Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
0
नाशिक शहर परिमंडल दोनचे उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. स्वामी औरंगाबाद येथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून तर डॉ. महावरकर रायगड जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून काम पहाणार आहेत.

मनमाड-येवला मार्गावर अपघात

0
0
मनमाड-येवला मार्गावरुन शिर्डीच्या दिशेने जात असलेल्या एका व्हॅनची ट्रकशी टक्कर झाली. या अपघातात पाचजण जागीच ठार झाले तर एका व्यक्तीचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला; तीनजण जखमी झाले.

मुख्यमंत्री आज नाशकात

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतानाच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी शहरात येत आहेत. कालिदास कला मंदिरात होणाऱ्या काँग्रेस मेळाव्याला उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ग्रॅच्युईटी प्रकरणात श‌िक्षण सच‌िवांची माफी

0
0
न‌िवृत्त श‌िक्षकांच्या ग्रॅच्युईटी प्रकरणात सुप्र‌ीम कोर्टाचे आदेश न मानल्याबद्दल कोर्टच्या अवमान प्रकरणी उच्च श‌िक्षण सच‌िव संजीव कुमार यांनी कोर्टाची ब‌िनशर्त माफी माग‌ितली. तर याच‌िकाकर्त्यांचे ३२ कोटी रुपये चार आठवड्यांमध्ये औरंगाबाद खंडपीठात जमा करण्यात यावेत, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने शासनाला द‌िला आहे.

ना‌शिकला हवं पाठबळ ‘आयआयएम’च

0
0
व‌िमानतळाच्या न‌िम‌ित्ताने नाश‌िक शहर आता थेट आंतरराष्ट्रीय नकाशावर जात आहे. या टप्प्यावर जगाच्या नकाशावरील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून लौकीक म‌िळव‌िण्यासाठी नाश‌िकला त‌ितक्याच दमदार संस्थांची गरज न‌िर्माण झाली आहे.

स्थायीच्या सभापती निवडीची उत्सुकता

0
0
मालेगाव मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाची मुदत ३ ऑगस्ट रोजी संपली असून नव्या सभापती निवडीचा कार्यक्रम मनपा प्रशासनाने जाहीर केला आहे. येत्या ६ ऑगस्ट रोजी स्थायीच्या सभापती पदाची निवड होणार आहे.

पुनर्वसनाअभावी प्रकल्पग्रस्त अडचणीत

0
0
इगतपुरी तालुक्यात नव्यानेच बांधलेल्या घोटी-वैतरणा मार्गावरील वाकीखापरी धरणात यावर्षी प्रथमच प्रायोगिक तत्वावर पाणी साठवल्याने वैतरणामार्गच पाण्यात गेला. तत्यात पर्यायी रस्ता नव्याने बांधण्यात आला असला तरी शेवटच्या टप्यात घाईघाईने हा रस्ता तयार केल्याने तो महिनाभरातच खचला आहे.

शहर वाहतुकीचा एसटी अन् प्रवाशांना फटका

0
0
शहरातील ट्रॅफीकची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. रस्‍त्यांवर पायी चालणे सुध्दा मुश्किल झाले आहे. रस्त्यावर उभी राहणारी वाहने, नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारक याचा ट्रॅफीकवर मोठा परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका सिटी बस व सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.

संसरीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार

0
0
संसरीच्या पाणीयोजनेचा समावेश केंद्र सरकारच्या २०१४-१५ च्या राष्ट्रीय पेयजल कृती आराखड्यात करण्यात आला आहे. राज्य शासनानेही ५५ लाखाचा निधी दिला आहे. त्यामुळे या गावचा पाणीप्रश्नी कायमस्वरुपी मिटणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

दारूसाठी वाटेल ते केले!

