Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्वस्तातील जागेची उद्योजकांकडून मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सरकारी अधिकारी आणि दलाल यांच्या हातमिळवणीमुळेच आम्हाला कमी किमतीत जागा उपलब्ध होत नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला. तर दिंडोरीतील तळेगाव, अक्राळे येथे माफक दरात जागा देण्याची मागणी त्यांनी केली.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय समन्वय समितीची बैठक झाली. नाशिक व नगरचे उद्योजक आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. विभागीय अप्पर आयुक्त आर. जी. कुलकर्णी, उद्योग सहसंचालक बी. एस. जोशी, एमआयडीसीच्या प्रांतिक अधिकारी संध्या घोडके यांनी मार्गदर्शन केले. मंगेश पाटणकर, जयप्रकाश जोशी, मनीष कोठारी, प्रशांत मुनोत, हरजित वधवा, संजय वाळुंज या उद्योजकांनी व्यथा मांडली.

उद्योजक पाटणकर व जोशी म्हणाले की, तळेगाव, अक्राळे येथे रस्ते, वीज, पाणी नसताना प्रति चौ. मी. २३०० रुपये दर जाहीर झाला आहे. तो बाराशे करावा, प्लाट पाडून वेबवर माहिती द्यावी. नाशिकला जागा नसल्याने नवीन उद्योग येत नाहीत. अधिकाऱ्यांशी संगनमत करुन गुंतवणूकदार एमआयडीसीतील जागा लाटतात व नंतर विकतात. हे टाळून नवीन उद्योजकांना जागा द्या. इगतपुरीतील गोंदे, वाडीवऱ्हेतील जमिनीही गुंतवणूकदारांनी स्वस्तात बळकावल्या आहेत. पंचवीस पट भाव मिळावा म्हणून ते अडून बसले आहेत.

आयटी पार्कचा प्रश्न

नगर, नाशिक येथील आयटी पार्क काही व्यक्तींच्या हितसंबंधांमुळे सुरु झाले नाहीत. बिल्डरांना सहा हजार तर उद्योकजांना २१ हजार चौ. मी. दर आकारला जातो. तरीही उद्योजक तयार असताना जागा दिली जात नाही. आयटी सुरु करायचे नसेल तर या इमारती तोडा आणि अधिकारी व दलालांची हातमिळवणीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी नगरचे उद्योजक वधवा यांनी केली. नाशिकमध्येही अशीच परिस्थिती आहे असे सांगून पाटणकर

म्हणाले की, सुरवातीला आयटीच्या नावाने जागा घ्यायची आणि आयटी चालत नाही म्हणून दुसरा उद्योग सुरु करायचा असे प्रकार सुरु आहेत. ही जागा आयटी कंपन्यांना किंवा छोट्या आयटी उद्योजकांनाच द्यावी. बैठकीत माळेगाव, अंबड, नाशिक येथील ट्रक टर्मिन्स, अंबडचे फायर स्टेशन, सिन्नर एमआयडीसला वाढीव पाणी पुरवठा, चिंचोडी (येवला) येथे जागा मिळावी, कळवणला स्वतंत्र फिडर सुरु करावा आदी मागण्या करण्यात आल्या.

वरिष्ठच गैरहजर

या बैठकीला उद्योजक कमी व अधिकारी जास्त हजर होते. बैठका नियमित होत नाहीत, निर्णय घेणारे अधिकारी हजर राहत नाहीत, बैठकीतील मुद्यांवर कार्यवाही होत नाहीत, न्याय मिळत नाही. त्यामुळे उद्योजक बैठकीला फिरकत नसल्याचे एका उद्योजकाने मटाशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेन्नईतील पावसाने कॉलसेंटर नॉटरिचेबल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक दिवाळीपासून चेन्नईत कोसळणाऱ्या पावसामुळे दक्षिण भारतातील जनज‌ीवन विस्कळीत झाले आहे. या संततधार पावसामुळे देशपातळीवर सेवा पुरविणाऱ्या अनेक कॉल सेंटरचे काम विस्कळीत झाले असून, पाऊस बंद झाल्याशिवाय ते पूर्वपदावर येणे अशक्य झाले आहे.

चेन्नईत आभाळ कोसळल्यागत पडणाऱ्या पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून, चेन्नई शहरासह दक्षिण भारतात हाहाकार उडला आहे. या पावसात शेकडो बळी गेले असून, हा प्रलय आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शहराचे कामकाज ठप्प झाले असून, यापासून देशपातळीवर सेवा देणारे अनेक कंपन्यांचे कॉल सेंटर देखील दूर राहू शकलेले नाही. एसबीआय कार्डसाठी चेन्नईमधून कॉलसेंटर चालवले जाते. एसीबी आयकार्डच्या देशभरातील ग्राहकांना येथेच संवाद साधून माहिती घ्यावी लागते. मात्र, पावसामुळे दूरध्वनी सेवा खंड‌ित झाली असून, विलंबाने सर्व कामकाज केले जाते आहे.

याबाबत एसबीआयने ग्राहकांना एसएमएस पाठवून सर्व सेवा पूर्ववत होईपर्यंत इतर एसएमएस किंवा इंटरनेट पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेड‌िट कार्डचे काम सुध्दा याच ठिकाणावरून होते. देशभरातील अनेक महत्त्वपूर्ण बँकांचे व कंपन्यांचे ग्राहक सेवा केंद्र चेन्नईमध्ये कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत नंदिनी अखेर सापडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सात महिन्यांपूर्वी घराजवळ खेळत असताना अपहरण करण्यात आलेल्या नंदिनी शर्मा या चार वर्षांच्या मुलीचा ठावठिकाणा पोलिसांनी शोधून काढला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून, अपत्य होत नसल्याने त्रासलेल्या पतीने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

शिवादास पुंजा सातपुते (४२) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या आणखी एका साथिदारालाही अटक करण्यात आली आहे. मूळचा पिंपळगावखांब येथील रहिवाशी असलेल्या शिवदासचे तीन वर्षांपूर्वी दिंडोरी येथील विद्याशी लग्न झाले. कालांतराने सातपुते दांपत्याने गंगापूररोडवरील ध्रृवनगरमध्ये बस्तान बसविले. कॉलेजरोडवर स्पाचा व्यवसाय करणाऱ्या सातपुते दांपत्याला तीन वर्षांत अपत्य सुख लाभले नाही. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या डॉक्टरांच्या भेटी घेतल्या. त्याचाही तितकासा फायदा होताना दिसत नसल्याने, आपण एखादे मुल दत्तक घेऊ असा तगादा विद्याने सुरू केला. दत्तक मुल घेणे शिवदासला अवघड बनले होते. कुठे एक वर्षाची वेटींग, तर कुठे त्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. मुल दत्तक घेण्यासाठी विद्याने गुजरातमध्येही प्रयत्न केले. या सर्व घडामोडी होत असताना शिवदासने एखाद्या मुलाचे अपहरण करून हा प्रश्न कायमचा मिटवण्याचा अघोरी निर्णय घेतला. यात त्याला त्याच्या एका मित्राने साथ दिली. त्यांनी १४ मे रोजी सातपूर भागातच दोन ते तीन मुला-मुलींना उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही कारणास्तव फसला. याचदरम्यान शिवदासला महेंद्र शर्माचे कुंटुंब दिसले. मग, दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी सव्वाआठच्या सुमारास शर्माचे घर गाठले. अंबड लिंकरोडवरील एस्सार पेट्रोल पंपाजवळ राहणाऱ्या महेंद्र शर्मा यांच्या दोन मुली अंगणात खेळत होत्या. तुझ्या वडिलांना बोलाव, असे सांगत शिवदासने सहा वर्षाच्या मोठ्या मुलीला घरात पाठवले. तिची पाठ वळताच नंदिनीला कवेत घालून शिवदासने होंडा अमेझ कारमधून धूम ठोकली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसणानेही दिला महागाईचा ठसका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

