Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मोटरसायकल विक्री मंदावली

$
0
0

अरविंद जाधव, ना​शिक

गेल्या ​आर्थिक वर्षात शहरातील वाहनधारकांनी मोपेड व स्कूटर खरेदीस प्राधान्य दिल्याने मोटरसायकलच्या विक्रीवर परिणाम झाला. २०१४-१५ या आर्थिक वर्षात मोपेड व स्कूटरची विक्री ५ हजार ९५ इतकी वाढली. ग्राहकाची रूची बदलल्याने गत वर्षात मोटरसायकलची विक्री ३ हजार ९०९ इतकी घटली आहे. मोटरकारच्या विक्रीत देखील किरकोळ वाढ झाली असून, त्याचा फटका प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) महसुलाला बसला आहे.

शहरी भागातील रस्ते, सामानाची वाहतूक, मायलेज आदी मुद्दे लक्षात घेता दुचाकी कंपन्यांनी स्कूटर तसेच मोपेडला आधुनिक टच देऊन बाजारात आणले. २०१३-१४ या आर्थिक वर्षात प्रादेशिक परिवहन विभागाकडे ५९ हजार ८३० मोटरसायकलींची नोंदणी करण्यात आली होती. तेच १७ हजार ७९ स्कूटर तर अवघ्या ४०४ नवीन मोपडेचे रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. तेच गत आर्थिक वर्षात मोटरसायकलींचा आकडा मात्र ५५ हजार ९२१ पर्यंत पोहचला. याउलट, स्कूटरची विक्री २१ हजार ३८६ पर्यंत गेली. मोपेडचा आकडा सुध्दा ४०४ वरून थेट १ हजार १९२ वर पोहचला. गरज आणि रूची बदलत असल्याने मोटरसायकलऐवजी ग्राहक मोपेडला पसंती देत असल्याचे वाहन विक्री व्यवसायातील एका व्यवसायिकाने स्पष्ट केले. सर्व प्रकारच्या दुचाकींच्या विक्रीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली असून २०१३-१४ या वर्षात दुचाकींची एकूण विक्री ७७ हजार ३१३ इतकी होती. तेच २०१४-१५ मध्ये नोंदणी झालेल्या दुचाकींची संख्या ७८ हजार ४९९ वर पोहचली. नवीन वाहनांच्या नोंदणीमधून आरटीओ विभागाला महसूल मिळतो. विशेषतः चारचाकी वाहनांच्या नोंदणीवर महसुलाचे गणित अवलंबून असते. गत आर्थिक मोटरकारच्या विक्रीत अपेक्षेइतकी वाढ झाली नाही. २०१३-१४ च्या तुलनेत गत वर्षात अवघ्या ४५० कारची भर पडली. एकूणच नोंदणी झालेल्या वाहनांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याने त्याचा परिणाम महसुलावर पडला आहे. गत वर्षासाठी विभागाला २१७ कोटी ८१ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, नवीन वाहनांच्या नोंदणीत वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे आरटीओकडे १९० कोटी ८२ लाख रूपयांचे उत्पन्न जमा झाले.

स्कूल बसेसची संख्या वाढली

सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात आरटीओकडे अवघ्या ९० स्कूल बसेसची नोंद झाली होती. तेच २०१४-१५ या आर्थिक वर्षात स्कूल बसेसची संख्या २३१ पर्यंत पोहचली आहे. स्कूल बसबाबत नवीन नियम लागू झाले असून, आमच्या विभागामार्फत जनजागृती अभियानही राबवले जाते. विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी पालकांसह शाळाही पुढे येत असल्याने या वर्षात स्कूल बसेसची संख्या वाढली, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांचा जीव मोलाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाही मिरवणूक पारंपरिक मार्गाने न्यावी की नवीन हे महत्वाचे नाही. मिरवणुकीचा मार्ग बदलल्याने कुंभमेळ्याच्या परंपरांना धक्का पोहोचत नाही. मिरवणूक मार्गापेक्षा भाविकांचा जीव अधिक मोलाचा असतो असे सांगत गोवर्धनमठ पुरीचे उत्तराधिपती जगदगुरू शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद देवतीर्थ यांनी शाही मिरवणुकीच्या मार्गावरून उद्भवणारे वाद निरर्थक असल्याचे शनिवारी नाशिक येथे स्पष्ट केले.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिकला भेट देऊन साधूग्राम तसेच, गोदाघाटावरील कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, 'कुंभमेळ्यात साधू-महंत आणि भाविकांना प्रदुषित पाण्यात स्नान करावे लागले तर ते सरकार आणि प्रशासनासाठी कलंक ठरेल. गोदेचे सध्याचे रूप पहाता कुंभमेळा होण्यालायक परिस्थिती दिसत नाही. मात्र केंद्र आणि राज्यातील हिंदुत्ववादी सरकार अजूनही ही परिस्थिती बदलू शकते. त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी ती अवश्य बदलायला हवी. कुंभमेळा हा सनातन धर्मियांचा समागम आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या साधू-महंत, भाविकांना स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी प्रशासनाने घ्यावी. गोदेचे पात्र प्रवाही नसल्याच्या तसेच, ते खूपच प्रदुषित झाल्याच्या भाविकांच्या तक्रारी आहेत. गोदा प्रदूषणमुक्त व्हायलाच हवी. त्यासाठी निधी कमी पडणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

अलाहाबादला २०१० मध्ये तर हरिद्वारला २०१३ मध्ये कुंभमेळा झाला. तेथील सरकारने १२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. अलाहाबादला नगरविकास मंत्री मुस्लिम होते. तरीही त्यांनी भाविकांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. हरिद्वारला मात्र कुंभमेळा काळात आर्थिक घोटाळा झाला. त्याची चौकशी देखील सुरू झाली आहे. देशात आणि महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच कुंभमेळा होत आहे. त्यामुळे त्यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनात पुढाकार घ्यावा आणि निधीची कमतरताही भासू देऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, नाशिकची स्तुती केली जावी बदनामी नव्हे अशी अपेक्षाही शंकराचार्यांनी व्यक्त केली.

