Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘गोल्डन राईड’ ने वेधले नाशिककरांचे लक्ष

$
0
0

नाशिक : नागरिकांचे आरोग्य आणि शहराचे पर्यावरण यांचा मेळ साधण्यासाठी आयोजित 'गोल्डन राईड' या उपक्रमाने नाशिककरांचे लक्ष वेधले. नाशिक सायकलिस्ट आणि सीआयआय (कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) यांच्या वतीने सायकल राईडच्या उपक्रमाचे आयोजन केले हाेते.

डॉक्टर्स, इंजिनीअर्स, कंपन्यांचे सीईओ, जनरल मॅनेजर, उद्योजक, बँकर्स आदी मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सायकलिंगबाबत जनजागृती वाढविण्याचे उद्दिष्ट यामागे होते. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते झेंडा फडकावून या गोल्डन राईडला सुरुवात झाली. महापौर अशोक मुर्तडक यांनीही सायकल चालवून यात सहभाग घेतला. नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपाल सिंग यांचे विशेष प्रयत्न होते. या उपक्रमात महापौर अशोक मुर्तडक, पोलिस अधिकारी हरिष बैजल, सीआयआयचे अध्यक्ष सुधीर मुतालिक, एस. बॅनर्जी, सुनील बापट, श्रीनिवास पत्की देखील उपस्थित होते. प्रसाद गर्भे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रक-कार अपघातात भाऊ-ब‌हिणीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

दिवाळीच्या सुटीकरिता लोणावळाहून लासलगावी घरी परतत असताना इगतपुरी येथे कार व मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात भाऊ व बहिण जागीच ठार झाले. तर, आई-वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लासलगाव येथील राजा ड्रेसेसचे संचालक गुरुविंदरसिंग दलजीतसिंग भल्ला हे आपली पत्नी अविनाशकौर व मुलगी तनमितकौर (वय २४) यांना घेऊन लोणावळा येथे मुलगा सिमरनजीतसिंग (वय १८) यास दिवाळीची सुटी लागल्यामुळे घरी आणण्यासाठी टोयोटो कार (एम.एच.१५ डी.सी.७०४७) ने गेले होते. लोणावळा येथून कल्याणमार्गे परतत असताना रात्री १२.३० च्या सुमारास इगतपुरी येथे हॉटेल गारवाजवळ त्यांची कार व ट्रकचा अपघात होऊन त्यात मुलगी तनमितकौर व मुलगा सिमरनजीतसिंग हे दोघे जागीच ठार झाले. तर, आई-वडील गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी दोन वाजता लासलगाव येथील अमरधाममध्ये दोघा भाऊ-बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषण करणाऱ्यांवर आता कारवाई

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : प्रदूषण करणारेच आता यापुढे दोषी ठरणार असून त्यासाठीची तजवीज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केली आहे. ग्रीन ट्रिब्युनलच्या निर्देशानुसार एमपीसीबीने पर्यावरण कायद्यांच्या अंमलबजावणीसाठीचा कृती आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यात 'पोल्यूटर टू पे' या तत्वाला अधिक प्राधान्य दिले आहे.

हवा, पाणी आणि जमीन यांच्या प्रदूषणाचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. त्या तुलनेत प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना कमी पडत आहेत. त्यामुळेच कोर्टात याचिका दाखल होण्यासह विविध प्रकारच्या अपर्यावरणीय प्रकारांबाबतच्या सुनावण्याही वाढत आहेत. विविध प्रकारचे पर्यावरणीय कायदे अस्तित्वात असले तरी त्याचा कुठलाही परिणाम प्रदूषण रोखणे किंवा बंद करण्यावर होत नसल्याची बाब पुण्यातील ग्रीन ट्रिब्युनलच्या निदर्शनास आली. त्यामुळेच पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्वंकष धोरण (एन्फोर्समेंट पॉलिसी) तयार करावे, असे निर्देश ट्रिब्युनलने गेल्यावर्षी एमपीसीबीला दिले. त्यानुसार एमपीसीबीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे. एमपीसीबीच्या वेबसाइटवर हा मसुदा सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यात 'पोल्यूटर टू पे' अर्थात प्रदूषण करणाऱ्यांनाच कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना नोटीस बजावण्यासह विविध कारवाई केली जाते. तसेच, परवान्यांचे नूतनीकरणावेळी काळजी घेतली जात नाही. म्हणूनच येत्या काळात ही सारीच प्रक्रिया पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक कठोर केली जाणार आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होणाऱ्या प्रदूषणापोटी कारवाई करण्यातही अडचणी येतात. मात्र, नवीन मसुद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांवर कडक कारवाई होणार आहे. तसेच, बँक गॅरंटीसंदर्भातील अनेक नियम कडक होतानाच एमपीसीबीकडून दिल्या जाणाऱ्या संमती पत्राचे (कन्सेन्ट) निकषही वाढणार असल्याचे मसुद्यात नमूद आहे.

पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणीचे धोरणाचा मसूदा आम्ही तयार केला आहे. हा मसुदा http://mpcb.gov.in/legal/legal.php या लिंकवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांच्या काही सूचना किंवा हरकती असतील तर त्यांनी त्या आवर्जून द्यावात.

