Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कांदा रडवणार?

$
0
0
झणकेदार आणि टिकाऊ कांदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या उन्हाळ कांद्याला यंदा गारपीट आणि अवकाळी पावसाचा बट्टा लागला आहे. त्यामुळे हा कांदा घेण्यास व्यापाऱ्यांकडून सुरू असलेल्या नकारघंटेमुळे शेतकरी हतबल झाला आहे.

नाशिकची ‘खाऊगल्ली’

$
0
0
खवय्यांच्या अभिरुचीमुळे नाशिकमध्ये खाद्यसंस्कृतीही चांगलीच बहरली आहे. खाद्यपदार्थांच्या अनेक पद्धती व त्यासाठीची खास दुकानेही नाशिकमध्ये वर्षानुवर्षे आहेत. जसं की, जिलेबी खावी तर ‘बुधा’कडचीच, वडापाव म्हणजे ‘कृष्णाई’ला टक्कर नाही, जोडीला उपवासाचे पदार्थ द्यायला ‘सायंतारा’ आहेच, शौकीनांना चाटचा शौक पूर्ण करायचा असेल तर ‘शौकीन’चा पर्याय आहे.

आत्मविश्वासाची जोपासना

$
0
0
आत्मविश्वास हा काही सुट्टीच्या एक-दोन ‌महिन्यांच्या कार्यशाळेत शिकता येईल असा विषय नाही. आत्मविश्वास ही स्व-जाणीव आहे. आत्मविश्वास म्हणजे आत्मभानाची सगळ्यांना कळणारी अभिव्यक्ती आहे.

माणुसपणाकडे होणारी वाटचाल म्हणजेच व्यक्तिमत्व विकास

$
0
0
आपल्यातील माणुसपणाकडे होणारी वाटचाल म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होय. माणूसपणातूनच आपल्या व्यक्तिमत्वाला पूर्णत्व प्राप्त होते.

सारे काही खुर्चीसाठी

$
0
0
सोहळा कुठलाही असो. कधी राजकारणातला तर कधी समाजकारणातला. पण् सोहळा म्हटला क‌ि त्यात खुर्चीची अपरिहार्यता आलीच. आण‌ि खुर्ची आली क‌ि राजकारणही आपसूकच आले. यंदा न‌िवडणूका आण‌ि लग्नसराई असा माहोल एकाच वेळी आला होता. एकीकडे न‌िवडणूकांची लगबग सुरू होती तर दुसरीकडे लग्सोहळ्यांची.

रेशीम योजनांसाठी शंभर टक्के अनुदान

$
0
0
बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत राज्यात राबविण्यात येणा-या रेशीमविषयक अनेक योजनांतर्गत प्रकल्प खर्च व अनुदान मर्यादेत भरीव वाढ करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातुन अनेक बाबींसाठी शेतक-यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

दुसऱ्या दिवशाही अवकाळी पावसाची हजेरी

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, सटाणा तसेच देवळ्याच्या काही भागाला गुरूवारी दुपारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. मालेगाव तसेच मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली.

वैद्यकीय मदत मिळाली असती तर...

$
0
0
रेल्वेत प्रवासादरम्यानच वाढलेल्या प्रसव वेदना... मनमाड प्लॅटफॉर्मवर महिलेच्या वेदनांना ओ देणारी माणुसकी... बाळंतपण सुरक्षित व्हावे म्हणून सुरू झालेली धावपळ... त्यातच प्लॅटफॉर्मवर बाळानं जन्म घेतला मात्र, रेल्वेकडून प्लॅटफॉर्मवर तातडीने वैद्यकिय सुविधा ‌न मिळाल्याने अखेर ते बाळ दगावलं.

वाहतूक बेटांची महापौरांकडून पाहणी

$
0
0
नाशिक शहरातील विविध खासगी संस्थांना दिलेल्या व महापालिकेकडे असलेल्या वाहतूक बेटांची गुरुवारी महापौर अॅड. यतीन वाघ यांनी पाहणी केली.

