Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पुणे विमानसेवेला एअर स्पेसचा अडसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकहून पुणे प्रस्तावित असलेल्या विमानसेवेला पुण्याच्या एअर स्पेसचा अडसर येण्याची चिन्हे आहेत. पुण्याची एअर स्पेस सकाळी ८ ते १० या वेळेत उपलब्ध नसल्याने नाशिकहून सकाळी सेवा केव्हा उपलब्ध होणार, असा प्रश्न आहे.

पाणी आणि जमीनीवर उतरू शकणाऱ्या ९ आसनी सीप्लेनची सेवा सुरू करण्याची मेहेर कंपनी इच्छा प्रदर्शित केली आहे. सीप्लेनची विमानसेवा नाशिक ते पुणे या मार्गावर येत्या १५ जूनपासून सुरू करण्याचे कंपनीचे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत नाशिक ते पुणे किंवा पुणे ते नाशिक प्रवास हा सहा ते सात तासांचा आहे. मात्र, या विमानसेवेमुळा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे या विमानसेवेबाबत नाशिककरांना मोठी उत्सुकता आहे.

सकाळी ८ वाजता ओझर विमानतळावरुन विमान निघेल ते सकाळी ९ वाजता लोहगाव येथे पोहचेल. तेथून पुन्हा ९.१५ ला निघून १०.१५ ला ते ओझर येथे येईल, अशी सेवा विचाराधीन आहे. मात्र, सकाळी ८ ते १० या वेळेत पुण्याची एअर स्पेस उपलब्ध नसते, असे हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. हवाई दलाच्या विमानांचे प्रात्यक्षिक या काळात सुरू राहत असल्याने या दोन तासात सध्या तेथून कुठल्याही प्रकारची प्रवासी विमानसेवा सुरू नाही. त्यामुळे नाशिकच्या प्रवासी विमानसेवेची वेळ बदलण्याची शक्यता आहे.

सकाळी सातचा मुहूर्त

ओझर विमानतळाहून सकाळी सातला सेवा सुरू केली तर हे विमान ७.४५ ला पुण्याच्या लोहगाव विमानतळावर पोहचू शकणार आहे. सकाळी ८ ते १० परवानगी नसल्याने पुण्याहून विमान सकाळी १०.१० वाजता निघेल आणि सकाळी ११ वाजता ओझर येथे पोहचेल, अशा प्रकारचा पर्याय विमानसेवेला उपलब्ध होऊ शकणार आहे.

टर्मिनलचे टेंडरच नाही

ओझर विमानतळाच्या भव्य पॅसेंजर टर्मिनलची देखभालीसाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) अद्याप टेंडर प्रसिद्ध केलेले नाही. यापूर्वी टर्मिनलची मालकी राज्य सरकारकडे होती. आता ते एचएएलकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. तरीही या टर्मिनलचे टेंडर काढण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विमानसेवेसाठी उद्या बैठक

विमानसेवेला प्रतिसाद मिळावा यासाठी नाशिकमधील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी (दि. ५) बैठक घेण्यात येणार आहे. त्यात येणाऱ्या विविध सूचना आणि प्रस्तावांचा विचार केला जाणार आहे. या बैठकीला शहरातील विविध संस्था-संघटनांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तिडके कॉलनीतील हॉटेल एसएसके येथे सायंकाळी चार वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला मेहेर कंपनीचे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा, संचालक एस. के. मन, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ नाशिक (तान) चे अध्यक्ष दत्ता भालेराव व पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डीपी’ मंजुरीसाठी एकजूट ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शेतकरी आणि मिळकतधारकांच्या अभूतपूर्व एकजुटीमुळेच शहर विकास आराखड्यातील (डीपी) अन्याय दूर झाला आहे. नवा आराखडा तयार झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. ती मिळेपर्यंत सर्वांनी एकजूट ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वास्तु अभियंता आणि शासकीय तांत्रिक सल्लागार उन्मेष गायधनी यांनी केले आहे.

शहर विकास आराखडा अन्याय निवारण समितीच्या बॅनरखाली शेतकरी आणि मिळकतधारक एकत्र आले. समितीतर्फे नाशिकरोड येथे मेळावा झाला. त्यावेळी गायधनी बोलत होते. समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, अॅड. नितीन ठाकरे, डॉ. डी. जी. पेखळे, त्र्यंबकराव गायकवाड व्यासपीठावर होते.

गायधनी म्हणाले, की आराखड्यातील अन्याय दूर झाला असला तरी अजूनही बिल्डर लॉबीचा दबाव आहे. ते धनशक्तीचा वापर करत आहेत. कोर्टात जाण्याचीही त्यांची तयारी सुरू आहे. आराखडा तयार झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे जागरुकता निर्माण करण्यासाठी समिती मेळावे घेत आहे. अरिंगळे म्हणाले, की आराखड्याच्या विरोधात खोटा प्रचार सुरू आहे. शेतकरी आणि मिळकतधारकांची बांधकाम व्यावसायिक, विकसक दिशाभूल करत आहेत. त्यांच्या दबावामुळेच प्रशासनाने चुकीचा विकास आराखडा तयार केला होता. ठाकरे म्हणाले, की न्याय देणाऱ्या आराखड्यालाच अंतिम मंजुरी मिळावी यासाठी शेतकरी आणि मिळकतधारकांनी दबाव कायम ठेवला पाहिजे. त्र्यंबकराव गायकवाड, अॅड. भास्कर निमसे, मधुकर गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.

आराखड्याबाबत मंगळवारी व्याख्यान

शहर विकास आराखड्यातील सकारात्मक आणि नकारात्मक बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी कृती समितीतर्फे मंगळवारी (दि. ९) उन्मेष गायधनी यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती निवृत्ती अरिंगळे यांनी दिली. रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी पाचला व्याख्यान होईल. हरकती नोंदविण्यासाठी मिळकतधारक व शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची सरशी; भाजप तोंडघशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षितपणे अध्यक्षपदी नरेंद्र दराडे आणि उपाध्यक्षपदी सुहास कांदे निवडून आले असले तरी सहकारातील प्रस्थापित असलेल्या आमदार अपूर्व हिरे आणि माणिकराव कोकाटे यांना धक्का देण्यात आघाडीचे नेते यशस्वी ठरले. तर योग्य रणनीती अभावी आणि अनुभवाच्या कमतरतेमुळे आ. हिरे यांच्यासह कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेन एकत्रित येवून भाजपला धडा शिकविला आहे.

