Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला येवला शहरात मारहाण

$
0
0
शहरात थंडपेय विक्रीच्या दुकानात तपासणी करण्यासाठी गेलेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. नाशिक येथील अन्न सुरक्षा अधिकारी राहुल संपतराव ताकाटे (वय ३२) हे अन्न आस्थापनाच्या तपासणीसाठी काल शहरात दुकानांना भेटी देण्यासाठी आले होते.

हिरे, शेलार भाजपच्या वाटेवर?

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या आघाडीत बिघाडी होण्यास सुरुवात झाली आहे. खुशमस्करी करणाऱ्यांनाच पक्षात प्राधान्य दिले जाते. सच्चा कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर हिरे व काँग्रेसचे राजाभाऊ शेलार यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महामार्गावर अपघातात एक ठार

$
0
0
नाशिक-पुणे महामार्गावर शुक्रवारी पळसेजवळ झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

म्हसरूळ येथील ३५ अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त

$
0
0
पंचवटी विभागातील म्हसरूळ गावातील मनपा कार्यालय ते कॅनॉलपर्यंतच्या रस्त्यावरील ३५ अतिक्रमणे अतिक्रमण विभागाच्या पथकाने जमीनदोस्त केली. गुरूवारी सुरू झालेली अतिक्रमण मोहिम दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.

जनतेची काम वेगाने करा

$
0
0
भारतात जरी मोदी लाट आली असेल, तरी राज्यात मात्र आघाडीचेच सरकार येईल, असा दावा करतानाच उर्वरित चार महिन्यांत नागरी कामे गतीने करण्याच्या सूचना शासकीय अधिका-यांना दिल्या असल्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले.

अपघातात मायलेक ठार

$
0
0
इगतपुरी येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिंप्री फाट्यावर रस्ता ओलांडत असताना मारुती सुझुकी कारने सायकलवर जात असलेल्या मायलेकांना धडक दिल्यान तेे जागीच ठार झाले तर त्यांचा सहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

रेडीरेकनरःमहसूलमंत्र्यांना साकडे

$
0
0
चालू आर्थिक वर्षात रेडीरेकनरच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे व्यवहार थंडावले आहेत. स्टॅम्पड्युटीचे दर वाढूनही सरकारला अपेक्षित महसूलापेक्षा निम्माही महसूल आतापर्यंत मिळाला नाही. त्यामुळे हे दर पूर्ववत करावेत, यासाठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले.

दिनकर पाटील शिवसेनेच्या वाटेवर

$
0
0
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसमधून बंडखोरी करत बहुजन समाज पक्षात दाखल झालेले दिनकर पाटील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजते. पाटील यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांची भेट घेतली आहे.

अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला पाठबळ

$
0
0
मार्च महिन्यात बदली झालेले महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्या स्वाक्षरीनिशी तीन अधिकाऱ्यांना २७ मे रोजी पदोन्नती देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासन उपायुक्तांनी याबाबत कानावर हात ठेवला तर लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही ऑर्डर असल्याचा यु​क्तिवाद संबंधीत अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

नोकरीचे आमिष, तरुणांची फसवणूक

$
0
0
पाथर्डी परिसरातील एका व्यवसाय प्रश‌िक्षण मार्गदर्शन केंद्रात नोकरीच्या नावाखाली फसवणूक केली जात असल्याचा आरोप राज्यभरातून आलेल्या सुमारे दीडशे उमेदवारांनी केला. हा आरोप करतानाच या प्रश‌िक्षण केंद्राच्या प्रांगणात दोन तास चाललेल्या गोंधळामुळे राज्याच्या व‌िव‌िध भागातून आलेल्या उमेदवारांच्या पदरी न‌िराशा पडली.

गाडी जाळल्याप्रकरणी गुन्हा

$
0
0
गाडी आडवी का लावली असे विचारल्या वरुन एकाने सफारी गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. सफारी मालक शाम भंदुरे यांच्या फिर्यादीवरुन सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक जी. जे. गायकवाड करत आहेत.

पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

$
0
0
शांतीनगर भागात पिण्याच्या पाणी वेळेवर मिळत नसल्याने महिलांचे प्रचंड हाल होतात. अनेकदा दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने संतापलेल्या महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी सिडको विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

‘स‌िनेटमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव करू’

$
0
0
‘महाव‌िद्यालयीन स्तरापासून तर सर्वच क्षेत्रांमध्ये मह‌िलांनी बुध्दीमत्तेची चुणूक दाखव‌िली आहे. आरोग्य व‌िद्यापीठाच्या सोहळ्यातही सुवर्ण पदकांच्या यादीत मह‌िलांचेच वर्चस्व राहीले. असे होऊनही स‌िनेटसारख्या ठ‌िकाणी अद्याप मह‌िलांचे प्रमाण तुलनेने कमी आढळते.

घरेलू कामगारांना सन्मानधन

$
0
0
घरेलू कामगारांसाठी मंडळ स्थापन झाल्यानंतर आता या मंडळाच्यावतीने ५५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या घरेलू कामगारांना दहा हजार रुपये सन्मानधन देण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील घरेलू कामगारांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

राजकीय पक्षांची अनास्था

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीकडे राजकीय पक्षांनी पाठ फिरविली. केवळ भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

अंतिम मतदार यादी ३१ जुलैला

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी सुरु झाली असून येत्या ९ जून रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर येत्या ३१ जुलैला विधानसभेसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यापार्श्वभूमीवर मतदारांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची गरज आहे.

बहुविकलांगांसाठी प्रयत्नांचा श्री‘गणेशा’

$
0
0
लहान बहीण डाऊन सिंड्रोमने ग्रस्त... घरची परिस्थितीही हलाखीची... बहिणीच्या आजारपणामुळे कोलमडलेल्या घराची जबाबदारी विशीतील गणेश सूर्यवंशीच्या खांद्यावर आली. परिस्थितीशी झुंजण्यासाठी घरांना पेंटिंग करण्याची कामे करीत गणेशने स्पेशल एज्युकेशनमध्ये डीएड पूर्ण केले.

वैद्यकीय व‌िभागातील सर्व रिक्त पदे भरणार

$
0
0
‘राज्यातील आरोग्याचे प्रश्न अध‌िक सक्षमतेने सोडव‌िण्यासाठी वैद्यकीय व‌िभागातील सर्व रिक्त पदे अल्पावधीत भरू. वैद्यकीय श‌िक्षण मंत्री म्हणून म‌िळालेल्या अल्प कालावधीतही आगामी काळात व्यापक व जनह‌िताचे न‌िर्णय घेण्यास प्राधान्य द‌िले जाईल’, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय श‌िक्षण मं‌त्री व महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाचे प्र-कुलपती ज‌ितेंद्र आव्हाड यांनी द‌िले.

बिटको हॉस्पिटलवर विधानसभेतच ‘उपचार’

$
0
0
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यामध्ये नवीन बिटको हॉस्पिटलचा प्रश्न आपण उपस्थित करणार असून दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती आमदार बबनराव घोलप यांनी दिली.

‘भ्रष्टाचाराला सरकारने पाठीशी घातले’

$
0
0
आदर्श घोटाळा प्रकरणात नावे असलेल्या जयराज फाटक आणि प्रदीप व्यास या अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू करणे म्हणजे भ्रष्टाचाराला हे सरकार संरक्षण देते आहे. फाटक आणि व्यास कितपत दोषी आहेत हे शोधण्याचे काम सरकारने विशेष समितीकडे सोपविले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images