Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘शेतमालाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा’

$
0
0
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुरु असलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतमालाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विविध उपक्रमांनी बालदिन साजरा

$
0
0
नाशिक यूथ प्रतिष्ठानतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली गावात बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी गावातील १२३ मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी डॉ. सुजित कुदळे, अमोल येवला, करण पाटोळे उपस्थित होते.

गो हत्या रोखण्यासाठी मृत्यूदंड हवा

$
0
0
‘गोवंश हत्या रोखायची असेल तर गो हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंड हीच कठोर शिक्षा असणारा कायदा अच्छे दिनचा नारा देणाऱ्या नवीन सरकारने तातडीने संमत करायला हवा.’ असे मत विश्व हिंदू परिषद तसेच भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेचे उपाध्यक्ष हुकूमचंदजी सावला यांनी रविवारी नाशिक येथे केले.

जीएसटी करप्रणाली सुटसुटीत व्हावी

$
0
0
जीएसटी करप्रणाली सुटसुटीत व्हायला हवी. कुठलाही नवीन कर अंमलात आणताना सरकारला ज्या अडचणी येतात त्या तात्कालीक असतात. जीएसटीकरिता सरकारमध्ये एकमत होणे गरजेचे असून जीएसटी करप्रणाली हे पुढच पाऊल आहे.

जिल्ह्यात पावसाचा अवकाळी कहर

$
0
0
जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावत तारांबळ उडवली. यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीत आणखीनच भर पडली असून उरलेसुरले पीकही मातीमाले झाले आहे.

कोर्टाला हवे इन्फ्रास्ट्रक्चर

$
0
0
शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या जिल्हा कोर्टाची सध्याची जागा अपुरी ठरू लागली आहे. पक्षकारांचा राबता, वक‌िलांची वाढलेली संख्या यामुळे सर्वांनाच कोर्टामध्ये अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. जागेची उपलब्धता आणि अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर ही सद्दस्थितीमध्ये कोर्टाची सर्वात मोठी निकड आहे.

अवकळा!

$
0
0
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने रविवारी सलग चौथ्या दिवशी जोरदार तडाखा दिला, तर शहरात सलग तिसऱ्या दिवशी सायंकाळी पाचवाजेपासून तास-दीडतास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

नानासाहेब प्रतिष्ठानतर्फे शहरात स्वच्छता मोहीम

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देत त्याच्या अंमलबजावणीसाठी नानासाहेब प्रतिष्ठानने राज्यात पुढाकार घेतला आहे. नाशिकमध्येही रविवारी या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

फेरीवाल्यांसाठी काँग्रेसचे आंदोलन

$
0
0
फेरीवाल्यांच्या समस्यांसंदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली. नाशिक महापालिकेने हेतूपूरस्कर शहर फेरीवाला समिती सदस्यांचे मानधन रोखले आहे.

डॉ. मदनूरकर यांना प्रथम पारितोषिक

$
0
0
इंग्लड येथे झालेल्या जागतिक स्तरावरील युरोपियन सोसायटी ऑफ सर्जिकल आँकोलॉजीच्या परिषदेत कॅन्सर सर्जन डॉ. नागेश मदनूरकर यांच्या पोस्टर प्रेझेंटेशनला प्रथम पारितोषित मिळाले आहे.

महापालिका प्रशासनाला आली जाग...

$
0
0
पिसाळलेल्या कुत्र्यांचा सातपूर कॉलनीत पाच जणांना चावा याबाबत ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध करताच सोमवारी सकाळी महापालिकेने मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहिमच हातात घेतली.

एमआयडीसी कॉलनीत मूलभूत सुविधांची वानवा

$
0
0
औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या एमआयडीसी कॉलनीला अनेक समस्यांनी वेढले आहे. कॉलनीत ठिकठिकाणी कच‍ऱ्यांचे ढीग साचले असून, फुटलेल्या गटारी व वाढलेल्या गवताने डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.

रिक्षाभाडे, रोजचाच प्रश्न!

$
0
0
आज अन्न, वस्त्र, निवाऱ्यानंतर महत्त्वाची गरजेची बाब येते ती म्हणजे प्रवास! महानगरात सर्वांकडेच चारचाकी नसते, बसची व्यवस्था तर गल्लीबोळात होऊ शकत नाही.

आयटीआय निकाल २० तारखेला

$
0
0
राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) निकाल तब्बल ११० दिवसांनंतर आता गुरुवारी, २० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. परीक्षा प्रणालीत ओएमआर पद्धतीचा पहिल्यांदाच वापर केल्यानंतर निकाल लवकर लागणे अपेक्षित होते.

विनय बारपांडेंची राष्ट्रीय प्लंबिंग परिषदेसाठी निवड

$
0
0
महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक विभागातील तज्ञ प्लंबिंग कंन्सलटंट विनय बारपांडे यांची २० व २१ नोव्हेंबर २०१४ रोजी बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्लंबिंग परिषदेसाठी निवड झाली आहे.

सिन्नरला मुख्याधिकाऱ्यांना घेराव

$
0
0
सिन्नर शहर व परिसरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विजयनगर भागातील एम. जी. नगरातील संतप्त महिलांनी नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

आनंदयात्रीची एक्झिट

$
0
0
अवघ्या चार पाच दिवसांआधी आपला ७१ वा वाढदिवस साजरा करून अभीष्टचिंतन करणाऱ्या सर्व स्नेहीजनांना आनंदाचा मूलमंत्र देणारा आणि वृद्धांसाठी काही तरी करण्याची खुणगाठ मनात बांधणारा हा आनंदयात्री अशी अचानक आयुष्यातून एक्झिट कशी घेऊ शकतो हा प्रश्न कल्पनेच्या ही पलिकडचा होता!

विहिरीत पडून हरणाचा मृत्यू

$
0
0
तालुक्यात विहिरीत पडून हरणांची बळी जाण्याची घटना येवला तालुक्यातच सुरूच आहे. ममदापूर येथे रविवारी रात्रीच्या सुमारास विहिरीत पडून एका नर जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पाणीप्रश्नासाठी सोनवणेंचे उपोषण

$
0
0
सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या ठेंगोडा येथील गायरान जमिनाच्या प्रस्तावाला चालना मिळून सदरची जमीन सटाणा पालिकेला सुपूर्द करण्यात यावी, अशी मागणी पालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते व नगरसेवक मनोज सोनवणे यांनी केली आहे.

कळवणमध्ये स्वच्छता अभियान

$
0
0
बालदिन ते जागतिक शौचालय दिन या कालावधीत शासनातर्फे बाल स्वच्छता अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत कळवण पंचायत समितीच्या निर्मल भारत अभियान कक्ष, आरोग्यविभाग, शिक्षण विभाग व महिला बाल विकास प्रकल्प विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images