जिल्हा बँकेत आ. हिरे यांच्याकडे बहुमत असतांनाही केवळ स्वतः अध्यक्ष होण्याचा हट्ट त्यांना महागात पडला. सोबतच सर्व सदस्यांचा आ. अनिक कदम यांना पाठिंबा असतांनाही त्यांना विरोध केल्याने त्यांच्यावर गटाच्या बाहेर जाण्याची वेळ आली. त्यांच्या गटातील दहा संचालकांनी एकत्रित येवून दराडे बंधूंना हाताशी धरून हिरेंसह कोकाटेंना धक्का देण्यात भुजबळ समर्थक संचालकांना यश आले आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणात आतापर्यंत शुन्य असलेल्या भाजपने बँकेच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली. खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. अपूर्व हिरे, सीमा हिरे, अद्वय हिरे, कोकाटे, केदा आहेर असे भाजपचे सहा अधिकृत पदाधिकारी प्रथमच निवडून आले. शेतकरी विकास आणि कर्मवीर भाऊसाहेब हिरे या दोन पॅनलचे नेतृत्व भाजप उमेदवारांकडे आहे. त्यामुळे सत्ता कोणत्याही पॅनलची असली तरी अध्यक्ष भाजपचा होईल अशी शक्यता आहे. मात्र, अनुभवाची कमतरता आणि रणनीती आखण्यात भाजपचे नेते अपयशी ठरल्याने अखेर भाजपला या निवडणुकीत सत्तेचा फायदा उचलता आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतीश खरे बनले २२ वे ‘संचालक’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी सतीश खरे यांनी २२ व्या संचालकाची भूमिका पार पाडली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर लक्ष देण्याऐवजी माध्यमांना कसे दूर ठेवता यासाठी प्रयत्न केले.

सभागृहात संचालकांनी सर्रास नियमांची पायमल्ली केली. सभागृहात मोबाईल नेण्यास बंदी असतांनाही संचालक सर्रास सभागृहात सेटींग करतांना दिसून आले. आपल्या नेत्यांशी थेट मोबाईलवर बोलत होते. अध्यक्षपदासाठी सभागृहातच लॉबिंग सुरू होते. मात्र, या सर्व प्रक्रियेकडे लक्ष देवून हा प्रकार थांबवण्याऐवजी खरे यांनी माध्यमांचीच मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी उर्मटपणे व्यवहार करून 'चालते व्हा' असे फर्मानही सोडले. त्यांच्या या संशयास्पद कृतीमुळे सचांलकांना रान मोकळे होवून सभागृहाला आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले. माध्यमांना चौथ्या स्तंभाचा दिलेला दर्जाच काढून घेण्याचा प्रयत्न खरे यांनी केल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

अध्यक्षपदाच्या माध्यमांतून सेवा करण्याची संधी मिळाली असून यापुढे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार आहे. सर्व संचालकांना सोबत घेवून शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबविण्यात येतील. कर्जमर्यादा वाढवणार आहे. छगन भुजबळांनी आपल्याला अध्यक्ष करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाच्या सदस्यांना सोबत घेवून जिल्हा बँकेला पूनर्वैभव प्राप्त करून देईल.
- नरेंद्र दराडे, नवनिर्वाचित अध्यक्ष

जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच होत नाही.अध्यक्ष कोणीही असला तरी तो सर्वपक्षीय असतो. अध्यक्ष उपाध्यक्षांनी शेतकरी हिताचे काम केले तर त्यांना आमचा पाठिंबा राहील. मात्र, त्यांनी चुकीचे काम केले तर त्याला तीव्र विरोध करू.
- आ. अपूर्व हिरे, संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्ष, सांगा नेमके कुणाचे?

$
0
0

वर्चस्ववादाची लढाई; नरेंद्र दराडेंनाही सांगता येईना त्यांचा गट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर नरेंद्र दराडे नेमके कोणत्या गटाचे यावरून संचालकांमध्ये वर्चस्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी शेतकरी विकास पॅनलची साथ सोडणाऱ्या दराडेंनी निवडून आल्यानंतर मी सर्वपक्षीय गटाचा अध्यक्ष असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी दोन तासातच 'यू टर्न' घेत आपण शेतकरी विकास पॅनलचे अंग असल्याचे कोकाटेंच्या उपस्थितीत सांगितले. पुन्हा तासाभरात कोकाटेविरोधकांसोबत उपस्थित राहून आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत सर्वांचे अध्यक्ष असल्याचे सांगितले. दोन गटातील ओढाताणीत दराडे यांची कोंडी झाली.

जिल्हा बँकेत एकमेकांना शह देण्याच्या प्रयत्नात दराडे यांची ऐनवेळी अध्यक्षपदी वर्णी लागली. ते कोकाटे यांच्या शेतकरी विकास पॅनलमधून निवडून आले होते. मात्र, अध्यक्षपदासाठी त्यांनी हिरे विरोधकांशी हातमिळवणी केली. हिरे यांना विरोध असणाऱ्या आमदार अनिल कदम, शिवाजी चुंभळे, शिरीष कोतवाल, गणपतराव पाटील, नामदेव हलकंदर, परवेझ कोकणी, सचिन सावंत, केदा आहेर हे पाठीशी उभे राहिल्याने दराडे बिनविरोध निवडून आले.

