Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

द्राक्ष शेतकरी चिंतेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

हंगामाच्या शेवटच्या सत्रात द्राक्षांचे भाव प्रचंड कडाडले असून, स्थानिक बाजारपेठेत शेतकऱ्यांना ६० ते ७५ रुपये दर मिळत आहे. मात्र, द्राक्षांना वजन मिळत नसल्याने दर वाढूनही शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मोबदला मिळत नसल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

ऐन द्राक्ष ‌हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रचंड नुकसान झाल्यानंतर निर्यातक्षम द्राक्षही यंदा दहा ते वीस रुपये किलो दराने विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली. बहुसंख्य शेतकऱ्यांना वाईन उत्पादक व बेदाण उत्पादकांना मातीमोल भावात द्राक्ष विकावे लागले होते. मात्र, आता हंगामाच्या अखेरच्या सत्रात द्राक्षांना ६० ते ७५ रुपये दर मिळत आहेत. द्राक्ष संपत आल्याने स्थानिक बाजारपेठेबरोबरच द्राक्षांची निर्यातही मंदावली आहे. शिल्लक द्राक्षांपैकी केवळ दहा टक्के द्राक्ष निर्यात होत असून, ९० ते १०० रुपये किलोने विकली जात आहेत.

यंदा प्रत्येक महिन्यात पावसाचा व वेळोवेळी गारपिटीचा सामना करावा लागला आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ५० टक्के निर्यात घटली आहे. गतवर्षी नाशिक विभागातून युरोप, लंडन, रशिया, अरब राष्ट्र, बांगलादेश आदी देशात साडेसहा हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा केवळ तीन हजार दोनशे कंटेनेर द्राक्षांची निर्यात झाली आहे. मुळात गत वर्षाच्या तुलनेत द्राक्ष उत्पादनात तब्बल ४० टक्के घट झाली आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीने नाशिक विभागातील दोन लाख एकर द्राक्ष क्षेत्राचे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकंदरीत संपूर्ण द्राक्ष हंगामात अस्मानी संकटांना तोंड द्यावे लागल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विविध कार्यकारी सोसायट्या, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकांची वसुली ठप्प झाली आहे. शेतकरी यंदा कर्जफेड करूच शकत नसल्याने नुकसानभरपाईपेक्षा सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये शरद पवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून शनिवारी (दि. ११) यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी भवनात शनिवारी सकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. सायंकाळी आमदार हेमंत टकले यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला त्यांची प्रमुख हजेरी असणार आहे.

पवार शुक्रवारी दुपारीच नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यांनतर त्यांनी माजी खासदार अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी पवार यांचा मुक्काम असून आपल्या निवडक सहकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करणार आहेत. नाशिक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, सध्या जिल्ह्यात पक्षाची अवस्था फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे पक्षाच्या पुनर्वैभवासाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सांयकाळी साडे चार वाजता हुतात्मा कान्हेरे मैदानावर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नूतन कार्यालयाचे उद्धाटन होईल. याच कार्यक्रमात जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष खासदार धैर्यशील पवार यांच्या छायाचित्रांचे व बॉलिंग मशीनचे अनावरण पवार यांच्या हस्ते व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आमदार हेमंत टकले यांच्या 'थोडी ओली पानं' या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते होणार आहे. रात्री उशिरापर्यंत ते मुंबईला रवाना होणार आहेत.

नव्या पदाधिकारी निवडीत लक्ष घालणार

नाशिक शहरासह जिल्हा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सध्या पक्षात सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभेत पक्षाची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. त्यामुळे पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी नाशिकमध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी पवार स्वतः लक्ष घालणार आहेत. पदाधिकाऱ्यांच्या निवडीत हस्तक्षेप करून आक्रमक आणि अभ्यासू पदाधिकाऱ्यांच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यासाठी पवार हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींच्या हस्ते महाभिषेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जैन धर्मियांचे भारतातील पवित्र तीर्थक्षेत्र मांगातुंगी (ता.बागलाण) येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये जगातील सर्वात उंच भगवान वृषभदेवाच्या महाभिषेक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, खासदार डॉ. सुभाष भामरे, महोत्सव समितीचे परम संरक्षक खासदार राजू शेट्टी व पर्यटन विकास कमिटीच्या सदस्यांसह जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक मांगीतुंगी येथे घेण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन आत्तापासून सुरू करण्यात आले आहे. सटाणा शहरापासून तीस कि. मी. अंतरावर असलेले मांगीतुंगी येथे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद मोदी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेसह पर्यटन स्थळाच्या सर्व सुविधा, रस्ते, दळणवळण, पिण्याचे पाणी आदी कामे करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीतर्फे विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी कुशवाह यांनी स्पष्ट केले. विकास आराखडा मंजुरीनंतर नियोजित कामांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याबरोबरच मांगीतुंगी येथे अ वर्गाचे पर्यटन स्थळ निर्मितीचे संकेत या निर्मित्ताने मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह स्वत:च रस्त्यावर उतरले. सर्व नियम धाब्यावर बसवून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर त्यांनी स्वत: कारवाई केली. चांदवड, बागलाण आणि देवळा तालुक्यात केलेल्या या कारवाईद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील सरकारी बाबूंनाच चपराक लगावली आहे. वाळू वाहतूक करणारे ट्रक व इतर वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्याचा मनोदयही कुशवाह यांनी व्यक्त केला.

