Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महाव‌िद्यालयांची संलग्नता काढणार

$
0
0
सातत्याने नोटीस द‌िल्यानंतरही व‌िद्यापीठाचे आदेश धुडकावणाऱ्या महाव‌िद्यालयांची संलग्नता काढण्याचा इशारा साव‌ित्रीबाई फुले पुणे व‌िद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना द‌िला आहे.

एमकेसीएल घडव‌िणार ड‌िजिटल फ्र‌िलान्सर

$
0
0
प्रॉडक्ट बेस्ड संकल्पनेचा उंबरठा ओलांडत रोल बेस्ड नव्या अभ्यासक्रमांची आखणी करून व‌िद्यार्थ्यांमधून आता ड‌िजिटल फ्र‌िलान्सर घडव‌िण्यासाठी एमकेसीएल (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन) ने नवे पाऊल टाकले आहे. नव्या प्रवाहातील व‌िद्यार्थ्यांसाठी रोजगार न‌िर्मितीला या प्रयोगातून चालना म‌िळेल, असा आशावाद एमकेसीएलकडून व्यक्त होत आहे.

अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू

$
0
0
शहरातील अशोकनगर येथील बसस्टॉपवरील पास केंद्र बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. हे केंद्र त्वरित सुरू न केल्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा ‘छावा’ या संघटनेमार्फत देण्यात आला आहे.

ओझरला दहीहंडीचा थरार

$
0
0
मुंबई, पुण्याच्या धरतीवर गोपालकालानिमित्त ओझर येथे दहीहंडीचा थरार अनुभवायला आला. आर. के. हेल्‍थ क्लब व आर. के. मेमोरियल हॉस्पिटलतर्फे रांगोळी स्पर्धा, नटखट बाल गोपाल स्पर्धा, नवीन तोलानी ग्रुप डान्‍स स्पर्धा घेण्यात आल्या. सिने अभिनेत्री सुदिपा सिंग हिच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

कळवाडी गावठाणातील अतिक्रमण काढणार

$
0
0
तालुक्यातील कळवाडी गावठाणमध्ये सातत्याने वाढत असलेले अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात येईल, असा निर्णय स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. ही माहिती सरपंच गिरधर देसले यांनी दिली.

कळवणची सांडपाण्याची समस्या सुटणार

$
0
0
कळवणच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच नगरांची समस्याही वाढत आहे. रस्ते, गटार व सांडपाणी या प्रमुख समस्या जनतेला भेडसावत आहेत. कळवण शहरात गटार व सांडपाण्याचे निर्मूलन करण्याची मोठी समस्या आहे.

राष्ट्रवादीचे युवा नेते शिवसेनेत दाखल

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस संजय गोडसे, जिल्हा उपाध्यक्ष राजू चौधरी, संदीप घुले यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

खासगी शाळांमध्ये मैदानांची वानवा

$
0
0
वाढत्या लोकवस्तीत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी सातपूर भागात अनेक खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा वाढल्या पण, विद्यार्थ्यांसाठी मैदानेच नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळांपासून वंचित रहावे लागत आहे. सरकारने शाळांना मंजुरी देताना मैदाने असणे सक्तीचे करायला हवे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

‘सिन्नर तालुक्यातील समस्या सोडविणार’

$
0
0
आगामी काळात राज्यात महायुतीचेच सरकार येणारआहे. भगवा सप्ताह व शाखा उद्घाटनांच्या निमित्ताने तालुक्याच्या ग्रामीण भागात फिरत असताना समस्यांचे भीषण वास्तव समोर येत आहे. या सर्व समस्या समजावून घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून सरकार दरबारी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राजाभाऊ वाजे यांनी शहा येथे झालेल्या सभेत दिली.