- पी. अनबलगन, सदस्य सचिव, एमपीसीबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवासाठी नटले शहर

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, नाशिक मांगल्य अन् समृध्दीचा संदेश देणाऱ्या दीपोत्सावाच्या स्वागतासाठी शहर उत्साहाने नटले आहे. सोमवारपासून (दि. ९) दीपावलीच्या मुख्य दिवसांना सुरुवात होत असल्याने नागरिकांची लगबग शहरभर दिसून येत आहे. आरोग्यदेवता धन्वंतरींच्या पूजनासह लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेच्या पूर्वतयारीसाठी बाजारपेठही बहरली आहे. शहरात जागोजागी नजरेस पडणारी विद्युत रोषणाई, बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी दाखल रंगबेरंगी नक्षीकाम केलेल्या इवल्याश्या पणत्या, केरसूणीसह आकाशकंदीलापर्यंत विविध वस्तूंची दुकाने लक्षवेधी ठरत आहेत. औद्योगिक वसाहतींमध्येही नुकतेच बोनस वाटप झाल्याने कर्मचारी वर्गही कपड्यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळला आहे. मोठ्या वस्तूंकडे नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनाही विक्रेते आणि कंपन्यांनी बाजारपेठेत आणल्या आहेत. सुगंधी द्रव्य, कपड्यांसह फर्निचर, वाहने व गृहसजावटीच्या वस्तूंची बाजारात रेलचेल आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शहरातील रस्त्यांमध्येही गर्दीच्या परिणामी वाहतूक कोंडी होते आहे. सोमवारच्या (दि. ९) दिवशी धनत्रयोदशी नवीन वस्त्र, अलंकार व वह्यांच्या खरेदीची प्रथा आहे. यामुळे आज या वस्तूंच्या दुकानांमध्ये विशेष गर्दी राहील. मंगळवारी (दि. १०) नरक चर्तुदशी असल्याने या दिवशी अभ्यंग स्नानास विशेष महत्त्व आहे. यादिवशी अभ्यंगासाठी पहाटे ५.२० ते ६.४४ हा मुहूर्त पंचागकर्त्यांनी दिला आहे. तर बुधवारी लक्ष्मीपूजनासाठी दिवसभर मुहूर्त आहेत. यामध्ये विशेषत: पहाटे ६.३० ते सकाळी ९.४२, सकाळी ११ ते दुपारी ११.४२, दुपारी २.०५ ते रात्री ८.२४ आणि रात्री ९.२५ ते १२.२५ या कालावधीत मुहूर्त देण्यात आले आहेत. गुरूवारी पाडव्याच्या दिवशी महासरस्वतीच्या पूजनासाठी पहाटे ३.३० ते रात्री ८.१० व सकाळी १०.१५ ते दुपारी २ या कालावधीत मुहूर्त आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारीवर्ग हिशेबाच्या नवीन पोचट्यांचे पूजन करतात. या चोपड्या खरेदी करण्यासाठी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी रविवार कारंजा आणि मेन रोडवर परिसरात गर्दी केल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके न फोडण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला "नको फटाक्याची वात, लावू विवेकाची ज्योत" असा नारा देत, फटाके वाजवल्याने आजारांना निमंत्रण मिळते, प्रदूषण होते, प्राण्यांनाही त्याचा त्रास होतो. तसेच हजारो रुपयांचा चुराडा होतो असे फटाक्यांचे दुष्परिणाम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मांडले आणि त्याला साद देत येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील संतोष श्रमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी यंदा दिवाळीला महागडे फटाके न वाजवण्याचा संकल्प केला. दिवाळी हा फटाक्यांचा सण नसून तो दिवे-पणत्यांचा आहे. दिवाळीच्या काळातील प्रदूषण आटोक्यात आणणे आणि फटाक्यांच्या अनुत्पादक खर्चाला आवर घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या 'अंनिस'च्या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. 'अंनिस'चे येवला शाखा कार्यवाह उदयकुमार कुऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना फटाके कमी फोडणे अथवा अजिबात न फोडण्याचे आवाहन केले. फटाक्यांच्या वाचलेल्या पैशातून खाऊ, खेळणी, पुस्तके घेण्याचे व गरीब गरजूंना मदत करावी, असे सूचवले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी संकल्पपत्र भरून देत १०० ते दोन हजारांहून अधिक रुपयांचे फटाके न वाजवण्याचा निर्धार केला, तशी शपथ देखील घेतली. यावेळी प्राचार्य जी. एस. येवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. एम. पी. गायकवाड, प्रा. किशोर सोनवणे, उपप्राचार्य आप्पासाहेब कदम, माध्यमिक विभाग प्रमुख व्ही. आर. परदेशी, दत्तात्रय खोकले, तुषार जेजुरकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेदोनशे कोटींची मालमत्ता जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धान्य घोटाळ्यातील ठेकेदार संपत घोरपडे व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली मालमत्ता जप्तीची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये शेकडो गुंठ्यांचे भूखंड, दोन पेट्रोलपंप, सदनिका, ११ वाहनांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. घोरपडे कुटुंबीयांकडे तब्बल पावणेदोनशे कोटींचे घबाड सापडल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत.

