Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याचे विस्तारीकरण

$
0
0

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची घोषणा; अंदाजपत्रकातही वाढ होणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड येथील रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याचे विस्तारीकरण करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांनी बुधवारी केली. वार्षिक अंदाजपत्रकातही भरीव वाढ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. येथील गुणवत्तापूर्ण कामावर खूष होऊन त्यांनी एक लाखाचे बक्षिसही जाहीर केले.

१९८१ साली स्थापन झालेल्या रेल्वे ट्रॅक्शन कारखान्यातील थ्री फेज, वाईंडिंग, स्टेटर आदी विभागांची पाहणी सूद यांनी केली. नंतर झालेल्या बैठकीत त्यांनी वरील घोषणा केली. खासदार हेमंत गोडसे, भुसावळ मंडल रेल्वे प्रबंधक एस. के. गुप्ता, मध्य रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता अग्रवाल, के. एस. कृष्णकुमार, महेश चंद्रा, ए. के. सिन्हा, मनोज महाजन आदी उच्च अधिकारी उपस्थित होते. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक संजय वाघमारे यांनी कारखान्यापुढील समस्या आणि उद्दिष्टे यांच्या माहितीचे सादरीकरण केले. खासदार गोडसे यांनी कारखान्यात सर्व पायाभूत सुविधा असल्याने प्रकल्प विस्तार करावा अशी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सूद यांनी प्रकल्प विस्ताराची घोषणा केली.

सूर्यवंशींची कार्यतत्परता

शुभलक्ष्मी कुलकर्णी या मुख्याध्यापिकेने उपाध्यक्ष वैशंपायन यांची उपसंचालक सूर्यवंशी यांच्याकडे १७ मार्चला लेखी तक्रार केली. त्याची सूर्यवंशी यांनी तत्काळ दखल घेत पोस्टाने नाही तर थेट कर्मचाऱ्यास पाठवून लेखी खुलासा मागविला. वैशंपायन यांनी २० मार्चला उपसंचालकांकडे लेखी खुलासा पाठवितानाच कुलकर्णी यांना दिलेल्या नोटिशीची प्रतही जोडली. मात्र, सूर्यवंशी यांनी २३ मार्चला वैशंपायन यांना पत्र देवून तुमच्यावरील तक्रारींमध्ये तथ्य असून, तसे सिद्ध होत असल्याचे सांगत खुलासा पाठविण्याचे सूचित केले आहे. कुठलाही पुरावा नसताना आरोप सिद्ध कसे झाले, आणि खुलासा दिल्यानंतरही तो पुन्हा पाठविण्याची मागणी का करण्यात येत आहे, असा प्रश्न वैशंपायन यांनी विचारला आहे.

खासदारांच्या मागण्या

खासदार हेमंत गोडसे म्हणाले, की चाकरमान्यांच्या पंचवटी गाडीला दररोज विलंब होत असल्याने त्यांना लेट मार्क मिळून आर्थिक फटका बसत आहे. हा विलंब टाळावा. राज्यराणी एक्सप्रेस कुर्ल्याला थांबत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होतो. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनन्सपर्यंत न्यावी. नाशिकरोड, ओढा रेल्वे स्थानकात कुंभमेळ्याची सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिटकोपर्यंत अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

महानगरपालिका प्रशासनाने सौभाग्यनगर ते बिटकोपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोहीम राबवत अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमण मोहिमेला सुरुवात होताच व्यावसायिक व नागरिकांची धावपळ उडाली होती.

अतिक्रमण काढण्याबाबत व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या होत्या. असे असून देखील व्यावसायिक व नागरिकांनी अतिक्रमण न काढल्यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या आदेशाने दोन जेसीबी, चार गाड्या व ५० कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह अतिक्रमण मोहिमेस आरंभ करण्यात आला. लामरोड भागासह बिटको चौकापर्यंत सर्वच व्यावसायिकांनी केलेली अनधिकृत बांधकामे, ओटे, दुकानांपुढील शेड, सामासिक अंतरातील बांधकामे व पार्किंगला अडथळे ठरणारे पेवर ब्लॉक काढण्यात आले.

अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच अनेक व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांसमोरील अतिक्रमणे काढण्यासाठी धावपळ उडाली. अनेक दुकानांच्या समोरील संरक्षक जाळ्या देखील जेसीबीच्या साह्याने काढण्यात आल्या. तसेच दुकानांच्या समोर असणारा कोबा, फर्ची, जाहिरात फलक यावर देखील हातोडा चालविला गेला. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त एस. डी. वाडेकर, विभागीय अधिकारी किशोर चव्हाण, नगररचना विभागाचे अभियंता एजाज शेख, आर. आर. गोसावी यांच्यासह उपनगर पोलिस ठाण्याचे सपोनि पळे, एएसआय आर. तेजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४०-५० पोलिसांचा ताफा यावेळी तैनात करण्यात आला होता.

महापालिकेने शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीत हाती घेतल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. या मोहिमेमुळे अनेकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली आहेत. मात्र, सूचना करूनही काही नागरकि व व्यावसायिक जुमानत नसल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांबरीकरणानंतर लगेचच खोदले रस्ते

$
0
0

वाहनचालकांची तक्रार, महापालिकेचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक शहरात सिंहस्थामुळे रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. काही रस्त्यांचे काम अंतिम टप्यात असताना दुसरीकडे डांबरीकरण केलेले रस्ते खोदण्याचे प्रकार सुरू आहेत. डांबरीकरणानंतर रस्ता खोदण्याचे कारण काय, असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत. याकडे महापालिकेचे मात्र दुर्लक्ष होत आहे.