नदी प्रदुषित होते मात्र ती अपवित्र नसते. त्यामुळे नदी प्रदुषित असली तरी श्रध्दाळू त्यामध्ये स्नान करतील. सरकारने आणि प्रशासनाने त्यांना प्रदुषित पाण्यात स्नान करावयास भाग पाडले तर तो त्यांच्याच कारकीर्दीला कलंक ठरेल. याउलट साधू आणि भाविक प्रदूषण विरहीत पाण्यात स्नान करू शकले तर त्यांचे मन प्रसन्न होईल, असे शंकराचार्य म्हणाले. त्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, लक्ष्मण मंडाले यांच्यासह साधुग्रामची पाहणी केली.

नाले, कारखान्यांमुळे प्रदूषण

भाविकांनी स्नान केल्याने नदी प्रदुषित होत नाही, तर ती पवित्र होत जाते. नाले, कारखान्यांमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे नदी प्रदुषित झाली आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर सरकारला काम करावेच लागते. केंद्र आणि राज्य सरकारने स्वयंस्फूर्तीने त्यांच्याकडील यंत्रणेला गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याच्या कामात झोकून दिले तर ती कुंभमेळ्यापूर्वीच स्वच्छ होईल, असा विश्वास शंकराचार्यांनी व्यक्त केला.

सिंहस्थात अतिरिक्त मोबाइल टॉवर

कुंभमेळा काळात लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने संपर्कयंत्रणा कोलमडण्याची भीती आहे. संपर्कयंत्रणा अखंडीतपणे सुरू रहावी यासाठी शहरात आणखी २१४ मोबाइल टॉवर उभारण्याची तयारी बीएसएनएलसह मोबाईल कंपन्यांनी दर्शविली आहे. मात्र ही संख्या वाढविण्याची तयारी ठेवावी लागेल अशा सूचना जिल्हाधिकारी कुशवाह यांनी मोबाईल कंपन्यांना दिल्या आहेत. ‍कुंभमेळा काळात व विशेषतः पर्वणीकाळात संपर्कयंत्रणा अखंडितपणे सुरू राहणे आवश्यक आहे. विशेषत: आपत्कालीन परिस्थिती उदभवलीच तर वेळप्रसंगी मदतीसाठी मोबाईल सारखी यंत्रणाच अधिक उपयुक्त ठरू शकणार आहे. मात्र, पर्वणी काळात लाखो लोक शहरात दाखल होणार असल्याने टॉवरवर ताण येऊन मोबाईल व दूरध्वनी संपर्क यंत्रणा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बीएसएनएलसह मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यात शहर आणि त्र्यंबकेश्वरमधील एकूणच नेटवर्क क्षमता किती यावर चर्चा करण्यात आली. होणारी गर्दी आणि मोबाईल कंपन्यांची क्षमता याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्यासाठी २१४ मोबाइल टॉवर

$
0
0

नाशिक ः सिंहस्थ कुंभमेळा काळात संपर्कयंत्रणा अखंडीतपणे सुरू रहावी यासाठी शहरात आणखी २१४ मोबाइल टॉवर उभारण्याची तयारी बीएसएनएलसह मोबाइल कंपन्यांनी दर्शविली आहे.

ही संख्या वाढविण्याची तयारी ठेवावी लागेल अशा सूचना जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी मोबाइल कंपन्यांना दिल्या आहेत. या काळात संपर्कयंत्रणा अखंडितपणे राहणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थिती उद् भवलीच तर वेळप्रसंगी मदतीसाठी मोबाइल सारखी यंत्रणाच उपयुक्त ठरू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये डी. फार्मसी कॉलेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी एक गुडन्यूज असून, पुढील शैक्षणिक वर्षात नवीन डी. फार्मसी कॉलेज कार्यरत होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातून आलेल्या एकूण चार प्रस्तावांपैकी एक प्रस्ताव सरकारकडून मान्य होण्याची शक्यता आहे.

ज्या काळात शिक्षण क्षेत्राविषयीच जागरुकता कमी होती, अशा ७० च्या दशकामध्ये नाशिकला फार्मसी कॉलेज सुरु झाले. राज्यातील मोजक्या फार्मसी कॉलेजपैकीच ते एक होते. तेव्हापासून नाशिक जिल्ह्यात फार्मसी शिक्षणाचा विस्तार अफाट झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यामध्ये फार्मसीचे एकूण १६ कॉलेज कार्यरत आहेत. बारावीनंतर फार्मसीचा डिप्लोमा करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांसून वाढत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १६ कॉलेजमध्ये डी. फार्मसीचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. नाशिक शहर परिसरात बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या फार्मसी कंपन्याही कार्यरत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात फार्मसी क्षेत्रानी मोठी मुसंडी मारली आहे. हे सर्व लक्षात घेत नाशिक शहरातून २ आणि मालेगाव येथीन २ अशा एकूण चार नवीन कॉलेजेसचा प्रस्ताव तंत्र शिक्षण संचलनालयाकडे (डीटीई) आला आहे. संचालनालयाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने या प्रस्तावांची शहानिशा करून हे चारही प्रस्ताव संचालकांकडे पाठविले आहेत.

नाशिक विभागाच्या आराखड्याचा विचार करता नाशिकमध्ये आणखी एक डी. फार्मसी कॉलेज सुरु होऊ शकते. ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे हे कॉलेज या चार प्रस्तावांपैकीच एक असणार आहे. त्यास संचालनालयाने मान्यता दिल्यानंतर पुढील वर्षापासून डी. फार्मसीचे नवे कॉलेज अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन कॉलेजची संधी उपलब्ध होणार आहे.