आयुर्वेदात गुणकारी व अत्यंत उपयोगी ठरणारा बहुगुणी लसूण आता भाव खाऊ लागला आहे. सुमारे २०० रूपये प्रति किलो दरापर्यंत त्याची विक्री होत आहे. लसणाच्या चढ्या दरांनी सामान्य कुटुबांतील महिलांच्या डोळ्यात पाणी आणण्यास प्रारंभ केला आहे.

डाळी आणि तांदळापाठोपाठ लसणाने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दिवसागणिक जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढत असतांना आता मसाला पदार्थांत उपयोगी ठरणारा गुणकारी लसूण अग्रभागी आहे. भाजीबाजारात लसूण सुमारे १८० ते २०० रूपये किलो दराने विकला जावू लागला आहे.

अवघ्या महिना दीड महिन्यांपूर्वी बाजारेपेठेत २५ ते ३० रूपये किलो दराने मिळणारा लसणनाचा दर आता २०० रूपयांवर पोहचला आहे. लसणाची आवक कमी व मागणी वाढल्याने बाजारातील भाव चढे झाल्याचे व्यापारी सांगू लागले आहेत. बाजारात शेतकऱ्यांकडील लसूण विक्रीसाठी आला की, मातीमोल दरात खरेदी करण्याची साखळी दलांलाकडून रचली जाते. परंतु त्यानंतर पाच ते सहा महिने उलटले की, लसणाचे भाव गगनाला भिडतात. या सर्व घडामोडीत ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. लसून विक्री करणारे बाजारात मोजकेच व्यापारी असून, ग्रामीण भागात लसणाचे उत्पादन घटले आहे.

राजस्थानकडील लसणाला उठाव नसल्याने या लसनाची चव जेवणात देखील मिळत नाही. आपल्याकडील गावठी लसणाला बाजारात सर्वाधिक मागणी असून, हाच लसूण चवीला चांगला असल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने लसणाचे लागवड क्षेत्रही घटले आहे. त्यामुळे पुढील हंगामापर्यंत लसणाचे दर उतरणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

फोडणीच्या मसाल्यात लसूण अत्यावश्यक बाब आहे. लसणाशिवाय भाजीला चव येत नाही. पण सध्या बाजारात चांगला लसूण घेण्यासाठी दोनशे रुपये मोजावे लागत आहे. तूरडाळ, तांदूळ आणि आता लसणाच्या दरवाढीचा नंबर असल्याने वैताग आला आहे.

‍- सुनीता पगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी थांबेना शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या दोन दिवसांपूर्वीच तीन तरुण शेतकर्‍यांच्या आत्महत्येने मालेगाव तालुक्यात खळबळ उडाली होती. या घटनेच्या स्मृती शेतकर्‍यांच्या मनावर ताज्या असतांनाच शुक्रवारी तालुक्यातील माळमाथा भागावरील शेरूळ गावातील तरुण शेतकरी सुनील जगन्नाथ देसले (वय ३३) यांनी आत्महत्या केली.

तालुक्यातील शेतकरी सततच्या दुष्काळी, नापिकी आणि अवकळी पाऊस याने नैराश्येच्या भावनेतून थेट मृत्यूला कवटाळत असल्याने संबंध तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुनील यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या हिसवळ शिवरातील शेततातील झाडाला गळफास घेवून जीवन संपवले. या घटनेचे वृत्त गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती तालुका पोलिस स्टेशनला हनुमंत चव्हाण या ग्रामस्थाने दिल्यानंतर पोलिस हवालदार बोगिर व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुनील हा हिसवाळ शिवारात आई -वडिलांच्या नावावर असलेल्या शेतात मेहनत घेत होता. गेल्या वर्षी शेतातील पोल्ट्री फार्मचे अवकळी पाऊस आणि वादळीवार्‍याने नुकसान झाले. त्यामुळे यासाठी घेतलेल्या ८ लाखांच्या कर्जाचा बोजा वाढत होता. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्के लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉईंटमेंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिकाऊ लायसन प्राप्त केल्याच्या तीस दिवसानंतर व शिकाऊ लायसन्सची मुदत संपण्याच्या आत उमेदवार ऑनलाइन अपॉईंटमेट घेवून वाहन चालविण्याची चाचणी देऊ शकतो. तसा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला आहे. तसेच दुचाकी वाहनाच्या चाचणीसाठी मात्र हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे.

शिकाऊ लायसन्सची मुदत संपल्यानंतर उमेदवार वाहन चालविण्याच्या चाचणीसाठी पात्र ठरत नाही. शिकाऊ लायसन्स हे सहा महिन्यांच्या कालावधी मुदतीसाठी असते. वाहन चालविण्याचे पक्के लायसन्स प्राप्त करण्यासाठी इच्छुक अर्जदाराने प्रथम शिकाऊ लायसन्स प्राप्त करणे आवश्यक आहे. वाहन चालविण्याच्या चाचणीसाठी येताना शिकाऊ लायसन्स, ज्या वाहनावर चाचणी देणार त्या वाहनाची वैध कागदपत्रे (विमा, पीयूसी, नोंदणी प्रमाणपत्र) सादर करणे आवश्यक असल्याचे विभागाने सांगितले आहे. तसेच, अनेकदा पक्के लायसन्स घेण्यासाठी विहित मुदतीत अर्जधारक येत नाहीत. त्यासाठीच ऑनलाइन अपॉईंटमेंटचा पर्याय सुरु करण्यात आला आहे. यामुळे अर्जदार ऑनलाइन अपॉईंटमेंट घेऊन निश्चित दिवशी आणि वेळी येऊ शकणार आहे. यामुळे अर्जदाराच्या वेळेची बचत होणार आहे.

हेल्मेट सक्ती

पक्के लायसन्स काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर वाहन चालविण्याची अपॉईंटमेंट ऑनलाईन दिली जाणार आहे. तसेच, ही चाचणी देण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या आरटीओ कार्यालयात येणाऱ्या सर्व वाहनधारकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. आता चाचणी देणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आल्याने हेल्मेटचा वापर वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांना’ पुन्हा पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दरोड्याच्या तयारीत असताना अटक केलेल्या संशयितांना विशेष मोक्का कोर्टाने शुक्रवारी दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या टोळीला पंचवटीतील कमलनगर परिसरातून २६ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हांपासून हे संशयित पोलिस कोठडीत असून, त्यांची शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.

