Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नऊ वर्षाची संस्कृती एमएससीआयटीत उत्तीर्ण

$
0
0
घोटी येथील व्हिनस कॉम्‍प्युटर्स प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनी संस्कृती संदीप गावंडे ही नऊ वर्षीय मुलगी बौधिक कौशल्याच्या बळावर एमएस सीआयटीची परीक्षा तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सटाणा नववसाहतीत माशींमुळे नागरिक हैराण

$
0
0
शहरातील भाक्षी रोडच्या नववसाहतीजवळ सुरू असलेल्या एका पोल्ट्रीफार्ममुळे माशींचा प्रचंड उपद्रव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माशींमुळे नागरिकांना घरात बसने देखील मुश्किल झाले आहे.

महंत सागरानंद सरस्वती यांची फेरनिवड

$
0
0
येथील स्वामी सागरानंद सरसस्वती यांच्या आश्रमात सर्व शैव आखाड्यांचे प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थासह तीन वर्ष साधू महात्मा यांच्या षडदर्शन आखाडा परिषदेचे प्रतिनिधीत्व स्वामी सागरानंद सरस्वती अध्यक्ष म्हणून करतील, असा सर्वानुमते निणर्य घेण्यात आला.

सटाणा बाजार समितीच्या विभाजनाला मंजुरी

$
0
0
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाचे अखेर सुप वाजले आहे. विभाजन करण्यास राज्याच्या पणन मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याने लवकरच सटाणा व नामपूर या दोन स्वतंत्र बाजार समितींच्या निर्मितीला चालना मिळणार आहे.

येवला नगरपरिषद नव्या इमारतीत

$
0
0
सन १८५८ मध्ये स्थापन झालेल्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या ऐतिहासिक येवला नगरपरिषदेचे कामकाज सोमवारी तब्बल १५६ वर्षांच्या जुन्या वास्तूमधून येवला-कोपरगाव रोडलगतच्या नव्या दिमाखदार इमारतीत स्थलांतरित झालं.

पोलीस कार्यालयांचे होणार स्थलांतर

$
0
0
गंगापूर रोडवर सुरू असलेल्या पोलिस आयुक्तालयाच्या दिमाखदार वास्तूचे काम पूर्ण झाले असून फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पोलिस आयुक्तालयाचा कारभार या नव्या इमारतीतून होणार असला तरी त्यामुळे परिमंडल एक आणि वाहतूक विभागाची कार्यालयेही सध्याच्या पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहेत.

उत्तरपत्र‌िका फोटोकॉपीची ‘लॉ’ च्या व‌िद्यार्थ्यांना प्रतीक्षा

$
0
0
पुणे व‌िद्यापीठांतर्गत लॉ व‌िद्याशाखेचा न‌िकाल लागून सुमारे दीड मह‌िन्याचा कालावधी उलटला, तरीही व‌िद्यार्थ्यांना उत्तरपत्र‌िकांची फोटोकॉपी म‌िळालेली नाही. व‌िव‌िध पेपरच्या रिचेकिंगसाठी उत्तरपत्र‌िकांची फोटोकॉपी सक्तीची असल्याने व‌िद्यार्थ्यांना या फोटोकॉपीची गरज आहे. या फोटोकॉपीज वेळेत न म‌िळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी व‌िद्यार्थी काँग्रेसने द‌िला आहे.

‘सांख्यिकी पध्दतीत सुधारणा गरजेची’

$
0
0
उत्पन्नाचे तुलनात्मक अंदाज सर्व राज्यांनी तयार करण्यासाठीची शिफारस तेराव्या वित्त आयोगाने केली आहे. त्यासाठी सांख्यिकी पध्दतीत सुधारणा गरजेची आहे. या दृष्टीने राज्य व जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमता वर्धनास बळकटी देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संचालक अश्विनी देव यांनी केले.

बडगुजरांना नोटीस राजकीय षडयंत्रातूनच

$
0
0
महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावणे हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. त्यामुळे ही नोटीस रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे केली आहे.

मोदींना शेतकऱ्यांची ताकद दाखवा!

$
0
0
शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणाऱ्या मोदी सरकारला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी येत्या १४ ऑगस्टला लासलगाव येथे रेलरोको करून शेतकरी संघटनेची एकजूट व ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी पिंपळगाव बसवंत येथे ‌केले.

...तर रंगभूमी होईल पुनरुज्जीवित!