वाडीवऱ्हे, घोटी, सुरगाणा, अंबड, पिंपळगाव बसवंत, ओझर यांसह अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातील घोटाळ्यांमध्ये घोरपडे कुटुंबीयांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संपत घोरपडे, त्यांच्या दोन भावांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोर्टाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही ते हजर न झाल्याने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या त्या भागातील तहसीलदारांच्या माध्यमातून ही जप्तीची कारवाई केली जात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील भंडारवाडी, भरवीर, सिन्नर तालुक्यातील धारणगाव, फर्दापूर, वडनेर दुमाला, दिंडोरी तालुक्यातील जऊळके या ठिकाणी घोरपडे यांची शेकडो गुंठे जमीन असून, ती जप्त करण्यात आली. बहुतांश भूखंडांचे सातबारा उतारेही प्राप्त झाल्याची माहिती खेडकर यांनी दिली. याखेरीज म्हसरूळ येथे आकाश पेट्रोलपंप आणि त्रिमूर्ती चौकातील विशाल पेट्रोलपंपावर देखील जप्तीची कारवाई करण्यात आली. आतापर्यंत सुमारे १७५ कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, अजूनही २० टक्के मालमत्ता जप्त होणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशी आहे मालमत्ता

इगतपुरी तालुक्यातील भरवीर, भंडारवाडी येथे ९३ गुंठे, सिन्नर तालुक्यातील धारणगाव, फर्दापूरमध्ये २२० गुंठे, पिंपळद येथील ९८ गुंठे भूखंड जप्त केल्याची माहिती पुढे आली आहे. याखेरीज दोन पेट्रोलपंप, पाथर्डी, उंटवाडी येथील सदनिका तसेच जऊळके येथील अनेक भूखंड जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक बाजारावर कारवाईचे सावट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकवासीयांच्या दिवाळीवर अतिक्रमण निर्मूलनाचे सावट दाटले आहे. मेनरोड गंगास्लॅबवर दरवर्षी भरभरून वाहणारा बाजार यावर्षी विशेष सजलेला नाही. येथे काही दिवसांपर्यंत व्यवसायिकांना बसू देण्यास मनाई करण्यात आली होती. दरम्यान, रविवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने येथे बाजार भरला; मात्र व्यवसायिक आणि ग्राहक दोन्ही पातळीवर निरुत्साह स्पष्टपणे दिसून आला आहे.

पाणत्या, बत्तासे, केरसुणी, महालक्ष्मी अशा विविध वस्तुंची पारंपरिक दुकाने थाटली होती. शहरात सिंहस्थपूर्व अतिक्रमण मोहीम त्यानंतर सिंहस्थाचे नियाजन व त्यासाठी व्यवसायिकांना केलेली बंदी त्यानंतर पितृपक्ष आणि नंतर पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेने अतिक्रमणाच्या हातोड्याची धास्ती यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये केवळ व्यवसायिकच नव्हे तर जवळपास प्रत्येक रहिवाशी काही ना काही कारणाने अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या १००, २००, ३०० मीटर नियमांचा बडगा, शासकीय भूखंडावर वसलेल्या वस्त्यांना आणि तसेच इतर बांधकामधारकांना नियमबाह्य ठरवत अतिक्रमणाची नोटीस, मंदिरात फुल नारळास केलेली बंदी त्यामुळे पूजा साहित्य व्रिकेत्यासह अनेकांना व्यवसायास पारखे व्हावे लागत आहे. अशा एक ना अनेक बाबतीत प्रत्येक नागरिक भीतीखाली वावरत आहे. तशात सिंहस्थानंतर भाविक पर्यटकांचा ओघ विशेष राहिलेला नाही. येथील अर्थव्यवस्था भाविक पर्यटनावर अवलंबून असल्याने पुजा साहित्य विक्री अथवा खाणावळ किंवा निवासाची व्यवस्था करणारे सारेच मंदिच्या फेऱ्यात सापडले आहेत. एकूणच यंदाची दिवाळी त्र्यंबवासीयांना काळजीत टाकणारी असल्याचे स्पष्ट चित्र जाणवत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांची दिवाळी फसली मंदीच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरातील एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची यंदाची दिवाळीच्या 'कही खुशी, कही गम' अशी साजरी होत आहे. अनेक कंपन्यांना मंदीचा फटका असल्याने कामगारांच्या हातात बोनस आलेला नाही. काही कंपन्यांनी बोनस दिला असला तरी तो समाधानकारक नसल्याने कामगारांमध्ये विशेष उत्साह दिसत नाही.

बहुतांश कंपन्यांमधील कंत्राटी कामगार दिवाळी बोनसपासून वंचित आहेत. यावर्षी मंदीचे सावट असल्याने काही कंपन्यांनी बोनस दिलेले नाहीत. सिटू युनियनने मात्र वेतनवाढीच्या करारात नमूद केलेल्या रक्कमेवरूनच कामगारांना बोनस मिळवू दिले आहेत. परंतु, काही कंपन्यांमध्ये दिवाळीचा सण तोंडावर आला असतांना बोनस दिला गेल्या नसल्याचे कामगार संघटनांची प्रतिनिधी सांगतात.

