Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कॉलेजरोडला हाय होल्टेजचा शॉक

$
0
0
महावितरणच्या हायहोल्टेज सप्लायमुळे कॉलेजरोडवर अनेक ठिकाणी उपकरणे जळाली असून ऑफिसमधील जनरेटरचे चेंजओव्हर स्विच जळाले आहेत. त्यामुळे महावितरणने त्याची भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

फुप्फुसावरील दुर्धर शस्त्रक्रिया यशस्वी

$
0
0
वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉ. जी. बी. सिंग आणि सहका-यांनी एका ४७ वर्षीय रूग्णावर फुप्फुसाच्या आजारावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.

डीटीईचा सर्व्हर डाऊन

$
0
0
इंजिनीअरिंग आणि फार्मसी च्या प्रवेशांसाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या एमटी सीईटीच्या निकलाकडे नजरा लावून बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांची डीटीईची सर्व्हर डाऊन असल्याने निराशा झाली.

गोडसेंचा बोलवता धनी वेगळाच

$
0
0
मनसेला जयमहाराष्ट्र ठोकून शिवसेनेत प्रवेश करणारे हेमंत गोडसे खोटारडे आणि वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करीत असून त्यांचा बोलवता धनी वेगळाच असल्याचा आरोप मनसेचे गटनेते अशोक सातभाई यांनी केला आहे.

रेल्वे स्टेशनवरील एटीएम कंगाल

$
0
0
नाशिकरोड रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांच्या सोयीसाठी तीन एटीएम केंद्र आहे. या एटीएमध्ये अनेकवेळा पैसे नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून दिवसातून दोन वेळा मशिनमध्ये पैशाचा भरणा करावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

अतिक्रमणांकडे पालिकेचे दुर्लक्ष

$
0
0
पवननगर येथील जिजामाता भाजीमंडईत रोज सायंकाळी होणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीमुळे गाड्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. रस्त्यावरच उतरवला जात असलेला भाजीपाला असलेल्या गर्दीत आणखी भर टाकत आहे.

गोदान एक्स्प्रेसखाली मोराचा मृत्यू

$
0
0
पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या मोराचा गोदान एक्स्प्रेसच्या इंजिनची धडक लागल्यामुळे मृत्यू झाला. गुरुवारी मनमाड रेल्वे स्थानकावर ही घटना उघडकीस आली. मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे आरपीएफ अधिकारी बाबासाहेब नेटके यांनी तातडीने वन विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधून घटनेची माहिती देऊन मयत झालेला मोर त्यांच्या हवाली केला.

धुळीने रहिवासी हैराण

$
0
0
मेळा स्टॅँडकडून ठक्कर बाजारात येणाऱ्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत असून स्टॅँडलगत राहणाऱ्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच स्टँडजवळ असलेल्या न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीच्या आवारातही धुळीने थैमान घातले आहे.

कुंभमेळ्याचा आढावा घेणार

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना वेग देण्यासाठी आणि एकंदरीत कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव शुक्रवारी नाशकात येणार आहेत. विविध विभागांची कामे, तातडीने करावयाच्या उपाययोजना आदींबाबत माहिती घेऊन योग्य ते दिशानिर्देश देणार आहेत.

मोटरस्पोर्ट्समध्ये महाराष्ट्र मागे

$
0
0
कुस्तीपासून क्रिकेटपर्यंत तर जलतरणापासून नेमबाजीसारख्या आंतरराष्ट्रीय खेळात मराठी खेळाडू आपला झेंडा फडकवत आहेत. मात्र मोटरस्पोर्टसप्रती महाराष्ट्र सरकारला असलेली अनास्था मराठी खेळाडूंसाठी मारक असल्याची खंत नाशिकला होणाऱ्या 'रॅली ऑफ महाराष्ट्र'मधील प्रख्यात शिरोले व रूपेश खोले यांनी बोलून दाखवली.

