Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कळवण तालुक्यात ७८ % पेरणी

0
0
कळवण तालुक्यात जुलैच्या उत्तरार्धात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला आहे. आत्तापर्यंत ७८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

देवनदी झाली प्रवाही

0
0
सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पश्चिम पट्यात असलेले उंबरदरी व कोनांबे धरण पूर्ण पणे भरले आहे. म्हाळुंगी नदीला पाणी वाहत असल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोनांबे धरणही भरले असल्याने देवनदी प्रवाहित झाली आहे.

अतिक्रमण निर्मूलन : फक्त फार्स

0
0
महापालिकेतर्फे नाशिकरोड येथे शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. संबंधितांनी सहकार्य केल्याने कोणताही अडथळा अथवा तणाव झाला नाही. नेत्यांचे आशीर्वाद असलेल्या तसेच धनदांडग्यांच्या अतिक्रमणांना हात न लावल्याने आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.

पारख यांनी घातला सोन्याचा शर्ट

0
0
सोन्याच्या शर्टमुळे राज्यभर टीकेचे धनी ठरूनही येवला पालिकेचे उपनगराध्यक्ष पंकज पारख यांनी आपल्या ४५ व्या वाढदिवशी सोन्याचा शर्ट घालून आपली हौस भागवली. सोन्याचा शर्ट घालणार नसाल तर, वाढदिवसाला हजर राहील, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बजावले होते.

एटीएम फोडून २४ लाखाची चोरी

0
0
सिन्नर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन तोडून चोवीस लाख रुपयाची चोरी झाल्याची घटना घडली.

काळाचे तुकडे जुळवताना…

0
0
प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ आणि महाराष्ट्राच्या पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक डॉ. अरविंद जामखेडकर यांनी नुकतीच वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. त्यांनी आपलं आजवरचं आयुष्य भारतीय संस्कृतीच्या शोधात घालवलं. प्राचीन संस्कृती ही भारताची खूप मोठी ताकद आहे.

‘धनगर आरक्षण आंदोलनाला राज्य सरकारचीच फूस’

0
0
धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सध्या राज्यभरात जे काही आंदोलन सुरू आहे त्यास राज्य सरकारचीच फूस असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शनिवारी केला. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबाबत आयोजित रावसाहेब थोरात सभागृहातील आभार मेळाव्यात ते बोलत होते.

डिसेंबरपर्यंत बसस्थानकांवर विश्रांतीगृह उभारणार

0
0
चालक, वाहक आणि मेकॅनिक हे एसटीची शक्त‌ीस्थळे आहेत. कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला तरच ते चांगली सेवा देऊ शकतील. २१ डिसेंबर २०१४ पर्यंत आवश्यक त्या प्रत्येक बसस्थानकावर विश्रांतीगृह, स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी शनिवारी व्यक्त केला.

धडाकेबाज पर्यावरण परवानग्या विनाशच

0
0
ऑनलाइन आणि धडाकेबाज पर्यावरण परवानग्या देण्याचा मोदी सरकारचा अजेंडा हा देशाला विनाशाकडे नेणारा असल्याची प्रखर टीका जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी ‘मटा’शी बोलताना केली आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना सिंह यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पत्नीचा खून : पतीला अटक

0
0
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या पतीला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. रुपेश तुळशीराम गायकवाड (४२, रा. मोरे मळा, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

प्रत्येक मिनिटाला तीन बसेस

0
0
तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला फेरी मारण्यासाठी लाखो भाविक जातात. भाविकांना त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले असून तब्बल ४६० बसेस नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर धावणार आहेत. महामंडळाचे एक हजार फेऱ्यांचे नियोजन असून प्रत्येक मिनिटाला तीन बसेस सोडण्यात येणार आहेत.

चौफुली बनली खड्डेमय

0
0
शहरातील खड्ड्यांबाबत सध्या जोरात चर्चा सुरू आहे. खड्डे बुजविण्याचे काम उशिरा का होईना हाती घेण्यात आले. मात्र, याला पाथर्डीफाटा चौफुली आणि गणेश चौकातील महेश भुवनजवळील रस्ता अपवाद ठरला आहे.

पेट्रोलपंप ११ ऑगस्टला बंद

0
0
एलबीटी, व्हॅट व इतर कर कमी करण्याच्या मागणीसाठी राज्यातील पेट्रोलपंप ११ आगस्टला बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. या संदर्भात आज नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनची बैठक झाली.

फेरीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज

0
0
तिसऱ्या श्रावणी सोमवारी होणाऱ्या फेरीसाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामीण पोलिसांकडून तब्बल १ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. रविवारी सकाळपासून सोमवारी रात्रीपर्यंत हा बंदोबस्त तैनात राहणार आहे.

पिक विमा योजनेस १६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

0
0
खरीप हंगाम २०१४ -१५ मध्ये राज्यात पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरणी व भात लावणीच्या कामांना विलंब झालेला आहे. त्याचा विचार करून केंद्रीय कृषी व सहकार विभागाने राष्ट्रीय कृषी विमा योजनेची मुदत ३१ जुलै २०१४ ऐवजी १६ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

जखमी माकडाला तरुणांनी दिले जीवदान

0
0
पावसाळ्याचे दिवस अन् विशेषकरून श्रावणात सध्या येवला तालुक्यातील अनकाई किल्यावरील भक्त व पर्यटकांची मोठी गर्दी बघता खायला मिळेल या आशेने या किल्ल्यावर माकडांची रेलचेल वाढलेली दिसत आहे. यातील चुकलेले एक माकड कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना शिवारातील गोरखनगर येथे घडली.

`निफाड तालुक्यात सर्वाधिक निधी खर्च`

0
0
रस्ते, वीज, पाणी आदी मुलभूत सुविधांसह व्यक्तिगत लाभाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करीत असून, निफाड तालुक्याच्या विकास साधतांना गट, तट, पक्षभेद बाजूला ठेवून सर्वाधिक निधी तालुक्यातील विकास कामांवर खर्च केला असल्याचे प्रतिपादन निफाडचे आमदार अनिल कदम यांनी केले आहे.

रुग्णालयाला अस्वच्छतेचा वेढा

0
0
कळवण उपजिल्हा रुग्णालयाबाहेर प्रवेशद्वार जवळच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याठिकाणी असणारा कचरा, चिखल या रोगराई पसरवणाऱ्या दुर्गंधीकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

सातपूरकर झाले हैराण

0
0
नाशिक शहरात अनियमित होणाऱ्या बससेवेमुळे प्रवाशांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. त्यातच बसचालकांमध्येही बस स्थानकावरून प्रथम बस कोण काढणार यावरूप हमरीतुमरी होत असून प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत.

‘बम बम भोले’च्या जयघोषाने फेरीला सुरुवात

0
0
‘बम बम भोले’च्या जयघोषाने ब्रह्मगिरीच्या फेरीला रविवारी (ता. ९) सायंकाळपासून सुरुवात झाली. मात्र, सालाबादचा अंदाज घेता यंदा पोलिस प्रशासनासह सर्वांनी केलेली प्रंचड तयारी पाहता रात्री उशिरापर्यंत तिसऱ्या सोमवारची गर्दी कमी असल्याचे दिसून आले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images