यात राकेश कोष्टी (रा. सिडको), जयेश हिरामण दिवे (रा. पेठफाटा), कुंदन सुरेश परदेशी, सुनील पंढरीनाथ धोत्रे , लक्ष्मण पांडुरंग जाधव उर्फ काळू (रा. गजानन चौक), गणेश भास्कर कालेकर, राकेश रामदास शेवाळे, मयूर शिवराम कानडे, परिक्षित बाळासाहेब सूर्यवंशी (सर्व रा. हनुमानवाडी, पंचवटी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, मोक्का कोर्टाने त्यांना आज आणखी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याच्या दरात घसरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अमेरिकेची मध्यवर्ती बॅँक असणाऱ्या फेडरेल रिझर्व्हने १५ डिसेंबरनंतर व्याज दरात घट होणार असल्याचे संकेत दिल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी नाशिकच्या सराफ बाजारात भाव कमी झाल्याने अनेकांनी खरेदी केली.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या भावात घसरण सुरु आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव २५ हजार ४०० रुपये होता. त्यामुळे ज्यांच्याकडे लग्न समारंभ आहे त्यांनी सोन्याची खरेदी केली. गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी भाव असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सोन्याचे भाव आणखी कमी होतील, अशी बाजारात चर्चा असल्याने गुंतवणूक म्हणून खरेदी करणाऱ्यांनी मात्र सोने खरेदीकडे पाठ फिरवली. गुंतवणुकदार मात्र सोन्याच्या दराची रोज चौकशी करताना दिसत आहे. शुक्रवारी कमी झालेल्या भावाने खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा व्यावसायिकांचा अंदाज होता. मात्र, खरेदीदार भाव आणखी कमी होण्याची वाट पहात असल्याने हवी तशी खरेदी झाली नाही. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी आणखी भाव कमी होण्याची वाट पहात आहेत. येत्या काही दिवसात सोन्याच्या भावात आणखी घसरण होईल, असा तज्ञांचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांच्या जिद्दीमुळे उलगडला गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांनी ठरवले तर अशक्य ते शक्य करून दाखवतात. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेवढी जिद्द दाखवयला हवी. नंदिनीच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी तेच केले. तब्बल सात महिने कसोशीने तपास सुरू ठेवत सिनीअर पीआय मनोज करंजे यांनी पाठपुरवा केला. तर पीएसआय माधवी वाघ व इतरांनी त्यांना पाठबळ दिले. पोलिसांच्या सकारात्मक कामामुळे आज मायलेकींची पुन्हा भेट होऊ शकली.

नंदिनी शर्मा नावाच्या अवघ्या चार वर्षाच्या मुलीच्या अपहरणाची बाब १५ मे रोजी साडेआठ वाजता सातपूर भागात पसरली आणि सातत्याने गुन्हेगारी घटनांना समोरे जाणाऱ्या नागरिकांचा रोष अनावर झाला. पोलिस सुध्दा चक्रावले. त्यांनी तपासाला सुरूवात केली. मात्र, 'एक सफेद रंगाची कार' एवढाच पुरावा समोर आला. सुदैवाने ही कार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सापडली. पोलिसांनी त्याचे पृथकरण केले. ती सफेद कार होंडा अमेझ

असल्याचे दिसत होती. पोलिसांनी लागलीच अहमदाबाद फॉरेसिंक लॅबमध्ये तो ​

व्हिडीओ पाठवून वाहनाचा नंबर स्पष्ट होतो का हे तपासले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही.

दरम्यान, १४ मे रोजी शिवदास व त्याच्या मित्राने सातपूर परिसरात दोन ते तीन ठिकाणी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या मुलांकडे चौकशी केली. त्यात पुन्हा याच कारचा उल्लेख आढळून आला. कारच्या डॅशबोर्डवर एक गणेश प्रतिमा असल्याचे संबंध‌ित मुलांनी सांगितले. पोलिसांनी या कारविषयी जिल्ह्यासह राज्यभरात चौकशी केली. काही तपास पथके परराज्यात तपासासाठी पाठवण्यात आली. पण, त्यातून काहीही स्पष्ट होऊ शकले नाही. हळुहळू नंदिनी सापडण्याची आशा मावळत गेली. मात्र, पोलिसांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. पीआय करंजे प्रत्येक वेळी नंदिनीबाबत चौकशी करीत राहिले. साधारणतः दोन महिन्यापूर्वी

करंजे व त्यांच्या पथकाला नंदिनी परत मिळण्याचा पहिला आशेचा किरण सापडला.

सीटी सेंटर मॉलमध्ये नंदिनी सारखी दिसणारी मुलगी कोणतरी पाहिली. नंतर तीच मुलगी गंगापूररोड परिसरात दिसून आली. या घटनांमुळे पोलिस अर्लट झाले. त्यांनी सदर कार व मुलीच्या शोधासाठी एक पथकच तैनात केले. सुदैवाने आज पोलिस नाईक रमेश सोनवणे यांना ती कार एका स्पाबाहेर सापडली. सोनवणे यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवली तसेच कारचा पाठलाग करीत ध्रृवनगर येथील घर गाठले. तिथे नंदिनी असल्याची खात्री

झाल्यानंतर पोलिसांनी शिवदाससह त्याच्या एका मित्राला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली.

'स्पा'मुळे संशयाची सुई

नाशिक शहरातील बहुतांश स्पा सातत्याने संशयाच्या भोवऱ्यात असतात. पोलिस अधुनमधून कारवाई करतात. तसेच तिथे कामाला असलेल्या मुलींची सुटका करतात. सातपुते दांपत्यांचा स्पाचा व्यवसाय असल्याने मुलीच्या अपहरणाच्या मागे नेमके काय कारण असावे, याचाही तपास पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीआय अवसरेंचीतडकाफडकी बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शांताराम अवसरे यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी घेतला. अवसरे यांच्या जागी स्पेशल ब्रँचचे प्रकाश सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील संवेदनशिल म्हणून पंचवटी व भद्रकाली पोलिस स्टेशनकडे पाहिले जाते. या दोन्ही पोलिस स्टेशनतंर्गत नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे याठिकाणी नियुक्ती घ्यावी की, नाही असा प्रश्न पोलिस अधिकाऱ्यांपुढे निर्माण होतो.