नवीन डी फार्मसी कॉलेजचे एकूण ४ प्रस्ताव आमच्याकडे आले होते. हे चारही प्रस्ताव आम्ही संचालक कार्यालयाकडे पाठविले आहेत. - डॉ. डी. आर. नंदनवार, सहसंचालक, डीटीई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बळीराम हिरे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मालेगाव

माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. बळीराम हिरे यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. हिरे यांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी ३ वाजता कॉलेजरोडवरील इंद्रप्रस्थ या निवासस्थानापासून निघणार आहे. त्यानंतर एमबीए कॉलेज, गोळीबार मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना मुंबई येथे उपचारार्थ नेले जात होते. मात्र, प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

उत्तम वैद्यकीय कारकीर्द सुरू असतानाच डॉ. हिरे १९७२ साली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात सक्रिय झाले. सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर व व्यंकटराव हिरे यांच्या अकाली निधनानंतर डॉ. हिरे यांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे नेतृत्व केले. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर नितांत श्रद्धा असलेले डॉ. हिरे यांनी राज्य मंत्रिमंडळात शालेय शिक्षण, आरोग्य, पाटबंधारे यासारखी विविध खाती भूषविली. आरोग्यमंत्री पदाची त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत त्यांचे नाव आल्यानंतर मात्र १९८५ साली त्यांना उमेदवारीच नाकारण्यात आली. त्यानंतर मात्र त्यांच्या कारकीर्दीला ग्रहण लागले. पुढे त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती पत्करली. बळीराम हिरे यांच्या पश्चात पत्नी इंदिरा, चिरंजीव व मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रसाद, स्नुषा गीतांजली, कन्या डॉ. सुचेता बच्छाव, डॉ. निता शुक्ला, तसेच जावई, नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या काही वर्षात सक्रीय राजकरणातून ते निवृत्त झाले होते; मात्र तरीदेखील सामान्य मालेगावकरांशी त्यांचे नाते कायम होते. वयाची ८० वर्ष ओलांडल्यावर देखील मॉर्निंग वॉक आणि इव्हीनिग वॉकसाठी अगदी सहज फिरायला निघालेले डॉ. मालेगाकरांच्या मनात आदराचे स्थान कायम राखून होते.

इंदिरानिष्ठ कार्यकर्ता हरपला! - जयप्रकाश छाजेड, माजी आमदार

सुरुवातीला बळीराम हिरे हे प्रख्यात डॉक्टर म्हणून मालेगाव तालुक्यात प्रसिध्द होते. कोणालाही मदत करणारे, संवेदनशील व्यक्तिमत्त्व, मृदृ स्वभावासाठी ते सर्वपरिचित होते. १९७२ ते १९८५ पर्यंत ते नाशिक जिल्ह्याचे अनभि‌षिक्त सम्राट होते. नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्याच्या राजकारणात त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. विविध मंत्रिपदे भूषवली. गांधी घराण्याशी त्यांची अत्यंत जवळीक होती. कमीत कमी शत्रू असणारा राजकारणी अशीच त्यांची ओळख होती.

प्रस्थापितांना शह देण्यासाठी इंदिरा गांधीनी बळीराम हिरे यांना राजकारणात आणले. दाभाडी मतदारसंघात व्यंकटराव हिरेंऐवजी बळीराम हिरे यांना उमेदवारी दिली. यामुळे जिल्ह्याचे राजकारण पूर्ण बदलले. त्यावेळी बळीराम हिरे, विलास लोणारी, मोठाभाऊ भामरे हे नवीन चेहरे निवडून आले. सन १९७२ ते ७८ या काळात एकच काँग्रेस होती. मात्र, सन १९७८ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळी बळीराम हिरेंसह चार ते पाच कार्यकर्त्यांनी एकत्र येत इंदिरा काँग्रेस नाशिकमध्ये रूजवली. सन १९७८ मध्‍येही डॉ. बळीराम हिरे हे निवडून आले. त्यावेळी त्यांना आरोग्य मंत्रिपदही मिळाले. त्यांनी सभागृहात उत्तम काम केले. गांधी घराण्याशी ते एकनिष्ठ होते. सरकार तुटले पण डॉ. ‌‌हिरे शरद पवारांसोबत गेले नाहीत. सन १९८० मध्येही डॉ. हिरे विधानसभेवर निवडून आले. त्यांच्यावर ऊर्जा मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मुख्यमंत्रिपदाची संधी त्यांच्याकडे चालून आली होती. मात्र, ऐनवेळेस बाबासाहेब भोसले यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. सन १९८४ मध्येही बळीराम हिरे मंत्रिमंडळात उत्तम काम करीत होते. जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव होता. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचे ते अनभिषिक्त सम्राट होते. शत्रूशी ते प्रेमाने बोलत. सर्वांशी ते नेहमी चांगले बोलत असत. सन १९८५ मध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट जाहीर झाले होते. मात्र, डॉ. हिरे यांना राज्याच्या राजकारणातच जास्त रस होता. त्यांना लोकसभेवर जाण्याची इच्छा नव्हती. त्यावेळी सर्वांनी दिल्लीवारी करून मुरलीधर माने यांचे नाव पुढे केले. मात्र, सन १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व निवडणुकीचे तिकीट घेण्यासाठी गेल्यावरच विमानतळावरच डॉ. हिरे यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी एल. के. निकम यांना तिकीट जाहीर झाल्याची माहिती मिळाल्याने आश्चर्याचा धक्काच बसला. तिकीट मिळविण्यासाठी पुन्हा दिल्लीवारी करून इंदिराताईं ‌हिरेंना तिकीट दिले. त्यावेळी पुलोदचे सर्व १४ आमदार निवडून आले. डॉ. हिरे यांचे तिकीट कापले गेल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला. यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला घसरण लागली. त्यांनी अपक्ष उमेदवारीही केली. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यांच्या निष्ठेबद्दल शंका नव्हती. गांधी घराण्याशी ते एकनिष्ठ राहिले. कमीत कमी शत्रू असणारा राजकारणी, अशी त्यांची ओळख होती.

रुग्णसेवक अन् जनसेवक निमाला

बळीराम हिरे यांच्या निधनाने सामान्यांचा नेता हरपला अशा शब्दांत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अत्यंत वादातीत स्वभाव असलेले डॉक्टर सगळ्यांसाठी अत्यंत प्रेमळ व्यक्ती होते, अशाही भावना व्यक्त करण्यात आली आहेत.

