Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महिलांना मिळणार नेतृत्वगुणांच्या टिप्स

$
0
0
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे आणि त्यांच्या श्रमाला आर्थिक प्रतिष्ठा मिळवून देणे हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून यशस्विनी सामाजिक अभियानाची सुरुवात झाली आहे.

मुक्तीधाम परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट

$
0
0
नाशिकरोडच्या मुक्तीधाम व आजुबाजुच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना ताजी असतानाही नाशिकरोडच्या कर्मचा-यांना मोकाट कुत्री पकडण्याबाबत मात्र अजूनही जाग येत नसल्याचे दिसते. यामुळे नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करित आहेत.

सुधारणांच्या प्रतिक्षेत प्रवेश प्रक्रिया

$
0
0
वर्षानुवर्षे पारंपरिक प्रवेश प्रक्रियेचा चिकटलेल्या कॉलेजेसमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ऑनलाईन तसेच सेंट्रलाईज प्रवेश प‌्रक्रियेच्या सुलभ पध्दतीकडे त्यांनी केलेले दुर्लक्ष म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्यायच म्हणावा लागेल.

ओमनगरला रस्त्याची प्रतीक्षा

$
0
0
नाशिकरोड, जेलरोड परिसरात असलेल्या ओमनगर परिसरात पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला असून त्यावर मुरुम टाकावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गॅसची बुकिंग ठरतेय ज्येष्ठांसाठी अडचणीची

$
0
0
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसी)तर्फे भारत गॅसच्या ग्राहकांना व्हॉइस कॉलवर सिलिंडर बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पध्दतीत मोबाईलद्वारे सिलेंडरसाठी नंबर लावावा लागत असल्याने ही सुविधा ज्येष्ठांसाठी किचकट ठरू लागली आहे.

'पार्किंग'चा नव्याने लिलाव

$
0
0
शहरातील ११ ठिकाणी खासगी तत्त्वावर सुरू असलेल्या पार्किंग ठेक्यांची मुदत संपली असून येत्या १४ जुन रोजी या जागांच्या ठेक्याचा पुन्हा लिलाव करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने समोर आणाला आहे.

डॉ. जैन हत्या : संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध

$
0
0
संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणा-या आणि आतापर्यंत कोणताही धागा न लागलेल्या डॉ. जैन हत्याप्रकरणी आज पोलिसांनी संशयिताचे एक रेखाचित्र प्रसिद्ध केले. ६ जून रोजी रात्री कासमपूरा येथील डॉ. रमणलाल बन्सीलाल जैन व त्यांचे कम्पाउंडर रामेश्वर पांडे घरी परतत असताना यांच्यावर सवतखेडाजवळ गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

गाडी दुभाजकाला धडकून तरुणी ठार

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवर झालेल्या गाडीच्या अपघातात एक तरुणी ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना राणेनगर परिसरातील एसबीआय स्टॉप येथे रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

सुरूच राहणार 'नाशिक रायझिंग'...!

$
0
0
तसं नाशिक ही मंत्रभूमी पण अनेक बदल स्विकारत आज ती तंत्रभूमीकडे वाटचाल करतेय. 'मटा'चे सकारात्मक पत्रकारितेला नेहमीच प्राधान्य राहीले आहे. त्यातूनच तर नाशिकचा महानगर म्हणून होणारा उदय व्हावा यासाठी 'मटा'ने 'नाशिक रायझिंग'अभियान हाती घेतले.

'गायना'चे चाहते !

$
0
0
राजकारण हा पिंड असलेल्या व्यक्तींना आपण लोकाभिमुख असावे, असे नेहमी वाटत असते. हा प्रत्येक राजकीय व्यक्तीचा स्थायीभावच असे म्हणा. त्यामुळे परिचय असो वा नसो. आपण कोण, काय करतो, आमचा पक्ष कसा, त्यातील ‌नेते कसे? यावर ते कोणत्याही संकोचाशिवाय गप्पा मारत इतरांचा वेळ घेण्यात आघाडीवर असतात.

नाशिक जिल्ह्यात दम'धार'

$
0
0
जून महिन्यात सुरू झालेल्या मान्सुनने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. १ जून ते ९ जूनपर्यंत जिल्ह्यात १ हजार ३०० म‌िलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दुष्काळी ठरलेल्या सिन्नर, देवळा, बागलाण, दिंडोरी आदी तालुक्यांसह सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे.

शाळा सुरू होणार १७ जूनला

$
0
0
राज्यभरातील सर्व शाळा १५ जूनऐवजी १७ जूनला सुरू करण्याची सूचना शालेय शिक्षण ‌व क्रीडा विभागामार्फत देण्यात आली आहे. दरवर्षी राज्यभरातील शाळा १५ जूनला सुरू करण्यात येतात. परंतु यंदा मात्र शाळा दोन दिवस उशीरा सुरू करण्याची सूचना नुकतीच देण्यात आली आहे.

गो. ब. देवल पुरस्कार जाहीर

$
0
0
अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे गो. ब. देवल पुरस्कार जाहीर करण्यात आले. नाशिकमधील विविध कलाकारांना हा पुरस्कार जाहीर झाला असून १४ जून रोजी मुंबई येथील यशवंत नाट्यमंदिरात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

इंजिनीअरिंग कॉलेजात क्रेडिट सिस्टीम

$
0
0
राज्यभरातील इंजिनीअरिंग कॉलेजच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना येत्या शैक्षणिक वर्षपासून क्रेडिट सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लेकीची हत्या करून मातेची आत्महत्या

$
0
0
आपल्या सात महिन्यांच्या मुलीची विजेच्या खांबाला आपटून हत्या करून आईने स्वतःही रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली.

'रासबिहारी'ची मान्यता धोक्यात

$
0
0
प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत गुरुवारी रासबिहारी शाळेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून याबाबत सोमवारी (१० जून) खुलासा न मिळाल्यास पुढील कारवाई करणार असल्याची माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.

अंतिम दिवशी बिलांचे वाटप

$
0
0
महावितरणकडून डीजीपी नगर परिसरात पैसे भरण्याच्या अंतिम दिवशी बिले पाठवण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. या बिलांवर आकारण्यात येणारा दंड महावितरणने माफ करावा, अन्यथा बिलाची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

करूया आपत्तीशी दोनहात

$
0
0
मान्सून पूर्व पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीतून जिल्ह्यात सहा दिवसात सहा जणांचा बळी गेला. पावसाळा आणि नैसर्गिक आपत्ती हे समीकरणच आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे दरवर्षी नियंत्रण कक्ष स्थापणे तसेच विविध प्रकारचे नियोजन केले जाते.

महावितरणला हवाय 'झटका'

$
0
0
एखाद्या जबाबदार संस्थेने बेजबाबदारपणा दाखविला तर नागरिकांचाच नव्हे तर लोकप्रतिनिधींचा रोषही त्या अंगावर ओढवून घेतात. त्यातल्या त्यात महावितरणकडून असे काही घडले तर संताप होणे सहाजिकच आहे.

नाशिकरोडच्या 'सेतू'त दलालांचा सुळसुळाट

$
0
0
दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर नाशिकरोडच्या सेतू कार्यालयात दाखले काढण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. याच गर्दीचा फायदा घेत दलाल मंडळी सक्रिय झाली असून याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images