गेल्या काही महिन्यांपासून पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शांताराम अवसरे व तेथील कर्मचाऱ्यांमध्ये बेबनाव निर्माण झाला होता. अवसरे यांनी एका ​अवैध व्यवसायावर छापा मारल्यानंतर तर पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये उभी फूट पडली. या पार्श्वभूमीवर पंचवटीत गुन्हेगारीने डोकेवर काढले. यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नात असलेल्या पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी शांताराम अवसरे यांची स्पेशल ब्रँचला बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी स्पेशल ब्रँचचे प्रकाश सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीरामपूर येथून शहरात बदली झालेले सपकाळे यांना सुरूवातीस भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये नियुक्ती देण्यात आली व नंतर त्यांना स्पेशल ब्रँचला घेण्यात आले. दरम्यान, आणखी काही सिनीअर पोलिस निरीक्षकांच्या खांदेपलटाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनद वाटपाची विशेष मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका क्षेत्रातील चाडेगांव, चेहडी, विहीतगांव, वडाळा या गावांमध्ये नव्याने नगर भूमापन योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नगर भूमापन कार्यालयाकडून सनद फी वसुलीबाबत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

भूमी अभिलेख कार्यालयाने सनद फी वसुली तसेच सनद पुरविण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. वडाळा, चाडेगांव, चेहडी, विहीतगांव या गावांमधील अभिलेखांचे फेरफार नोंद घेण्याचे काम यापुढे भूमी अभिलेख कार्यालयात केले जाणार आहे. वडाळा या गावाची सनद फी तलाठी कार्यालय, वडाळा येथे ९ डिसेंबर, चेहडी या गावाची सनद फी तलाठी कार्यालय, चेहडी येथे १६ डिसेंबर, विहितगावाची सनद फी तलाठी कार्यालय, विहीतगाव येथे २२ डिसेंबर, चाडेगाव या गावाची सनद फी तलाठी कार्यालय, चाडेगाव येथे २९ डिसेंबर या दिवशी गावातील शिल्लक धारकांना सनद वाटप करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटाळ्याची व्याप्ती २० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परदेशातील कंपनी विकत घेणार असून, त्याद्वारे मिळणाऱ्या नफ्यातून गुंतवलेल्या पैशांचे महिन्यात दुप्पट करून देतो, असे सांगत कोट्यवधी रूपये जमा करणारा संशयित अद्याप फरार आहे. पोलिसांकडे तक्रारदार येत नसले तरी या घोटाळ्याची व्याप्ती २० ते ३० कोटी रूपयांच्या घरात पोहचल्याची चर्चा सुरू आहे. या योजनेत शहरातील ४० ते ५० प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या व्यक्तींची गुंतवणूक असून, फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

प्रदीप माधव वाघ, असे संशयित आरोपीचे नाव असून, तो काठेगल्लीतील गणेशनगर येथील सम्राट सोसायटीत राहत होता. सध्या ठाणे येथे कार्यालय स्थलांतर केलेल्या वाघने आपण हाँगकाँग देशातील ब्राईट सिनो इंटरनॅशनल होल्डिंग लि. कंपनीचे मालक असल्याचे अनेकांना सांगितले होते. तसे कागदपत्रेही त्याने सादर केलीत. २०११ मध्ये वाघने आपण घाणा देशातील अबुथनान इन्व्हेस्टमेंट ही कंपनी खरेदी करणार असल्याचा प्रचार केला. कंपनीत पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणुकदारास पैसे गुंतवल्यापासून महिन्याभरात दुप्पट पैसे देणार असल्याचे अमिष संशयित प्रदीप वाघने दाखवले. त्यानुसार शिंगाडा तलाव परिसरातील गुरूद्वारारोड येथील शिवसाग सोसायटीत राहणाऱ्या हुकूमत डिलोमल वालेचा (४८) यांच्यासह इतरांनी वाघकडे ५० लाख रूपये जमा केले. याबदल्यात वाघने त्यांना चेक दिलेत. मात्र, सांगितल्याशिवाय ते बँकेत टाकायचे नाही, असे स्पष्ट केले. हळुहळू मुद्दल किंवा त्याचा कोणताही परतावा मिळत नसल्याचे वालेचा यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. हा गुन्हा तत्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी काठेगल्ली येथील तसेच ठाणे येथील वाघच्या कार्यालयावर व घरांमध्ये सर्च ऑपरेशन राबवून त्याच्या पासपोर्ट अनेक कागदपत्रे जमा केलीत. त्याची बँक खाते तपासली. मात्र, यात पैसे नव्हते. जप्त करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आहे. वाघला आज ना उद्या अटक होईल, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी व्यक्त केली.

दरम्यान वाघकडे काही प्रतिष्ठित व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले असून या घोटाळ्याची व्याप्ती २० ते ३० कोटी रूपयांपर्यंत पोहचू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ला मानवी चेहरा हवा

$
0
0



संपूर्ण देशातच नाशिक ही लव्हेबल आणि लिव्हेबल सिटी आहे. आल्हाददायक हवामान, पुरेसे पाणी, मुबलक सोयी-सुविधा असा विविध प्रकारच्या बाबींमुळे नाशिक हे राहण्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाण आहे. नाशिकचा विकास करण्यासाठी भौतिक साधनांबरोबरच आम आदमीला केंद्रभूत ठेऊन विचार व्हायला हवा. तेव्हाच खरा स्मार्ट विकास होईल, असा सूर 'मटा राऊंड टेबल कॉन्फरन्स'मध्ये व्यक्त करण्यात आला. स्मार्ट सिटीसाठीच्या विशेष महासभेत करवाढ आणि स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही)ला वगळून मान्यता देण्यात आली. परिणामी, नाशिक स्मार्ट होणार की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित 'मटा राऊंड टेबल'मध्ये महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, अतिरीक्त आयुक्त जीवन सोनवणे, माजी महापौर प्रकाश मते, आर्किटेक्ट विवेक जायखेडकर, उद्योजक पियुष सोमाणी, अविनाश सिसोदे, अभ्यासक अमोल पाध्ये आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रा. दिलीप फडके यांनी सहभाग घेतला.
स्मार्ट सिटीबाबत शहर सकारात्मक

भौगोलिक स्थिती, अनुकूल हवामान व पर्यटनाचे केंद्र असल्याने नाशिक अगोदरच स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. नाशिक स्मार्ट सिटी होणे ही काळाची गरज आहे. सिंहस्थ कामांच्या निम‌ित्ताने शहर अगोदरच ७० टक्के स्मार्ट झाले असून, उर्वरीत ३० टक्के शहरालाही या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्मार्ट सिटीचा सध्याचा प्रस्ताव चांगला आहे. मात्र या योजनेतील काही अट‌ीशर्तीबद्दल स्पष्टता नसल्याने थोडी साशंकता आहे. प्रशासनावर अगोदरच कामांचा भार आहे. महापालिकेला पाच हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना केवळ १७०० कर्मचाऱ्यांवर काम भागविले जाते. नागरिकांना मूलभूत सुविधा द्यायच्या असतील तर, प्रशासनासह इतर सुविधांवरचाही भार वाढणार आहे. रेट्रोफिटींग अंतर्गत जुन्या नाशिकचा समावेश झाला असला तरी, या भागाच्या विकासाच्या काही मर्यादा आहेत. तर आजूबाजूच्या भागातील शेतकरी आता विकासासाठी शेतकरी तयार होत नाहीत. जम‌िनीचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा या योजनेसाठी जमीन देण्यास विरोध होत आहे. त्यामुळे योजनेतील अंमलबजावणीलाच अडथळे येण्याची शक्यता आहे. नवे उद्योग येत नसून, आहेत ते उद्योग व्यवसाय आजारीच पडले आहेत. झोपडपट्ट्यांची संख्या कमी करणे ही आवश्यक असून, त्यासाठी शहरातूनच पैसा कमावणाऱ्या विकासकांनी व व्यावसायिकांनी सामाजिक हित म्हणून मदतीला पुढे आले पाहिजे. स्मार्ट सिटी योजना चांगली असली तरी प्रथम यासाठी मुलभूत सुविधांची निर्मिती करणे आवश्यक आहे. नागरिकांचीही मानसिकता त्यासाठी तयार करावी लागणार आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधी व नागरिकांनीही पारदर्शी होणे आवश्यक आहे. आम्ही सकारात्मक असलो तरी, या योजनेसदंर्भात अजून संभ्रमावस्था आहे. आमच्या अधिकारांवर अतिक्रमण या माध्यमातून होऊ शकते. परंतु तरीही आम्ही स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात सकारात्मक आहोत.
- अशोक मुर्तडक, महापौर
एसपीव्हीवर हवे पालिकेचे नियंत्रण

