Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कारच्या धडकेत दोघे जखमी

0
0
मेरी लिंक रोडने जाणाऱ्या मोटारसायकलला अल्टो कारने धडक दिल्याने वाहनचालक सदाशिव गंभीरे व मागे बसलेल्या लक्ष्मीबाई मनोहर चव्हाण जखमी झाले. याप्रकरणी अल्टोकार चालविणाऱ्या नंदू काशिनाथ पगार याच्याविरोधात सदाशिव गंभीरे यांनी तक्रार नोंदवली असून पंचवटी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला आहे.

‘विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड रुजावी’

0
0
‘शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड रुजायला हवी. त्यादृष्टीने शालेय स्तरावरच अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी सर्व घटकांचे एकत्र‌ित प्रयत्न गरजेचे आहेत,’ असे प्रत‌िपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. अरूण जामकर यांनी केले.

सहकार भारतीचे उद्यापासून प्रदेश अधिवेशन

0
0
सहकार क्षेत्रात ३४ वर्षांपासून बहुमुल्य योगदान देणाऱ्या सहकार भारती या संस्थेचे ९ वे प्रदेश अधिवेशन नाशिकच्या मुंबई नाक्याजवळील भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात ३१ मे व १ जून रोजी संपन्न होत असून माजी केंद्रीय अर्थमंत्री पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.

नाशिकला रेल्वे टर्मिनल उभारावे

0
0
जगात सर्वाधिक झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत नाशिक सोळाव्या स्थानी आहे. राज्यात मुंबई, पुणे नंतर सर्वाधिक झपाट्याने विकसित होणारे नाशिक शहर आहे. राज्यातील चौथे मोठे शहर म्हणूनही नाशिकची ओळख आहे. मात्र, या शहराला गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

घोटीसाठी मनसेची तयारी

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी तालुका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घोटी येथे राजारात साळवी मंगल कार्यालयात झाली. आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात बैठकीत मंथन करण्यात आले.

अतिसूक्ष्म आराखडा तयार करा

0
0
आगामी सिंहस्थ हा मान्सूनच्या काळात होणार असल्याने त्या काळात उदभवू शकणाऱ्या आपत्ती लक्षात घेवून जिल्ह्यातील संबंधित यंत्रणानी आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करावे. त्यासाठी अतिसूक्ष्म आराखडा तयार करावा, अशी सूचना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ सल्लागार निवृत्त मेजर जनरल व्ही. के. दत्ता यांनी केले.

सर्वपक्षीय इच्छुकांची लगबग

0
0
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६० व प्रभाग क्रमांक १७ मध्ये २९ जून रोजी पोटनिवडणूक होत असून, सर्वच पक्षांचे इच्छूक कामाला लागले आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विहितगाव-वडनेर (प्रभाग क्र. ६०)मध्ये, तर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक दिनकर पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या शिवाजीनगर (प्रभाग क्र.१७) मध्ये पोटनिवडणुकीचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे.

पावसात घरांचे नुकसान

0
0
जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावणाऱ्या मान्सून पूर्व पावसामुळे बुधवारी हजारो घरांचे नुकसान झाले तर वीज पडून दोन लहान मुलांचाही बळी गेला आहे.

स्टेनो परीक्षेचे ढिसाळ नियोजन

0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‌शहरातील गजबजलेल्या सिडको परिसरात ‘गर्व्हमेंट कमर्शिअल सर्टिफिकेट’च्या (जीसीसी) स्टेनो अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या घेतल्या जात आहेत. मात्र, परिषद आणि संबंधित शाळा व्यवस्थापनामध्ये समन्वयाच्या अभावामुळे परीक्षांना गुरुवारी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

‘NCP’चा वर्धापन दिन आला, पण...

0
0
सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील उदयानंतर वेगळी चूल मांडत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला येत्या १० जून रोजी १५ वर्षे पूर्ण होत आहेत. नेहमी जल्लोषात साजरा होणाऱ्या ‘राष्ट्रवादी’च्या वर्धापन दिनावर यंदा मात्र, लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे सावट आहे.

