Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

न‌िकालापूर्वीच छोट्या पक्षांनी आकसले पंख

$
0
0
मोठ्या राजकीय पक्षांच्या तुलनेत अत्यंत तोकडे पडलेले छोट्या पक्षांचे संघटन, फसलेले प्रचारतंत्र अन् कुठेच नसलेल्या ताळमेळाच्या परिणामी न‌िकालानंतर या पक्षांचे नावही चर्चेत नव्हते.

फुलले रे क्षण माझे...

$
0
0
माझा हेमंत आता खासदार झाला. त्याच्या वडिलांचीही एकच इच्छा होती, खासदाराचे वडील म्हणूनच आपल्याला मरण यावं. आजे ते नाहीत परंतु, हेमंत खासदार झाल्याचे पाहून त्यांनाही नक्कीच मनोमन समाधान वाटत असेल... डोळ्यांतून घळाघळा येणारी आसवे पदराने टिपत हेमंत आप्पांच्या मातोश्री द्रौपदीबाई बोलत होत्या.

हरिश्चंद्र चव्हाणांच्या घरी उत्साहाला उधाण

$
0
0
दुसऱ्या तिसऱ्या फेरीपासूनच आघाडी घेतलेल्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या घरी जल्लोष व उत्साहाचे वातावरण होते. प्रत्येक फेरीला फटाके फोडण्यात येत. तसेच बॉक्सच्या बॉक्स भरून पेढे वाटण्यात येत होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून खासदार चव्हाण यांच्या घरी कार्यकर्ते येऊन थांबलेले होते.

सुरक्षित नव्हे, असुरक्षितच मतदारसंघ!

$
0
0
अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनी २ लाख ४७ हजार ९१६ एवढे विक्रमी मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. संपूर्ण देशभराप्रमाणेच या मतदारसंघातही भाजप व मोदी लाटेचा प्रभाव असल्याने चव्हाणांचा विजय सुकर होतानाच त्यांना मोठा लीड मिळाल्याचे स्पष्ट आहे.

मोदी लाटेत ‘विकासवारी’च्या गटांगळ्या

$
0
0
विकासकामांचा डोंगर उभा केल्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे मानणाऱ्या पालकमंत्री छगन भुजबळ यांचा तब्बल १ लाख ८७ हजार मतांनी झालेला पराभव त्यांच्या विकासवारीच्या गटांगळ्या स्पष्ट करणारा आहे.

भुजबळांचा दारुण पराभव, चव्हाणांची हॅटट्रिक

$
0
0
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजब‍ळ यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघातून तब्बल १ लाख ८७ हजार मतांनी दणदणीत पराभव करीत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी विजय मिळविला.

दोन्ही काँग्रेसचा सुपडा साफ

$
0
0
मोदींची लाट व आघाडी सरकारविषयीचा रोष या घटकांच्या एकत्रित परिणामांनी निर्माण झालेल्या महायुतीच्या त्सुनामीत उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला, मनसेचा फुगा फुटला आणि आम आदमी पक्षाचीही वाताहत झाली

लाथाडलेले मंत्रिपद फायद्याचे ठरले!

$
0
0
नंदुरबारमधून दहाव्यांदा विजयाचा विक्रम नोंदविण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसच्या माणिकराव गावित यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मंत्रिपद लाथाडले.

मोदी लाटेने तारले

$
0
0
भाजप शिवसेना नेत्यांची अखेरच्या टप्प्यापर्यंत सुरू असलेली धुसफूस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये घडून आलेल्या मनो‌मिलनामुळे भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयाचा मार्ग अवघड मानला जात होता. मात्र, नरेंद्र मोदींच्या देशभर सुरू असलेल्या लाटेमुळे डॉ. भामरे यांच्या विजय सोपा झाला.

खान्देशात फुलले ‘भाजप’चे कमळ

$
0
0
नंदुरबारमध्ये सलग नऊ वेळा निवडून येणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माणिकराव गावित यांची सद्दी डॉ. हीना गावित यांनी शुक्रवारी संपुष्टात आणली. १९८४ पासून खासदारकी भूषविणाऱ्या माणिकरावांना तब्बल एक लाख सहा हजार ९०५ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

भगवा फडकला, उत्साह बहरला!

$
0
0
भगव्या रंगामध्ये न्हाऊन निघालेले हजारो शिवसैनिक... हातांमध्ये डौलाने फडकणाऱ्या भगव्या पताका... फटाक्यांची आतषबाजी अन `आला रे आला, शिवसेनाचा वाघ आला’ या गगनभेदी गर्जनेने वातावरण दणाणले होते. हे चित्र होते अंबड वेअर हाऊस या मतमोजणी केंद्राबाहेरील. मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी नाशिककरांनीही खंबीर साथ दिल्याने अवघे शहर भगवेमय झाले.

महायुतीचा जल्लोष

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघात विविध घडामोडींनी केंद्रस्थानी राहिलेल्या सिन्नर तालुक्याने महायुतीचे हेमंत गोडसे यांना ४१ हजार मतांची आघाडी देऊन भुजबळांविरोधी आपला रोष व्यक्त केला. शहर व परिसरात प्रचड घोषणाबाजी व पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

भुजबळविरोधी लाट

$
0
0
नाशिक लोकसभा, तर येवला आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणाऱ्या भुजबळ कुटुंबियांविषयी सर्वसामान्यांमध्ये विरोधी लाट असल्याचे शुक्रवारच्या निकालातून स्पष्ट झाले. त्यामुळेच भुजबळ कुटुंबियांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने हा लाल सिग्नलच आहे.

नाशकात राष्ट्रवादीचा धुव्वा

$
0
0
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडाला असून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना नाशकात तब्बल १ लाख ८७ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला आहे.

नियमित परिश्रमातून यश शक्य

$
0
0
खेळाडूंनी नियमित सराव केल्यास निश्चित यश मिळते त्याकरता सातत्य आणि परिश्रम यांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी केले.

‘स्मार्ट स्टडी’लाच द्या प्राधान्य

$
0
0
कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना रात्र थोडी सोंगे फार असे आव्हान व‌िद्यार्थ्यांसमोर असते. अशावेळी व‌िद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता स्मार्ट स्टडीला प्राधान्य द्यायला हवे, असा सल्ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.राम खैरनार यांनी केले.

विहिरी विनावापर पडून

$
0
0
महापालिकेच्या मालकीच्याच पाण्याने भरलेल्या विहिरी वापराविना पडून आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मुबलक पाणी साठा असल्याने महापालिका स्वतःच्या मालकीच्या पाण्याच्या विहिरींकडे दुर्लक्ष का, असा सवाल नागरीक उपस्थित करत आहेत.

कॉम्बॅट प्रशिक्षण देशाच्या संरक्षणासाठी

$
0
0
कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलतर्फे दिले जाणारे कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन फ्लाईंग प्रशिक्षण हे सेनादलाचा आधार स्तंभ आहे, असे प्रतिप्रादन आर्मी एव्हीएशन सेंन्टर दिल्लीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल पी. के. भराली यांनी केले.

नरेंद्र मोदींची लाट अन् लीडची चर्चा

$
0
0
देशभरातील मोदी लाट, खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण यांना मिळालेले विक्रमी मताधिक्य, आघाडीच्या पराभवाची कारणे तसेच स्थिर केंद्र सरकारकडून अपेक्षा यासह अनेक विषयांवर शहरात दिवसभर चर्चेचे पेव फुटले होते.

उत्तर महाराष्ट्राला मंत्रीपद?

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे मुंबईला तर दिंडोरी मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिल्लीला रवाना झाले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images