असे काम करेल जीपीएस

वाळू तसेच रेशन धान्याच्या वाहतुकीत जीपीएस यंत्रणा प्रभावीपणे काम करू शकते. वाळू वाहतुकदाराने ठिय्यापासून वाळू उचलली की तो सर्व्हरला मेसेज टाकेल. त्यानंतर सर्व्हरकडून त्याला कोड मिळेल. या कोडवर चालकाचा मोबाईल नंबर टाकून तो सर्व्हरला फीड केला जाईल. त्यानंतर संबंधितांना पावती मिळेल. ठिय्यापासून ज्या ठिकाणापर्यंत वाहतुकीसाठी परवाना दिला आहे त्याची माहिती सर्व्हरपर्यंत पोहोचेल. ज्या ‌ठिकाणी गाडी खाली केली जाईल त्या ठिकाणचे चालकाचे मोबाईल लोकेशन सर्व्हरला प्राप्त होईल.

दोन ते तीन ब्रास वाळू वाहतुकीची परवानगी असताना वाहनांमधून पाच ते सहा ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. तसेच काही वाहनांमधून पूर्णत: अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळले. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. - दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये शरद पवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी राष्ट्रवादी भवनला भेट देऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सवांद साधला. शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत फोटोसेशन करीत जिल्ह्यात पक्ष उभारणीसाठी कामाला लागण्याचे संदेश त्यांनी दिले. विशेष म्हणजे आपल्या तासभराच्या भेटीत पवारांनी प्रत्येकाशी हसतखेळत संवाद साधला.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या पवारांना विधानसभेनंतर पक्षाची पुर्नउभारणी स्वतःच्या हातात घेतली आहे. त्यासाठी जिल्हावार दौरे करीत असून, शुक्रवारपासून ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी त्यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये जाऊन पक्षाच्या स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा आणि शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. महिला पदाधिकाऱ्यांना प्राधान्याने भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. पवारांना भेटण्यासाठी पक्ष कार्यालयात ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पवारांनी प्रत्येकासोबत फोटोसेशन केले. कार्यकर्त्यांचे फोटोसेशन आटोपल्यानंतर त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चंभुळे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जून टिळे यांच्यासह जिल्हाभरातील निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्यात नव्या जोमाने पक्षाची उभारणी करण्याचा आदेश त्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रवादी भवन प्रथमच गजबजले

विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राष्ट्रवादी भवनमध्ये शुकशुकाट होता.पदाधिकारी वगळता कार्यकर्तेही कार्यालयाकडे फिरकेनासे होते. मात्र, शुक्रवारी पवार येताच पक्षाचे कार्यालय पुन्हा गजबजले होते. विशेषतः ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित असले तरी शहरातील काही नगरसेवक आणि पदाधिकारी मात्र या दौऱ्यापासून लांबच होते.

