक्यात करण्यात आले आहे. भारत सरकारची युवा मंडळ सक्षमीकरणाची ही नवीन योजना आहे.

ही योजना मार्च २०१५ पासून अंमलात आली आहे. गाव तिथे मंडळ स्थापन झाल्यानंतर युवकांना कार्यक्रम आयोजित करण्याकरीता आर्थिक तरतूद म्हणून प्रत्येक गावाकरीता दरमहा शंभर रुपये दिले जाणार आहेत. एप्रिल २०१५ ते ऑक्टोबर २०१५ पर्यंतचे ७०० रुपये प्रत्येक गावातील मंडळांना त्यांच्या बँक खात्यावर नेहरू युवा केंद्राच्या नाशिक शाखेमार्फत देण्यात येणार आहेत. याकरीता युवा मंडळांच्या सभासदांचे वय १३ ते २९ असणे गरजेचे आहे. खेड्यातील मंडळांनाच रक्कम देण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील राष्ट्रीय युवा नेता कार्यक्रमात संलग्न मंडळानी सहभागी होवून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई यांनी केले आहे.

या कार्यक्रमात गावातील एक नेता निवडण्यात येऊन तालुक्यातून जिल्हा नेता निवडण्यात येईल. या निवड केलेल्या युवकांना राष्ट्रीय स्तरावर युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या युवा मंडळानी मागील वर्षात स्चच्छ भारत मिशन, बेटी बचाओ बेटी बढाओ, पंतप्रधान जनधन योजना सांसद, आदर्श ग्राम योजना, अटल पेशन योजना गाव पातळीवर राबविण्याकरीता जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होते अशा युवा मंडळाना तालुका स्तरावर ८ हजार रुपये प्रथम पुरस्कार व ४ हजार द्वितीय पुरस्कार सरकारमार्फत देण्यात येणार आहे. तरी गाव स्तरावरील युवा मंडळानी या योजनचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र किंवा तालुका प्रतिनिधींशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील देवस्थानांवर पुरुषांची मक्तेदारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक विभागातील सर्व धर्मियांच्या देवस्थानांवर पुरुषांची मक्तेदारी असून, येथे महिलांना स्थान नाही. तर त्र्यंबकेश्वर व संत निवृत्तीनाथ मंद‌िरात विश्वस्त म्हणून प्रत्येकी एका महिलेला स्थान देण्यात आले आहे. विश्वस्तपदासाठी काही महिलांनी अर्ज केले असता अनेक मंदिरांच्या ट्रस्टींनी त्यांना केराची टोपली दाखवली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश देवस्थानावर पुरुषांचे राज्य आहे. मुळातच महिलांमध्ये धार्मिकता मोठ्या प्रमाणात असल्याने पुरुषांपेक्षा महिलांचा मंदिरांमध्ये जास्त वावर असतो. त्यामुळे मंदिरात काय सुविधा हव्यात हे पुरुषांपेक्षा महिला चांगल्या प्रकारे सांगू शकतात. महिलांना विश्वस्तपदी ठेवण्यास पुरुषांची मानसिकता नाही. त्यामुळे अनेक विश्वस्तांकडे महिलांनी अर्ज करुनही त्याला केराची टोपली दाखवली जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. नाशिक विभागात एकूण १६ हजार ट्रस्ट आहेत त्यातील १ हजार २०० ट्रस्ट हे धार्मिक आहेत. यातील अवघ्या दोन ट्रस्टमध्ये महिलांची नेमणूक केलेली आहे. नाशिक विभागात शिर्डी संस्थान, काळाराम संस्थान, त्र्यंबकेश्वर संस्थान, सप्तऋृंगी ट्रस्ट, कपालेश्वर मंद‌िर ट्रस्ट अशी अनेक नावाजलेली मंद‌िरे आहेत. त्यातील साईबाबा शिर्डी संस्थावर एकाही महिलेची नेमणूक केलेली नाही.

नाशिकच्या काळाराम मंद‌िरात देखील महिला विश्वस्तांची नेमणूक केलेली नाही. त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानचे पदसिध्द चेअरमन न्यायाधिश असतात. या वेळी उर्मिला फलके जोशी या पदसिध्द चेअरमन असल्याने मह‌िला प्रतिनिधी म्हणून त्या काम पहात आहेत. तर कपालेश्वर मंद‌िरातील ट्रस्टच्या अध्यक्षपदी तहसीलदारांची नेमणूक असते. याठिकाणी राजश्री आहिरराव या तहसीलदार असल्याने त्यांची नेमणूक आहे.