नाशिक महापालिकेने अनेक वर्षांनंतर शहरातील मुख्य रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. असे असताना नव्याने सातपूरला पपया नर्सरी सर्कलवर तयार झालेला रस्ता एकाने वीज कनेक्शन घेण्यासाठी खोदला आहे. यामुळे खोदलेल्या ठिकाणी खड्डा पडल्याने तो वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे.

तसेच, सातपूर औद्योगिक वसाहतीत प्रवेश करताना महिंद्रा अॅण्ड महिंद्रा सर्कलवर देखील पाण्याच्या लाइनला लिकेज असल्याने नुकताच डांबरीकरण केलेला रस्ता खोदण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सिबल हॉटेलच्या समोर देखील डांबरीकरण केलेला रस्ता खोदण्यात आला. अशा प्रकारे नवीन रस्ता खोदताना महापालिकेची यंत्रणा करते काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. नुकतेच डांबरीकरण झालेले रस्ते खोदण्यासाठी परवानगी जर कुणी घेत नसतील, तर महापालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, असा सवाल वाहनचालकक उपस्थित करीत आहेत.

रस्ते खोदल्यानंतर तेथे लगेच तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून खड्डे बुजविले जात आहेत. यामुळे या जागांवर पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. म‌हापालिका प्रशासनाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

महापालिकेने अनेक वर्षांनंतर मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणासह डांबरीकरणास सुरुवात केली आहे. असे असताना डांबरीकरण झालेले रस्ते काही कारणास्तव खोदलेले दिसतात. यामुळे नव्यानेच डांबरीकरण झालेल्या रस्त्यांना पुन्हा खड्डे पडले आहेत. याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

- किरण निकुंभ, रहिवासी, सातपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीटीएल’ सर्वोच्च न्यायालयात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील महापालिकांकडून मोबाईल टॉवरवर आकारण्यात येणाऱ्या करांविरोधात आशियातील सर्वात मोठी जीटीएल कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. महापालिकेकडून टॉवर उभारतांना परवागनी घेतल्यानंतर पुन्हा मोबाईल टॉवर कंपन्यावर कोणतेही कर आकारले जावू नये अशी कंपनीची मागणी आहे. उच्च न्यायालयाने महापालिकांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आता दावा दाखल केला आहे. नाशिक महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिका आणि राज्य सरकारला या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे.

मोबाईल टॉवर उभारण्यात आशियात अग्रेसर असलेल्या जीटीएल एन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून महापालिका हद्दीमध्ये टॉवरची उभारणी केली जाते. कंपनीकडून टॉवर उभारल्यानंतर मोबाईल कंपन्यांना भाडेपट्टावर दिले जातात. महापालिका या टॉवर्सकडून दरवर्षी कर वसुली करते. जीटीएल कंपनीचे नाशिकमध्ये १४ मोबाईल टॉवर असून, राज्यातील सर्वच महापालिकामध्ये कंपनीचे टॉवर्स आहेत. परवानगी घेतांना कर भरल्यानंतर पुन्हा कर आकारू नये अशी कंपनीची मागणी आहे. यासंदर्भात कंपनीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने हे अपील फेटाळून लावत कर भरावाच लागेल असे आदेश दिले होते. त्यामुळे कंपनीने आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कंपनीची याचिका दाखल करून घेतली आहे.विशेष म्हणजे कंपनीच्या वतीने आता राज्य सरकारलाही प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यामुळे मोबाईल टॉवर कर वसुलीचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेल्याने वसुलीची प्रक्रिया रखडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाड्यांचा पोषण आहार नियंत्रणहीन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार तपासणीची कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनी केला आहे. महापालिकेच्या ४१९ अंगणवाड्या असून, केवळ सहा पर्यवेक्षिकांमार्फत पोषण आहारावर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे पर्यवेक्षकांची संख्या वाढवण्यासह प्रतिबालक पोषण आहाराचा खर्च प्रतिदिन सहा रुपयांऐवजी दहा रुपये करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महापालिका हद्दीत सध्या ४१९ अंगणवाड्या असून, त्यात १४ हजार ५०० बालके आहेत. या अंगणवाड्यांमध्ये बचत गटांमार्फत शालेय पोषण आहार पुरवठा केला जातो. यासाठी दरवर्षी दोन कोटींची तरतूद करण्यात येते. सहा विभागांमंध्ये केवळ सहा मुख्य पर्यवेक्षिकांमार्फत अंगणवाड्यांवर लक्ष ठेवले जाते. एका पर्यवेक्षिकेकडे ६० ते ७० अंगणवाड्या असून, दररोज अंगणवाड्यामंध्ये आहार पोहचतो की नाही, हे त्या तपासू शकत नाही. त्यामुळे किती बालकांना आहार दिला जातो याच्या नोंदीची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप कर्डक यांनी केला आहे. शालेय पोषण आहार भत्ता १० रुपयांपर्यंत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांच्या मिळकतींचा लिलाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वारंवार सूचनापत्र आणि नोटिसा देवूनही थकबाकी जमा न करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात महापालिका आक्रमक झाली आहे. थकबाकी न भरणाऱ्या ७२ थकबाकीदारांच्या संपत्तीचा लिलाव करण्याची प्रक्रिया पालिकेन सुरू केली असून, लिलावाची अंतिम जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिडकोतील ४१ आणि सातपूर २६ मिळकतींचा यात समावेश आहे.