निवडणुकीनंतर दराडे यांनी आपण सर्वपक्षीय संचालकाचे अध्यक्ष असल्याचे सांगून दोन्ही गटांना बरोबर घेवून बँकेचे कामकाज करणार असल्याचे सांगितले. मात्र, बँकेत आता तिसऱ्याच गटाची सत्ता आल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. तर धोबीपछाड मिळालेल्या हिरे, कोकाटे यांनी निवडणुकीनंतर काढता पाय घेतला.

दोन तासानंतर दराडे आणि कांदे यांनी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख असलेल्या कोकाटे कार्यालयावर हजेरी लावली. या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून कोकाटे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आमच्याच गटाचे असल्याचे सांगितले. राजकीय खेळी खेळल्याने आमचा गटाचा अध्यक्ष झाला. आम्हीच दराडेंना दुसऱ्या गटात पाठविल्याचा दावा कोकाटेंनी केला. विशेष म्हणजे आम्हाला विचारूनच दराडे गेल्याचे त्यांनी सांगितले. तर दराडे यांनीही आपण शेतकरी विकास पॅनलचे अध्यक्ष असल्याचे सांगून आपल्याला छगन भुजबळांनी मदत केल्याचे सांगितले. आम्ही ठरवून ही खेळी केल्याचा दावा कोकाटे, दिलीप बनकर यांनी केला.

दराडेंची पुरती कोंडी

दोन गटात चाललेल्या या वर्चस्वाच्या लढाईत दराडेंची पुरती कोंडी झाली. दोन्ही गटांनी मदत केल्याने त्यांना स्पष्टीकरण देणेही अवघड जात आहे. आपण सर्वपक्षीय अध्यक्ष असल्याचे सांगता सांगता ते पुरते नाकीनऊ आले. तीन तासात त्यांना दोनदा कोलांटउड्या घ्याव्या लागल्या. सर्व संचालकांची मनधरणी करणेही त्यांना अवघड झाले.

आम्ही केलेली राजकीय खेळी यशस्वी झाली. दराडे आमच्या गटाचे असून आम्हीच त्यांना ठरवून तिकडे पाठविले. त्यामुळे सहा जण निवडून आले असतांनाही आता बँकेवर शेतकरी विकासची सत्ता आहे.
- माणिकराव कोकाटे, शेतकरी विकास पॅनल

दराडे शेतकरी विकासचे नसून ते आमच्या नव्या गटात आले आहेत. दोन्ही गटाचे उमेदवार मान्य नसल्याने आम्ही स्वतंत्र गट तयार करून ऐनवेळी दराडेंना संधी दिली आणि निवडून आणले. कोकाटेंनी चहाला बोलावून दराडेंची फसगत केली.
- आ. अनिल कदम, संचालक

कदम, कोतवालांची घालमेल

दराडे यांनी कोकाटे यांच्या कार्यालयात हजेरी लावल्याची माहिती समजताच अस्वस्थ झालेल्या आमदार अनिल कदम तसेच शिरीष कोतवाल, परवेझ कोकणी यांनी दराडे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. सोबतच कोकाटेंच्या कार्यालयातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. दराडेंच्या घरी पत्रकार परिषद घेत पुन्हा दराडे हे कोकाटे गटाचे नसल्याचा प्रयत्न कदम व कोतवाल यांनी केला. विशेष म्हणजे आपण चहा घेण्यासाठी गेल्याचा खुलासा दराडेंनी केला. त्यांना बोलावून कोकाटेंनी पत्रकार परिषद घेतली असली तरी त्यांना अंधारात ठेवल्याचा दावा कदम यांनी केला असून दराडे हे आता भुजबळ गटाचे असल्याचा दावा या सदस्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माझं शाळेचं नक्की झालं’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भटक्या विमुक्त जमातीतील लेखिका विमल मोरे यांच्या 'तीन दगडांची चूल' या आत्मकथनातील एक प्रकरण बालभारतीने यंदा इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. भटक्या विमुक्त जमातीतील एका स्त्रिच्या शैक्षणिक प्रवासाच्या खडतर सुरुवातीवर प्रकाश टाकणारा हा धडा असणार आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात 'बालभारती'ने सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून या पाठाचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे. या समाजातील स्रियांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना, व्यथा, त्यांची होणारी परवड, मानसिक कुचंबना याचे विदारक चित्र विमल मोरे यांनी आपल्या 'तीन दगडांची चूल' आत्मकथनातून समाजासमोर मांडले आहे. वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या या समाजात शिक्षणाविषयी मात्र फारशी जागरुकता झाली नाही. शिक्षणाचे मोल काय असते, हे त्यांना स्वातंत्रानंतर आजपर्यंत समजू शकले नाही. त्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात निरक्षर राहिला. मात्र, त्याचा परिणाम या समाजातील मुलींवर झाला. या विघटनामुळे प्रगतीपासून तो अधिक दूर गेला आणि मागासलेपण आले. नेमकी हीच सद्य परिस्थिती मोरे यांनी आपल्या आत्मकथनातून समाजासमोर मांडली. 'गबाळ'चे लेखक तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेतील सहयोगी प्रा. दादासाहेब मोरे यांच्या त्या पत्नी आहेत.

इरगोंडा यांचे मार्गदर्शन

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ आणि राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा २००५ नुसार बालभारतीने प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. या शासनमान्य अभ्यासक्रमावर आधारीत इयत्ता पाचवीचे मराठी बालभारती हे पुस्तक तयार करण्यात आले. मराठी भाषा समितीचे ज्येष्ठ सदस्य इरगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक साकारले आहे.

माझ्या आत्मकथनातील 'माझं शाळेचं नक्की झालं' या धड्याचा बालभारतीने पाचवीच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. यामुळे भटक्या विमुक्त समाजासह शोषित, वंचित आणि उपेक्षित समाजातील मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल, अशी मला खात्री आहे.
- विमल मोरे, लेखिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम जन्मभूमीचा तिढा सुटणार?

