Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वाइन उद्योगाची निवडणुकीपूर्वी आठवण

$
0
0
वाइन उद्योगाचे विविध प्रश्न सोडविण्यासंदर्भात मंगळवारी तातडीची बैठक बोलविण्यात आल्याने आघाडी सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच विषयांना हात घालण्याचा सपाटा लावला आहे. वाइन उद्योगासाठी सर्वंकष धोरण तसेच वातावरण निर्माण होण्यासाठी ही बैठक मोलाची ठरणार आहे.

आचारसंहितेपूर्वीचा आठवडा व्हीआयपी

$
0
0
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑगस्टनंतर केव्हाही लागू होण्याची चिन्हे असल्यामुळे मंत्र्यांचे नाशिक दौरे सुरु झाले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, पालकमंत्री छगन भुजबळ हे सारेच या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर असल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीचा आठवडा नाशिकसाठी व्हीआयपी असणार आहे.

'क्लस्टर'च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फुलवला रानमाळ

$
0
0
नियोजनबद्ध विविध योजना हाती घेत पीक पद्धतीत बदल घडविला तर खडकाळ, मुरमाड अन् हलक्या प्रतिच्या जमिनीचाही मोठा कायापालट होतो. या बदलात सुधारित शेती व तंत्रज्ञानाची सांगड घातल्यास शेती अन् बागा चांगल्याच बहरतात, हे दाखवून दिलं आहे, दुष्काळी तालुका म्हणुन गणना होणाऱ्या येवला तालुक्यातील कातरणी गावातील शेतकऱ्यांनी.

निम्मा पाऊस अन् जलसाठाही

$
0
0
गेल्या जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या प्रारंभी झालेल्या जोरदार पावसामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत निम्मा पाऊस जिल्ह्यात बरसला असून, जिल्ह्यातील धरणांनीही निम्मा जलसाठा गाठला आहे.

‘सुपर’च्या किडनी प्रत्यारोपण युनिटला मिळेना मनुष्यबळ

$
0
0
नाशिकच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (संदर्भ सेवा रुग्णालय) किडनी प्रत्यारोपण युनिटला मान्यता मिळाली असली तरी कर्मचाऱ्यांच्या अभावी हे युनिट सुरू झालेले नाही. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत तरी १५ मेडिकल ऑफिसर मिळावे, अशी मागणी ‘सुपर’च्या प्रशासनाने केली आहे.

मोबाइलमुळे लागला खुनाचा छडा

$
0
0
मोबाइल किती गुणी किती अवगुणी, याची चर्चा नेहमीच रंगत असते. पण मोबाइलमुळे एका खुनाची उकल करणे शक्य झाल्याने नांदगाव पोलिसांना मात्र मोबाइल किती मोठे काम करू शकतो, याचा प्रत्यय आला आहे.

चव्हाणच्या अटकेची मागणी

$
0
0
गुंतवणुकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करून परदेशात लपून बसलेल्या भाऊसाहेब चव्हाण याला अटक करावी, अशी मागणी माजी उपमहापौर देवयानी फरांदे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

गोदावरीत दोघे बुडाले

$
0
0
ख्रिश्चन मुलांचा सांभाळ करणाऱ्या आश्रमाचा तरुण व्यवस्थापक आणि एक मुलगा रविवारी (ता. १०) टाकळीरोडवरील गोदावरी पात्रात बुडाले. अग्निशामक दल आणि पोलिस रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते. व्यवस्थापकाचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.

निफाडमध्ये रेड अलर्ट

$
0
0
संततधार पाऊस... दमट व ढगाळ वातावरण... स्वच्छतेचा अभाव... दूषित पाण्यामुळे निफाड गावात जुलाब, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने सहा दिवसांत दीड हजार जणांची जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली आहे.

दीड लाख भाविकांची ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा

$
0
0
सालाबाद प्रमाणे तिसऱ्या सोमवारची ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी शिवभक्तांनी लावलेली हजेरी यावर्षी कमी झाली. यंदा साधारणत: दीड लाखांच्या आतच भाविकांची प्रदक्षिणेसाठी उपस्थिती राहिली, तर दर्शन बारी मात्र रिकामीच होती.

कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

$
0
0
कृषी विभागातील तांत्रिक संर्वगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून येथे बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. राज्य कृषी सेवा महासंघांच्या पुण्यातील बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

मांजरपाडा-१ च्या पाण्यावर आरक्षणाची मागणी

$
0
0
मनमाड शहराच्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रामगुळणा पान्झण नद्या व सटवाई नाल्यावर लोक वर्गणीतून बंधारे बांधन्यास परवानगी मिळावी तसेच मांजरपाडा-१ प्रकल्पाच्या ७४५ दलघफू पाण्यावर चांदवड, मनमाडसह नांदगाव तालुक्याला आरक्षण मिळावे, अशा आशयाची दोन निवेदने मनमाड बचाव कृती समिती व चांदवड नांदगाव जल हक्क संरक्षण समितीतर्फे येवला उपविभागीय प्रांत अधिकारी वासंती माळी यांना देण्यात आली.

मनमाड-येवला मार्गावर अपघातात महिला ठार

$
0
0
येवला येथून मालेगावकडे जात असलेल्या मोटरसायकलस्वारास ट्रकने पाठी मागून धडक दिल्याने २७ वर्षीय महिला ठार झाली, तर दोन जण जखमी झाले. मनमाड येवला मार्गावर करूणा हॉस्पिटल जवळ हा अपघात घडला. याप्रकरणी शहर पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली आहे.

विद्यार्थिनीला छेडणारे तिघे ताब्यात

$
0
0
शालेय विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करणाऱ्या आणि तिचा हात धरून अश्लील संवाद साधणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. द्वारका परिसरातील संत कबीरनगरमध्ये राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

`ब्रेन डेड` पेशंटच्या अवयदानाबाबत उदासीनता

$
0
0
ऑपरेशन थिएटर व आयसीयू सेंटर्स असूनही शहरातील अनेक हॉस्प‌िटल्सने रिट्राइव्हल सेंटर म्हणून नोंदणी करण्यास उदासिनता दाखविल्याने अवयवदान आणि प्रत्यारोपण मोहिमेला खो बसला आहे.

विद्यार्थ्यांना निकृष्ट पोषण आहार

$
0
0
मालेगाव शहरातील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असल्याचा आरोप महापौर ताहेरा शेख यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेवून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

फिजिकल चॅलेंज अन् वृध्दांना मनासारखं घर

$
0
0
कॉर्पोरेट कंपन्या तरूणांना लक्ष्य करून प्रोडक्ट लाँच करतात.. मात्र, काही अनुभवी कार्पोरेट कंपन्या आता सिनिअर सिटीझन्सच्या गरजा ओळखून प्रोडक्ट लाँच करण्यावरही भर देऊ लागले आहेत. पुण्यातील विकासक परांजपे स्किम नाश‌िकमध्ये खास ज्येष्ठांसाठी सुखसुविधायुक्त ‘अथश्री’ हा प्रोजेक्ट लाँच करणार आहे.

एसटीला ३० लाखांचे उत्पन्न

$
0
0
श्रावणी सोमवार निमित्ताने त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या दीड लाख भाविकांची वाहतूक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसने केली. उत्कृष्ठ नियोजन आणि तत्पर सेवेच्या जोरावर महामंडळाने श्रावणी सोमवारचे आव्हान लिलया पार पाडले.

शहर काँग्रेसमध्ये धूसफूस

$
0
0
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून घेण्यात येणाऱ्या पक्षनिधीच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पुतळ्याचे सोमवारी दहन केले. नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे युवक काँग्रेस उपाध्यक्ष तुषार जगताप यांनी पक्षकार्यालयाबाहेरच ठाकरे यांचा पुतळा जाळला.

ना‌शिककरांचे हाल

$
0
0
पेट्रोल आणि डिझेलवर होणाऱ्या कर आकारणीच्या विरोधात नाशिक जिल्हा पेट्रोल ड‌िलर्स वेल्फेअर असोसिएशनने पुकारलेल्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. या संपामुळे वाहचालकांचे मोठे हाल झाले. नाशिक शहरातील तीन तर सिन्नर आणि ओझर येथील प्रत्येकी एक पंप मात्र सुरु होता.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images