Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘फुले विद्यापीठावर भगवा फडकवा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

मुंबई विद्यापीठाप्रमाणेच पुणे विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक शिवसेना व युवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठावरही युवासेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांनी केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१५ च्या सिनेट निवडणुकांच्या संदर्भातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांच्या शिवसेना व युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शालीमार येथ‌ील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. मुंबई विद्यापीठाप्रमाणेच पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी शिवसेना व युवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार आहे.

या निवडणुकीसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे, मतदान केंद्रांची माहिती, ऑनलाइन मतदार नोंदणी प्रक्रिया या संदर्भातील माहिती युवसेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांनी पदाधिका‍ऱ्यांना दिली. सिनेट मतदार नोंदणी करतांना नाशिक शिवसेना महानगर व युवसेनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील पदवीधरांची नोंदणी करून विभाग निहाय नोंदणी प्रमुखांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे, युवसेना संपर्क प्रमुख शशिकांत झोरे, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, जयंत दिंडे, कारभारी आहेर, युवसेना कोषाध्यक्ष अमेय घोले, पवन जाधव यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक व युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नफा फक्त ५५ लाखांचाच!

$
0
0

प्रशासकांच्या कारभारावर संचालकांकडून प्रश्नचिन्ह; माहिती जमविण्यास सुरुवात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेतील विविध भ्रष्टाचारामुळे चौकशांच्या सामना कराव्या लागणाऱ्या संचालकांनी सत्तेवर येताच प्रशासक मंडळाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. बँकेला ६० कोटी नव्हे तर ५५ लाखांचाच नफा झाला असून प्रशासकांची आकडेवारी चुकीची असल्याचा दावा संचालक व माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केला आहे. तर, प्रशासक मंडळातील कारभाराची सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे बँकेत प्रशासक मंडळ विरूद्ध संचालक यांच्यात वाद उदभवण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक पिककर्ज उपलब्ध करून देणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दोन वर्षांपासून भ्रष्टाचारामुळे गाजली. या भ्रष्ट कारभारामुळेच बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होवून मे २०१३ मध्ये प्रशासक मंडळाची नियुक्ती केली गेली. तत्कालीन अध्यक्ष परवेझ कोकणी, शिरीष कोतवाल यांच्यासह ६ संचालकांमागे चौकशीचा ससेमिराही सुरू झाला. तत्कालीन संचालक माणिकराव कोकाटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहविला होता. चौकशीमध्ये तत्कालीन संचालक मंडळातील अनेकांवर ठपला ठेवण्यात आला. मात्र, तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सत्तेतून पायउतार होण्यापूर्वी या सर्वांनाच आर्थिक प्रेमापोटी क्लिनचीटही दिली. दोन वर्षात संचालक मंडळाने कारभार करून ८५ कोटीचा संचित तोटा भरून काढत बँक ६० कोटीच्या नफ्यात आणली.

जिल्हा बँकेची निवडणूक सुरू असतांनाच प्रशासक मंडळाने नफा झाल्याच्या बातम्या दिल्याने अनेक संचालकांची गोची झाली. प्रशासक मंडळाचा हाच दावा आता संचालकांनी संशयाच्या भोवऱ्यात अडकवला आहे. बँकेत आता सत्तेमध्ये सहभागी झालेल्या काही संचालकांनी प्रशासक मंडळाचा हा दावा खोडायला सुरुवात केली आहे. तर प्रशासक मंडळानी केलेल्या कामकाजा बाबत माहिती सादर करण्याचे फर्मान सीईओंना सोडले आहेत. संचालक शिरीष कोतवाल यांनी प्रशासक मंडळाने दाखवलेला नफा हा चुकीचा असून बँकेला ६० नव्हे तर ५५ लाखाचाच नफा झाल्याचा दावा केला आहे. संचालक मंडळाने शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा घटवला असून केलेले दावेही चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तर अध्यक्ष दराडे यांनी तीन वर्षातील ताळेबंदच सादर करण्याचे आदेश सीईओंना दिले आहेत. प्रशासक मंडळाच्या काळात झालेल्या बदल्यांचा आढावा घेण्यात नवीन बदल्यांना स्थगिती दिली आहे. दराडे यांनी गुरुवारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेवून कामकाजाच्या सूचना दिल्यात. सोबतच प्रशासक मंडळात झालेल्या चुकीच्या गोष्टींचीही माहिती सादर करा असे सांगितल्याने आता प्रशासक मंडळ आणि संचालक यांच्यात वाद उदभवण्याची शक्यता आहे.

दबावाचे राजकारण

प्रशासक मंडळाच्या कारभारावर आक्षेप घेवून दबावाचे राजकारण केले जात असल्याची चर्चा बँकेत रंगली आहे. गत भ्रष्टाचारात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले अनेक संचालक पुन्हा सत्ताधारी गटाला मिळाले आहेत. या संचालकांनीच हिरे किंवा कोकाटे यांना अध्यक्षपदापासून रोखले आहे. मर्जीचा अध्यक्ष बसविण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे चौकशी पुन्हा सुरू होण्यापूर्वीच दबाव टाकण्याचे राजकारण सुरू झाले आहे. तर प्रशासक मंडळाकडील पुरावे बाहेर जावू नये अशी तरतूद केली जात आहे.