मालेगाव तसेच उत्तर महाराष्ट्राचे ते जेष्ठ नेते होते. संपूर्ण राजकीय जीवन हे सामान्यांच्या कल्याणासाठी वाहिले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मालेगावचे नेतृत्व आणि नावलौकिक वाढविला. मालेगावच्या विकासासाठी नेहमीच ते प्रयत्नशील राहिले. त्यांच्या निधनाने मालेगावच्या विकासासाठी झटणारा नेता हरपला आहे. - दादा भुसे, सहकार राज्यमंत्री

डॉ. बळीराम हिरे हे आमचे मार्गदर्शक होते. आमची पिढी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत राजकारणात आली. त्यांच्या निधनाने मालेगाव आणि जिल्ह्याच्या राजकारणातील वटवृक्ष हरवला आहे. मालेगावच्या विकासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. ते एक सिद्धहस्त डॉक्टर होते. राजकारणात असूनही, त्यांनी रुग्णांची सेवा केली. - डॉ. तुषार शेवाळे, काँग्रेस नेते

डॉ. बळीराम हिरे यांनी वैद्यकीय सेवेत असताना रुग्णांची सेवा केली. तसेच, राजकारणात देखील त्यांनी नेहमीच जनतेची सेवा केली. आपल्या राजकीय कारकीर्दीत स्वच्छ आणि समाजहिताच्या राजकारणालाच त्यांनी प्राधान्य दिले. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही सामान्य जनतेशी असलेली त्यांची कायम होती. राजकारणात फार थोडी व्यक्तिमत्वे अजातशत्रू असतात. डॉक्टर हे त्यातील एक होते. - सुरेश निकम, भाजप नेते

बळीराम हिरे हे व्यवसायाने डॉक्टर असल्याने सामाजिक जवळीक त्यांच्या स्वभावातच होती. एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या हिरे यांनी राज्य, देश पातळीवर मालेगावचे नेतृत्व केले. नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शक होते. राजकारणात असूनही एक व्यासंगी, अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टरांचे होते. - राजेंद्र भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस नेते

राजकीय जीवनात उच्चपदावर कर्तृत्ववान कारकीर्दीनंतरही सामान्य कार्यकर्त्याला ते कधीच विसरले नाही. सामान्य माणसासाठी त्यांची दारे नेहमीच खुली राहिली. अलीकडे तर सक्रिय राजकरणातून निवृत्त झाल्यावर तर ते अधिकच सामान्य लोकांशी भेटत, बोलत. त्यामुळे सामान्यांची सुख दुखे जाणून घेणारा नेता हरपला आहे. - श्रीकांत वाघ, कार्यकर्ता

डॉ. बळीराम हिरे यांच्या रुपाने महाराष्ट्रात एक चांगला निर्णय घेणारा नेता हरपला. त्यांच्या निधनाने जिल्ह्याने एक उत्तुंग नेतृत्व हिरावले गेले आहे. त्यांच्या निधनामुळे शहर आणि जिल्हा काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. - शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक गाईड अॅप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी देशभरातील पर्यटकांसाठी उपयुक्त ठरेल, अशी नाशिकची सर्वांगिण माहिती असलेले नाशिक गाईड या मोबाइल अॅपचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सिंहस्थात नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी हा अॅप मार्गदर्शकाची भूमिका निभावणार आहे.

माजी मंत्री विनायकदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार आदी मान्यवर उपस्थित होते. ए.सी.इ. सोलुशन्स यांनी तयार केलेले हे मोबाइल अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर येथून विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपच्या मदतीने नाशिक जिल्ह्याची इत्यंभूत माहिती एका क्लिकसरशी उपलब्ध होणार आहे. यात जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रे, पर्यटनस्थळे, वाहतूक व्यवस्था, बातम्या, महत्त्वाचे संपर्क क्रमांक, छायाचित्रे तसेच इतर महत्वाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. सिंहस्थात या अॅपचा मोठा फायदा होणार आहे.

हा मोबाइल अॅप बनविण्यासाठी युगंधर पगार व नवीन विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक तळपे, युवराज कदम, गिरीष अहिरराव, जितेंद्र महाजन, रोशन सोनवणे, कांचन ढिकले, रेणुका शिंदे, अपर्णा पाटील यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेटसाठीचे दोन कोटी पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

संसद सदस्यांच्या क्रिकेटच्या मॅचेस होतात. दरवर्षी अनेक खासदार त्यात सहभागी होतात. येथील क्रिकेटचा विकास व्हावा म्हणून आयपीएलच्या माध्यमातून दोन कोटी रुपये दिले. मात्र, त्या पैशांचे काय झाले? याचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

नाशिक ​जिल्हा क्रिकेट असो​सिएशनच्या नूतनीकरण कार्यालयाचे उद्‌घाटन, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष खासदार धैर्यशीलराव पवार यांच्या छायाचित्राचे तसेच बॉलिंग मशिनच्या अनावरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धैर्यशीलराव पवार खासदार असताना त्यांना क्रिकेटचा लळा होता. त्यातूनच त्यांनी संसद सदस्यांसाठी क्रिकेटचे सामने सुरू केले. लोकसभा विरुध्द राज्यसभा, पंतप्रधान विरुध्द लोकसभा अध्यक्ष असे सामने तेव्हापासून दरवर्षी आयोजित होतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असताना आयपीएल सामन्यांना सुरुवात झाली. त्यात आर्थिक उलाढाल मोठी असल्याने संसद सदस्यांच्या क्रिकेटसाठी चांगले प्रयत्न करण्याची मागणी केली जाऊ लागली. म्हणून आयपीएलच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची तरतूद करून पैसे देण्यात आले. नंतर, या पैशांचे काय झाले असा प्रश्न अनेकदा संबंधितांना विचारला. तेव्हा, पैसे जपून ठेवले आहेत. पैशांवरील व्याजही मिळत असल्याचे उत्तरे देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. तालुकास्तरावरून देखील मोठ्या संख्येने प्रतिभावंत खेळाडू पुढे येत असून, क्रिकेट खऱ्या अर्थाने देशाचा धर्म झाला असल्याची प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली. आयपीएलमुळे उदयोन्मुख खेळांडूना मोठे व्यासपीठ उपब्लध होत असल्याचे सांगत त्यांनी त्याची पाठराखण केली. तसेच, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन झपाट्याने काम करीत असून, त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे कौतुकही त्यांनी केले.

कार्यक्रमास माजी मंत्री विनायकदादा पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिक्रे, माजी खासदार समीर भुजबळ, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, विलास लोणारी, सुधाकर शानबाग, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते.