'त्यांची' दिवाळी अंधारात

ट्रायकॉम कंपनीतील कामगार वेतनापासून वंचित आहेत. दरम्यान, रविवारी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी कंपनी मालकांशी दूरध्वनीदवारे संपर्क साधत बोलणी केली. मंगळवारी काही रक्कम देण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापन करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मांगीतुंगी सोहळ्यासाठी ५० कोटींच्या निधीची अपेक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जैन धर्माचे पहिले तीर्थकार ऋषभदेव यांची मांगीतुंगी (ता. बागलाण) येथे भव्य मूर्ती साकारण्यात येत असून, मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा फेब्रुवारीत होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मंत्रालयात घेतला. या सोहळ्यासाठी ५० कोटींचा निधी मागण्यात आला असून, दोन तीन दिवसात त्याला मंजुरी मिळेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मांगीतुंगी डोंगरावर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंचीची मूर्ती साकारण्यात येत आहे. १६ वर्षांपासून एका अखंड पाषाणात राजस्थानी कारागिर ही मूर्ती साकारत आहेत. ११ ते १६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच, महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. जगभरातील सुमारे २० लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी बैठक बोलावली होती. त्यास खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दीपिका चव्हाण, सीमा हिरे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव नील पोरवाल, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे सीईओ सुखदेव बनकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार, शशांक काळे उपस्थित होते.

कुशवाह यांनी यावेळी महोत्सवाच्या तयारीबाबतचे सादरीकरण केले. मांगीतुंगी परिसराचा नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. मूर्तीच्या परिसरात व्हॅली उद्यान विकसित करणे, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी डोंगर भागाचे सबलीकरण करणे, पर्यटन वाढीसाठी प्रचार करणे, ऋषभदेव मूर्ती मार्गावरील रस्त्याचे मजबुतीकरण करणे, हरणबारी धरण परिसरात पर्यटनस्थळ विकसित करणे, मांगीतुंगी परिसरातील इतर पर्यटनस्थळांचा विकास करणे आदी कामांचा समावेश आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलीच्या ५७ फूट मूर्तीच्या मस्तकाभिषेकासाठी केंद्र आणि तेथील राज्य सरकार ज्या पद्धतीने आर्थिक सहकार्य करते तसेच सहकार्य करून या महोत्सवासाठी केंद्र तसेच प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रशासनामार्फत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पणती सजावटीतून उजळली येवलानगरी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

मांगल्याचे प्रतिक असलेल्या घरादारांसमोरील मिणमिणत्या पणत्या अन् रांगोळी म्हणजे दिपावलीतील मोठे देखणेपण. येवल्यातील खटपट युवा मंचने आयोजित केलेल्या पणती सजावट स्पर्धेमुळे शहर उजळून निघाले. शहरातील संत नामदेव मंदिरात झालेल्या पणती सजावट स्पर्धेला महिलांसह युवतींचा भरभरून प्रतिसाद लाभला. ‍

आकर्षकरित्या घरूनच सजवुन आणलेल्या पणत्या अन् तितक्याच खुबीने त्याभोवती सुंदरतेने रेखाटलेली रांगोळी अशी मनमोहक सजावट महिलांनी यावेळी केली. या लखलखत्या पणत्यांनी मंदिर प्रकाशमय झाले. महिलांचे कलागुण सजावट स्पर्धेतून दिसून आले आणि तितकाच उत्साह देखील. स्पर्धेत एकूण ५३ महिला व युवतींनी सहभागी घेतला.

स्पर्धेचे परिक्षक म्हणून शंकरसा टाक, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, संतोष खंदारे यांनी काम पाहिले. मंचचे अध्यक्ष आयोजक मुकेश लचके यांनी प्रास्ताविक तर प्रा. दत्तात्रय नागडेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष नंदलाल भांबारे, रमाकांत खंदारे, अमोल लचके, ज्ञानेश टिभे, श्रीकांत खंदारे, विशाल तुपसाखरे, तुषार भांबारे आदी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

असे आहेत विजेते

गट - १५ वर्षाखालील : १) प्रियंका धकाते, २) वैष्णवी भुसनळे, ३) पायल एंडाईत (अंदरसुल), उत्तेजनार्थ : वैष्णवी भिंगारकर, रक्षिता बाबर, अनुजा धकाते

गट - १५ वर्षावरील : १) श्रुती नाळके, २) ज्योती बाबर, ३) कोमल मारवाडी, उत्तेजनार्थ :

