Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हावे - दरेकर

0
0
मनसेच्या स्थापनेनंतर अल्पावधीत पक्षाने राज्यात झंझावात निर्माण केला आहे. या झंझावाताने सत्ता परिवर्तन घडण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन मनसेचे प्रवक्ते आ. प्रवीण दरेकर यांनी केले.

विद्यार्थ्यांना मिळणार हक्काची इमारत

0
0
महापालिकेच्या शाळानंबर ९७ मधील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ४५० विद्यार्थ्यांना अवघे २ वर्ग उपलब्ध असल्याने ऊन, वारा आणि पाऊस सहन करीत ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच हक्काची इमारत मिळणार आहे.

अधिका-याची धडाडी

0
0
नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर साकारण्याबाबत काही दिवसांपूर्वी निमा हाऊसमध्ये बैठक झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जॉईण्ट सीईओ डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिडको विद्युत विभाग निम्म्या कर्मचा-यांवरच

0
0
जुने नवीन सिडको, अश्‍विननगर, पाथर्डी व अंबड गाव परिसरातील पथदीप नादुरूस्तीच्या तक्रारींत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आठ दिवसांपूर्वी दिलेल्या तक्रारीवरही कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने निराशेचे वातावरण आहे.

दोन मृतदेह सापडल्याने खळबळ

0
0
साईनगर रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सोमवारी दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. साठ ते सत्तर वयोगटातील त्या दोघांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कुंभमेळ्याची भिस्त गंगापूरवरच

0
0
गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरासाठी प्रस्तावित असलेल्या किकवी धरणाचा कुंभमेळ्यातील कामांमध्ये अंतर्भाव नसल्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुंभमेळ्य़ाची भिस्त गंगापूर धरणावरच अवलंबून राहणार आहे.

अॅड् नीलिम सोळंके बेपत्ता

0
0
मुंबई-नांदेड देवगिरी एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या मुंबई हायकोर्टातील वकील अॅड्. नीलिमा प्रवीण सोळंके या मनमाड रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी मनमाड रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कांद्याने ओलांडला दोन हजारांचा टप्पा

0
0
बाजार समितीमध्ये सोमवारी (दि. ८) कांद्याच्या बाजारभावाने दोन हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे दुष्काळी पार्श्वभूमीवर उत्पादन घेणा-या कांदा उत्पादकांच्या कष्टांचे चीज झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे

0
0
गोदावरी आणि तापी खो-यामध्ये दरवर्षी दहा ते बारा टीएमसी पाण्याची तूट होत असल्यामुळे या दोन्ही भागांतील पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यासाठी या दोन्ही खो-यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांनी सोमवारी येथे दिले.

सहा 'जात पंचां'ना न्यायालयीन कोठडी

0
0
मुलामुलींच्या आंतरजातीय विवाहाविरोधात आदेश काढणाऱ्या सहा जात पंचांना कोर्टाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. चार दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयितांना कोर्टात हजर करण्यात आले होते.

रेल्वे पार्कींगचा तिढा सुटेना

0
0
रेल्वे स्टेशन परिसरात येणा-या प्रवाशांना आपली वाहने लावण्यास जागा नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या अस्तित्वात असलेले देवी चौकातील पार्कींग अपुरे पडत असल्याने.

मजदुर संघातर्फे सिन्हांना निवेदन

0
0
संसदीय स्थायी समितीची आयएसपी मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय वित्त विभागातील संसदीय स्थायी समितीचे चेअरमन यशवंत सिन्हा यांची भेट घेऊन कामगारांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

प्रवेश द्यायला ‘अशोका’चा नकार

0
0
शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आदेशानंतरही अशोका युनिव्हर्सल स्कूलने ऋत्व‌ी चौधरी या सिनीयर केजीच्या विद्यार्थीनीला शाळेत घेण्यास नकार दिला आहे. शाळेवर आठ दिवसात कारवाई न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचे पालक दिनानाथ चौधरी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

रिक्षाचालकांच्या दादागिरीने कॉलेजरोड वेठीस

0
0
स्थळ : टाइम्स ऑफ इंडिया इमारतीसमोर, कॉलेजरोड. वेळ : दुपारी दोनची. कॅनडा कॉर्नरकडून कॉलेजरोडकडे येणाऱ्या एका रिक्षाला पाठीमागून कारचा थोडासा धक्का लागतो.

मोडेन पण वाकणार नाही

0
0
एखाद्या जाहिर कार्यक्रमात घडणारा कॉमेडी किस्सा त्या कार्यक्रमापेक्षाही अधिक लक्षात राहतो. मंगळवारी कॉलेजरोडवरील एका कॅम्पसमध्ये आयोजित वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात असाच एक किस्सा घडला.

रिक्षावाला तुपाशी; प्रवाशी उपाशी

0
0
शहरातील रिक्षांना जूनपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवण्याची मुदत देण्यात आली होती. मुदत उलटूनही इलेक्ट्रॉनिक्स मीटर न बसवणाऱ्या रिक्षा चालकांवर अखेर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. त्यानंतर रिक्षा संघटनांनी आक्रमक भूमिका घेत बंदचे हत्यार उपसले.

केबल तुटल्याने अंबडची दूरसंचार सेवा ठप्प

0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या ठिकाणी भारत संचार निगम लिमीटेडची (बीएसएनएल) केबल तुटल्याने परिसरातील हजारो ग्राहकांना त्याचा फटका बसला. खासकरुन उद्योजकांचे यामुळे कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले.

‘एटीव्हीएम’ मशिनची घोषणा विरली हवेतच

0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी लक्षात तिकिटाच्या रांगा कमी करणारे व प्रवाशांचा वेळ वाचविणारे अॅटोमॅटीक तिकीट व्हेंडींग मशिन (एटीव्हीएम) बसविण्यात येतील अशी घोषणा मध्यरेल्वेचे तत्कालीन मॅनेजर सुबोधकुमार जैन यांनी केली होती.

१५ दिवसात ३४४ मिसींग केसेसचा उलगडा

0
0
नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तींसंबंधी दाखल झालेल्या १ हजार ४७४ केसेसपैकी ३४४ केसेसचा अवघ्या १५ दिवसात उलगडा करण्यात आला आहे. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी क्राईम ब्रँचने विशेष मोहिम हाती घेतली होती.

बी. कॉमच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा निकालाची

0
0
परीक्षा विभागामध्ये पारदर्शकता आणून विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावण्याची पुणे विद्यापीठाची घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे. बी. कॉम अभ्यासक्रमाचे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे निकाल अद्याप न लागल्याने विद्यार्थी ‌चिंतेत आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images