अतिरेकी प्रवृत्तीला राज्यात थारा नाही

एमआयएम पक्षाकडून एका विशिष्ट वर्गासाठी संशयात्मक भूमिका घेतली जाते. त्यामुळे अशा प्रकारची अतिरेकी विचाराच्या लोकांना महाराष्ट्र स्वीकारणार नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दमणगंगा आणि नार-पार खोऱ्यातील थेंब अन् थेंब पाणी महाराष्ट्राने अडविले पाहिजे, असे सांगून हे पाणी गोदावरी खोऱ्यात आणले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. खासदार उदयनराजे आणि विधानपरिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकरांमधील वाद आपण मिटवू, असे आश्वासनही त्यांनी दिले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना पवारांनी विविध विषयांवर भाष्य केले. एमआयएमच्या ओवेसी बंधूच्या आक्रमक भाषणांवर बोलताना पवारांनी मुस्लिम लीगचा दाखला दिला. पाण्यावरून प्रादेशिक वाद निर्माण होणे योग्य नाही. दमणगंगा आणि नार-पार खोऱ्यातील थेंब आणि थेंब पाणी महाराष्ट्राने अडविले पाहिजे, असे सांगून हे पाणी गोदावरी खोऱ्यात आणले पाहिजे असे नमूद केले. खासदार उदयनराजे आणि विधानपरिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकरांमधील वाद आपण मिटवू असे आश्वासनही त्यांनी दिले. सोबतच आदिवासींच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र पक्षाची भाषा करणाऱ्या माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या विधानांची चिंता नाही. ते पक्षाचे जाणकार नेते आहेत. आदिवासींच्या तीव्रतेपोटी बोलले असतील असे सांगत त्यांना समजावू असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जैतापूर प्रकल्प हा राज्याचा हिताचा असून, त्याला आपला पाठिंबा असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. यातून तारापूरप्रमाणेच स्वस्त वीज मिळणार आहे. या विजेमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनं या प्रकल्पाला समर्थन केले पाहिजे. मात्र त्यांनी शिवसेनेच्या विरोधाचा समाचार घेतला. केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे सत्तेत असताना घेतलेला निर्णय स्वीकारला पाहिजे. भाजपने शिवसेनेची समजूत घातली पाहिजे. मात्र सत्तेत राहून विरोध करणे योग्य नाही असे सांगत निर्णय पटत नसेल तर शिवसेनेन सत्तेतून बाहेर पडावे असा सल्ला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शिवसेनेला दिला आहे.

स्वतंत्र विदर्भाला विरोध

राष्ट्रवादीचा स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा असला तरी, पवारांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून पलटी खाल्ली असून, वेगळ्या विदर्भाला विरोध केला आहे. १०८ हुतात्म्यांच्या बल‌दिानातून एकसंघ महाराष्ट्र अस्तित्वात आला आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाला आपला विरोध असून, मतदानाच्या माध्यमातूनच स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न सुटला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 'वेगळा विदर्भ झाला पाहिजे हे जनतेला वाटले पाहिजे. मात्र तसे चित्र सध्यातरी नाही. मतदानामार्फत स्वंतत्र विदर्भाचा निर्णय झाला पाहिजे. गोवा राज्याप्रमाणेच नागरिकांनी स्वंतत्र विदर्भाबाबतचा निर्णय घेतला पाहिजे या मताचा मी आहे. मात्र आज राज्याच्या सत्तेत राज्याच्या ऐक्याच्या विरोधातील लोक आहेत. स्वंतत्र विदर्भाची त्यांची भूमिका आहे. राज्यकर्ते हे राज्य एकसंघ ठेवण्याच्या विचाराचे असले पाह‌जिे. मात्र आजचे चित्र वेगळे असून, राज्य एकसंघ ठेवायचे की, स्वतंत्र ठेवायचे अशा संभ्रमात असलेले लोक सत्तेत आहेत. अशी टीका त्यांनी यावेळी केली.

हेरगिरीचे समर्थन

पंडित नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांची हेरगिरी केल्याच्या घटनेसंदर्भात बोलताना शरद पवारांनी कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी पोल‌सिच परस्पर पाळत ठेवतात. याला हेरगिरी म्हणत नाहीत. माझ्यावर सुरक्षा यंत्रणांकडून लक्ष ठेवले जाते. त्यात काही वावगे असल्याचे मला वाटत नाही, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकटकाळात शेतकरी वाऱ्यावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र आणि राज्य सरकारने संकटकाळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून, शेती आणि शेतकरी दोन्ही सरकारच्या प्राधान्यक्रमात नाहीत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विक्रमी परदेश दौऱ्यांमध्ये देशातील शेतकऱ्यांचे प्रतिबिंब दिसत नसल्याची टीका माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तर जैतापूर प्रकल्प राज्याच्या हिताचा आहे, हे पटत नसेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. स्वतंत्र विदर्भाला विरोध असल्याचे सांगत मतदानाच्या माध्यमातूनच विदर्भाचा प्रश्न सुटला पाहिजे, असेही त्यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना पवारांनी अवकाळी पाऊस आणि गारप‌िटीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. संकटात मदत करण्याची जबाबदारी ही सरकारची असते. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी राह‌िले पाह‌िजे. केंद्राच्या आपत्ती निधीतून मदत करण्यासाठी समितीही कार्यरत असते. अर्थसंकल्पात तरतूदही केलेली असते. समितीच्या बैठका झाल्यात मात्र, मदतीची घोषणा झालेली नाही. दुर्दैवाने चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेल्याने शेतकरी वाऱ्यावर असल्यासारखा वाटतो आहे. केंद्र आणि राज्याच्या दिशा आणि नव्या धोरणात या देशातील बहुसंख्य घटक असलेला शेतकरी आणि शेती दिसत नाही. यांची प्राथमिकता दुसरीच असून, हे भारताला शोभणारे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौऱ्यांचा दहा महिन्यातच विक्रम केला आहे. या परदेश विक्रमात शेतकऱ्यांचे प्रतिबिंब दिसले नाही. बाहेरच्या देशांशी करार करताना, शेतीसंदर्भात नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असायला हवा. मात्र तसे कुठेच दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीसह कर्जाचे पुर्नगठनही करून दिले पाहिजे. नवीन पिकपानीसाठी सवलत दिली पाहिजे. परंतु असे निर्णय होत नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडू असे आश्वासन देत ते म्हणाले,' लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, मात्र अपेक्षा पूर्तीचा अधिकार लोकांनी आम्हाला दिला नसून, फक्त गाऱ्हाणे मांडण्याचा अधिकार दिल्याचा टोला पवारांनी शेतकऱ्यांना लगावला.