टोलमुक्ती संवग लोकप्रियतेसाठी

राज्यातील युती सरकारने घेतलेल्या टोलमुक्तीचा निर्णय हा संवग लोकप्रियतेसाठी असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नाशिक येथे केली. 'जगात सर्वत्र टोल नाके आहेत, दळणवळणासाठी खाजगी गुतंवणूक केली जाते. काही वेळा प्रवाशांकडूनही पैसे घेतले जातात. राज्यात टोलची सुरूवातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. भांडवली गुंतवणुकीसाठी असे निर्णय घेतले जातात. त्यातून रस्त्यांचा दर्जा वाढतो. त्यामुळे लोकही खुशीने टोल भरतात. मात्र भाजपने काल घेतलेला निर्णय हा संवग लोकप्रियतेचा आहे. टोलमुक्ती केल्याने तुम्ही रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी पैसे कुठून आणणार. त्याचा राज्याच्या हितावर परिणाम होणार आहे .मात्र टोलमुक्तीचे धोरण चुकीचे आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी रस्ते खराब असतील तरी, चालेल. अशी भूमिका योग्य नाही.' असे मतही पवार यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत गोळीबार, रहस्य कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून मुलीच्या काकांवर गावठी पिस्तुलातून गोळीबार करीत दहशत पसरविणारा संभाजी कडवे हा संशयित शुक्रवारीही अंबड पोलिसांच्या हाती लागला नाही. गुरुवारी, सायंकाळी सिडकोतील शिवपुरी चौकात ही घटना घडली. सुदैवाने, मुलीच्या काकांना कोणतीही इजा झाली नाही. या घटनेमुळे, नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी कडवे ऊर्फ संभ्या याचा पंचवटीतील एका मुलीशी विवाह ठरला होता. संभाजी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने श्रीपाद कडवीलकर या मुलीच्या काकांनी लग्नास विरोध केला. याचा राग संभाजीच्या मनात होता. हाच राग मनात ठेवून कडवे हा वेळोवेळी मुलीच्या नातेवाइकांना दमबाजी करून वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत होता. गुरुवारी श्रीपाद कडवीलकर हे सिडकोतील शिवपुरी चौकात राहत असलेल्या त्यांच्या नातेवाइकांकडे आले होते. त्यावेळी, संभाजी कडवे याने तेथे पोहचून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर संभाजीने गावठी पिस्तूल रोखून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान दाखवित गोळी चुकविली. आवाजामुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी होत असल्याचे बघून कडवेने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संभाजी कडवे हा अद्याप फरारच आहे.

लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून नातेवाईकावर गोळीबार करणाऱ्या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. त्याच्या शोधासाठी दोन ते तीन पथके रवाना झाली असून लवकरच तो जेरबंद होईल, अशी अपेक्षा अंबड पोलिसांनी व्यक्त केली. गोळीबारीची घटना गुरूवारी सायंकाळी सिडकोतील शिवपुरी चौकात घडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूलमध्ये काम बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सात तहसीलदारांसह १६ जणांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ महसूल विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते राजपत्रित अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच शुक्रवारी लेखणी बंद आंदोलन केले. ही कारवाई अन्यायकारक आहे, हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी संघटनांचे पदाधिकारी मुंबईत गेले होते. चर्चेनंतर कारवाईची दिशा ठरविली जाईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.

सुरगाणा येथे कोट्यवधींच्या रेशन धान्याचा घोटाळा झाल्याचा प्रकार जानेवारीत उघडकीस आला होता. या प्रकरणी स्थानिक आमदारांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानंतर अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी अशा १६ जणांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह सात तहसीलदारांचाही समावेश आहे. या कारवाईचे पडसाद शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये उमटले. ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करीत सर्व महसूल संघटना एकत्रित आल्या. कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी अन्यायकारक कारवाई थांबविण्यासाठी अघोषित लेखनी बंद आणि कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, जिल्हा महसुली कर्मचारी संघटना, जिल्हा तलाठी संघटना, जिल्हा लेखा व कोषागार संघटना, चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहनचालक संघटना आणि जिल्हा कोतवाल संघटना अशा संघटनांशी संबंधित तब्बल एक हजार १२९ जण या कारवाईमध्ये सहभागी झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील ५६२ तलाठी, ९२ सर्कल अधिकारी, ३५० लिपीक तसेच अव्वल कारकून आणि १२६ शिपाई यांचा समावेश होता. या विभागाशी संबंधित सर्वच कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. ही कारवाई अन्यायकारक असून, काही अधिकारी कर्मचाऱ्यांचा या प्रकरणाशी संबंध नसतानाही ते भरडले जात आहेत. ही कारवाई मागे घ्यावी, अशा आशयाचे निवेदन संघटनांनी दिले आहे.

