Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आमदार निर्मला गावित यांचे आश्वासन

$
0
0
आगामी पाच वर्षात मतदारसंघाच्या विकास व प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावण्यासाठी सदैव प्रयत्न करणार आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही.

‘पीककर्ज माफीसह नुकसानभरपाई द्या’

$
0
0
नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी आणि पीककर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी मुख्यमंत्र्यासह कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

सटाणा येथे राबविले स्वच्छता अभियान

$
0
0
येथील नववसाहतीमधील मोकळ्या भूखंडावरील काटेरी झुडपे काढण्याची मागणी स्वराज्य प्रतिष्ठान व शहरवासीयांनी केली होती. त्यानुसार पालिकेच्या माध्यमातून व गटनेते काका रौंदळ यांच्या पुढाकारातून स्वच्छता करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांवर संक्रांत

$
0
0
सलग तीन दिवस अवकाळी पावसाने बागलाण तालुक्यात रौद्ररूप कायम ठेवल्याने शेतीपिके पूर्णत: संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी तालुक्यातील नष्ट झालेल्या पिकांची पाहणी केली.

केसांच्या न‌िगेलाही द्या प्राधान्य

$
0
0
सौंदर्य साधनेत त्वचेइतकेच केसांच्या न‌िगेलाही महत्व आहे. केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहारासोबतच योग्य प्रसाधनांचा उपयोग आण‌ि स्वच्छता या बाबींनाही मह‌िलांनी प्राधान्य द्यावे, असा कानमंत्र इंटरनॅशनल हेअर स्टायल‌िश दामोदर चव्हाण यांनी द‌िला.

‘वा गुरू’ ने दिला सकारात्मक संदेश

$
0
0
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सोमवारी बाबाज थिएटर्सतर्फे चंद्रशेखर फणसळकर लिखीत ‘वा गुरू’ हे नाटक सादर करण्यात आले.

१७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

$
0
0
सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १७ हजार ४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक माहिती आहे. यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, कांदा, भात, नागली, टोमॅटो, सोयाबीन, मका या पिकांचा समावेश आहे.

लेटलतिफांची मुजोरी कायम

$
0
0
महापालिकेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर नवनियुक्त आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारूनही त्यांची मुजोरी कायम असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी राजीव गांधी भवनासह सहाही विभागीय कार्यालयांत केलेल्या पाहणीत तब्बल २९६ कर्मचारी लेटलतिफ असल्याचे आढळून आले.

बाळासाहेब ठाकरेंना ‘सोशल’आदरांजली

$
0
0
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडियावर सोमवारी दिवसभर अभिवादन करण्यात येत होते. निव्वळ शिवसैनिकच नव्हे तर सामान्य नागरिकांनीही बाळासाहेबांच्या आठवणींना फेसबुक आणि व्हॉटसअपच्या माध्यमातून उजाळा देत त्यांचे स्मरण केले.

सिंहस्थापूर्वीच हव्यात ५०० बसेस

$
0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला नवीन सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवासी उत्पन्न वाढवायचे असेल तर शहर आणि जिल्हा मिळून किमान ५०० नवीन बसेस मिळायला हव्यात अशी अपेक्षा आहे.

आढळल्या ‘डेंग्यू’च्या अळ्या

$
0
0
पंचवटीतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये सोमवारी सकाळी जनजागृती मोहिम सुरू करण्यात आली. पहिल्या काही तासातच आठ ते दहा ठिकाणी​ डेंग्यू आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्यात.

देशात लक्षणीय वीज वाहिन्या

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार विकासाच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक आहे. त्यामुळेच पॉवर ग्रीडच्या माध्यमातून देशात येत्या अडीच वर्षात सुमारे पाच हजार किलोमीटर लांबीच्या वीज वाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पॉवर ग्रीडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आर. एन. नायक यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. नाशकात एका बैठकीसाठी ते आले होते.

वीज वाहिनीबाबत सर्वेक्षण

$
0
0
औरंगाबाद ते भोईसर या दरम्यान नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या अति उच्च दाबाच्या वीज वाहिनीचे काम फेरसर्व्हेक्षणानंतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्वेक्षणही गुजरातमधील इंजिनिअर आणि तेथील एजन्सीकडून केले जाईल, असे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाली.

दिवसाला पाच जणांना डेंग्यू

$
0
0
शहरात साफसफाई मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रम महापालिकेने सुरू केला असला तरी नोव्हेंबर महिन्यात दिवसाकाठी सरासरी पाच व्यक्तींना डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ८२ व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली असून, यातील १० जण शहराबाहेरील असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

क्रीडा विभाग गावापर्यंत पोहचावा

$
0
0
सरकार कोणाचेही आले तरी त्यांच्याकडून क्रीडा विभाग हा नेहमीच दुर्लक्षिला जात असल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सरकारने या खात्याकडेही आस्थेने पहावे अशी सामान्य खेळाडूंची अपेक्षा आहे.

युवकांचे योगदान महत्त्वाचे

$
0
0
खेळामुळेच जीवनात मोठी उंची गाठता येते. राष्ट्रीय एकात्मतेसाठी तरुण युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. जगात सर्वात मोठी युवापिढी भारतात असून देश महासत्ता बनविण्याची ताकद नवयुवकांत आहे, असा विश्वास कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केला.

हरित कुंभ कागदावरच

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा पर्यावरणपूरक होण्यासाठी करण्यात आलेले नियोजन कागदावरच असल्याची बाब पुढे आली आहे. हरित कुंभच्या आराखड्यानुसार एकाही सरकारी विभागाने कामकाज केलेले नसल्याने संतप्त झालेले विभागीय आयुक्त पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेणार आहेत.

जागेचे भाडे काय देणार?

$
0
0
साधुग्रामसाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण करताना जागा भाडे दर किती असणार आहे, असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने विचारला आहे. तसेच इतर काही प्रश्नांसंदर्भात प्रशासनाने येत्या आठ दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

खर्च निरीक्षक नाशिक दौऱ्यावर

$
0
0
विधानसभा निवडणुकीत केलेल्या खर्चाचा एकूण तपशील तपासण्यासाठी खर्च निरीक्षक बुधवारी नाशकात येत आहेत. खर्च सादर करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर असल्याने उमेदवारांची धावपळ उडाली.

चीनच्या वर्चस्वाला धक्का

$
0
0
गेल्या आठवड्यात बॅडमिंटनमधील चीनच्या भिंतीला जोरदार हादरे बसले. चीनच्या घुसखोरीचे प्रयत्न नेहमीच होतात हो, पण चीनमध्ये जाऊन चीनच्या बॅडमिंटन वर्चस्वाला यशस्वी आव्हान देणे म्हणजे भारतात अस्सल चायनीज पदार्थ मिळण्याइतकेच अवघड!
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images