गडकरींवरही ‌टीका

'शेतकऱ्यांनी देवाच्या आणि सरकारच्या भरवश्यावर राहू नये', असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही पवारांनी टीका केली. 'गडकरींना ही उपरती सत्ता आल्यानंतर लवकरच आली.' असा टोला त्यांनी हाणत 'असे वक्तव्य करू नये' असा सल्ला दिला. तर भाजपने देशासमोरील प्रश्नांवर बोलले पाहिजे असे सांगून वेद पुराणांतून बाहेर पडा असा टोला लगावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलमुक्तीला शरद पवारांचा विरोध

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

राज्यातील जनतेला टोलमुक्त करण्याच्या शिवसेना-भाजप युती सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध दर्शवला आहे. 'फडणवीस सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असून तो सवंग प्रसिद्धीसाठी घेण्यात आला आहे,' अशी टीका पवार यांनी केली आहे. पवार यांच्या या भूमिकेमुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भाजप-शिवसेनेच्या सरकारने राज्याला टप्प्याटप्प्यानं टोलमुक्त करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील १२ टोलनाके कायमचे बंद करताना ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी जाहीर केली. या निर्णयामुळं सर्वसामान्य सुखावले असताना शरद पवारांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे.

नाशिक येथे बोलताना पवार यांनी युती सरकारच्या टोलमुक्तीच्या निर्णयावर टीका केली. 'जगात सर्वत्र टोल नाके आहेत, दळणवळणासाठी खासगी गुतंवणूक केली जाते. भांडवली गुंतवणुकीसाठी असे निर्णय घेतले जातात. त्यातून रस्त्यांचा दर्जा सुधारतो. त्यामुळे लोकही खुशीने टोल भरतात,' असं पवार म्हणाले. 'राज्यात टोलची सुरुवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच केली होती, असं सांगतानाच, 'भाजपनं काल घेतलेला टोलबंदीचा निर्णय सवंग लोकप्रियतेसाठी आहे. टोलमुक्ती केल्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे पैसे कुठून आणणार? राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा वाईट परिणाम होईल, असा इशारा त्यांनी दिला. 'लोकप्रियता मिळत असली तर रस्ते खराब असतील तरी चालतील, लोकांचं आरोग्य धोक्यात आलं तरी चालेल ही भूमिका योग्य नाही.' असंही मतही त्यांनी मांडलं.

रन फॉर फन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

सकाळच्या कोवळ्या उन्हात, लष्कराच्या कडक शिस्तीचे वातावरण अन् जवानांनी भरलेले मैदान पाहून कुणालाही वाटेल की लष्करी कवायतीची तयारी सुरू आहे. मैदानावर धावण्यात आले तेही कुटुंबातील सदस्यांसह. मात्र, ‌नियमित परेड म्हणून नव्हे उद्याचे सक्षम लष्करी वीर जवान, अधिकारी घडविण्यासाठी. निमित्त होते लष्कराच्या १३६, फिल्ड रेजिमेंट मैदानावर स्कूल ऑफ आर्टिलरीच्या ७४ व्या स्थापना दिनाचे. 'रन फॉर फन' या कार्यक्रमात लष्करी अधिकारी कुटुंबियांसह सहभागी झाले.

देवळालीत ७४ वर्षांपूर्वी म्हणजेच १५ एप्रिल १९१८ साली लष्करी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच १९२२ मध्ये पाकिस्तानातील काकुल शहरात हे केंद्र हलविण्यात आले. परंतु, देवळालीमध्ये १५ एप्रिल १९४१ साली हे केंद्र पुन्हा आणण्यात आले. मिलिटरीतील कौशल्यपूर्ण कार्यप्रणालीवर आधारित देणारे सर्वोत्कृष्ट सैनिकी अधिकारी प्रशिक्षण देणारे प्रथम श्रेणीचे एकमेव केंद्र म्हणून मान्यता आहे. या जागतिक दर्जाच्या एकमेव संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्धाटन 'रन फॉर फन' या कार्यक्रमाने रविवारी झाले. या वेळी स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडण्ट लेफ्टनण्ट जनरल ए. के. मिश्रा (अतिविशेष सेवा मेडल) यांच्या हस्ते ध्वज दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या रनमध्ये लष्करी अधिकारी आणि सेवानिवृत्त लष्करी अधिकारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिला, मुले, मुली असे सुमारे ५०० जण सहभागी झाले.

यावेळी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देतांना लेफ्टनंट जनरल ए. के. मिश्रा हे म्हणाले, की अशा स्पर्धांमधून उद्याचे नवे लष्करी अधिकारी निर्माण होण्यास मदत होते त्यामुळे आम्ही अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने वेळोवेळी करत असतो. डेप्युटी कमांडर मेजर जनरल राजीव मिश्रा, ब्रिगेडिअर संजीव तिवारी, सेवानिवृत्त ब्रिगेडिअर जी. व्ही. जी. प्रसाद, सेवानिवृत्त ब्रिगेडिअर के. व्ही. शांडील, सेवानिवृत्त लेफ्ट. कर्नल एच. एन. दांडेकर, सेवानिवृत्त ब्रिगेडिअर ए. के. गर्ग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा प्रत्यय देवळालीतही दिसून आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी कार्यक्रमाच्या समारोपानंतर लगेचच सारा परिसर स्वच्छ केला.

विजेते पुढीलप्रमाणे

१२ वर्षाआतील गट (२ किलोमीटर) : १) संदीप चौहान, २) अनिश, ३) आनंद

१२ वर्षावरील गट (३ किलोमीटर) : १) रोहित नायर, २) सौरव कुमार, ३) प्रेयांश राठी

महिला गट (२ किलोमीटर): १) अमिता, २) देवराणी, ३) प्रियंका

खुला गट (५ किलोमीटर) : १) लेफ्ट. रोहित कुमार झा, २) लेफ्ट. मनोज कुमार, ३) लेफ्ट. विकास कमल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाड्यांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेच्या नेहमीच आरोग्य धोक्यात असलेल्या घंटागाड्यांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) तपासणी करून नोटिसा बजावल्या. यात नादुरुस्त असलेल्य घंटागाड्या भंगारात जमा करण्याचे आदेश 'आरटीओ'ने घंटागाडी ठेकेदाराला बजावले आहेत. परंतु, केवळ नोटीसा देऊन घंटागाड्यांची दशा सुधारणार काय, असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.

