Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्थायीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच

0
0
काँग्रेसचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायी समिती सदस्यात्वाचा अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून गांगुर्डे आपला मोबाइल बंद करून अज्ञात ठिकाणी रवाना झाल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे.

पन्नास हजार इमारतींचे ‘ऑड‌िट’

0
0
शहरातील ३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी महापालिकेने तीन संस्थांची नियुक्ती केली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात ४० ते ६० वर्ष जुन्या इमारतींच्या ऑड‌िटचे काम हाती घेतली जाण्याची शक्यता असून टाळाटाळ करणाऱ्या घरमालकांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

रासेगाव शिवारात मृतदेह आढळला

0
0
नासिक पेठ रस्त्यावर दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात एका अनोळखी वृद्धाचा बेवारस मृतदेह आढळला. वृद्धाचा मृत्यू मारहाण व गळा आवळून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दिंडोरी पोलीसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा केला आहे.

‘संत नामदेवांचे पंढरपुरात स्मारक हवे’

0
0
तीर्थनगरी असलेल्या पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांचे स्मारक राज्य सरकारने उभारावे, असा ठराव नामदेव समाजोन्नती परिषदेच्या ५३ व्या अधिवेशनात शनिवारी करण्यात आला. शिंपी समाजातील पोटजातींनी एकत्र येत ओबीसीला बळ द्यावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिवेशनात केले.

रुंदीकरणासाठी अतिक्रमण कारवाई

0
0
नाशिक शहरातील रस्ते रुंदीकरणात येणारे अतिक्रमण काढण्याचा महापाल‌िकेने धडाकाच लावला आहे. शनिवारी राजीवनगर येथील रस्ते रुंदीकरणात येणाऱ्या दीडशे झोपड्यांचे अतिक्रमण महापाल‌िकेने शनिवारी काढले.

कॉम्प्युटरमध्ये ‘फीट’ करा

0
0
तंत्रज्ञानाचा कितीही बोलबाला झालेला असला तरी अनेकदा यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंग्लिश शब्दांची गडबड झालेली आपल्याला दिसतेच. विशेषत: सरकारी कार्यालयांमध्ये हा प्रकार हटकून असतोच. नुकताच असा एक प्रकार शहरातील एका पोलिस स्टेशनमध्ये घडला.

दिंडोरीचा ‘मार्ग’ अखेर झाला प्रशस्त!

0
0
आगामी सिंहस्थासाठी प्रस्तावित असलेल्या दिंडोरी रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाले आहे. हा रस्ता ३० मीटर रुंदीचा होणार असल्याने या मार्गावरील वाहतुकीची कोंडी दूर होतानाच आगामी सिंहस्थात वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.

वाढीव घरपट्टीवर दोनशे उद्योजकांच्या हरकती

0
0
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात उद्योजकांनी रांगा वाढीव घरपट्टीवर हरकती नोंदविल्या. २९, ३० व ३१ मे या तीन दिवसांत जवळपास दोनशे उद्योजकांनी वाढीव घरपट्टीबाबत आक्षेप नोंदवले.

सातपूरला रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या

0
0
एकाच रात्रीत घरफोडीच्या चार घटना सातपूर भागात घडल्या आहेत. शनिवारी (ता.३१)च्या मध्यरात्रीनंतर या घटना घडल्या. मात्र, घरफोडी झालेल्या घरांचे मालक गावी गेलेले असल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

अहिल्यादेवींचे कार्य प्रेरणादायी

0
0
अहिल्यादेवी होळकर यांचे सार्वजनिक क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या जीवनात सर्व समाजातील लोकांच्या उध्दारासाठी व विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली.

महिंद्राचे शटडाऊन; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

0
0
नाशिक जिल्ह्यातील मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील उत्पादन सात दिवस बंद आहे. त्याचा फटका महिंद्रावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या दोनशेपेक्षा अधिक छोट्या-मोठ्या कंपन्याना बसला असून, शहरात कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.

एसटीने साजरा केला परिवहन दिन

0
0
एसटी महामंडळाचा वर्धापनदिन परिवहन दिन म्हणून साजरा केला जात असतानाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासी वाहतूक आणि सौजन्यशील सेवेची शपथ देण्यात आली.

सहकार मोडीत काढण्याचा डाव

0
0
सहकारात मोठी ताकद असून, राज्यातील अनेक नेतृत्व याच माध्यमातून पुढे आले आहेत. तरीही ग्रामीण अर्थकारणाची ही वाहिनी बंद करुन सहकार चळवळ मोडीत काढण्याचा काही जण प्रयत्न करीत आहेत.

महिला पदाधिकारी ना‘राज’

0
0
मनसेतील महिला पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत काही महिला पदाधिकारी लवकरच पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

श्रीराम शेटेंना विधानपरिषदेवर घ्या

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांची राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यपदी वर्णी लावावी यासाठी नासिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून त्यांना साकडे घातले आहे.

पारुंडेलाही मिळणार सिंहस्थनिधी

0
0
पुणे जिल्ह्यातील पारुंडे या गावालाही सिंहस्थ निधी उपलब्ध होणार आहे. पारुंडे येथील विविध विकासकामांचा प्रस्ताव नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला आहे.

भूसंपादनानेच महापालिका हतबल

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या विविध कामांवर आजवर ९० कोटी ४५ लाख रुपये खर्ची पडले आहेत. यातील बहुतांशी म्हणजे ५८ कोटी ५९ लाख रुपये फक्त भूसंपादनावरच खर्ची पडले असल्याने महापालिकेला पैशांची चणचण भासू लागली आहे.

कोऱ्या शिधापत्रिका गहाळ झाल्यास कारवाई

0
0
शिधापत्रिका वाटपात होणाऱ्या काळाबाजाराला आता अंकुश लागणार आहे. कार्यालयातील कोऱ्या शिधापत्रिका जतन करणे व काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

येवल्यात तलाठ्यांची दुहेरी कसरत

0
0
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सजेवरील तलाठींच्या जागा रिक्त दिसत असून येवला तालुकाही त्याला अपवाद ठरलेला नाही. येवला तालुक्यातील एकूण ३४ सजांपैकी तब्बल ११ ठिकाणी कायमस्वरूपी तलाठी नसल्याने कार्यरत असलेल्या २३ तलाठ्यांपैकी ११ तलाठ्यांनाच आपल्या कायम सजेव्यतीरिक्त रिक्त जागीही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे.

सुहास कांदेना नांदगावमधून उमेदवारी

0
0
शिवसेनेत नव्याने दाखल झालेले आणि अल्पावधीतच मनमाडसह नांदगांवमधे विकासकामांचा धडाका लावणारे शिवसेना संघटक सुहास कांदे हे आता मनमाडचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आमच्याबरोबर विधानसभेत असतील, अशी ग्वाही शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी मनमाड येथे दिली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images