Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रेशनकार्ड ऐवजी आता स्मार्टकार्ड

$
0
0
बनावट रेशनकार्डाला फाटा देतानाच पुरवठा विभागात पारदर्शकता आणण्यासाठी येत्या वर्षभरात रेशनकार्ड रद्द करून त्याऐवजी स्मार्टकार्ड देण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

ए-टू दर्जाची अंमलबजावणी व्हावी

$
0
0
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी या नदीला देण्यात आलेल्या ए-टू दर्जाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी शिफारस नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) केली आहे. गोदावरी प्रदूषणाबाबत नीरीने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

डेब्रीजची जबाबदारी नक्की कोणाची ?

$
0
0
शहरात गेल्या काही काळात विकसक आणि ठेकेदारांकडून राडारोडा, माती, दगड-विटांचे तुकडे, तसेच निरुपयोगी बांधकाम साहित्य नदीकिनारी किंवा पात्रात, तसेच नाल्यांच्या पात्रात टाकण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नदी-नाल्यांचे पात्र बुजते, अरुंद होते आणि पाणी अडून अनेकांच्या घरात पाणी शिरते.

निकिताताई, माझ्याच घासातला अर्धा देतोय!

$
0
0
'निकिताताई, तू माझी छोटी बहीणच आहेस, मला तुझा अभिमान आहे. तुझ्यासाठी फार काही मोठे नाही करू शकत. खरे तर मला तुला अधिक मदत करण्याची इच्छा आहे, पण माझ्या पगारातून इतकीच रक्कम मी तुला देऊ शकतो, हा माझ्या घासातला अर्धा घास आहे. तो गोड मानून घे.

बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर शहरात अलर्ट

$
0
0
बिहार राज्यातील बोध गया येथील महाबोधी मंदिरात रविवारी पहाटे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या धर्तीवर गृहविभागाने राज्यातील सुरक्षा वाढवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

विकासाचा मुद्दा घेऊन मनसे निवडणूक लढवणार

$
0
0
जळगाव महापालिकेची निवडणूक ही शहर विकासाचा मुद्दा घेऊनच मनसेकडून लढवली जाईल. विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे काम सुरू असून योग्य वेळी जळगावकरांसमोर ठेवली जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आ. प्रवीण दरेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

पाऊस होऊनही वृक्षारोपणाकडे पाठ

$
0
0
जळगाव जिल्हा परिषदेला ४० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले गेले आहे. मात्र जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असताना जिल्हा परिषदेने हे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. जिल्ह्यात नेमकी किती वृक्ष लागवड करण्यात आली, याची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत दिसून आले.

'शून्य टक्के कचरा अभियान राबविणार'

$
0
0
प्रभाग क्रमांक २१मध्ये विविध विकासकामांची पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून श्रीगुरुजी हॉस्पिटल ते विवेकानंदनगरच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी प्रभागात 'शून्य टक्के कचरा अभियान' राबविणार असल्याचे नगरसेवक विक्रांत मते यांनी सांगितले.

प्रदूषित करणा-यांकडून ५० हजाराचा दंड वसूल

$
0
0
गोदावरीतील प्रदुषण रोखण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी प्रदुषण करणाऱ्या ८० जणांवर कारवाई करून तब्बल ५० हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर चार पोलिस स्टेशनमधील कर्मचा-यांनी ही कारवाई केली आहे.

हातभार मोबाईल बॅटरीचा

$
0
0
व्यवस्थेची दोन टोके जेव्हा एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा घडणारे प्रसंग अकल्पनीय असतात. मुक्त विद्यापीठाचा पदवीदान सोहळा महाकवी कालिदास मंदिरात नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते.

रस्ते दोन; वापरण्या जोगा एकच

$
0
0
गंगापूररोड सारखा पॉश समजल्या जाणा-या परिसराचा विकास प्रगतीपथावर आहे. अंतर्गत रस्ते आणि बांधकाम व्यवसायिकांना सुखसोयी देण्यात दंग असलेल्या महापालिकेने मात्र गंगापूररोडकडे दुर्लक्ष करायचे ठरविलेले दिसते.

आयटीआय प्रवेशाच्या मुदतीत वाढ

$
0
0
ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्याच दिवसापासून झालेल्या सर्व्हर डाऊनमुळे खोळंबलेल्या आयटीआय प्रवेशाची मुदत वाढविण्यात आली आहे. आधी ही मुदत ८ जुलैपर्यंत होती. राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यानंतर आता १५ जुलैपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे.

रेल्वे रिझर्वेशनचा अनागोंदी कारभार

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे रिझर्वेशन काऊंटरवर तिकीट रिझर्वेशनसाठी आलेल्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून तिकीट बुकींगमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांना हिन दर्जाची वागणूक मिळत असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे.

सप्तश्रुंगसाठी २७८ कोटींचा आराखडा

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सप्तश्रुंग गड येथे विकासकामांसाठी ट्रस्टने ५१ कामे सुचवून २७८ कोटींचा आराखडा शासनाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापैकी सुमारे ४० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत.

रिक्षा मीटरसाठी रांगेत; प्रवाशांचे हाल

$
0
0
इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीची मोहिम आरटीओने मनावर घेतल्याने रविवारीही आरटीओचे कर्मचारी कामावर हजर होते. यामुळे शहरातील रिक्षाचालक मीटर बसविण्यात दंग असल्याने आज शहरात रिक्षा वाहतूक बंद असल्याची स्थ‌ि‌ती निर्माण झाली होती. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

व्यापा-यांचा १५ आणि १६ जुलैला बंद

$
0
0
महापालिका हद्दींमध्ये राज्यसरकारने सुरू केलेल्या लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) विरोधात फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम) या संघटनेने १५ आणि १६ जुलै या दोन दिवशी बंद पुकारला आहे.

नाशिकरोडला तणाव

$
0
0
बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती झाली होती. परंतु पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण करा

$
0
0
नदीपात्रालगत असलेल्या पूररेषेत अनधिकृतरित्या बांधकामे होत असल्यामुळे अशा बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी सोमवारी येथे दिले. या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकारी, महापालिका आणि राज्य सरकार यांना देण्यात येणार आहे.

मनमाड बंदला शंभर टक्के प्रतिसाद

$
0
0
बिहारमधील बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या निषेधार्थ सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी व आरपीआयच्या वतीने पुकारण्यात आलेल्या मनमाड बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

बोधगयेतील स्फोटाच्या निषेधार्थ मोर्चे

$
0
0
बुध्दगया येथे झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या निषेधार्थ शहर व नाशिकरोड येथील विविध संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चे, रास्तारोको व रेल रोको आंदोलन करून निषेध नोंदविला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images