१३ जूनला पहिली बैठक

नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली बैठक शनिवारी (दि. १३) जूनला होणार आहे. बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी बैठकी संदर्भातील माहिती दिली असून या बैठकित प्रशासक मंडळाच्या काळातील ताळेबंद सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सोबतच पिककर्जाच्या आढाव्यासह कर्जवसुली, एनपीए आणि नवीन सभासदांना पतपुरवठा करण्यावर चर्चा केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाट क्षेत्र अनधिकृतच

$
0
0

शेंडेच्या भूमिकेवर सहसंचालक आकाश बागूल ठाम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इमारतींमधील अनधिकृत कपाटांसह बेकायदेशीर कामास विरोध केल्यामुळे बदलीला झालेल्या महापालिकेच्या नगररचना सहसंचालक विजय शेंडेच्या भूमिकेला नवनियुक्त सहसंचालक आकाश बागूल यांनी पाठिंबा दर्शविला आहे. इमारतीतील कपाट क्षेत्र अनधिकृत असून या नियमाला आपणही बांधील आहोत. तसेच या संदर्भातील निर्णय शासनस्तरावरच होईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे शेंडेच्या बदलीसाठी लॉबी करणाऱ्या लोकप्रतिनिधींसह बिल्डरांना झटकाच बसला आहे.

इमारतींमधील लेआऊटपेक्षा जास्त बांधकाम आणि फ्लॅटमधील अधिकृत कपाटांमुळे जानेवारीपासून इमारत पूर्णत्वाचा दाखला देण्यास विजय शेंडे यांनी थांबविले होते. त्यामुळे शहरातील शेकडो इमारतींमधील रहिवाशांसह बिल्डरांना मोठा झटका बसला आहे. नियमात बसत नसतांनाही बिल्डरांनी बांधकाम केल्याने शेंडेनी कायद्यावर बोट ठेवत परवानग्या थांबविल्या होत्या. त्यामुळे बिल्डर लॉबीने थेट त्यांची बदलीच करून आणली. शेंडे यांच्या जागेवर आलेल्या आकाश बागूल यांनीही कपाट धोरणाबाबतची शेंडे यांची भूमिका योग्य असून नियमाच्या बाहेर आपण काम करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज’प्रश्नी १० जूनला सुनावणी

$
0
0

नाशिक : वेतन कराराहून क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीमध्ये पेटलेल्या संपप्रश्नी केवळ चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता अद्यापही दृष्टीपथात नाही. अंबड पोलिसांच्या पाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनीही याप्रश्नी चर्चेतून समन्वय साधण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यग्रतेमुळे ही बैठक नियोजित वेळी होऊ शकली नाही. चर्चेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असताना याप्रश्नी कामगार न्यायालयात १० जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे आता उद्योग वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तीन आठवड्यांपेक्षाही अधिक काळापासून या कंपनीत कामगारांनी संप छेडला आहे. बहुसंख्य कामगार पाठीशी असलेल्या सीटू प्रणित युनियनला टाळून कंपनीने वेतनवाढीचा करार करू नये अशी संपकर्त्यांची मागणी आहे. तर न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मान्यता प्राप्त युनियनच्या पलिकडे न जाण्याची कंपनीची भूमिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिशन अॅडमिशनसाठी धावाधाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेच्या मार्क्सशीटचे वितरण गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता संबंधित कॉलेजेसमध्ये करण्यात आले. शहरातील सर्व ज्युनिअर कॉलेजेसमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी दिसून आली. करीअरचा महत्त्वाच्या टप्पा पार केल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान व पुढील अॅडमिशनसाठी उत्सुकता असल्याचे चित्र कॉलेजेसमध्ये दिसून आले.

परीक्षांचा ऑनलाइन निकाल बुधवारी (२७ मे) जाहीर करण्यात आला होता. बारावीचे मार्क्स जरी विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पद्धतीमुळे समजले असले तरी अॅडमिशन प्रक्रिया ही मार्कशीटची मूळ प्रत हातात मिळाल्यानंतरच सुरु होणार असे सर्वच कॉलेजेसनी विद्यार्थ्यांना कळवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही या मार्क्सशीटची ओढ होती. गुरुवारी हे निकाल सर्वांच्याच हातात आल्याने कॉलेजेसमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. काही विद्यार्थी पुढील प्रवेशाची चौकशी करत होते तर काही विद्यार्थी कमी मार्क्स मिळाल्याने गुणपडताळणी व रिचेकिंगचे अर्ज भरण्यात व्यग्र होते. त्यामुळे सर्व ज्युनिअर कॉलेजेस गजबजले होते. मार्क्सशीटच्या वाटपानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजेसमध्ये गौरविण्यात आले. त्यांना उत्कृष्ट विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र देऊन संबंधित कॉलेजेसच्या प्राचार्यांनी करीअरच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

गुणपडताळणीसाठी अर्ज

ऑनलाइन निकालामुळेच मार्क्स जरी विद्यार्थ्यांना मार्क्सशीट्स मिळण्यापूर्वीच समजले असले तरी ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत, त्यांना गुणपडताळणीसाठी मूळ मार्क्सशीट मिळाल्यानंतरच अर्ज करता येणार आहे असे विभागीय मंडळाच्या वतीने जाहिर करण्यात आले होते. त्यामुळे निकालाची प्रत मिळाल्यानंतर विभागीय मंडळाकडे अर्ज करण्याकडे विद्यार्थ्यांची धाव दिसून आली. १५ जूनपर्यंत हे अर्ज करता येणार असून निकालाची प्रत त्यास जोडणे अनिवार्य आहे. इंटरनेटवरील मार्क्सशीटची प्रत अर्जाला जोडल्यास तो अर्ज बाद केला जाईल, असे विभागीय मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अॅडमिशन प्रक्रिया सुरू

आजपासून सर्व कॉलेजेसमध्ये पुढील शिक्षणक्रमांसाठी अॅडमिशन प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने कॉलेज प्रशासन सज्ज झाले आहे. मार्कशीट मिळाल्याने सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष आता पुढच्या अॅडमिशन घेण्याकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गावठी कट्टे जप्त

$
0
0

तिघा परप्रांतीयांना अटक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन गावठी कट्टे व चार काडतूस विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघा परप्रांतीय तरूणांना क्राईम ब्रँचच्या युनिट तीनने बुधवारी अटक केली. कोर्टाने त्यांना सहा जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, १५ दिवसांत बंदूका जप्त करण्याची ही दुसरी घटना समोर आली आहे.

वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केल्याचा दावा केला जातो आहे. दोन दिवसांपूर्वी देवळाली कॅम्प परिसरात विविध आकाराचे व गुन्ह्यांसाठी उपयोगी पडणारे चाकू विक्री करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर, एकाच दिवसाने क्राईम ब्रँचच्या युनिट तीनच्या कर्मचाऱ्यांनी पाथर्डी फाटा परिसरात गावठी कट्टे विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक केली. निरज किशोर प्रसाद, छेडी प्रसाद सिंग आणि पुष्कर मनोजकुमार सिंग असे संशयितांची नावे आहेत. पुष्कर सिंग एमआयडीसी परिसरात फॅब्र‌िकेशनचे काम करतो. तर, उर्वरीत दोघे मजुरीचे काम करतात. मुळ बिहार राज्यातील असलेले संशयित मागील पाच ते सहा वर्षांपासून पाथर्डी फाटा परिसरात वास्तव्यास आहेत.

पाथर्डी फाटा परिसरातील काही परप्रांतीय तरूण बेकायदा बंदूक विक्री करीत असल्याची माहिती हवालदार शेख जाकीर हुसेन यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी बातमीची खातरजमा करून संशयिताकडे बनावट ग्राहक पाठवला. ग्राहकांशी सौदा पक्का केल्यानंतर बंदुकांची डिलेव्हरी करण्यासाठी सिडको परिसरातील शिवाजी स्टेड‌ियमची जागा निश्चित झाली. त्यानुसार, सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. गोंधे, जी. डी. देवडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सुभाष गुंजाळ, हवालदार जाकीर शेख, गंगाधर केदार, इरफान शेख, शांताराम महाले, मोहन देशमुख, शंकर गडदे यांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपासासाठी ६ जूनपर्यंत कोर्टाने संशयितांना पोलिस कोठडी सुनावली. बिहार राज्यात अगदी स्वस्तात व सहजतेने गावठी कट्टे मिळतात. तुलनेत नाशिकसह इतर शहरात त्यांना चांगला भाव मिळतो. चार पैसे मिळतील, या उद्देशाने संशयितांनी बंदुका आणल्या होत्या, असे प्राथमिक चौकशीत निष्पण झाल्याची माहिती पीआय सानप यांनी दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंचवटी परिसरातून दोघांना विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी क्राईम ब्रँचने अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूवार ठरतोय ‘स्नॅचिंग डे’

$
0
0

शहरातील १०५ पैकी २४ घटना गुरूवारच्या; सायंकाळची ४ ते ८ ची वेळ सर्वाधिक धोकादायक

अरविंद जाधव, नाशिक

शहरातील विविध भागात दुचाकीवरून येणारे चेन स्नॅचर्स धुमाकूळ घालत आहेत. गळ्यातील चेन तोडण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, स्नॅचर्ससाठी गुरूवार सर्वांत 'लकी' ठरल्याचे दिसते. २०१४- मे २०१५ या कालावधीत स्नॅचिंगच्या १०५ घटना घडल्यात. त्यातील सर्वाधिक म्हणजे २४ घटना

गुरूवारच्या दिवशी घडल्या असून, यामागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.

भरधाव वेगात येऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडून नेण्याच्या घटना नवीन राहिलेल्या नाहीत. चोर पोलिसांचा पाठलाग सातत्याने सुरू असला तरी चोरटे पोलिसांच्या एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येते. कारण, आतापर्यंतच्या १०५ घटनांपैकी फक्त ३१ गुन्हे उघडकीस आले आहेत. अनेकदा चोरटे पोलिसांनी लावलेल्या बंदोबस्ताप्रमाणे आपली कार्यपध्दत बदलतात. स्नॅचिंगच्या घटना ठराविक वेळेत आणि ठराविक ठिकाणी होतीलच असे नाही. मात्र, तरीही आतापर्यंतच्या एकूण घटनांपैकी स्नॅचिंगच्या सर्वाधिक घटना गुरूवारीच झाल्याचे दिसून येते. १०५ गुन्ह्यांपैकी चोरट्यांनी गुरूवारच्या दिवशी २४ वेळा मंगळसूत्र तोडून पोबारा केला आहे. आता, चोरटे याच दिवशी सक्रिय का असतात? या विषयी पोलिसांनाही कोडेच आहे.

एक ते दीड वर्षांपूर्वी नाशिकरोड पोलिसांनी दोघा भामट्यांना स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक केली होती. ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या आसपास राहणारे संशयित शिर्डीला देवदर्शनासाठी जात होते. त्यांना शहरात हात साफ करता आला नाही. त्यामुळे शिंदे गावाजवळ रस्ता क्रॉस करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून त्यांनी सिन्नरकडे धाव घेतली.

सुदैवाने या महिलेच्या पतीचे चिंचोली फाटा परिसरात दुकान होते. तिने ही माहिती पतीला दिली. त्यानुसार पतीने चोरट्यांचा सिन्नरपर्यंत पाठलाग केला. पेट्रोल भरण्यासाठी चोरटे थांबले असता तेथील वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली. या संशयितांनी अनेकदा असे प्रकार केल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. आताही अशाच पध्दतीने काम चालते की, चोरट्यांनी वेगळी पध्दत अवलंबली याचा तपास पोलिस करीत आहेत.

गुरूवारपाठोपाठ शुक्रवारी देखील १८ चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. यानंतर शनिवारी १७ व बुधवारी १५ ठिकाणी मंगळसूत्र तोडण्यात आले. रविवारी १३ आणि मंगळवार व सोमवारी अनुक्रमे १० आणि ८ चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याची नोंद आहे.