$
0
0

सर्वपक्षीय समन्वय समितीची पुढील महिन्यात बैठक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीर्घकाळापासून प्रलंबित असणाऱ्या रामजन्मभूमी-बाबरी मशिदच्या वादग्रस्त प्रश्नी लवकरच तोडगा निघेल असा प्रखर आशावाद हनुमान गढीचे महंत ग्यानदास यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्यासाठी बुधवारी शहरात त्यांचे आगमन झाले. यावेळी ते बोलत होते. या मुद्द्यावर समन्वय साधण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार समन्वय समिती नेमण्यात आली असून, त्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील महिन्यात नाशिकमध्ये महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रश्न समन्वयातून तोडगा निघणे शक्य असल्याचा आशावाद हनुमान गढीचे महंत ग्यानदास यांना आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. या समितीवर महंत ग्यानदास हे ही कार्यरत आहेत.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून नाशिकमध्ये येणाऱ्या साधू महंत आणि भाविकांचीही आदराची भावना या प्रार्थनास्थळांबाबत आहे. भाविकांच्या दृष्टीने श्रध्देचा असणारा हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहण्याऐवजी यावर विचार विनिमयातून तोडगा निघू शकतो, असा आशावाद यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी सर्वपक्षीय घटकही एकत्रित येण्यास तयार असून, पुढील महिन्यात या विषयाचा तिढा सोडविण्यासाठी महत्वाची बैठक नाशिकमध्ये पार पडणार असल्याचेही ते म्हणाले. या बैठकीसाठी रामजन्मभूमी-बाबरी मशिद खटल्यातील मुख्य पक्षकार महंमद हाशीम अन्सारी हे देखील उपस्थित राहणार असल्याचे महंत ग्यानदास यांनी सांगितले.

महंत ग्यानदास-अन्सारी मतैक्याचे संदर्भ

अयोध्येतील वादग्रस्त प्रार्थनास्थळांच्या प्रश्नी न्यायालयाबाहेर हा प्रश्न सोडविण्याच्या मुद्द्यावर काही महिन्यांपूर्वी महंत ग्यानदास आणि या खटल्यातील प्रमुख पक्षकार महंमद हाशीम अन्सारी यांच्यात मतैक्य झाले होते. यावेळी प्रतिवादींचा न्यायालयीन लढाईतून माघार घेण्यास नकार होता. आता मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर नेमण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत महंत ग्यानदास आणि महंमद हाशीम अन्सारी या दोहोंचाही सहभाग असणार आहे. यांसह सर्वपक्षीय प्रतिनिधीही या समितीच्या बैठकीत सहभाग घेऊन चर्चा करणार असल्याने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर समन्वयवादी तोडगा निघणार का, असा सवाल भाविकांच्या मनात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद

$
0
0

महंत ग्यानदास यांचा अध्यक्षपदावर दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पद हमसे है, हम पद से नही !' असे ठणकावून सांगत सन २०१३ मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्षपद माझ्याचकडे आहे, असा दावा महंत ग्यानदास यांनी केला. तोंडावर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील वास्तव्याकरिता त्यांचे बुधवारी शहरात आगमन झाले. यावेळी आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदासह कुंभाशी निगडीत विविध मुद्द्यांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा वादही आता चांगलाच पेटला आहे. या परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे असल्याचा दावा त्र्यंबकेश्वरचे महंत सागरानंद सरस्वती यांनी केला आहे. यामुळे नेमके अध्यक्षपद कुणाकडे या प्रश्नावर बोलताना महंत ग्यानदास म्हणाले, 'आजवर कित्येक अध्यक्ष आले अन् गेले. पदापेक्षा व्यक्तिचे कार्य महत्वाचे मानायला हवे. कार्य असेल तर पद चालत येते. हेच गतवर्षी हायकोर्टात आदेशाने माझ्या अध्यक्षपदाच्या बाबतीत सिध्द झाले आहे. नव्याने निवडणूक होईपर्यंत माझे पद कायम आहे,' असाही दावा यावेळी त्यांनी केला.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध संत महंतांकडून आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावे सुरू आहेत. या प्रकारामुळे कोर्टाचा अवमान होत असल्याने या दावेबाजांना आम्ही वकिलांच्या माध्यमातून कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटीस पाठविल्या आहेत. सद्यस्थितीत तरी मला या विषयी यापेक्षा अधिक बोलायचे नाही, कोर्टातला मुद्दा कोर्टातच मांडेल अशीही भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

गटारी आवरा ..!

कुंभाच्या तोंडावर गोदेला जास्त क्षमतेचे पाणी सोडून पदीचे प्रदूषण दूर करू पाहणाऱ्या जिल्हा प्रशासनाला महंत ग्यानदास यांनी नाशिक पदार्पणाच्या पहिल्याच दिवशी टोला हाणला आहे. 'नदीचे प्रदूषण दूर करण्याचा हा तोडगा नव्हे, त्यासाठी शहरात जागोजागी नदीला जोडलेली बहुसंख्य गटारे आवरा तरच नदी प्रदूषण आटोक्यात येईल असे ते म्हणाले.

अपेक्षित कामे झालीच नाहीत

कुंभमेळ्याची कामे आटोक्यात असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरीही अपेक्षित कामे अद्याप झालेलीच नाहीत. मंदिर अन् मठांची अवस्थाही 'जैसे थे' च आहे, असे सांगत महंत ग्यानदास यांनी खेद व्यक्त केला. मागच्या वेळी आलो तेव्हा प्रशासनाला याबाबत विनंती करून गेलो. आता आलोय तर या सर्व कामांचा पाठपुरावा करण्यासाठी ठिय्याच देणार असल्याचीही भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैष्णव आखाडे करणार कुशावर्तात स्नान

$
0
0

अडीचशे वर्षांनंतर परंपरा होणार पुनरुज्जीवित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाहीस्नानाच्या मानाहून दोन पंथियांमध्ये झालेल्या ऐतिहासिक युध्दानंतर सुमारे अडीचशे वर्षांनंतर पहिल्यांदाच वैष्णव पंथीय आखाडे कुशावर्तातही शाहीस्नानाची पर्वणी साधणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी कुशावर्तातील शाहीस्नानाची पर्वणी साधत खंडित झालेली परंपरा यंदापासून पुनरुज्जीवित करीत असल्याची घोषणा महंत ग्यानदास यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

