Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जलसंपदामंत्र्यांनी उडवले पतंग

$
0
0
दमणगंगा-पिंजाळ आणि नार-पारच्या पाण्याच्या विषयांवरून कोडींत सापडलेल्या भाजप सरकारच्या बचावासाठी पुढे आलेल्या जलसंपदा व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याविषयी गुजरातचा कोणताही दबाव नसल्याचा दावा केला.

एकाच क्रमांकाचे २ जेसीबी

$
0
0
शहरात एकाच क्रमाकांच्या दोन खासगी प्रवासी बसेस आढळल्याचा प्रकार ताजा असताना आता एकाच क्रमांकाचे दोन जेसीबी आढळल्याने खळबळ उडाली आहे. जेसीबीचे रजिस्ट्रेशन न करताच तो सात वर्षांपासून व्यावसायिक हेतूने वापरात येत असल्याने सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.

जे. पी. डांगेंनी घेतला महापालिकेचा आढावा

$
0
0
राज्याच्या चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी शुक्रवारी महापालिकेस भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेचा आर्थिक आढावा घेऊन सूचना तसेच मार्गदर्शन केले. महापालिकेच्या मुख्यालयात दुपारी साडेतीन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आदिवासी महामंडळाला दहा वर्षांची मुदतवाढ

$
0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय अनुदानाची मुदत दहा वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाने हा निर्णय घेतला असून, मंडळ स्वावलंबी होईपर्यंत खर्चाचा भार आदिवासी विकास विभागालाच उचलावा लागणार आहे.

नाशिकरोडला व्यावसायिकांनी पाळला बंद

$
0
0
उपनगर पोलिस ठाण्यावर लष्करी जवानांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी उपनगर, जेलरोड व नाशिकरोड येथे बंद पाळण्यात आला. जेलरोडला भीमनगर येथे रस्त्यावर टायर्स पेटविण्यात आली. हा अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला.

वाहतूक अडथळ्यांची पाहणी

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गावर इंदिरानगर, द्वारका चौकात वाहतुकीला ठरणाऱ्या अडथळ्यांची पोलिस अधिकारी आणि नॅशनल हायवे अॅथोरिटीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली. वाहतूक सुरळीत व्हावी आणि अपघाताच्या शक्यताही कमी व्हाव्यात या उद्देशाने पोलिसांनी एनएचएला काही सूचनाही केल्या आहेत.

सिंहस्थ वेबसाईट अद्यापही वाऱ्यावरच

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या सहा महिन्यांवर येवून ठेपला असला तरी त्याची अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. मात्र, सिंहस्थाच्या खासगी वेबसाईटची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अधिकृत वेबसाईटला दिरंगाईचा फटका बसत आहे.

कॅन्टीनमधील कर्मचारी अपशब्दांचेच धनी

$
0
0
एटीएम कार्डद्वारेच खरेदीची सक्ती कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप देणारी ठरते आहे. रोकड व्यवहाराचाही पर्याय असावा, अशी पोलिसांच्या सौभाग्यवतींची अपेक्षा आहे.

मांजरपाडा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल

$
0
0
मांजरपाडा प्रकल्प या भागाचा कायापालट करणारा आहे. या प्रकल्पासंदर्भात मला या भागातील अनेक लोक भेटले आहेत. त्यांनी मांजरपाडा प्रकल्पा विषयी विचारणा केली आहे. त्यानुसार मी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामाला चालना दिलेली आहे.

भुजबळांचे नाव ऐकण्याची सवय सोडा

$
0
0
पालकमंत्री म्हणून काही जणांना केवळ छगन भुजबळ यांचेच नाव ऐकण्याची सवय झाली होती. आता ती सवय बदला, असा टोलाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लावला. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या पवित्र कुंभमेळ्यासाठी शहरातील चारही आमदार व मी स्वतः जातीने लक्ष घालत आहे.

तापमानात लक्षणीय चढ-उतार

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून तपमानात लक्षणीय चढ-उतार होत असून, त्याचा परिणाम नाशिककरांच्या आरोग्यवर होत आहे. येते काही दिवस पारा चढाच राहणार असल्याने थंडी कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वाइन उद्योगावर संक्रांत

$
0
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आडमुठेपणामुळे देशाची वाइन कॅपिटल असलेल्या नाशिकमध्ये वाइन उद्योगावर संक्रांत आली आहे.

२ हजार मिळकतींवर रेडमार्किंग

$
0
0
सहा विभागातील मुख्य रस्त्यावर असलेल्या १ हजार ९५७ अतिक्रमणांवर रेड मार्किंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ​अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे हटवण्यासाठी दिलेला एका आठवड्याचा कालावधीही संपुष्टात आल्याने सोमवारपासून अतिक्रमणे काढून टाकण्याच्या कारवाईस सुरूवात होणार आहे.

महापालिका आणणार जेनरिक मेडिकल

$
0
0
सध्या महागाईच्या काळात जीवनावश्यक वस्तू महागल्या असताना औषधांचे दरही शिखर गाठत आहे. महागलेली औषधे विकत घेणे सर्वसामान्य नागरिक, गरीब पेशंटना परवडत नाही.

इगतपुरीत गॅस ग्राहकांची लूट

$
0
0
इगतपुरी शहरातील गॅस एजन्सी ही गॅस ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर शासकीय दरापेक्षा जास्त पैसे उकळत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट पसरली आहे. ग्राहकांची लुटमार करणाऱ्या या कंपनी विरोधात शासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कळवणमध्ये आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक

$
0
0
एकीकडे ‘बेटी बचाव’ चा नारा दिला जातो तर, दुसरीकडे स्त्री भ्रूण हत्या सुरूच आहे. याचा द्यप्रत्यय नुकताच कळवणमधील युवकांना गिरणा संगमावर अवघ्या दोन ते तीन दिवसाच्या अर्भकामुळे अनुभवयास मिळाला.

सटाणा आगार व्यवस्थापकांना घेराव

$
0
0
सटाणा आगारातील एस. टी. बसस्थानक आवारात प्रवाशांना स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आगार व्यवस्थापकांना घेराव घालण्यात आला.

उत्तर महाराष्ट्रासाठी पाणी राखीव ठेवावे

$
0
0
उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा-पिंजाळ व नार-पार प्रकल्पाचे पाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून गुजरात राज्याला देण्याचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन आहे.

मनमाडला धावत्या रेल्वेत चोरी

$
0
0
हैदराबाद अजमेर एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशाची सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज असलेली बैग चोरट्याने हातोहात लंपास केली. यामुळे धावत्या रेल्वेतील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मळवाडी ते कटके वस्ती रस्ता कामाची चौकशी करा

$
0
0
नगरसूल शिवारातील मळवाडी ते कटके वस्ती वहिवाट रस्ता मजबुती कामात ठेकेदाराने स्वत:च्या मर्जीने मूळ रस्ता सोडून इतर शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ता तयार करण्यास सुरुवात केल्याने संबधित शेतकऱ्यांनी या रस्ता कामास हरकत घेतली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images