हायवेलगतचा भाग असुरक्षित

मुंबई-आग्रा हायवे आणि नाशिक पुणे हायवेलगत असलेल्या उपनगर, इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये स्नॅचिंगच्या सर्वाधिक घटना होत आहेत. या तिन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीत १०५ पैकी ५० टक्के म्हणजे ५२ गुन्ह्यांची नोंद गत १७ महिन्यात झाली आहे. उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत २३, इंदिरानगरमध्ये १५ आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये १४ गुन्हे या काळात घडले आहेत. विशेष म्हणजे यातील ८० टक्के गुन्हे हायवे लगतच्या भागात घडले आहेत. स्नॅचिंगच्या घटनेनंतर सहजतेने हायवेपर्यंत पोहचणे आणि त्यानंतर शहरातून बाहेर पडणे, असा उद्देश त्यामागे चोरट्यांचा असावा. सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या दहा गुन्ह्यांचा अपवाद वगळता इतर पोलिस स्टेशनमध्ये स्नॅचिंगच्या गुन्ह्याचे प्रमाण तुलनेत कमीच आहे.

संध्याकाळची वेळ संभाळा

गत वर्षभरातील चेन स्नॅचिंगच्या सर्वाधिक घटना सांयकाळी ४ ते ८ या वेळेत घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे. साधारणतः सायंकाळी ४ ते ८ या कालावधीत रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांना चोरट्यांनी टारगेट केले आहे. या महिला ऑफीससाठी, देवदर्शनासाठी, शॉपींगसाठी, लग्न किंवा इतर कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडल्या होत्या. यानंतर चोरट्यांनी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या काळात २५ महिलांच्या चेन स्नॅच केल्या आहेत. सकाळी ८ ते १२ या वेळेत १७ तर रात्री ८ ते १२ या कालावधीत २१ महिलांना चोरट्यांचा सामना करावा लागला. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडल्याच्या

अनेक केसेस उपनगर तसेच नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

सध्या, रात्री आठ वाजेनंतर स्नॅचर्स सक्रिय होत असल्याचे काही घटनांवरून स्पष्ट होत, असल्याची माहिती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिली. दुपारी ४ ते रात्री आठ वाजेपर्यंतच्या घटना रोखण्यासाठी आम्ही या काळात बंदोबस्त वाढवला. त्यानंतर चोरट्यांनी मोडस ऑपरेंडीमध्ये बदल केला. आता, रात्री आठ वाजेनंतरच्या वेळेत रस्त्यावर फिरणाऱ्या महिलांना चोरटे टारगेट करीत आहे.

हा बदल लक्षात घेत रात्री ८ ते १२ या कालावधीत बंदोबस्तात वाढ केले असल्याचे आयुक्त जगन्नाथन यांनी सांगितले. चेन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यात अनेक नवीन गुन्हेगार सहभागी होत असून त्यांना रोखण्यासाठी योग्य ते नियोजन केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

परजिल्ह्यातील स्नॅचर्सची ठिकाणे

चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात स्थानिक सराईत गुन्हेगारासोबत ठाणे जिल्ह्यातील कल्याण, आंबिवली तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. हे गुन्हेगार गुन्हा करून स्वतःच्या वाहनाने, रेल्वे किंवा बसने परत जातात. स्नॅच‌िंगच नव्हे तर घरफोडी, बॅग लिफ्टिंग अशा गुन्ह्यात देखील यांचा समावेश आहे.

हायवेलगतची स्नॅचिंगची ठिकाणे

भाभानगर, लेखानगर, राजीवनगर, पाथर्डी फाटा, जयभवानी रोड, उपनगर, शिक्रेवाडी, बोधलेनगर, शिवाजीनगर, डिजीपीनगर, काठेगल्ली, पौर्णिमा बस, गंगापूररोड, जुना हायवे लगतच परिसर, मुंबई आग्रा हायवेवर द्वारकापासून आडगावपर्यंतचा लगतच्या भागात स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. या भागात गस्त वाढविण्याची गरज आहे.

चेन स्नॅचिंगसह इतर गंभीर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास झाला असून, नवनवीन गुन्हेगार यातून समोर आले आहेत. चेन स्नॅचिंगचे गुन्हे रोखण्यासाठी चोरट्यांच्या मोडस ऑपरेंडीप्रमाणे पोलिसांनी आपल्या कार्यपध्दतीत बदल केले असून त्याचा सकारत्मक प्रतिसाद लवकरच दिसून येतील. - एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ उचलताहेत प्लास्टिक बाटल्यांचा खच!

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

लग्न, समारंभ किंवा विविध इव्हेंटच्या ठिकाणाहून कचऱ्याच्या डब्यात जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावणे आता शक्य होणार आहे. दिंडोरी येथे असलेल्या पॉलिगेंटा कंपनीकडे या बाटल्या दिल्या तर या बाटल्यांचे रिसायकलिंग करून त्यापासून धागा बनविण्यात येणार आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांची डोकेदुखी दूर होणार आहे.

शहरातील विविध हॉटेल्स, लॉन्स आणि बहुसंख्य ठिकाणी सार्वजनिक उपक्रम, लग्न-समारंभ, सोहळे आणि विविध प्रकारचे इव्हेंट होतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर होतो. मात्र, या सोहळ्यानंतर बाटल्यांची विल्हेवाट कुठे लावावी, असा प्रश्न उपस्थित होतो. साधारणपणे महापालिकेच्या घंटागाडीत या बाटल्या देण्याचे काम केले जाते. मात्र, या बाटल्या खत प्रकल्पाच्या ठिकाणी आणूनही तेथे त्यांचे विघटन केले जात नाही. त्यामुळे या बाटल्या डोकेदुखी ठरतात. पण, आता ही डोकेदुखी दूर होणार आहे.

नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील पॉलिगेंटा टेक्नॉलॉजिज लिमिटेड ही कंपनी प्लास्टिकच्या बाटल्यांचे रिसायकल करुन त्यापासून पॉलिस्टर धागा तयार करण्याचे काम करीत आहे. या कंपनीने मुंबईतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन नंतर ठिकठिकाणी साचलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली आहे. जवळपास ४ अब्ज प्लास्टिकच्या बाटल्या कंपनीने रिसायकल केल्या आहेत. केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मान्यतेने कार्यरत असलेल्या या कंपनीत हजारोच्या संख्येने बाटल्या आणून दिल्यास त्याचे मोफत रिसायकलिंग करण्याचे कंपनीने सांगितले आहे. यामुळे शहरात विविध समारंभांमध्ये तयार होणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे रिसायकलिंग होऊ शकणार आहे.

प्रसंगी परदेशातून आयात

देशाच्या विविध भागातून येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे रिसायकलिंग पॉलिगेंटा कंपनी करते. वर्षाकाठी पाच हजार मेट्रीक टन बाटल्यांचे रिसायकलिंग करण्याची क्षमता कंपनीकडे आहे. मात्र, अनेकदा रिसायकलिंगसाठी कंपनीला परदेशातून प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आयात कराव्या लागतात.

कुठल्याही संस्था, व्यक्ती किंवा महापालिका यांनी हजारोच्या संख्येने आम्हाला प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल आणून दिल्या तर आम्ही त्यावर मोफत रिसायकलिंग करून देऊ. - विश्वास पाटील, हेड, इएचएस विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरस्कारांवर नाशिकची छाप

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या यावर्षीच्या पुरस्कारात नाशिककर रंगकर्मींनी बाजी मारली आहे. प्रायोगिक गटात नाटकासह लेखन, दिग्दर्शन, अभिनयासह तब्बल सात विविध पुरस्कार नाशिककरांच्या वाट्याला आले आहेत. या पुरस्कारांची घोषणा नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर व ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रभरातून एकूण ३८ रंगकर्मींचा नाट्यपरिषदेच्या पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. त्यात नाशिकचे सहा रंगकर्मी असून, राज्य नाट्य स्पर्धेत बाजी मारलेले 'न ही वैरेन वैरीणी' या नाटकाला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या नाटकाचे दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी व अभिनेते हेमंत देशपांडे यांनाही दिग्दर्शन व अभिनयासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली काही वर्षे सातत्याने प्रायोगिक नाट्यलेखनात महाराष्ट्रभर आपली वेगळी छाप सोडणारे नाशिकचे नाट्यलेखक दत्ता पाटील यांना सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक एकांकिकांसह बगळ्या बगळ्या कवडी दे, रिमझीम रिमझीम, कृष्णविवर ही त्यांची अलीकडची नाटकं रंगभूमीवर विशेष नावाजली गेली आहेत. याशिवाय लोककलेलाही गौरवताना हा पुरस्कारही नाशिकच्या पदरात टाकत लोककलावंत पुरस्कारासाठी शाहीर दत्ता शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.रंगभूषेची समृद्ध परंपरा चालवणाऱ्या नाशिकला या क्षेत्रासाठीही पुरस्कार मिळाला आहे. रंगभूषाकार रवींद्र जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पडद्याच्या मागे राबणाऱ्या कष्टाळू रंगकर्मींनाही नाट्यपरिषद गौरवत असते. या वर्षीचा गुणवंत रंगमंच कामगाराचा पुरस्कार नाशिकच्या महाकवी कालिदासमध्ये गेली अनेक वर्षे राबणारे रंगकर्मी वसंत दौंड यांना जाहीर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक नरमला, दंड भरला !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलाच्या विवाह निमित्ताने आयोजित रिसेप्शन पार्टीसाठी राजरोसपणे विजेची चोरी करणाऱ्या शहरातील बड्या उद्योजकावर वीज कंपनीने अखेर कारवाईचा बडगा उचलला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी `मटा`च्या वृत्ताची दखल घेत गुरुवारी सकाळी या उद्योजकाच्या घरावर धडक मारली. सुरुवातीला वीजचोरी केली नसल्याचा कांगावा करणाऱ्या उद्योजकाने नंतर मात्र निमूटपणे १६ हजार रुपयांचा दंड भरला. रंगीबेरंगी दगडगोट्यांचा व्यवसाय करणाऱ्या या उद्योजकाने डीपी तसेच स्ट्रीट पोलमधून

रिसेप्शनसाठी वीज चोरली होती. याबाबत मटाने वृत्त प्रकाशित केले. या उद्योजकाने 'मी असे केलेच नाही' असे सांगून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी आपल्याकडे पुरावा असल्याचे सांगत वीजचोरीचे फोटोच त्याला दाखवले. दंड भरला नाहीतर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा वीज कंपनीने घेतल्यानंतर मात्र त्याची बोबडी वळली. वापरलेल्या विजेचे पैसे व दंडाची रक्कम असे एकूण १६ हजार रुपये त्याने निमूटपणे काढून दिले.

रिसेप्शन पार्टी ज्या ठिकाणी होती, तेथे जवळच असलेल्या उद्योजकाच्या बंगल्यासमोरील डीपी उघडून त्यात वायर खुपसून वीजचोरी करण्यात आली होती. महोदयांच्या घराशेजारील विजेच्या खांबावरूनही वायर ओढण्यात आल्या. तीन-चार ठिकाणांहून अनधिकृतपणे वीज घेण्यात आल्याचे अनेक सजग नागरिकांनी `मटा`ला कळविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानात घट; मशागतीला वेग

$
0
0

बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; खरिपाच्या तयारीने घेतला वेग

टीम मटा

नाशिक शहरासह जिल्ह्याचा सरासरी तापमानात घट झाली आहे. जिल्ह्यातील बळीराजाला मान्सूनचे वेध लागले असून, त्याने शेतीच्या मशागतीवर जोर दिला आहे. जिल्ह्याचा पारा सरासरी दोन ते तीन अंशाने कमी झाल्याने नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मि‍ळाला आहे.