मार्च अखेर असल्याने पालिकेने मालमत्ता कर वसुलीसह पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे. जवळपास ७४ हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. २५ हजार मिळकतधारकांनी थकबाकी जमा केली आहे. तर उर्वरितांविरोधात पालिका आक्रमक झाली असून, वांरवार सूचनापत्र आणि नोटिसांना प्रतिसाद न देणाऱ्या ७२ मिळकतधारकांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लिलावाची अंतिम नोटीस बजावलेल्या मालमत्तांच्या जप्तीसंदर्भात शुक्रवारी जाहीरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

नळकनेक्शन तोडले

मालमत्ता कराप्रमाणेच पाणीपट्टी वसुलीसाठीही धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या आठवड्याभरात थकबाकी न भरणाऱ्या तब्बल आठशे नळकनेक्शन धारकांचे नळकनेक्शन तोडण्यात आले आहेत. त्यात नाशिक पूर्व १२८, नाशिक पश्चिम ६५, पंचवटी १४९, नाशिकरोड-सातपूर-२६९, नवीन नाशिक ९२ अशा तब्बल ७९६ जणांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर काहिलीने हैराण

$
0
0

नाशिक : गुढीपाडव्यानंतर उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून, तपमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसवर गेला आहे. त्यामुळेच दुपारी शहरातील रस्ते निर्मनुष्य होतानाच उन्हापासून बचावासाठी नाशिककरांची कसरत सुरु झाली आहे. गेल्या चार दिवसांत शहराच्या तपमानात सुमारे तीन ते चार अंशांनी वाढ झाल्याची नोंद आहे. गेल्या शुक्रवारी शहराचे कमाल तपमान 35.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. रविवारी हेच तपमान दोन अंशांनी वाढले. तर मंगळवारी हे तपमान ३९ अंशांवर गेले. उन्हाच्या वाढत्या चटक्यापासून बचावासाठी टोपी, सनकोट यांच्या वापरासह शीतपेयांनाही प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारासच आता शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात ढगाळ वातावरण होते. मात्र, आता हे वातावरण दूर झाले असून गुढीपाडव्यानंतर वैशाख वणवा तापू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले आहेत. मार्चमध्येच कमाल तपमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसवर जाऊन पोचला आहे.

काही दिवसांपूर्वी शहरात ढगाळ हवामान होते. तसेच, जोरदार पाऊस आणि गारपिटीचाही तडाखा होता. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. सकाळी थंडी, दुपारी ऊन व रात्री पाऊस अशी परिस्थिती नाशिककरांवर होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलं‌बित शिक्षिकेचा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वादग्रस्त प्रकरणातून निलंबित करण्यात आलेल्या शिक्षिकेने पंचायत समितीच्या कार्यालयात शिव‌ीगाळ करीत गोंधळ घातल्याने कर्मचारी अन् अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. यानंतर कर्मचाऱ्यांनी सरकारवाडा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात धाव घेत कैफियत मांडली. जिल्हा परिषदेच्या सीईओंनी या प्रकरणाची माहिती घेत त्या शिक्षिकेच्या बडतर्फीच्या कार्यवाहीला सुरूवात केली आहे.

विद्यार्थ्यांकडून सक्तीने सेवा करून घेण्याच्या मुद्द्यावरून शिलापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका रजनी गोविंदराव भोसले काही महिन्यांपूर्वी चर्चेत आल्या होत्या. या प्रकाराविरोधात त्यावेळी पालकांनी एकजूट दाखवित आंदोलन केले होते. यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षिकेस निलंबित केले होते. दरम्यान, बुधवारी भोसले या पंचायत समिती कार्यालयात आल्या व निलंबनाच्या कालावधीतील पगाराची मागणी करू लागल्या. कर्मचाऱ्यांनी तांत्रिक अडसरावर बोट ठेवल्यानंतर त्यांनी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. यानंतर कार्यालयातील फाईल्स अन् कागदपत्रे फेकली. हा प्रकार कर्मचाऱ्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव यांना सांगितला. या त्रासामुळे काम बंद आंदोलन करीत पोलिस संरक्षणाची मागणी करत कार्यालयात ठिय्या मांडला. या शिक्षिकेने यापूर्वीही कार्यालयात येऊन गोंधळ घातल्याने कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सीओंनी संबंधितांवर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबत कारवाईचे आश्वासन सीओंनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तरच वाळूचा अवैध धंदा बंद

$
0
0

'मटा' राऊंड टेबलमधील सूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूल विभाग, पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि ग्रामपंचायतींच्या एकत्रित प्रयत्नांशिवाय वाळूच्या अवैध धंद्याला आळा घालणे तसेच सरकारचा महसूल वाचविणे शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे या सर्वांच्या एकत्रित समावेशाचे मॅकेनिजम निर्माण करायला हवे, असा सूर महाराष्ट्र टाइम्सने बुधवारी आयोजिलेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये निघाला.