स्मार्ट सिटी म्हणजे संपूर्ण शहर स्मार्ट होईल असे नाही. शहराचा एक भाग स्मार्ट करून ते इतरांसाठी एक मॉडेल बनविणे असा आहे. त्यातून नागरिक आदर्श घेऊन आपल्या भागाला बदलण्यास तयार होतील. शहर स्मार्ट व्हावे, अशी नागरिकांचीही मानसिकता आहे. सुविधा मिळत असतील तर, नागरिक कर भरायलाही तयार असतात. परंतु तसा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण व्हायला हवा. सिंहस्थात नाशिकने नागरिकांचा असा विश्वास संपादन केला आहे. चांगल्या सुविधा मिळाल्या तर कर देतीलही. त्यासाठी उत्पन्नाची बाजुही भक्कम असायला हवी. परंतु करवाढी संदर्भात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात काही वैचारीक मतभेद आहेत. करवसुलीतील लिकेजेस दूर केल्यानंतर करवाढीला परवानगी देण्याची आमची विनंती लोकप्रतिनिधींना आहे. शेवटी करवाढीच्या माध्यमातून विकास होतो. प्रशासनाच्या प्रयत्नांना ५० टक्के यश दिसल्यानंतर करवाढ केली तरी चालणार आहे. या योजनेतून वेगवेगळ्या योजना आपण राबवू शकतो. त्यासाठी करवाढीतून उत्पन्न अपेक्षित आहे. जकात व एलबीटीमुळे हक्काचे उत्पन्न आता कमी झाल्याने आर्थिक परिस्थितीवरही विचार केला गेला पाहिजे. शेवटी विकास हवा असेल तर, उत्पन्नवाढीवर विचार झालाच पाहिजे. एसपीव्ही संदर्भात मतभेद असले तरी, या एसपीव्हीचे नियंत्रण हे महापालिकाच करणार आहे. स्मार्ट सिटी संदर्भातील धोरणे ठरविण्याचे अधिकार हे महासभेलाच आहेत. एसपीव्ही ही केवळ अंमलबजावणी करणारी एक यंत्रणा आहे. त्याच्यावर अंत‌िम अंकुश हा लोकप्रतिनिधींचाच राहणार आहे. त्यामुळे स्वायत्तता धोक्यात येण्याचा प्रश्नच नाही. तरीही एसपीव्ही संदर्भात काही डिसपूट असेल तर त्यावर शासन विचार करण्यास सक्षम आहे. करवाढीचा अंत‌िम अधिकार हे महासभेचे आहेत. त्यावर महासभेनेच प्रशासनाचे रिझल्ट दिसल्यावर विचार करावा. आपण विकासाच्या दिशेने जात राह‌िले पाहिजे. विकासाचे मॉडेल हे बहुमताचे असायला हवा. त्यामुळे नाशिककरांनी स्मार्ट सिटीचा विचार करायला हवा. लिव्हेबल सिटी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- जीवन सोनवणे, अतिरिक्त आयुक्त, मनपा
एसपीव्ही राज्य सरकारचा हवा

विकासाला आमचा विरोध नाही, परंतु विकास हा वास्तवतावादी व सर्वसमावेशक असावा. केवळ साडेसातशे कोटीसाठी आम्ही आमची स्वायत्तता गमवायची का ? एसपीव्हीच्या माध्यमातून हा संपूर्ण शहराला कंट्रोल करण्याचा केंद्राचा हा डाव आहे. पंचायतराजसाठी हा धोका असून, ७२ व्या घटनादुरूस्तीचाही भंग आहे. संपू्र्ण योजनेचे नियंत्रण हे केंद्राने ठरविलेल्या सीईओकडे केले जाणार आहे. यातील अनेक मुद्दे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. त्यामुळे आमची स्वायत्तता धोक्यात आणण्याचा प्रकार आहे. केंद्राचा एसपीव्ही करण्यापेक्षा हा राज्य रकारचा केल्यास आम्हाला ही अट मान्य राह‌ील. एका विशिष्ट भागावर एसपीव्हीचे नियंत्रण असले तरी, पाणी, वाहतूक, घनकचरा व्यवस्थापनावर एसपीव्हीचा कंट्रोल असणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरावर त्यांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे. इंडियाचे भारतावर सरळ सरळ आक्रमण होईल. त्यामुळे ही योजना यशस्वी करायची असेल तर एसपीव्ही हा केंद्राचा नकोच. स्मार्ट सिटीतल्या करवाढीलाही आमचा विरोध आहे. प्रशासनाने करवाढ करण्याऐवजी लिकेजेस शोधून त्यातून उत्पन्न वाढवले पाहिजे. सध्याची वसुली ६० टक्केच असेल तर ती ९५ टक्क्यांपर्यंत नेल्यास त्यातूनच ३२ कोटीची वाढ होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे आहे ते वाढवा. आम्हीही पारदर्शी आहोत. वसुली वाढली नाही तर, आम्ही विचार करू करवाढीचा. पण पहिले केंद्राने पारदर्शक झाले पाहिजे. महापालिकेला सर्वच घटकांचा विचार करावा लागतो. कुणा एकाच्या बाबतीत आम्ही निर्णय घेत नाही. परंतु लोकप्रतिनिधींना या योजनेतील अडथळे आता ठरविले जात आहेत. शहरातील सामान्य माणसाला आम्हाला सांभाळावे लागतात. त्यामुळे चार लोकांच्या हातात शहराचा ताबा देणे आम्हाला परवडणारे नाही. त्यासाठी आम्ही तयार नाहीत.