माया काबरा, भाग्यश्री बाबर, मिनाक्षी क्षत्रिय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने कपडे जमा करण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर दिवाळीचा सणात आदीवासी पाड्यांवर जुने कपडे सातपूरमधून गोळा करून दरवर्षी वाटण्यात येतात. यासाठी जनसेवा सेवापुर्ती फाऊंडेशनने जुने कपडे गोळा करण्याची मोहीम हाती घेतली होती. सातपूर परिसरातील अनेक नागरिकांनी जुने कपडे जनसेवा संस्थेकडे जमा केली आहेत. जमा करण्यात आलेले जुने कपड्यांचे हरसूल भागात आदिवासी पाड्यांवर वाटप केले जाणार आहे. तसेच आदिवासी बांधवांना पणती, फराळाचे साहित्य देखील वाटण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष धनंजय खाडीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो पाऊस आणि टाफेटा’ने मारली बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबईतील अश्व थिएटर संस्थेच्या 'तो पाऊस आणि टाफेटा' ही तुषार गोडसे लिखित एकांकिका 'बाबाज करंडक २०१५' या राज्यस्तरीय स्पर्धेची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. 'लायन्स क्लब ऑफ नाशिक' व 'बाबाज थिएटर' यांच्या वतीने आयोजित केलेल्या या एकांकिकेने परीक्षकांबरोबरच प्रेक्षकांचीही दाद मिळवित स्पर्धेत यश मिळवले.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या या दोन दिवसीय स्पर्धांचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील २४ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत पुण्यातील संक्रमण संस्थेच्या 'एकूट समूह' या यतीन माझिरे लिखित एकांकिकेला द्वितीय तर व्यक्ती या संस्थेच्या 'प्रती गांधी' या धनंजय सरदेशपांडे या एकांकिकेला तृतीय क्रमांकांने गौरविण्यात आले. नितीन सावळे, जुईली शिर्के, यतीन माझिरे व सुयश झुंजुरके यांना उत्तम दिग्दर्शन या पारितोषिकाने गौरविण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण शुभांगी पाठक, रवींद्र ढवळे व आशू सिंग यांनी केले. यावेळी लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद कुलकर्णी, बाबाज थिएटरचे प्रशांत जुन्नरे, सावानाचे सुरेश गायधनी, लायन्स क्लब ऑफ नाशिकचे उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकातही बिहारचा आनंदोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आज बिहारियोंने मोदीजीको अपने मन की बात बता दी यासारख्या कोट्यांचा आज व्हॉटस अॅपसह अन्य सोशल मीडियावरही पाऊस पडला. रोजगारानिमित्त नाशकात आलेल्या बिहारी बांधवांनीही महाआघाडीला यश मिळाल्याबद्दल आंनदोत्सव साजरा केला.

बिहार निकालाचा आनंदोत्सव बिहारी बांधवांनी नाशिकमध्येही साजरा केला. रोजगारानिमित्त सुमारे ४० ते ५० हजार बिहारी नागरिक नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. सातपूर येथील स्वारबाबानगर, नाशिकरोड, अंबड लिंकरोड, श्रमिकनगर परिसरात बिहारी बांधव मोठ्या संख्येने राहतात. लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांना मानणारा मोठा बिहारी वर्ग नाशिकमध्ये असून, त्यांनी एकेमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. गुलालाने माखलेले काही बिहारी लोक शहरातील एमजी रोड, मेनरोड परिसरात दिवाळीच्या खरेदीसाठी आल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान भाजपचा पराभव झाल्याने व्हॉटस अॅप, फेसबुकच्या वॉलवरही दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपच्या रणनीतिची खिल्ली उडविली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाच्या उंबरठ्यावर तेवणार मदतीचा दीप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक जण दीपावलीच्या तोंडावर स्वानंदात मग्न असताना निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या मदतीसाठी पंचवटीतील दंडे हनुमान मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाची पावले बाजारपेठेकडे ओढली जात असताना सामाजिक जाणिवेचे भान जागृत करण्यासाठी आयोजित निधी संकलन उपक्रमात सुमारे लाख रुपयांपेक्षाही अधिक निधी रविवारी संकलित करण्यात आला.

'रुपया तुमचा, प्रयत्न आमचा' असे आवाहन करीत दंडे हनुमान मित्र मंडळाच्या वतीने रविवारी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील सर्व व्यापारी वर्गासह नाग‌रिकांनी या उपक्रमात मुक्त हस्ते मदत करीत सहभाग नोंदवला. हा उपक्रम दिवाळीच्या कालावधीतही सुरूच राहणार असून, यातून जमा होणारी सर्व रक्कम मुख्यमंत्री निधीसाठी देण्यात येणार आहे. हा निधी राज्यातील जलयुक्त शिवार मोहिमेसाठीच वापरला जावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.

रविवार सुटीचा दिवस असला तरीही दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत गर्दी होती. व्यापारी वर्गही रविवारी दुकानात उपस्थित होता. यामुळे पंचवटीसह मेनरोड, सीबीएस, शालीमार, अशोक स्तंभ आदी परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात मोठी मदत देऊन सहभाग घेणाऱ्या व्यापाऱ्यांना तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले. या मदतनिधीत मोठा सहभाग घेणाऱ्या व्यापारी वर्गात प्रकाश सुपारी समूहाचे फासलीवाल परिवार, आनंद फूटवेअरचे विनोद जेठवा, मे. पांडूरंग पवार, दगडू तेली, चांदवडकर, आमले परिवार, श्रीराम ट्रेडर्स, सुनील जाधव, जयहिंद लेदर ब्रदर्स, चोकसी ज्वेलर्स, सागर बुक डेपो आदींनी सहभाग घेतला.