कारवाई अविचाराने

तहसीलदार तडवी यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. मार्चमध्ये ते निवृत्त झाले आहेत. एफडीओ अरुण उजागरे हे देखील निवृत्त झाले आहेत. तरीही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुरवठ्याची मागणी करणारा अहवाल तहसीलदार प्रत्येक महिन्याला देत असतात. त्यामुळे त्यांचा दोष नसताना तसेच पूर्वसूचना न देताच ही कारवाई झाल्याचे महसूल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कारवाईमुळे अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले आहेत. तहसीलदार आणि त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या यंत्रणेकडे कामाचा मोठा व्याप असतो. तो सांभाळून ते पुरवठा विभागाची अतिरिक्त जबाबदारी पार पाडतात. त्यांच्यावर अशा प्रकारची अन्यायकारक कारवाई झाल्याने पुरवठा विभागाचे कामच नको, असा पवित्रा स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये अधिकारी आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. केवळ महसूलशी संबंधित कामेच पाहण्याच्या पवित्र्यात असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींच्या उत्पादनांचे ब्रँडिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नैसर्गिक वातावरणात तयार होणाऱ्या आणि शंभर टक्के शुद्ध असलेल्या आदिवासी भागातील वनोपज ब्रँडिंग आणि प्रसिद्धी अभावी शहरी भागात मातीमोल भावात विकले जातात. आदिवासींना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने आता आदिवासी भागातील डिंक, मध, लाख, हिरडा, महू फुल, खुरसणी सारखे ३३ नैसर्गिक वनउपज व वनौषंधींचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

आदिवासी भागात या वनउपजावर प्रक्रिया करणारे व पॅकेजिंग करण्याऱ्या प्रक्रिया उद्योगांना बळ दिले जाणार आहे. त्यामुळे आदिवासींना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला आणि रोजगारही मिळणार आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, भंडारा, नागपूर ,नंदूरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यात वनोपज व वनौषंधीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. त्यावरच आदिवासींचे उत्पन्न आणि उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र, आदिवासींकडून या मालाचे पॅकेजिंग आणि ब्रँडिंग होत नसल्याने शहरी भागात ही उत्पादने कवडीमोल भावात विकली जातात. हीच उत्पादने व्यापारी खरेदी करून लाख रुपये बनवतात. आयुर्वेदाच्या कंपन्या त्यावर प्रक्रिया करून कोट्यवधी कमावतात. त्यामुळे आदिवासींच्या या वनोपजासह वनौषंधींचा खरा पैसा त्यांनाच मिळावा यासाठी आदिवासी विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून आठ कोटी २५ लाख आणि राज्य सरकारकडून एक कोटी २९ लाखांची रक्कम मिळणार आहे. पॅकेंजिगसाठी बचत गटांनाच सहभागी करून घेतले जाणार आहे. आदिवासी महिला बचत गटांना प्रशिक्षित करून त्यांच्याकडून पॅकेजिंग केल्यानंतर त्याचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग करून दिले जाणार आहे. त्यामुळे आदिवासींच्या विकासाला आर्थिक हातभार लागणार आहे. आदिवासींना चांगला आर्थिक मोबदला मिळण्यासह रोजगारही मिळणार आहे.

केंद्र आणि राज्याच्या निधीतून आदिवासींच्या वनउपज आणि वनौषंधीचे पॅकेजिंग, ब्रँडिंग व मार्केटिंग केले जाणार आहे. आदिवासींची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टळून त्यांना दोन पैसे अधिकचे मिळणार आहे. आदिवासींना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न आहे. - बाजीराव जाधव, एमडी, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक

महूपासून सरबत निर्मिती

महूच्या फुलापासून आतापर्यंत आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठीची दारूच बनवली जाते. मात्र, महू फुलाचा जास्तीत जास्त वनौषंधी म्हणून वापर करता येणे शक्य आहे. सोबतच आरोग्यासाठी या फुलापासून उपयुक्त सरबतही बनवता येते. यांसदर्भात एक प्रोजेक्ट गडचिरोलीत सुरू करण्यात आला आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर तो इतरत्र वापरला जाणार आहे. वनौषधींसाठी या फुलाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष शेतकरी चिंतेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

हंगामाच्या शेवटच्या सत्रात द्राक्षांचे भाव प्रचंड कडाडले असून, स्थानिक बाजारपेठेत शेतकऱ्यांना ६० ते ७५ रुपये दर मिळत आहे. मात्र, द्राक्षांना वजन मिळत नसल्याने दर वाढूनही शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मोबदला मिळत नसल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

ऐन द्राक्ष ‌हंगामात अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रचंड नुकसान झाल्यानंतर निर्यातक्षम द्राक्षही यंदा दहा ते वीस रुपये किलो दराने विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली. बहुसंख्य शेतकऱ्यांना वाईन उत्पादक व बेदाण उत्पादकांना मातीमोल भावात द्राक्ष विकावे लागले होते. मात्र, आता हंगामाच्या अखेरच्या सत्रात द्राक्षांना ६० ते ७५ रुपये दर मिळत आहेत. द्राक्ष संपत आल्याने स्थानिक बाजारपेठेबरोबरच द्राक्षांची निर्यातही मंदावली आहे. शिल्लक द्राक्षांपैकी केवळ दहा टक्के द्राक्ष निर्यात होत असून, ९० ते १०० रुपये किलोने विकली जात आहेत.