- गुरूमीत बग्गा, उपमहापौर
सर्वसामान्यांचा विचार करा

स्मार्ट सिटीच्या योजनेविषयी मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था असल्याचे दिसून येत आहे. पुण्याजवळ मगरपट्टा जशी नव्याने विकस‌ित केली तसे होणार की, अन्य काही याची सर्वसामन्यांना माहिती नाही. योग्य ते नियोजन होणे आवश्यक आहे. जुने सीबीएस आणि द्वारका येथे भुयारी मार्ग करण्यात आला. पण, त्याचा वापर शून्य आहे. असे प्रकल्प करण्याने पैसा खर्च होईल पण त्याचा कुठलाच दिलासा मिळणार नाही. योजना आणि त्यांची अंमलबजावणी यात मोठी तफावत असते. यातून अनेक समस्या निर्माण होतात. नक्की कुठल्या विचारातून योजना केल्या जातात ही बाब महत्त्वाची आहे. जवाहरलाल नेहरु पुनरुत्थान योजनेद्वारे पावसाळी गटारी योजना राबविली. पण, त्याची सध्य स्थिती कशी आहे हे कोणी पाहिले आहे का? सध्या शहराच्या अनेक भागात पेव्हर ब्लॉक्स केले. त्याची नक्की काय स्थिती आहे आज?
- जुने नाशिकचा पुनर्विकास खरोखर शक्य आहे का?

- शाळेचे मोर्चे काढून काय साध्य झाले

- विकासात नागरिकांचा सहभाग हवा

- विकासाचा अॅप्रोच काय?

- प्रा. दिलीप फडके
स्मार्ट सिटीची योजना प्रभावी

जवाहरलाल नेहरु पुनरुत्थान योजनेसह आजवर अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र, त्यात लोकसहभाग, लोकांच्या सूचना कुठेही नव्हत्या. स्मार्ट सिटीमध्ये मात्र, जनतेच्या विचारांना स्थान देण्यात आले आहे. शहरातील सर्वच क्षेत्र आणि स्तरातील जनतेच्या सूचना त्यात घेणे आवश्यक केले आहे. वरुन काही तरी योजना पाठविल्या आणि त्याची अंमलबजावणी करा, असे यात नाही. तुम्हाला काय हवे आहे हे निश्चित करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्ट‌िम ही काळाची गरज आहे. स्पेशल पर्पज व्हेईकलला केवळ विरोध करुन काय होणार. देशात आणि जगातही ही संकल्पना राबविली जात आहे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करायला हव्यात. थेट केंद्रीय अर्थमंत्रालयापासून विविध अधिकारी असणार आहेत. त्यामुळे पक्षीय सत्ता बदलली तरी प्रशासनाकडे काम असल्याने ते उत्तम प्रकारे करु शकतील.

- स्मार्ट सिटीची गरज आहे

- गरजेच्या योजनांना प्राधान्य

- योजनेत राजकारण नको

- विवेक जायखेडकर, आर्किटेक्ट
माणूस हा एकक का नाही ?

स्मार्ट म्हणजे नक्की काय हे प्रथम बघायला हवे. चलाख, चतुराई अशा अनुषंगाने ही योजना जाते. आपल्याला विकासाचा शॉर्टकट नको आहे. कष्ट न घेता होणारा विकास कुठल्याही कामाचा नाही. विकास कुणाचा आणि कसा करायचा याचाही विचार व्हावा. स्मार्ट सिटी योजनेचा मसुदा तीनदा बदलण्यात आला. जो काही अंतिम आहे त्यापूर्वी वेबसाईट बंद करण्यात आली. ज्यावेळी विचारणा करण्यात आली त्याचे समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. जुने नाशिकचा विकास करताना आपण काही कमावणार आहोत की, गमावणार आहोत. आज तेथे हेरिटेज वॉक करता येतो. तो येत्या काळात करता येईल का. आपल्याला टुरिझम हवे की ट्रॅव्हलिंग याचाही विचार झाला तर विकासाची सूत्रे योग्य पकडता येतील. कळीचा मुद्दा जमीन असून, विकासाच्या योजनेत माणूस हा एकक का असत नाही.

- ग्रामीण भागातून होणाऱ्या स्थलांतराचे काय - खेड्यांना सशक्त करायला हवे - ग्रामीण भागात रोजगाराची निर्मिती व्हावी

- अमोल पाध्ये
रोजगाराच्या संधी निर्माण करा

शहराला आपण स्मार्ट करतो आहोत; पण शहरात गुंतवणूक येत नाहीय, त्याचाही विचार व्हायला हवा. जे उद्योग आहेत तेच सुरु आहेत. त्यातील काही बंद झाले. अनेकांनी सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत जागा घेऊन ठेवली. अनेक वर्षांपासून ती पडून आहे. त्यामुळे महसूलात वाढ कशी होणार. शहराचा आपण विस्तार करत चाललो आहोत; पण याला मर्यादा कुठे तरी घालायला हवी. नाशिकमध्ये मुंबईपेक्षाही जास्त महाग जमीन आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रही अडचणीत सापडले आहे. आठ रुपये प्रति एकर एवढा दर नाशकात चालू आहे. हे खरोखरच योग्य आहे का. शहरात दरवर्षी ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. यातील ४० हजाराहून अधिकजण रोजगारासाठी नाशिकच्या बाहेर जातात. या सर्वांना नाशकातच रोजगार मिळायला हवा. नाशकात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या तर महापालिकेचा करही वाढेल.

- आपले शहर खुप सुंदर आहे ते तसेच रहावे

- झाडे लावण्याची सक्ती करा

- जागा अडवणाऱ्यांना दंड करा

- पियुष सोमाणी
क्लस्टर विकसित करा

केवळ नाशिक शहराचा स्मार्ट विकास करणे ही बाब अधिक प्रभावी होणार नाही. त्यासाठी नाशिक शहरालगतचे परिसर आणि शहराच्या बाह्य भागावर असलेली खेडी विकसीत करायला हवीत. क्लस्टर विकासाचा एक पर्याय समोर आहे. तो स्विकारल्यास समतोल विकास साधता येईल. विकासाचा वेग हळूहळू असला तरी सर्वच भागात विविध योजना कार्यन्वित करता येतील. यामुळे शहरांतर्गत लोकसंख्या वाढण्याच्या प्रकारालाही आळा घालता येईल. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हे सांगितले आहे. त्याची अंमलबजावणी करायला हवी. शिवाय विकास प्रक्रियेत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यालाही प्राधान्य द्यायला हवे.
- अविनाश सिसोदे
अभ्यास करून योजना राबवा