दंडे हनुमान मित्र मंडळाच्या वतीने गजानन शेलार, राहुल शेलार, सतीष आमले, नंदन भास्करे, मुन्ना अन्सारी, गौरव सोनार, विशाल आटोळे, अंकित पाटील, वैभव शुक्ले, सचिन कदम, रमेश महाले, वैभव वाकचौरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री निधीस मदत

यंदा निसर्गाच्या अवकृपेने राज्यात बहुतांश ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या आनंदात सर्वजण मग्न असताना अर्थव्यवस्थेचा कणा असणारा बळीराजा उपेक्षित राहू नये, यासाठी हा उपक्रम राबवला. यातील निधी मुख्यमंत्री निधीस देण्यात येईल.

- राहुल शेलार, दंडे हनुमान मित्र मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धात्रक फाटा येथे प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धात्रक फाटा येथे युवकावर गोळीबार करून फरार झालेले आरोपींचा कोणताही माग लागलेला नसताना रविवारी पहाटे अज्ञात आरोपींनी याच परिसरातील राज आनंद मंगल कार्यालयामागे असलेल्या रो हाऊसमध्ये राहणाऱ्या अविनाश कृष्णराव सवई (वय ४२) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

गंभीर जखमी असलेल्या सवई यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पोलिस तपास थंडावला आहे. सवई रात्रीच्या सुमारास घराबाहेर का पडले याचेच उत्तर पोलिसांना अद्याप मिळालेले नाही. हाणामारी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी औरंगाबाद येथे राहणाऱ्या रमेश कृष्णराव सवई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणीस मारहाण

कौटुंबीक कारणावरून एका तरुणीचे अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये विवाहितेसह सहा संशयितांविरोधात अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गडकरी चौक परिसरात राहणाऱ्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शताब्दी हॉस्पिटलच्या आवारातून संशयित सविता छगन विधाते आणि प्रशांत यांनी कौटुंबीक कारणावरून बेदम मारहाण केली. तसेच, संशयितांनी तिचे दुचाकीवरून अपहरण करीत गोविंदनगर परिसरातील अनमोल शिल्प अपार्टमेंट नेले. संशयित सविताच्या घरच्यांनीदेखील सोनलला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.

भिंत मालकांवर गुन्हा

घराची भिंत कोसळून जखमी झालेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी काझीगढी येथील घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. अशा पध्दतीचा गुन्हा प्रथमच दाखल झाला असून, यामुळे जुन्या घरांमध्ये किंवा वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या महिन्यात जुन्या घराची भिंत कोसळून एक महिला जखमी झाली होती. या प्रकरणी सतरा दिवसांनंतर महिलेने भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये संबंधित घरमालकाविरोधात तक्रार दाखल केली. २० ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास काझीगढी, कुंभारवाडा येथे राहणाऱ्या कुसुमबाई सोमनाथ वासनकर (वय ५०) या थकवा लागल्याने काझीची गढी येथील घर क्रमांक १५१६ च्या पायरीवर बसल्या होत्या. त्याचवेळी अचानक घराची ‌भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी सविता सुदाम उखाडे (कुंभारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी घर नंबर १५१६ आणि १५१७ क्रमाकांच्या घराच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आठ लाखाची चोरी

सातपूर परिसरातील पवन ठाकूरदास चांदवाणी यांची बाबासाई बेकरीचे छत उचकटून चोरट्याने सुमारे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बेकरीच्या छताचा पत्रा उचकटून आणि पीओपी सिलिंग तोडून बेकरीत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने बेकरीच्या कार्यालयातील लॉकर तोडून तेथून ७ लाख ९५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


९० पेशंटची मधुमेह तपासणी

$
0
0



नाशिक : जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. मृणालिनी केळकर व मधुमेह स्वास्थ संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केळकर हॉस्पिटल येथे शनिवारी मधुमेह तपासणी आणि प्रबोधन शिबिर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ९० पेशंटची तपासणी करण्यात आली.

दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : वेगात असलेली दुचाकी डिव्हायडरला धडकून सातपूर परिसरातील कामगारनगर येथील रहिवाशी दिनेश धर्माजी आहिरे (वय ३०) याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास मायकोसर्कलजवळील वेद मंदिरासमोर घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली.

घरफोडी करणारा अटकेत

नाशिक : दिंडोरीरोडवरील पोकार कॉलनीत घरफोडी करून एक लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या संशयित बाळू राजाराम प्रधान (वय २३) या युवकास पोलिसांनी अटक केली. मखमलाबाद परिसरातील इरिगेशन कॉलनीत राहणाऱ्या प्रधानने चंद्रशेखर गायकवाड यांचे घर फोडून चोरी केली होती.

संशयित चोरटा ताब्यात

नाशिक : घरफोडी करण्याच्या इराद्याने अंधारात लपून बसलेल्या संशयितास भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले. सोहेल मोईनोद्दीन शेख (वय १९) असे या संशयिताचे नाव असून, पंचशीलनगर येथे राहतो. पिंपळ चौक परिसरात शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अंधारात लपून बसलेला असताना पोलिसांनी त्याला पकडले.

