Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

काँग्रेस-राष्ट्रवादीची यशस्वी खेळी

$
0
0
बहुमताचे त्रांगडे, ऐन निवडणुकीपूर्वी सेना-भाजपची वाढलेली जवळीक, काँग्रेस-राष्ट्रवादीसह अपक्षांची अनिश्चित भूमिका आणि मनसेला लागलेले फुटीचे ग्रहण अशा बहुरंगी पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला सत्ता ​मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून होती.

अपहृत तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

$
0
0
तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी काही संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. विनय रमेश रेवर (२२, रा. दिंडोरीरोड, पंचवटी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

आघाडी सरकारने लावली महाराष्ट्राची वाट

$
0
0
राज्यातील आघाडी सरकारविरोधात आमदार पंकजा मुडें-पालवे यांनी काढलेली संघर्ष यात्रा शुक्रवारी नाशिकमध्ये दाखल झाली असून, या यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मालेगाव, चांदवड लासलगावमध्ये पंकजा मुडें यांनी जाहीर सभा घेवून आघाडी सरकारच्या कामकाजाव जोरदार प्रहार केला आहे.

नाटक थेट प्रेक्षकांच्या दारी

$
0
0
प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन नाटक पहायला कंटाळा करतात अशी कायम ओरड केली जाते. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी नाटक पहावे या उद्देशाने मयुरी थिएटरच्या कलाकारांनी थेट प्रेक्षकांच्या दारी जाऊन नाटक करण्याची योजना आखली आहे.

सरकारी बाबूंना सैनिकी प्रशिक्षण

$
0
0
राज्य सरकारच्या वतीने प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना सैन्यामार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. नाशिकमधील आर्टीलरी सेंटरमध्ये हे प्रशिक्षण सध्या सुरू असून त्याचा समारोप शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

इच्छुकांसह पक्षही लागले कामाला

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच जिल्हा प्रशासनापाठोपाठ राजकीय पक्षांसह उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

निवडणूकीची कामे सुरू

$
0
0
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच, आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्त्या केल्या आहेत.

'नाशिक पॅटर्न' युतीला डोकेदुखी

$
0
0
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर राज्यात नवे समीकरण उदयास आले आहे.

नाशिकचा गड मनसेनेच राखला

$
0
0
जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी एकत्र आल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीसह अपक्षांच्या महाआघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला थेट मदत केल्याने मनसेचे अशोक मुर्तडक यांची महापौरपदी बहुमताने निवड झाली.

पंकजा मुंडेंची दिल्लीवर फुल्ली!

$
0
0
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर रिक्त झालेली बीड लोकसभेची जागा त्यांची मुलगी पंकजा लढवतील अशी चर्चा आहे. पण, ‘मला राज्यातच काम करण्याची इच्छा आहे’ असे सांगत पंकजा यांनी दिल्लीला जाण्यात रस नसल्याचे संकेत दिले आहेत.

निवडणुकीची रणनीती आखण्यात पक्ष व्यस्त

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच जिल्ह्यातील राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून, मतदारसंघ निहाय मेळावे, बैठकांचे नियोजन करण्यात व्यस्त झाले आहेत. सोबतच मतदार यादीत नाव नोंदविण्यास शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी मतदारांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.

मतदार कार्डने थांबणार ‘मध्य’च्या मतदारांची धावपळ

$
0
0
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांची नावे शोधण्यासाठी होणारी धावपळ नाशिक मध्य मतदारसंघात तरी शिवसेनेन यावेळी थांबवली आहे. ‘मध्य’ मधून इच्छूक असलेल्या शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी कुटुंब मतदार कार्ड तयार केले आहे.

पेंशनधारकांचे धरणे आंदोलन

$
0
0
औद्योगिक तसेच विविध ठिकाणी काम करणाऱ्या पेंन्शनधारकांनी भविष्य निधी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. यावेळी दरमहा सहा हजार पाचशे रुपये पेंशन देण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रादेशिक अधिकारी जगदीश तांबे यांच्याकडे करण्यात आली.

विमानसेवा, हायवेप्रकरण हायकोर्टाच्या दारात

$
0
0
कसारा घाटासह अन्य ठिकाणी खराब झालेला मुंबई-आग्रा हायवे आणि अनुकूल वातावरण असूनही सुरू न होणारी विमानसेवा या दोन्ही मुद्यांवर नाशिकच्या संघटना मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. याबाबत निर्णय घेण्यात आला असून, संबंधित यंत्रणांना त्याचा जाब कोर्टच विचारणार आहे.

राज ठाकरेंवर पंकजांची टीकेची तोफ

$
0
0
राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात सुरू केलेली संघर्ष यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली आहे. या निमित्त पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडेनी राज्यसरकारच्या गेल्या पंधरा वर्षाच्या कामगिरीवर तोफ डागताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही टीका केली.

संघर्ष यात्रेविरुद्ध भाजपवर गुन्हा?

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली असताना भाजपच्या संघर्ष यात्रेत विनापरवाना झेंडे तसेच, बॅनर्स वापरल्याप्रकरणी भाजप विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या सर्व कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी केली असून, त्याद्वारे शहानिशा केली जाणार आहे.

बैलगाडीतून मिरवणूक

$
0
0
भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे यांची बहुचर्चित संघर्ष यात्रा नाशिकरोड येथे दाखल झाली. तिचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. सिन्नर फाटा येथून पंकजा मुंडेंची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडीचे सारथ्य त्यांनी स्वतः केले.

आचारसंहितेने लटकवले महापालिकेला

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेचे अनेक कामे अंधातरी लटकली आहेत. आता, याबाबत दिवाळीनंतरच नव्या सरकारच्या साक्षीने निर्णय होण्याची शक्यता आहे.

केळीच्या सालीने घेतला तरुणाचा जीव

$
0
0
केळीच्या सालीवरून सरकल्याने डोक्यास मार लागलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश रमेश जाधव (३४, रा. डिंगरआळी, भद्रकाली) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी तो केळीच्या सालीवरून सटकला.

सिंगल विंडो उद्यापासून

$
0
0
आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्षांना लागणाऱ्या विविध परवानग्या सिंगल विंडोच्या माध्यमातून दिल्या जाणार असून, ही विंडो सोमवारपासून कार्यरत होणार आहे. तसेच, यंदाच्या निवडणुकीत मध्य, पश्चिम आणि पूर्व या तीन मतदारसंघात व्हीव्हीपॅटचे मशिन्स लावले जाणार आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images