कामावर मर्यादा शहरातील अनेक सामाजिक संस्था अस्थापना आणि काही संस्थावर महिलांची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तेथील कारभार अत्यंत चोख असून, कुठेही गैरव्यवहार नसल्याचे सिध्द झाले आहे. उलट महिला असल्यावर गैरकारभार करणाऱ्यांना आळा बसत असल्याने महिलांनी विश्वस्त पदी येऊ नये, अशी तजवीज करण्यात येऊन महीलांना ट्रस्टी म्हणून नाकारण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठीउत्पन्नाची जमवाजमव!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीतील प्रस्तावित करवाढीला लोकप्रतिनिधींनी ब्रेक लावल्यानंतर प्रशासनाने उत्पन्न वाढीचे नवे स्मार्ट पर्याय शोधले आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन दिवस मेहनत करून उत्पन्नवाढीचे ६० नवे पर्याय शोधले आहेत. व्यावसायिक करात वाढ करण्यासह, रिकाम्या जागांवर कर, आस्थापना खर्च कमी करणे, करवसुली आऊटसोर्सिगद्वारे, रात्रीच्या वेळी रस्त्यावर पार्क होणाऱ्या वाहनांना कर लावणे आदिंचा त्यात समावेश आहे. महापालिकेच्या शाळासुद्धा खाजगी क्लासचालकांना भाडेतत्वावर देण्याचा पर्याय असून, या स्मार्ट पर्यायांची यशस्वी अंमलबजावणी व लिकेजेस कमी केल्यास वर्षभरात तिजोरीत शंभर कोटींची भर पडणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेची आर्थिक बाजू भक्कम असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने स्मार्ट सिटीत करवाढ सुचविली असली तरी महासभेने ही करवाढ फेटाळून लावली आहे. करवाढीसोबतच एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल)ला खोडा घातल्याने स्मार्ट सिटी प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, प्रशासनाने हार मानलेली नाही. महासभेत सदस्यांनी लिकेजेस शोधण्यासह मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर पाणीपट्टीतील गळती रोखण्याच्याही सूचना केल्या आहे. मात्र, या लिकेजेमधून तातडीने उत्पन्नवाढीची शक्यता नसल्याने ताबडतोब उत्पन्न वाढीच्या पर्यायांकडे प्रशासनाने मोर्चा वळवला आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह पालिकेतील अधिकाऱ्यां दोन दिवस मेहनत करीत तातडीचे ६० पर्याय निवडले असून, त्यांच्या अंमलबजावणीवर मंथन सुरू केले आहे. या पर्यायांचा अवलंब केला तर तातडीने महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

--

स्मार्ट पर्याय

- रात्री शहरात रस्त्यांवर पार्क होणाऱ्या

वाहनांना कर लावणे

- जाहिरातीचे ऑडिट करणे

- तपोवनातील ५४ एकर जागा भाड्याने देणे

- मालमत्तांचे मूल्यांकन करून त्यांच्यावर कर आकारणे,

- निवासी भागात व्यावसायिक भागासाठी पाणी वापरणाऱ्यांना व्यावसायिक पाणी पट्टी आकारणे, वॉटर ऑडिट करणे,

- पालिका शाळा खाजगी क्लासेसाठी भाड्याने देणे

- हॉटेल व व्यावसायिक कचऱ्यासाठी यूजर चार्जेस आकारणे

- नागरी सुविधांवर अधिक कर

- पार्किंग नसलेल्या इमारतींकडून अधिक कर वसूल करणे

- अतिक्रमणधारकाकडून अधिकचा दंड घेणे


ब्रॅन्ड अॅम्बेसिडर असावा

नाशिकचे धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने जगभरातून पर्यटक येतात. नाशिकला भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यास पालिकेच्या उत्पन्नातही भर पडते. त्यामुळे नाशिकचे ब्रॅन्डिंग करण्यासाठी स्वतंत्र ब्रॅन्ड अॅम्बेसिडर असावा अशी प्रशासनाची संकल्पना आहे. कुंभमेळ्यासोबतच कायमस्वरूपी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्वंत्रत ब्रॅन्ड अॅम्बेसिडर नेमण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यातूनही उत्पन्न वाढविले जाणार आहे.


प्रस्ताव आज सादर होणार

स्मार्ट सिटी प्रस्तावात लोकप्रतिनिधींनी खोडा घातल्याने प्रशासनाने या प्रस्तावाची पुनर्मांडणी केली आहे. नव्या सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. आता प्रस्ताव सादर करण्याची मुदत उलटली असली तरी आयुक्तांनी विशेष बाब म्हणून शनिवारची मुदत मागून घेतली होती. त्यामुळे आज राज्य सरकारकडे हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
मध्य रेल्वे प्रशासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) अनुयायासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर ते सेवाग्राम-अजनी-नागपूर अशा अधिकच्या सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. यामुळे मुंबईहून परतणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. खास करुन खान्देश, विदर्भातील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या या गाड्यांचा लाभ होणार आहे.

६ डिसेंबरला सुटणाऱ्या गाड्यांचा तपशील : १) विशेष गाडी क्रमांक ०१०६९ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून सायं ४.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१० वाजता अजनी येथे पोहोचेल. २) विशेष गाडी क्रमांक ०१०७१ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून सायं. ६.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल. ३) विशेष गाडी क्रमांक. ०१०७३ दादर, मुंबई येथून मध्यरात्री १२.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ७ डिसेंबरला सायं ०६.०० वाजता नागपूरला पोहोचेल.

७ व ८ डिसेंबरला सुटणाऱ्या गाड्यांचा तपशील : १) विशेष गाडी क्रमांक ०१०७५ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून ७ डिसेंबरला दुपारी १२.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायं ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. २) विशेष गाडी क्रमांक. ०१०८३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ८ डिसेंबरला सायं ६.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल. ३) विशेष गाडी क्रमांक. ०१०८५ दादर, मुंबई येथून ८ डिसेंबरला मध्य रात्री १२.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायं ६.०० वाजता नागपूरला पोहोचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images