साधू समूहाच्या दोन पंथियांमध्ये सतराव्या शतकात वाद होऊन युध्द झाल्याची नोंद इतिहासात आहे. यातून झालेल्या हानीचा प्रकार पुन्हा उद्भवू नये यासाठी तत्कालीन राज्यकर्ते पेशव्यांनी मध्यस्थी करीत दोन्हीही पंथांना शाहीस्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून दिल्या होत्या. दोन्हीही पंथांनी हा निर्णय स्वीकारल्यानंतर सन १७५८ पासून वैष्णव पंथीय आखाडे त्र्यंबकेश्वरी कुशावर्तावर शाहीस्नानासाठी जात नसत. या गोष्टीला आता अडीचशे वर्षांचा कालखंड उलटला असून, पंचांग आणि प्रशासन यांच्या सहाय्याने पर्वणीच्या स्वतंत्र व राखीव तारखाही मिळाल्या आहेत. कुठेतरी खंडित झालेली प्रथा पुनरुज्जीवित करून श्रध्दा जपण्यास काय हरकत आहे, या भूमिकेतून आम्ही २५ सप्टेंबर २०१५ या प्रशासनाने आमच्यासाठी दिलेल्या आरक्षित दिवशी शाहीस्नानाची पर्वणी साधू, अशी भूमिकाही यावेळी महंत ग्यानदास यांनी मांडली. साधूंचा वाद सोडवून त्याबाबतच्या पेशव्यांच्या निर्णयाबाबतचे ताम्रपत्रही यावेळी महंतांनी दाखविले.

का झाली परंपरा खंडित ?

साधू समूहामध्ये वैष्णव आणि शैव पंथियांमध्ये शाहीस्नानाच्या मानाहून सन १७४६ मध्ये वाद झाले. त्यावेळी त्र्यंबक रस्त्यावरील बेजे गावानजीक कावनई आणि चक्रतीर्थ येथेही सिंहस्थाची पर्वणी होत असल्याचे काही संदर्भ आहेत. या ठिकाणी साधूंच्या वादातून मोठ्या प्रमाणावर हानी झाल्यानंतर हा तंटा पेशव्यांच्या दरबारी गेला. यावेळी गादीवर असलेल्या माधवराव पेशव्यांनी यात मध्यस्थी करीत सन १७५८ पासून दोन्ही पंथियांची शाहीस्नानाची स्वतंत्र व्यवस्था केली. तेव्हापासून हे दोन्हीही पंथ नेमून दिलेल्या ठिकाणीच पर्वणी साधत होते. तेव्हापासून कुशावर्तावर दोन्हीही पंथांनी स्नान करण्याची प्रथा खंडित झाली होती. मात्र, आता पर्वणी साधण्यासाठी दोन्हीही पंथांना स्वतंत्र वेळ मिळत असल्याने खंडित परंपरा पुनरुज्जीवित करण्यात गैर काय? असाही सवाल महंत ग्यानदान यांनी यावेळी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या विजेवर रंगली रिसेप्शन पार्टी

$
0
0

बड्या उद्योजकाचा प्रताप; नागरिकांना कारवाईची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रंगीबेरंगी दगडगोट्यांचा व्यवसाय करणाऱ्या शहरातील नामवंत उद्योजकाने मुलाच्या विवाह निमित्ताने आयोजित रिसेप्शन पार्टीसाठी राजरोसपणे विजेची चोरी केल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वीच पाच-सहा कोटी रूपयांची विदेशी गाडी खरेदी केल्याने हाच उद्योजक चर्चेचा विषय ठरला होता, हेही विशेषच.

या उत्तर भारतीय उद्योजकाच्या मुलाच्या विवाहाची रिसेप्शन पार्टी नाशिकरोडला आयोजित करण्यात आली होती. या उद्योजकाच्या मुलाचा गेल्याच महिन्यात राजधानी दिल्लीत शाही विवाह झाला. केंद्र सरकार तसेच उत्तर भारतातील विविध खात्यांचे मंत्री, अभिनेते, उद्योगपती या शाही सोहळ्यासाठी उपस्थित होते. एवढ्या शाही रूबाबात वावरणाऱ्या उद्योजकाने ही चिंधीचोरी का केली, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकमधील नामवंत हॉटेलमध्ये या उद्योजकाने व्हीआयपींसाठी नुकतेच रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. मंगळवारी नाशिकरोडवासीयांसाठीही महापालिकेच्या एका छोट्या बागेत पार्टी आयोजित करण्यात आली. शेजारीच असलेल्या या महाशयाचा बंगला तसेच मंडप, स्टेज, स्वागतकमानी यावर मोठ्या प्रमाणात विद्युतरोषणाई करण्यात आली होती. करमणूक म्हणून संगीतबारीचेही आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मोठे स्क्रीनही लावण्यात आले होते. या सर्वांसाठी लागणारी वीज मात्र महापालिकेचे विद्युत खांब तसेच डीपीवरून चोरण्यात आली.

रिसेप्शन पार्टी ज्या ठिकाणी होती, तेथे जवळच असलेल्या उद्योजकाच्या बंगल्यासमोरील डीपी उघडून त्यात वायर खुपसण्यात आल्या. भीमनगरकडून येणाऱ्या रस्त्यावरील स्वागत कमानी शेजारी एक डीपी तसेच विजेचा खांब आहे. त्यावरुन वीज चोरून हॅलोजन लावण्यात आले. महोदयांच्या घराशेजारील विजेच्या खांबावरूनही वायर ओढण्यात आल्या. तीन-चार ठिकाणांहून अनधिकृतपणे वीज घेण्यात आल्याचे अनेक सजग नागरिकांनी `मटा`ला कळविले.

सारेच नियम धाब्यावर...

