Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

इलेक्ट्रिकल लॅब, डाटा सेंटरचा ‘तिळगुळ’

$
0
0
नव्या वर्षाला प्रारंभ होऊन काही दिवस लोटले असतानाच नाशिककरांसाठी दोन मोठ्या गुडन्यूज आहेत. नाशिकमध्ये प्रस्तावित असलेल्या सीपीआरआय इलेक्ट्रिकल लॅबच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारने निधीची मंजुरी दिली आहे.

पोलिसासह ८ जणांवर गुन्हा दाखल

$
0
0
बंगल्याच्या बांधकामासाठी माहेरून ५ लाख रुपये न आणणाऱ्या विवाहितेस उपाशीपोटी ठेवत शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या तसेच, दुसऱ्या महिलेशी विवाह करणाऱ्या मालेगावच्या छावणी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी राकेश शांताराम पाटील यांच्यासह कुटुंबातील आठ जणांवर सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामविकासाची दोरी तरुणांच्या हाती

$
0
0
अभोणा कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे आठ दिवसीय शिबिर नुकतेच ढेकाळे येथे झाले. यामध्ये युवकांनी गाव स्वच्छतेपासून व्यक्तिमत्त्व विकास, श्रमदानातून ५०० मीटर समचर पातळी, रस्ते, मंदिर, गाव परिसर व पडीक जागेची साफसफाई, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा पाइपलाइन ४७० फूट, शाळा व अंगणवाडी परिसर स्वच्छता, १०० वृक्षारोपण ग्रामस्वच्छता अशी कामे करून ग्रामविकासाला चालना दिली.

झिम्मा फुगडीने आणली रंगत

$
0
0
भरधाव वेगाने बाईकवर महाविद्यालयात येणाऱ्या मुलांकडे सर्वांचेच लक्ष जाते. काहींचा चार चाकीतून महाविद्यालयात येण्याचा डामडौल देखील लक्ष वेधत असतो. पण, चांदवड नजीकच्या वडनेर भैरव महाविद्यालयातील तरुणांनी चक्क सजवलेल्या बैलगाडीतून महाविद्यालयात एन्ट्री करून सर्वांना चकीत करून सोडले.

एक हजार मुस्लिम हज यात्रेला

$
0
0
हज यात्रेची तयारी भारतीय हज कमेटी बैत-उल-हुजाज (हज हाऊस)तर्फे सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे एक हजार यात्रेकरू सौदी अरेबियातील मक्का शरीफ येथे जाणार आहे.

साडेतीन हजार लोकांमागे एक पोलिस

$
0
0
जुने नाशिक परिसर हा विविध सर्व जातीधर्माच्या लोकांच्या मिश्र वस्ती असलेला अतिसंवेदनशील भाग आहे. मात्र, इथल्या सुमारे साडेचार लाख लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी १३२ पोलिस तैनात असतात.

कुणाला तारक, कुणाला मारक?

$
0
0
कामगार कायद्यातील बदल अस्तित्वात येण्याआधीच त्यास विरोध सुरू झाला आहे. उद्योगधार्जिणे वातावरण तयार करायचे असेल तर कायद्यात बदल आवश्यक असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

शैक्षणिक उपक्रमांसाठी ‘जाणीव'

$
0
0
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजांसोबतच शिक्षण हीदेखील अतिमहत्त्वाची गरज आहे. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा मानला जातो. त्यामुळे वंचित, दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राथमिक शिक्षण मिळाले तर त्यांचा शिक्षणासंदर्भातील दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत होते व शिक्षणाविषयी ओढ निर्माण होऊन त्यांचे भवितव्य उज्ज्वल घडू शकते.

गट शेती प्रकल्प राबविण्याची गरज

$
0
0
‘नाशिक विभागात गट शेतीच्या उत्पादन ते विक्री यातील टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. नाशिक व परिसरात गट शेती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आता लोकसहभाग वाढत आहे.

ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांवर संक्रांत

$
0
0
जिल्हा परिषदेच्या विविध विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरूद्ध पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनानेही त्यांच्या बदल्यांची तयारी सुरू केली आहे.

गितेंचा प्रवेश सुकर

$
0
0
गेल्या दोन महीण्यापासून माजी आमदार वसंत गितेंचा भाजपातील प्रवेश रोखून धरणा-या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वर्चस्वाचा फटका बसला आहे.

‘त्या’ ग्राहकाला मिळणार न्याय

$
0
0
‘वीज जोडणी नसताना बील भरण्याची नोटीस’ या शीर्षकाखालील महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलेल्या बातमीची दखल ग्राहक संघटना आणि महावितरण यांच्या बैठकीत घेण्यात आली.

अंडरपासला ‘बायपास’चा पर्याय

$
0
0
इंदिरानगर येथील अंडरपास तयार करताना काय नियोजन झाले माहित नाही. मात्र, सध्या त्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. यास सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पर्याय देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे तसेच द्वारका सर्कल येथील वाहतूक सुरळीत करण्याच्यादृष्टीने अतिक्रमण मोहीम राबवण्याचे आश्वासन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गुरूवारी दिले.

कोर्टात अधिकाऱ्यांचा फौजफाटा

$
0
0
उपनगर पोलिस स्टेशनवर हल्ला करणाऱ्या जवानांना कोर्टात आणण्याच्या अगोदरपासून प्रचंड गर्दी झाली होती. कोर्ट आवारात चालणेही अवघड झाले होते. रस्त्यावर पोलिस व लष्करी अधिकाऱ्यांसह नागरिकांची वाहने उभी केल्यामुळे तीन तास वाहतूक धीम्या गतीने सुरु होती.

‘उपनिरीक्षकांवर गुन्हा दाखल करा’

$
0
0
भाजपचे पदाधिकारी जयंत नारद आणि लष्करी प्रशिक्षणार्थी अधिकारी आशिष बागूल यांना मारहाण तसेच, आमदारांच्या नावे शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस. एन. चन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सेंट जॉन्सने पटकावला मविप्र करंडक

$
0
0
अत्यंत चुरशीच्या झालेल्या ‘मविप्र करंडक’ अखिल भारतीय वक्तृत्व स्पर्धेत आग्रा येथील सेंट जॉन्स महाविद्यालयाने बाजी मारली. वैयक्तिक प्रकारात याच महाविद्यालयाच्या आनंदकुमार याने प्रथम क्रमांक पटकाव‌ला.

मांजामुळे चिमुरडी गंभीर जखमी

$
0
0
नायलॉन मांजावर बंदी घालूनही नाशिक शहरात सरार्स विक्री झाली. याचे दुष्परिणाम मकरसंक्रांतीच्या दिवशी अनुभवायला आले. नायलॉन मांजामुळे एका चिमुरडीचा चेहराचा कापला गेला.

नाशिकचे पाणी गुजरातला देवू नका

$
0
0
नाशिक जिल्ह्याच्या हक्काचे ८३ टीएमसी पाणी गुजरातला देण्याच्या निर्णयाचे पडसाद बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याचा एक थेंबही गुजरातला देऊ नये, असा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला.

नार-पारचे पाणी पेटणार!

$
0
0
दमनगंगा खोऱ्यासह नार-पारच्या पाणी आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतली असून, महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला जावू देणार नाही, अशी आरपारची भूमिका घेतली आहे.

पोलिस कॅन्टीन ‘हाजिर तोच वजीर’

$
0
0
पोलिसांना जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात मिळाव्यात, हा मुख्यालयातील सदभावना कॅन्टीनचा मुख्य हेतू असला तरी वारंवार चकरा मारूनही हव्या त्या वस्तूच उपलब्ध होत नसल्याने पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images