रॅली ऑफ महाराष्ट्र

$
0
0
आजपासून (शुक्रवार) रविवारपर्यंत नाशिक परिसरात रंगणाऱ्या 'रॅली ऑफ महाराष्ट्र'चा गुरुवारी मोठ्या दिमाखात शुभारंभ झाला. राजीव गांधी भवन येथे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल व महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करत रॅलीचे उद्घाटन झाल्याची घोषणा करण्यात आली.

नाशिकरोडला पावसाने झोडपले

$
0
0
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावत नाशिकरोडकरांना झोडपले. संध्याकाळी सुरू झालेल्या पावसाने जागोजागी तळे साचले होते. तसेच संपूर्ण नाशिकरोडची वीज पुन्हा गेली.

वारणेची 'कृष्णा' केली

$
0
0
'वारणा नदीतून स्वच्छ पाणी उचलण्याच्या मुख्य उद्दिष्टाला बगल देऊन वारणा योजनेची 'कृष्णा' करताना सत्ताधाऱ्यांनी निश्चितच मोठी भानगड केली असणार. योजनेत घोळ करून केंद्र सरकारचा निधी वापरला असेल, तर कोणालाही सोडणार नाही', असा इशारा केंद्रीय कोळसा खात्याचे राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

जळगावात गोळीबार, दोघांचा मृत्यू

$
0
0
जळगाव-पळसखेडा रस्त्यावर नेरीजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बाईकवरून जाणा-या डॉक्टर आणि कम्पाऊंडरचा मृत्यू झाल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीवरून देण्यात आले आहे. हल्लेखोरांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

नक्षलवादी हे देशाचे मित्र!: आंबेडकर

$
0
0
‘अति डावी’ भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेले भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आता नक्षलवाद्यांचे खुलेआम समर्थन करून खळबळ उडवून दिली आहे. ‘नक्षलवादी हे देशाचे खरे मित्र आहेत. पण देशातील सरकारच त्यांना शत्रू समजून त्यांच्याशी व्यवहार करते,’ असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

असे मिळवा दाखले

$
0
0
दहावी बारावीचे निकाल जाहीर झाल्यामुळे आता लगबग सुरू झाली आहे ती अॅडमिशनची. अॅडमिशन अर्जासोबत आवश्यक असणारे दाखले मळिविण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेकदा सेतू कार्यालयात हेलपाटे घालावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुक्त विद्यापीठांचे प्राधान्य ऑटोनॉमस बॉडीलाच

$
0
0
अगोदरपासूनच तोकड्या मनुष्यबळाच्या समस्येचा सामना करणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्याच (युजीसी) पदरी देशातील दूरस्थ शिक्षण पडले आहे. या स्थितीत युजीसी दूरस्थ शिक्षणाचे पोषण किती सक्षमतेने करू शकेल, याविषयी प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

मनमाडमध्ये ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण

$
0
0
दहावीच्या परीक्षेत मनमाड शहरातील १० शाळांमधील १०११ विद्यार्थ्यापैकी ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९९ पुनर्परिक्षार्थींपैकी अवघे १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १० शाळांमध्ये स्वामी विवेकानंद हायस्कूल अव्वल ठरली असून या शाळेचा निकाल ९६.१५ टक्के लागला. येथील ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

विद्यापीठ उपकेंद्राची जागा निश्चित

$
0
0
जागेच्या अडचणीमुळे रखडलेला पुणे विद्यापीठा‌च्या नाशिक उपकेंद्राचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. सय्यद पिंप्रीतील जागेबाबत अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे विद्यापीठ उपकेंद्र दिंडोरी तालुक्यातील मौजे शिवनई येथे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

जळगावचा निकाल ८०५३ टक्के

$
0
0
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून जळगाव जिल्ह्याचा निकाल ८०.५३ टक्के लागला आहे. धुळे जिल्ह्याचा ७८.०३, तर नंदुरबार जिल्ह्याचा ७९.६७ टक्के निकाल आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images