Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अब की बार... व्हॉट्स अॅप, ट्विटर

$
0
0
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सोशल मीडियामुळे निवडणुकांचे निकालही अगदी काही सेकंदात हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहचत होते.

लोकशाहीत ‘नोटा’चा बोलबाला

$
0
0
‘वरीलपैकी कोणालाही मत नाही’ म्हणजेच ‘नोटा’ या पर्यायाचा १९ हजार ८१३ मतदारांनी वापर केला. नोटाचा वापर पहिल्यादांच करण्यात आल्याने, याबाबत बरीच उत्सुकता निर्माण झाली होती.

महायुतीला आता विधानसभेचे वेध

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांवर प्रंचड बहुमताने उमेदवार विजयी झाल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता विधानसभेतही अशीच कामगिरी करीत जिल्ह्यातील सर्व चौदा जागा ताब्यात घेण्याचे वेध महायुतीला लागले आहेत.

भद्रकालीत ६ महिलांवर गुन्हा

$
0
0
शेजाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ तसेच मारहाण केल्याची कैफियत एका वृध्दाने न्यायालयात मांडली. न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले

$
0
0
अवकाळी पावसाने शनिवारी दुपारी पुन्हा एकदा नाशिक शहर व परिसरासह जिल्ह्याला झोडपून काढले. विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यांसह शहरात दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.

ट्रॅक्टरची ट्रॉलीसह लासलगावात चोरी

$
0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीस चोरीस गेला आहे. याबाबत नांदगाव तालुक्यातील मंगळने येथील पंढरीनाथ जगन्नाथ काकड यांनी सोमवारी रात्री उशिरा लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

त्र्यंबकला वीज कोसळून दोन ठार

जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसाचा दणका

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील विविध भागात मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार वादळामुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडली तर काही घरांचे छप्पर उडाली. अनेक ठिकाणी लग्नमंडप जमीनदोस्त झाली. झाडे उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. बागलाण, कळवण, इगतपुरी, नाशिक व सिन्नर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

वृक्षतोडीच्या बदल्यात तीन हजार रोपांची लागवड

$
0
0
नाशिकरोड ते सिन्नर या रस्त्याचे रुंदीकरण अद्याप रखडले असले तरी या कामात तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात तब्बल ३ हजार रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. येत्या गुरुवारी या रोपांची परिस्थिती तसेच पुनर्रोपण करावयाच्या झाडांचीही पाहणी केली जाणार आहे.

नाशिकरोड, सातपूर, सिडकोत दाणादाण

$
0
0
नाशिकरोड, सातपूर आणि सिडको परिसरात आज दुपारी तीनच्या सुमारास गारपीट आणि वादळीवा-यांसह अर्धा तास पाऊस झाला. वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. नाशिकरोड परिसरात तीन तास वीजपुरवठा खंडीत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर मदतकार्य केले.

वृक्ष कोसळण्यास महापालिकाच जबाबदार

$
0
0
मंगळवारी दिवसभर शहरात विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे करताना महापालिकेने झाडांचा कुठलाही विचार न केल्यानेच अनेक झाडांचा बळी गेला असल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत; आज कमी दाबाने पुरवठा

$
0
0
शहरात दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील बहुतांश भागात वीज पुरवठाखंडीत झाला. परिणामी सायंकाळी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवारी सकाळीही शहराच्या काही भागांत कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता संबंधीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

नगरपंचायतीसाठी कळवणकरांचा पाठिंबा

$
0
0
येथील ग्रामपालिकेचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी कळवणला विशेष ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखाने हात उंचावत नगरपंचायतीसाठी एकमुखी ठराव मंजूर केला.

नांदगावच्या भारनियमनप्रश्नी निर्देश

$
0
0
शहरातील जनतेवर कोणत्या निकषावर भारनियमन लादण्यात आले, याची विचारणा करीत भारनियमनाबाबत वस्तुस्थिती दर्शक अहवाल दोन दिवसात सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दिंडोरीकरांकडून नगरपरिषदेची मागणी

$
0
0
दिंडोरी ग्रामपालिकेचे रुपांतर नगरपंचायतमध्ये करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून दिंडोरी ग्रामपालिकेने मंगळवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामस्थांनी नगरपंचायतीला विरोध करत नगरपरिषद करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी केली.

आरोग्य व‌िद्यापीठाने अखेर नेमली चौकशी सम‌िती

$
0
0
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेड‌िकल कॉलेजमधील व‌िद्या‌र्थिनी प्र‌ियंका मुखर्जी ह‌िच्या आत्महत्येप्रकरणी नाश‌िकच्या आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाने चौकशी सम‌ितीची नेमणूक केली आहे. व‌िद्यापीठातील अॅण्टी रॅग‌िंग सेलच्या माध्यमातून ही सम‌िती या प्रकरणी तपास करुन व‌िद्यापीठाला अहवाल सादर करणार आहे.

झाड कोसळल्याने महापालिकाही अंधारात

$
0
0
पावसाच्या जोरदार तडाख्याने राजीव गांधी भवनमधील दोन ते तीन वृक्ष उन्मळून पडली. यातील एक झाड महापालिकेच्या जनरेटरवर पडल्याने महापालिकेत अंधार पसरला होता. शहरातील अनेक भागात झाडे पडून मोठे नुकसान झाल्याने महापौरांनी विविध ठिकाणांची पाहणी केली.

`नको आम्हाला हे अच्छे दिन...`

$
0
0
जेलरोडसह नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी नेत्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक लावले आहेत. महापालिका आणि पोलिस त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे नवीन खासदार तसेच आमदारकीसाठी उत्सुक असलेल्यांचे समर्थक होर्डिंग्ज जास्त प्रमाणात आहेत.

निम्म्या शहराने अनुभवला अंधार

$
0
0
वळवाच्या पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यासह शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडीत झाला. दुपारी अचानक आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी विजेच्या खांबांवर वृक्ष उन्मळून पडल्याने संपूर्ण शहरातील वीज खंडीत झाली.

अनुदानाचा नवीन पॅटर्न नुकसानकारक

$
0
0
‘मराठी चित्रपट निर्मात्यांना आता पहिल्या चित्रपटापासूनच अनुदान दिले जाते, तसेच अनुदानातून सी कॅटॅगरीच्या चित्रपटांना वगळण्यात आले आहे. हा निर्णय नुकसानकारक आहे.’ असे मत अभिनेत्री, दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी व्यक्त केले. ‘हुतूतू’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबत संवाद साधला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images