Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकला हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे कौंदण

$
0
0
मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकला हेमाडपंथी स्थापत्यशैलीने मोहिनी घातली आहे. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात महाराष्ट्रात बांधलेली हेमाडपंथी मंदिरे नजर खिळवून ठेवतात.

नाशिक विभागात ८३.८६ टक्के, मुलींचीच आघाडी

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१३मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा नाशिक विभागाचा निकाल ८३ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या निकालाची आकडेवारी सहा टक्कयाने उंचावली आहे.

कामगारांच्या प्रश्नांवर माझी भूमिका रंगणार

$
0
0
कामगार नेहमी समस्यांच्या गर्तेत अडकलेला असतो. त्याचे प्रश्न त्याच्या समस्या वेळोवेळी कामगार आपापल्या पद्धतीने मांडतो. कधी तो रस्त्यावर येतो तर कधी काळ्या फिती लावून निषेध नोंदवितो.

फरार गुन्हेगार, पोलिस परेशान

$
0
0
मे महिन्यात गंगापूररोडवर झालेल्या चांगले-सोनवणे हत्याकांडातील दोन आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात अद्याप यशस्वी ठरले आहेत. या दोन संशयितांबरोबर आतापर्यंत १ हजार २०८ संशयित गुन्हे करून फरार झाले असून पोलिस त्यांच्यावर मागावर आहेत.

सराफ बाजाराची दैना

$
0
0
गुरूवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासियांची त्रेधा उडाली. या पावसाचा सर्वाधिक फटका सराफ बाजारातील व्यवसायिकांना बसला. या भागात पावसाचे पाणी साचल्याने तब्बल ३० पेक्षा जास्त वाहने पाण्यात बुडाली तर अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले.

कुंभमेळ्याच्या कामांना दिवाळीत प्रारंभ

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांची प्रशासकीय मंजुरी आणि तयारी पावसाळ्यात पूर्ण करून येत्या दिवाळीत सर्व मोठ्या कामांना प्रारंभ करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांनी प्रशासनाला दिले. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कामांना चालना मिळणार आहे.

हॉकर्स झोनला व्यवसायिकांचा विरोध

$
0
0
केंद्र सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने हॉकर्स झोन सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी महापौर अॅड. यतीन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकी दरम्यान व्यवसायिकांनी हे सर्व्हेक्षणच बेकायदेशिर असल्याची भूमिका घेतली.

दोन तपांनी 'रचना'त एकमेकांना भेटले मित्र

$
0
0
शरणपूररोडवरील महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा नुकताच झाला. यावेळी सन १९८८ च्या बॅचच्या विद्यार्थी व शिक्षकांनी एकमेकांशी मनमोकळा संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे सर्वजण तब्बल २४ वर्षांनंतर प्रथमच एकत्र आले होते.

'चीअर लीडर'साठी भारतीय मुलींना संधी द्यावी

$
0
0
आयपीएलमध्ये चीअर लीडर म्हणून भारतीय मुलींनाच संधी दिली पाहिजे. आपल्याला पुणे वॉरियर्सकडून तसेच प्रेक्षकांकडूनही नेहमीच आदराची वागणूक मिळाल्याचे मत चीअर गर्ल अमृता मांडवीकर हिने व्यक्त केले.

पहिल्याच पावसाने नाकातोंडात पाणी

$
0
0
नाशकात दाखल झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने नाशिककरांची चांगलीच झोप उडवली. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी तुंबण्यासह विजेचा पुरवठा खंडित झाल्याने नाशिककरांना रात्रभर जागेच राहावे लागले.

'साईमार्गा'ला प्रशासकीय अडथळा

$
0
0
नाशिक, मुंबईसह विविध भागातून येणा-या आणि सिन्नरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या सिन्नर ते शिर्डी हायवेचे विस्तारीकरण प्रशासकीय अडथळ्यांमुळे अद्यापही सुरू होऊ शकलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागविल्या असल्या तरी कंत्राटाची निश्चिती आणि वर्क ऑर्डर देण्यास विलंब झाला आहे.

'डीएड'ला उतरती कळा

$
0
0
पारंपरिक अभ्यासक्रमांमुळे रोजगाराच्या संधी फारशा उपलब्ध होत नसल्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य मिळत आहे. परिणामी 'डीएड' अभ्यासक्रमालाही उतरती कळा लागली असून यंदा राज्यभरात या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ २ हजार ९०० अर्जांची विक्री झाली आहे.

नाशिकलाही होणार आरके स्टुडिओ

$
0
0
कृष्णधवल काळात अर्ध्याहून अधिक शतक ज्या स्टुडिओने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले त्या आरके स्टुडिओच्या धर्तीवर नाशकात स्टुडिओ होणार आहे.

'रॅली ऑफ महाराष्ट्र'वर गौरव गिलचे वर्चस्व

$
0
0
नागमोडी वळणे व तीव्र चढ-उतारांचा समावेश असलेल्या खडतर रस्त्यांचे आव्हान असताना व नेहमीप्रमाणे पेट्रोलऐवजी डिझेल वाहनासह उतरलेल्या दिल्लीच्या गौरव गिलने यंदाही 'रॅली ऑफ महाराष्ट्र'वर आपलेच वर्चस्व ठेवले आहे.

घरफोडीत लाखाचा मुद्देमाल लंपास

$
0
0
नाशिकरोड भागात घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांत चोरट्यांनी सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास केला. घरफोडी, चोरीच्या वाढत्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये मात्र चांगलीच धास्ती बसली आहे.

वॉलमार्ट नाशिकमध्ये!

$
0
0
अमेरिकेतील सर्वात मोठी रिटेल कंपनी असलेल्या वॉलमार्टचे महाराष्ट्रातील पहिले रिटेल आऊटलेट नाशकात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने वॉलमार्टच्या अधिकाऱ्यांना नाशिकमधील काही जागांची पाहणी केली आहे. त्यामुळे नाशिकच्या मॉल आणि रिटेल संस्कृतीला वेगळा आयाम मिळणार आहे.

'आरटीओ'त ८ नवे अधिकारी

$
0
0
नाशिक आरटीओ (प्रादेशिक परिवहन विभाग) कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक पदावरील पाच व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (असिस्टंट आरटीओ) पदावरील दोन अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. या सात पदांसह निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या एका पदाची सूत्रे नवीन अधिका-यांनी हाती घेतली आहेत.

धुळे, नगरला सुरक्षा रक्षक मंडळ

$
0
0
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांसाठी नाशिकपाठोपाठ धुळे आणि अहमदनगर येथे सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या बोर्डामुळे खासगी ठिकाणी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना किमान वेतनासह विविध सवलती मिळण्यात मदत होणार आहे.

खरेंची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे

$
0
0
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक बी. आर. खरे यांनी शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकाला भेट दिली. त्यांनी प्लॅटफॉर्मवरच्या विविध भागांना भेटी देऊन सुधारणांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. परंतु त्याची पाठ फिरताच परिस्थिती जैसे-थे झाली.

शेती तंत्रज्ञान @ आदिवासी पाडे

$
0
0
शेतीचे अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान आता लवकरच आदिवासी पाड्यांवरसुद्धा पोहोचेल. नंदूरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात कृषी कॉलेज स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images