Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कल्याणराव पाटलांवर मनसेचे जाळे?

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून येवल्यात संभाजी पवार यांनाच पुढे केले जात असल्याने माजी आमदार कल्याणराव पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पाटलांच्या या नाराजीची फायदा घेण्यासाठी मनसे पुढे सरसावली असून, त्यांच्यावर मनसेकडून जाळे टाकले जात आहे. मनसेकडून त्यांना येवल्यातून उमेदवारी देण्याची ऑफर आहे.

‘इमेज बिल्डींग’वर कोटींची उधळण

$
0
0
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी विद्यमान आमदारांसह इच्छुक उमेदवारांनी इमेज बिल्डींगचा धडाकाच लावला आहे. राजकीय पक्षांसह मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणुकीपूर्वीच त्यांनी कोट्यवधी रुपये ओतायला सुरुवात केली आहे.

निर्माण ग्रुपतर्फे रोप वाटप

$
0
0
सामाजिक वनीकरण विभाग नाशिक व बांधकाम क्षेत्रातील नामवंत संस्था निर्माण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पंचवटीतील ‘निर्माण उपवन’ या प्रकल्पावर रोपांचे वाटप करण्यात आले. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक पी. एन. पाटील यांच्या हस्ते रोप वाटप करण्यात आले.

पत्नीला जाळण्याच्या प्रयत्नात पतीही भाजला

$
0
0
दिराने फूस लावल्यानंतर मद्यपी पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी ५४ टक्के तर पतीही २० टक्के भाजला आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आडगाव येथील कल्पतरू गार्डनजवळ हा प्रकार घडला. आडगाव पोलिसांनी संशयित दिराला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी‌ सुनावली आहे.

तरुणांच्या आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न

$
0
0
राज्यातील बेरोजगार युवकांना न्याय देत नोकरी व व्यवसाय मिळवून देण्याच्या उद्देशाने शिवसेनेचा जन्म झाला आहे. तरुणाच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम केले तर हे युवक कायम आपले होतील. मोठ्या कंपन्या व उद्योगांनी अती काटेकोर न रहाता ग्रामीण भागातील युवकाची कुवत ओळखून त्यांना नोकऱ्या द्याव्यात, असे आवाहन शिवसेनेचे जेष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.

नाशिकरोड परिसरात दहीहंडीचा थरार

$
0
0
नाशिकरोड परिसरात दहिहंडी शांततेत साजरी झाली. मटकी फोडून आणि बेंधुद होऊन नाचतगात दहीहंडी उत्साहात झाली. मुक्तीधाम मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. विश्वस्त हिरालाल चौहाण, इंदिराबेन चौहाण यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. यावेळी विजय चौहाण, साधना चौहाण, नटवरलाल चौहाण, गीता चौहाण, मोहन चौहाण, जगदीस चौहाण, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश धोंगडे, नागेशशास्त्री देशपांडे, डा. अनिकेत देशपांडे, राजू कुलकर्णी, सुरेश मानकर, जयेंद्र शिरसाठ आदी उपस्थित होते.

मार्चपर्यंत १० सिग्नल्स होणार कार्यान्वित

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी शहरात दाखल होणाऱ्या वाहनांचे नियमन करण्यासाठी महापालिकेने आणखी दहा सिग्नल यंत्रणा उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या कामासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून खर्चाची तरतूद २०१४-१५ च्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठ कुलगुरुपदी डॉ. साळुंखे

$
0
0
राजस्थानमधील सेंट्रल व‌िद्यापीठ आण‌ि कोल्हापूरच्या श‌िवाजी व‌िद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. माण‌िकराव साळुंखे यांची मुक्त व‌िद्यापीठाच्या कुलगुरुपदी न‌िवड करण्यात आली आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी डॉ. साळुंखे यांची सोमवारी नियुक्ती केली. मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता डॉ. साळुंखे हे प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांच्याकडून कुलगुरू पदभार स्वीकारतील.

खासदारनिधीची परिणामकारकता वाढणार

$
0
0
खासदारांना मिळणारा स्थानिक विकास निधीचे निकष बदलण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातूनच तसे संकेत दिले असून, सोळाव्या लोकसभेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदारांसाठी अद्याप निधी मंजूर करण्यात आलेला नाही.

चुकीचे पंचनामे भोवले चौघांना

$
0
0
चुकीचे पंचनामे केल्याप्रकरणी मुंजवाड व खमताणेच्या शेतकऱ्यांनी आत्मदनाचा प्रयत्न केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने तीन कर्मचाऱ्यांची निलंबलाचे आदेश जारी केले आहेत.