महापालिकेच्या ठेकेदारामार्फत चालविण्यात येत असलेल्या घंटागाड्यांची दरवर्षी 'आरटीओ'कडून पासिंग करून घ्यावी लागतात. परंतु, घंटागाडी ठेकेदाराकडून घंटागाड्यांचीच पासिंग करण्यात आलेली नाही. यामुळे नेहमीच आरोग्य धोक्यात असलेल्या घंटागाड्यांची 'आरटीओ'ने सातपूर क्लब हाऊस येथे उभ्या राहत असलेल्या घंटागाड्यांची तपासणी करत पासिंग करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. तसेच नादुरुस्त व निकामी झालेल्या घंटागाड्यांना भंगारात जमा करण्याचे आदेश देखील आरटीओने घंटागाडी ठेकेदाराला दिले आहेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून धोक्यात असलेल्या घंटागाड्यांची पासिंग 'आरटीओ'ने दंड भरून करुन न घेता वाहनांची व्यवस्थित दुरुस्ती करूनच पासिंग करावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. त्यातच रेती, डबरचा व्यवसाय करणाऱ्यांच्या गाड्यांची पासिंग 'आरटीओ' संपूर्ण वाहने तपासून करते. त्याच प्रमाणे घंटागाड्यांची पासिंग करतांना पूर्णपणे दुरुस्त असलेल्या घंटागाडीलाच पासिंग 'आरटीओ'ने देण्याची गरज आहे. त्यातच घंटागाडी ठेकेदाराकडून घंटागाड्याच पासिंग केल्या जात नसल्याने 'आरटीओ'ने सातपूर क्लब हाऊस मैदानाच्या बाहेर उभ्या राहत असलेल्या घंटागाड्यांच्या ठिकाणी येत वाहनांची तपासणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याचे पाणी सुरक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नार-पार आणि दमणगंगा या दोन्ही प्रकल्पांचा केवळ डीपीआर तयार झाला आहे. पाणी वाटपाबाबत कोणताही करार गुजरात राज्य किंवा केंद्र सरकारशी झालेला नाही. प्रकल्पाच्या पाणी वाटपाबाबत अद्याप निर्णय व्हायचा असून राज्याच्या वाटेचे एक थेंबही पाणी गुजरातला जाणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

नार-पार योजनेबाबत मुंबईतील विधान भवनाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये विशेष सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नार-पार आणि दमणगंगेचे महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी गुजरातला दिले जाणार नाही, असे जलसंपदा मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान भवनाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये योजनेबाबत विधीमंडळ सदस्यांना असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी त्यांनी योजनेबाबत सादरीकरण केले. एखाद्या विभागामार्फत सेन्ट्रल हॉलमध्ये सादरीकरण होण्याची ही पहिलीच वेळ होती.

विधीमंडळात महाराष्ट्राच्या वाटेचे पाणी गुजरातला जाण्याबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांना उत्तर देताना जलसंपदामंत्र्यांनी सदस्यांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी सविस्तर सादरीकरण करण्याची तयारी दाखविली होती. त्यासाठी विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेच्या अध्यक्षांची अनुमती मागितली होती. योजनेबाबत तथ्ये सदस्यांसमोर मांडण्यासाठी सेन्ट्रल हॉलमध्ये सादरीकरण करण्यात आले.

सादरीकरणाच्यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजीमंत्री पतंगराव कदम, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह विधीमंडळ सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राण्यांची तहान भागवणारी वॉटर होल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

उन्हाळ्यात वनक्षेत्रात पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटताना पाण्याच्या शोधार्थ हरिणांना दाहीदिशा भटकंती करावी लागते. जीवाची काहिली शमविण्यासाठी वनक्षेत्र सोडून उन्हाळ्यात वाड्यावस्त्यांवर धडकणारी हरणे हे येवला तालुक्यातील उत्तरपूर्व भागातील आजवरचे नेहमीच नजरेत भरणारे चित्र. मात्र, गेल्या दोन तीन वर्षांत यात बराचसा फरक पडला आहे. वनक्षेत्रात येवला वनविभागाच्या वतीने ठिकठिकाणी केलेले 'वॉटर होल' अर्थातच कृत्रिम पाणवठे व त्यात टँकरद्वारे सोडले जाणारे पाणी वन्यजीवांची तहान भागवितांनाच वन्यजीवप्रेमींना दिलासा देणारे ठरले आहेत.

येवला तालुक्यातील उत्तरपूर्व भागात वनविभागाचे सुमारे १० हजार ९०० हेक्टर असे विस्तीर्ण क्षेत्र आहे. या वनक्षेत्रात जवळपास चार हजारच्या वर हरिण, त्यांची पाडसे व काळवीट यांच्याशिवाय लांडगे, कोल्हे, ससे, मोर आदी वन्यजीवांचा अगदी वर्षभर संचार असतो. पावसाळा तसेच हिवाळयात वनक्षेत्रात चारा व पाण्याची कुठलीच कमतरता नसली तरी खरे संकट उभे राहते ते दरवर्षीच्या उन्हाळयात.

रणरणत्या उन्हात वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत कुठे कमी होताना तर बऱ्याच ठिकाणी आटताना दरवर्षीच या वन्यजीवांची पाण्याच्या शोधार्थ दाहीदिशा भटकंती होते. त्यातही मोठी संख्या असलेले हरिण, काळवीट, हरणाची पाडसे हे तहान शमविण्यासाठी वनक्षेत्र सोडून आजूबाजूच्या नागरी वस्त्या अन् वाड्यावस्त्यांकडे धडकतात. वाड्या वस्त्यांकडे, शेताकडे भरकटलेली ही हरिणे अनेकदा विहिरीत पडून तर, कधी भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडून मृत्युमुखी पडल्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, गेल्या दोन तीन वर्षांतील वनविभागाने केलेल्या काही योजनांचा विचार करता पूर्वीच्या तुलनेत सध्या अशा घटना काही प्रमाणात कमी झालेल्या दिसत आहेत. येवला वनपरिक्षेत्र विभागाने गेल्या दोन तीन वर्षांत वनक्षेत्रात ठिकठिकाणी निर्माण केलेले वॉटर होल अर्थातच कृत्रिम पाणवठे व त्यात टँकरद्वारे सोडले जाणारे पाणी उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी वन्यजीवांची भटकंती बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास मदतगार ठरले आहेत.