अदखलपात्र गुन्हा

नाशिक : मनपा प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये मुंबई नाका येथील युवक मित्र मंडळाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अंकुष म्हसुजी आंबेकर यांनी या प्रकरणी भद्रकाली पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये विकासकामांची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबतच्या लढ्यात आक्रमक भूमिका बजावणारे आमदार अनिल कदम निफाड तालुकावासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात किमान पहिल्या वर्षात तरी अपयशी ठरल्याचे दिसते. तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय असून, ग्रामीण रुग्णालयासारखी वर्षानुवर्षे रेंगाळलेली कामेही पूर्णत्वाकडे गेलेली नाहीत. अनेक कामे प्रस्तावित असली तरी ती पूर्ण होण्यासाठी मतदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बागायतदारांचा तालुका असा निफाडचा लौकीक आहे. काळी माती, कसदार जमिनी यामुळे येथे सुपीकता नांदते. मात्र, हाच शेतकरी यंदा अवकाळी, गारपीट यासारख्या अस्मामानी संकटांमुळे उद्ध्वस्त झाला. मुबलक पाण्याचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था अशा तालुकावासीयांच्या प्रमुख समस्या आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली असून, प्रस्तावित कामांची मोठी यादी आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचा दावा कदम यांनी केला.

निफाड तसेच, ओझर महामार्गावर अद्ययावत बसस्थानक उभारण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येकी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमाकेअर सेंटर उभारणीत जागेची अडचण होती. ती दूर झाली असून, हे कामही लवकर मार्गी लागेल, असा विश्वास आहे. निफाडमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या काम मार्गी लागावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सुमारे १८ कोटींचा खर्च त्यास अपेक्षित असून, सचिव समितीची मान्यताही प्राप्त झाली आहे. तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. येथे सिन्नर, वन्यजीव आणि नाशिक पूर्व अशा वनखात्याशी संबंधित तीन कार्यालयांशी समन्वय साधावा लागतो. एकच विभागीय कार्यालय असावे यासाठी पाठपुरावा सुरू असून, हे कामही अंतिम टप्प्यात आहे. गावागावांत अंधारामुळे बिबट्यांचे फावते. म्हणूनच गावोगावी हायमास्टचे दिवे बसविण्यावर भर दिला असून, जिल्हा नियोजन समितीकडे तसा प्रस्तावही देण्यात आला आहे. ओझर येथे तरण तलावाची उभारणी, ग्रामीण भागात रस्ते बनविण्याचे प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक होत नसल्याने कामे मंजुरीला अडथळे निर्माण होत आहेत.

शेतकऱ्यांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी गावोगावी छोटे बंधारे उभारणीवरच भर दिला जात आहे. पाणीवाटपाचा मुद्दा निकाली निघावा, यासाठी पाणीवापर संघ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तालुकावासी तसेच, जवळपासच्या वाहनधारकांना पिंपळगाव बसवंतचा टोल परवडत नाही. अशा वाहनधारकांसाठी पाचोरे ते आहेरगाव, आहेरगाव ते लोणवाडी, लोणवाडी ते कारसूळ असा पर्यायी रस्ता बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दारणा-गोदावरी संगमावर रस्ता करून निफाड आणि सिन्नर तालुक्याला जोडावयाचे आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्यांचे बरेचसे अंतर वाचू शकेल. निफाड साखर कारखाना किंवा परिसरात छोटा कारखाना कार्यान्वित करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. ओझर, पिंपळगावला अजूनही ग्रामपंचायत असून, परिणामी विकासाला मर्यादा येत आहेत. या ठिकाणांच्या नेटक्या विकासासाठी नगरपंचायत होणे आवश्यक असून, सर्वांच्या एकविचारानेच त्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. निफाड शहरासाठी पाणीपुरवठा योजना, ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी मिळण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. या कामांना मंजुरीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापसाचे आंदोलन ही माझी चूक!

$
0
0

विजय पाठक, जळगाव

भाजपने कापसाला सात हजारांचा भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना भडकवण्याचे योजनाबद्ध काम केले. त्यात भाजपचे तत्कालीन आमदार आणि आजचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी २०१२ मध्ये दहा दिवस उपोषण केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांशी शनिवारी औपचारिक बोलताना कापसाचा विषय निघाल्यानंतर आपण केलेले कापसाचे आंदोलन ही चूकच होती, असे प्रांजळपणे महाजन यांनी मान्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था वाढती महागाई, डाळींचे चढते भाव याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणस्थळी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी महाजनांच्या स्वभावानुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत गप्पा रंगल्या.