रविवार कारंजावर बसची तोडफोड

$
0
0
रविवार कारंजा येथून प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसची तोडफोड करण्यात आली. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. बसचालक सचिन गिरीधर डांगळे (३४, रा. श्रीकृष्णनगर, नाशिकरोड) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. बस क्र. एमएच १५ एके ८१०२ मध्ये प्रवासी घेऊन ते रविवार कारंजा येथून चालले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तिंनी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महापालिकेला प्रतीक्षा आदेशाची

$
0
0
मुख्यमंत्र्यांनी एलबीटी की जकात हे ठरवण्याचा अधिकार महापालिकांना दिल्यापासून प्रशासनाला राज्य सरकारच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा आहे. व्यापारी उद्योजकांकडून एलबीटीस प्राधान्य देण्यात येत आहे. तर जकात सुरू करण्यासाठी विरोधकांसह सत्ताधारी अनुकूल असल्याचे चित्र दिसून येते.

उघड्या डीपी ठरताहेत जीवघेण्या

$
0
0
वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने जुन्या नाशिकमध्ये रविवारी एका चिमुरड्याचा शॉक लागून मृत्यू झाला. जुन्या नाशिकसह अनेक भागांत उघड्या डीपी आणि धोकादायक ट्रान्सफार्मर असून, महावितरण त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. शहरात सुमारे चार हजार डीपी आहेत. यातील बहुतांश धोकादायक स्थितीत आहेत. अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

भुजबळांचा विकासाचा मुद्दा ऐरणीवर

$
0
0
विकासवंचित येवला विधानसभा मतदारसंघाला सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या निमित्ताने विकासाभिमुख नेतृत्व लाभले. भुजबळ यांनी तालुक्याच्या राजकारणातील मुख्य प्रश्‍न असणार्‍या पाटपाण्याच्या प्रश्‍नाला गती दिली. निधी उपलब्धतेने उत्तर-पूर्व भागाला जलसंजीवनी ठरणार्‍या पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोच कालव्याचे काम वेगाने सुरू असून, भविष्यात या कालव्याने पाणी प्रवाहीत होईल, अशी येवलेकरांना आशा आहे.

हिंदुत्ववादी संघटनांची चौकशी?

$
0
0
धुळे शहरातील मच्छिबाजार परिसरात जानेवारी २०१३ मध्ये झालेल्या जातीय हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती श्रीकांत मालते आयोगापुढे हिंदुत्ववादी संघटनांची लवकरच चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. या दंगलीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला होता.

शिवसेनेचे मिशन आदिवासी मतदारसंघ

$
0
0
भाजपपाठोपाठ शिवसेनेनही जिल्ह्यातील आदिवासी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, सेनेच्या कोट्यातील तीनही आदिवासीबहुल मतदारसंघ जिकंण्याची रणनीती आखली आहे. याच रणनितीचा भाग म्हणून इगतपुरीत बुधवारी (ता.२०) शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

नाशिकरोडला स्वच्छता कार्यालयाचा शुभारंभ

$
0
0
स्वच्छतेच्या ठिकाणीच आरोग्य संपदा असते. नागरिकांनी वृक्षलागवड करून हरित नाशिक, सुंदर नाशिक ही संकल्पना राबवावी. प्लॅस्टिक पिशव्या आणि वस्तूंचा वापर टाळावा. कचरा हा घंटागाडी अथवा कचराकुंडीतच टाकावा, असे प्रतिपादन महापालिकेचे आरोग्य अधिकारी सुनिल मुकाणे यांनी मंगळावारी येथे केले.

मविप्रच्या पुरस्कारांचे वाटप

$
0
0
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या समाजदिनाचे निमित्त साधून संस्थेतर्फे व‌िव‌िध क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारे पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. समाज दिनाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्‍येष्ठ साह‌ित्यिक राजन गवस उपस्थित होते.

गुणवत्तेच्या संकल्पनाच बदलायला हव्यात

$
0
0
श‌िक्षणाने समाजातील व‌िषमता हद्दपार व्हायला हवी. सध्याच्या श‌िक्षण पध्दतीत मात्र नेमके याउलट घडते आहे. श्रीमंत अन् गरीब अशी व‌िषम दरी ही पद्धती न‌िर्माण करते आहे. गुणवत्तेच्या आपल्या संकल्पनाही जीवनाला केवळ उपभोगवाद अन् व‌िध्वंसाकडे घेऊन चालल्या आहेत. या संकल्पनांची जोखड दूर करण्याची गरज या वळणावर न‌िर्माण झाली आहे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साह‌ित्यिक राजन गवस यांनी व्यक्त केली.

जेईईच्या तयारीसाठी एमकेसीएलचे ऑप्शन

$
0
0
बारावीनंतर जेईई प्रवेश परीक्षेला सामोरे जाणाऱ्या व‌िद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी एमकेस‌ीएलने ‘मास्टरींग जेईई’ ही सुव‌िधा उपलब्ध करून द‌िली आहे. ‘ई टेस्ट’, ‘मॉक टेस्ट’ अशा चाचण्यांच्या समावेशातून अकरावी आण‌ि बारावी या दोन वर्षाच्या कालावधीत व‌िद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाणार आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images