येवला तालुक्यातील वनक्षेत्रात वनविभागाने आतापर्यंत १७ वॉटर होल तयार केले असून या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात वनविभागाच्या वतीने टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे. रणरणत्या उन्हात हे वॉटर होल वन्यजीवांची तहान शमवित आहेत.

राजापूरसारख्या प्रकल्पाची गरज

येवल्यातील वनविभागाने राजापूर परिसरात उभारलेला सौर ऊर्जेवरील वॉटर पंप प्रकल्प हा कौतुकास्पद ठरला आहे. या धर्तीवरच इतरही वनविभागाच्या क्षेत्रात असे प्रकल्प उभारल्यास वन्यजीवांच्या पाण्याची मोठी सोय होण्यास मदत होऊ शकते, असे वन्यप्राणीप्रेमींचे मत आहे. त्यातही अशा प्रकल्पांमुळे दरवर्षी उन्हाळयात टँकरद्वारे पाणी आणून टाकण्यासाठी होणारा मोठा खर्च, वेळेचा अपव्यय टळतानाच विजेची देखील बचत होणार आहे.

सौर ऊर्जेवरील जिल्ह्यातील पहिला प्रकल्प

एरवी सौर उर्जेवर वॉटर हिटर, लाईट शेगडी आदी आपण पाहतो. येवला वनपरिक्षेत्र विभागाच्या वतीने वनक्षेत्रातील राजापूर परिसरात उभारलेला सौर ऊर्जेवरील वॉटर पंप प्रकल्प हा वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत आहे. येवला तालुक्यातील राजापूर गावाच्या पश्चिमेस वनक्षेत्रातील राजापूर वनकक्ष क्रमांक ५३७ मध्ये गेल्या वर्षी साकारलेला हा प्रकल्प यंदाच्या उन्हाळ्यातही रणरणत्या उन्हात वन्यजीवांची तहान भागवत आहे.

या ठिकाणी एका विंधन विहिरीमधील पाणी या सौरऊर्जा यंत्राच्या सहाय्याने पंप कार्यान्वित केला जाऊन पाण्याचा उपसा केला जातो. हे पाणी नजीकच्या एका 'वॉटर होल' मध्ये सोडले जाते. सौरऊर्जा यंत्र सूर्यप्रकाशाच्या वेळेस चालू केले जातानाच त्याद्वारे दिवसभरात सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळेस वॉटर होलमध्ये पाणी सोडले जाते. वनविभागाने यासाठी खास एक कर्मचारी तैनात केला आहे. सौरऊर्जेवरील चालणारी ही प्रणाली वनविभागाचा विचार करता नाशिक जिल्ह्यातील पहिला प्रोजेक्ट ठरली आहे. बरोबरच या प्रोजेक्टद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा हा उन्हाळ्याबरोबरच इतर ऋतूतही वन्यजीवांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींचा अपहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीमध्ये कर सल्लागार गोविंद राजपूत यांच्यासह ६३ ठेवींदाराचे २ कोटी १ लाख ८७ हजार ८९६ रुपयांच्या ठेवीचा अपहार झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे. पतसंस्थेचे संस्थापक, सल्लागार मंडळ, संचालक मंडळ, शाखा व्यवस्थापक व करमचाऱ्यांसाह १८ जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपहार प्रकरणी कर सल्लागार गोविंद राजपूत यांनी छावणी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भाईचंद हिराचंद रायसोनी सोसायटी लि. शाखा मालेगाव येथे एका वर्षाच्या व सहा महिन्याच्या मुदतीवर एकूण तीन लाख ८४ हजार ५५७ अशी रक्कम पतसंस्थेत घोषणाकृत व जाहीर केल्याप्रमाणे इतर बँकांपेक्षा जास्त व्याज दराने पैसे देण्याचे आश्वासन व स्कीमद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. परंतु, ठेवीची मुदत संपल्यानंतर मिळणारी एकूण ४ लाख २४ हजार ७५६ रुपये रक्कम वेळोवेळी मागणी करूनही पतसंस्थेने परत केली नाही. तसेच, आपल्यासह एकूण ६३ ठेवीदारांची १ कोटी ८० लाख ८९ हजार ४९६ रुपये ठेवीदारांना परत न करता सदर रकमेचा पतसंस्थेने अपहार केला आहे.

त्यामुळे ठेवीदारांना आर्थिक व मानसिक त्रास दिल्याने राजपूत यांनी या प्रकरणी येथील छावणी पोलिस ठाण्यात पतसंस्थेच्या संस्थापक, संचालक मंडळ, शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक इंगळे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीकर हैराण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील नागरिक विजेच्या लपंडावाने त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या वतीने वीजपुरवठा सुरळीत न केल्यास वरखेडा परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्टवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी दिला आहे.

अवकाळी पावसाने ग्रासलेल्या बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले असताना वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. तालुक्यातील वरखेडा, आंबे वणी, राजापूर, मातेरेवाडी परिसरात कादवा सबस्टेशन अंतर्गत होणारा वीजपुरवठा भारनियमनाव्यतिरिक्त कायमच विजेचा लपंडाव सुरू असतो. सद्यस्थितीत द्राक्षबागांची छाटणी सुरू आहे. त्यातच द्राक्ष पिकांना विजेअभावी पाणी देता येत नाही. लाईट आली की, ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होतो, तर कधी ते जळून जाते. वाढत्या उन्हाचा कहर त्यात भार नियमनाची भर पडत आहे. यामुळे परिसरातील द्राक्ष बागायतदारांसह शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.

सद्यस्थितीला गृहिणींचे वाळ वाणाचे पदार्थ बनविण्याचे काम सुरू आहे. यामुळे विजेच्या लपंडावाचा फटका गृहिणी वर्गालाही बसत आहे. अनेकवेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने वीज वितरण कंपनीच्या विरोधात त्रीव आंदोलन छेडण्याचा इशारा राष्टवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी दिला आहे. प्रसिद्धी पत्रकावर प्रभाकर पडोळ, विलास भागवत, दशरथ उफाडे, माणिकराव उफाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live

Latest Images