Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची महिला आरक्षण सोडत जाहीर

$
0
0
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची महिला आरक्षण सोडत आज जाहीर झाली. कॅन्टोनेमेंट बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर संजय तिवारी व मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी बाराला बोर्ड कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली.

शिक्षक भरती प्रक्र‌िया संशयाच्या भोवऱ्यात

$
0
0
दोन मह‌िन्यांपूर्वी नवीन श‌िक्षकांची भरती करताना शाळा संह‌ितेचे न‌ियम डावलून तरुण ऐक्य मंडळाच्या संस्थाचालकांनी स्वह‌ित जोपासल्याचा आरोप संस्थेच्या ह‌ितच‌िंतकांनी केला आहे.

व्होकेशनल श‌िक्षकांच्या पदरी ‘फुलाची पाकळी’

$
0
0
नाश‌िक व‌िभागांतर्गत उच्च माध्यम‌‌िक व्यवसाय अभ्यासक्रमांना श‌िकव‌िणाऱ्या श‌िक्षकांचा ग्रेड पे १९०० हून २१०० रुपये करण्यात येईल, या आश्वासनासह आणखी दोन मागण्या मान्य होत महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोस‌िएशनचे धरणे पार पडले. यामुळे मुख्य नऊपैकी तीन मागण्या पदरी पडल्याने ‘फुल न फुलाची पाकळी’चे दान असोस‌िएशनच्या पदरी पडले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बीकेसीला द‌िलासा

$
0
0
बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी भुजबळ नॉलेज स‌िटीच्या चौकशी संदर्भातील मुंबई हाय कोर्टाच्या आदेशास सुप्रीम कोर्टाने पुन्हा स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे भुजबळ नॉलेज स‌िटीला द‌िलासा म‌िळाला आहे.

महसूलचे काम पडले ठप्प

$
0
0
राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी महसूल दिनापासून सुरू केलेल्या संपावर तोडगा निघाला नसतानाच नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिल्याने महसूलचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. परिणामी महसूल कार्यालयात काम घेऊन येणाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे.

मनसे राखणार की युती हिसकवणार

$
0
0
बहुतांश कामगार वर्ग आणि कसमादे (कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा) मतदारांचा कौल निर्णायक ठरत असलेल्या पश्चिम मतदारसंघात यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला या भागातून सिन्नर मतदारसंघापाठोपाठ सर्वाधिक मताधिक्य मिळालेले असल्याने या दोन्ही पक्षांकडून तीसपेक्षा अधिक जण इच्छुक आहेत.

कसारा, वणी घाटाबाबत अफवा

$
0
0
कसारा आणि वणी घाट खचला आहे, तो कोसळणार आहे अशा प्रकारच्या विविध अफवा सोशल नेटवर्किंग साईटसद्वारे पसरविल्या जात आहेत. मात्र, या दोन्ही घाटांमध्ये तशी परिस्थिती नसल्याचा निर्वाळा जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.

टोमॅटो झाले महाग

$
0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला खरेदी केंद्रावर टोमॅटोची किरकोळ आवक सुरू झाली असून मंगळवारी शंभर क्रेट्स विक्रीसाठी दाखल झाले होते. समाधानकारक आवक होत नसल्याने टोमॅटोचे दर काही दिवस चढेच राहण्याची शक्यता आहे.

जेलरोडला पुन्हा ‘वाहनकांड’

$
0
0
जेलरोड येथील विठ्ठल मंगल कार्यालयामागील एका सोसायटीत समाजकंटकांनी आठ दुचाकी आणि एका कारचे नुकसान केले. संबंधितांनी प्रत्येक गाडीवर डीएक्स अशी आद्याक्षरे लिहिली. दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याची मागणी नागरिक करत आहेत.

कोनांबे धरण ओव्हरफ्लो

$
0
0
सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पश्चिम पट्यात असलेले कोनांबे धरण पूर्ण भरले आहे तर, म्हाळुंगी नदीला पाणी वाहत असल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

एअरटेलची नाशकात ४जी सेवा

$
0
0
टेलिकॉम क्षेत्रातील ४ जी सेवेत नाशिकचाही समावेश झाला असून, एअरटेल कंपनीने त्यांची सेवा सुरु केली आहे. तर, रिलायन्स कंपनीची ४ जी सेवा येत्या काही दिवसातच सुरु होणार आहे. परिणामी, ४ जी सेवा असलेले नाशिक हे देशातील १६ वे तर महाराष्ट्रातील तिसरे शहर ठरले आहे.

राख्यांनी सजली बाजारपेठ

$
0
0
फ्रेंडशीप डे सरला असून नाशिकरांना आता रक्षाबंधनाचे वेध लागले आहेत. नाशिकची बाजारपेठ आता विविध प्रकारच्या राख्या अन् भेटवस्तूंनी फुलली आहे. बदलत्या आवडीनिवडीनुसार राख्यांमध्ये नवेनवे प्रकार पहावयास मिळत आहेत.

विवाहितेची आत्महत्या; चौघांना अटक

$
0
0
तब्बल दोन अडीच वर्ष विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पती‌सह चौघांना अटक केली आहे. अनिता भूषण सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.

संघाणी यांची चौकशी करा

$
0
0
कडवा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता संघाणी यांचीप्रशासकीय चौकशी करून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी येवला तालुका जलहक्क संघर्ष समितीचे संजय पगारे, भाऊ लहरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

दर ४ दिवसांनी एका महिलेवर अत्याचार

$
0
0
नाशिक शहर आणि जिल्ह्यात दर चार दिवसांनी एका महिलेवर अत्याचार होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. पीडित महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य या योजनेच्या माध्यमातून ही बाब उजेडात आली आहे.

‘व‌िद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करा’

$
0
0
प्राथम‌िक आण‌ि माध्यम‌िक स्तरावर श‌िक्षण घेणाऱ्या व‌िद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचे अवास्तव ओझे होत आहे. यामुळे व‌िद्यार्थ्यांना मानस‌िक तणावासह व‌िव‌िध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

सर्जनशील व्यक्तिमत्त्व हरपले

$
0
0
स्मिता तळवलकर म्हणजे एक हसरे व्यक्तिमत्त्व. धडाडीची अभिनेत्री व निर्माती असेच त्यांचे वर्णन व्हावे. मराठी मालिकांमध्ये कादंबरीचे अस्तित्त्व गडद करण्याला त्यांनी मोलाचा हातभार लावला. अशा गुणी अभिनेत्रीचे अचानक एग्झीट घेणे ही चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत धक्कादायक बाब आहे.

तीन आठवड्यात अंमलबजावणी करा

$
0
0
एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेच्या विटांचा बांधकामात वापर करावा यासह ग्रीन ट्रिब्युनलच्या इतर आदेशांची अंमलबजावणी केली नाही, म्हणून विविध सरकारी यंत्रणांच्या विरोधात ग्रीन ट्रिब्युनलमध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

रेड कॉर्नर नोटीसची केबीसीप्रकरणी प्रतीक्षा

$
0
0
केबीसी प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी न्यायालयाने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी, अशी विनंती पोलिसांनी केली असली तरी त्यासाठी पोलिसांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशी नोटीस बजावण्यासाठी करावयाच्या प्रक्रियेची तपशीलवार माहिती न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेकडे मागवली आहे.

लासलगावजवळ अपघातात पिकअपमधील २५ जखमी

$
0
0
लासलगाव-विंचूर रस्त्यावर बुधवारी सकाळी पिकअप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात २५ जण जखमी झाले. यातील पाच जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गाडीतील सर्व प्रवासी नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील रहिवासी आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images