Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कांदाप्रश्न पेटणार?

$
0
0
केंद्रातील भाजपप्रणित नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे शेतकरी आर्थिक संकटातसापडला असल्याचा आरोप करून कांदा, बटाटा यांचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश व कांदा निर्यातमुल्यात वाढ केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

पुरातत्वची कामे अधांतरीच?

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुंबईत सोमवारी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीला पुरातत्वच्या अधिकाऱ्यांनी चक्क दांडी मारली. या विभागाने आपल्या कामांचा अद्याप आराखडाही तयार केल्याने पुरातत्वची कामे अधांतरीच राहण्याची चिन्हे आहेत.

‘अर्ध्या’ कसारा घाटासाठी, ‘पूर्ण’ टोल

$
0
0
कसारा घाटातील रस्त्याला मोठा तडा गेला असून केवळ एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांनी टोल कमी करण्याची मागणी केली जात असून रस्ता पूर्णपणे बंद झाला तरच टोल कमी होईल वा बंद केला जाईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) दिले आहे.

हिरे बंधूंच्या प्रवेशाने भाजपला बळकटी

$
0
0
अद्वय व अपूर्व हिरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाने नक्कीच नाशिक जिल्ह्यात व उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. लोकसभेत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी अद्वय हिरे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघात मोलाचे योगदान दिले.

भांडवली मूल्यावर कर आकारणी नको

$
0
0
शहरातील मालमत्तांवर भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी करण्यास येवला पालिकेतील सर्वच नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. करप्रणाली आकारणीबाबत चर्चा करण्यासाठी बोलविलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अशी करआकारणी नकोच असा पवित्रा नगरसेवकांनी घेतल्याने हा विषय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला.

कृषी कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

$
0
0
राज्य कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातून मोर्चा काढून एक दिवसीय लाक्षाणिक उपोषण केले. यावेळी नायब तहसीलदार संजय पवार यांना निवेदन दिले.

त्र्यंबकला सिंहस्थ कामांना वेग

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा कामांनी शहरात वेग घेतला आहे. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०१५ करिता ८८ कोटी २ लाख ६१ हजार रुपयांची कामे सुरू झाली आहेत.

कंटेनरने लावली साईडपट्यांची वाट

$
0
0
औद्योगिक वसाहतीत सर्रासपणे उभ्या राहणाऱ्या कंटेनरमुळे रस्त्याच्या साईडपट्यांची वाट लागल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. साईडपट्या तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

ट्रान्सफार्मरमधील ऑईलची चोरी

$
0
0
भद्रकालीत ट्रान्सफार्मरमधील ४०० लीटर ऑईल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. सतीश वसंतराव कुलकर्णी (५४, रा. भाविकनगर, गंगापूर रोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ९ ऑगस्टपूर्वी हा प्रकार घडल्याचे कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मूर्ती विक्रेत्यांचे महापौरांना साकडे

$
0
0
त्र्यंबक रोडवरील सिव्हील हॉस्पिटल शेजारी गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यास परवानगी मिळावी यासाठी मूर्ती विक्रेत्यांनी महापौर यतीन वाघ यांची भेट घेतली. त्यावर पोलिसांनी परवानगी दिल्यानंतरच या ठिकाणी विक्रेत्यांना स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात येईल, असा पवित्रा महापौर वाघ यांनी घेतल्याने विक्रेत्यांना माघारी फिरावे लागले.

नाशिकरोडचा प्रवास धुळीमुळे झाला घातक

$
0
0
सूर्यदेवतेने कृपा केल्यामुळे आणि पावसाने उघडदीप दिल्याने रस्त्यावरील चिखल वाळला आहे. त्याची धूळ उडत असल्याने द्वारका चौक ते सिन्नरफाटा प्रवास करणे घातक झाले आहे. धूळ आणि खड्ड्यापासून बचाव करताना अपघात होत आहेत.

घरे झाली मोठी अन् रस्ते झाले लहान

$
0
0
शहर वाढत असले तरी रस्ते आणि जागा तेवढीच असल्याने त्याचे तोटे आता जाणवू लागले आहेत. कामगार वसाहती तसेच कॉलन्यांमध्ये घरांचे आकार वाढल्याने घंटागाडी जाण्यासाठीही रस्ता उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.

कुलगुरूंच्या पदग्रहणाची घट‌िका समीप?

$
0
0
सात मह‌िन्यांपासून कुलगुरू पदाच्या न‌ियुक्तीसाठी प्रत‌ीक्षेत असणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त व‌िद्याप‌ीठाची प्रत‌ीक्षा आता लवकरच संपणार आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या मुलाखतीचा पह‌िला टप्पा मंगळवारी संपला. एकूणच कुलगुरू न‌िवडीची प्रक्र‌िया या आठवड्याअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पत्नी-पतीसह मुलगाही भाजला

$
0
0
दिवा पेटविताना भाजलेल्या महिलेला विझविताना पती आणि तिचा मुलगाही भाजला. वाडीवऱ्हे येथे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. छाया दत्तू कातोरे (४०), दत्तू निवृत्ती कातोरे (४५) आणि दीपक दत्तू कातोरे (९) अशी भाजलेल्या तिघांची नावे आहेत.

मोदींच्या फसव्या घोषणांचा प्रचार करणार

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे. मोदींनी केलेल्या घोषणा निवडणुकींनतर लगेच हवेत विरल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोंदींच्या या फसव्या घोषणांचा राष्ट्रवादीच्या महिला घराघरात जावून प्रचार करणार आहेत.

मनसे आमदारांनाच महापालिकेचे वावडे!

$
0
0
नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असली तरी मनसेच्याच तिन्ही आमदारांचा महापालिका प्रशासनावर विश्वास नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

जगताप यांची पक्षातून हकालपट्टी

$
0
0
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी नाशिक पूर्व विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

येवलेकरांना ३ दिवसाआड पाणी

$
0
0
येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर पाणी साठवण तलावात पालखेडचे 'ओहरफ्लो' चे पाणी मिळाले आहे. यामुळे स्वतंत्र दिनापासून येवला शहर वासीयांना पाचऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे.

बोगस चिटफंडसाठी कडक कायदे हवेत

$
0
0
हल्ली एकाच पत्त्यावर चिटफंडच्या १० कंपन्या दाखविल्या जातात. अशा बोगस कंपन्यांना परवानगीच मिळू नये, यासाठी कायदे कठोर व्हायला हवेत. कंपनी कायद्यात बदल आवश्यक असून ते केंद्र सरकारच करू शकते.

...तर त्र्यंबकला पूजाविधीस बंदी

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथील विविध प्रकारच्या पूजा साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी येणारा खर्च तेथील पुरोहित संघाने द्यावा. त्यांनी तो दिला नाही तर त्र्यंबकला पूजाविधी करण्यास नगरपालिकेने बंदी घालावी, असा थेट इशाराच पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने दिला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images