Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ज्यादा घरपट्टीप्रकरणी मिळकतींची फेरमोजणी

$
0
0
वाढीव बांधकामे केल्याचा ठपका ठेवत ज्यादा घरपट्टी लागू केलेल्या २४० तक्रारदारांच्या मिळकतींची फेरमोजणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच, बांधकाम पूर्णत्वाचे दाखले सादर करणाऱ्या मिळकतधारकांवरील दंडात्मक कारवाई देखील मागे घेण्यात येणार आहे.

बागलाणला दुष्काळी जाहीर करा

$
0
0
राज्य शासनाने नुकत्याच १२३ दुष्काळी तालुके घोषित केले असून यात बागलाणचा समावेश नाही. यामुळे बागलाण तालुक्यावर अन्याय झाला असून कोणत्याही परिस्थितीत बागलाण तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात यावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री व पालकमंत्री यांना लवकरच शिष्टमंडळाद्वारे भेट घेवून साकडे घालण्यात येणार आहे. ही माहिती बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिली.

विकास हाच धर्म अन् जात

$
0
0
दोन महिन्यांपूर्वी मोदी नावाचं वादळ आलं. त्याचा फटका सर्वांनाच बसताना तो आम्हालाही बसला. मी कधीच मराठा समाज आरक्षणाच्या विरोधात नव्हतो. मात्र, लोकसभा निवडणुकीत माझ्याबाबत विरोधी म्हणून अपप्रचार केला गेला.

आश्रमशाळा, कारागृहालाही ‘आधार’

$
0
0
यूपीए सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या आधार नोंदणीचा विस्तार जिल्ह्यातही होणार असून आदिवासी आश्रमशाळा आणि नाशिकरोड येथील कारागृहातही आधारची नोंदणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासंबंधीचे निर्देश आधार नोंदणीचे कंत्राट दिलेल्या एजन्सींना दिले आहे.

अन्नसुरक्षा ग्रामसभेच्या हाती!

$
0
0
अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांना आता ग्रामसभेच्या परवानगीनेच धान्य मिळणार आहे. अन्नसुरक्षेच्या लाभार्थ्यांबाबत साशंकता उपस्थित झाल्याने प्रत्येक गावातील अन्न सुरक्षा लाभार्थ्यांच्या यादीला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक करण्यात आली आहे.

सिन्नर ‘सेझ’ला आणखी २ वर्षे?

$
0
0
विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) विशिष्ट कालावधीत कार्यान्वित होत नसल्याचा मुद्दा पुढे आल्यामु‍ळे सिन्नर येथील इंडिया बुल्सचा सेझही त्यास अपवाद नसल्याची बाब स्पष्ट होत आहे.

आघाडी, मनसेला महायुतीचे आव्हान

$
0
0
सर्वच पक्षांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवून प्रस्थापित करणारा अन् प्रसंगोपात विस्थापित करण्यासही तेवढ्याच हिरिरीने पुढाकार घेणारा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख सांगता येईल.

पोलिस अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पडावा यासाठी प्रशासनाकडून जोरदारी तयारी सुरू आहे. त्यातीलच महत्त्वाचा भाग म्हणून पोलिसांसाठी आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत हे शिबीर होणार आहे.

पाणीकपात रद्दची घोषणा फसवी

$
0
0
‘नाशिक महापालिकेस गंगापूर व काश्यपी धरणातून पाणी पुरवठा करणारी दोन्ही धरणे ९० टक्के भरली असून या पार्श्वभूमीवर महापौर अॅड. यतीन वाघ यांनी मे महिन्यात ५० टक्के कपात रद्द केल्याची घोषणा केली.

अधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा

$
0
0
गोल्फ क्लब मैदानाच्या भिंतीलगत गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल्स उभारू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिल्यानंतरही हे काम बंद झाले नाही. अधिकाऱ्यांची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे झाल्याने महापालिकेच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होतो आहे.