सार्वजनिक रस्ता हा खासगी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अडवू नये असे निर्देश हायकोर्टाने काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. मात्र, या कार्यक्रमासाठी रस्त्यावर भोजनाची सोय करण्यात आल्याने तो वाहतुकीस बंद करण्यात आला होता. महापालिकेच्या गार्डनमध्ये कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली की नाही, हाही वादाचाच मुद्दा आहे.

आता लक्ष कारवाईकडे

एरव्ही बील भरण्यास दोन दिवस उशीर झाला तरी वीज कंपनीचे कर्मचारी लोकांच्या घरातील वीज कनेक्शन कापतात. कुणी शेतकरी अनधिकृतपणे वीज घेताना आढळला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला थेट अटक केली जाते. मग आता या उद्योजकावरही अशी कारवाई करण्यास वीज कंपनी धजावेल काय, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे. महत्त्वाचे म्हणजे रिसेप्शन पार्टीच्या स्थळापासून हाकेच्या अंतरावर वीज कंपनीची दोन मोठी कार्यालये आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारणाऱ्या एपीआयला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपघात प्रकरणातील वाहन सोडविण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास अँटी करप्शन विभागाने केलेल्या कारवाईत रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. आनंदा गोरखनाथ वाघ असे त्यांचे नाव आहे.

वडनेरभैरव परिसरात एका वाहन अपघाताच्या केसमधील वाहन सोडण्यासाठी वाघ यांनी वाहनमालकाकडे १० हजारांची लाच मागितली होती. यानुसार पहिल्या टप्प्यात वाहन मालकाने वाघ यांना अडीच हजारांची लाच देऊन वाहन ताब्यात घेतले. मात्र, या वाहनाची कागदपत्रे आणि लायसन उर्वरित रक्कम मिळाल्याशिवाय देण्यास वाघ यांनी नकार दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेत भाजपला दणका

$
0
0

अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दराडे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे कांदे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेचा अध्यक्ष हिरे गटाचा की कोकाटेंचा या चर्चेला पूर्णविराम देत राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या गटाने आ. अपूर्व हिरे आणि माणिकराव कोकाटे या भाजपच्या नेत्यांना बुधवारी जोरदार धक्का दिला. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या खेळीने अध्यक्षपदी नरेंद्र दराडे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास कांदे यांची बिनविरोध निवड झाली.

हिरे आणि कोकाटे यांना विरोध असणाऱ्या संचालकांनी ऐनवेळी मोट बांधल्याने बँकेत तिसराच गट अस्तित्वात आला आहे. ताकद वाढली असतांनाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खेळीने भाजपला बँकेत सत्तेपासून दूर रहावे लागले आहे.

खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असतांनाही भुजबळ फार्मवरून चक्रे फिरल्याने बँकेचे अध्यक्षपद येवल्याला मिळाले आहे. निवडणुकीत हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचे जवळपास नऊ संचालक निवडून आले होते. तर पाच संचालक त्यांना जावून मिळाले होते. त्यामुळे हिरे गटाने १४ संचालक असल्याचा दावा केला होता. सोबतच अध्यक्ष हा भाजपचाच होईल, असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनाच दिले होते. कोकाटे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले होते. मात्र, पाच ते सहा संचालकांनी दोन्ही डगरींवर हात ठेवल्याने अध्यक्ष कोण होईल याचा शेवटपर्यंत थांगपत्ता लागत नव्हता.

याच संचालकांना हाताशी धरून छगन भुजबळ यांनी यशस्वी खेळी करीत नरेंद्र दराडे यांना अध्यक्षपद बहाल केले आहे. हिरेंनी अध्यक्षपदासाठी आ. कदम यांच्या नावाला विरोध केल्याने, हिरे विरोधकांनी एकत्रित येवून आ. कदम यांना उमदेवारीसाठी समर्थन केले. तर आ. अपूर्व हिरेंनीही अर्ज भरला. कोकाटे गटाकडून अध्यक्षपदासाठी कोकाटेंसह हरिश्चंद्र चव्हाण, दिलीप बनकर आणि नरेंद्र दराडे रिंगणात उतरले होते. मात्र, ऐनवेळी दराडेंनी हिरे विरोधकांशी, तर हिरे बंधुसह डॉ. शोभा बच्छाव यांनी कोकाटे गटाशी हातमिळवणी केली. कदम यांनी माघार घेतल्याने भुजबळ समर्थकांचे पारडे जड झाले. त्यामुळे चव्हाण, बनकर, कोकाटे आणि हिरे यांनी अर्ज माघारी घेतल्याने दराडे बिनविरोध निवडून आले. उपाध्यक्षपदासाठी सुहास कांदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.

वंजारी तितुका मेळवावा

जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदे वंजारी समाजाला मिळाली आहेत. नरेंद्र दराडे हे गेल्या वेळेस बँकेचे उपाध्यक्ष होते. यावेळी त्यांनी थेट अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. पहिल्यांदाच संचालक म्हणून निवडून आलेल्या सुहास कांदे यांनीही उपाध्यक्षपदापर्यंत बिनविरोध मजल मारली. नाशिक जिल्ह्यात मराठा समाजापाठोपाठ वंजारी समाजाचे राजकारणात प्राबल्य मानले जाते. त्यामुळे प्रथमच जिल्हा बँकेचे सर्वंकष नेतृत्व करण्याची संधी मराठेतर समाजाला मिळाली आहे. या निवडीनंतर वंजारी समाजातही आनंदाचे वातावरण आहे.