$
0
0
चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी आयुष्याच्या संध्याकाळी लिहिलेल्या सुरेख व मनोरम्य ‘रंगभूमी’ या नाटकाचा वनवास लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी हे नाटक वाचनासाठी नेले असून, त्यांच्या पसंतीला ते उतरले तर काही बदल करून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज होणार आहे.

आकांक्षा तेजस्वी पथदर्शनाची...!

$
0
0
भारतभरातून विद्या आत्मसात करीत ती नाशिक शहरासाठी अर्पण करणाऱ्या कलावंतांचे महान योगदान म्हणून शहराला कला संस्कृतीचे माहेरघर असे नामाभिधान मिळत आहे. हे कलाप्रकार कोणत्या अवस्थांमधून संक्रमित झाले म्हणजे उदयोन्मुख युवापिढीच्या आशा आकांक्षांना तेजस्वीपणा लाभून पथदर्शन होईल याकडे आता ज्येष्ठांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

बालेकिल्ल्याचा किल्लेदार बदलणार

$
0
0
शिवसेनेचा गड, बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देवळाली मतदारसंघाचा किल्लेदार यंदा हमखास बदलणार आहे. या मतदारसंघात गेली २५ वर्षे हुकूमत गाजविणारे बबन घोलप यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी धरल्याने या वेळी इथला उमेदवार बदलला जाणार आहे.

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला

$
0
0
धरण क्षेत्रात पावसाचा जोर मोठा असल्याने सलग चौथ्या दिवशी गंगापूर धरणातून दीड हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

निवडणुकीपूर्वी राज्याला धोरणांचं बळ

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑगस्टनंतर कुठल्याही क्षणी लागण्याची चिन्हे असल्यामुळे आघाडी सरकारने राज्यातील सहा क्षेत्रांसाठी नवे धोरण आणण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. त्यामुळेच आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनीअरिंग, कृषी, जैवतंत्रज्ञान आणि कृषीप्रक्रिया उद्योग या सहा क्षेत्रांसाठीचे धोरण येत्या काही दिवसातच जाहीर होण्याची चिन्हे आहेत.

... अन् हात आपोआप खिशात गेला!

$
0
0
एरवी वर्तमानपत्र वाचताना मदतीसाठी आवाहनाच्या बातम्या वाचनात येतात. अशी बातमी वाचून मदत करण्याची इच्छा असते. मात्र, त्याबाबत आपण जी मदत करत आहोत, ती योग्य आणि गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल की नाही याबाबत शंकाही वाटत असते. पण ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये या मुलांबद्दल वाचनात आलं आणि हात आपोआप खिशात गेले.

नाशकातील गणपती सातासमुद्रापार

$
0
0
अवघ्या २५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या कामांना सुरुवात झाली असून मूर्तीकारांनी मूर्तीवर शेवटचा हात फिरवायला सुरुवात केली आहे. सिडकोतील मोरे गणपतीवाले यांनी परदेशात मूर्ती पाठवण्याची परंपरा यंदाही कायम राखली असून अनेक मूर्ती रवाना झाल्या आहेत.

‘संध्याछाया’ नव्याने नाट्यप्रेमींच्या भेटीला

$
0
0
नाशिकचे नाट्यकार आता पूर्णतः व्यावसायिक नाटकाकडे वळत असून 'रिमझिम रिमझिम' नंतर सचिन शिंदे दिग्दर्शित, स्नेहबंध निर्मित व अना‌हिता प्रस्तूत ‘संध्याछाया’या नाटकाच्या निमित्ताने नाशिकरांना अजून एक नाट्यभेट मिळणार आहे.

पेरणी झाल्यावर बियाणे वाटप

$
0
0
राज्य सरकारच्या तालुका कृषी विभागाच्या वतीने कावेरी मका बियाने ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यासाठी प्रकल्प म्हणून ठेंगोडा गावाची निवड केली होती. मात्र पेरण्या झाल्यावर बियाणे वाटण्याचा प्रताप कृषी विभागाने केला. शेतकऱ्यांना महागडी बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

जेट एअरवेजकडून अपंगांची हेळसांड

$
0
0
विमानसेवेत पराकोटीची स्पर्धा असतानाही जेट एअरवेज या खासगी विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडून अपंगांची हेळसांड केली जात असल्याची बाब पुढे आली आहे. नाशिकच्या एका तरुणाला जेट एअरवेजकडून मिळालेल्या निकृष्ट सेवेमुळे अत्यंत मनस्ताप सहन करावा लागला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images