Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महिलेवर सामूहिक बलात्कार

$
0
0
भाऊ घरी नसल्याने दिंडोरी बसस्थानकात झोपण्यासाठी गेलेल्या महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बस स्थानकाच्या मागील बाजूस हा प्रकार घडला. पीडीत महिलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संधीचे सोने करा!

$
0
0
मनसेची सत्ता कायम राहिली, आता संधीचे सोने करा. नागरिकांच्या समस्या सोडवा आणि शहर विकासाच्या योजना पूर्णत्वास जाऊ द्या, असा कानमंत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महापौर अशोक मुर्तडक यांना दिला. सकाळी ११ वाजता ‘कृष्णकुंज’ येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेतली.

भाजपच्या जागांवर सेनेची चाचपणी

$
0
0
शिवसेनेसह भाजपाच्या वाट्याला जाणाऱ्या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी मातोश्रीवर पार पडल्यात. शिवसेनेच्या या डावपेचामुळे भाजपात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, महायुती कायम राहणार का, असा प्रश्न निवडणुकीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.

गतिमान कामकाजाची ‘आघाडी’

$
0
0
विधानसभा निवडणुकांचा धसका घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने प्रचंड गतिमान कामकाज करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गेल्या २७३ दिवसांत तब्बल ५ हजार १५९ सरकारी अध्यादेश काढण्यात आले आहेत.

शिवसेनेसमोर जागा टिकविण्याचे आव्हान

$
0
0
दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाने धर्मनिरपेक्ष पक्षांना साथ देण्याची परंपरा मोडीत काढत मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवून नवा इतिहास घडवला. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने आपली पाळेमुळे चांगलीच घट्ट केल्याने भगवा फडकतच राहिल, अशी आशा त्‍यांना आहे.

निवडणुकीसाठी एक खिडकी कक्ष सुरू

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने राजकीय पक्षांना लागणाऱ्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात राजकीय पक्षांना हव्या असणाऱ्या परवानग्या या कक्षाच्यावतीने दिल्या जाणार आहेत.

नाशिकमधून उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह

$
0
0
दक्षिण कराड मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना होणारा विरोध लक्षात काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्र्यासांठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध घेतला जात आहे. पक्षाचा हा शोध थांबविण्याचा निर्णय नाशिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून, मुख्यमंत्र्यांना नाशिक जिल्ह्यातून निवडणूक लढवण्याच निमंत्रण दिले आहे.

१९४० होर्डिंग्ज, फलक हटवले

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे महापालिकेच्या ​अतिक्रमण विभागाने गत तीन दिवसात शहरातील राजकीय पक्षांशी निगडीत १ हजार ९४० होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि बॅनर हटवले आहेत.

नांदगावमध्ये मनसे उमेदवार देणार

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कोणत्याही परिस्थितीत उमेदवार दिला जाईल, अशी घोषणा मनसे जिल्हा संघटक राजेंद्र पवार आणि मनमाड शहराध्यक्ष सुनील हांडगे यांनी मनमाड येथे पत्रकार परिषदेत दिली.

लासलगाव मर्चंट सुरू करणार ATM अन् कोअर बँकिंग

$
0
0
लासलगाव मर्चंट्स बँकेमध्ये लवकरच कोअर बँकिंग व एटीएम सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे चेअरमन ज्ञानेश्वर जगताप यांनी सतराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले. यावर्षी लामकोला ३५ लाख ८६ हजार रुपयांचा नफा झाल्याचेही चेअरमन जगताप यांनी सांगितले.

भाक्षीच्या उपसरपंचविरोधात अविश्वास ठराव मंजूर

$
0
0
शहरालगत असलेल्या भाक्षी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश अशोक सोनवणे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव सात मतांनी मंजूर करण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार होते.

सटाण्यात २ दरोडेखोरांना अटक

$
0
0
शहरापासून जवळच असलेल्या यशवंतनगरमधील स्टेट बँके ऑफ इंडियाच्या शाखेत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने परिसरात दबा धरून बसलेल्या सहा दरोडेखोरांपैकी दोघांना पकडण्यात आले. मात्र, चार जण फरार झाले. त्यांचा शोध सुरू आहे.

चव्हाण-गावित भेटीने सटाण्यात चर्चेला उधाण

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्यमंत्री व भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश घेतलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांनी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांची त्याच्या कार्यालयात भेट घेवून चर्चा केली. यामुळे बागलाणच्या राजकीय पटलावर चर्चेला उधाण आले आहे.

वेतन थकल्याने शिक्षक आर्थिक विवंचनेत

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन सप्टेंबर उजाडला तरी थकले आहे. ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकांचे पगाराविना प्रापंचिक हाल होताहेत.

अशोकनगर कोंडीच्या कचाट्यात

$
0
0
समृद्धनगर ते बारदान फाटा गंगापूररोडकडे अशोकनगरहून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व परिसरात राहणारे नागरिक हैराण झाले आहेत. अशोकनगरच्या या रस्त्याला पर्यायी असणारा डीपी रस्ता सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.

औद्योगिक वसाहतीत शौचालयांची गरज

$
0
0
नाशिक जिल्हातील औद्योगिक वसाहतीत वाहनचालकांसाठी तसेच कामगारांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वाहनचालक व कामगारांनी केली आहे. याबाबत महापाल‌िका व औद्योगिक विकास महामंडळाने दखल द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

दंड घटला; अनियमितता कायम

$
0
0
काम चुकार, लेटलतीफ तसेच दांडीबहाद्दर घंटागाडी ठेकेदारांकडून गेल्या आठ महिन्यात अवघा ३ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. घंटागाडींची अनियमितता कायम असताना दंडाचा आकडा तुलनेत कमी झाला असून, दंड भरण्यात पूर्व ​विभागातील ठेकेदाराने आघाडी कायम ठेवली आहे.

निवडणूक तक्रारींसाठी हेल्पलाईन

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात तक्रारी जाणून घेण्यासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आहे.

जलसंपदाचा गोदाघाटावर ‘प्रकाश’!

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदाघाटाचा विस्तार करण्यासह या घाटालगत असलेल्या जागेचा विकास आणि याच परिसरात जलसंपदा विभागाकडून विद्युतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थात जलसंपदाकडून गोदाघाटावर प्रकाश पडणार आहे.

भूविकास बँकांचा फैसला ३० सप्टेंबरला

$
0
0
राज्यातील भूविकास बँकांसंबंधी राज्य सरकारने येत्या ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे भूविकास बँकांचा फैसला येत्या ३० सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images