धक्क्यांची परंपरा यंदाही कायम

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील दोन्ही प्रमुख गटाचे नेतृत्व हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे होते. प्रथमच बँकेत भाजपचे सहा उमेदवार निवडून आल्याने बँकेवर पक्षाचीच सत्ता येण्याच्या आशा पल्लवित झाल्या होता. त्यातच राज्यात सत्ता असल्याने अध्यक्ष भाजपचाच होईल, असा दावा हिरे आणि कोकाटे यांच्याकडून केला जात होता. मात्र, ऐनवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संचालकांनी हिरे-कोकाटेंना शह दिल्याने भाजप तोंडावर आपटला आहे. हिरे गटासोबत भारतभ्रमण करून आलेल्या संचालकांनी ऐनवेळी कोलांटउडी घेत हिरेंनाच गट सोडायला भाग पाडले. शेवटच्या क्षणी हिरे बंधुंनी कोकाटे गटाशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला खरा; पण तोपर्यंत वेळ निघून गेल्याने हिरेंसह, चव्हाण, कोकाटे यांना माघार घ्यावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या हेरिटेज आर्ट वॉक

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

नाशिकमधील मंदिरे, वाडा संस्कृती यांची परंपरा शेकडो वर्षांची आहे. या सर्व वास्तूंचा वारसा आजपर्यंत टिकवला गेला. फोटोग्राफी आणि चित्रकलेच्या माध्यमातून हा वारसा जपता यावा यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' व 'रुचिर आर्ट गॅलरी'तर्फे महाराष्ट्र टाइम्सच्या वाचकांसाठी 'हेरिटेज आर्ट वॉक'चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (६ जून) सकाळी साडेसहा वाजता हा उपक्रम होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्ती वर्धापनदिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. गोदाघाट यशवंतराव पटांगण येथून याची सुरुवात होणार आहे. फोटोग्राफर सौरभ कोल्हे आणि चित्रकार अशोक धिवरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे अशांना आपला कॅमेरा किंवा मोबाइल सोबत आणायचा आहे. यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचबरोबर चित्रकलेची आवड असणाऱ्यांनी चित्रकलेचे साहित्य सोबत आणायचे आहे. यावेळी चित्र कसे काढावे याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या उपक्रमातून गोदाघाट परिसर फिरण्याबरोबरच कलाकारांच्या नजरेतून गोदापरिसराचे सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न होणार आहे. सोळा वर्षांपुढील कुणीही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकते. हा उपक्रम सर्वांसाठी मोपत असून सहभाही होऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी साडेसहा वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचायचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठवा तुमचे बेस्ट शॉट

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

'महाराष्ट्र टाइम्स' व 'फोटो सर्कल'तर्फे 'माय बेस्ट शॉट' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १३ व १४ जूनला नाशिक तसेच नाशिकबाहेरील फोटोग्राफर्सनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी असून तुम्ही काढलेला वेगळा फोटो यामध्ये सहभागी करता येणार आहे. तुमच्या कॅमेऱ्यातून टिपलेली छायाचित्रे यामध्ये असणार आहे. यामध्ये तुमच्या कॅमेऱ्यातून टिपलेला हटके फोटो यासाठी पाठवायचा आहे. यामाध्यमातून तुमची कला समोर येणार असून फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांना यामधून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या प्रदर्शनासाठी तुमच्या आठवणीतील फोटो किंवा वेगळ्या थीममधील तसेच संदेश देणारे फोटो पाठवता येऊ शकतात. यामध्ये सहभागी होण्यासाठी fotocirclenashik@gmail.com सोमवार (८ जून) रात्री बारा वाजेपर्यंत या मेल आयडीवर पाठवायचे आहेत. तसेच छायाचित्रासोबत जास्तीत जास्त ५० शब्दात, ते छायाचित्र सर्वोत्तम का? काय विशेष आहे त्याबद्दल? हे मात्र आपणास कळवणे अनिवार्य आहे. सदरच्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी नियम आणि अटी वाचण्यासाठी www.facebook.com/fotocirclenashik या संकेतस्थळावर भेट देऊ शकतात. तर मग सहभागी व्हा आणि तुमची बेस्ट फोटोग्राफी सर्वांना कळू द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पौर्णिमेच्या प्रकाशात सायकलिंगचा आनंद

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

दिवसा तसेच पहाटे सायकल चालवणारे अनेजण भेटतील. पण स्वच्छ चंद्रप्रकाशात रात्रीच्यावेळी सायकलिंगचा आनंद लुटण्याची संधी नुकतीच 'नाशिक सायकलिस्ट' या संघटनेमार्फत नाशिककरांना ‌देण्यात आली.

वटपौर्णिमेनिमित्त नाशिक सायकलिस्टमार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जेहान सर्कल ते गंगावऱ्हे गाव व त्यानंतर गंगापूर डॅमच्या भिंतीवरुन दुगाव फाटा व पुन्हा जेहान सर्कल अशी ही सायकल राईड झाली. जवळपास ३० सायकलिस्टनी यामध्ये सहभाग घेतला होता. या प्रवासादरम्यान भेटणाऱ्या अनेकांनी यामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष विशाल उगले यांनी सांगितले. रात्री सायकलिंग केल्यामुळे सर्वांना झोप व्यवस्थित झाल्याचे जाणवले, असेही उगले म्हणाले. अशा प्रकारच्या सायकलिंगमध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उगले यांनी केले.

याचबरोबर पोलिस उपायुक्त हरिष बैजल यांनीही बुधवारी एबीबी सर्कल ते अंजनेरी अशी चंद्रप्रकाशातील सायकल राईड आयोजित केली होती. एबीबी सर्कलवरुन रात्री ८.३० वाजता निघून नाशिकला परत रात्री १ वाजता आली. हे जवळपास २८ किलोमीटरचे अंतर होते. या राईडमध्ये प्रदीप रणधीर, प्रथमेश गीते, शेखर गवळी, यश पाटील, दिलीप धोंडगे, धनंजय ठाकरे, सुशांत पटेल, देवेंद्र चौधरी, मनीष गुप्ता तसेच अन्य सायकलप्रेमी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीआय मेढे यांची तडकाफडकी बदली