यंदा प्रत्येक महिन्यात पावसाचा व वेळोवेळी गारपिटीचा सामना करावा लागला आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ५० टक्के निर्यात घटली आहे. गतवर्षी नाशिक विभागातून युरोप, लंडन, रशिया, अरब राष्ट्र, बांगलादेश आदी देशात साडेसहा हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा केवळ तीन हजार दोनशे कंटेनेर द्राक्षांची निर्यात झाली आहे. मुळात गत वर्षाच्या तुलनेत द्राक्ष उत्पादनात तब्बल ४० टक्के घट झाली आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीने नाशिक विभागातील दोन लाख एकर द्राक्ष क्षेत्राचे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकंदरीत संपूर्ण द्राक्ष हंगामात अस्मानी संकटांना तोंड द्यावे लागल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विविध कार्यकारी सोसायट्या, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकांची वसुली ठप्प झाली आहे. शेतकरी यंदा कर्जफेड करूच शकत नसल्याने नुकसानभरपाईपेक्षा सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये शरद पवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारपासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून शनिवारी (दि. ११) यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी भवनात शनिवारी सकाळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. सायंकाळी आमदार हेमंत टकले यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला त्यांची प्रमुख हजेरी असणार आहे.

पवार शुक्रवारी दुपारीच नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यांनतर त्यांनी माजी खासदार अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी पवार यांचा मुक्काम असून आपल्या निवडक सहकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करणार आहेत. नाशिक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, सध्या जिल्ह्यात पक्षाची अवस्था फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे पक्षाच्या पुनर्वैभवासाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सांयकाळी साडे चार वाजता हुतात्मा कान्हेरे मैदानावर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नूतन कार्यालयाचे उद्धाटन होईल. याच कार्यक्रमात जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष खासदार धैर्यशील पवार यांच्या छायाचित्रांचे व बॉलिंग मशीनचे अनावरण पवार यांच्या हस्ते व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आमदार हेमंत टकले यांच्या 'थोडी ओली पानं' या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते होणार आहे. रात्री उशिरापर्यंत ते मुंबईला रवाना होणार आहेत.

नव्या पदाधिकारी निवडीत लक्ष घालणार

नाशिक शहरासह जिल्हा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सध्या पक्षात सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभेत पक्षाची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. त्यामुळे पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी नाशिकमध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी पवार स्वतः लक्ष घालणार आहेत. पदाधिकाऱ्यांच्या निवडीत हस्तक्षेप करून आक्रमक आणि अभ्यासू पदाधिकाऱ्यांच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यासाठी पवार हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींच्या हस्ते महाभिषेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जैन धर्मियांचे भारतातील पवित्र तीर्थक्षेत्र मांगातुंगी (ता.बागलाण) येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये जगातील सर्वात उंच भगवान वृषभदेवाच्या महाभिषेक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, खासदार डॉ. सुभाष भामरे, महोत्सव समितीचे परम संरक्षक खासदार राजू शेट्टी व पर्यटन विकास कमिटीच्या सदस्यांसह जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक मांगीतुंगी येथे घेण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन आत्तापासून सुरू करण्यात आले आहे. सटाणा शहरापासून तीस कि. मी. अंतरावर असलेले मांगीतुंगी येथे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे पुढील वर्षी पंतप्रधान नरेंद मोदी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेसह पर्यटन स्थळाच्या सर्व सुविधा, रस्ते, दळणवळण, पिण्याचे पाणी आदी कामे करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीतर्फे विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी कुशवाह यांनी स्पष्ट केले. विकास आराखडा मंजुरीनंतर नियोजित कामांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याबरोबरच मांगीतुंगी येथे अ वर्गाचे पर्यटन स्थळ निर्मितीचे संकेत या निर्मित्ताने मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह स्वत:च रस्त्यावर उतरले. सर्व नियम धाब्यावर बसवून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर त्यांनी स्वत: कारवाई केली. चांदवड, बागलाण आणि देवळा तालुक्यात केलेल्या या कारवाईद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील सरकारी बाबूंनाच चपराक लगावली आहे. वाळू वाहतूक करणारे ट्रक व इतर वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्याचा मनोदयही कुशवाह यांनी व्यक्त केला.