मान्सूनपूर्व पावसाच्या ढगांनी आकाशात गर्दी करायला सुरवात केल्याने यंदा सरासरीपेक्षा कमी खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा बळीराजा बाळगून आहे. सायंकाळी आकाशात जमा होणारे ढग पाहून शेतकरीराजा काहीसा सुखावला आहे. मालेगाव शहर आणि तालुक्यात यावर्षी उन्हाळ्यात मे महिन्यात सूर्याने चांगलाच ताप घेतल्याने उच्चांकी तापमान ४४ अंश से. इतके नोंदवले गेले होते. मे महिन्याच्या अखेच्या आठवड्यात तर या उष्ण वातावरणाने सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. मात्र आता मान्सूनच्या आगमनाचे अंदाज येत असून साधारणतः १५ जून च्या आसपास पावसाचे आगमन होईल असा अंदाज व्यक्त होत आहे . त्यामुळे वातावरणात देखील मान्सूनपूर्व पावसाचे संकेत मिळत आहे.

खरिपाची तयारी

जिल्ह्यातील शेतकरी वर्षभर दुष्काळ, गारपीट व अवकळीमुळे यंदा होरपळला गेला होता. मात्र, आता यंदाच्या खरीप हंगामात तरी चांगला पाऊस होईल या आशेवर खरिपाच्या तयारीला लागला आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शेतकऱ्याला उसंत नाही. नांगरणी, वखरणी जमीन सपाटीकरणाची कामे शेतकरी करीत आहे. सकाळच्या प्रहरात अधिक काम होते. तर दुपारी विश्रांतीनंतर उशिराने बैल अवजरांना जुंपले जात आहेत. काही जणांना शेतजमिनींचे लेव्हलिंगही हाती घेतले आहे. पावसाची चाहूल लागल्याने या कामांचा वेग वाढविला जात आहे.

ज्यांच्याकडे बैल जोडी अवजारांची वानवा आहे, तेथे ट्रॅक्टर व इतर यांत्रिक अवजारांनी जमिनीची मशागत केली जात आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या नियोजनाला फटका देणाऱ्या पर्जन्याला सामोर जाताना शेतकरी यावर्षी अधिक सावध झाला आहे. त्यामुळे पारंपरिक कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत असून, मका लागवड घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी

$
0
0

नाशिक : जून महिन्याला प्रारंभ झाल्याने मान्सूनचे वेध लागले असतानाच जिल्ह्याच्या काही भागात मान्सून पूर्व सरींनी हजेरी लावली. मालेगाव, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. दुपारी कडक उन्हाचा तडाखा असतानाच सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली. शहरासह जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन शॉपिंग करा जपून

$
0
0

अजित कुर्लेकर, नाशिक

ऑनलाइन शॉपिंगमधला हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. या घटनेने मला जो धडा दिला त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. नुकताच हा किस्सा माझ्यासोबत घडला. ४ मार्च २०१५ ला आपल्या आजीचा वाढदिवसाला माझ्या मुलीने पुण्याहून आजीसाठी काही वस्तू मागवल्या. यामध्ये वाढदिवसाचा केक, फुलांचा बुके आणि चिनी मातीचा मग अशा काही वस्तू खरेदी केल्या.

तशी ही ऑनलाइन गिफ्ट कंपनी खूप नामांकित आहे असं नाही. मात्र या कलकत्तास्थित कंपनीतून आम्ही खरेदी केली होती. आम्ही दिलेल्या ऑर्डरपैकी त्यांनी फुलांचा बुके आणि केक या दोनच गोष्टी घरापर्यंत पोहोचवल्या आणि चिनी मातीचा मग ट्रान्सपोर्टमध्ये फुटल्याचे सांगितले.

यावर तक्रार केली असता त्यांनी आम्ही हा मग पुन्हा बदलून पाठवू असे कळवले. मात्र आता या घटनेला जवळपास तीन महिने होत आहेत. पण अजूनही रिफंड किंवा ती वस्तू हातात मिळाली नाही. याविषयी आम्ही असंख्य वेळा रिमाईंडर पाठवले. पण तरीही त्यावर काहीच अक्शन घेतली गेली नाही. त्यामुळे आम्ही या कंपनीबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. जास्त माहिती काढल्यावर लक्षात आले की अशीच फसवणूक असंख्य ग्राहकांची झालेली आहे. याविषयी अधिक माहिती कन्झुमर कोर्टाच्या ऑनलाइन चौकशीत मिळाली.

या कंपनीच्या वेबसाईटवर कॉर्पोरेट ऑफिसचा पत्ता नाही. जसे की इतर ऑनलाइन कंपन्या म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील वगैरेचे आहेत. आम्ही ज्या कंपनीतून खरेदी केली ती फ्रॉड असल्याचे नंतर आम्हाला समजले. आमचे झालेले नुकसान भरून निघण्याची शक्यता आता कमी आहे. मात्र त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण ऑनलाइन खरेदी करताना ऑथराइज्ड कंपन्या तसेच त्या कंपनीविषयी पूर्ण माहिती मिळवूनच खरेदी करा अशी माहिती मी इतरांना देऊ इच्छितो. ऑनलाइन शॉपिंगने सर्वांनाच वेड लावले आहे ही वेगळी गोष्ट मात्र त्यातील विश्वासार्हता जपण्यासाठी ग्राहकांनीच जागरुक असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कुठलाही व्यवहार करताना चाचपणी करूनच तो करावा असेही सांगू इच्छितो. मला आलेला अनुभव कुणालाही येऊ नये हीच अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरू पोलिसांच्या रडारवर