कॉप्रिहन्स कंपनीमध्ये पगारवाढीचा तिढा कायम

$
0
0
औद्योगिक वसाहतीतील कॉप्रिहन्स कंपनीतील कामगारांना भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून सहा हजार चारशे रुपयांची पगारवाढ मिळाली. मात्र, कंपनीतील कामगार व भारतीय कामगार सेना यांच्यातच मतभेद निर्माण झाल्याचे समजते.

जेईई अॅडव्हान्स परीक्षा २५ मे रोजी

$
0
0
नुकताच जाहीर झालेला आयआयटी जेईईचा न‌िकाल, या पाठोपाठ पार पडलेल्या ऑल इंडिया पीएमटी आणि एमएचटी सीईटी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या मागोमाग आता २५ मे रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरात सुमारे २ लाख ३५ हजार व‌िद्यार्थी उत्तीर्ण झाले.

फायर स्टेशन्सला प्रतीक्षा मनुष्यबळाची

$
0
0
नाशिक शहरात असलेली फायर स्टेशन लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी पडत असून, त्यात आणखी वाढ करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या फायर स्टेशनला कर्मचाऱ्यांची टंचाई भासत असून, विद्यमान कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागतो.

निकालापूर्वीच मनसेत बदलाचे वारे

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष समीर शेटे यांना बाजुला सारत पक्षाने राहुल ढिकले यांची गुरूवारी नियुक्ती केली. याबरोबर शहर प्रवक्ता म्हणून शर्वरी लथ यांची निवड झाली असून, ना​शिकचे संपर्क अध्यक्ष म्हणून मुंबई येथील मसेनेचे पदाधिकारी अविनाश अभ्यंकर यांची निवड पक्षाने केली आहे.

गोडसेंना वैष्णोदेवी पावणार का?

$
0
0
विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, म्हणून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी वैष्णोदेवीला साकडे घातले आहे. तुळजापूरची भवानी माता, जेजुरीचा खंडेराया यांचेही दर्शन त्यांनी घेतले आहे. अजमेरच्या दर्ग्यावर मन्नतची चादर त्यांनी चढवली आहे.

सिंहस्थ कक्षाचे काम अखेर सुरू

$
0
0
पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या कक्षाचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झाले आहे. मात्र, या कक्षासाठी प्रस्तावित फॅसिलिटेशन सेंटरचा बळी देण्यात आला आहे.

नाशिकसाठी होणार १२१ राऊंड

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीचे सहा विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण १२१ राऊंड होणार आहेत. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून एकूण ६०० ते ६५० कर्मचारी मतमोजणीत सहभागी होणार आहेत.

नाशकात शिवसेनेचेच 'बळ'!

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसची हमखास निवडून येणारी जागा म्हणून जिच्याकडे पाहिले जात होते, त्या नाशिक मतदारसंघात सध्यातरी शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यावर ४० हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भुजबळांसह राष्ट्रवादी काँग्रेसचेही अवसान गळाले आहे.

छगन भुजबळांचा बीपी वाढला!

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या घरी रवाना झाल्याचे समजते.

वधू-वर, पंडित अन् पोलिसही ऑनलाइन

$
0
0
लग्नसराई सुरू असली तरी सर्वांचे लक्ष होते ते निवडणूक निकालावर. वधू-वरासह पंडित अन् बॅण्डवालेही वेळ मिळेल तेव्हा निवडणूक निकालाचे अपडेट घेत होते. विधी सुरू असतानाही मोबाइलची रिंग खणखणत होती.

मनसेच्या इंजिनची ‘पलटी’

$
0
0
शहरात ४० नगरसेवक, तीन आमदार, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत सत्ता असे सत्तेचे समीकरण असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त झाल्याने पक्षावर चांगलीच नामुष्की ओढवली आहे. अडीच लाखांवरून थेट ६३ हजार मतांवर आलेल्या मनसेच्या अस्तित्वाबाबतच निकालानंतर चर्चा झडू लागल्या आहेत.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images