असे काम करेल जीपीएस

वाळू तसेच रेशन धान्याच्या वाहतुकीत जीपीएस यंत्रणा प्रभावीपणे काम करू शकते. वाळू वाहतुकदाराने ठिय्यापासून वाळू उचलली की तो सर्व्हरला मेसेज टाकेल. त्यानंतर सर्व्हरकडून त्याला कोड मिळेल. या कोडवर चालकाचा मोबाईल नंबर टाकून तो सर्व्हरला फीड केला जाईल. त्यानंतर संबंधितांना पावती मिळेल. ठिय्यापासून ज्या ठिकाणापर्यंत वाहतुकीसाठी परवाना दिला आहे त्याची माहिती सर्व्हरपर्यंत पोहोचेल. ज्या ‌ठिकाणी गाडी खाली केली जाईल त्या ठिकाणचे चालकाचे मोबाईल लोकेशन सर्व्हरला प्राप्त होईल.

दोन ते तीन ब्रास वाळू वाहतुकीची परवानगी असताना वाहनांमधून पाच ते सहा ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. तसेच काही वाहनांमधून पूर्णत: अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळले. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. - दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये शरद पवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी राष्ट्रवादी भवनला भेट देऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सवांद साधला. शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत फोटोसेशन करीत जिल्ह्यात पक्ष उभारणीसाठी कामाला लागण्याचे संदेश त्यांनी दिले. विशेष म्हणजे आपल्या तासभराच्या भेटीत पवारांनी प्रत्येकाशी हसतखेळत संवाद साधला.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या पवारांना विधानसभेनंतर पक्षाची पुर्नउभारणी स्वतःच्या हातात घेतली आहे. त्यासाठी जिल्हावार दौरे करीत असून, शुक्रवारपासून ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी त्यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये जाऊन पक्षाच्या स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा आणि शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. महिला पदाधिकाऱ्यांना प्राधान्याने भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. पवारांना भेटण्यासाठी पक्ष कार्यालयात ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पवारांनी प्रत्येकासोबत फोटोसेशन केले. कार्यकर्त्यांचे फोटोसेशन आटोपल्यानंतर त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चंभुळे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जून टिळे यांच्यासह जिल्हाभरातील निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्यात नव्या जोमाने पक्षाची उभारणी करण्याचा आदेश त्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रवादी भवन प्रथमच गजबजले

विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राष्ट्रवादी भवनमध्ये शुकशुकाट होता.पदाधिकारी वगळता कार्यकर्तेही कार्यालयाकडे फिरकेनासे होते. मात्र, शुक्रवारी पवार येताच पक्षाचे कार्यालय पुन्हा गजबजले होते. विशेषतः ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी पवारांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले. ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित असले तरी शहरातील काही नगरसेवक आणि पदाधिकारी मात्र या दौऱ्यापासून लांबच होते.

टोलमुक्ती संवग लोकप्रियतेसाठी

राज्यातील युती सरकारने घेतलेल्या टोलमुक्तीचा निर्णय हा संवग लोकप्रियतेसाठी असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नाशिक येथे केली. 'जगात सर्वत्र टोल नाके आहेत, दळणवळणासाठी खाजगी गुतंवणूक केली जाते. काही वेळा प्रवाशांकडूनही पैसे घेतले जातात. राज्यात टोलची सुरूवातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. भांडवली गुंतवणुकीसाठी असे निर्णय घेतले जातात. त्यातून रस्त्यांचा दर्जा वाढतो. त्यामुळे लोकही खुशीने टोल भरतात. मात्र भाजपने काल घेतलेला निर्णय हा संवग लोकप्रियतेचा आहे. टोलमुक्ती केल्याने तुम्ही रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी पैसे कुठून आणणार. त्याचा राज्याच्या हितावर परिणाम होणार आहे .मात्र टोलमुक्तीचे धोरण चुकीचे आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी रस्ते खराब असतील तरी, चालेल. अशी भूमिका योग्य नाही.' असे मतही पवार यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळीत युवकाचा खून

$
0
0

टाकळीत युवकाचा खून

नाशिक : टाकळी येथील समतानगरमध्ये शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुजीत लोट (वय २०) या कॉलेज युवकाचा जुन्या वादातून खून झाला. धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सुजीतच्या नातलगांनी उपनगर पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. याबाबत तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उश‌िरापर्यंत सुरू होते. गेल्या दोन महिन्या नाशिकरोड परिसरातील हा तिसरा खून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बळीराम हिरे यांचे निधन

$
0
0

मालेगाव ः माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. बळीराम हिरे (८५) यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. हिरे यांच्या पार्थिवावर आज, रविवारी एमबीए कॉलेज, गोळीबार मैदानावर अंत्यसंस्कार होतील.

अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या हिरे यांना पुढील उपचारांसाठी मुंबईला नेत असतानाच त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यामुळे त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. १९७२ साली विधानसभा निवडणुकीतून राजकारणात सक्रिय झालेल्या डॉ. हिरे यांनी राज्य मंत्रिमंडळात शालेय शिक्षण, आरोग्य, पाटबंधारे यासारख्या खात्यांचा मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते १९८५ मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्ती झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी वाऱ्यावर

$
0
0

मोदींवर शरद पवारांची टीका

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

केंद्र आणि राज्य सरकारने संकटकाळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून देशातील बहुसंख्य घटक असलेला शेती आणि शेतकरी दोन्ही सरकारांच्या प्राधान्यक्रमात नाहीत, अशी टीका माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विक्रमी परदेश दौऱ्यांमध्येही देशातील शेतकऱ्यांचे प्रतिबिंब दिसत नाही, असा टोला पवार यांनी लगावला.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या धोरणांवर टीका केली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. केंद्राच्या आपत्ती निधीतून मदत करण्यासाठी समितीच्या बैठका झाल्या, मात्र मदतीची घोषणा झालेली नाही, अशी टीका पवार यांनी केली.

दरम्यान, राज्यातील युती सरकारने घेतलेल्या टोलमुक्तीचा निर्णय हा संवग लोकप्रियतेसाठी असल्याची टीकाही त्यांनी केली.

शिवसेनेने बाहेर पडावे

जैतापूर प्रकल्प हा राज्याचा हिताचा असून त्याला आपला पाठिंबा आहे, असे सांगत या प्रकल्पाला शिवसेना करत असलेल्या विरोधाचा त्यांनी समाचार घेतला. केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे सत्तेत असताना घेतलेला निर्णय स्वीकारला पाहिजे. भाजपने शिवसेनेची समजूत घातली पाहिजे. मात्र सत्तेत राहून विरोध करणे योग्य नाही, निर्णय पटत नसेल, तर शिवसेनेन सत्तेतून बाहेर पडावे, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक वृत्त

$
0
0

गोदावरी प्रदूषणाकडे दुर्लक्ष

सिंहस्थ जवळ आला असला तरी गोदावरीत आजही दूषित पाणी सोडले जात आहे. गोदाप्रदूषण रोखण्यासाठी सर्व स्तरावरून मागणी होत असताना प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष झाले आहे. सिंहस्थात तरी गोदा प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन पावले उचलले का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुलाची डागडूजी

तपोनवनातील गोदावरी नदीवरील एका पुलाची डागडूजी करण्यात आली आहे. मात्र, तकलादू पत्रे बसविल्याने पत्रा वाकत आहे. यामुळे या पुलावरून चालणे धोकादायक ठरू शकते. यामुळे नावालाच डागडूजी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिझनेस बँकेकडे कागदपत्रांची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडच्या बिझनेस बँकेकडून ग्राहकाच्या झालेल्या फसवणूक प्रकरणी उपनगर पोलिसांनी बँकेला कागदपत्रांची मागणी करणारे पत्र दिले आहे. बँकेने स्वतःच्या फायद्यासाठी खोट्या कागपत्रांच्या आधारे आपल्या नावे बनावट खाते उघडले. मुदत ठेवीवर दोनदा २५ लाखाचे खोटे कर्ज घेऊन व पुन्हा भरुन फसवणूक केल्याची तक्रार अजगर रमझान खान या ग्राहकाने केल्यानंतर बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांसह संचालक मंडळ व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण सन २००१ मधील आहे.

नाशिकरोडच्या बिझनेस बँकेत बनावट कागपत्राच्या आधारे बनावट खाते उघडून ठेवधारकाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. उपनगर पोलिस ठाण्यात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष विजय संकलेचा, तत्कालीन संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक प्रल्हाद बलदेवा, सीताराम सोमाणी व मुख्य रोखपाल, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपासासाठी संबंधित जुनी कागदपत्रे मिळावीत म्हणून पोलिसांनी बँकेला पत्र दिले आहे. त्यांचा अभ्यास केल्यानंतर आणि पुरावे मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'अवकाळी'चा दणका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

अवकाळी पावसाचा ससेमिरा टळण्याच्या मार्गावर दिसत नाही. शनिवारी दुपारी येवला, मालेगाव, सिन्नर, नांदगावसह जिल्ह्यातील इतर भागात अवकाळी पावसाने जोरदार वादळी वाऱ्यांसह १० ते १५ मिनिटे तडाखा दिला. येवला तालुक्यातील राजापूर येथे एक बैल तर तळवाडे जवळ डोंगरगाव शिवारामध्ये एक गाय वीज पडून ठार झाली. तसेच कांदा व्यापाऱ्यांचे शेडही उडून गेले. तसेच नांदगाव तालुक्यातही एक गाय, सोळा शेळ्या ठार झाल्या.