$
0
0

माहिती दडवल्यास घरमालकाविरोधात गुन्हा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलिस स्टेशनला कळवावी; अन्यथा थेट घरमालकाविरोधात गुन्हे दाखल करणार येईल, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे. सिंहस्थ काळात दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा असे केले जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

शहरात २०१० मध्ये राहिलेला संशयित दहशतवादी शेख लालबाब फरीद उर्फ बिलाल हा सातपूर भागात भाडेकरू म्हणून राहिला होता. त्याने त्यावेळी महाराष्ट्र पोलिस अकादमी, पोलिस आयुक्तालय, देवळाली कॅम्प व इतर महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. अबू जुंदाल व लष्कर-ए-तय्यबाच्या मदतीने शहरात घातपात करण्याचा बिलालचा इरादा होता. त्यानंतर शहरात राहणाऱ्या भाडेकरूंबाबत प्रश्न उपस्थित होऊन त्यांची माहिती पोलिसांना कळवण्याचे आदेश तत्कालीन पोलिस आयुक्तांनी दिले होते. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी गंगापूर भागात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या संशयित गुन्हेगारांना अटक केली. हे संशयित स्वस्तात डॉलर देण्याचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत होते. याबरोबर, टकलेनगरमध्ये जून २०१३ मध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली. त्या घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलिसांना दिली नव्हती. परिणामी पोलिसांनी लागलीच संबंधित घरमालकाविरोधात कारवाई केली. जून २०१२ ते जून २०१३ या वर्षभराच्या कालावधीत शहर पोलिसांनी भाडेकरूंची माहिती लपवून ठेवली म्हणून १६९ घरमालकांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात कारवाईचे प्रमाण काही कमी झाले होते. मात्र, सिंहस्थांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुन्हा एकदा भाडेकरूंकडे आपला मोर्चा वळवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुणा नदी पुनर्जीवित करावी

$
0
0

ग्यानदास महाराज यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

रामकुंडावरील गोमुखात प्रकट होणारी मात्र आता लुप्त झालेली अरुणा नदी पुनर्जीवित व्हावी तसेच नदीतील सर्व बंद पडलेले कुंड पुन्हा खोदून काढावे, अशी अपेक्षा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांनी व्यक्त केली. याप्रश्नी शासन दरबारी लढा देण्यासाठी ग्यानदास महाराज यांना साथ द्यावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

कुंभमेळा आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी भाविकांशी चर्चा केली आहे. गोदावरी व अरुणा या दोन्ही नद्यांचा संगम पूर्ववत करण्याची गरज आहे यासाठी अरुणा नदी पुनर्जीवित करण्याची गरज आहे. गोदावरी नदीकाठावरील १६ प्राचीन कुंडही जीवित करायला हवीत. हिंदू संस्कृतीचे जतन करणे स्थानिक प्रशासन व नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी नागरिकांनी साथ देणे गरजेचे आहे, असे मत ग्यानदास यांनी व्यक्त केले. अरुणा नदी पुनर्जीवित करण्यासाठी महंत ग्यानदास महाराज हे शासन दरबारीकडे पाठपुरावा करणार आहेत. नाशिककरांसह भाविकांनी या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी आणि उद्योजक धनंजय बेळे यांनी केले आहे. यावेळी राजू व्यास, योगेश रामय्या उपस्थित होते.

प्रशासनाचे सहकार्य हवे

कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्यानदास महाराज यांनी केले. त्यांनी साधुग्रमची पाहणी करीत कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

साधू-महंताचे मनोमिलन

साधूग्राम तसेच गोदावरी काठची पाहणी करतांना ग्यानदास महाराज यांनी दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोर शास्त्री व रामस्नेहीदास यांना सोबत घेतले. यामुळे अनेक दिवसानंतर सर्व साधू महंत एकत्र असल्याचे दिसून आले. साधू महंतामध्ये मनोमिलन झाल्याचे चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रविवारी ‘आई रिटायर होतेय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याअंतर्गतच रविवारी (दि. ७) दुपारी दीड वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे 'आई रिटायर होतेय' या नाटक सादर होणार आहे. 'मटा'च्या वाचकांसाठी ही खास ऑफर असून त्यासाठी मोफत पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

'आई रिटायर होतेय' हे नाटक मनोरंजन प्रकाशित असून एक अजरामर अभिजात नाट्यकृती आहे. कलाकार पुणे यांच्या माध्यमातून होत असलेल्या या नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी केले आहे. दिग्दर्शन रवी सांभारे यांचे आहे. यात उपेंद्र दाते, मंगेश दिवाणजी, रेणुका भिडे, मनोज डाळिंबकर, सुशील भोसले, रूपाली पाथरे, रुचा आणि वीणा फडके यांच्या भूमिका आहेत.

कल्चर कल्बच्या सदस्यांसाठी राखीव आसनव्यवस्था असून अद्यापही काही पासेस शिल्लक आहेत. अनेक वाचकांनी पास नेले असून ज्यांना पास हवे असतील त्यांनी मटा कार्यालयातून आज सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत पास घेऊन जावेत. ही सुविधा पास संपेपर्यंतच आहे. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोट धरून हसविणारे ‘लगीनघाई’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. हा टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात विशिष्ट वयातच येतो. असा हा महत्त्वपूर्ण टप्पा एकाच घरातल्या बाप व मुलाच्या आयुष्यात एकाच वेळी आला तर काय होईल? याचं उत्तर म्हणजे 'लगीनघाई'. सुयोग निर्मित, निर्माते गोपाल अलगेरी यांचं 'लगीनघाई' हे नवं कोरं विनोदी नाटक महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब सदस्यांसाठी नुकतेच दाखविण्यात आले. महाकवी कालिदास कलामंदिरात 'नाट्यसेवा'तर्फे या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

'लगीनघाई' नाटकातील बाप एक विधूर. बायकोनंतर आपल्या मुलाला आईची आणि बापाची माया देऊन त्याचे संगोपन करतो. पण आता त्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली आहे. दोघांनाही लग्न करायचं आहे, पण अडचण आहे ती मोठा झालेल्या मुलाला ही गोष्ट सांगायची कशी? मुलाचीही एक वेगळीच अडचण आहे. तो पण प्रेमात पडलाय, पण त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीच्या. दोघंही बाप-बेट्यांना आपली प्रेमप्रकरणं एकमेकांना सांगायची आहेत. पण भिडस्त स्वभावाने थेट कोणीच बोलू शकत नाही.