`वाळूचे वळू` या विषयावर महाराष्ट्र टाइम्सने वृत्तमालिका प्रसिध्द केली आहे. अवैध वाळू वाहतुकीला प्रोत्साहन मिळत असल्याने सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. वाळूमाफियांनी अधिकाऱ्यांवर हल्ले करून कायदा हातात घेणे चुकीचे असून, असल्या प्रकारांचे कधीच समर्थन होऊ शकत नाही अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनीही चोर सोडून संन्याशाला फाशी न देता आपल्या कर्तव्यांप्रती प्रामाणिक राहायला हवे अशी वाळू व्यावसायिकांनी व्यक्त केलेली भूमिकाही मालिकेतून मांडण्यात आली. या सर्व विषयावर विचारमंथन होऊन त्यातून प्रभावी उपाययोजनेचे नवनीत निघावे या उद्देशाने महसूल, पोलिस, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि प्रत्यक्ष वाळू व्यवसायात झळा सोसत असलेल्या व्यावसायिकांनाही बैठकीला बोलावण्यात आले. अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, प्रांत व तहसीलदार संघटनेचे सचिव बाळासाहेब वाघचौरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी एम. पी. बऱ्हाणपूरकर तर वाळू व्यावसायिकांपैकी वामन चुंबळे, राज चव्हाण, सचिन बोरूडे आणि प्रदीप वाघ यांनी कॉन्फरन्समध्ये सहभाग नोंदवला. अत्यंत ज्वलनशील आणि गंभीर विषयाला हात घालून त्यातील वस्तुस्थिती समतोलपणे सहभागी मान्यवरांनी महाराष्ट्र टाइम्सचे अभिनंदन केले. लोहोणेर येथील लिलाव राज चव्हाण या लिलावधारकाने रितसर काही कोटी रुपयांचे सरकारी शुल्क भरून ठेका घेतला. मात्र लगेचच स्थगिती आली या अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

गाड्या का सापडत नाहीत ?

सरकारचा महसूल वाचवायचा असेल तर लिलावाच्या प्रक्रियेत बदल अत्यंत गरजेचा असल्याचे मतही ठामपणे मांडण्यात आले. काही अधिकाऱ्यांकडून अवैध वाळू वाहतुकीला पाठबळ मिळते. परंतु, प्रशासनामध्ये कुणाच्याही दबावाला न जुमानणारे प्रामाणिक अधिकारी असल्याचा दावाही या कॉन्फरन्समध्ये करण्यात आला. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरतात त्यावेळी गाड्या का सापडत नाहीत, असा प्रश्नही उपस्थित झाला. या सर्व अवैध वाहतुकीवर तोडगा निघावा यासाठी तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण असे मॅकेनिझम विकसित व्हायला हवे असे मत बनसोड यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेत आता खांदेपालट

$
0
0

मटाले, काळे यांचे स्थायी सदस्यत्वाचे राजीनामे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची स्थायी समिती सभापतीपद निवडणूक निर्विघ्न पार पडल्यानंतर मनसेने अंतर्गत खांदेपालटाला सुरूवात केली आहे. एक व्यक्ती एक पदासाठी स्थायीवर नव्याने नियुक्त झालेल्या अनिल मटाले आणि सविता काळे यांच्याकडून पक्षाने राजीनामे घेतले आहेत. मटालेंना गटनेतेपद बहाल केले जाणार असून, सभागृहनेतेपदीही नव्या चेहऱ्याची निवड केली जाणार आहे. स्थायीच्या दोन रिक्त जांगावर मेघा साळवे आणि सुरेखा भोसले यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या सत्तेत दोलायमान असलेल्या मनसेला तीन वर्षानंतरही सूर सापडत नसल्याचे चित्र आहे. स्थायीच्या निवडणुकीपुर्वी सविता काळे यांनी राजीनामा देण्याचा पक्षाचा आदेश झुगारला होता. तर स्थायीत जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. त्यातच महाआघाडीच्या कराराप्रमाणे मनसेने सभापतीपद राष्ट्रवादीला दिले आहे. त्यामुळे पक्षात बंडखोरांनी पुन्हा डोके वर काढू नये यासाठी मलमपट्टीला सुरूवात झाली आहे. नव्यानेच स्थायी समितीवर नियुक्त झालेल्या अनिल मटाले यांच्यासह सविता काळे यांचा पक्षाने बुधवारी राजीनामा घेतला. पक्षात एक व्यक्ती एक पद यासाठी हे राजीनामे घेण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. मटाले यांना महापालिकेच्या गटनेतेपदाची संधी दिली जाणार असून, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर रिक्त होणाऱ्या स्थायी समितीच्या दोन सदस्यपदावर मेधा साळवे आणि सुरेखा भोसले यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सभागृह नेतेपदातही फेरबदल होण्याची शक्यता आहे. विद्यमान सभागृह नेता शशिकांत जाधव यांच्याऐवजी सलीम शेख यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनाही राजीनामे घेणार

निवडणुकीपुर्वी मनसेसोबतच शिवसेनेनही दोन सदस्यांचे राजीनामे मागितले होते. वंदना बिरारी आणि सचिन मराठेंनी मात्र राजीनामा घेण्यास नकार दिला होता. सभापतीपदानंतर राजीनामा देवू असे सदस्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता मनसेने राजीनामे घेतल्यानंतर शिवसेनाही आपल्या सदस्यांचे राजीनामे घेणार असून, एक दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेटस ठरतंय डोकेदुखी

$
0
0


नयना शहा, नाशिक

टेक इट इझीच्या या जमान्यात आजकाल फेसबुक स्टेटस मात्र फारच सिरियसली घेतले जाऊ लागले आहेत. एखाद्याच्या फेसबुक स्टेटसवरुन त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज बांधला जाऊ लागल्याने अनेकांसाठी हे स्टेटस प्रकरण डोकेदुखी ठरु लागले आहे. सहज म्हणून फेसबुकवर केले जाणारे स्टेटस अनेकांबद्दल गैरसमज पसरवित असल्याचे तसेच अनेकांना अडचणीत आणणारे ठरल्याचे अनेक घटनांमधून समोर येत आहे.

सोशल नेटवर्किंग साईट्सच्या लोकप्रियतेमुळे खाजगी गोष्टीही अशा पब्लिक प्लॅटफॉर्मवर सहज शेअर करण्याचा ट्रेंड वाढतोय. अगदी तुम्ही काय खात आहात, कोणाबरोबर आहात, कुठे आहात इथपासून ते तुमच्या मनात काय चाललंय इथपर्यंत सगळ फेसबुक स्टेटसमधून झळकत असतं. परंतु अनेकदा यामुळे काहीजण अडचणीत सापडत आहेत तर काहींनी सहज म्हणून अपडेट केलेले हे स्टेटस त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरु लागले आहेत.