$
0
0

नाशिकः प्रशासकीय कारण पुढे करीत पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलासकुमार मेढे यांची बुधवारी तडकाफडकी बदली केली. वाढलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही बदली प्रक्रिया राबवली गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे. सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सातत्याने गुन्ह्यांची संख्या वाढत गेली. खून, हाणामाऱ्या, चोऱ्या अशा गंभीर गुन्ह्यांची मालिकाच सुरू झाली आहे. अंबड लिंकरोडवरील ४ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा पोलिसांना शोध लागला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मेढे यांची बदली झाली आहे. दरम्यान, पीआय मनोज करंजे यांनी सातपूर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राइम ब्रँचसाठी अतिरिक्त मनुष्यबळ

$
0
0



सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान मिळणार १५० कर्मचारी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान गुन्हेगारांना प्रतिबंध घालण्यासाठी क्राइम ब्रँचमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे. किमान १५० कर्मचाऱ्यांचा यात भरणा करण्यात येणार असून यात शहराबाहेरील पोलिसांचाही समावेश असणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ७० ते ८० लाख भाविक शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. या गर्दीत चोर भामट्यांचाही समावेश असू शकतो. शहर पोलिसांना स्थानिक गुन्हेगारांची माहिती असते. मात्र, बाहेरील पाकीटमार, चोरटे यांचा सहसा संपर्क येत नाही. त्यांना हुडकून काढण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असते. त्यामुळे गर्दीत समाविष्ट झालेल्या चोरट्यांना शोधण्याचे आवाहन क्राइम ब्रँचला पेलावे लागणार आहे. मोठ्या स्वरूपाच्या गर्दीचे नियोजन करणे आणि गुन्ह्यांना पायबंध घालणे असे दुहेरी काम पोलिसांना करावे लागणार आहे. यात गुन्हेगारांना रोखण्याची जबाबदारी क्राइम ब्रँचला पार पाडावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे १५० कर्मचाऱ्यांचा क्राइम ब्रँचमध्ये समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त एन. अंबिका यांनी दिली. सध्या, क्राइम ब्रँचमध्ये ४० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या १५० कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. हे कर्मचारी राज्यातील कोणत्याही भागातील असू शकतात. नियुक्त झालेले कर्मचारी सुमारे दोन महिने शहरात राहतील, असे अंबिका यांनी स्पष्ट केले.

'स्पॉटर'चाही मदतीचा हात

दरम्यान, कुंभमेळ्यासाठी परराज्यातील 'स्पॉटर' देखील येणार असून हे पोलिस कर्मचारी त्यांच्या-त्यांच्या राज्यातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासह स्थानिक पोलिसांना गुन्हे रोखण्यासाठी मदत करतील. यामुळेही सिंहस्थ काळात शहरामध्ये उद्भवू शकणाऱ्या गुन्हे आणि चोरीच्या घटनांना पायबंद घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिक वीज कंपन्यांना मनसेचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेतर्फे गुरुवारी वीज कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकरोड येथील विद्युत भवनासमोर द्वारसभा घेऊन आंदोलन करण्यात आले.

संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत शेंडे, राज्य सचिव भाऊसाहेब गांगुर्डे, परिमंडल अध्यक्ष भावेश मैद, सचिव रिनेश पिल्ले, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून वीज कंपनीच्या अन्यायकारक धोरणांचा निषेध करण्यात आला. प्रादेशिक वीज कंपनी करण्याचा निर्णय रद्द करावा, कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीत अचानक बदल करू नये, वेतनवाढ करारावेळी केलेली मेडिक्लेम योजना चालू ठेवावी, एक तृतीयांश उपदान रक्कम निवृत्ती आधी द्यावी, वीज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आपल्याकडेच ठेवावा, फीडर फ्रँचाईजीचा निर्णय रद्द करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रशांत शेंडे म्हणाले, की वीज मंडळाचे विभाजन करताना यापुढे खासगीकरण अथवा पुन्हा विभाजन कले जाणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने कामगारांना दिले होते.

प्रशासनाने दिलेला शब्द पाळून प्रादेशिक वीज कंपन्या तयार करू नयेत. वीज कामगारांविरोधात चुकीचा व अन्यायकारक निर्णय घेण्यात आला तर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल. गिरीश जगताप, महेश कवडे, दत्ता पारस, अविनाश जावरे, विलास वर्पे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कहाँ है रामसृष्टी?’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास यांनी गुरूवारी सायंकाळी रामकुंड ते तपोवन या परिसरात सिंहस्थ कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी साधूग्राम परिसरातील रामसृष्टी प्रकल्पाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रामसृष्टीच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोपही महंत ग्यानदास यांनी केला आहे.

गेल्या कुंभमेळ्यात रामसृष्टीच्या जागी साधूग्राम साकारण्यात आले होते. मात्र, महापालिकेत युतीची सत्ता येताच या जागेवर रामसृष्टी प्रकल्प साकरण्यात आला होता. त्यामुळे आता साधूग्रामसाठी जागा अत्यल्प झाल्याबाबत ग्यानदास यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सद्यस्थितीत असलेल्या रामसृष्टी प्रकल्पाच्या कामाबाबतही त्यांनी असंतोष व्यक्त केला. महंत ग्यानदास यांचे बुधवारी शहरात आगमन होताच त्यांनी सिंहस्थ कामांच्या पाहणीची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, पाहणीनंतर संथगतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मठ आणि मंदिरांच्या पुनरुज्जीवनाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

SMSद्वारे मतदानला तीव्र विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजमधील विद्यार्थी संसद निवडणुका एसएमएसच्या माध्यमातून होऊ नये, या पद्धतीने निवडणूका पार पडल्यास जाहीर निषेध केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने कॉलेजमधील विद्यार्थी संसद निवडणुका या लिंगडोह कमिटीच्या शिफारसीनुसार खुल्या वातावरणात घेण्यात याव्यात, असा अध्यादेश २०१४ मध्ये जाहीर केला होता. या अध्यादेशाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली असून यामुळे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या कॉलेजमधील निवडणुका खुल्या वातावरणात घेण्यात येणार आहेत. ही निवड एसएमएसच्या माध्यमातून होणार असल्याचे नुकतेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितल्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे शहराध्यक्ष चिन्मय गाढे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images