शनिवारी दुपारी दीड वाजता येवला शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जोरदार वादळ वारा आणि विजेच्या कडकडाटात पावसाने शेतकऱ्यांची पळापळ झाली. नुकताच काढलेला कांदा पीक ही भिजले. जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडे देखील उन्मळून पडली. बाजार समितीमध्ये लिलावाला आलेला शेतकऱ्यांचा कांदाही भिजला. तालुक्यात इतरत्र पावसाचे प्रमाण कमी असले तरी वादळ व विजा सर्वत्र होत्या. शेतकऱ्यांचे कांदा, द्राक्ष, हरभरा, डाळिंब पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. वादळ व पावसाने वीजपुरवठा ही खंडित झाला होता.

राजापूर येथे पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरी वादळी वाऱ्यासोबत वीज पडून दत्तू अलगट यांच्या शेतात रघुनाथ सानप यांचा ४० हजार रुपये किमतीचा बैल ठार झाला. तसेच तळवाडे जवळ डोंगरगाव शिवारामध्ये राहणारे मधुकर मुरलीधर आरखडे यांची दुभती गाय वीज पडून ठार झाली. तलाठ्याने घटनास्थळी भेट देऊन ४२ हजार रुपये नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. येथील कांदा व्यापारी उमेश अट्टल यांची कांदा चाळ उन्मळून पडली. धामोडा येथे कारभारी गव्हाणे यांचे घराचे पत्रे उडाले. रस्त्याच्याकडेचे फलक, वीज वितरणचे खांब हे पूर्णपणे पडून वीज वितरण व मोबाइल कंपनीची सेवा बंद पडली आहेत.

मनमाड शहर परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांसह रस्त्यावरील भाजी तसेच किरकोळ वस्तू विक्रेंत्यांची धावपळ उडाली. उकाड्यानंतर जोराच्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हवेत गारवा पसरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत २०२० पर्यंत महासत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अर्थिक क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करीत असून, यंदा भारताचा विकास दर चीनपेक्षा निश्चित जास्त असणार आहे. भारत २०२० पर्यंत जगातील महासत्ता बनेल यात शंका नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ व नियोजन आयोगाचे माजी सदस्य नरेंद्र जाधव यांनी केले.

क. का. वाघ शिक्षण संस्था व क. का. वाघ तंत्रनिकेतन यांच्यातर्फे आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. गंगापूर रोड येथील कूर्तकोटी शंकराचार्य न्यास संकुल येथे शुक्रवारी नरेंद्र जाधव यांचे 'भारताच्या अर्थिक विकासाचे प्रतिबिंब -२०२०' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अधयक्षस्थानी रावसाहेब शिंदे होते. यावेळी क. का. वाघ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, काशिनाथ टर्ले, अशोक मर्चंट, चांगदेवराव होळकर आदी उपस्थित होते. जाधव यांनी भारतीय व्यवस्थेचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ याचा उहापोह केला. जाधव म्हणाले की, भारताचा विकास दर चीनपेक्षा जास्त असला तरी चीनची बरोबरी करण्यास आणखी बराच कालावधी लागणार आहे. चीनने सातत्याने २५ वर्षापेक्षा जास्त काळ विकासाचा दर हा १० टक्क्यांपेक्षा जास्त राखला आहे. यावेळी त्यांनी भारताच्या अर्थिक व्यवस्थेचा आढावा घेतला. ते म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विकासाचा दर हा शुन्य टक्के होता१९५१ मध्ये नियोजनबध्द विकासाला सुरुवात झाली. जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची, जागतिक बॅँकेची स्थापना करण्यात आली. गॅटची स्थापना करण्यात येऊन अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याचे काम करण्यात आले. याच कालावधीत दीर्घकालीन विकासाच्या योजना आखण्यात आल्या. तेव्हापासून अईथिक विकासाला सुरुवात झाली. याच वेळी भारताने संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live

Latest Images