याबाबत निकिताचा अनुभव असा होता की तिचे एक नातेवाईक त्यांच्याकडे एका कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे जमणार नाही असं कारण त्यांनी दिलं. पण त्याच दिवशी त्या मुलाचे एफबी स्टेटस होते 'एन्जॉयिंग विथ फ्रेंड्स'. याबाबत बोलताना नील सांगतो की, एकदा सहजच 'जोडीदार समजूतदार असायला हवा, भांडण झालं की कामातही मन रमत नाही.' हे स्टेटस त्याने अपडेट केलं. यावरून त्याच्या ऑफिसमधले, नातेवाईक सगळ्यांनी त्याला भंडावून सोडला. हे तू बायकोबद्दल लिहलं आहेस का? ती समजूतदार नाही का? तुमचे पटत नाही का? इथपर्यंत लोकांची मजल गेली. प्रशांतला तर एक वेगळाच अनुभव आला. तो गुजरातमध्ये असल्याचे स्टेटस अपडेट करताच त्याला त्याच्या ओळखीच्या लोकांनी तिकडून आणायच्या वस्तूंची भली मोठी लिस्ट पाठवली होती.

अमेरिकेत मात्र एक उलटाच किस्सा पाहायला मिळाला. एका लहान मुलाने फेसबुकवर आपल्या पालकांना अगोदरच आपल्या आत्महत्येबाबत वॉर्निंग देणारे स्टेटस टाकले होते. जे त्याच्या पालकांनी फारसे गांभिर्याने घेतले नाही अन् त्यांना आपल्या पाल्याचा जीव गमवावा लागला. थोडक्यात फेसबुकच्या व्हर्च्युअल जगात रमणाऱ्यांसाठी आता हे स्टेटस म्हणजे डोकेदुखी ठरु लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हे आहेत विजेते..

$
0
0



एसएमएस कॉन्टेस्टचे विजेते जाहीर

नाशिक टाइम्स टीम

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एसएसएस कॉन्टेस्टचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणाऱ्या सभासदांना 'आई तुला मी कुठे ठेवू?' या नाटकाचे फ्री पासेस मिळणार आहेत. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेमध्ये रोहिणी हट्टंगडी यांची सध्या लोकप्रिय असलेली भूमिका कोणती? हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते 'आई आजी'. या स्पर्धेमध्ये दीपा दाणी, पुष्पा पाटील, उदय कार्लेकर, संजय येवलेकर, मंजुषा नेरकर, सुजाता ठकार, सुवर्णा बिरारी, नितीन बागड, शीतल तागरे, आर.पी. धुमाळ, सुनिता भातखळकर, गोविंद आवरी, नेत्रा वाकडकर, उमेश गुरव, शरद लासलकर, स्नेहल कारे, मयुर अनभुळे, सुषमा पुणेकर, अरविंद वऱ्हाडे, शुभांगी चपळगावकर, शिल्पा कटारिया, कल्याणी गोसावी, अथर्व पिंपळे, मनिषा ठोके, निलेश वाणी, साधना कारखानीस, दमयंती सूर्यवंशी, प्रतिभा कुलकर्णी, शोभा मोहिते, सुधीर वष्टीकर, नितीन श्रावगी, पूनम बावीस्कर, सोनल नेरे, उज्ज्वला देशमूख ए. ए. गढीकर, मेघमाला पाठक हे या स्पर्धेचे लकी विजेते ठरले आहेत. विजेत्यांनी आपले बक्षीस 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयातून आजच सकाळी अकरा ते चार यावेळेत घेऊन जायचे आहे.

रविवारी (२९ मार्च) संध्याकाळी साडेपाच वाजता हे नाटक होणार असून 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांना सवलतीच्या दरात तिकिटे मिळणार आहेत. यामध्ये दोनशे रुपयांचे तिकिट दिडशे रुपयांना मिळणार आहे. तिकिट मिळवण्यासाठी या बातमीचे कात्रण किंवा जाहिरातीचे कात्रण सोबत आणणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्कंडेय’वर श्रमदान मोहिम

$
0
0



नाशिक टाइम्स टीम

'शिवकार्य गडकोट मोहिमे'मार्फत किल्ले मार्कंडेय श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ल्याच्या साफसफाईबरोबरच विविध उपक्रम याठिकाणी होणार आहेत. २९ मार्चला असणारा हा उपक्रम शिवकार्य गडकोट मोहिमेचे २१ वे किल्ले संवर्धन श्रमदान शिबिर आहे.

नाशिकहून रविवारी (२९ मार्च) पहाटे ६ वाजता या मोहिमेसाठी प्रस्थान केले जाणार आहे. यासाठी रविवारी पहाटे सहा वाजता दुर्गसंवर्धकांना नाशिकच्या रविवार पेठेतील पेठे विद्यालयाच्या समोर जमावे लागणार आहे. तिथूनच सर्वजण एकत्र निघणार असल्याची माहिती शिवकार्य गडकोट मोहिमेचे मुख्य संयोजक योगेश कापसे यांनी दिली. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील सालबारा रांगेवर सातमाळा अजिंठा उपरांगेत कळवण तालुक्यात मार्कंडेय किल्ला आहे. ऐतिहासिक, आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या भव्य किल्ल्यावर मार्कंडेय ऋषींची तपोभूमी आहे. शिवलिंग, भुयार आणि शिवकालीन तळे तसेच टाक्या असा मोठा ऐतिहासिक ऐवज इथे सापडतो. त्यामुळे २९ मार्चला या किल्ल्यावर श्रमदान मोहिम राबविली जाणार आहे.