अशी घडली अद्दल

0
0
उपदेश हे फार मोठे शस्त्र आहे. परंतु त्याचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा नाहीतर तो कधीही अंगलट येऊ शकतो. योग्य माणसाला समजावणीच्या स्वरात दोन शब्द सांगितल्यास तो ऐकतो मात्र हेच चुकीच्या माणसाला सांगायला गेल्यास तो सांगणाऱ्यासाठी तापच होऊन बसतो.

मारहाणीत विवाहितेचा मृत्यू

0
0
बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील तरुण विवाहितेचा बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू, नणंद यांना अटक केली आहे.

भीषण टंचाईतही मिळेना टँकरला मंजुरी

0
0
इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामारे जावे लागत आहे. तालुका प्रशासनाने १७ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रांताधिकाऱ्यांकडून केली आहे. मात्र, महिनाभरात एकाही टंचाईग्रस्त गावाला प्रांताधिकाऱ्यांनी भेट दिलेली नसून टँकरही मंजूर केलेले नाहीत.

रिकाम्या हाती परतले जप्ती पथक

0
0
देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर जप्तीसाठी मोठ्या पोलिस बंदोबस्तासह आलेल्या महाराष्ट्र सहकारी बँकेच्या पथकाला शुक्रवारी कारखान्याच्या सभासदांसह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या प्रखर विरोधाला तोंड देत रिकाम्या हाती परतावे लागले.

डीटीएडची अर्जव‌िक्री सोमवारपासून

0
0
शैक्षण‌िक वर्ष सन् २०१४-१५ साठी डीटीएड (अध्यापन श‌िक्षण पदव‌िका) अर्जव‌िक्रीला सोमवारपासून (ता. २ जून) सुरुवात होणार आहे. १६ जूनपर्यंत अर्ज विक्री सुरू राहणार असून, १७ जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

वीज समस्येला महाव‌ितरणच जबाबदार

0
0
अवकाळी पावसाच्या जोरदार तडाख्याने शहरात मोठ्या प्रमाणावर व‌‌िजेच्या लपंडावासह इलेक्ट्रिक पोल आण‌ि तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाळ्या अगोदर शहरातील वृक्षांची छाटणी महाव‌ितरणने न केल्यानेच ही वेळ ओढवली असल्याचा सूर महापौरांच्या ‘रामायण’ बंगल्यात आयोज‌ित बैठकीत उमटला.

पायाभूत सुविधांकडे लक्ष देणार

0
0
अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) ची २९ वी वार्षिंक सर्वसाधारण सभा आयमाच्या के. आर. बुब सभागृहात पार पडली. यावेळी आयमाचे नूतन अध्यक्ष विवेक पाटील यांनी कंपन्यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन केले.

अन् महापालिकेची यंत्रणा झाली जागी

0
0
नवीन बिटको हॉस्पिटलच्या कामात गोसावीवाडीतील सार्वजनिक शौचालयांचा अडथळा येत आहे. त्याचे हजारो लिटर पाणी दररोज हॉस्पिटलच्या पायाच्या ठिकाणी पाझरून खोदाई व पाया भरणीचे काम रेंगाळले आहे.

रस्त्यांची दुरुस्तीच गेली ‘खड्ड्यात’

0
0
मान्सून बरसण्यास सुरुवात होण्याची वेळ आलेली असताना अद्यापही पावसाळापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांना गती मिळालेली नाही. पावसाळा सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून, महापालिकेने अद्यापपर्यंत अवघ्या १ हजार ६१ खड्ड्यांची दुरुस्ती केली आहे.

‘येवला मतदारसंघ भाजपला सोडा’

0
0
येवलाः येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असून आगामी विधनसभा निवडणुकीसाठी येवला मतदारसंघ भाजपाला सोडण्यात यावा, अशी मागणी जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नानाभाऊ लहरे पाटील यांनी केली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images