Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्हा परिषदेतही निवडणुकीची लग‌ीनघाई

$
0
0
एकीकडे विधानसभा निवडणुकीची धूम सुरू झाली असतानाच नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूकही जवळ येवून ठेपली असून, सत्ता स्थापनेसाठी सत्ताधारी आघाडीसह विरोधी महायुतीनेही जोर लावला आहे.

प्रेस कामगारांचे मोदींना साकडे

$
0
0
गांधीनगर येथील मुद्रणालयासह देशातील १८ मुद्रणालये बंद करण्याचा निर्णय रद्द करावा यासाठी प्रेस कामगार पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. त्यासाठी रविवारी (ता.१४) रात्री खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे शिष्टमंडळ रवाना होणार आहे.

अलाहाबादला निधी का दिला?

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी निधी देवू शकत नसाल तर अलाहाबाद येथे गेल्या वर्षी झालेल्या कुंभमेळ्याला का आणि कसा निधी दिला, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला केली आहे. तसेच, नीरीने त्यांचा अंतिम अहवाल कोर्टाला सुपुर्द केला आहे.

महापौर आज राज दरबारी

$
0
0
मनसेचे नूतन महापौर अशोक मुर्तडक, आमदार वसंत गिते यांच्यासह इतर पदाधिकारी आज (दि. १४) मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. महापौरांनी शनिवारी वणी गडावर जाऊन दर्शन घेतले.

स्वाईन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू

$
0
0
शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या स्वाईन फ्ल्यूच्या पेशंटचा शनिवारी मृत्यू झाला. येवला तालुक्यातील रहिवाशी असलेला हा पेशंट ४५ वर्षांचा होता. तर सिव्ह‌िलमध्ये स्वाईन फ्ल्यूचा एक पेशंट उपचार घेत आहे.

मुख्यमंत्री पदाची दावेदार नाही

$
0
0
राज्यात मह‌िला मुख्यमंत्री व्हावी अशी मागणी असली, तरी आपण भाजपतर्फे मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार नसल्याचे स्पष्ट करून आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.

आघाडीच्या कारभाराला जनता कंटाळली

$
0
0
राज्यातील जनता आघाडी शासनाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात कोणत्याही परिस्थितीत भाजप महायुतीचीच सत्ता येणार असून, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेवेदावे विसरून कामाला लागावे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.

टोमॅटोचा बहरला हंगाम

$
0
0
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो हंगाम बहरला असून, दररोज ८० ते ९० हजार टोमॅटो क्रेट विक्रीसाठी येत आहेत. टोमॅटोची पाकिस्तान, बांगलादेश निर्यात सुरू झाल्यामुळे टोमॅटोला समाधानधारक भाव ‌मिळत आहे.

ठेवी परत देण्याची मागणी

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड जळगावच्या येवला येथील शाखेतील ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळावी, अशी मागणी ठेवीदारांनी संस्थेच्या व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नदीत बुडून बालकाचा मृत्यू

$
0
0
आजोबांबरोबर गुरे चारण्यास गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी बगडू येथे घडली. आदेश प्रवीण वाघ (वय ९) असे मृताचे नाव आहे. म्हशी चारण्यासाठी नदीवर गेल्यावर आदेश हा परिसरात खेळत होता.

पंचायत समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व

$
0
0
जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवड प्रकिया रविवारी पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व कायम राखले तर शिवेसनेही चांगलाच जोर लावला होता. विधानसभा निवडणुकीमुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले होते...

धोक्याच्या उंबरठ्यावर रस्ता वाहतूक

$
0
0
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकाच क्रमांकाच्या चार बसेस रस्त्यावर वर्षानुवर्षे धावतात. आरटीओ विभागाला त्याची कानोकान खबरही नसते. चोरीचा ट्रक बनावट क्रमांक आणि चासीजच्या क्रमांकात फेरफार करून राज्यात नव्हे, तर देशात फिरतो अन् कुणाच्या मनात संशयाच‌ी पालही चुकचुकत नाही.

एलईडी अहवाल दिवाळीनंतरच ‘चमकणार’

$
0
0
दोन दिवसात अहवाल द्या, अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, या स्थायी समितीच्या आक्रमक पवित्र्यानंतर लागलीच महापौरपदाची निवडणूक घोषित झाली. ही लगभग सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, एलईडी बसविणाऱ्या ठेकेदाराची चौकशी गुलदस्त्यात अडकली आहे.

‘एटी’, ‘जेपीं’ ची अस्तित्वाची लढाई

$
0
0
मतदारसंघ पुनर्रचनेत पूर्वीचे कळवण आणि सुरगाणा हे दोन मतदारसंघ मिळून कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ पूर्वी कळवण मतदारसंघात आमदार ए. टी. पवार यांचे व सुरगाणा विधानसभा मतदारसंघात तत्कालीन आमदार जे. पी. गावित यांचे निर्विवाद वर्चस्व होते.

‘आयुष्यभर शिकत राहा’

$
0
0
शिकायला मागे-पुढे पाहू नका. आपली निरीक्षणे फरफेक्ट ठेवा. आजची भाषा, टेक्नोलॉजी, वातावरण सर्व यातून आपण सर्व काही शिकले पाहिजे. आत्मसात केले पाहिजे तरच आपली प्रगती होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी केले.

केरळच्या संस्कृतीचे सुरेख दर्शन

$
0
0
केरळी बांधवांचा सर्वात मोठा असलेला ओणम हा सण उपनगर येथे उत्साहात पार पडला. यानिमित्ताने केरळच्या संस्कृतीचे सुरेख दर्शन घडविण्यात आले. दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

आगीचे परदेशी कंपनीकडून ऑडिट

$
0
0
ओझर येथील हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील रडार सेक्शनमध्ये लागलेल्या आगीची चौकशी सुरु झाली आहे. तसेच, या आगीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचे ऑड‌िट करण्यासाठी परदेशी कंपनीचीही नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे.

मविप्रची सभा वादळी

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची शंभरावी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली. संस्थेचे सदस्य बाळासाहेब कोल्हे यांनी मेडिकल कॉलेजमधील लिपिकाने केलेल्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करण्यास सुरूवात केल्याने गोंधळ उडाला

कंपनीवर दरोडा; रक्षकाचा मृत्यू

$
0
0
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील बेलम्याक मेटल वर्क्स या कंपनीवर शनिवारी मध्यरात्री पडलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी दोन लाख रूपयांची रोकड लुटली. दरम्यान, कारखान्यात प्रवेश करण्यासाठी सुरक्षा रक्षकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका सुरक्षारक्षकाला प्राण गमवावे लागले तर दुसरा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला.

बिग बझारवर एफडीएची कारवाई

$
0
0
मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कॉलेजरोडवरील बिग बझारवर कारवाई केली. सातपूर परिसरातील सदगुरुनगर येथील नितीन औटी या ग्राहकाने दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>