या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांचे होते. अभिजीत पेंढारकर यांनी संगीत, शशांक तेरे, प्रकाश शीतल तळपदे यांनी नेपथ्य, प्रणोती जोशी यांची वेशभूषा तर यात मालतीची भूमिका आदिती देशपांडे, अनिकेतची भूमिका ओंकार राऊत, पूनमची भूमिका नियती घाटे तर राजीवची भूमिका अशोक सराफ यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आज शहरात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष खा. अशोक चव्हाण शनिवारी (दि. ६) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत कालिदास कलामंदिरात जिल्हा स्वातंत्र्य सैनिकाचा मेळावा होणार आहे. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही उपस्थित राहणार आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहे.

चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. सकाळी १०.३० वाजता त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्याकडील कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी सव्वा वाजता ते स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्लिनटेक’द्वारे गोदा स्वच्छता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर 'गोदावरी स्वच्छता' अभियानांतर्गत यंत्राद्वारे नदीतील झुडूपे आणि कचरा काढण्याच्या कामाचा महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते आणि विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सुरुवात करण्यात आली.

ऍक्वाटेक वीड हार्वेस्टर्स ट्रॅश स्कीमा नामक जलशुद्धीकरण यंत्रामार्फत पुढील चार महिने नदीपात्रात हे काम सुरू राहणार आहे. सीएसआर उपक्रमातून तीन कंपन्यांच्या मदतीने आणि आर्ट ऑफ लिव्हींगच्या सहकार्याने हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस गोदामाई मोकळा श्वास घेण्याची शक्यता आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग, जिंदाल स्टील वर्क्स, डायनामिक प्रिस्ट्रेसिंग कंपनी यांच्या संयुक्त सहकार्याने ऍक्वाटेक वीड हार्वेस्टर्स ट्रॅश स्कीमा या जलशुद्धीकरण यंत्र नाशिक महापालिकेला नदीच्या स्वच्छतेसाठी उपलब्ध झाले आहे. आनंदवल्ली शिवारातील गोदापात्रात महापौरांनी पूजन करून यंत्राचा शुभारंभ केला. यावेळी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते. गेल्या ५ वर्षांपासून क्लीन टेक इन्फ्रा या यंत्राचा भोपाल, अलाहाबाद आदी ठिकाणच्या सरोवरांमध्ये जलशुद्धीकरणासाठी वापर केला जात आहे. नदीपात्रात ५ फूट खोलवरील झुडुपे, घाण-कचरा काढण्याचे काम या यंत्राद्वारे केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनोद्यानाचा मार्ग मोकळा

$
0
0

मंगळवारी महासभा, भुयारी गटार योजनेच्या निधीचाही प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेची प्रलंबित महासभा येत्या मंगळवारी (दि. ९) होत असून या महासभेत सिडकोच्या सहाव्या गृहनिर्माण योजनेचे हस्तातंरणासह पांडवलेण्याजवळील वनोद्यान विकसित करण्याचा सामंजस्य कराराचा विषय चर्चेला येणार आहे. या सभेत हा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महासभा होणार आहे. यात पांडवलेण्याजवळील २५ हेक्टर जागा महापालिकेच्या बॉटनिकल गार्डनसाठी वनविकास महामंडळाकडून महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यासंदर्भातील प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वनविकास महामंडळाकडून ही जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा कराराला संमती दिली जाणार आहे. त्यामुळे हे गार्डन विकसित करण्याचा टाटा फाऊंडेशनचा मार्गही मोकळा होणार आहे. या गार्डनच्या माध्यमातून पर्यटनाचे एक मोठे केंद्र तयार होणार आहे.

महासभेत सिडकोच्या सहाव्या योजनेचा प्रस्तावही चर्चेला येणार आहे. सिडकोने सुमारे ८ वर्षांपूर्वी सहाव्या गृहनिर्माण योजनेत साडेचारशे सदनिका बांधल्या. या सदनिका सिडकोच्याच ताब्यात असल्यामुळे महापालिकेला सुविधा देताना अडचण निर्माण होते. त्यात यापूर्वी पाच गृहनिर्माण योजना महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या आहेत; पण ही योजना हस्तांतरीत करतांना सुरुवातीपासूनच अडचणी निर्माण झाल्या. येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे अडीच वर्षांपासून योजना हस्तांतर करताना सिडको प्रशासनाने काही रक्कम महापालिकेला द्यावी, अशी मागणी होती. सुरवातीला ही मागणी मोठी होती; पण नंतर नऊ कोटी रुपये प्रशासनाने महापालिकेला द्यावेत, असे ठरले. मात्र, त्यावरही प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी या योजनेच्या बदल्यात प्रशासनाने येथील चार भूखंड महापालिकेला द्यावेत, असे ठरले; मात्र पुढे सिडको व महापालिका प्रशासनाचे बिनसले. अनेकदा हस्तांतराचा अंतिम निर्णय लांबल्यामुळे या महासभेच्या चर्चेदरम्यान काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रस्तांवासोबतच महिला रुग्णालयासाठी जागा देण्याचा आणि सिंहस्थाच्या विकास कामांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ६० कोटीच्या अतिरिक्त निधीचाही प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images