येवल्यात अवतरले गोकूळ

$
0
0
श्रीकृष्ण जयंती निमित्त धडपड मंचतर्फे घेण्यात आलेल्या बाल श्रीकृष्ण सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नटखट, गंभीर, खेळकर, बासरीवाला, दहीहंडी फोडणारा, माखनचोर अशा विविध श्रीकृष्णलीलांनी स्पर्धेच्या सभागृहात अक्षरक्ष: गोकूळ नगरीच अवतरली होती.

टोमॅटो लिलावाचा लासलगावमध्ये प्रारंभ

$
0
0
लासलगाव बाजार समिती टोमॅटो लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. उत्पादकांना स्पर्धात्मक वातावरणातून चांगला भाव मिळावा याकरिता येथील बाजार समिती नामवंत परप्रांतीय व्यापाऱ्यांची संख्या वाढविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सिन्नरला माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत गोंधळ

$
0
0
नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत सभासदांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या पार्श्वभूमीवर सभासदांनी गोंधळ करीत तसेच शिवीगाळ, धक्काबुक्की आणि हाणामारी असे प्रकार घडल्याने ही सभा चांगलीच गाजली.

इंडिश मोटरेनतर्फे कार रॅली

$
0
0
मर्सिडीज-बेंझ या लक्झरी कार कंपनीच्या नाशिकमधील इंडिश मोटरेन शोरूमतर्फे नेहमी वेगळ्या अंदाजात विविध उपक्रम सादर केले जातात. त्याच अनुषंगाने नुकत्याच साजरा झालेल्या ६८ व्या स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने मर्सिडीज कंपनीच्या लक्झरी कार मॉडेलला तिरंगा लावून शहरातील विविध भागातून रॅली काढण्यात आली होती.

सटाणा ‘कृउबा’त आता शेतकऱ्यांसाठी निवासस्थान

$
0
0
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विश्रांतीसाठी उभारलेल्या शेतकरी निवासाचा शुभारंभ आज (दि. १९) सकाळी. ११. ३० वा. होणार आहे. ही माहिती सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भिका सोनवणे यांनी दिली.

हटवले रस्त्यांवरील वाहनांचे अतिक्रमण

$
0
0
शहर पोलिसांनी सोमवारी शहरात अचानक धडक अतिक्रमण मोहीम राबवून रहदारीस अडसर ठरणाऱ्या मोटरसायकली, हातगाड्या जप्त करून अतिक्रमण धारकाना दंड ठोठावला. छोटे छोटे अपघात टळावेत तसेच, वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी ही धडक मोहीम आवश्यक असल्याचे पोलिस निरीक्षक भागवत सोनवणे यांनी सांगितले.

बीएसएनएल सेवेचा दिंडोरीत बोजवारा

$
0
0
दिंडोरी शहरात भारत संचार निगमच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला आहे. बीएसएनएलची सेवा असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. दोन दिवसापासून दिंडोरीतील काही ग्राहकांची इंटरनेट सेवा ठप्प असून त्यांचे नुकसान होत आहे. तसेच व्यवसायावरही परिणाम होत आहे.

त्र्यंबकराजाच्या पालखी दर्शनासाठी गर्दी

$
0
0
श्रावणाच्या चौथ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे अभुतपूर्व गर्दी उसळली होती. दुपारी चार वाजेच्या दरम्यान भगवान त्र्यंबकराजाची पालखी कुशावर्तावर स्नानासाठी प्रस्थान झाली तेव्हा शिवभक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. चौथ्या सोमवारी भाविकांची संख्या लक्षणीय होती.

मंत्र्यांची जत्रा अन् विकासकामांची खैरात

$
0
0
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जोमाने कामाला लागली आहे. पक्षाच्या सर्वच आमदारांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. विविध पक्षांचे नेते दर आठवड्याला नाशिकमध्ये दाखल होऊन विकासकामांचे दाखले देऊ लागले आहेत. महिनाभरात डझनभर मंत्र्यांनी हजेरी लावत ना‌शिककरांना विकासाचे गाजर दाखवले आहे.

नांदगावच्या ‘भुजां’त समीर भरणार ‘बळ’

$
0
0
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदगाव मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांची कोंडी फोडण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर येवून ठेपली आहे. या मतदारसंघातून आता पंकज भुजबळ यांच्याऐवजी समीर भुजबळ यांना उभे करण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>