Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लष्करी अधिकाऱ्यांना जामीन

$
0
0
उपनगर पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या लेफ्टनंट दर्जाच्या अठरा संशयित प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकाऱ्यांना नाशिकरोड न्यायालयाने गुरूवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

कॅन्टीन सुविधेकडे पोलिसांनी फिरवली पाठ

$
0
0
सुट्यांची मारामार आणि कामाचा ताण यांमुळे कुटुंबीयांना देण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ नसतो. भाडेतोडे खर्चून सवलतीच्या दरात खरेदीसाठी शहरात येणे हा आमच्यासाठी घर घालून धंदा आहे. त्यामुळे कॅन्टीनचा लाभ कसा घेणार?

पोलिसांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ देवळाली कॅम्प येथे बंद

$
0
0
उपनगर पोलिस ठाण्यावर लष्करी जवानांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देवळाली कॅम्प येथे सर्व पक्ष, व्यापारी असोसिएशन व अन्य संघटनांतर्फे बंद पाळण्यात आला. बंद शांततेत पार पडला.

त्र्यंबकनगरी भरला वारकऱ्यांचा मेळा

$
0
0
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका व मुखवटा मिरवणुकीला वारकऱ्यांची अलोट गर्दी उसळली होती. सायंकाळी नाथांच्या पादुका व मुखवटा रथातून त्र्यंबकराजाच्या भेटीस येत असतो. तेव्हा दुतर्फा विणेकरी आणि तुळसधारी वारकरी महिला असा अवर्णनीय सोहळा असतो.

औद्योगिक संघटनांनी सुचविले उपाय

$
0
0
नाशिकच्या उद्योगवाढीसाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर सर्वच औद्योगिक संघटनांनी नाशिक क्लस्टरमध्ये सादरीकरण केले. यात संघटनांनी उद्योगवाढीसाठी सुचविलेल्या पर्यायांवर उद्योग विभाग साथ देणार असल्याचे उद्योग मंत्री देसाई यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रच अव्वल

$
0
0
महाराष्ट्रात उद्योग वाढीला मोठा वाव असल्याने महाराष्ट्रच उद्योग क्षेत्रात अव्वलस्थानी आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन नव्याने आलेले सरकार काम करणार आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

कंत्राटी कामगारांच्या पीएफसाठी विशेष मोहीम

$
0
0
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कंत्राटी कामगारांना लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम उघडली आहे. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी सभासदत्वासंबंधी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

'वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन'

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत होत नसून, वेळेवर बिले मिळत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

थोडे थांबा...जर्मन सरकारचा सांगावा

$
0
0
अनेक वर्षापासून रखडलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कराराचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना दोन दिवसांपूर्वी जर्मन सरकारने थोडे थांबण्याचा सांगावा इ-मेलद्वारे महापालिकेला दिला आहे.

शिस्तबद्ध वाहतुकीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

$
0
0
महाराष्ट्र राज्य गुन्हेगारीमुक्त व्हावे व शिस्तबद्ध वाहतुकीसाठी राज्याने ओळख निर्माण करावी या आशयाचे निवेदन जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले आहे.

सोमवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

$
0
0
एका आठवड्याच्या शांततेनंतर महापालिका प्रशासन पुन्हा एकदा अतिक्रमणांवर हातोडा घालण्याच्या तयारीत जुंपले आहे. सोमवारपासून अतिक्रमण मोहीम पुन्हा राबवली जाणार असून, यापुढील कारवाईनंतर अतिक्रमणधारकांकडून मोहिमेचा खर्च वसूल करण्यावर प्रशासन ठाम आहे.

नगरसेवकांना हवे कोट्यवधी, मिळणार अवघे २० लाख

$
0
0
वॉर्डातील छोटी-मोठी कामे पैशांअभावी होत नसल्याची तक्रार करणाऱ्या नगरसेवकांना प्रत्येकी २० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला विरोध

$
0
0
सिन्नर तालुक्यातील इंडिया बुल्सच्या औष्णिक विद्युत प्रकल्पास एकलहरा ते गुळवंच रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, येथील भूसंपादन शासनाने थांबवावे, अशी मागणी राज्याचे उद्योग मंत्री शुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली आहे.

आमदार फरांदेंनी राखले पालकमंत्र्यांपासून अंतर

$
0
0
माजी आमदार वसंत गिते यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या मध्य नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी शुक्रवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापासून अंतर राखल्याची चर्चा होती.

जिल्हानियोजनच्या खर्चाला कात्री

$
0
0
जिल्हा नियोजन समितीच्या नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारुप आराखड्यामध्ये विकासकामांसाठी १,३५९ कोटी रूपयांची मागणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ८२० कोटी रूपयांच्या खर्चालाच प्रारुप विकास आराखड्यात मान्यता देण्यात आली आहे.

पाणी वाटपाचा करार आघाडीच्याच काळातला

$
0
0
दमणगंगा-पिंजाळ आणि नार-पारच्या पाण्याच्या विषयांवरून कोडींत सापडलेल्या भाजपा सरकारचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न जलसंपदा व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

भटक्या श्वानांसाठी उभारणार निवारागृहे

$
0
0
भटक्या श्वानांसाठी निवारागृह सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बुकाणे यांनी दिली. श्वान निर्बिजीकरणाचा वेग वाढला असला तरी श्वानांची संख्या कमी झालेली नसल्याने हा प्रस्ताव समोर आला असल्याचे डॉ. बुकाणे यांनी स्पष्ट केले.

नायलॉन मांज्याचे ३०० रिळ नष्ट

$
0
0
महापालिकेने जप्त केलेले ३०० पेक्षा अधिक नायलॉन मांज्याचे रिळ नष्ट केले. यात सातपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नायलॉन मांजा जप्तीची मोहिमेत कारवाई केली होती. सातपूर महापालिकेच्या विभागीय कार्यालयात नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या हस्ते कटरने रिळ कापून नष्ट करण्यात आले.

नाशिकमध्ये फूड क्लस्टर उभारणार

$
0
0
महाराष्ट्रातील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, विविध उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या शासनाच्या विविध विभागातील परवाने देखील कमी केली जाणार आहेत.

विकासकामांसाठीचा निधी पडूनच

$
0
0
विकास कामांसाठी दिलेल्या निधीपैकी बराचसा निधी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांनी खर्चच केला नसल्याचे धक्कादायक वास्तव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी उघड झाले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images