‘वीज नियामक आयोगाच्या नियमांची अंमलबजावणी करा’

$
0
0
वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वीज ग्राहकांना विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार सेवा देण्यात येत नाही. आयोगाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षक कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ‘बुरे दिन’

$
0
0
पाकिस्तान, इजिप्तमधून होत असलेल्या कांद्याच्या आयात तसेच डाळिंबास केलेल्या निर्यात बंदीमुळे केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांवर ‘बुरे दिन’ लादल्याने उद्ध्वस्त होण्याची वेळ येवून ठेपली आहे.

मालेगाव शहरातील फेरीवाल्यांसाठी ‘अच्छे दिन’

$
0
0
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाची अंमलबजावणी ५३ शहरांमध्ये करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आला. या ५३ शहरात मालेगाव शहराचादेखील समावेश असल्याने शहरातील फेरीवाल्यांसाठी एक चांगला निर्णय झाला आहे. अर्थात या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते यावरच फेरीवाल्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

पिंपळगाव बसवंतला समाज‌‌दिनी वृक्षारोपण

$
0
0
येथील मविप्र संस्‍थेचा शतकपूर्ती समाजदिन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मविप्र ध्वजारोहण व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रच्या सरचटणीस नीलिमा पवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द लेखक डॉ. अच्युत गोडबोले उपस्थित होते.

येवला, नांदगावमध्ये मुलभूत सुविधांसाठी निधी

$
0
0
महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटार व अन्य मुलभूत सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या निधीतून येवला व नांदगाव मतदारसंघातील मुलभूत सोयी सुविधांसाठी भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून ३ कोटीच्या निधीस शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

महापालिकेचे घालीन ‘लोटांगण’

$
0
0
प‌श्चिम विभागात सर्व गणेशमूर्ती स्टॉल्स समावून घेण्याइतकी मोठी जागा नाही. इदगाह मैदानावर जागा दिल्यास जातीय प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर सिव्हीलचा परिसर सायलन्स झोनमध्ये येत असल्याचे असंबंध उत्तर देत महापौर अॅड. यतीन वाघ यांनी गणेशमूर्ती विक्रेत्यांपुढे अक्षरशः लोटागंण घालणे पसंद केले.

उद्धव ठाकरे आज नाशकात

$
0
0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी (ता.२०) नाशिक जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. घोटी येथे आदिवासी बांधवांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत शिवसेना नेते खा. संजय राऊत, माजी विरोधी पक्ष नेते रामदास कदम, संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार राम पडांगळे उपस्थित राहणार आहेत.

महापालिकेला ९० कोटींची देणी

$
0
0
महसुलातून मिळणारा पैसा कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर बंधनात्मक कामांवर खर्च होत असल्याने महापालिकेच्या देणीदारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवघ्या तीन महिन्यापूर्वी ४७ कोटी रुपयांची देणी आता ९० कोटींच्या घरात पोहचली असून त्याचा प​रिणाम विकासकामांवर होत आहे.

माता कुंटुबांच्या पालनकर्त्या

$
0
0
आमदार नितीन भोसले यांच्या संकल्पनेतून सातपूरला कर्तृत्ववान मातांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी असलेल्या प्रबोधनी ट्रस्टच्या अध्यक्षा रंजनीताई लिमये यांनी कुटुंबाच्या पालककर्त्या माताच असल्याचे सांगितले. या प्रसंगी कर्तृत्ववान मातांचे कुटुंबीय तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बागलाणचा पूर्व भाग कोरडाच

$
0
0
संपूर्ण हिवाळा अन् उन्हाळ्यात धो धो पाऊस व गारपीटने बागलाण तालुक्यात थैमान घातले होते. मात्र, ऐन पावसाळ्यात बागलाणचा पूर्व भाग आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पेरण्या संकटात सापडल्या आहेत. ऐन पावसाळ्यात तालुक्यातील सोळा गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

'हत्येचा तपास विचित्र पद्धतीने'

$
0
0
'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लोकप्रियतेसाठी हिंदुत्ववादी संघटनांवर संशय व्यक्त करत सवंग वक्तव्य केल्यानं डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पहिल्याच दिवसापासून भरकटला', असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images