गेल्या ३ वर्षांपासून शिवकार्य गडकोट मोहीमेमार्फत किल्ले श्रमदान मोहिम राबविली जात आहे. किल्ले वाचवा आंदोलने, शासनाकडे किल्ले संवर्धनासाठी सततचा पाठपुरावा, जेव्हा गड बोलू लागला हा एकपात्री प्रयोग, व्याख्याने, पोवाडे आणि किल्ले पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून किल्ल्यांचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा संदेश दिला जात आहे. ज्यांना या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी नोंदणीसाठी ९८५०४९०७९० या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन राम खुर्दळ यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी प्रदूषणावरून आखाडा परिषद नाराज

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शासनाच्या उदासीनतेने गोदावरी नदीची स्थिती दैयनीय झाली असून, याबद्दल आखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरिगिरी महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तीर्थांमध्ये प्रयागतीर्थ आणि नद्यांमध्ये गोदावरी सर्वश्रेष्ठ गणली जाते. मात्र, गोदामातेची आजची परिस्थती पाहता शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे श्रीमहंत हरिगिरी महाराज यांनी म्हटले आहे.

सिंहस्थ कामांच्या पूर्वनियोजनासाठी निलपर्वत येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय संरक्षक तथा आखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरिगिरी महाराज येथे काही महिन्यांपासून तळ ठोकून आहेत. सिंहस्थ कुंभपर्वात गोदावरीत स्नान करण्यासाठी साधुमहंत व भाविक येत असतात, त्या गोदामाईची अवस्था अत्यंत चिंतनीय असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.

सिंहस्थ नियोजनाबाबत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली असता, त्यांनी शासनाचा उदासीन कारभाराबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. नीलपर्वत येथील जुना आखाड्याच्या परिसरात साधुसंत भाविक यांच्यासाठी निवास व इतर सुविधांच्या कामांना वेग आला आहे. भक्तगणांच्या सहयागातून ही कामे होत आहेत. जुना आखाड्याचे साधुंची संख्या मोठी आहे. शासनाने दिलेल्या सुविधा पुरेशा ठरणार नाहीत. शासनाने प्रती आखाड्यास अवघ्या २० लाखांची विकास कामे दिली आहेत. इतर खर्च हा भाविकांच्या सुविधांसाठी होत आहे. इतर राज्यांचा विचार करता हा खर्च अत्यंत कमी असल्याचे श्रीमहंत हरिगिरी महाराज यांनी स्पष्ट केले आहे. गत सिंहस्थतात सुविधा नाही म्हणून मोठ्या प्रमाणात साधू व भाविक परत गेले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

महामंडलेश्वर नगरला सुविधा द्या!

साधुग्राम तयार होत आहे. मात्र, तेथे होत असलेल्या कामांबाबत साधुंचा विचार घेणे आवश्यक होते. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ पर्वकाल हा चार्तुमासमध्ये येत असतो. या कालावधीत काही व्रतधारी प्रमुख नदी प्रवाह ओलांडत नाहीत याचीही दखल घेतली गेली नसल्याचे हरिगिरी यांनी म्हटले आहे. यावेळी प्रथमच सिंहस्थ पर्वकाळात शंकराचार्य येत आहेत. जुना आखाड्याच्या पिंपळद येथील जागेत महामंडलेश्वर नगर होत आहे. तेथे शंकराचार्यांच्या निवासाची सुविधा केली जाणार आहे. तेथून कुशावर्त स्नान आणि भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन दोन्ही नदी न ओलंडता शक्य होणार आहे. अर्थात शासनाने महामंडलेश्वर नगर येथे वीज, पाणी, रस्त्यासह स्वच्छतागृहे आदि सुविधा देणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागापूर शिवारात १३ मोरांचा मृत्यू

$
0
0



उष्माघाताने बळी गेल्याचा अंदाज

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथून जवळच असलेल्या नागापूर शिवारात तब्बल १३ मोरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मागील तीन-चार दिवसांपासून तापमानाचा पारा सतत वाढता आहे. उष्माघातामुळेच मोरांचा बळी गेला असावा, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नागापूर शिवारात मंगळवारी १३ मोर मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. भारत पेट्रोलियम कंपनीमागे रेल्वे लाइनलगत हे मोर मृत अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. एरव्ही थुई थुई करीत नाचत बागडत आपला मनोहारी पिसारा फुलवत या परिसरात सातत्याने दिसणारे आणि सर्वाना आनंद बहाल करणारे मोर अचानक असे मरणाच्या दारात पाहून अनेकांचे मन हेलावले. आनंदमयी मोरांचा दारुण मृत्यू पाहून ग्रामस्थांचे डोळे भरुन आले. या वेळी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. डॉ. ए. एल. साबळे व डॉ. एस. बी. गोंडकर यांनी या मोरांचे शवविच्छेदन केले. उष्माघाताने मोरांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. आधी फ़क्त चार मोर मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले मात्र ते उशिरा उपलब्ध झाल्याचा आरोप काही प्रत्यक्षदर्शिंनी केला आहे. वेळेत उपचार झाले असते तर काही मोरांचे प्राण वाचले असते, असा सूर नागापूर शिवारात कानी पडत आहे. वैद्यकीय सूत्रांनी मात्र या आरोपांत तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेमेंट द्या अन्यथा, धरणच रद्द करा