स्मार्ट सिटी ही एक संधी आहे. सर्वांना एकत्रीत घेऊन विकासाची दिशा निश्चित केला पाहिजे. गावठाणाचा विकास व्हावा यासाठी मीच प्रयत्न केले. इथली स्थिती आज बदलली आहे. सोयी सुविधा वाढल्या आहेत; मात्र इथला माणूस हा असुरक्षित झाला आहे. त्याच्या सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे. हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होत असेल तर चांगलेच आहे. इथल्या नागरिकांना चार एफएसआय दिला तर, बिल्डर अधिकचे पैसे लाऊन या भागाचा विकास करू शकतात. त्यासाठी घाईघाईत ही योजना राबविण्याची घाई नको. काय होऊ शकते याची चर्चा करायला हवी. व्यवस्थित अभ्यास करून ही योजना राबविली गेली पाहिजे. एक हजार कोटीत ही योजना पूर्ण होणारी नाही. त्यासाठी अधिकचा निधी लागणार आहे. तांत्रिक मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. सध्याच्या स्थितीतील त्रुटीही शोधल्या पाहिजे. संधी एकदाच येत असते. त‌िचा वापर आपण विकासासाठी कसा करून घेतो यावर त्या योजनेचे यशापयश अवलंबून असते. शहरे स्मार्ट करताना खेड्याचाही विकास व्हायला हवा. नाहीतर शहरांकडे लोंढा वाढून पुन्हा त्याच त्या समस्या निर्माण होतील. खेड्यांमध्येच उद्योग नेले तर, तिथल्या माणसाला रोजगार मिळेल आणि शहरेही अधिक स्मार्ट राहतील. योजना राबवतांना इतर योजनांचे चांगले गुणही घेता आले पाहिजे. केवळ नकारात्मक मानसिकता ठेवून योजनांकडे बघू नका. त्यासाठी अभ्यास करा, मग योजना राबवा. त्यांचे यश दीर्घकाळ टिकते. महापालिकेने सिव्ह‌िल क्षेत्रावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. ही संपूर्ण योजना चांगली आहेत. त्याचे संधीत रुपांतर करा, पणे ते अभ्यास करूनच करायला हवे.

- प्रकाश मते, माजी महापौर, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौरऊर्जा जनजागृतीसाठी महाराष्ट्रभ्रमंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विजेची वाढती गरज व त्याच प्रमाणात निर्माण होत असलेला तुटवडा हा विरोधाभास आज सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. यावर सौरऊर्जा हा एक प्रभावी पर्याय असून, त्याविषयी समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेत पुण्यातील सौरभ कुंभार व त्यांचे मित्र संतोष खोमणे दुचाकीवर महाराष्ट्रभ्रमंती करुन सौरऊर्जेच्या वापराविषयी जनजागृती करीत आहेत. शनिवारी नाशिकमध्ये येऊन त्यांनी याविषयी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेतली.

कम्प्युटर इंजिनीअरची नोकरी करीत असलेले सौरभ कुंभार मागील दहा वर्षांपासून सौरऊर्जा क्षेत्रातील विकासासाठी कार्यरत आहेत. अपुऱ्या विजेच्या संकटापासून देशाला वाचविण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन करण्याच्या हेतूने त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. राज्य सरकारने १० सप्टेंबरला छतावरील सौरऊर्जानिर्मिती यंत्रणेविषयी धोरण प्रसिद्ध केले. याचा अवलंब केला व यंत्रणेस मागणी वाढली तर त्याच्या किंमती आपोआप कमी होतील, म्हणून सरकारी कार्यालयांनी या यंत्रणा विकत घ्याव्यात व जिल्ह्यात त्याविषयी जनजागृती करावी, असा मूळ उद्देश या मोहिमेचा आहे.

साताऱ्यापासून या मोहिमेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व नाशिक येथील सरकारी कार्यालयांमध्ये त्यांनी सौरऊर्जा वापराविषयी माहिती दिली. नाशिकनंतर नंदुरबार, जळगावकडे त्यांनी प्रस्थान केले असून, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन याविषयी ते जनजागृती करणार आहेत. एकूण साडे पाच हजारांचा प्रवास ते या मोहिमेसाठी करणार असून, पुण्यात या मोहिमेची भव्य कार्यक्रमासह सांगता करण्यात येणार आहे.

सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये सौरउर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिल्यास ही कार्यालये विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतील. त्यामुळे जिल्हा, तालुका, प्रदेश, राज्य आणि देशाचे उर्जा स्वयंपूर्णतेचे वा निर्मितीचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास कुंभार यांनी व्यक्त केला आहे. विजेची गरज वाढली असताना त्यावर पर्याय शोधणेदेखील गरजेचे झाले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये सौरऊर्जेविषयी जनजागृती केली तर त्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याबाबत माहिती होईल. त्यामुळे या कार्यालयांमध्ये आम्ही जात आहोत.

- सौरभ कुंभार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन्यथा आंदोलन छेडू

$
0
0



माळी समाज महासंघाचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुण्यात विख्यात लेखिका अरूंधती रॉय यांना समता पुरस्काराने गौरविताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या आंदोलनाचा निषेध माळी समाज महासंघाच्या वतीने शनिवारी करण्यात आला. या उपक्रमास राजकीय रंग देऊन विरोध दर्शविणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन छेडू, असा इशारा माळी समाज महासंघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.

तिडके कॉलनीतील दुर्वांकूर लॉन्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल महाजन यांनी हा इशारा दिला. पुण्यात महात्मा फुले पुण्यतिथीचा कार्यक्रमात अभाविपच्या आंदोलनामुळे चर्चेत आला होता. महात्मा फुले यांच्या अभिवादनासह विख्यात लेखिका अरूंधती रॉय यांना समता परिषदेच्या वतीने या कार्यक्रमात समता पुरस्काराने गौरविण्यात येणार होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सरकारचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार परत करत रॉय यांनी सरकारविरोधातील पुरस्कार वापसीच्या सत्रात उडी घेतली होती. देशातील सद्यस्थितीचे वर्णन करण्यासाठी असहिष्णू हा शब्दही कमी पडेल. ज्यावेळी मतदान केले त्याच वेळी या प्रकाराची नांदी झाल्याचे रॉय यांनी म्हटल्यानंतर वादळ उठले होते. त्याच्याच परिणामी पुण्यात या पुरस्कार सोहळ्यास अभाविपचा विरोध झाल्याची पार्श्वभूमी होती. मात्र, महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीदिनी झालेल्या या प्रकारामुळे माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे मत अनिल महाजन व नाशिक विभागीय अध्यक्ष बाजीराव तिडके यांनी मांडले. संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी झाली.यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष अनिल महाजन, नाशिक विभागीय अध्यक्ष बाजीराव तिडके यांसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भटक्या विमुक्तांचे संमेलन २३ जानेवारीला

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षण, विकास व संशोधन संस्थेतर्फे भटक्या विमुक्तांचे नववे राज्यस्तरीय साहित्य संमेलन २३ जानेवारी रोजी होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकुजी विधाते यांची नुकतीच घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांचे जीवनमान उंचावण्यासाठी साहित्याच्या माध्यमातून सत्याता मांडली जाते. समाजातील अनेक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी साहित्यिक प्रयत्नशील असतो. परंतु अनेकांचे साहित्य आर्थिक परिस्थितीमुळे प्रकाशित होऊ शकत नाही, अशा उपेक्षित लेखक, कवी यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एका विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यासाठी साहित्यही मागविण्यात येत आहे. या विशेषांकात नामांकित भटक्या विमुक्त साहित्यिकांची सूची आणि साहित्याचा समावेश राहणार आहे. बालसाहित्याचाही यात समावेश असेल.

