Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गांधी विचारांची धगधगती ज्योत

$
0
0
महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरणा घेणाऱ्या. आचार्य विनोबा भावेंकडून ज्यांनी शिक्षणाचे धडे घेतले व त्यांच्या आश्रमात सूत कापणीच तंत्र आत्मसात करीत कालांतराने नाशिकसह राज्यातील विविध भागांत लोकांपर्यंत पोहचवलं अशा थोर विचारवंत, सूतकार, अध्यापिका, लेखिका, वक्त्या म्हणजे प्रा. वासंती सोर.

नाशिकच्या उद्योगांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा

$
0
0
राज्यात नवे सरकार आल्यापासून उद्योग जगताला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यात नाशिकच्या उद्योग विश्वाचाही अपवाद नाही. एकूण सहा नव्या धोरणांद्वारे ‘मेक इन महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पावसाने वाढणार साथींचा ‘ताप’

$
0
0
शहरात डेंग्यूने थैमन घातले असतानाच त्यातच तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने बदललेल्या तापमानाचा फटका आता रुग्णांना बसू लागला आहे. डेंग्यूचा त्रास त्यात पावसाचा कहर असे म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.

HAL सोसायटीप्रकरणी दोषींवर कारवाई करा

$
0
0
ओझर टाऊनशिप येथील एम्प्लॉइज को-ऑप क्रेडीट सोसायटीतील ५५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल कदम आणि कृती समितीचे समन्वयक प्रवीण तिदमे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून दोषींवर कारवाई करण्यासह संस्था पुनर्जीवित करण्याची मागणी केली.

ई टेंडरला ‘नकारघंटा’

$
0
0
निविदा न मागवाता मजूर सोसायट्यांना ई टेंडरच्या प्रक्रियेतून जाण्याच्या सरकारच्या निर्णया विरोधात मजूर सोसायट्याचे प्रतिनिधी एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी नाशिक तालुक्यातील मजूर सोसायट्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.

ताडी दुकानांसाठी ३५ परवान्यांचे वाटप

$
0
0
जिल्ह्यात गेल्या सात वर्षांच्या कालावधीनंतर मंगळवारी ३५ दुकानांचे लिलाव घेण्यात आले. या लिलावांसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली. या लिलावाद्वारे सरकारला १ कोटी ६५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला. ताडी दुकानांबाबत वाद निर्माण झाल्याने मंत्र्यांपासून हायकोर्टापर्यंत यासंदर्भात चर्चा राहिली.

हायकोर्टाची वनविभागावर नाराजी

$
0
0
आगामी सिंहस्थ विकासकामांसाठी नाशिक शहरातील २४०० झाडे तोडण्यासंदर्भात हरकती मगिविलेल्या सूचनांचा योग्य विचार न केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने नाशिक वनविभागावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, येत्या गुरुवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

६५७ हॉस्पिटल्सला महापालिकेच्या नोटिसा

$
0
0
मुंबई नर्सिंग होम अॅक्टनुसार दर तीन वर्षांनी परवान्याचे नूतनीकरण न करणाऱ्या तब्बल ६५७ हॉस्पिटल्स तसेच क्लिनिकला महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे बदलीसाठी प्रयत्न?

$
0
0
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतपिकांचे आतोनात नुकसान केले असताना जिल्हाधिकारी विलास पाटील हे बदलीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची रजा वाढवली असून ते आता पुन्हा रुजू होणार की नवे जिल्हाधिकारीच येणार, अशी चर्चा आहे.

जॉगिंग ट्रॅकवर चिखलाची पायवाट!

$
0
0
औद्योगिक वसाहतीत एकमेव असणाऱ्या क्लब हाऊसच्या मैदानावरील जॉगिंग ट्रॅकची दूरवस्था झाली आहे. त्यातच चार दिवस झालेल्या पावसाने ट्रॅक चिखलाने व्यापला गेला असून पायी चालणेही कठीण झाले आहे.

सिमकार्डप्रकरणी सिन्नरमध्ये छापा

$
0
0
सिन्नर तालुक्यातील माळेगाव, मुसळगाव येथील कंपंन्यामध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना स्थानिक रहिवाशांच्या नावाने मोबाइल सीम कार्ड देणाऱ्या एका कंपनीच्या डिस्ट्रीब्यूटर्सवर सिन्नर पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून कोरे दाखले, कोरे अर्धवट भरलेले फॉर्म, वेगवेगळे शिक्के जप्त केले आहेत.

अवकाळी पावसाचा फळबागांना फटका

$
0
0
येवला तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा, बाजरी, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांना काहीसी क्षती पोहचवली असली तरी या 'अवकाळी' ने विशेषतः फळबागांना मोठा फटका बसला आहे.

सहा दरोडेखोरांना अटक

$
0
0
संगमनेरसह स‌िन्नर आण‌ि नाश‌िकमधील दरोडेखोरांच्या टोळक्याने मानूर शिवारातून सोमवारी रात्री एक ट्रक पळवत सुमारे १७ लाखांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांच्या सर्तकतेमुळे दरोडा घालणारे सहा आरोपी बारा तासात पोलिसांच्या हाती लागले.

अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ५४ एकर जागेमध्ये झालेली अतिक्रमणे मंगळवारी महापालिका प्रशासनाने जमीनदोस्त केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी किरकोळ विरोध करण्याचा प्रयत्न केला.

मुख्य सचिव घेणार आढावा

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रस्तावित विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकारी समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे.

वर्षभरात ५६७ मिमी अवकाळी पाऊस

$
0
0
नाशिक जिल्ह्यात यंदा वर्षभरात तब्बल ५६७ मिलीमीटर अवकाळी पावसाने झोडपले आहे. या पावसात अनेक ठिकाणी शेतमालाचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे.

प्राध्यापक आंदोलनावर ठाम

$
0
0
नव्या सरकारने प्राध्यापकांच्या प्रलंब‌ित मागण्यात लवकर सकारात्मक पध्दतीने न‌िकाली काढाव्यात, अन्यथा आंदोलनाच्या माल‌िकेचा न‌िर्णय कायमच राहील, अशी भूम‌िका बुधवारी एमफुक्टोच्या श‌िष्टमंडळाने घेतली.

अनधिकृत इमल्यांवर पडणार हातोडा

$
0
0
शहरातील सरकारी जागेवरील अतिक्रमणासह अनधिकृत इमारतीवर महापालिकेच्या परवानगीशिवाय केलेल्या बाधंकामावर हातोडा चालव‌िला जाणार असल्याची माह‌िती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिला आहे.

सिंहस्थाची चाहूल

$
0
0
दर १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपला आहे. सिंहस्थातील विशेष आकर्षण हे साधुग्रामचे असते. कारण देशाच्या विविध भागातील साधू, महंत हे साधुग्रामच्या ठिकाणी वास्तव्यास असतात.

पालखेड डाव्या कालव्याचे पाणी करारानुसारच हवे

$
0
0
येवल्यातील सहकारी पाणीवापर संस्थांना पालखेड डाव्या कालव्याचे करारानुसार पाणी देण्यात यावे. अगोदर शेतकऱ्यांची तहान भागवा मग, जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा बळीराज्य पाणीवापर संस्थांचा संघ आणि शेतकरी संघटनेचे नेते संतू पा. झांबरे यांनी निवेदनाद्वारे संबंधितांना दिला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images