0
0
‘नशायात्रा’ लिहतांना स्वतःला आठवून लिहित होतो. दारूच्या प्रचंड आहारी गेलो होतो. मुक्तांगणमधून परतल्यावरही दारूचा अट्टहास सोडला नाही. माझ्या या वागण्यामुळे कुटुंबीयही वैतागले होते. दारूसाठी घरच्यांशी भांडण, चोऱ्या करायला लागलो. कालांतराने असे काही अनुभव आयुष्यात आले जे मनाला चटका लावून गेले.

‘लोकसभेची पुनरावृत्ती करणार’

0
0
लोकसभा निवडणुकीत जशी शिवसेनेने मुसंडी मारूण विरोधकांना अस्मान दाखविले त्याचीच पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत करू, असा संकल्प प्रत्येक शिवसैनिकाने करून कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी येवल्यातील शिवसैनिकांना केले.

काझी गढी रहिवाशांचे उपोषण सुरू

0
0
काझी गढी येथील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असताना लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत जागा सोडणार नसल्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने कोणतीही तयारी दर्शविली नसल्याने रविवारपासून नागरिकांनी उपोषणाला सुरुवात केली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे एकला चलो रे !

0
0
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गेल्या दीड दशकापासून सरकार आहे. आगामी निवडणुकीसाठी आघाडीच्या हालचाली देखील सुरु आहेत. तरीही काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात ‘एकला चलो रे’चा जोरदार नारा दिला. मात्र, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी सन्मानजनक तडजोडीची भाषा केल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना होती.

‘देव‌िदास पिंगळेंचे आरोप निराधार’

0
0
नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष देव‌िदास पिंगळे यांनी केलेले आरोप निराधार असून, कामगारांमुळे कारखाना कधीही अडचणीत येणार नाही, असे व‌िश्वास नाशिक साखर कामगार युनियनचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे यांनी पत्रकाव्दारे व्यक्त केला आहे.

सटाण्यात सहा तास भारनियमन

0
0
सटाणा शहरातील वीज चोरी बरोबरच सुमारे ३१ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे शहराची वर्गवारी घसरल्याने सटाणा शहरात दररोज तब्बल सव्वासहा तास भारनियमन सुरू करण्यात आले आहे. हे भारनियमन आक्टोंबर अखेरपर्यंत असून थकबाकी व वीजचोरी सुरूच राहिल्यास अधिक वाढ होण्याची शक्यता अधिकारी वर्गाने व्यक्त केली आहे.

सिंहस्थासाठी हवेत स्वयंसेवक

0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यात पोलिसांना स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याची गरज भासणार आहे. १०० हून अधिक सभासद संख्या असलेल्या स्वयंसेवी संस्थानी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी केले आहे.

साईभक्तांवर काळाचा घाला

0
0
येवला तालुक्यातील गोपाळवाडी फाट्याजवळ मनमाड-नगर राज्य मार्गावर रविवारी (ता. ३) सकाळी सव्वासहाच्या सुमारास आयशर टेम्पो व मारुती व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात व्हॅनमधील ६ जण ठार झाले, तर ३ भाविक गंभीर जखमी झाले. हे सर्व भाविक मध्य प्रदेशातील असून, ते शिर्डीला चालले होते.

नवापूरची जागा ठरणार कळीची

0
0
नवापूरची जागा सध्या काँग्रेसकडे असून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हक्क सांगितला जात असल्याप्रकरणी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळेच आघाडीच्या जागा वाटपात ही जागा अधिक कळीची ठरण्याची शक्यता आहे.

तडजोड सन्मानाने, अन्यथा स्वबळ!

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची चर्चा आणि तडजोड ही सन्मानपूर्वकच होईल, अन्यथा काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे.

शांतीनगरची सुरक्षा रामभरोसे

0
0
नाशिक महापालिकेची चुंचाळे घरकुल योजना देखील डोंगराच्याच पायथ्याशी उभी राहत आहे. तसेच वीस वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीच्या शेजारी डोंगराला लागून असलेल्या शांतीनगर झोपडपट्टीच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. यामुळे भविष्यात दरड कोसळून दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल माळीण गावाच्या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images