इच्छुकांनी १५ डिसेंबरपर्यंत भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षण विकास व संशोधन संस्था, १ कृष्णकमल, संकल्प को ऑप हौसिंग सोसायटी, संत जनार्दन स्वामी नगर, नवीन आडगाव नाका, पंचवटी या पत्त्यावर किंवा bapubairaginsk@gmail.com या मेलवर साहित्य पाठवावे. अधिक माहितीसाठी ९२०९६२४४०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी साहित्यिक व रसिकांनी पूर्व नोंदणी करणे बंधनकारक आहे. २३ रोजी काव्यसंमेलन आणि २४ ला साहित्य संमेलन, ग्रंथदिंडी असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे अशी माहिती महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षण संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात बालके पुन्हा ‘लक्ष्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर परिसरातील भारतनगर येथील शिवाजीवाडी येथे घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे अपहृत नंदिनी शर्मा या चार वर्षांच्या मुलीचा शोध लागल्याचा आनंदोत्सव सुरू असतानाच, दुसरीकडे अपहरणाचा आणखी एक प्रकार शहरात घडल्याने लहान मुलांच्या व विशेषतः झोपडपट्टी भागातील अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

शिवाजीवाडी येथे अपहृत मुलाचे कुटुंब राहते. मोलमजुरी करून उदारनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबातील तीन वर्षांचा मुलगा शनिवारी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घराबाहेर परिसरातील मुलांसोबत खेळत होता. यावेळी तेथील महिला घराबाहेरच होत्या. मात्र, पाच वाजेनंतर तो कोणालाही दिसून आला नाही. ही माहिती मुलाच्या आईवडिलांना समजताच त्यांनी आजुबाजूला त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडून आला नाही. मुलाच्या वडिलांनी इंदिरानगर पोलिस स्टशेन फिर्याद दिली. याबाबत माहिती देताना इंदिरानगर पोलिस स्टेशनचे सिनीअर पीआय हेमंत सावंत यांनी सांगितले की, संध्याकाळी पाच वाजेनंतर हा बालक कोणालाही दिसून आलेला नाही. याप्रकरणी स्थानिक परिसरात शोध घेण्यात आला. शहर तसेच शहराबाहेर इतर ठिकाणी शोध घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, एखादा क्लू सापडतो का? याचा शोध घेतला जात असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. शहरात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अपहृत बालकाचा त्वरित शोध लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य घोटाळ्यात दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धान्य घोटाळ्यात वाडीवऱ्हे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून, त्यांना आज कोर्टाने १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यापूर्वी मुंबई येथून अटक करण्यात आलेल्या लक्ष्मण पटेल या संशयिताच्या कोठडीत सुध्दा १५ डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय कोर्टाने दिला.

शनिवारी अटक झालेल्या संशयितांमध्ये काशिनाथ सदाशिव पाटील आणि ज्ञानेश्वर दशरथ घुले यांचा समावेश आहे. सिडको परिसरात राहणारा पाटील रिक्षा चालक असून, त्याच्या नावे महालक्ष्मी कार्पोरेट कंपनीची नोंदणी झाल्याची बाब तपासात उघड झाली आहे. तर, पाथर्डी फाटा परिसरात राहणारा संशयित घुले शेतकरी असून, सरकारी धान्याची वाहतूक करण्यासाठी त्याच्या वाहनांचा वापर झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. या दोघांना आज विशेष मोक्का कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, मुंबई येथील लक्ष्मण पटेल या व्यापाऱ्याची पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. दोन्ही बाजुचा युक्तिवाद संपल्यानतंर कोर्टाने त्याच्या कोठडीत १५ डिसेंबरपर्यंत वाढ केल्याची माहिती सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली.

सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या सिन्नर येथील रेशन धान्य अपहार प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत मोक्कान्वये गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील फरार आरोपीपैकी संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, रतन पवार व रमेश पाटणकर गेल्या रविवारी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले होते. त्यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी असून या प्रकरणात काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीची ‘पीपीटी’ रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात महापालिकेच्यावतीने आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन (पीपीटी) आज राज्य सरकारला सादर केले. ते पुढील आठवड्यात मुख्य सचिवांना भेटून आयुक्त या प्रस्तावाचे सादरीकरण केले जाणार आहे.

स्मार्ट सिटी प्रस्तावाबाबत गुरूवारी महासभेत सर्वच नगरसेवकांनी करवाढीला तसेच स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) या कंपनीला विरोध दर्शवला. स्मार्ट सिटी प्रस्तावामध्ये या दोन मुद्द्यांनाच महत्त्व असल्याने महापालिका आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १५ डिसेंबरपर्यंत हा प्रस्ताव सरकारला सादर करण्याची अंतिम मुदत असून, आज पीपीटी सरकारला पाठवण्यात आले. आयुक्त मुंबईला जाऊन याची सविस्तर माहिती मुख्य सचिवांना सादर करणार आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या घटनांमध्ये सातपूरमध्ये चौघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूरला वेगवेगळ्या कारणांनी चार तरुणांचा गेल्या दोन दिवसात मृत्यू झाल्याचे समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूरच्या कुबेरस्वामी पेट्रोल पंपच्या शेजारी राहणारे अशोक भंदुरे यांचे चिरंजीव सचिन भंदुरे (वय २५) यांनी गुरुवारी ३ डिसेंबरला विषारी औषध सेवन केल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अज्ञात गाडीमुळे अपघात

सातपूर कॉलनीत भत्ता व्यवसाय करणारा आशिष टेकवाडे (वय २४) गुरुवारी रात्रीच्या दहाच्या सुमारास कामानिमित्ताने श्रीराम चौकात मित्रा बरोबर दुचाकीवर गेला होता. यावेळी एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धक्का दिल्यानंतर आशिष व त्याचा मित्र खाली पडला होता. यानंतर आशिष धक्का दिलेल्या वाहनाला जाऊन आडवा झाला, यात अज्ञात वाहनाने आशिषला जोरदार धडक देत उडवून पळ काढला. आशिषला रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तलावात तरुण बुडाला

श्रमिकनगर भागातील मनोहर चौकात राहणारा कुंदन पवार (वय २०) हा मित्रासंमवेत वासाळी शिवारातील सुला वाईनच्या मागे असलेल्या पाझर तलावाकडे सुट्टी असल्याने फेरफटका मारण्यासाठी गेला होता. यावेळी कुंदन तलावात बुडाला. रात्री उशिरापर्यंत कुंदनला शोधण्याचे काम सुरु होते.

मृतदेह आढळला

अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहतीत राहणारा प्रदिप जगन्नाथ आहिरराव (वय ३५) एक डिसेंबरपासून घरातून बेपत्ता होता. याबाबत सातपूर पोलिसांत मिसिंगची तक्रार देखील पोलिसांनी दाखल केली होती. फाशीच्या डोंगरालगत एक तरुणाचा मृतदेह सापडल्याचे गंगापूर पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोलिस दाखल झाले. दरम्यान, तो प मृतदेह प्रदिपचाच असल्याचे पोलिसांनी सांगिलते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images