$
0
0



इगतपुरी तालुक्यातील वाकी धरणग्रस्तांचा सरकारला इशारा

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

वाकी धरणाचे काम पूर्णत्वास येऊनही अद्याप पुनर्वसन व भूसंपादनाचे पेमेंट मिळालेले नाही. शासनाकडे पैसे नसतील तर धरणच रद्द करा व आमच्या जमिनी परत करा, असा इशारा इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणग्रस्तांनी राज्य सरकारला दिला आहे. शासनाने वाकी धरण ग्रुप प्रकल्पात समाविष्ट केल्याने या धरणाच्या उर्वरित कामांसाठी शासन निधी देण्यास असमर्थ ठरत असल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

इगतपुरी तालुक्यात नांदुरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत भाम, भावली, मुकणे, व वाकी ही चार धरणे आहेत. त्यात मुकणे व भावलीचे काम पूर्ण झाले असून, वाकी धरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तर भाम धरणाच्या कामाला केवळ सुरुवात झाली आहे. शासनाने नुकतेच जाहीर केले आहे की ज्या प्रकल्पाचे काम ७५ टक्के पूर्ण असेल अशाच प्रकल्पांच्या पूर्णत्वाच्या कामांसाठी यापुढे शासन प्राधान्याने निधी देईल. त्यामुळे वाकीचे काम ९५ टक्के होऊनही ग्रुप प्रकल्पामुळे निधी अभावी या धरणाच्या अंतिम टप्यातील कामाला व प्रकल्पग्रस्तांच्या सुविधांच्या कामांना खो बसणार आहे.

शासन नियमांमुळे वाकी खापरी धरणाच्या भूसंपादन, पुनर्वसन इतर कामांसाठी शासनाकडून निधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे शासनाने आता एकतर धरण पूर्णत्वस आल्याने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावे. याउलट शासनाकडे निधी नसेल तर निर्माण केलेले धरणच रद्द करून आमच्या संपादित केलेल्या जमिनी शासनाने परत कराव्यात. परत केलेल्या जमिनींपैकी काही जमीन बाजारभावने विकून आम्हाला अल्पसा दिलेला मोबादला शासनाला परत करू, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने मोबदला देण्याची मागणी समितीचे अध्यक्ष काशीनाथ गातवे, बद्रीनाथ कोकणे, रावजी नाडेकर कारभारी गायकवाड, लहानू गायकवाड, अरुण कोकणे, गणपत कोकणे, रामा सराई, ढवळू ठोंबरे, नावजी हिंदोळे आदींनी केली आहे.

पेमेंट देणे शक्य नसेल तर शासनाने धरण रद्द करून शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात. त्यातील तुकडा जरी बाजारभावाने विकला तरी शासनाने देऊ केलेल्या मोबादल्यापेक्षा जमीन हाती ठेऊनही प्रकल्पग्रस्त फायद्यात राहतील. - अॅड. रतनकुमार इचम, धरणग्रस्तांचे नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तश्रृंग गडावर खासगी वाहनांना बंदी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चैत्र महोत्सव कालावधीत वणी येथील सप्तश्रृंग गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. २८ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान सकाळी ८ ते रात्री १२ या वेळेत वाहनांना गडावर जाण्यासाठी बंदी असणार आहे. तसे आदेश अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर चैत्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनही भाविक हजारोच्या संख्येने येतात. यंदा २८ मार्च ते ६ एप्रिल या काळात हा महोत्सव होत आहे. गडावर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडून भाडोत्री टॅक्सी, ऑटोरिक्षा, खाजगी चारचाकी व दुचाकी वाहने, तसेच इतर खाजगी वाहने यांना गडावर वाहतुकीस वाहतुकीस प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी दिले आहेत.

गडावरील रस्ते अरुंद असल्याने भाविकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व प्रवाशी यात्रेकरुंच्या जिविताला धोका होऊ नये यासाठी सप्तश्रृंग गडावर जाणाऱ्या भाडोत्री टॅक्सी, ऑटोरिक्षा, खाजगी चारचाकी व दुचाकी वाहने यांना प्रवेश बंदी करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मुबंई मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड वर्षांपासून सेटची प्रतीक्षा

$
0
0


विद्यार्थ्यांची चिंता वाढली; पुणे विद्यापीठ मूग गिळून गप्प

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल दीड वर्षे उलटूनही राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा घेण्यात आली नसल्याने विद्यार्थी प्रचंड चिंतेत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेटचे कुठलेही नियोजन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत तरी ही परीक्षा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कॉलेजेसमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी सेट परीक्षा घेतली जाते. एमफील किंवा पीएचडी केलेल्या उमेदवारांची पात्रता सहायक प्राध्यापक पदासाठी थेट सुप्रीम कोर्टानेच अवैध ठरवली आहे. त्यामुळे सेट आणि नेट या दोन्ही परीक्षांना प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे डिसेंबर २०१३ मध्ये सेट परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर आता तब्बल १६ महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने डिसेंबर २०१३ पासून आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा घेतल्या आहेत. सेट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या तुलनेत मोठी आहे. कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्यासाठी सेट आवश्यक असल्याने परीक्षार्थींचा कल या परीक्षेकडे असतो. सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाणदेखील अल्पच आहे. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्यात वेळापत्रकच जाहीर झालेले नसल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यापीठाकडून सेट परीक्षेच्या आयोजनात होणाऱ्या

दिरंगाईबाबत विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.

विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या विविध परीक्षांचे नियोजन हे अतिशय गांभिर्याने होणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाला त्याचे कुठलेच सोयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे. आगामी वर्षभरात होणाऱ्या सेट व नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले तर विद्यार्थ्यांना त्यादृष्टीने तयारी करता येते. मात्र, याबाबतीत विद्यापीठाचा कारभार सूस्त असल्याचे स्पष्ट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधारमय रस्त्यावरील प्रवास संपणार कधी?

$
0
0



सातपूर, अंबड एमआयडीसीत बंद पथदिपांनी वाहनचालक त्रस्त

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर, अंबड एमआयडीसीतील रस्त्यांवरील बंद पथदिपांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यातच रस्तावरून वाहने चालवितांना अंधारातून प्रवास संपणार कधी असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत. यासाठी महापालिकेने तात्काळ पथदीप बसविण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

महापालिकेने शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. परंतु, रस्त्यांच्या कामात जुने पथदीप हटविल्याने सद्यस्थितीत वाहनचालकांना रस्त्यांवरील प्रवास अंधाराताच करण्याची वेळ येत आहे. यामळे अंधारातून वाहन चालवितांना अनेकदा अपघात होतात. त्यातच सातपूर व अंबड एमआयडीसीतील रस्त्यांवर पथदीप आहेत. परंतु, ते निम्म्याहून अधिक बंद पडलेली आहेत. तसेच काही ठिकाणचे पथदीप टवाळखोरांकडूनच फोडले जात असल्याचे महापालिकेचे विद्युत विभागाचे अधिकारी सांगतात. परंतु, एमआयडीसीतील महत्त्वाच्या रस्त्यांवरचे पथदीप विद्युत विभागाने तात्काळ सुरू करण्याची मागणी कामगार करत आहेत. रस्ते कामात पथदीप टाकले गेले नसल्याने रोजच किरकोळ अपघाताला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी महापालिकेने रस्त्यांवरील अंधार हटवत पथदीप बसविण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

सातपूर व अंबड एमआयडीसीतील बहुतांश रस्त्यांवरील पथदीप बंद आहेत. यामुळे अनेकदा रात्री अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने कामगारांची सुरक्षा ठेवण्यासाठी रस्तांवरील अंधार हटवत पथदीप सुरू करण्याची गरज आहे. तसेच रस्ते कामात हटविण्यात आलेल्या ठिकाणचे देखील पथदीप महापालिकेने तात्काळ बसविले पाहिजेत.- रुपेश पाटील, कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार वर्षात आठ सुभेदार!

$
0
0



उपनगर पोलिस ठाण्याची अवस्था; कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान कायम

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

शेजारील लष्करी जवानांसह झोपडपट्टीवासियांमधील गुंडांचा उद्छाद असतांना अशा परिस्थिती नोकरदार, मध्यमवर्गीयांच्या संरक्षणासह कायदा व सुव्यवस्थेची घडी नीट बसविण्याची प्रमुख जबाबदारी पार पाडण्यासाठी उपनगर पोलिस स्टेशनची सलग दीर्घ काळ धुरा वाहिली जाईल असा अधिकारीच मिळू शकलेला नाही.

उपनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक नम्रता देसाई यांची तडकाफडकी बदली झाल्याने पोलिस निरीक्षकांची एक वर्षाच्या आत बदली होण्याचा येथील लौकिक कायम राहिला आहे. आता नव्याने आलेल्या अशोक भगत यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. यात मुख्यत: लष्करी जवानांच्या हल्ल्यानंतर मनोधैर्य्य खच्ची झालेल्या पोलिसांना आत्मविश्वाचे बळ देण्याची मुख्य जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्यावरील ताण वाढल्याने जानेवारी २०११ मध्ये विभाजन करून उपनगर पोलिस ठाण्याची निर्माती करण्यात आली. मात्र, स्थापनेच्या सव्वा चार वर्षाच्या कालावधीत आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने या पोलिस ठाण्याची घडीच बसलेली नाही. सुरवातीला जागा नसल्यामुळे उपनगर नाक्यावरील तंबूत व नंतर नेहरुनगर महापालिका शाळेत पोलिस कर्मचारी बसत असत.

वर्षाच्या आतच गच्छंती

उपनगर ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना एक वर्षापेक्षा जास्त काळ मिळालेला नाही. प्रारंभी के. एस. भारते यांची नियुक्ती येथे झाली. दोन दिवसात त्यांना बढती मिळाली. त्यांच्या जागी आलेल्या जे. एन. कढरे यांना सात महिन्यात नारळ देण्यात आला. त्यानंतर आलेल्या बी. एस. बुधवंत यांना नऊ महिन्यानंतर मुंबईला धाडण्यात आले. के. आर. पोपरे यांची आठ महिन्यात बदली झाली. नंतर आलेल्या हेमंत सावंत यांनी सराफ दरोडा प्रकरणी वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांना नऊ महिने मिळाले. धडाडीच्या नम्रता देसाई आल्या. मात्र, त्यांच्या सहकारी उपनिरीक्षकाने लष्करी अधिकाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीचा बदला घेण्यासाठी लष्करी जवानांनी हल्ला केला. ही घटना देसाई यांना भोवली. चार महिन्यात त्यांची बदली होऊन आता अशोक भगत आले आहेत.

दक्षिणमुखी पोलिस ठाणे

उपनगरचे पोलिस ठाणे दक्षिणमुखी असल्यामुळेच साडेसाती मागे लागल्याची चर्चा आहे. लष्करी जवानांचा हल्ला, पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निलंबन यामुळे या चर्चेने जोर पकडला. तत्कालीन निरीक्षक बुधवंत यांनी येथे वास्तुशास्त्राचा प्रयोग केला होता. बदली सत्रांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होत असून गुंडाचे मात्र फावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images