तुमच्या मागण्या काय आहेत, असे महाजनांनी विचारता जिल्ह्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, डाळींचे चढते भाव, मिळणारे निकृष्ट दर्जाचे धान्य याबाबत चर्चा झाली. नंतर चर्चा कापसाकडे वळली. जामनेरचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी, 'भाऊ, कापसाचे काय विचारता? कापसावर बोलू नका' म्हणून गिरीश महाजनांनी सांगितले. यावर तुम्ही तर दहा दिवस कापसाला सात हजाराचा भाव मिळावा म्हणून उपोषण केले होते, याची पाटलांनी आठवण करून देता, 'हो, ते उपोषण केले चूक झाली.. फसलो!' अशी प्रामाणिक कबुली देऊन टाकत हा विषय अधिक वाढत असता शरद पाटील यांना यावर आपण जामनेरमध्ये बोलू म्हणत संपवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून मराठवाड्याला पाणी सोडले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'नाशिक व नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याला जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य एस. व्ही. सोडल हेच कारणीभूत आहेत. सोडल यांच्या अट्टाहासापुढे राज्य सरकारही हतबल होते,' असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी केला आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतरही प्राधिकरणाने पुनर्विचार याचिकेवर निर्णय दिले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा असे सांगत अतिरिक्त पाणी कोणासाठी दिले, असा सवाल त्यांनी केला आहे.

शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी पाण्याच्या राजकारणावरून सरकारवर टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे गांभीर्य शासन व प्राधिकरणाला समजले नाही. पिण्यासाठीच पाणी सोडा असे सांगीतले. मात्र सोडल यांचा हट्ट पानी सोडण्यावर कायम होता. त्यांचा हा हट्ट राज्य सरकारने सुद्धा पुरविला. नाशिक व नगरमधून पुनर्विचार याचिका दाखल झाल्या. मात्र त्यावर निर्णयच झाले नाहीत. त्यामुळे हे अतिरिक्त पाणी कोणासाठी सोडले गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'पिण्याच्या पाण्याला आमचा विरोध नाही, मात्र या दोन जिल्ह्यातही चांगली स्थिती नाही. शासनाने यात पुढाकार घेऊन उर्वरीत पानी थांबवायला हवे होते. मात्र सोडल यांच्या हट्टापुढे शासनही हतबल झाले होते. त्यामुळे प्राधिकरणातच अनागोंदी असल्याची टिका त्यांनी केली.

समान पाणी वाटपाचा कायदा हा एका वेगळ्या उद्देशासाठी होता. जागतिक बँकेच्या कर्जासाठी ही अट असल्याने रात्रीतून हा कायदा केला. मात्र तो आता कालबाह्य झाला आहे. त्याचा आता वेगळाच अर्थ लावला जात आहे. या संदर्भात आता १७ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्यात ही वस्तुस्थिती मांडली जाणार असल्याचे त्यांनी सांग‌तिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थगिती आमदार बाळासाहेब सानप

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नरेंद्र मोदींच्या लाटेवर विजयाची माळ गळ्यात पडलेल्या नाशिक पश्चिमचे आमदार बाळासाहेब सानप यांची वर्षभरातील कारकिर्द ही निराशाजनक आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांची जवळीक व पदरात पाडून घेतलेला समितीचा लालदिवा या कामगिरीपलीकडे मतदारसंघातील प्रश्न व समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. दर्शनही दुर्लभ झाल्याने त्यांच्याविषयी मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. वर्षभरात त्यांनी विकास कामांऐवजी शहरातील विकासकामांना स्थगितीसाठी प्रयत्न केल्याने नाशिकमध्ये स्थगिती आमदार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.

नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे आणि तपोवनातील मोदींच्या एका सभेमुळे एका रात्रीत बाळासाहेब सानप यांचे भविष्य बदलले. नगरसेवकपदासोबतच आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडाली. तब्बल ४६ हजार ३७४ अशा भरघोस मतांनी मतदारांनी त्यांना निवडून दिले. सर्वाधिक जास्त मते त्यांना मिळाल्याने नागरिकांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. नगरसेवक व आमदार पद अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर जनतेने टाकली. मात्र, वर्षभरातील त्यांची कामगिरी ही समाधानकारक नाही. दोन्ही पदाला ते न्याय देत नसल्याची मतदारांची ओरड आहे. प्रभागातील विकासकामांसाठी ते प्रभागातच काय महापालिकेतही फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मतदारांमध्येच असंतोष आहे. तसेच, महाराष्ट्र विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाचा लालदिवा त्यांच्याकडे आहे.

गेल्या वर्षभरात सानप यांची कारकिर्द ही वादग्रस्त राहिली आहे. पोलिसाच्या मदतीने हॉटेलवर छापा मारण्याचे प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले होते. वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला असला तरी, तो मिटवताना त्यांना नाकीनव आले होते. या सोबतच शहर विकासाच्या कामांना स्थगिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून केला जात आहे. शिक्षण समिती असो व शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा मुकणे पाणीपुरवठा योजनेला स्थगिती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांनी टीका ओढवून घेतली. विकासकामांऐवजी स्थगिती आमदार अशी त्यांची प्रतिमा तयारी झाली. तसेच, सिंहस्थादरम्यान साधू-महंताचा कोपही त्यांनी ओढवून घेतला. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी त्यांच्यावर जाहीर टीकास्र सोडले होते. ग्यानदासांवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या साध्वी त्रिकालभंवता यांना आश्रय दिल्यामुळे त्यांच्यावर त्या काळी चांगलीच टीका झाली होती. नाशिकचे पाणी मराठवाड्याला जात असताना त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नसल्याने ग्रामीण मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. दरम्यान, वर्षभरात केलेल्या विकासकामांसंदर्भात आमदार सानप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images